नेमके किती पाणी प्यावे? प्रत्येकाने रोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे सांगितले जाते. मात्र, हे तीन लिटरचे माप प्रत्येकासाठी अचूक कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. व्यक्तिगणिक पाण्याची गरज वेगवेगळी असते. तेव्हा पाण्याची नेमकी गरज किती हे निश्‍चित करणे महत्त्वाचे आहे. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळा म्हटले, की सर्वप्रथम मनात कोणती गोष्ट येते, तर ती म्हणजे उष्मा. उष्म्यावर मात करण्यासाठी पाणी हवेच. प्रत्येकाने रोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे वर्षानुवर्षे सांगितले जाते. मात्र, जलपानाचे हे तीन लिटरचे माप प्रत्येकासाठी अचूक कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रत्येकाला रोज नेमकी किती पाणी पिण्याची गरज असते, या प्रश्नाचे आणि त्या अनुषंगाने इतर प्रश्नांचीही उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करू.  प्रत्येकाने रोज तीन लिटर पाणी पिण्याची संकल्पना सदासर्वकाळ योग्य म्हणता येत नाही. एकच माप सर्वांसाठी योग्य असू शकत नाही. व्यक्तीगणिक पाण्याची गरज बदलते. एखाद्याला नेमकी किती पाणी पिण्याची गरज आहे, हे एका सहजसोप्या सूत्राने काढता येते. ते खालीलप्रमाणे-  तुमचे वजन (उदा. ते ७० किलो गृहीत धरू)  तुमच्या वजनाला तुमच्या वयाने गुणा. (उदा. ते तीस समजू)  आलेल्या उत्तराला २८.३ ने भागा.  म्हणजेच ७० गुणिले ३०/२८.३ = ७४.२० औंस, जवळपास २.१९ लि.  (३३.८ औंस = एक लिटर)  यावरून संबंधित व्यक्तीला दिवसभरात एकूण किती औंस पाण्याची गरज आहे, हे समजेल. एखाद्या व्यक्तीची पाण्याची सरासरी गरज वरील सूत्रातून समजू शकते. अर्थात, यात हवामानातील बदल, व्यायाम, जीवनशैली आदी घटक गृहीत धरलेले नाहीत. भारतात उन्हाळ्यात तापमान ४५ अंशांपर्यंत पोचते. त्यामुळे, शरीराची अतिरिक्त गरज भरून काढण्यासाठी उन्हाळ्यात रोज दोन ग्लास अधिक पाणी प्यावे. त्याचप्रमाणे, तुम्ही मध्यम तीव्रतेचे व्यायाम करत असाल तर व्यायामाच्या प्रत्येक तासाला रोज एक ते दोन ग्लास पाणी अधिक पिण्याची गरज आहे. तीव्र व्यायाम करणाऱ्यांनी व्यायामाचा प्रकार, तीव्रता आदी घटक ध्यानात घेऊन रोजच्या पिण्याच्या पाण्यात दोन ते चार ग्लास वाढ करावी. घरामध्येच असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना रोज पिण्याच्या पाण्यामध्ये सरासरीपेक्षा कपात करावी लागू शकते. त्याचप्रमाणे, थंड प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींनीही थोडेसे कमी पाणी प्यावे. हे सर्व समजून घेताना हेही लक्षात घ्यावे, की पाण्याची गरज भागविण्याचा केवळ पाणी हाच एकमेव स्रोत नव्हे. आपल्या अन्नामध्येही पाणी असते. प्रत्येक पदार्थामध्ये पाण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे आहारातूनही आपल्याला पाणी मिळते.  प्रभाव टाकणारे विशेष घटक आरोग्याशी निगडित एखादी विशिष्ट समस्या असेल, तर पाणी अधिक प्यायले जाऊ शकते. उदा. थायरॉईड किंवा मूत्रपिंडाचा, यकृताचा आजार, हृदयविकार आदी. त्याचप्रमाणे, पाणी रोखून धरणारी औषधे घेत असल्यास त्याचाही पाणी अधिक पिण्यावर परिणाम होऊ शकतो. उदा. वेदनाशामक औषधे, नैराश्‍याच्या आजारांवरील काही औषधे. मुतखड्यासारख्या काही आजारांमध्येही उपचाराचा भाग म्हणून अधिक पाणी प्यायले जाऊ शकते.  