आता पुढची फाशी कोल्‍हापुरातील या दोन भगिनींना? केला तब्बल ४२ मुलांचा खून औरंगाबाद - निर्भयाच्या बलात्काऱ्यांनंतर आता पुढची फाशी कोल्‍हापुरातील दोन भगिनींना होण्‍याची शक्‍यता आहे. रेणुका शिंदे आणि सीमा गावीत अशी त्‍यांची नावे आहेत. त्‍यांनी ४२ मुलांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याचा आरोप होता. त्‍यातील नऊ मुलांची हत्‍या केल्‍याचे सिद्ध झाले. त्‍यामुळे त्‍यांना मृत्युदंड ठोठावण्‍यात आला. राष्‍ट्रपतींनी त्‍यांची दया याचिका फेटाळलेली आहे. देश स्‍वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत एकाही महिला गुन्‍हेगाराला मृत्युदंड दिला गेला नाही. त्‍यामुळे यांना जर मृत्युदंड दिला तर या देशातील मृत्युदंड झालेल्या पहिल्या महिला ठरणार आहेत.   नेमके काय आहे प्रकरण? सैतानालाही लाजवेल अशा या क्रूर हत्‍याकांडाची मुख्‍य सूत्रधार रेणुका आणि सीमा यांची आई अंजनाबाई गावीत ही होती. स्वतः आई असलेली ही स्त्री आणि तिच्या दोन मुलीच्‍या मदतीने इतरांच्या बालकांना पळवून नेत होत्‍या. त्‍यानंतर दमदाटी करून किंवा निरागस मुलांकडून भीक मागून घेतले जात होते. एखाद्या मुलाने जर या बाबत कुणाला काही सांगितले तर त्‍याला ठार मारले जात होते. अशा प्रकारे त्‍यांनी ४२ मुलांना ठार केल्‍याचा आरोप होता. पोलिसांकडे त्‍याची त्‍यांनी कबुलीही दिली; पण ४२ पैकी नऊ हत्‍या झाल्‍याचे न्‍यायालयात सिद्ध झाले. २९ ऑक्‍टोबर १९९६ ला हे बालहत्याकांड उघडकीस आले. यामुळे सारा महाराष्ट्र हादरला होता. सुरवातीला अंजनाबाई एकटीच मुलांना पळवीत असे. नंतर तिने दोन्ही मुलींना त्यात सामील करून घेतले. १९९० च्या सुमारास त्यांनी मुलांना पळवण्यास सुरवात केली. चोरी, पाकीटमारी करण्यासाठी एक ते तेरा वर्षांपर्यंतच्या बालकांना पळवून त्यांचा खून केल्याचे हे प्रकरण आहे. वर्ष १९९७ मध्‍ये अंजनाबाईचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे आता रेणुका आणि सीमाच उरल्‍या आहेत. क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी    फॅक्ट फाईल  १९९० ते १९९६ या काळात रेणुका, तिचा पती किरण शिंदे, बहीण सीमा आणि आई अंजनाबाई गावीत यांनी ४२ लहान मुलांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप होता. त्यातील नऊ मुलांचा निर्घृण खून करण्यात आल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. अंजनाबाईचा १७ डिसेंबर १९९७ ला कारागृहात मृत्यू झाला.  किरण शिंदे हा या खटल्यात माफीचा साक्षीदार झाला होता.  रेणुका व सीमा यांच्यावर खटला चालविण्यात आला.  २८ जून २००१ ला कोल्हापूरमधील सेशन कोर्टाने या दोघींना नऊ मुलांचा खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली.  रेणुका व सीमाने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. हायकोर्टाने ८ सप्टेंबर २००४ ला सेशन कोर्टाचा फाशीच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाला या बहिणींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही ३१ ऑगस्ट २००६ ला त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. फाशीची शिक्षा माफ करावी यासाठी त्यांनी केलेला दयेचा अर्ज जुलै २०१४ मध्ये राष्ट्रपतींनी फेटाळल्याने त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले आहे.  मृत्युदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला... News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 19, 2020

