Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 29, 2020

कोरोना संसर्ग : 'कम्युनिटी ट्रान्समिशन' सुरू झाल्याचं सरकार मान्य का करत नाही?
कोरोना स्वयंसेवकांचे तडकाफडकी निर्णय अन् प्रशासनाची डोकेदुखी

नांदगाव (सिंधुदुर्ग) - येथील कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर शासनाच्या आदेशाने स्थापन झालेल्या कोरोना स्वयंसेवक गाव समितीतील 9 सदस्यांनी आज तडकाफडकी सामुदायिकरित्या राजिनामा दिल्याने खळबळ उडाली असून ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राजिनामा दिल्याने स्थानिक प्रशासनाची डोकेदुकी वाढली आहे. राजिनामा देताना नांदगाव समितीच्या सभेमध्ये जे सर्वानुमते निर्णय होतात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे राजिनामा पत्रात म्हटले आहे. नांदगाव सरपंच तथा समिती अध्यक्ष आफोजा नावलेकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता निश्‍चित कारण समजू शकले नसल्याचे सांगितले. 

स्वयंसेवकांच्यावतीने रविराज मोरजकर म्हणाले, ""नांदगावात कोरोनाच्या पार्श्‍वभमीवर 4 ते 5 महिने निरपेक्षपणे काम केले. प्रत्येकवेळी सभेमध्ये वेळोवेळी केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी होत नव्हती. त्यातच रविवारी सायंकाळी नांदगाव गावातील स्थानिक मच्छी विक्रेता हा पॉझीटीव्ह सापडल्यानंतर कन्टेन्मेंट झोनबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली.

कंटेन्मेंन्ट झोनचा परिसर निश्‍चित झाला; पण त्यानंतर 24 तास उलटूनही कार्यवाही दिसत नव्हती. याबाबत प्रशासनाशी चर्चा करून पॉझीटीव्ह रूग्ण मिळून बरेच तास उलटूनही कन्टेन्मेंट झोनबाबत कोणतीही हालचाल होत नसेल तर झोन रद्द करावा, असे म्हणणे मांडले; परंतू म्हणण्याबाबत गैरसमज पसरविण्यात आला. जर निरपेक्षेने आणी पर्यायाने स्वत:चा कुटूंबांचा जीव धोक्‍यात घालून काम करूनही असे वाद होत असतील तर या पदावर राहणे योग्य नाही.'' ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर यांना विचारले असता त्यांनी पुढे गणेश चतुर्थी असून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. 

स्वयंसेवक सदस्यांचे जर काही गैरसमज झाले असतील ते दूर करून पुन्हा आजपर्यंत जे सहकार्य केले ते असेच पुढेपर्यंत करावे. 
- निरज मोरये, उपसरपंच, नांदगाव. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना स्वयंसेवकांचे तडकाफडकी निर्णय अन् प्रशासनाची डोकेदुखी नांदगाव (सिंधुदुर्ग) - येथील कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर शासनाच्या आदेशाने स्थापन झालेल्या कोरोना स्वयंसेवक गाव समितीतील 9 सदस्यांनी आज तडकाफडकी सामुदायिकरित्या राजिनामा दिल्याने खळबळ उडाली असून ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राजिनामा दिल्याने स्थानिक प्रशासनाची डोकेदुकी वाढली आहे. राजिनामा देताना नांदगाव समितीच्या सभेमध्ये जे सर्वानुमते निर्णय होतात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे राजिनामा पत्रात म्हटले आहे. नांदगाव सरपंच तथा समिती अध्यक्ष आफोजा नावलेकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता निश्‍चित कारण समजू शकले नसल्याचे सांगितले.  स्वयंसेवकांच्यावतीने रविराज मोरजकर म्हणाले, ""नांदगावात कोरोनाच्या पार्श्‍वभमीवर 4 ते 5 महिने निरपेक्षपणे काम केले. प्रत्येकवेळी सभेमध्ये वेळोवेळी केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी होत नव्हती. त्यातच रविवारी सायंकाळी नांदगाव गावातील स्थानिक मच्छी विक्रेता हा पॉझीटीव्ह सापडल्यानंतर कन्टेन्मेंट झोनबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. कंटेन्मेंन्ट झोनचा परिसर निश्‍चित झाला; पण त्यानंतर 24 तास उलटूनही कार्यवाही दिसत नव्हती. याबाबत प्रशासनाशी चर्चा करून पॉझीटीव्ह रूग्ण मिळून बरेच तास उलटूनही कन्टेन्मेंट झोनबाबत कोणतीही हालचाल होत नसेल तर झोन रद्द करावा, असे म्हणणे मांडले; परंतू म्हणण्याबाबत गैरसमज पसरविण्यात आला. जर निरपेक्षेने आणी पर्यायाने स्वत:चा कुटूंबांचा जीव धोक्‍यात घालून काम करूनही असे वाद होत असतील तर या पदावर राहणे योग्य नाही.'' ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर यांना विचारले असता त्यांनी पुढे गणेश चतुर्थी असून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.  स्वयंसेवक सदस्यांचे जर काही गैरसमज झाले असतील ते दूर करून पुन्हा आजपर्यंत जे सहकार्य केले ते असेच पुढेपर्यंत करावे.  - निरज मोरये, उपसरपंच, नांदगाव.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fdFTc8
Read More
ससूनच्या दारात भर पावसात भिजणाऱ्या रुग्णाचा मृत्यू

पुणे - ससून रुग्णालयाच्या दारात शुक्रवारी झालेल्या धो-धो पावसात भिजत पडलेल्या त्या जर्जर देहाने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. वेदनेने विव्हळणारा तो उपचारासाठी रुग्णालयाच्या दारापर्यंत आला, पण त्याला दाखल करण्यासाठी रुग्णालयात ड्युटी कोणाचीच नव्हती! 

रवी धन्नाप्पा शिंदे (रा. बाणेर) असे त्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. एक महिला शिंदे यांना ससूनच्या प्रवेशद्वाराजवळ सोडून निघून गेली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

उपचारांसाठी रुग्णालयाच्या दारापर्यंत शिंदे आले पण, इतक्‍यात धो-धो पाऊस पडू लागला. कोसळणाऱ्या पावसात ते जमिनीवर पडले. वेदेनेने विव्हळू लागले. त्यांना चक्कर येऊ लागली. मात्र, पोलिस, रुग्णवाहिकेतील कर्मचारी, ससून रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका, सुरक्षारक्षक, डॉक्‍टर यांपैकी कोणीही शिंदे यांना दाखल केले नाही. संवेदनशील मनाला सुन्न करणारी ही घटना होती. या वेळी तेथून जाणाऱ्या डॉ. मानसी पवार यांचे या रुग्णाकडे लक्ष गेले. सध्या रुग्णालयात कोरोना उद्रेकामुळे रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. रुग्णालय रुग्णांनी पूर्ण भरले आहे, अशी सारवासारव डॉक्‍टरांनी केली. अखेर शिंदे यांना दाखल करून घेतले. या बाबतचे वृत्त शनिवारी (ता. 25) "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिंदे यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना अँनेमिया होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याचे शरीर उपचारांस प्रतिसाद देत नव्हते. त्यातच मंगळवारी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. या घटनेबाबत सविस्तर चौकशी झाली. पण, त्या रुग्णाचा प्राण वाचला नाही. रुग्णालयात दाखल होण्याची झुंज रुग्ण जिंकला खरा, पण मृत्यूशी लढाई हरला. 

संवेदनशील मन सुन्न करणारी ससून रुग्णालयातील घटना वाचा सविस्तर...

