Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 2, 2020

बसस्थानके, आगार आणि गाड्या होणार स्वच्छ

सांगली : राज्य परिवहन विभागाची बसस्थानके, आगार आणि गाड्या स्वच्छ ठेवून जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच कोविड पार्श्‍वभूमीवर लक्षात घेऊन 1 ते 15 डिसेंबरपर्यंत "स्वच्छता अभियान' सर्वत्र राबवले जाणार आहे. अभियानात दर दोन तासानी स्वच्छतेची तपासणी होणार आहे. तसेच अचानक तपासणी देखील केली जाणार आहे. 

राज्य परिवहन विभागाने बसस्थानकावर नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, प्रवासी प्रतिक्षालय, प्रसाधनगृह आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व ठिकाणी स्वच्छता असणे महत्वाचे आहे. बसस्थानके व आगार परिसर आणि गाड्या स्वच्छ असतील तर प्रवासी वर्गात प्रतिमा उंचावली जाऊ शकते. तसेच सध्या कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण आवश्‍यक आहे. परंतू बऱ्याच बसस्थानक परिसरात स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जात नसल्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे 1 ते 15 डिसेंबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

अभियानात आगार व्यवस्थापकांनी त्यांच्या नियंत्रणाखालील बसस्थानकांवरील स्वच्छता करून घ्यायची आहे. तसेच स्वच्छतेची प्रत्येक दोन तासांनी वारंवार तपासणी करून घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत. तपासणीसाठी आगारातील पर्यवेक्षीय कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप केले जाईल. हे कर्मचारी गणवेशात उपस्थित राहतील. प्रत्येक दोन तासानंतर साफसफाई करावी. प्रतिक्षालय निर्जंतुकीकरण केले जावे. दिवसातून किमान दोनवेळा पोचा मारला जावा. 

आठवड्यातून किमान एक दिवस प्रतिक्षालय, बसस्थानक धुण्याच्या पावडरने धुवून घ्यावे. दिवे, पंखे दुरूस्ती, प्रवासी आसनाची दुरूस्ती, स्थानकावर कचरापेटी आदी सुविधा ठेवाव्यात अशाही सूचना दिल्या आहेत. तसेच वाहनतळाचा परिसरात दिवसातून दोनवेळा स्वच्छ करावा. ग्रामीण भागातील वाहनतळ देखील स्वच्छ ठेवावा. प्रत्येक ठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी, बसेस निर्जंतुकीकरण, प्रसाधनगृहे व चालक-वाहक विश्रांतीगृह आदींसह बसस्थानकांचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे सूचवले आहे. स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी अचानक तपासणी केली जाणार आहे. तेव्हा दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बसस्थानके, आगार आणि गाड्या होणार स्वच्छ सांगली : राज्य परिवहन विभागाची बसस्थानके, आगार आणि गाड्या स्वच्छ ठेवून जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच कोविड पार्श्‍वभूमीवर लक्षात घेऊन 1 ते 15 डिसेंबरपर्यंत "स्वच्छता अभियान' सर्वत्र राबवले जाणार आहे. अभियानात दर दोन तासानी स्वच्छतेची तपासणी होणार आहे. तसेच अचानक तपासणी देखील केली जाणार आहे.  राज्य परिवहन विभागाने बसस्थानकावर नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, प्रवासी प्रतिक्षालय, प्रसाधनगृह आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व ठिकाणी स्वच्छता असणे महत्वाचे आहे. बसस्थानके व आगार परिसर आणि गाड्या स्वच्छ असतील तर प्रवासी वर्गात प्रतिमा उंचावली जाऊ शकते. तसेच सध्या कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण आवश्‍यक आहे. परंतू बऱ्याच बसस्थानक परिसरात स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जात नसल्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे 1 ते 15 डिसेंबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.  अभियानात आगार व्यवस्थापकांनी त्यांच्या नियंत्रणाखालील बसस्थानकांवरील स्वच्छता करून घ्यायची आहे. तसेच स्वच्छतेची प्रत्येक दोन तासांनी वारंवार तपासणी करून घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत. तपासणीसाठी आगारातील पर्यवेक्षीय कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप केले जाईल. हे कर्मचारी गणवेशात उपस्थित राहतील. प्रत्येक दोन तासानंतर साफसफाई करावी. प्रतिक्षालय निर्जंतुकीकरण केले जावे. दिवसातून किमान दोनवेळा पोचा मारला जावा.  आठवड्यातून किमान एक दिवस प्रतिक्षालय, बसस्थानक धुण्याच्या पावडरने धुवून घ्यावे. दिवे, पंखे दुरूस्ती, प्रवासी आसनाची दुरूस्ती, स्थानकावर कचरापेटी आदी सुविधा ठेवाव्यात अशाही सूचना दिल्या आहेत. तसेच वाहनतळाचा परिसरात दिवसातून दोनवेळा स्वच्छ करावा. ग्रामीण भागातील वाहनतळ देखील स्वच्छ ठेवावा. प्रत्येक ठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी, बसेस निर्जंतुकीकरण, प्रसाधनगृहे व चालक-वाहक विश्रांतीगृह आदींसह बसस्थानकांचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे सूचवले आहे. स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी अचानक तपासणी केली जाणार आहे. तेव्हा दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे.      संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33FyqzL
Read More
लॉकडाऊनमध्येही IIT ची पोरं मालामाल; प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज

मुंबई : देशभरातील आयआयटीमध्ये मंगळवार (ता.1) पासून प्लेसमेंट सुरू झाल्या आहेत. प्लेसमेंटमध्ये झालेल्या मुलाखतींना दुसर्‍या दिवशीही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई आयआयटीमध्ये यंदा 35 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. टेक्सास इन्स्ट्रुमेंट, गुगल, मायक्रोसॉफ्ट, क्वॉलकॉम, मास्टरकार्ड आणि बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नोकरीच्या ऑफर्स विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.

