विशेष संपादकीय : बांधिलकी समाजाशी इमान सत्याशी... गेले काही दिवस बंद असलेले वृत्तपत्रांचे वितरण आजच्या अंकासोबत सुरू होते आहे. नेमका हाच काळ आहे ज्यावेळी खरी, विश्‍वासार्ह माहिती लोकापर्यंत पोचण्याची गरज कधी नव्हे इतकी समोर आली आहे. तसंही मागचा काही काळ जगभरात फेक न्यूजचा बोलबाला आहे. आणि ‘पोस्ट ट्रुथ’च्या जमान्यात अर्धसत्य, भ्रामक सत्य, असत्य असलं काहीही सत्याचा जामानिमा पांघरुन खपवलं जातं आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप समाज माध्यमांनी व्यक्त होणं सुलभ केलं पण त्यात पारंपरिक माध्यमांतील माहिती तपासून घ्यायची व्यवस्था नसल्यानं अफवांचा बाजारही तेजीत आणला. ज्या कोरना विषाणूच्या संकाटाशी सध्या आपण झगडतो आहोत. त्यात या प्रकारच्या अफवांचा प्रसार अत्यंत घातक ठरू शकतो. म्हणूनच ही वेळ वास्तव माहिती पोचण्याची निकड स्पष्ट करणारी आहे. कोरोनाच्या विषाणूंनी जगाला ग्रासलं असताना आणि एक अज्ञाताच्या भयसावटानं भवताल कवेत घेतला असताना सत्याशी इमान राखणाऱ्या माहितीचं वहन होत राहणं अत्यावश्‍यक बनतं. हे काम मुद्रीत वृतत्प्तरं करीत आली आहेत. यात कोरोनाच्याच तडाख्यानं काही दिवसांचा खंड आणला तरी या काळात सकाळ आणि अन्य वृत्तपत्रांनीही डिजिटल आवृत्त्या, ई पेपर, आणि वृत्तपत्रांच्या वेबसाईटवरुन लोकांपर्यंत योग्य माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा मुद्रीत सकाळ आपल्या भेटीला येतो आहे. अफवा पसरवणं हे अक्कलशून्य काम आहे मात्र त्याच परीणाम घातक होऊ शकतो. वृत्तपत्रातून संसर्ग होऊ शकतो ही अशीच बिनबुडाची कंडी. जागतिक आरोग्य संघटनेनं यावर पुरेसं स्पष्टीकरण केलं आहे. वैद्यकीय क्षेत्रीतल तज्ज्ञांनीही कोरनाचा वृत्तपत्रांशी संबध नसल्याचा निर्वाळा दिलाच आहे. अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा शासकीय यंत्रणांच्या नावे खोडसाळ संदेश फिरवले गेले त्यावर संबधित अधिकाऱ्यांनी वृत्तपत्रांचा कोरोनाशी संबंध नाही असे स्पष्ट खुलासे केले आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईही केली जाते आहे. वृत्तपत्रांचा आणि कोरोनाचा संबध जोडणं हा खोटारडेपणा आहे यापुरता मुद्दा नाहीच फेकन्यूजच्या बुडाशी असं धादांत खोटं समजात पेरुन संशय तयार करणं हाच हेतू असतो. अशा प्रकारच्या अपप्रचारात सर्वात मोठा अडथळा जर कोणता असलेल तर तो मुद्रित माध्यमांचा अर्थात वृत्तपत्रांचा. सकाळनं तर नेहमीच वाचकांशी बांधिलकी आणि सत्याशी ईमान राखलं आहे. यात कोणतीही तडजोड नाही ही सकाळची दीर्घकाळच्या वाटचालीतील भूमिका आहे. तो आमच्या मूल्यव्यवस्थेचाही भाग आहे. खरतर असल्या शंका मनात यायचंही कारण नाही. वृत्तपत्रांची छपाई ही आता अत्याधुनिक तंत्रानचं केली जाते, त्याखेरीज मोठ्या प्रमाणात छपाई शक्‍यही नाही. वृत्तपत्रांची आधुनिक काळातील निर्मिती प्रक्रिया स्वयंचलित यंत्रणेवर आधारलेली आणि बहुतांशी मानवी हस्तक्षेपरहित होते आहे. सकाळनं नेहमीच छपाईतील सर्वांत आधुनिक ते तंत्रज्ञान आणलं आहे. सकाळची मुद्रण यंत्रणा अत्यंत आधुनिक तर आहेच त्यावर मुद्रणाच्या क्षेत्रातील उत्कृष्ठ अशा कामगिरीसाठी ‘सकाळ’ला जागतिक वृत्तपत्र संघटनेनच्या अनेक पुरस्कारांनी मान्येतची मोहोर उमटवली आहे. कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर सकाळच्या सर्व छपाई केंद्रात आवश्‍यक ती दक्षता घेतली जात आहे. छपाईयंत्रातून बाहेर येणाऱ्या वृत्तपत्रावंर सॅनिटाजइर फवारणची यंत्रणाही सकाळनं उभी केली आहे. वितरण करणाऱ्यांकडूनही वृत्तपत्र सुरक्षितपणेच पोचेल यासाठीच सर्व व्यवस्था वृत्तपत्रे एकत्रिकपणे करताहेत. यानंतर शंकेचं कारणच उरत नाही.  