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ससूनच्या दारात भर पावसात भिजणाऱ्या रुग्णाचा मृत्यू पुणे - ससून रुग्णालयाच्या दारात शुक्रवारी झालेल्या धो-धो पावसात भिजत पडलेल्या त्या जर्जर देहाने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. वेदनेने विव्हळणारा तो उपचारासाठी रुग्णालयाच्या दारापर्यंत आला, पण त्याला दाखल करण्यासाठी रुग्णालयात ड्युटी कोणाचीच नव्हती!  रवी धन्नाप्पा शिंदे (रा. बाणेर) असे त्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. एक महिला शिंदे यांना ससूनच्या प्रवेशद्वाराजवळ सोडून निघून गेली होती.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   उपचारांसाठी रुग्णालयाच्या दारापर्यंत शिंदे आले पण, इतक्‍यात धो-धो पाऊस पडू लागला. कोसळणाऱ्या पावसात ते जमिनीवर पडले. वेदेनेने विव्हळू लागले. त्यांना चक्कर येऊ लागली. मात्र, पोलिस, रुग्णवाहिकेतील कर्मचारी, ससून रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका, सुरक्षारक्षक, डॉक्‍टर यांपैकी कोणीही शिंदे यांना दाखल केले नाही. संवेदनशील मनाला सुन्न करणारी ही घटना होती. या वेळी तेथून जाणाऱ्या डॉ. मानसी पवार यांचे या रुग्णाकडे लक्ष गेले. सध्या रुग्णालयात कोरोना उद्रेकामुळे रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. रुग्णालय रुग्णांनी पूर्ण भरले आहे, अशी सारवासारव डॉक्‍टरांनी केली. अखेर शिंदे यांना दाखल करून घेतले. या बाबतचे वृत्त शनिवारी (ता. 25) "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा शिंदे यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना अँनेमिया होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याचे शरीर उपचारांस प्रतिसाद देत नव्हते. त्यातच मंगळवारी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. या घटनेबाबत सविस्तर चौकशी झाली. पण, त्या रुग्णाचा प्राण वाचला नाही. रुग्णालयात दाखल होण्याची झुंज रुग्ण जिंकला खरा, पण मृत्यूशी लढाई हरला.  संवेदनशील मन सुन्न करणारी ससून रुग्णालयातील घटना वाचा सविस्तर... News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fdldkK
Read More
धक्क्यावर धक्के...कारिवडेतील ग्रामस्थांचे धाबे दणाणले

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कारिवडेत अजून तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये दोन लहान मुले व एका महिलेचा समावेश असून दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातीलच ते जवळचे नातेवाईक आहेत. तालुक्‍याची एकुण रुग्णसंख्या आता 64 वर पोहचली, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी सांगितले. 

कारिवडेमध्ये दोन दिवसांपूर्वी स्थानिक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली होती. आरोग्य प्रशासनाने तत्काळ पावले उचलताना तो भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करताना संबंधित व्यक्तीच्या घरातील व शेजारील असे मिळून एकूण बारा व्यक्तींचे स्बॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन केले होते. त्यापैकी आज त्याच्या जवळचे नातेवाईक असणाऱ्यापैकी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कारिवडेमध्ये यापूर्वीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत; मात्र ते सर्व रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन असल्याने ते अन्य कोणाच्या संपर्कात आले नव्हते.

दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या तो पॉझिटिव्ह रुग्ण चितारआळी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला असावा, असा संशय आहे. चितारआळी भागात नोकरीनिमित्त जाणे येणे होते. कारिवडे गावात एकापाठोपाठ एक रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थांमधून काहीशी भीती व्यक्त होत आहे. 

सावंतवाडी शहरातील चितारआळी येथील दाम्पत्याच्या संपर्कातील सात व्यक्तींचा अहवाल आतापर्यंत पॉझिटिव्ह आला असून सुरुवातीला निगेटिव्ह आलेल्या त्याच्या मुलाचा अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. मळगाव येथे आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील काही जणांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही; मात्र तालुक्‍यात जे स्थानिक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत त्यांच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्यांना क्वारटांईन करण्यात आले आहे; मात्र संपर्कातील व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने भीती व्यक्त होत आहे. नव्याने तीन रुग्ण आढळून आल्याने कारिवडे ग्रामपंचायत प्रशासन व सनियंत्रण समिती अधिक सतर्क झाली आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

धक्क्यावर धक्के...कारिवडेतील ग्रामस्थांचे धाबे दणाणले सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कारिवडेत अजून तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये दोन लहान मुले व एका महिलेचा समावेश असून दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातीलच ते जवळचे नातेवाईक आहेत. तालुक्‍याची एकुण रुग्णसंख्या आता 64 वर पोहचली, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी सांगितले.  कारिवडेमध्ये दोन दिवसांपूर्वी स्थानिक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली होती. आरोग्य प्रशासनाने तत्काळ पावले उचलताना तो भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करताना संबंधित व्यक्तीच्या घरातील व शेजारील असे मिळून एकूण बारा व्यक्तींचे स्बॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन केले होते. त्यापैकी आज त्याच्या जवळचे नातेवाईक असणाऱ्यापैकी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कारिवडेमध्ये यापूर्वीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत; मात्र ते सर्व रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन असल्याने ते अन्य कोणाच्या संपर्कात आले नव्हते. दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या तो पॉझिटिव्ह रुग्ण चितारआळी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला असावा, असा संशय आहे. चितारआळी भागात नोकरीनिमित्त जाणे येणे होते. कारिवडे गावात एकापाठोपाठ एक रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थांमधून काहीशी भीती व्यक्त होत आहे.  सावंतवाडी शहरातील चितारआळी येथील दाम्पत्याच्या संपर्कातील सात व्यक्तींचा अहवाल आतापर्यंत पॉझिटिव्ह आला असून सुरुवातीला निगेटिव्ह आलेल्या त्याच्या मुलाचा अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. मळगाव येथे आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील काही जणांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही; मात्र तालुक्‍यात जे स्थानिक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत त्यांच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्यांना क्वारटांईन करण्यात आले आहे; मात्र संपर्कातील व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने भीती व्यक्त होत आहे. नव्याने तीन रुग्ण आढळून आल्याने कारिवडे ग्रामपंचायत प्रशासन व सनियंत्रण समिती अधिक सतर्क झाली आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39G7ZMk
Read More
समस्यांवर समस्या...एकीकडे कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या अन् दुसरीकडे हे

ओरोस (सिंधुदुर्ग) - शासनाने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत दिलेल्या आदेशाची सिंधुदुर्गात अंमलबजावणी होणे कठिण आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि सदोष इंटरनेट जोडणीमुळे ही स्थिती ओढवली आहे. 
कोरोनाच्या प्रभावामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होवून महिना उलटला तरी सुरू न झालेल्या शाळा सुरू करण्याबाबत शासनाने डेडलाईन दिली होती.

या पहिल्या आदेशानंतर शासनाने दुसरा आदेश काढत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याबाबत आदेश काढले आहेत; परंतु सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही आदेशांची जिल्ह्यात अंमलबजावणी अशक्‍य आहे. पहिले कारण म्हणजे जिल्ह्यात कोरोना प्रभाव अधिक घट्ट होत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होणार नाहीत. जिल्ह्यात 82 टक्के मुलांकडे इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी नसल्याने दुसऱ्या आदेशाप्रमाणे ऑनलाईन लेक्‍चर सुरू होवू शकत नाही. 

कोरोनामुळे मार्चमध्ये शाळा बंद केल्या. 2019-20 वर्षातील अंतिम परीक्षा रद्द केल्या. शासनाने शिक्षणापेक्षा मुलांच्या आरोग्याला महत्व दिले. 2020-21 हे शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी शाळा सुरु करण्याबाबत आदेश केलेले नाहीत. या शैक्षणिक वर्षात नववी ते बारावीचा वर्ग जुलैमध्ये सुरु करावेत, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टमध्ये सुरु करावेत, तीसरी ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरमध्ये सुरु करावेत, असे शासनाचे आदेश आहेत.