आयआयटी मुंबईत पहिल्या दिवशी नेदरलँडच्या ऑप्टिव्हर या कंपनीकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय नोकर्‍यांची संधी विद्यार्थ्यांना देऊ केली. त्या खालोखाल जपानची होन्डा आर अ‍ॅण्ड डी, तैवानची टीएसएमसी या कंपन्यांनी सर्वाधिक नोकर्‍या दिल्या. पहिल्या दिवशी तब्बल 313 विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळाल्या. यामध्ये सोनीने सर्वाधिक 1.63 कोटीचे वार्षिक पॅकेज दिले. त्याखालोखाल होन्डा आर अ‍ॅण्ड डी या कंपनीने 82 लाख, एनईसी कंपनीने 49.24 लाख तर टीएसएमसी या कंपनीने 20.70 लाखाचे वार्षिक पॅकेज विद्यार्थ्यांना दिले.

महत्त्वाची बातमी : अभिनेत्रीचा मास्क काढून शिवसैनिक उर्मिला यांचा योगी आदित्यनाथ यांना "जय महाराष्ट्र"; मातोंडकर ऍक्शन मोडमध्ये

पहिल्या दिवसाप्रमाणे बुधवारी (ता.2) दुसर्‍या दिवशीही विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकर्‍या मिळाल्या. दुसर्‍या दिवशी झालेल्या प्लेसमेंटमध्ये 64 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नोकर्‍या मिळाल्या. जपानच्या सिसमेक्स कॉर्पोरेशनकडून आंतरराष्ट्रीय नोकर्‍या विद्यार्थ्यांना मिळाल्या. ओरॅकल, अमेरिक एक्स्प्रेस आणि बजाज ऑटो या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर नोकर्‍या विद्यार्थ्यांना मिळाल्या.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्लेसमेंटवर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र तरीही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक नोकर्‍या या आयटी, सॉफ्टवेअर, कोअर इंजिनीअरिंग आणि कन्स्लटिंग या क्षेत्रात मिळाल्याचे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

students of IIT gets massive packages during lockdown amid corona

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाऊनमध्येही IIT ची पोरं मालामाल; प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज मुंबई : देशभरातील आयआयटीमध्ये मंगळवार (ता.1) पासून प्लेसमेंट सुरू झाल्या आहेत. प्लेसमेंटमध्ये झालेल्या मुलाखतींना दुसर्‍या दिवशीही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई आयआयटीमध्ये यंदा 35 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. टेक्सास इन्स्ट्रुमेंट, गुगल, मायक्रोसॉफ्ट, क्वॉलकॉम, मास्टरकार्ड आणि बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नोकरीच्या ऑफर्स विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. आयआयटी मुंबईत पहिल्या दिवशी नेदरलँडच्या ऑप्टिव्हर या कंपनीकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय नोकर्‍यांची संधी विद्यार्थ्यांना देऊ केली. त्या खालोखाल जपानची होन्डा आर अ‍ॅण्ड डी, तैवानची टीएसएमसी या कंपन्यांनी सर्वाधिक नोकर्‍या दिल्या. पहिल्या दिवशी तब्बल 313 विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळाल्या. यामध्ये सोनीने सर्वाधिक 1.63 कोटीचे वार्षिक पॅकेज दिले. त्याखालोखाल होन्डा आर अ‍ॅण्ड डी या कंपनीने 82 लाख, एनईसी कंपनीने 49.24 लाख तर टीएसएमसी या कंपनीने 20.70 लाखाचे वार्षिक पॅकेज विद्यार्थ्यांना दिले. महत्त्वाची बातमी : अभिनेत्रीचा मास्क काढून शिवसैनिक उर्मिला यांचा योगी आदित्यनाथ यांना "जय महाराष्ट्र"; मातोंडकर ऍक्शन मोडमध्ये पहिल्या दिवसाप्रमाणे बुधवारी (ता.2) दुसर्‍या दिवशीही विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकर्‍या मिळाल्या. दुसर्‍या दिवशी झालेल्या प्लेसमेंटमध्ये 64 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नोकर्‍या मिळाल्या. जपानच्या सिसमेक्स कॉर्पोरेशनकडून आंतरराष्ट्रीय नोकर्‍या विद्यार्थ्यांना मिळाल्या. ओरॅकल, अमेरिक एक्स्प्रेस आणि बजाज ऑटो या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर नोकर्‍या विद्यार्थ्यांना मिळाल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्लेसमेंटवर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र तरीही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक नोकर्‍या या आयटी, सॉफ्टवेअर, कोअर इंजिनीअरिंग आणि कन्स्लटिंग या क्षेत्रात मिळाल्याचे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे. ( संपादन - सुमित बागुल ) students of IIT gets massive packages during lockdown amid corona News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39FGzIf
Read More
पदवीधर निवडणूक; जोशी की वंजारी? कोण मारणार बाजी? आज होणार फैसला

नागपूर ः नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीचा निकाल उद्या गुरुवारी जाहीर होणार असून भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी आणि काँग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी यांचा फैसला होणार आहे. नागपूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असली तरी सर्वाधिक सुमारे एक लाख मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे निकाल नागपूरकर मतदारांवरच अवलंबून राहणार आहे. 

यंदा प्रथमच पदवीधर निवडणुकीत विक्रमी मतदान झाले आहे. तसेच चुरसही बघायला मिळाली. प्रत्येक उमेदवाराने आपल्या समर्थकांना मतदारांना बाहेर काढल्याने टक्केवारी प्रचंड वाढली आहे. मतदानाचा टक्का वाढल्याने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक ७२ टक्के मतदान झाले आहे. 

जाणून घ्या - धक्कादायक आकडेवारी! यवतमाळ जिल्ह्यात ११ महिन्यांत तब्बल २५० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

भंडारा जिल्ह्यातून काँग्रेसला मोठी आशा वाटत आहे तर गडचिरोलीमध्ये भाजप आघाडीवर राहील असे जोशी यांचे समर्थक दावा करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप आणि काँग्रेसला बरोबर मतदान होईल असा कयास व्यक्त केला जात आहे. मात्र जोशी आणि वंजारी यांच्यासह एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी रिपाइं मतांवर दावा करणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यांनी आपली कामगिरी जोख बजावली तर भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

यंदा प्रथमच काँग्रेसचे नेते प्रचारात होते. मेळावे घेतले. अनेक बूथवर पदाधिकारी बसलेले दिसले.  महाआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही नेते व कार्यकर्ते या निमित्ताने एकत्र दिसले. महाआघाडीसाठी हे शुभसंकेत असले तरी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत किती नेते पोहचले हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुसरीकडे संदीप जोशी यांच्यासाठी भाजपने आपली यंत्रणा ताकदीने राबवली. 

