तारण योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद औरंगाबाद : शेतमालावर कर्ज देण्यासाठी पणन विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या तारण योजनेस गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी आठ कोटी २६ लाख रुपयांचे कर्ज या योजनेतून शेतकऱ्यांनी घेतले होते. यावेळी शेतमालास मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांनी या योजनेस अल्प प्रतिसाद दिला आहे. मराठवाड्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत केवळ ११५ शेतकऱ्यांनी ५३५७ क्विंटल माल तारण ठेवत ७८ लाख ९६ हजारांचे कर्ज घेतले आहे, अशी माहिती पणन विभागातर्फे देण्यात आली.  पणन विभागातर्फे शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा, या उद्देशाने कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. यंदा खरिपादरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर रब्बीच्या पिकांवरही रोगराई आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचदरम्यान कर्जमफीची प्रक्रियाही सुरू असल्याने शेतकरी या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहेत. हेही वाचा -  येस बँक : एका नगरसेवकाने वाचवले महापालिकेचे २४० कोटी​   तसेच शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल तारण ठेवण्याऐवजी विक्रीस पसंती देत आहेत. पणन महामंडळातर्फे या योजनेची जनजागृती करूनही यंदा दर चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे.  हेही वाचा - कोरोनाला भिऊ नका, ही घ्या काळजी   मराठवाड्यात फक्त परभणी, जालना आणि हिंगोली येथील ११५ शेतकऱ्यांनी तारण कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे. या शेतकऱ्यांनी सोयाबीन, हळद हा शेतमाल तारण ठेवला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत आणि जिंतूर तर जालना जिल्ह्यातील परतूर, जवळा बाजार येथील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात मका व कापूस असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतलेला नाही व इतर जिल्ह्यांचीही अशीच काहीशी परिस्थिती असल्यामुळे अद्यापही तेथील शेतकऱ्यांनी तारण कर्ज योजनेचा लाभ घेतला नाही.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 9, 2020

तारण योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद औरंगाबाद : शेतमालावर कर्ज देण्यासाठी पणन विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या तारण योजनेस गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी आठ कोटी २६ लाख रुपयांचे कर्ज या योजनेतून शेतकऱ्यांनी घेतले होते. यावेळी शेतमालास मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांनी या योजनेस अल्प प्रतिसाद दिला आहे. मराठवाड्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत केवळ ११५ शेतकऱ्यांनी ५३५७ क्विंटल माल तारण ठेवत ७८ लाख ९६ हजारांचे कर्ज घेतले आहे, अशी माहिती पणन विभागातर्फे देण्यात आली.  पणन विभागातर्फे शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा, या उद्देशाने कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. यंदा खरिपादरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर रब्बीच्या पिकांवरही रोगराई आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचदरम्यान कर्जमफीची प्रक्रियाही सुरू असल्याने शेतकरी या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहेत. हेही वाचा -  येस बँक : एका नगरसेवकाने वाचवले महापालिकेचे २४० कोटी​   तसेच शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल तारण ठेवण्याऐवजी विक्रीस पसंती देत आहेत. पणन महामंडळातर्फे या योजनेची जनजागृती करूनही यंदा दर चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे.  हेही वाचा - कोरोनाला भिऊ नका, ही घ्या काळजी   मराठवाड्यात फक्त परभणी, जालना आणि हिंगोली येथील ११५ शेतकऱ्यांनी तारण कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे. या शेतकऱ्यांनी सोयाबीन, हळद हा शेतमाल तारण ठेवला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत आणि जिंतूर तर जालना जिल्ह्यातील परतूर, जवळा बाजार येथील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात मका व कापूस असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतलेला नाही व इतर जिल्ह्यांचीही अशीच काहीशी परिस्थिती असल्यामुळे अद्यापही तेथील शेतकऱ्यांनी तारण कर्ज योजनेचा लाभ घेतला नाही.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38xGlic

No comments:

Post a Comment