यात पहिली ते दुसरीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले नव्हते. त्यानंतर शासनाने 22 जुलैला आदेश नव्याने काढत त्यात पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण ऑनलाईन सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी कोणत्या इयत्तेचे लेक्‍चर किती वेळ घ्यायचे? याचेही नियोजन करून दिले आहे. 
शासन आदेशानुसार जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शाळा सुरु करायच्या की नाही? याबाबतचा अभिप्राय शाळा स्तरावरील असलेल्या व्यवस्थापन समित्यांकडून 25 जूनपर्यंत मागविण्यात आले होते.

त्या अभिप्रायात सर्वाधिक शाळांनी शाळेची घंटा वाजवावी, असे कळविले होते. यात जिल्ह्यातील 1390 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपैकी 1256 शाळांनी नियोजित वेळापत्रकानुसार शाळा सुरु करण्यास सहमती दर्शविली आहे. माध्यमिकच्या 247 पैकी 112 शाळांनी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग जुलैपासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. 

शाळा समित्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार शाळा सुरु करण्यास सहमती दर्शविली असली तरी हे अभिप्राय वाचल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जुलैनंतर याबाबत निर्णय घेण्याचे जाहीर केले होते; मात्र पूर्ण राज्यातील कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेत शासनाला प्रत्यक्ष शाळा भरणार नाहीत, हे लक्षात आल्याने ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे तसे आदेश काढले आहेत; मात्र या आदेशाचीही जिल्ह्यात अंमलबजावणी होवू शकत नाही.

कारण जिल्ह्यात नेट कनेक्‍टिव्हिटी पुरेशी नाही. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या शिक्षण घेणाऱ्या मुलांमधील 82 टक्के मुलांना नेट मिळत नाही. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांत 65 हजार 689 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील 30 हजार 435 विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन आहे. उर्वरित मुलांकडे ही सुविधा नाही. 
अनेक मुले ऑनलाईन नाहीत 
याबाबत एका खाजगी शाळेच्या शिक्षकांना विचारले असता, खाजगी संस्थाच्या शाळा या अन्य शाळांच्या तुलनेत शहरात असतात. ग्रामीण भागापेक्षा जास्त येथे नेट उपलब्ध असते. तरीही आमच्या ऑनलाईन लेक्‍चरला अर्ध्यापेक्षा जास्त मुले नेट अभावी ऑनलाईन येत नाहीत, असे सांगितले. 

अधिकाधिक मुले वंचित 
शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात पहिली ते बारावी शिक्षण ऑनलाईन सुरु केल्यास जिल्ह्यात दोन भाग पडण्याची शक्‍यता आहे. कारण सध्या बारावीपर्यंत ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांतील अधिकाधिक मुलांपर्यंत हे शिक्षण पोहोचणार नाही. यामुळे ज्यांना हे शिक्षण घेता येणार नाही ती मुले वंचित राहणार आहेत. याचा अर्थ एवढ्या मुलांकडे स्मार्ट फोन नाही, असे नाही तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत पुरेशी नेट कनेक्‍टिव्हिटी नाही. त्यामुळे ही स्थिती आहे. 

ऑनलाईन शिक्षणाचे आदेश 
* पूर्व प्राथमिक ः सोमवार ते शुक्रवार. प्रत्येक दिवशी 30 मिनिट. पालक व विद्यार्थी मार्गदर्शन 
* पहिली ते दुसरी ः सोमवार ते शुक्रवार. प्रत्येक दिवशी 30 मिनिटे. 15 मिनिटे पालक आणि 15 मिनिटे विद्यार्थी. 
* तीसरी ते आठवी ः प्रत्येक दिवशी 45 मिनिटांचे दोन सत्र 
* नववी ते बारावी ः प्रत्येक दिवशी 45 मिनिटांची चार सत्र 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

समस्यांवर समस्या...एकीकडे कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या अन् दुसरीकडे हे ओरोस (सिंधुदुर्ग) - शासनाने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत दिलेल्या आदेशाची सिंधुदुर्गात अंमलबजावणी होणे कठिण आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि सदोष इंटरनेट जोडणीमुळे ही स्थिती ओढवली आहे.  कोरोनाच्या प्रभावामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होवून महिना उलटला तरी सुरू न झालेल्या शाळा सुरू करण्याबाबत शासनाने डेडलाईन दिली होती. या पहिल्या आदेशानंतर शासनाने दुसरा आदेश काढत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याबाबत आदेश काढले आहेत; परंतु सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही आदेशांची जिल्ह्यात अंमलबजावणी अशक्‍य आहे. पहिले कारण म्हणजे जिल्ह्यात कोरोना प्रभाव अधिक घट्ट होत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होणार नाहीत. जिल्ह्यात 82 टक्के मुलांकडे इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी नसल्याने दुसऱ्या आदेशाप्रमाणे ऑनलाईन लेक्‍चर सुरू होवू शकत नाही.  कोरोनामुळे मार्चमध्ये शाळा बंद केल्या. 2019-20 वर्षातील अंतिम परीक्षा रद्द केल्या. शासनाने शिक्षणापेक्षा मुलांच्या आरोग्याला महत्व दिले. 2020-21 हे शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी शाळा सुरु करण्याबाबत आदेश केलेले नाहीत. या शैक्षणिक वर्षात नववी ते बारावीचा वर्ग जुलैमध्ये सुरु करावेत, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टमध्ये सुरु करावेत, तीसरी ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरमध्ये सुरु करावेत, असे शासनाचे आदेश आहेत. यात पहिली ते दुसरीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले नव्हते. त्यानंतर शासनाने 22 जुलैला आदेश नव्याने काढत त्यात पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण ऑनलाईन सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी कोणत्या इयत्तेचे लेक्‍चर किती वेळ घ्यायचे? याचेही नियोजन करून दिले आहे.  शासन आदेशानुसार जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शाळा सुरु करायच्या की नाही? याबाबतचा अभिप्राय शाळा स्तरावरील असलेल्या व्यवस्थापन समित्यांकडून 25 जूनपर्यंत मागविण्यात आले होते. त्या अभिप्रायात सर्वाधिक शाळांनी शाळेची घंटा वाजवावी, असे कळविले होते. यात जिल्ह्यातील 1390 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपैकी 1256 शाळांनी नियोजित वेळापत्रकानुसार शाळा सुरु करण्यास सहमती दर्शविली आहे. माध्यमिकच्या 247 पैकी 112 शाळांनी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग जुलैपासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे.  शाळा समित्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार शाळा सुरु करण्यास सहमती दर्शविली असली तरी हे अभिप्राय वाचल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जुलैनंतर याबाबत निर्णय घेण्याचे जाहीर केले होते; मात्र पूर्ण राज्यातील कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेत शासनाला प्रत्यक्ष शाळा भरणार नाहीत, हे लक्षात आल्याने ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे तसे आदेश काढले आहेत; मात्र या आदेशाचीही जिल्ह्यात अंमलबजावणी होवू शकत नाही. कारण जिल्ह्यात नेट कनेक्‍टिव्हिटी पुरेशी नाही. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या शिक्षण घेणाऱ्या मुलांमधील 82 टक्के मुलांना नेट मिळत नाही. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांत 65 हजार 689 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील 30 हजार 435 विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन आहे. उर्वरित मुलांकडे ही सुविधा नाही.  अनेक मुले ऑनलाईन नाहीत  याबाबत एका खाजगी शाळेच्या शिक्षकांना विचारले असता, खाजगी संस्थाच्या शाळा या अन्य शाळांच्या तुलनेत शहरात असतात. ग्रामीण भागापेक्षा जास्त येथे नेट उपलब्ध असते. तरीही आमच्या ऑनलाईन लेक्‍चरला अर्ध्यापेक्षा जास्त मुले नेट अभावी ऑनलाईन येत नाहीत, असे सांगितले.  अधिकाधिक मुले वंचित  शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात पहिली ते बारावी शिक्षण ऑनलाईन सुरु केल्यास जिल्ह्यात दोन भाग पडण्याची शक्‍यता आहे. कारण सध्या बारावीपर्यंत ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांतील अधिकाधिक मुलांपर्यंत हे शिक्षण पोहोचणार नाही. यामुळे ज्यांना हे शिक्षण घेता येणार नाही ती मुले वंचित राहणार आहेत. याचा अर्थ एवढ्या मुलांकडे स्मार्ट फोन नाही, असे नाही तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत पुरेशी नेट कनेक्‍टिव्हिटी नाही. त्यामुळे ही स्थिती आहे.  ऑनलाईन शिक्षणाचे आदेश  * पूर्व प्राथमिक ः सोमवार ते शुक्रवार. प्रत्येक दिवशी 30 मिनिट. पालक व विद्यार्थी मार्गदर्शन  * पहिली ते दुसरी ः सोमवार ते शुक्रवार. प्रत्येक दिवशी 30 मिनिटे. 15 मिनिटे पालक आणि 15 मिनिटे विद्यार्थी.  * तीसरी ते आठवी ः प्रत्येक दिवशी 45 मिनिटांचे दोन सत्र  * नववी ते बारावी ः प्रत्येक दिवशी 45 मिनिटांची चार सत्र  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jZW80n
Read More
कोरोना रॅपिड सेंटरबाबत सिंधुदुर्गात महत्त्वाचा निर्णय