सविस्तर वाचा - ‘डिअर मम्मी-पप्पा, तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय’; दोघ्या बहिणींचे इंस्टाग्राम प्रेम - 

माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस शेवटचे दोन दिवस शहरात ठाण मांडून बसले होते. अनेक नेत्यांच्या भेटीगाठी तसेच गुप्त बैठकाही त्यांनी घेतल्या. काँग्रेसच्या काही नेत्यांच्याही घरी त्यांनी आकस्मिक भेटी दिल्याचे कळते. त्यामुळे काँग्रेसला धडकी भरली आहे. विदर्भाच्या अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे हेसुद्धा आशावादी आहेत. मात्र त्यांच्याकडे असलेली यंत्रणा आणि रसद फार तोकडी होती. केवळ अनुशेष आणि विदर्भावरील अन्यायाला किती पदवीधर मतदान करतात हे उद्याच कळणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पदवीधर निवडणूक; जोशी की वंजारी? कोण मारणार बाजी? आज होणार फैसला नागपूर ः नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीचा निकाल उद्या गुरुवारी जाहीर होणार असून भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी आणि काँग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी यांचा फैसला होणार आहे. नागपूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असली तरी सर्वाधिक सुमारे एक लाख मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे निकाल नागपूरकर मतदारांवरच अवलंबून राहणार आहे.  यंदा प्रथमच पदवीधर निवडणुकीत विक्रमी मतदान झाले आहे. तसेच चुरसही बघायला मिळाली. प्रत्येक उमेदवाराने आपल्या समर्थकांना मतदारांना बाहेर काढल्याने टक्केवारी प्रचंड वाढली आहे. मतदानाचा टक्का वाढल्याने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक ७२ टक्के मतदान झाले आहे.  जाणून घ्या - धक्कादायक आकडेवारी! यवतमाळ जिल्ह्यात ११ महिन्यांत तब्बल २५० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा भंडारा जिल्ह्यातून काँग्रेसला मोठी आशा वाटत आहे तर गडचिरोलीमध्ये भाजप आघाडीवर राहील असे जोशी यांचे समर्थक दावा करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप आणि काँग्रेसला बरोबर मतदान होईल असा कयास व्यक्त केला जात आहे. मात्र जोशी आणि वंजारी यांच्यासह एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी रिपाइं मतांवर दावा करणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यांनी आपली कामगिरी जोख बजावली तर भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  यंदा प्रथमच काँग्रेसचे नेते प्रचारात होते. मेळावे घेतले. अनेक बूथवर पदाधिकारी बसलेले दिसले.  महाआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही नेते व कार्यकर्ते या निमित्ताने एकत्र दिसले. महाआघाडीसाठी हे शुभसंकेत असले तरी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत किती नेते पोहचले हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुसरीकडे संदीप जोशी यांच्यासाठी भाजपने आपली यंत्रणा ताकदीने राबवली.  सविस्तर वाचा - ‘डिअर मम्मी-पप्पा, तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय’; दोघ्या बहिणींचे इंस्टाग्राम प्रेम -  माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस शेवटचे दोन दिवस शहरात ठाण मांडून बसले होते. अनेक नेत्यांच्या भेटीगाठी तसेच गुप्त बैठकाही त्यांनी घेतल्या. काँग्रेसच्या काही नेत्यांच्याही घरी त्यांनी आकस्मिक भेटी दिल्याचे कळते. त्यामुळे काँग्रेसला धडकी भरली आहे. विदर्भाच्या अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे हेसुद्धा आशावादी आहेत. मात्र त्यांच्याकडे असलेली यंत्रणा आणि रसद फार तोकडी होती. केवळ अनुशेष आणि विदर्भावरील अन्यायाला किती पदवीधर मतदान करतात हे उद्याच कळणार आहे. संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lwowX9
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 03 डिसेंबर

पंचांग -
गुरुवार - कार्तिक कृष्ण ३, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५३ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय रात्री ८.२८, चंद्रास्त सकाळी ९.१५, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर मार्गशीर्ष १२ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक अपंग दिन ( युनेस्को)
१८८४ - भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा जन्म. स्वतंत्र भारताच्या घटनासमितीचे ते अध्यक्ष होते.  त्यांनी आपल्या पदाचा पगार कमी करून घेतला होता व राष्ट्रपतिभवनातील राहणीत अतिशय साधेपणा आणला होता.
१९५१ - प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. त्यांच्या कविता वऱ्हाडी, खानदेशी बोलीत आहेत.
२००४ - आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके; तसेच सुब्रह्मण्यम भारती, शरच्चंद्र बोस, त्रिदीपकुमार चौधरी यांच्या तैलचित्रांचे अनावरण उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये समारंभपूर्वक झाले.

