कोरोना : 31 मार्चनंतर पुढे काय होणार? (Video) सोलापूर : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने सध्या जनजीवन विस्कळित होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यास महाराष्ट्र सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे. याला नागरिक सध्या प्रतिसाद देत आहेत. सध्या सिनेमागृह, मॉल्स यासह गर्दीची ठिकाणे बंद झाली आहेत. मात्र, दळणवळणाची साधनं असलेली एसटी बस व रेल्वे बंद झाले तर जनजीवन विस्कळित होऊ शकते याची भीती नागरिकांत असून 31 मार्चनंतर पुढे काय होणार, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे.  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आणि विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात दररोज कोरोनाची लागण असलेल्या व संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. याची भीती सध्या ग्रामीण भागात आहे. कारण, राज्यातले एकही गाव असे नसेल की त्या गावातील नागरिक मुंबई आणि पुण्यात नाही. रोजगार देणाऱ्या आणि रोजगार निर्माण करणाऱ्या या शहरांचा प्रत्येक गावांशी संबंध आहे. मात्र, सध्या याच शहरांवर मोठे संकट आले आहे. सध्या या शहरांकडे जाणारी आणि येणारे वाहने व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या शहरांवर कोरोना व्हायरसचे असलेले संकट अन्य ठिकाणी पसरण्याचा धोका ओळखून सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. 31 मार्चपर्यंत मॉल, सिनेमागृह, सार्वजनिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये यासह गर्दी होणारी ठिकाणं सध्या बंद केली आहेत. मात्र, 31 मार्चनंतर पुढे काय होणार, असा प्रश्‍न केला जात आहे.  स्वप्नील कट्टीमनी : 31 मार्चपर्यंत कोरोना व्हायरसमुळे महाविद्यायांना सुटी दिली आहे. मात्र, त्यानंतर पुढे काय असेल हे समजत नाही. सध्या विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र, त्याचे वेळापत्रक अजून माहीत नाही. त्यामुळे नेमकं काय ते समजत नाही.  जावेद पटेल : सध्या कोरोनाचे सर्वत्र मोठे संकट आहे. त्यावर उपाययोजना म्हणून सरकार खबरदारी घेत आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर प्रतिबंध हाच उपाय आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेणे आवश्‍यक आहे. याबरोबर निर्णयाला प्रतिसाद देणे आवश्‍यक आहे.  प्रतीक गावडे : कोरोनासाठी जे काय करायचे आहे ते करावे. मात्र, 31 तारखेनंतर काय होणार हेच समजत नाही. त्यानंतर परीक्षा कधी होणार ते समजत नाही. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अनेक मुलं शहर सोडून गावाकडे जात आहेत. याचा परिणाम सर्वच गोष्टींवर होत आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 18, 2020

कोरोना : 31 मार्चनंतर पुढे काय होणार? (Video) सोलापूर : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने सध्या जनजीवन विस्कळित होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यास महाराष्ट्र सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे. याला नागरिक सध्या प्रतिसाद देत आहेत. सध्या सिनेमागृह, मॉल्स यासह गर्दीची ठिकाणे बंद झाली आहेत. मात्र, दळणवळणाची साधनं असलेली एसटी बस व रेल्वे बंद झाले तर जनजीवन विस्कळित होऊ शकते याची भीती नागरिकांत असून 31 मार्चनंतर पुढे काय होणार, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे.  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आणि विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात दररोज कोरोनाची लागण असलेल्या व संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. याची भीती सध्या ग्रामीण भागात आहे. कारण, राज्यातले एकही गाव असे नसेल की त्या गावातील नागरिक मुंबई आणि पुण्यात नाही. रोजगार देणाऱ्या आणि रोजगार निर्माण करणाऱ्या या शहरांचा प्रत्येक गावांशी संबंध आहे. मात्र, सध्या याच शहरांवर मोठे संकट आले आहे. सध्या या शहरांकडे जाणारी आणि येणारे वाहने व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या शहरांवर कोरोना व्हायरसचे असलेले संकट अन्य ठिकाणी पसरण्याचा धोका ओळखून सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. 31 मार्चपर्यंत मॉल, सिनेमागृह, सार्वजनिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये यासह गर्दी होणारी ठिकाणं सध्या बंद केली आहेत. मात्र, 31 मार्चनंतर पुढे काय होणार, असा प्रश्‍न केला जात आहे.  स्वप्नील कट्टीमनी : 31 मार्चपर्यंत कोरोना व्हायरसमुळे महाविद्यायांना सुटी दिली आहे. मात्र, त्यानंतर पुढे काय असेल हे समजत नाही. सध्या विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र, त्याचे वेळापत्रक अजून माहीत नाही. त्यामुळे नेमकं काय ते समजत नाही.  जावेद पटेल : सध्या कोरोनाचे सर्वत्र मोठे संकट आहे. त्यावर उपाययोजना म्हणून सरकार खबरदारी घेत आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर प्रतिबंध हाच उपाय आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेणे आवश्‍यक आहे. याबरोबर निर्णयाला प्रतिसाद देणे आवश्‍यक आहे.  प्रतीक गावडे : कोरोनासाठी जे काय करायचे आहे ते करावे. मात्र, 31 तारखेनंतर काय होणार हेच समजत नाही. त्यानंतर परीक्षा कधी होणार ते समजत नाही. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अनेक मुलं शहर सोडून गावाकडे जात आहेत. याचा परिणाम सर्वच गोष्टींवर होत आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2IW765o

No comments:

Post a Comment