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे 1 ऑगस्टपासून कोरोना रॅपिड टेस्ट सेंटर सुरू होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ..धनंजय चाकूरकर यांनी आज येथे दिली. 

श्री.चाकुरकर यांनी आज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.. महेश खलीपे, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नलावडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय नांदरेकर, खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा ताडे आदी उपस्थित होते. 

खारेपाटण येथे होत असलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट केंद्राची पाहणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चाकुरकर यांनी केली. त्यानंतर खारेपाटण सरपंच तथा ग्रामसनियंत्रण समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत यांच्याशी त्यांनी चाकरमान्यांच्या नियोजनाबाबत चर्चा केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ.प्रिया वडाम आणि येथील कर्मचारी वर्गाला कोरोना-19 च्या पार्श्‍वभूमीवर योग्य सूचना दिल्या. तसेच खारेपाटण चेकपोस्ट येथील सिंधुदुर्ग जिल्हा तपासणी नाक्‍यालाही भेट देऊन येथील महसूल पथक, आरोग्य पथक व पोलिस यंत्रणेची त्यांनी पाहणी केली. 

डॉ. वडाम नोडल अधिकारी 
खारेपाटण येथील कोरोना रॅपिड टेस्ट सेंटर हे खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होणार आहे. येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच येथील एकूण 5 आरोग्य कर्मचारी वर्गाला याचे विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना रॅपिड सेंटरबाबत सिंधुदुर्गात महत्त्वाचा निर्णय खारेपाटण (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे 1 ऑगस्टपासून कोरोना रॅपिड टेस्ट सेंटर सुरू होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ..धनंजय चाकूरकर यांनी आज येथे दिली.  श्री.चाकुरकर यांनी आज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.. महेश खलीपे, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नलावडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय नांदरेकर, खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा ताडे आदी उपस्थित होते.  खारेपाटण येथे होत असलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट केंद्राची पाहणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चाकुरकर यांनी केली. त्यानंतर खारेपाटण सरपंच तथा ग्रामसनियंत्रण समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत यांच्याशी त्यांनी चाकरमान्यांच्या नियोजनाबाबत चर्चा केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ.प्रिया वडाम आणि येथील कर्मचारी वर्गाला कोरोना-19 च्या पार्श्‍वभूमीवर योग्य सूचना दिल्या. तसेच खारेपाटण चेकपोस्ट येथील सिंधुदुर्ग जिल्हा तपासणी नाक्‍यालाही भेट देऊन येथील महसूल पथक, आरोग्य पथक व पोलिस यंत्रणेची त्यांनी पाहणी केली.  डॉ. वडाम नोडल अधिकारी  खारेपाटण येथील कोरोना रॅपिड टेस्ट सेंटर हे खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होणार आहे. येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच येथील एकूण 5 आरोग्य कर्मचारी वर्गाला याचे विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/312NncT
Read More
(Video) शब्बास पोरी : हलाखीची परिस्थिती, त्यातच वडिलांचे निधन; तरी मिळविले एवढे टक्‍के... 

उमरेड (जि. नागपूर) : बुधवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अनेकांची परिस्थिती अनुकूल होती. परंतु, उमरेड शहरातील न्यू आयडियल गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या आदिवासी समाजाच्या तन्नू सूरदास जांभुळे या विद्यार्थिनीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत घवघवीत यश मिळवले. हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हेच एकमेव अस्र आहे, हे तन्नूला कळून चुकले होते. त्याच दृष्टीने तिचे प्रयत्न सुरू असताना ऐन परीक्षेच्या तोंडावर तिच्यावर मोठा आघात झाला. त्यातूनही ती सावरली आणि घवघवीत यश मिळविले. जाणून घेऊया तन्नूची यशोगाथा... 

स्थानिक एमआयडीसी परिसराच्या शेजारी वसलेल्या कुंभारी या लहानशा गावात तन्नू जांभुळे कुटुंबीयांसह राहते. घरची परिस्थिती बेताचीच. लहानपणापासून हुशार असलेल्या तन्नूला घरची हीच परिस्थिती बदलायची होती. त्यासाठी तिचे प्रयत्नही सुरू होते. दहावीच्या वर्गात प्रवेश करताच तिने सुरुवातीपासून अभ्यासावर भर दिला. घरची परिस्थिती जाणून असल्याने शिकवणी लावण्याकडे तिचा कल नव्हताच. मग शिक्षक जे सांगतील ते करून रोजचा अभ्यास रोज हेच तिचे धोरण होते. वडीलही आपल्या मुलीला कसलीच कमी पडू देणार नाही, असे जेव्हा तिच्या आईला सांगायचे तेव्हा तन्नूला अभ्यासाची जिद्द चढायची. परंतु नियतील हे मंजूर नव्हतेच. 

ऐन परीक्षेच्या तोंडावर वडिलांचे अपघाती निधन झाले आणि तन्नूसह संपूर्ण कुटुंबच कोलमडले. आता पुढे काय, हा एकच प्रश्‍न तिच्या आईला सतावत होता. परंतु आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे हे ठरवलेल्या तन्नूने वडिलांच्या जाण्याच्या धक्‍क्‍यातून सावरत संपूर्ण कुटुंबाला आधार दिला. वडील गेल्यानंतर घरची आर्थिक स्थिती अधिक कमकुवत झाली. तेव्हा आईसोबत शेतमजुरीला तिला जावे लागायचे. परंतु अभ्यासाची जिद्द कायम होती. आईवर तिची आणि लहान भावाची जबाबदारी असल्याने तन्नू आईला आर्थिक हातभार लावायची. 

ठळक बातमी - व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल...
 