दिनमान -
मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना गुरूकृपा लाभेल.
वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. 
मिथुन : प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कर्क : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
सिंह : काहींचे नवीन परिचय होतील. संततिसौख्य लाभेल.आर्थिक लाभाचे प्रमाणवाढेल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. नोकरी,व्यवसायात उत्तम स्थिती. इतरांवर प्रभाव राहील.
तुळ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तमराहील.
वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहील.
धनु : महत्त्वाची कामे पार पडतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मीन : आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाणवाढेल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 03 डिसेंबर पंचांग - गुरुवार - कार्तिक कृष्ण ३, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५३ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय रात्री ८.२८, चंद्रास्त सकाळी ९.१५, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर मार्गशीर्ष १२ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - जागतिक अपंग दिन ( युनेस्को) १८८४ - भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा जन्म. स्वतंत्र भारताच्या घटनासमितीचे ते अध्यक्ष होते.  त्यांनी आपल्या पदाचा पगार कमी करून घेतला होता व राष्ट्रपतिभवनातील राहणीत अतिशय साधेपणा आणला होता. १९५१ - प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. त्यांच्या कविता वऱ्हाडी, खानदेशी बोलीत आहेत. २००४ - आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके; तसेच सुब्रह्मण्यम भारती, शरच्चंद्र बोस, त्रिदीपकुमार चौधरी यांच्या तैलचित्रांचे अनावरण उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये समारंभपूर्वक झाले. दिनमान - मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना गुरूकृपा लाभेल. वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.  मिथुन : प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. कर्क : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. सिंह : काहींचे नवीन परिचय होतील. संततिसौख्य लाभेल.आर्थिक लाभाचे प्रमाणवाढेल. कन्या : आरोग्य उत्तम राहील. नोकरी,व्यवसायात उत्तम स्थिती. इतरांवर प्रभाव राहील. तुळ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तमराहील. वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहील. धनु : महत्त्वाची कामे पार पडतील. वैवाहिक सौख्य लाभेल. मकर : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मीन : आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाणवाढेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3g0dSqJ
Read More
द्राक्ष निर्यातीसाठी दीड हजार हेक्‍टर बागांची नोंदणी 

सांगली : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीसाठी सन 2020-21 साठी दोन हजार 937 शेतकऱ्यांच्या 1527.36 हेक्‍टरची नोंदणी झालेली आहे. गेल्या वर्षी दोन हजार 135 शेतकऱ्यांच्या 1178 हेक्‍टरची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा 802 शेतकऱ्यांची संख्या आणि 350 हेक्‍टरनी क्षेत्रही वाढले आहे. 

निर्यातीसाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत होती. या काळात सरकारी कार्यालयाना चार दिवस सुटी, कर्मचारी संप झाला. परिणामी काही शेतकऱ्यांच्या नोंदणी अद्याप झालेली नाही. याचा विचार करुन निर्यातक्षम द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणीसाठी 20 डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. यामुळे आणखी क्षेत्र वाढणार आहे. रासायनिक अंश विरहीत शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत असल्याचे समाधानकारक चित्र पहायला मिळते आहे. 

गेली दोन वर्षे नैसर्गिक आपत्तीतही द्राक्ष निर्यातीत वाढच होत आहे. गेल्या वर्षी कोरोना साथीच्या काळातही द्राक्ष पिकांना फटका बसला होता. मात्र त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांकडून निर्यात झाली. त्यांना मात्र चांगले दर मिळाल्याचे समाधानकारक चित्रही समोर आहे. द्राक्षासह बेदाणाही मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. याशिवाय डाळिंब, इतर फळे, भाजीपाला निर्यातही होते. जिल्ह्यातून सन 2019-20 मध्ये युरोपियन देशात 8 हजार 484 टन, तर इतर देशांत 9 हजार 770 टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. 

जिल्ह्यात कृषी विभागाकडे द्राक्षाचे अधिकृत क्षेत्र 32 हजार हेक्‍टर नोंद आहे. द्राक्ष बागा, बेदाणा आणि प्रक्रिया उद्योगासाठी पाच लाख लोकांना रोजगार मिळतो हे राज्य सरकारनेही मान्य केलेले आहे. 
जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र तासगाव आणि खानापूर तालुक्‍यातील आहे. मिरज तालुक्‍यात द्राक्षाचे क्षेत्र जास्त असूनही निर्यातक्षम द्राक्ष पिकवणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. 

प्रयोगशाळेची मदत होणार
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात युरोपीयन देश व इतर देशात निर्यात होते. त्यातील कीडनाशके, ऊर्वरित अंश तपासणीसाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी 17 कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी नुकतीच मुंबई येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकही घेतली. त्याबाबत तातडीने निर्णय अपेक्षीत आहे. शेतमाल निर्यातीत जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंबाची दर वर्षी वाढ होत आहे. सध्या ही सुविधा पुणे येथे असल्याने सांगलीतील शेतकऱ्यांचा वेळ, पैसा खर्च होतो.तपासणी अहवाल वेळेत मिळून निर्यात लवकर होणार आहे. दर्जेदार, गुणवत्तापुर्ण पिकांचे उत्पादन घेण्यास प्रयोगशाळेची मदत होणार आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

द्राक्ष निर्यातीसाठी दीड हजार हेक्‍टर बागांची नोंदणी  सांगली : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीसाठी सन 2020-21 साठी दोन हजार 937 शेतकऱ्यांच्या 1527.36 हेक्‍टरची नोंदणी झालेली आहे. गेल्या वर्षी दोन हजार 135 शेतकऱ्यांच्या 1178 हेक्‍टरची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा 802 शेतकऱ्यांची संख्या आणि 350 हेक्‍टरनी क्षेत्रही वाढले आहे.  निर्यातीसाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत होती. या काळात सरकारी कार्यालयाना चार दिवस सुटी, कर्मचारी संप झाला. परिणामी काही शेतकऱ्यांच्या नोंदणी अद्याप झालेली नाही. याचा विचार करुन निर्यातक्षम द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणीसाठी 20 डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. यामुळे आणखी क्षेत्र वाढणार आहे. रासायनिक अंश विरहीत शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत असल्याचे समाधानकारक चित्र पहायला मिळते आहे.  गेली दोन वर्षे नैसर्गिक आपत्तीतही द्राक्ष निर्यातीत वाढच होत आहे. गेल्या वर्षी कोरोना साथीच्या काळातही द्राक्ष पिकांना फटका बसला होता. मात्र त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांकडून निर्यात झाली. त्यांना मात्र चांगले दर मिळाल्याचे समाधानकारक चित्रही समोर आहे. द्राक्षासह बेदाणाही मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. याशिवाय डाळिंब, इतर फळे, भाजीपाला निर्यातही होते. जिल्ह्यातून सन 2019-20 मध्ये युरोपियन देशात 8 हजार 484 टन, तर इतर देशांत 9 हजार 770 टन द्राक्षे निर्यात झाली आहेत.  जिल्ह्यात कृषी विभागाकडे द्राक्षाचे अधिकृत क्षेत्र 32 हजार हेक्‍टर नोंद आहे. द्राक्ष बागा, बेदाणा आणि प्रक्रिया उद्योगासाठी पाच लाख लोकांना रोजगार मिळतो हे राज्य सरकारनेही मान्य केलेले आहे.  जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र तासगाव आणि खानापूर तालुक्‍यातील आहे. मिरज तालुक्‍यात द्राक्षाचे क्षेत्र जास्त असूनही निर्यातक्षम द्राक्ष पिकवणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे.  प्रयोगशाळेची मदत होणार सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात युरोपीयन देश व इतर देशात निर्यात होते. त्यातील कीडनाशके, ऊर्वरित अंश तपासणीसाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी 17 कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी नुकतीच मुंबई येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकही घेतली. त्याबाबत तातडीने निर्णय अपेक्षीत आहे. शेतमाल निर्यातीत जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंबाची दर वर्षी वाढ होत आहे. सध्या ही सुविधा पुणे येथे असल्याने सांगलीतील शेतकऱ्यांचा वेळ, पैसा खर्च होतो.तपासणी अहवाल वेळेत मिळून निर्यात लवकर होणार आहे. दर्जेदार, गुणवत्तापुर्ण पिकांचे उत्पादन घेण्यास प्रयोगशाळेची मदत होणार आहे.    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Vry5fy
Read More
अभिमान तर वाटणारच ः नगरकराने बनवली सिरमची कोरोना लस, पंतप्रधानांनी केलं कौतुक