लघवीचा रंग आणि पाणी निर्जलीकरण (Dehydration) होत असल्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे लघवीचा रंग. सामान्यतः लघवीचा पारदर्शक रंग शरीरातील पाण्याचे पुरेसे प्रमाण (Hydration) दर्शवितो, तर पिवळा रंग पाणी कमी पडत असल्याचे निदर्शक आहे. निर्जलीकरणाचा विचार करता लघवीचा पिवळा रंग योग्य असू शकतो. मात्र, ती पारदर्शक असणे याचा अर्थ फक्त पाण्याच्या पुरेशा प्रमाणापुरता मर्यादित नाही. खरेतर, लघवीचा रंग पारदर्शक असेपर्यंत पाणी पिण्याची गरज नाही. लघवी पारदर्शक किंवा पांढऱ्या रंगाची होत असल्यास पाणी गरजेपेक्षा अधिक (Over Hydrated) पित असल्याचा त्याचा अर्थ होतो. लघवीचा फिकट पिवळा रंगही पाण्याचे योग्य प्रमाण दर्शवितो. मात्र, तरीही शरीरातील पाण्याचे प्रमाण ठरविण्याचे हे योग्य मोजमाप नव्हे.  गर्भारपण आणि पाण्याचे पुरेसे प्रमाण  शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण (Hydration) ठेवण्याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. गर्भवती किंवा स्तन्यपान करणाऱ्या महिलांनी रोजच्या द्रव पदार्थांचे प्रमाण २४ ते ३२ औंसांनी वाढवायला हवे. अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनच्या अहवालानुसार ते  वजनावर अवलंबून आहे. याशिवाय इतर कॅफिनयुक्त पेये आणि सोड्याऐवजी पाण्यामधूनच बहुतांश गरज भागवणेही, महत्त्वाचे आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 12, 2020

नेमके किती पाणी प्यावे? प्रत्येकाने रोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे सांगितले जाते. मात्र, हे तीन लिटरचे माप प्रत्येकासाठी अचूक कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. व्यक्तिगणिक पाण्याची गरज वेगवेगळी असते. तेव्हा पाण्याची नेमकी गरज किती हे निश्‍चित करणे महत्त्वाचे आहे. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळा म्हटले, की सर्वप्रथम मनात कोणती गोष्ट येते, तर ती म्हणजे उष्मा. उष्म्यावर मात करण्यासाठी पाणी हवेच. प्रत्येकाने रोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे वर्षानुवर्षे सांगितले जाते. मात्र, जलपानाचे हे तीन लिटरचे माप प्रत्येकासाठी अचूक कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रत्येकाला रोज नेमकी किती पाणी पिण्याची गरज असते, या प्रश्नाचे आणि त्या अनुषंगाने इतर प्रश्नांचीही उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करू.  प्रत्येकाने रोज तीन लिटर पाणी पिण्याची संकल्पना सदासर्वकाळ योग्य म्हणता येत नाही. एकच माप सर्वांसाठी योग्य असू शकत नाही. व्यक्तीगणिक पाण्याची गरज बदलते. एखाद्याला नेमकी किती पाणी पिण्याची गरज आहे, हे एका सहजसोप्या सूत्राने काढता येते. ते खालीलप्रमाणे-  तुमचे वजन (उदा. ते ७० किलो गृहीत धरू)  तुमच्या वजनाला तुमच्या वयाने गुणा. (उदा. ते तीस समजू)  आलेल्या उत्तराला २८.३ ने भागा.  म्हणजेच ७० गुणिले ३०/२८.३ = ७४.२० औंस, जवळपास २.१९ लि.  (३३.