समाज माध्यमातून माहितीचा धबधबा कितीही द्रुतगतीन आदळत असला अनेकदा तिथं सत्याचा अपलाप होण्याचा धोका असतोच. कोरोनासारख्या संकटाशी झुंजताना खरी आणि समाजोपयोगी माहिती लोकांपर्यंत पोचवणं हे मोठंच काम आहे. म्हणूनच देशाच्या पंतप्रधांनापसून साऱ्या यंत्रणा माध्यमांच्या कामात अडथळा येऊ नये अशी व्यवस्था करताहेत. लोकांना आकारण भयभित करणं किंवा निष्काळजी बनवणं आजघडीला परवडणारं नाही. वृतत्पत्रांतून कोणती माहिती कशी द्यावी याचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतलेल्या पत्रकारांकडून तपासून माहिती समाजपर्यंत पोटवली जाते. हाच खोट्या गदारोळाशी लढण्याचा मार्ग आहे. गेले काही दिवस डिजिटल माध्यमातून हे काम आम्ही करतच होतो. आता पुनश्‍च मुद्रीत अंक आपल्या हाती देत आहोत सकाळ आणि वाचकाचं विश्‍वासाचं नातं आठ दशकांहून अधिक काळाचं आहे. या संकटकाळातही ते झळाळून उठेल यात शंका नाही. तर आजपासून दररोज आपली सुरवात खऱ्या वस्तूनिष्ठ बातम्यांनिशी करणारा सकाळ आपल्या घरी येतो आहे. अवश्‍य त्याचा लाभ घ्या.  ...आणि हो, कोणत्याही कारणानं शासनानं ठरवून दिलेल्या अत्यावश्‍यक कामांखेरीज घराबाहेर पडू नका. घरात राहणं हाच कोरोनाशी लढण्याचा मार्ग आहे. सारे लढूया, सारे जिंकूया! News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 31, 2020

विशेष संपादकीय : बांधिलकी समाजाशी इमान सत्याशी... गेले काही दिवस बंद असलेले वृत्तपत्रांचे वितरण आजच्या अंकासोबत सुरू होते आहे. नेमका हाच काळ आहे ज्यावेळी खरी, विश्‍वासार्ह माहिती लोकापर्यंत पोचण्याची गरज कधी नव्हे इतकी समोर आली आहे. तसंही मागचा काही काळ जगभरात फेक न्यूजचा बोलबाला आहे. आणि ‘पोस्ट ट्रुथ’च्या जमान्यात अर्धसत्य, भ्रामक सत्य, असत्य असलं काहीही सत्याचा जामानिमा पांघरुन खपवलं जातं आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप समाज माध्यमांनी व्यक्त होणं सुलभ केलं पण त्यात पारंपरिक माध्यमांतील माहिती तपासून घ्यायची व्यवस्था नसल्यानं अफवांचा बाजारही तेजीत आणला. ज्या कोरना विषाणूच्या संकाटाशी सध्या आपण झगडतो आहोत. त्यात या प्रकारच्या अफवांचा प्रसार अत्यंत घातक ठरू शकतो. म्हणूनच ही वेळ वास्तव माहिती पोचण्याची निकड स्पष्ट करणारी आहे. कोरोनाच्या विषाणूंनी जगाला ग्रासलं असताना आणि एक अज्ञाताच्या भयसावटानं भवताल कवेत घेतला असताना सत्याशी इमान राखणाऱ्या माहितीचं वहन होत राहणं अत्यावश्‍यक बनतं. हे काम मुद्रीत वृतत्प्तरं करीत आली आहेत. यात कोरोनाच्याच तडाख्यानं काही दिवसांचा खंड आणला तरी या काळात सकाळ आणि अन्य वृत्तपत्रांनीही डिजिटल आवृत्त्या, ई पेपर, आणि वृत्तपत्रांच्या वेबसाईटवरुन लोकांपर्यंत योग्य माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा मुद्रीत सकाळ आपल्या भेटीला येतो आहे. अफवा पसरवणं हे अक्कलशून्य काम आहे मात्र त्याच परीणाम घातक होऊ शकतो. वृत्तपत्रातून संसर्ग होऊ शकतो ही अशीच बिनबुडाची कंडी. जागतिक आरोग्य संघटनेनं यावर पुरेसं स्पष्टीकरण केलं आहे. वैद्यकीय