नगर : कोरोना लसीबाबत सर्व जगाचे लक्ष लागले आहे. पुण्याच्या सिरम इन्सिट्यूटने लसीबाबत भारतालाच नव्हे तर जगालाही मोठी खुशखबर दिली आहे. ही लस बनविण्यासाठी नगरच्या वैज्ञानिकाचे मोठे योगदान आहे. मूळ पारनेरकर असलेल्या या वैज्ञानिकाच्या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन कोरोनावरील लसीची माहिती घेतली. मूळचे पारनेर तालुक्‍यातील वैज्ञानिक डॉ. उमेश शालीग्राम यांचे या लसनिर्मितीत मोठे योगदान आहे.

 पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. डॉ. शालीग्राम हे अहमदनगर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. तेथील शास्त्रज्ञांच्या टीमसोबत त्यांनी हे मोलाचे काम केले आहे.

सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख संचालक आदर पुनावाला व डॉ. शालीग्राम यांनी पंतप्रधान मोदी यांना कोरोना लसीबाबत माहिती दिली. डॉ. शालीग्राम त्यांनी अहमदनगर महाविद्यालयात चार महिने प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. शिवाय त्यांनी औरंगाबादमध्येही एका खासगी कंपनीतही सेवा दिलेली आहे. 

कोरोना लसीसाठी डॉ. शालीग्राम देत असलेल्या योगदानाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. एन. आर. सोमवंशी, डॉ. ए. व्ही. नागवडे, डॉ. रझाक सय्यद, डॉ. बी. एम. गायकर, ए. वाय. बळीद आदी उपस्थित होते.

महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभय शालीग्राम यांचे ते थोरले बंधू आहेत. डॉ. बार्नबस म्हणाले, की अहमदनगर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. शालीग्राम हे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महत्त्वाच्या लस उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचा अभिमान वाटतो. डॉ. शालीग्राम व त्यांच्या टीमला यश मिळून लवकरच कोरोना निर्मुलन होईल. 

संपादन - अशोक निंबाळकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अभिमान तर वाटणारच ः नगरकराने बनवली सिरमची कोरोना लस, पंतप्रधानांनी केलं कौतुक नगर : कोरोना लसीबाबत सर्व जगाचे लक्ष लागले आहे. पुण्याच्या सिरम इन्सिट्यूटने लसीबाबत भारतालाच नव्हे तर जगालाही मोठी खुशखबर दिली आहे. ही लस बनविण्यासाठी नगरच्या वैज्ञानिकाचे मोठे योगदान आहे. मूळ पारनेरकर असलेल्या या वैज्ञानिकाच्या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन कोरोनावरील लसीची माहिती घेतली. मूळचे पारनेर तालुक्‍यातील वैज्ञानिक डॉ. उमेश शालीग्राम यांचे या लसनिर्मितीत मोठे योगदान आहे.  पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. डॉ. शालीग्राम हे अहमदनगर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. तेथील शास्त्रज्ञांच्या टीमसोबत त्यांनी हे मोलाचे काम केले आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख संचालक आदर पुनावाला व डॉ. शालीग्राम यांनी पंतप्रधान मोदी यांना कोरोना लसीबाबत माहिती दिली. डॉ. शालीग्राम त्यांनी अहमदनगर महाविद्यालयात चार महिने प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. शिवाय त्यांनी औरंगाबादमध्येही एका खासगी कंपनीतही सेवा दिलेली आहे.  कोरोना लसीसाठी डॉ. शालीग्राम देत असलेल्या योगदानाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. एन. आर. सोमवंशी, डॉ. ए. व्ही. नागवडे, डॉ. रझाक सय्यद, डॉ. बी. एम. गायकर, ए. वाय. बळीद आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभय शालीग्राम यांचे ते थोरले बंधू आहेत. डॉ. बार्नबस म्हणाले, की अहमदनगर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. शालीग्राम हे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महत्त्वाच्या लस उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचा अभिमान वाटतो. डॉ. शालीग्राम व त्यांच्या टीमला यश मिळून लवकरच कोरोना निर्मुलन होईल.  संपादन - अशोक निंबाळकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VqYLgy
Read More
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दोनच प्रवेश फेऱ्या; सीईटी सेलकडून नियमावली जाहीर

पुणे : कोरोनामुळे व्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबल्याने ही प्रक्रिया गतीने व्हावी, यासाठी सीईटी सेलने नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये इंजिनिअरींग, फार्मसीसह सर्वच अभ्यासक्रमासाठी दोन प्रवेश फेऱ्या होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यंदा एक प्रवेश फेरी कमी करण्यात आली आहे. 