बेताच्या आर्थिक परिस्थितीतही तन्नूने जिद्द व चिकाटी कायम ठेवली. घरापासून पाच-सहा किलोमीटरचा प्रवास दररोज पायी करून तिने दहावीचा अभ्यास पूर्ण केला आणि दहावीच्या परीक्षेत तिने तब्बल 87.40 टक्‍के गुण मिळविले. आज तिच्या यशामुळे तिची आई ताई सूरदास जांभुळे गहिवरल्या. तिने आपल्या वडिलांच्या इच्छा पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा जांभुळे यांनी व्यक्‍त केली. 

 

परिस्थितीवर मात करून मुलीला शिकवीन 

तन्नू लहानपणापासून हुशार आहे. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे आम्ही तिला सुखसुविधा पुरवू शकलो नाही. आता तर कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्याने हातावर आणून पानवर खाणे आहे. तरी आम्ही जिद्द सोडली नाही. मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कोणतीही कमी पडू देणार नाही. आई म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही, अशी भावना ताई जांभुळे यांनी "सकाळ' प्रतिनिधीजवळ व्यक्‍त केली. 

 

तन्नूला इंजिनिअर व्हायचेय...

 
शिकवणी वर्ग नसताना, आईला आर्थिक मदत करून तन्नूने दहावीच्या परीक्षेत तब्बल 87.40 टक्‍के गुण मिळविले. तिच्य या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तन्नूला इंजिनिअर व्हायचे आहे. परिस्थितीअभावी तन्नूचे शिक्षण मागे राहू नये, अशी अपेक्षा तिच्या शिक्षकांनी व्यक्‍त केली. अभ्यासोबतच ती खेळातही अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन : अतुल मांगे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

(Video) शब्बास पोरी : हलाखीची परिस्थिती, त्यातच वडिलांचे निधन; तरी मिळविले एवढे टक्‍के...  उमरेड (जि. नागपूर) : बुधवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अनेकांची परिस्थिती अनुकूल होती. परंतु, उमरेड शहरातील न्यू आयडियल गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या आदिवासी समाजाच्या तन्नू सूरदास जांभुळे या विद्यार्थिनीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत घवघवीत यश मिळवले. हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हेच एकमेव अस्र आहे, हे तन्नूला कळून चुकले होते. त्याच दृष्टीने तिचे प्रयत्न सुरू असताना ऐन परीक्षेच्या तोंडावर तिच्यावर मोठा आघात झाला. त्यातूनही ती सावरली आणि घवघवीत यश मिळविले. जाणून घेऊया तन्नूची यशोगाथा...  स्थानिक एमआयडीसी परिसराच्या शेजारी वसलेल्या कुंभारी या लहानशा गावात तन्नू जांभुळे कुटुंबीयांसह राहते. घरची परिस्थिती बेताचीच. लहानपणापासून हुशार असलेल्या तन्नूला घरची हीच परिस्थिती बदलायची होती. त्यासाठी तिचे प्रयत्नही सुरू होते. दहावीच्या वर्गात प्रवेश करताच तिने सुरुवातीपासून अभ्यासावर भर दिला. घरची परिस्थिती जाणून असल्याने शिकवणी लावण्याकडे तिचा कल नव्हताच. मग शिक्षक जे सांगतील ते करून रोजचा अभ्यास रोज हेच तिचे धोरण होते. वडीलही आपल्या मुलीला कसलीच कमी पडू देणार नाही, असे जेव्हा तिच्या आईला सांगायचे तेव्हा तन्नूला अभ्यासाची जिद्द चढायची. परंतु नियतील हे मंजूर नव्हतेच.  ऐन परीक्षेच्या तोंडावर वडिलांचे अपघाती निधन झाले आणि तन्नूसह संपूर्ण कुटुंबच कोलमडले. आता पुढे काय, हा एकच प्रश्‍न तिच्या आईला सतावत होता. परंतु आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे हे ठरवलेल्या तन्नूने वडिलांच्या जाण्याच्या धक्‍क्‍यातून सावरत संपूर्ण कुटुंबाला आधार दिला. वडील गेल्यानंतर घरची आर्थिक स्थिती अधिक कमकुवत झाली. तेव्हा आईसोबत शेतमजुरीला तिला जावे लागायचे. परंतु अभ्यासाची जिद्द कायम होती. आईवर तिची आणि लहान भावाची जबाबदारी असल्याने तन्नू आईला आर्थिक हातभार लावायची.  ठळक बातमी - व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल...   बेताच्या आर्थिक परिस्थितीतही तन्नूने जिद्द व चिकाटी कायम ठेवली. घरापासून पाच-सहा किलोमीटरचा प्रवास दररोज पायी करून तिने दहावीचा अभ्यास पूर्ण केला आणि दहावीच्या परीक्षेत तिने तब्बल 87.40 टक्‍के गुण मिळविले. आज तिच्या यशामुळे तिची आई ताई सूरदास जांभुळे गहिवरल्या. तिने आपल्या वडिलांच्या इच्छा पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा जांभुळे यांनी व्यक्‍त केली.    परिस्थितीवर मात करून मुलीला शिकवीन  तन्नू लहानपणापासून हुशार आहे. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे आम्ही तिला सुखसुविधा पुरवू शकलो नाही. आता तर कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्याने हातावर आणून पानवर खाणे आहे. तरी आम्ही जिद्द सोडली नाही. मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कोणतीही कमी पडू देणार नाही. आई म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही, अशी भावना ताई जांभुळे यांनी "सकाळ' प्रतिनिधीजवळ व्यक्‍त केली.    तन्नूला इंजिनिअर व्हायचेय...   शिकवणी वर्ग नसताना, आईला आर्थिक मदत करून तन्नूने दहावीच्या परीक्षेत तब्बल 87.40 टक्‍के गुण मिळविले. तिच्य या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तन्नूला इंजिनिअर व्हायचे आहे. परिस्थितीअभावी तन्नूचे शिक्षण मागे राहू नये, अशी अपेक्षा तिच्या शिक्षकांनी व्यक्‍त केली. अभ्यासोबतच ती खेळातही अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले.  संपादन : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/339x5Sy
Read More
राफेल विमानाचे साक्षीदार; एअर कमाडोर हिलालांसाठी गौरवास्पद क्षण

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाची ताकद वाढवणारी लढाऊ राफेल विमानांचे आगमन बुधवारी भारतात झाले. या विमानांच्या फ्रान्स ते भारतात प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणारे एअर कमाडोर हिलाल अहमद राथेर (वय ५२) यांच्यासाठी तर आजचा दिवस खास ठरला. मूळचे जम्मू-काश्‍मीरचे असलेले राथेर हे त्यांच्या गावासाठी हिरो ठरले आहेत. राफेल भारतात आणण्यात भारताचे फ्रान्‍मधील राजदूत जावेद अश्रफ यांचाही सहभाग होता.

