"कोरोना विषाणू'च्या चर्चेने `या` शहरात भीतीचे वातावरण   सोलापूर : येथील अश्‍विनी सहकारी रुग्णालयात कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याची चर्चा समाजमाध्यमावरून पसरल्याने शहर व जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या संदर्भात रुग्णालयाने तातडीने प्रसिद्धपत्रक काढून संबंधित रुग्ण हा कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट केले. तथापि, या रुग्णालयाच्या रुग्णतपासणी अहवालावर मात्र "कोरोना'चा उल्लेख असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षाची पाहणी केली.  कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आलेला विलगीकरण कक्ष अश्‍विनी रुग्णालयात संशयित रुग्ण दाखल झाल्याची माहिती समाजमाध्यमावर रुग्णाच्या तपासणीअहवालासह प्रसिद्ध झाली. त्यामुळे नागरिकांत एकच खळबळ उडाली. हा रुग्ण तिरुपतीहून सोलापुरात आला असाही मेसेज फिरल्याने सोलापुरकरांच्या चिंतेत भर पडली. अनेकांनी अश्‍विनी रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खात्री करून घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र घुली यांनी, संबंधित रुग्ण कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित रुग्ण हा सोलापुरातील कुमठे गावातील असून त्यास गेल्या तीन दिवसांपासून खोकला व दमा लागण्यासाठी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तो "कोव्हीड 19' चा रुग्ण वाटत नव्हता. निदान करण्यासाठी त्याची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यात जिवाणू व विषाणूच्या डीएनएची तपासणी होती. त्यात सॅफीलोकोकस ऑरीअस, मायकोप्लाझमा न्यूमोनिया, करोना व्हायरसचे डीएनए दिसून आले. त्यामुळे तशी नोंद प्रयोगशाळेच्या अहवालावर आली आहे. करोना व्हायरसची तपासणी सोलापुरात होत नाही, त्यामुळे संबंधित रुग्णाच्या शरीरात आढळलेला व्हायरस हा वेगळा आहे, असे रुग्णालयाने महापालिकेस दिलेल्या अहवालात म्हटले आहे.  कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आलेला विलगीकरण कक्षातील सुसज्ज यंत्रणा  कोरोना विषाणूवरून शहर व जिल्ह्यात गोंधळ सुरु असतानाच राज्याचे मुख्य सचिव राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधत होते. व्हीसी संपल्यावर सर्व अधिकारी आपापल्या कार्यालयात परतण्यासाठी वाटेत असतानाच, अश्‍विनीतील प्रकार जिल्हाधिकाऱ्यांना समजला. त्यांनी परतीच्या वाटेवर असलेल्या सर्वांना पुन्हा बोलावले. रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तातडीने बोलावून घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसह शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली. या ठिकाणी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना दिल्या.  कक्षाची पाहणी करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ    News Story Feeds https://ift.tt/39vkrO2 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 5, 2020

"कोरोना विषाणू'च्या चर्चेने `या` शहरात भीतीचे वातावरण   सोलापूर : येथील अश्‍विनी सहकारी रुग्णालयात कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याची चर्चा समाजमाध्यमावरून पसरल्याने शहर व जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या संदर्भात रुग्णालयाने तातडीने प्रसिद्धपत्रक काढून संबंधित रुग्ण हा कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट केले. तथापि, या रुग्णालयाच्या रुग्णतपासणी अहवालावर मात्र "कोरोना'चा उल्लेख असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षाची पाहणी केली.  कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आलेला विलगीकरण कक्ष अश्‍विनी रुग्णालयात संशयित रुग्ण दाखल झाल्याची माहिती समाजमाध्यमावर रुग्णाच्या तपासणीअहवालासह प्रसिद्ध झाली. त्यामुळे नागरिकांत एकच खळबळ उडाली. हा रुग्ण तिरुपतीहून सोलापुरात आला असाही मेसेज फिरल्याने सोलापुरकरांच्या चिंतेत भर पडली. अनेकांनी अश्‍विनी रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खात्री करून घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र घुली यांनी, संबंधित रुग्ण कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित रुग्ण हा सोलापुरातील कुमठे गावातील असून त्यास गेल्या तीन दिवसांपासून खोकला व दमा लागण्यासाठी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तो "कोव्हीड 19' चा रुग्ण वाटत नव्हता. निदान करण्यासाठी त्याची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यात जिवाणू व विषाणूच्या डीएनएची तपासणी होती. त्यात सॅफीलोकोकस ऑरीअस, मायकोप्लाझमा न्यूमोनिया, करोना व्हायरसचे डीएनए दिसून आले. त्यामुळे तशी नोंद प्रयोगशाळेच्या अहवालावर आली आहे. करोना व्हायरसची तपासणी सोलापुरात होत नाही, त्यामुळे संबंधित रुग्णाच्या शरीरात आढळलेला व्हायरस हा वेगळा आहे, असे रुग्णालयाने महापालिकेस दिलेल्या अहवालात म्हटले आहे.  कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आलेला विलगीकरण कक्षातील सुसज्ज यंत्रणा  कोरोना विषाणूवरून शहर व जिल्ह्यात गोंधळ सुरु असतानाच राज्याचे मुख्य सचिव राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधत होते. व्हीसी संपल्यावर सर्व अधिकारी आपापल्या कार्यालयात परतण्यासाठी वाटेत असतानाच, अश्‍विनीतील प्रकार जिल्हाधिकाऱ्यांना समजला. त्यांनी परतीच्या वाटेवर असलेल्या सर्वांना पुन्हा बोलावले. रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तातडीने बोलावून घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसह शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली. या ठिकाणी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना दिल्या.  कक्षाची पाहणी करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ    News Story Feeds https://ift.tt/39vkrO2


via News Story Feeds https://ift.tt/3cuaFgZ

No comments:

Post a Comment