- ...फक्त लग्न मोडले म्हणून!​

इंजिनिअरिंग प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मसी प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मा डी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, हाॅटेल मॅनेजमेंट प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश, बॅचलर ऑफ प्लानिंग या अभ्यासक्रमांसाठी दोन प्रवेश फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना ३०० महाविद्यालयांपर्यंत पसंतीक्रम देता येतील, पण दोनच फेऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना जेथे प्रवेश मिळेल तेथे जागा निश्चित करावी लागणार आहे. 

- कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू​

सीईटी सेल नुकतेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर केले. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक प्रक्रिया जुलै-ऑगस्ट ऐवजी डिसेंबर महिन्यात सुरू होत आहे. २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष देखील कोलमडले आहे. आता लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने सीईटी सेलने पाऊल उचलले आहे. पुढील तीन चार दिवसात पहिली फेरी व 
प्रवेशाची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

- पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री

महाविद्यालय सस्तरावर प्रवेशास सवलत नाही? 
प्रवेश फेर्यां झाल्यानंतर महाविद्यालयात अनेक जागा रिक्त रहातात. त्यानंतर तेथे महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रियेला परवानगी दिली जाते. पण यामधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची कोणतीही सवलत मिळत नाही. याबाबत शासनाने विचार करावा, असे  सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. श्यामकांत देशमुख यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दोनच प्रवेश फेऱ्या; सीईटी सेलकडून नियमावली जाहीर पुणे : कोरोनामुळे व्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबल्याने ही प्रक्रिया गतीने व्हावी, यासाठी सीईटी सेलने नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये इंजिनिअरींग, फार्मसीसह सर्वच अभ्यासक्रमासाठी दोन प्रवेश फेऱ्या होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यंदा एक प्रवेश फेरी कमी करण्यात आली आहे.  - ...फक्त लग्न मोडले म्हणून!​ इंजिनिअरिंग प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मसी प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मा डी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, हाॅटेल मॅनेजमेंट प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश, बॅचलर ऑफ प्लानिंग या अभ्यासक्रमांसाठी दोन प्रवेश फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना ३०० महाविद्यालयांपर्यंत पसंतीक्रम देता येतील, पण दोनच फेऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना जेथे प्रवेश मिळेल तेथे जागा निश्चित करावी लागणार आहे.  - कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू​ सीईटी सेल नुकतेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर केले. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक प्रक्रिया जुलै-ऑगस्ट ऐवजी डिसेंबर महिन्यात सुरू होत आहे. २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष देखील कोलमडले आहे. आता लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने सीईटी सेलने पाऊल उचलले आहे. पुढील तीन चार दिवसात पहिली फेरी व  प्रवेशाची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. - पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री महाविद्यालय सस्तरावर प्रवेशास सवलत नाही?  प्रवेश फेर्यां झाल्यानंतर महाविद्यालयात अनेक जागा रिक्त रहातात. त्यानंतर तेथे महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रियेला परवानगी दिली जाते. पण यामधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची कोणतीही सवलत मिळत नाही. याबाबत शासनाने विचार करावा, असे  सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. श्यामकांत देशमुख यांनी सांगितले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mAwCiT
Read More
वरळीमध्ये एक अपार्टमेंट 42 कोटीला, लक्झरी फ्लॅटच्या खरेदीत तेजी

मुंबई: लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या ही महिन्यात रियल इस्टेट उद्योग आर्थिक संकटात सापडले होता. मात्र कोविड संसर्ग कमी होताना गृहनिर्माण क्षेत्र पुन्हा जोमाने उभारी घेत असल्याचे चित्र आहे. यामध्ये विशेषता लक्झरी फ्लॅट्स खरेदीचे प्रमाण वाढले आहे. नुकताच वरळी भागात एक आलिशान फ्लॅट तब्बल 42 कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आला.  कोविड काळातील घर खरेदीमधील ही महागडी डील असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी एका उद्योगपतीने वरळी भागात 76 कोटीला दोन फ्लॅट खरेदी केले होते. 

गेल्या दोन महिन्यांपासून लक्झरी सदरातील घर खरेदीला वेग आलाय. किंबहुना लॉकडाऊन काळातही या सेगमेंटमधील घरे विकली जात होती. वरळी भागात एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष आणि सीईओ अर्नाझ मिस्त्री यांनी 41.23 कोटी रुपये मोजून एक अपार्टमेंट खरेदी केली आहे. के रहेजा यांच्या आर्टेशीया या गृहनिर्माण प्रकल्पातील 35 व्या माळ्यावर हे अपार्टमेंट आहे. 18 नोव्हेंबरला हा सौदा पक्का झाला. या फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ 8,132 चौरस फूट एवढे आहे. या फ्लॅटसाठी जवळपास 96 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी मोजण्यात आली आहे. अर्नाझ मिस्त्री यांना या फ्लॅटसोबत एकूण आठ पार्कीग जागा  मिळाल्या आहेत. या फ्लॅटची एकूण खरेदी 44 कोटी 57 लाख पडली आहे. यापूर्वी प्रसिध्द बँकर्स रोमेश सोबती यांनी वरळीमध्ये 76 कोटी रुपयांमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते.

अधिक वाचा-  धारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात

 तयार लक्झरी फ्लॅटच्या खरेदीला चांगली मागणी आहे. जीएसटी आणि मुद्रांक शुल्क सवलतीमुळेही घर खरेदी होत असल्याचे नरडेकोचे राज्य अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी म्हटलं आहे.

मुंबई विभागातल्या अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यापूर्वीच्या मोठ्या घर खरेदी डील

ऑक्टोबर महिन्यात अनुराग जैन यांनी 1.22 लाख प्रति चौरस फूट या दराने कर्मिशयल प्रोजेक्टमध्ये अपार्टमेंट खरेदी केली.

