पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाण घटले पुणे - कोरोनाचा शहरात उद्रेक झाल्यामुळे धास्तावलेले नागरिक घरातच थांबत असल्यामुळे वाहतूक क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. विमान, एसटी, रेल्वे आणि पीएमपी बसच्या प्रवाशांची संख्या किमान २५ टक्‍क्‍यांपर्यंत घटली आहे. यात प्रामुख्याने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण कमी झाले असून शहरातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढती आहे.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  रेल्वे आरक्षण रद्द करण्याचा ट्रेंड पुण्याकडे रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या घटली आहे. लांब पल्ल्याच्या तसेच जवळच्या अंतराच्या प्रवाशांचा त्यात समावेश आहे. तसेच दौंडवरून पुण्याकडे येणाऱ्या आणि लोणावळा- पुणे मार्गावरील प्रवाशांचाही त्यात समावेश आहे, अशी माहिती रेल्वेतील अधिकृत सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. नियोजीत रेल्वे प्रवासाचे आरक्षण रद्द करण्याचाही ‘ट्रेंड’ आला आहे. नेमकी किती आरक्षणे रद्द झाली आहेत, याचा एकत्रित तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. मात्र, पुणे विभागात वेगवेगळ्या स्थानकांवरून वेगवेगळ्या प्रवासाची आरक्षणे रद्द होत आहेत. तसेच ‘आयआरसीटीसी’च्या सहलीही रद्द करण्यात   येत आहे अथवा पुढे ढकलल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. मात्र, कोरोनामुळे एकही रेल्वेगाडी अद्याप रद्द केलेली नाही.  कोरोनामुळे पुण्यात रस्त्यांवर शुकशुकाट (फोटो फीचर) पीएमपीलाही फटका पीएमपीचे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवासी पाच दिवसांत सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घटले आहेत. त्याचा फटका उत्पन्नावरही झाला आहे. एरवी सरासरी ११ ते ११.५० लाख प्रवाशांची वाहतूक सुरू होती. सध्या ही वाहतूक ९ ते ९. ५० लाखांवर आली आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्नही एक कोटी ६० लाख रुपयांवरून एक कोटी २५ लाखांवर आले आहे, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. प्रवाशांच्या सोयीसाठी गर्दी कमी असली तरी, बस सेवा सुरू ठेवली आहे. काही परीक्षा सुरू असल्यामुळे कोठेही मार्ग बदलले नाहीत. फिनेलचा दररोज वापर करून बसचे निर्जंतुकीकरण करावे, प्रत्येक फेरीनंतर बस स्वच्छ करूनच त्या मार्गांवर सोडण्याचे आदेश १४ आगारांना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. चालक-वाहकांनी सॅनिटायझरचा वापर करावा आदी सूचनाही प्रशासानने त्यांना दिल्या आहेत. एसटीचे ३० टक्के प्रवासी घटले  शहरात स्वारगेट, पुणे स्टेशन व वाकडेवाडी ही एसटीची प्रमुख स्थानके आहेत. या तीनही स्थानकांतून दररोज ४५०० बसेसची ये-जा होते. मात्र, पाच सहा दिवसांपासून शहरांतून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढती आहे तर, पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या विभागीय वाहतूक नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. एसटीची एरवीपेक्षा प्रवाशांची संख्या ३० टक्‍क्‍यांनी घटली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांचा त्यात समावेश आहे. एसटीच्या गाड्यांची वाहतूक नियमितपणे सुरू आहे. तसेच बस मार्गावर सोडण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आरक्षण केंद्रावर प्रवाशांकडून पैसे देण्या-घेण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझर ठेवले आहे. बस स्वच्छ केल्याशिवाय मार्गावर सोडली जात नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 15, 2020

पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाण घटले पुणे - कोरोनाचा शहरात उद्रेक झाल्यामुळे धास्तावलेले नागरिक घरातच थांबत असल्यामुळे वाहतूक क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. विमान, एसटी, रेल्वे आणि पीएमपी बसच्या प्रवाशांची संख्या किमान २५ टक्‍क्‍यांपर्यंत घटली आहे. यात प्रामुख्याने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण कमी झाले असून शहरातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढती आहे.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  रेल्वे आरक्षण रद्द करण्याचा ट्रेंड पुण्याकडे रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या घटली आहे. लांब पल्ल्याच्या तसेच जवळच्या अंतराच्या प्रवाशांचा त्यात समावेश आहे. तसेच दौंडवरून पुण्याकडे येणाऱ्या आणि लोणावळा- पुणे मार्गावरील प्रवाशांचाही त्यात समावेश आहे, अशी माहिती रेल्वेतील अधिकृत सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. नियोजीत रेल्वे प्रवासाचे आरक्षण रद्द करण्याचाही ‘ट्रेंड’ आला आहे. नेमकी किती आरक्षणे रद्द झाली आहेत, याचा एकत्रित तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. मात्र, पुणे विभागात वेगवेगळ्या स्थानकांवरून वेगवेगळ्या प्रवासाची आरक्षणे रद्द होत आहेत. तसेच ‘आयआरसीटीसी’च्या सहलीही रद्द करण्यात   येत आहे अथवा पुढे ढकलल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. मात्र, कोरोनामुळे एकही रेल्वेगाडी अद्याप रद्द केलेली नाही.  कोरोनामुळे पुण्यात रस्त्यांवर शुकशुकाट (फोटो फीचर) पीएमपीलाही फटका पीएमपीचे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवासी पाच दिवसांत सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घटले आहेत. त्याचा फटका उत्पन्नावरही झाला आहे. एरवी सरासरी ११ ते ११.५० लाख प्रवाशांची वाहतूक सुरू होती. सध्या ही वाहतूक ९ ते ९. ५० लाखांवर आली आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्नही एक कोटी ६० लाख रुपयांवरून एक कोटी २५ लाखांवर आले आहे, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. प्रवाशांच्या सोयीसाठी गर्दी कमी असली तरी, बस सेवा सुरू ठेवली आहे. काही परीक्षा सुरू असल्यामुळे कोठेही मार्ग बदलले नाहीत. फिनेलचा दररोज वापर करून बसचे निर्जंतुकीकरण करावे, प्रत्येक फेरीनंतर बस स्वच्छ करूनच त्या मार्गांवर सोडण्याचे आदेश १४ आगारांना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. चालक-वाहकांनी सॅनिटायझरचा वापर करावा आदी सूचनाही प्रशासानने त्यांना दिल्या आहेत. एसटीचे ३० टक्के प्रवासी घटले  शहरात स्वारगेट, पुणे स्टेशन व वाकडेवाडी ही एसटीची प्रमुख स्थानके आहेत. या तीनही स्थानकांतून दररोज ४५०० बसेसची ये-जा होते. मात्र, पाच सहा दिवसांपासून शहरांतून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढती आहे तर, पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या विभागीय वाहतूक नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. एसटीची एरवीपेक्षा प्रवाशांची संख्या ३० टक्‍क्‍यांनी घटली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांचा त्यात समावेश आहे. एसटीच्या गाड्यांची वाहतूक नियमितपणे सुरू आहे. तसेच बस मार्गावर सोडण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आरक्षण केंद्रावर प्रवाशांकडून पैसे देण्या-घेण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझर ठेवले आहे. बस स्वच्छ केल्याशिवाय मार्गावर सोडली जात नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39REruc

No comments:

Post a Comment