८ औंस = एक लिटर)  यावरून संबंधित व्यक्तीला दिवसभरात एकूण किती औंस पाण्याची गरज आहे, हे समजेल. एखाद्या व्यक्तीची पाण्याची सरासरी गरज वरील सूत्रातून समजू शकते. अर्थात, यात हवामानातील बदल, व्यायाम, जीवनशैली आदी घटक गृहीत धरलेले नाहीत. भारतात उन्हाळ्यात तापमान ४५ अंशांपर्यंत पोचते. त्यामुळे, शरीराची अतिरिक्त गरज भरून काढण्यासाठी उन्हाळ्यात रोज दोन ग्लास अधिक पाणी प्यावे. त्याचप्रमाणे, तुम्ही मध्यम तीव्रतेचे व्यायाम करत असाल तर व्यायामाच्या प्रत्येक तासाला रोज एक ते दोन ग्लास पाणी अधिक पिण्याची गरज आहे. तीव्र व्यायाम करणाऱ्यांनी व्यायामाचा प्रकार, तीव्रता आदी घटक ध्यानात घेऊन रोजच्या पिण्याच्या पाण्यात दोन ते चार ग्लास वाढ करावी. घरामध्येच असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना रोज पिण्याच्या पाण्यामध्ये सरासरीपेक्षा कपात करावी लागू शकते. त्याचप्रमाणे, थंड प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींनीही थोडेसे कमी पाणी प्यावे. हे सर्व समजून घेताना हेही लक्षात घ्यावे, की पाण्याची गरज भागविण्याचा केवळ पाणी हाच एकमेव स्रोत नव्हे. आपल्या अन्नामध्येही पाणी असते. प्रत्येक पदार्थामध्ये पाण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे आहारातूनही आपल्याला पाणी मिळते.  प्रभाव टाकणारे विशेष घटक आरोग्याशी निगडित एखादी विशिष्ट समस्या असेल, तर पाणी अधिक प्यायले जाऊ शकते. उदा. थायरॉईड किंवा मूत्रपिंडाचा, यकृताचा आजार, हृदयविकार आदी. त्याचप्रमाणे, पाणी रोखून धरणारी औषधे घेत असल्यास त्याचाही पाणी अधिक पिण्यावर परिणाम होऊ शकतो. उदा. वेदनाशामक औषधे, नैराश्‍याच्या आजारांवरील काही औषधे. मुतखड्यासारख्या काही आजारांमध्येही उपचाराचा भाग म्हणून अधिक पाणी प्यायले जाऊ शकते.  लघवीचा रंग आणि पाणी निर्जलीकरण (Dehydration) होत असल्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे लघवीचा रंग. सामान्यतः लघवीचा पारदर्शक रंग शरीरातील पाण्याचे पुरेसे प्रमाण (Hydration) दर्शवितो, तर पिवळा रंग पाणी कमी पडत असल्याचे निदर्शक आहे. निर्जलीकरणाचा विचार करता लघवीचा पिवळा रंग योग्य असू शकतो. मात्र, ती पारदर्शक असणे याचा अर्थ फक्त पाण्याच्या पुरेशा प्रमाणापुरता मर्यादित नाही. खरेतर, लघवीचा रंग पारदर्शक असेपर्यंत पाणी पिण्याची गरज नाही. लघवी पारदर्शक किंवा पांढऱ्या रंगाची होत असल्यास पाणी गरजेपेक्षा अधिक (Over Hydrated) पित असल्याचा त्याचा अर्थ होतो. लघवीचा फिकट पिवळा रंगही पाण्याचे योग्य प्रमाण दर्शवितो. मात्र, तरीही शरीरातील पाण्याचे प्रमाण ठरविण्याचे हे योग्य मोजमाप नव्हे.  गर्भारपण आणि पाण्याचे पुरेसे प्रमाण  शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण (Hydration) ठेवण्याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. गर्भवती किंवा स्तन्यपान करणाऱ्या महिलांनी रोजच्या द्रव पदार्थांचे प्रमाण २४ ते ३२ औंसांनी वाढवायला हवे. अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनच्या अहवालानुसार ते  वजनावर अवलंबून आहे. याशिवाय इतर कॅफिनयुक्त पेये आणि सोड्याऐवजी पाण्यामधूनच बहुतांश गरज भागवणेही, महत्त्वाचे आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2ILXHgE

No comments:

Post a Comment