यापूर्वी जुलै महिन्यात त्यांनी 1.56 लाख प्रति चौरस फूट या दराने इथेच अपार्टमेंट घेतली होती.

जुलै महिन्यात वांद्राच्या नवरोज बिल्डींगमध्ये सुशीलकुमार जैन यांनी 1.30 लाख  रुपये प्रति चौरस फुटाने अपार्टमेंट घेतली.

प्रतिक अग्रवाल यांनी समुद्र महल येथे 1.12 लाख रुपये प्रति चौरस फूट या दराने फ्लॅट खरेदी केला.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

An apartment in Worli for Rs 42 crore a boom in the purchase of luxury flats

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वरळीमध्ये एक अपार्टमेंट 42 कोटीला, लक्झरी फ्लॅटच्या खरेदीत तेजी मुंबई: लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या ही महिन्यात रियल इस्टेट उद्योग आर्थिक संकटात सापडले होता. मात्र कोविड संसर्ग कमी होताना गृहनिर्माण क्षेत्र पुन्हा जोमाने उभारी घेत असल्याचे चित्र आहे. यामध्ये विशेषता लक्झरी फ्लॅट्स खरेदीचे प्रमाण वाढले आहे. नुकताच वरळी भागात एक आलिशान फ्लॅट तब्बल 42 कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आला.  कोविड काळातील घर खरेदीमधील ही महागडी डील असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी एका उद्योगपतीने वरळी भागात 76 कोटीला दोन फ्लॅट खरेदी केले होते.  गेल्या दोन महिन्यांपासून लक्झरी सदरातील घर खरेदीला वेग आलाय. किंबहुना लॉकडाऊन काळातही या सेगमेंटमधील घरे विकली जात होती. वरळी भागात एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष आणि सीईओ अर्नाझ मिस्त्री यांनी 41.23 कोटी रुपये मोजून एक अपार्टमेंट खरेदी केली आहे. के रहेजा यांच्या आर्टेशीया या गृहनिर्माण प्रकल्पातील 35 व्या माळ्यावर हे अपार्टमेंट आहे. 18 नोव्हेंबरला हा सौदा पक्का झाला. या फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ 8,132 चौरस फूट एवढे आहे. या फ्लॅटसाठी जवळपास 96 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी मोजण्यात आली आहे. अर्नाझ मिस्त्री यांना या फ्लॅटसोबत एकूण आठ पार्कीग जागा  मिळाल्या आहेत. या फ्लॅटची एकूण खरेदी 44 कोटी 57 लाख पडली आहे. यापूर्वी प्रसिध्द बँकर्स रोमेश सोबती यांनी वरळीमध्ये 76 कोटी रुपयांमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते. अधिक वाचा-  धारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात  तयार लक्झरी फ्लॅटच्या खरेदीला चांगली मागणी आहे. जीएसटी आणि मुद्रांक शुल्क सवलतीमुळेही घर खरेदी होत असल्याचे नरडेकोचे राज्य अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी म्हटलं आहे. मुंबई विभागातल्या अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. यापूर्वीच्या मोठ्या घर खरेदी डील ऑक्टोबर महिन्यात अनुराग जैन यांनी 1.22 लाख प्रति चौरस फूट या दराने कर्मिशयल प्रोजेक्टमध्ये अपार्टमेंट खरेदी केली. यापूर्वी जुलै महिन्यात त्यांनी 1.56 लाख प्रति चौरस फूट या दराने इथेच अपार्टमेंट घेतली होती. जुलै महिन्यात वांद्राच्या नवरोज बिल्डींगमध्ये सुशीलकुमार जैन यांनी 1.30 लाख  रुपये प्रति चौरस फुटाने अपार्टमेंट घेतली. प्रतिक अग्रवाल यांनी समुद्र महल येथे 1.12 लाख रुपये प्रति चौरस फूट या दराने फ्लॅट खरेदी केला. --------------------------------------- (संपादन- पूजा विचारे) An apartment in Worli for Rs 42 crore a boom in the purchase of luxury flats News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2I40Qfb
Read More
शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी जवळपास एक हजार झाडांचा बळी

मुंबई:  शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथील 946 झाडांचा  बळी जाणार आहे. सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पूल आणि महालक्ष्मी येथील दोन उड्डाण पुलांच्या कामासाठी 288 झाडावर कुऱ्हाड चालणार आहे. सार्वजनिक प्रकल्पांसाठी 1 हजार 234 झाडे कापणे आणि पुनर्रोपित करण्याच्या प्रस्तावांना बुधवारी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

शिवडी न्हावाशेव हा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामुळे मुंबई ते न्हावाशेवा हा प्रवास अवघ्या काही मिनिटात शक्य होणार आहे. हा मार्ग शिवडी खाडी परीसरातून जात आहे. हा मुंबईचा पूर्व किनारपट्टीचा भाग आहे. या भागात मोठी वृक्ष संपदा आहे. या भागात सामान्य नागरिकांचा वावर फार तुरळक आहे. या भागातील 420 झाडे कापण्याचा 526 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी मिळण्याची विनंती MMRDA कडून महानगर पालिकेला करण्यात आली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मांडला होता. या प्रस्तावाला बुधवारी मंजूरी देण्यात आली आहे. त्याच बरोबर महालक्ष्मी येथील रेल्वे मार्गावरील जुन्या पुलाला पर्याय म्हणून नवा पुल बांधण्यात येणार आहे. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच या भागात दुसराही उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या दोन पुलांसाठी 175 झाडे कापणे 81 पुनर्रोपित करण्याची परवानगी बुधवारी वृक्ष प्राधिकरणाने दिली. सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पुलाच्या कामात अडथळा ठरणारी 20 झाडे कापणे आणि 12 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगीही वृक्ष प्राधिकरणने दिली आहे. प्रकल्पांसाठी झाडे कापण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून महापालिका गेल्या काही वर्षांपासून झाडांच्या पुनर्रोपणाला भर देत आहे. मात्र, पुनर्रोपीत केलेली झाडे जगण्याचे प्रमाण नगण्य आहे. तसेच त्यांचा कोणताही हिशोब महानगर पालिकेकडून ठेवला जात नाही.