जबाबदारी
भारताचे फ्रान्समधील ॲटॅची
राफेल विमाने भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका
वेळेत ताबा मिळणे आणि भारताच्या गरजांनुसार हा व्यवहार पूर्ण करण्यास प्राधान्य
भारतीय हवाई दलातील १५२ तंत्रज्ञ आणि लढाऊ विमानाचे २७ वैमानिकांना विमानात इंधन भरण्याच्या प्रशिक्षणाचे पर्यवेक्षक

कामगिरी
मिग-२१, मिराज २००० आणि किरण विमाने बिनचुकपणे व विना अपघात सुमारे तीन हजार तास उडविले
२०१०मध्ये विंग कमांडरच्या रूपात हवाई दलाच्या पदकाने सन्मानित
२०१६ मध्ये ग्रुप कॅप्टनच्या कार्यकाळात विशिष्ट सेवा पदक प्रदान

पार्श्‍वभूमी
जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बक्शियाबादचे रहिवासी
वडील मोहम्मद अब्दुल्ला राथर जम्मू-काश्‍मीर पोलिस दलात पोलिस उपअधीक्षक पदावरुन निवृत्त
सैनिकी शाळेतून शिक्षण 
डिफेन्स सर्व्हिल कॉलेजमधून (डीएसएससी) पदवीचे शिक्षण
राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी
अमेरिकेतील एअर वॉर कॉलेजमधून विशेष नैपुण्यासह पदवी प्राप्त
१७ डिसेंबर १९८८ मध्ये वैमानिक म्हणून हवाई दलात प्रवेश
१९९३ मध्ये फ्लाईट लेफ्टनंट, २००४ मध्ये विंग कमांडर, २०१६ मध्ये ग्रुप कॅप्टन, २०१९ मध्ये एअर कमाडोरपदी नियुक्ती

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राफेल विमानाचे साक्षीदार; एअर कमाडोर हिलालांसाठी गौरवास्पद क्षण नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाची ताकद वाढवणारी लढाऊ राफेल विमानांचे आगमन बुधवारी भारतात झाले. या विमानांच्या फ्रान्स ते भारतात प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणारे एअर कमाडोर हिलाल अहमद राथेर (वय ५२) यांच्यासाठी तर आजचा दिवस खास ठरला. मूळचे जम्मू-काश्‍मीरचे असलेले राथेर हे त्यांच्या गावासाठी हिरो ठरले आहेत. राफेल भारतात आणण्यात भारताचे फ्रान्‍मधील राजदूत जावेद अश्रफ यांचाही सहभाग होता. जबाबदारी भारताचे फ्रान्समधील ॲटॅची राफेल विमाने भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका वेळेत ताबा मिळणे आणि भारताच्या गरजांनुसार हा व्यवहार पूर्ण करण्यास प्राधान्य भारतीय हवाई दलातील १५२ तंत्रज्ञ आणि लढाऊ विमानाचे २७ वैमानिकांना विमानात इंधन भरण्याच्या प्रशिक्षणाचे पर्यवेक्षक कामगिरी मिग-२१, मिराज २००० आणि किरण विमाने बिनचुकपणे व विना अपघात सुमारे तीन हजार तास उडविले २०१०मध्ये विंग कमांडरच्या रूपात हवाई दलाच्या पदकाने सन्मानित २०१६ मध्ये ग्रुप कॅप्टनच्या कार्यकाळात विशिष्ट सेवा पदक प्रदान पार्श्‍वभूमी जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बक्शियाबादचे रहिवासी वडील मोहम्मद अब्दुल्ला राथर जम्मू-काश्‍मीर पोलिस दलात पोलिस उपअधीक्षक पदावरुन निवृत्त सैनिकी शाळेतून शिक्षण  डिफेन्स सर्व्हिल कॉलेजमधून (डीएसएससी) पदवीचे शिक्षण राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी अमेरिकेतील एअर वॉर कॉलेजमधून विशेष नैपुण्यासह पदवी प्राप्त १७ डिसेंबर १९८८ मध्ये वैमानिक म्हणून हवाई दलात प्रवेश १९९३ मध्ये फ्लाईट लेफ्टनंट, २००४ मध्ये विंग कमांडर, २०१६ मध्ये ग्रुप कॅप्टन, २०१९ मध्ये एअर कमाडोरपदी नियुक्ती News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2P8fiTi
Read More
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थांमध्ये चुरस; नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण...

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाचा दहावी परीक्षेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत 18.2 टक्केनी वाढला आहे. तर सीबीएसई आणि आयसीएसईचा निकालही 95 टक्क्यांच्या पार लागल्याने यंदा नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये यंदा चांगलीच चुरस पाहण्यास मिळणार आहे.

कोव्हिड रुग्णालयात महिला रुग्णाशी गैरवर्तन; नराधमास तरुणांनी दिला चोप...

दरवर्षी दहावीचा निकाल जूनमध्ये जाहीर होतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे निकालाला दीड महिन्याहून अधिक विलंब झाला. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने राज्य मंडळाचा दहावीचा शेवटचा पेपर होऊ शकला नाही. भूगोलाचा शेवटचा पेपर बाकी असताना कोरोनाचा कहर वाढल्याने अखेर हा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीने विद्यार्थ्यांना गुण विद्यार्थाना देण्यात आले.

भन्नाट ! हा अनोखा 'रक्षक' तपासणार तापमान, नाडी आणि रक्तातील ऑक्सिजनची टक्केवारी

त्यामुळे राज्याच्या निकालाचा टक्का चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर यंदा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांमध्येही 90 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस होणार आहे. याचबरोबर प्राविण्यासह प्रथम आलेल्यांमध्ये 1 लाख 8 हजार 49 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर 60 टक्के आणि त्यापुढे गुण मिळवणाऱ्यांची संख्या ही 1 लाख 17 हजार 819 इतकी आहे. यामुळे मुंबई आणि परिसरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी चुरस पहावयाला मिळणार आहे. मुंबई विभागात यंदा अकरावी प्रवेशासाठी तीन लाख 20 हजार जागा आहेत.

------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थांमध्ये चुरस; नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण... मुंबई : राज्य शिक्षण मंडळाचा दहावी परीक्षेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत 18.2 टक्केनी वाढला आहे. तर सीबीएसई आणि आयसीएसईचा निकालही 95 टक्क्यांच्या पार लागल्याने यंदा नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये यंदा चांगलीच चुरस पाहण्यास मिळणार आहे. कोव्हिड रुग्णालयात महिला रुग्णाशी गैरवर्तन; नराधमास तरुणांनी दिला चोप... दरवर्षी दहावीचा निकाल जूनमध्ये जाहीर होतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे निकालाला दीड महिन्याहून अधिक विलंब झाला. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने राज्य मंडळाचा दहावीचा शेवटचा पेपर होऊ शकला नाही. भूगोलाचा शेवटचा पेपर बाकी असताना कोरोनाचा कहर वाढल्याने अखेर हा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीने विद्यार्थ्यांना गुण विद्यार्थाना देण्यात आले. भन्नाट ! हा अनोखा 'रक्षक' तपासणार तापमान, नाडी आणि रक्तातील ऑक्सिजनची टक्केवारी त्यामुळे राज्याच्या निकालाचा टक्का चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर यंदा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांमध्येही 90 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस होणार आहे. याचबरोबर प्राविण्यासह प्रथम आलेल्यांमध्ये 1 लाख 8 हजार 49 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर 60 टक्के आणि त्यापुढे गुण मिळवणाऱ्यांची संख्या ही 1 लाख 17 हजार 819 इतकी आहे. यामुळे मुंबई आणि परिसरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी चुरस पहावयाला मिळणार आहे. मुंबई विभागात यंदा अकरावी प्रवेशासाठी तीन लाख 20 हजार जागा आहेत. ------------------------------------------------ Edited by Tushar Sonawane News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jRTxW3
Read More
लस आली तरी मास्क हवाच!

न्यूयॉर्क - कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी जगभरात ११५ लशींवर संशोधन सुरू असून त्यापैकी २६ लशींची मानवी चाचणी सुरू झाली आहे. ही बाब दिलासादायक असली तरी कोरोनावर लस आली तरी रोजच्या जीवनात स्वसुरक्षेसाठी मास्क आणि तोंड झाकण्यासाठी अन्य साधनांपासून मुक्ती मिळणार नाही.

