‘सकाळ’चे माजी संपादक अनंत दीक्षित यांचे निधन पुणे - ज्येष्ठ पत्रकार, ‘सकाळ’चे माजी संपादक अनंत भगवान दीक्षित (वय ६७) यांचे सोमवारी (ता. ९) सायंकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या मागे पत्नी अंजली, विवाहित कन्या अस्मिता आणि जावई असा परिवार आहे.  ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दीक्षित गेली काही वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. त्यांना सातत्याने डायलेसिस करावे लागत होते. सोमवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. कन्या अस्मिता परदेशातून परतणार असल्याने अंत्यसंस्कार बुधवारी होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.  दीक्षित यांनी ‘सकाळ’मध्ये कोल्हापूर आणि पुण्यात संपादकपदी दीर्घकाळ काम केले. समकालिन राजकारण, शिक्षण, कला आणि समाजकारणाचे जाणते भाष्यकार अशी त्यांची ओळख होती. साहित्य हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. पुण्याच्या आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची धाकटी मुलगी अमृता हिचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. तिने लिहिलेल्या ‘परतीचा पाऊस’ या पुस्तकाचे प्रकाशन पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत त्यांनी केले होते.  एखाद्या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, मुद्देसूद विश्‍लेषण; तसेच शैलीदार वक्तृत्व हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. सामान्यांच्या वेदना मांडणारा संपादक, अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय स्तरातून दुखवटा व्यक्त करण्यात येत आहे.  दीक्षित मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील भालगावचे. सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण बार्शीमध्ये झाले. वाचन आणि पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी सोलापूरमधून साडेचार दशकांपूर्वी पत्रकारितेस सुरुवात केली. सोलापूरमधील ‘विश्‍व समाचार’ आणि ‘संचार’मध्ये काही काळ काम केल्यानंतर ते ‘सकाळ’मध्ये कोल्हापुरात रुजू झाले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 10, 2020

‘सकाळ’चे माजी संपादक अनंत दीक्षित यांचे निधन पुणे - ज्येष्ठ पत्रकार, ‘सकाळ’चे माजी संपादक अनंत भगवान दीक्षित (वय ६७) यांचे सोमवारी (ता. ९) सायंकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या मागे पत्नी अंजली, विवाहित कन्या अस्मिता आणि जावई असा परिवार आहे.  ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दीक्षित गेली काही वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. त्यांना सातत्याने डायलेसिस करावे लागत होते. सोमवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. कन्या अस्मिता परदेशातून परतणार असल्याने अंत्यसंस्कार बुधवारी होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.  दीक्षित यांनी ‘सकाळ’मध्ये कोल्हापूर आणि पुण्यात संपादकपदी दीर्घकाळ काम केले. समकालिन राजकारण, शिक्षण, कला आणि समाजकारणाचे जाणते भाष्यकार अशी त्यांची ओळख होती. साहित्य हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. पुण्याच्या आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची धाकटी मुलगी अमृता हिचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. तिने लिहिलेल्या ‘परतीचा पाऊस’ या पुस्तकाचे प्रकाशन पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत त्यांनी केले होते.  एखाद्या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, मुद्देसूद विश्‍लेषण; तसेच शैलीदार वक्तृत्व हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. सामान्यांच्या वेदना मांडणारा संपादक, अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय स्तरातून दुखवटा व्यक्त करण्यात येत आहे.  दीक्षित मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील भालगावचे. सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण बार्शीमध्ये झाले. वाचन आणि पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी सोलापूरमधून साडेचार दशकांपूर्वी पत्रकारितेस सुरुवात केली. सोलापूरमधील ‘विश्‍व समाचार’ आणि ‘संचार’मध्ये काही काळ काम केल्यानंतर ते ‘सकाळ’मध्ये कोल्हापुरात रुजू झाले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Q6ryVc

No comments:

Post a Comment