आता पुढची फाशी कोल्‍हापुरातील या दोन भगिनींना? केला तब्बल ४२ मुलांचा खून औरंगाबाद - निर्भयाच्या बलात्काऱ्यांनंतर आता पुढची फाशी कोल्‍हापुरातील दोन भगिनींना होण्‍याची शक्‍यता आहे. रेणुका शिंदे आणि सीमा गावीत अशी त्‍यांची नावे आहेत. त्‍यांनी ४२ मुलांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याचा आरोप होता. त्‍यातील नऊ मुलांची हत्‍या केल्‍याचे सिद्ध झाले. त्‍यामुळे त्‍यांना मृत्युदंड ठोठावण्‍यात आला. राष्‍ट्रपतींनी त्‍यांची दया याचिका फेटाळलेली आहे. देश स्‍वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत एकाही महिला गुन्‍हेगाराला मृत्युदंड दिला गेला नाही. त्‍यामुळे यांना जर मृत्युदंड दिला तर या देशातील मृत्युदंड झालेल्या पहिल्या महिला ठरणार आहेत.   नेमके काय आहे प्रकरण? सैतानालाही लाजवेल अशा या क्रूर हत्‍याकांडाची मुख्‍य सूत्रधार रेणुका आणि सीमा यांची आई अंजनाबाई गावीत ही होती. स्वतः आई असलेली ही स्त्री आणि तिच्या दोन मुलीच्‍या मदतीने इतरांच्या बालकांना पळवून नेत होत्‍या. त्‍यानंतर दमदाटी करून किंवा निरागस मुलांकडून भीक मागून घेतले जात होते. एखाद्या मुलाने जर या बाबत कुणाला काही सांगितले तर त्‍याला ठार मारले जात होते. अशा प्रकारे त्‍यांनी ४२ मुलांना ठार केल्‍याचा आरोप होता. पोलिसांकडे त्‍याची त्‍यांनी कबुलीही दिली; पण ४२ पैकी नऊ हत्‍या झाल्‍याचे न्‍यायालयात सिद्ध झाले. २९ ऑक्‍टोबर १९९६ ला हे बालहत्याकांड उघडकीस आले. यामुळे सारा महाराष्ट्र हादरला होता. सुरवातीला अंजनाबाई एकटीच मुलांना पळवीत असे. नंतर तिने दोन्ही मुलींना त्यात सामील करून घेतले. १९९० च्या सुमारास त्यांनी मुलांना पळवण्यास सुरवात केली. चोरी, पाकीटमारी करण्यासाठी एक ते तेरा वर्षांपर्यंतच्या बालकांना पळवून त्यांचा खून केल्याचे हे प्रकरण आहे. वर्ष १९९७ मध्‍ये अंजनाबाईचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे आता रेणुका आणि सीमाच उरल्‍या आहेत. क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी    फॅक्ट फाईल  १९९० ते १९९६ या काळात रेणुका, तिचा पती किरण शिंदे, बहीण सीमा आणि आई अंजनाबाई गावीत यांनी ४२ लहान मुलांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप होता. त्यातील नऊ मुलांचा निर्घृण खून करण्यात आल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. अंजनाबाईचा १७ डिसेंबर १९९७ ला कारागृहात मृत्यू झाला.  किरण शिंदे हा या खटल्यात माफीचा साक्षीदार झाला होता.  रेणुका व सीमा यांच्यावर खटला चालविण्यात आला.  २८ जून २००१ ला कोल्हापूरमधील सेशन कोर्टाने या दोघींना नऊ मुलांचा खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली.  रेणुका व सीमाने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. हायकोर्टाने ८ सप्टेंबर २००४ ला सेशन कोर्टाचा फाशीच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाला या बहिणींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही ३१ ऑगस्ट २००६ ला त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. फाशीची शिक्षा माफ करावी यासाठी त्यांनी केलेला दयेचा अर्ज जुलै २०१४ मध्ये राष्ट्रपतींनी फेटाळल्याने त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले आहे.  मृत्युदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला... News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2IXqwaa

No comments:

Post a Comment