मास्कची आवश्‍यकता
१)कोरोना विषाणूंविरोधात लढ्यात रोग प्रतिकारक्षमतेत वाढ करणारी प्रभावी लस तयार होण्याची शक्यता कमी.
कोरोना रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याची आणि लक्षणे तयार होण्याची शक्यता लशीमुळे कमी होईल, पण कोरोनापासून संपूर्ण सुरक्षा मिळण्याची हमी नाही. 
सामूहिक संसर्ग रोखण्याची शक्यताही कमी
कोरोनाच्या संसर्ग होऊ नये यासाठी लशीची उपयुक्तता ६० ते ७० टक्केच

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

२)लस हा जादुई उपाय नव्हे (‘सायन्स इनसायडर’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात ‘बेलोर कॉलेज ऑफ मेडिसिन’मधील लस संशोधक मारिया एलेना बोटाझी यांचे भाष्य)
लस मिळाली याचा अर्थ असा नव्हे की मास्क कचरा पेटीत टाकून द्यायचा. 
लस हा कोरोनावरील जादुई उपाय आहे, असे कोणी समजू नये. 
लशीसह अन्य पर्यायांची गरज भासणारच आहे.
कोरोनाच्या प्रतिबंध लस प्रभावी असली तरी या सर्व प्रक्रिया दीर्घकालीन आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

३)तात्‍पर्य
 लस उपलब्ध झाली तरी साथीपूर्वीचे जीवन जगता येऊ शकणार नाही.
लशीनंतरही सुरक्षित अंतर, आरोग्याची काळजी घेणे, आणि संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक
कोरोनावर ६० टक्के प्रभावी ठरणाऱ्या लसीपेक्षा लस नसणे अधिक चांगले.
यामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
कोरोनात्तोर काळातही सुरक्षेसाठी मास्क लावणे उत्तम.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लस आली तरी मास्क हवाच! न्यूयॉर्क - कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी जगभरात ११५ लशींवर संशोधन सुरू असून त्यापैकी २६ लशींची मानवी चाचणी सुरू झाली आहे. ही बाब दिलासादायक असली तरी कोरोनावर लस आली तरी रोजच्या जीवनात स्वसुरक्षेसाठी मास्क आणि तोंड झाकण्यासाठी अन्य साधनांपासून मुक्ती मिळणार नाही. मास्कची आवश्‍यकता १)कोरोना विषाणूंविरोधात लढ्यात रोग प्रतिकारक्षमतेत वाढ करणारी प्रभावी लस तयार होण्याची शक्यता कमी. कोरोना रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याची आणि लक्षणे तयार होण्याची शक्यता लशीमुळे कमी होईल, पण कोरोनापासून संपूर्ण सुरक्षा मिळण्याची हमी नाही.  सामूहिक संसर्ग रोखण्याची शक्यताही कमी कोरोनाच्या संसर्ग होऊ नये यासाठी लशीची उपयुक्तता ६० ते ७० टक्केच ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   २)लस हा जादुई उपाय नव्हे (‘सायन्स इनसायडर’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात ‘बेलोर कॉलेज ऑफ मेडिसिन’मधील लस संशोधक मारिया एलेना बोटाझी यांचे भाष्य) लस मिळाली याचा अर्थ असा नव्हे की मास्क कचरा पेटीत टाकून द्यायचा.  लस हा कोरोनावरील जादुई उपाय आहे, असे कोणी समजू नये.  लशीसह अन्य पर्यायांची गरज भासणारच आहे. कोरोनाच्या प्रतिबंध लस प्रभावी असली तरी या सर्व प्रक्रिया दीर्घकालीन आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ३)तात्‍पर्य  लस उपलब्ध झाली तरी साथीपूर्वीचे जीवन जगता येऊ शकणार नाही. लशीनंतरही सुरक्षित अंतर, आरोग्याची काळजी घेणे, आणि संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक कोरोनावर ६० टक्के प्रभावी ठरणाऱ्या लसीपेक्षा लस नसणे अधिक चांगले. यामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. कोरोनात्तोर काळातही सुरक्षेसाठी मास्क लावणे उत्तम. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Eo8izx
Read More
मुख्यमंत्री घेणार प्रशासनाची झाडाझडती 

पुणे - कोरोनाचा संसर्ग, रुग्णसंख्या, उपचार व्यवस्था आणि नव्या रुग्णांना सामावून घेणारी यंत्रणा जाणून घेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी गुरुवारी (ता. 30) संवाद साधणार आहेत. त्याचवेळी ज्या उपाययोजना कागदोपत्री राहिल्या आहेत आणि त्याचे परिणाम रुग्णांना भोगावे लागत आहे, या मुद्दयावरून ठाकरे प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेण्याची शक्‍यता आहे. 

पुण्यासह जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही अत्यवस्थ रुग्णांची संख्या त्याच प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या कोविड केअर सेंटर्स आणि खासगी रुग्णालयांत बेड मिळत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. त्यावर उपाययोजना करताना प्रशासन कमी पडत असल्याची ओरड आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे हे कोरोनाविरोधातील यंत्रणेचा आढावा घेऊन नवी उपचार व्यवस्था उभारण्यासाठी पावले टाकण्याची आशा आहे. 

महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ""पुण्यात ज्या प्रमाणात नागरिकांची तपासणी होत आहे आणि नवे रुग्ण सापडत आहेत, त्यानुसार उपचार यंत्रणा आहे. त्यामुळे रुग्णांना गरजेनुसार उपचार मिळत आहेत.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राखीव खाटांबाबत काय ? 
कोरोनाची व्याप्ती वाढली तरी, खासगी हॉस्पिटलकडून बेड आणि उपचार खर्चाबाबत सहकार्य मिळत नाही, अशी तक्रार महापालिका आणि जिल्हा प्रशासनच करीत आहे. तेव्हाच, या हॉस्पिटलमधील 80 टक्के खाटा कोरोनासाठी राखीव ठेवण्याचे नियमाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यावर मुख्यमंत्री भूमिका जाहीर करण्याची शक्‍यता आहे. 

महापौरांचा निधीसाठी आग्रह 
कोरोनावर उपाय करताना महापालिकेने आतापर्यंत सुमारे 300 कोटी रुपये खर्च केल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सांगत आहे. यापुढे पुणेकरांना सुरक्षित ठेवताना राज्य सरकारने पुरेशा प्रमाणात निधी देण्याचा आग्रह मोहोळ यांनी धरला आहे. त्यावरही मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेण्याचा अंदाज आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुख्यमंत्री घेणार प्रशासनाची झाडाझडती  पुणे - कोरोनाचा संसर्ग, रुग्णसंख्या, उपचार व्यवस्था आणि नव्या रुग्णांना सामावून घेणारी यंत्रणा जाणून घेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी गुरुवारी (ता. 30) संवाद साधणार आहेत. त्याचवेळी ज्या उपाययोजना कागदोपत्री राहिल्या आहेत आणि त्याचे परिणाम रुग्णांना भोगावे लागत आहे, या मुद्दयावरून ठाकरे प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेण्याची शक्‍यता आहे.  पुण्यासह जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही अत्यवस्थ रुग्णांची संख्या त्याच प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या कोविड केअर सेंटर्स आणि खासगी रुग्णालयांत बेड मिळत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. त्यावर उपाययोजना करताना प्रशासन कमी पडत असल्याची ओरड आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे हे कोरोनाविरोधातील यंत्रणेचा आढावा घेऊन नवी उपचार व्यवस्था उभारण्यासाठी पावले टाकण्याची आशा आहे.  महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ""पुण्यात ज्या प्रमाणात नागरिकांची तपासणी होत आहे आणि नवे रुग्ण सापडत आहेत, त्यानुसार उपचार यंत्रणा आहे. त्यामुळे रुग्णांना गरजेनुसार उपचार मिळत आहेत.''  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा राखीव खाटांबाबत काय ?  कोरोनाची व्याप्ती वाढली तरी, खासगी हॉस्पिटलकडून बेड आणि उपचार खर्चाबाबत सहकार्य मिळत नाही, अशी तक्रार महापालिका आणि जिल्हा प्रशासनच करीत आहे. तेव्हाच, या हॉस्पिटलमधील 80 टक्के खाटा कोरोनासाठी राखीव ठेवण्याचे नियमाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यावर मुख्यमंत्री भूमिका जाहीर करण्याची शक्‍यता आहे.  महापौरांचा निधीसाठी आग्रह  कोरोनावर उपाय करताना महापालिकेने आतापर्यंत सुमारे 300 कोटी रुपये खर्च केल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सांगत आहे. यापुढे पुणेकरांना सुरक्षित ठेवताना राज्य सरकारने पुरेशा प्रमाणात निधी देण्याचा आग्रह मोहोळ यांनी धरला आहे. त्यावरही मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेण्याचा अंदाज आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30Xamq1
Read More
दिल्ली: स्मॉग टावर के काम से हटा IIT बॉम्बे, सुप्रीम कोर्ट ने लगाई फटकार https://ift.tt/2DfLlOv
म्यानमारमध्ये लोकमान्यांचा स्मृतिफलक