क्षेत्रीतल तज्ज्ञांनीही कोरनाचा वृत्तपत्रांशी संबध नसल्याचा निर्वाळा दिलाच आहे. अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा शासकीय यंत्रणांच्या नावे खोडसाळ संदेश फिरवले गेले त्यावर संबधित अधिकाऱ्यांनी वृत्तपत्रांचा कोरोनाशी संबंध नाही असे स्पष्ट खुलासे केले आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईही केली जाते आहे. वृत्तपत्रांचा आणि कोरोनाचा संबध जोडणं हा खोटारडेपणा आहे यापुरता मुद्दा नाहीच फेकन्यूजच्या बुडाशी असं धादांत खोटं समजात पेरुन संशय तयार करणं हाच हेतू असतो. अशा प्रकारच्या अपप्रचारात सर्वात मोठा अडथळा जर कोणता असलेल तर तो मुद्रित माध्यमांचा अर्थात वृत्तपत्रांचा. सकाळनं तर नेहमीच वाचकांशी बांधिलकी आणि सत्याशी ईमान राखलं आहे. यात कोणतीही तडजोड नाही ही सकाळची दीर्घकाळच्या वाटचालीतील भूमिका आहे. तो आमच्या मूल्यव्यवस्थेचाही भाग आहे. खरतर असल्या शंका मनात यायचंही कारण नाही. वृत्तपत्रांची छपाई ही आता अत्याधुनिक तंत्रानचं केली जाते, त्याखेरीज मोठ्या प्रमाणात छपाई शक्‍यही नाही. वृत्तपत्रांची आधुनिक काळातील निर्मिती प्रक्रिया स्वयंचलित यंत्रणेवर आधारलेली आणि बहुतांशी मानवी हस्तक्षेपरहित होते आहे. सकाळनं नेहमीच छपाईतील सर्वांत आधुनिक ते तंत्रज्ञान आणलं आहे. सकाळची मुद्रण यंत्रणा अत्यंत आधुनिक तर आहेच त्यावर मुद्रणाच्या क्षेत्रातील उत्कृष्ठ अशा कामगिरीसाठी ‘सकाळ’ला जागतिक वृत्तपत्र संघटनेनच्या अनेक पुरस्कारांनी मान्येतची मोहोर उमटवली आहे. कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर सकाळच्या सर्व छपाई केंद्रात आवश्‍यक ती दक्षता घेतली जात आहे. छपाईयंत्रातून बाहेर येणाऱ्या वृत्तपत्रावंर सॅनिटाजइर फवारणची यंत्रणाही सकाळनं उभी केली आहे. वितरण करणाऱ्यांकडूनही वृत्तपत्र सुरक्षितपणेच पोचेल यासाठीच सर्व व्यवस्था वृत्तपत्रे एकत्रिकपणे करताहेत. यानंतर शंकेचं कारणच उरत नाही.  समाज माध्यमातून माहितीचा धबधबा कितीही द्रुतगतीन आदळत असला अनेकदा तिथं सत्याचा अपलाप होण्याचा धोका असतोच. कोरोनासारख्या संकटाशी झुंजताना खरी आणि समाजोपयोगी माहिती लोकांपर्यंत पोचवणं हे मोठंच काम आहे. म्हणूनच देशाच्या पंतप्रधांनापसून साऱ्या यंत्रणा माध्यमांच्या कामात अडथळा येऊ नये अशी व्यवस्था करताहेत. लोकांना आकारण भयभित करणं किंवा निष्काळजी बनवणं आजघडीला परवडणारं नाही. वृतत्पत्रांतून कोणती माहिती कशी द्यावी याचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतलेल्या पत्रकारांकडून तपासून माहिती समाजपर्यंत पोटवली जाते. हाच खोट्या गदारोळाशी लढण्याचा मार्ग आहे. गेले काही दिवस डिजिटल माध्यमातून हे काम आम्ही करतच होतो. आता पुनश्‍च मुद्रीत अंक आपल्या हाती देत आहोत सकाळ आणि वाचकाचं विश्‍वासाचं नातं आठ दशकांहून अधिक काळाचं आहे. या संकटकाळातही ते झळाळून उठेल यात शंका नाही. तर आजपासून दररोज आपली सुरवात खऱ्या वस्तूनिष्ठ बातम्यांनिशी करणारा सकाळ आपल्या घरी येतो आहे. अवश्‍य त्याचा लाभ घ्या.  ...आणि हो, कोणत्याही कारणानं शासनानं ठरवून दिलेल्या अत्यावश्‍यक कामांखेरीज घराबाहेर पडू नका. घरात राहणं हाच कोरोनाशी लढण्याचा मार्ग आहे. सारे लढूया, सारे जिंकूया! News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2UzgNgI

No comments:

Post a Comment