स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त उच्चायुक्तालयात कार्यक्रम; डॉ.साठेंच्या प्रयत्नांना यश
पुणे - स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतिफलकाचे म्यानमार येथील (तत्कालीन ब्रह्मदेश) उच्चायुक्तालयात एक ऑगस्टला अनावरण होणार आहे.

लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षात हा स्मृतिफलक झळकणार आहे. इंग्रजांच्या विरोधात आवाज उठविल्याबद्दल लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला. त्यासाठी त्यांना शिक्षा होऊन सहा वर्षांसाठी मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. या ठिकाणी त्यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक यांना डांबून ठेवण्यात आलेला तुरुंग आता अस्तित्वात नाही. ती जागा आता लष्कराच्या ताब्यात आहे. ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे अभ्यासक व ‘मंडालेतील गीतारहस्य’ या पुस्तकाचे लेखक डॉ. दिलीप साठे हे मंडाले येथे गेले होते. लोकमान्य टिळकांना ठेवलेल्या तुरुंगाबाबत चौकशी केली असता तो अस्तित्वात नसल्याची माहिती त्यांना मिळाली. लोकमान्यांची कोणतीही स्मृती त्याठिकाणी नव्हती. लोकमान्यांचे छायाचित्रही तेथे नसल्याचे पाहून डॉ. साठे यांना हळहळ वाटली.

मंडालेमध्ये लोकमान्य टिळकांचे स्मारक होण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी ऑगस्ट २०१६ पासून परराष्ट्र मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, म्यानमार येथील भारतीय उच्चायुक्तालयाबरोबर पत्रव्यवहार सुरू केला. केवळ पत्रव्यवहारातून काही होणार नसल्याचे लक्षात आल्याने डॉ. साठे २० ऑक्टोबर २०१९मध्ये मंडालेला गेले. तेथील उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना लोकमान्यांचे छायाचित्र, ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची प्रत दिली. लोकमान्य टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे या ठिकाणी स्मारक उभारण्याची विनंती केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

दरम्यान, डॉ. साठे यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. अवधी कमी असल्याने एक ऑगस्टला किमान त्यांचा स्मृतिफलक लावण्याची विनंती मान्य केली. लवकरच लोकमान्य टिळकांचा अर्धपुतळाही बसविण्यात येणार असल्याचे डॉ. साठे यांना म्यानमार येथील उच्चायुक्तालयातून कळविण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लोकमान्य टिळकांनी केलेला त्याग व त्यांना झालेला त्रास, भोगलेले कष्ट सर्वांना समजावे, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्याठिकाणी लोकमान्यांचे स्मारक उभे राहील, अशी मला खात्री आहे.
- डॉ. दिलीप साठे
 

दोन कार्यक्रम
लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त एक ऑगस्ट रोजी स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रातर्फे दोन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हंतावाडी विद्यापीठाचे  निवृत्त उपकुलगुरु प्रा. खी मांग चो हे बर्मी भाषेत लोकमान्यांच्या कार्याची ओळख करून देतील. लोकमान्यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यासाठी डिजिटल फोटो प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. ‘कोविड’ची समस्या लक्षात घेऊन दोन्ही कार्यक्रम ऑनलाईन होतील. उच्चायुक्तालयाच्या ‘फेसबुक’ पेजवरून हे कार्यक्रम पाहता येतील, अशी माहिती सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आसावरी बापट यांनी दिली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

म्यानमारमध्ये लोकमान्यांचा स्मृतिफलक स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त उच्चायुक्तालयात कार्यक्रम; डॉ.साठेंच्या प्रयत्नांना यश पुणे - स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतिफलकाचे म्यानमार येथील (तत्कालीन ब्रह्मदेश) उच्चायुक्तालयात एक ऑगस्टला अनावरण होणार आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षात हा स्मृतिफलक झळकणार आहे. इंग्रजांच्या विरोधात आवाज उठविल्याबद्दल लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला. त्यासाठी त्यांना शिक्षा होऊन सहा वर्षांसाठी मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. या ठिकाणी त्यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक यांना डांबून ठेवण्यात आलेला तुरुंग आता अस्तित्वात नाही. ती जागा आता लष्कराच्या ताब्यात आहे. ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे अभ्यासक व ‘मंडालेतील गीतारहस्य’ या पुस्तकाचे लेखक डॉ. दिलीप साठे हे मंडाले येथे गेले होते. लोकमान्य टिळकांना ठेवलेल्या तुरुंगाबाबत चौकशी केली असता तो अस्तित्वात नसल्याची माहिती त्यांना मिळाली. लोकमान्यांची कोणतीही स्मृती त्याठिकाणी नव्हती. लोकमान्यांचे छायाचित्रही तेथे नसल्याचे पाहून डॉ. साठे यांना हळहळ वाटली. मंडालेमध्ये लोकमान्य टिळकांचे स्मारक होण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी ऑगस्ट २०१६ पासून परराष्ट्र मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, म्यानमार येथील भारतीय उच्चायुक्तालयाबरोबर पत्रव्यवहार सुरू केला. केवळ पत्रव्यवहारातून काही होणार नसल्याचे लक्षात आल्याने डॉ. साठे २० ऑक्टोबर २०१९मध्ये मंडालेला गेले. तेथील उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना लोकमान्यांचे छायाचित्र, ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची प्रत दिली. लोकमान्य टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे या ठिकाणी स्मारक उभारण्याची विनंती केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   दरम्यान, डॉ. साठे यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. अवधी कमी असल्याने एक ऑगस्टला किमान त्यांचा स्मृतिफलक लावण्याची विनंती मान्य केली. लवकरच लोकमान्य टिळकांचा अर्धपुतळाही बसविण्यात येणार असल्याचे डॉ. साठे यांना म्यानमार येथील उच्चायुक्तालयातून कळविण्यात आले आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा लोकमान्य टिळकांनी केलेला त्याग व त्यांना झालेला त्रास, भोगलेले कष्ट सर्वांना समजावे, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्याठिकाणी लोकमान्यांचे स्मारक उभे राहील, अशी मला खात्री आहे. - डॉ. दिलीप साठे   दोन कार्यक्रम लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त एक ऑगस्ट रोजी स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रातर्फे दोन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हंतावाडी विद्यापीठाचे  निवृत्त उपकुलगुरु प्रा. खी मांग चो हे बर्मी भाषेत लोकमान्यांच्या कार्याची ओळख करून देतील. लोकमान्यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यासाठी डिजिटल फोटो प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. ‘कोविड’ची समस्या लक्षात घेऊन दोन्ही कार्यक्रम ऑनलाईन होतील. उच्चायुक्तालयाच्या ‘फेसबुक’ पेजवरून हे कार्यक्रम पाहता येतील, अशी माहिती सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आसावरी बापट यांनी दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gdENOW
Read More