अधिक वाचा-  मध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा

 सार्वजनिक प्रकल्पांसह अंधेरी येथील मोगरा गावातील झोपू योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतीसाठीही 41 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर नाहूर येथील इमारतीच्या बांधकामा आड येणारी 119 वृक्ष कापण्यास आणि 66 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 
शिवडीच्या बदलत्यात वसईला झाडे

शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथून कापण्यात आलेली झाडे वसई येथील राजवली, कामन गावात करण्यात येणार आहे. येथे साधारण दोन हजार झाडे लावण्यात येणार आहे. महालक्ष्मी येथे कापण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात रेसकोर्सच्या परिसरात झाडे लावली जाणार आहे. मुंबईच्या कॉक्रिटच्या जंगलात अनेक दशकांपासून तग धरुन असलेली झाडे प्रकल्पांसाठी कापण्यात येणार आहे. त्या बदल्यात वसई तालुक्यातील राजावली आणि कामन या दोन गावात झाडे लावली जाणार आहेत.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Nearly one thousand trees sacrificed for sewri nhava sheva project

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी जवळपास एक हजार झाडांचा बळी मुंबई:  शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथील 946 झाडांचा  बळी जाणार आहे. सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पूल आणि महालक्ष्मी येथील दोन उड्डाण पुलांच्या कामासाठी 288 झाडावर कुऱ्हाड चालणार आहे. सार्वजनिक प्रकल्पांसाठी 1 हजार 234 झाडे कापणे आणि पुनर्रोपित करण्याच्या प्रस्तावांना बुधवारी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. शिवडी न्हावाशेव हा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामुळे मुंबई ते न्हावाशेवा हा प्रवास अवघ्या काही मिनिटात शक्य होणार आहे. हा मार्ग शिवडी खाडी परीसरातून जात आहे. हा मुंबईचा पूर्व किनारपट्टीचा भाग आहे. या भागात मोठी वृक्ष संपदा आहे. या भागात सामान्य नागरिकांचा वावर फार तुरळक आहे. या भागातील 420 झाडे कापण्याचा 526 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी मिळण्याची विनंती MMRDA कडून महानगर पालिकेला करण्यात आली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मांडला होता. या प्रस्तावाला बुधवारी मंजूरी देण्यात आली आहे. त्याच बरोबर महालक्ष्मी येथील रेल्वे मार्गावरील जुन्या पुलाला पर्याय म्हणून नवा पुल बांधण्यात येणार आहे.  मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच या भागात दुसराही उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या दोन पुलांसाठी 175 झाडे कापणे 81 पुनर्रोपित करण्याची परवानगी बुधवारी वृक्ष प्राधिकरणाने दिली. सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पुलाच्या कामात अडथळा ठरणारी 20 झाडे कापणे आणि 12 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगीही वृक्ष प्राधिकरणने दिली आहे. प्रकल्पांसाठी झाडे कापण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून महापालिका गेल्या काही वर्षांपासून झाडांच्या पुनर्रोपणाला भर देत आहे. मात्र, पुनर्रोपीत केलेली झाडे जगण्याचे प्रमाण नगण्य आहे. तसेच त्यांचा कोणताही हिशोब महानगर पालिकेकडून ठेवला जात नाही. अधिक वाचा-  मध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा  सार्वजनिक प्रकल्पांसह अंधेरी येथील मोगरा गावातील झोपू योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतीसाठीही 41 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर नाहूर येथील इमारतीच्या बांधकामा आड येणारी 119 वृक्ष कापण्यास आणि 66 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.   शिवडीच्या बदलत्यात वसईला झाडे शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथून कापण्यात आलेली झाडे वसई येथील राजवली, कामन गावात करण्यात येणार आहे. येथे साधारण दोन हजार झाडे लावण्यात येणार आहे. महालक्ष्मी येथे कापण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात रेसकोर्सच्या परिसरात झाडे लावली जाणार आहे. मुंबईच्या कॉक्रिटच्या जंगलात अनेक दशकांपासून तग धरुन असलेली झाडे प्रकल्पांसाठी कापण्यात येणार आहे. त्या बदल्यात वसई तालुक्यातील राजावली आणि कामन या दोन गावात झाडे लावली जाणार आहेत. -------------------------------- (संपादन- पूजा विचारे) Nearly one thousand trees sacrificed for sewri nhava sheva project News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3g2H2FN
Read More
दिव्यांगत्व निदान झालेल्या तब्बल ८३ टक्के बालकांच्या उपचारात पडतो खंड

जन्मजात व्यंगांसंबंधिच्या पुणे जिल्ह्यात झालेल्या संशोधनाचा निष्कर्ष
पुणे - चालताना अडखळते, जन्मतःच हृदयाला छिद्रे असणे, थॅलसेमिया आदी विकासात्मक दिव्यांगत्व बालकांमध्ये आढळतात. वाढत्या वयाबरोबरच हे दिव्यांगत्व जाईल, असा जर तुमचा समज असले, तर सावधान ! पुण्यातील एका सर्वेक्षणानुसार निदान झालेल्या बालकांपैकी तब्बल ८३ टक्के बालकांच्या उपचारांत खंड पडला असून, जनजागृतीचा अभाव हे यामागील मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जन्मजात व्यंग आणि बालकांचे दिव्यांगत्व संशोधन संस्था (बीडीसीडीआरसी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आरोग्यशास्त्र विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाच्या माहितीच्या आधारे संशोधन केले आहे. अपंगत्व किंवा जन्मदोष असलेल्या बालकांची ओळख पटविली असून, त्यांच्यावर उपचारही सुरू केले आहे. पण त्यापैकी अनेक बालकांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसल्याचे बीडीसीडीआरसीच्या संचालिका डॉ. अनिता कार यांनी सांगितले. या संशोधनामध्ये भाग्यश्री राधाक्रिष्णन, तृष्णा गिरासे, धम्मसागर उजागरे, अर्चना पाटील यांचा समावेश आहे.

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू

या उपाययोजना आवश्‍यक

जन्मलेल्या प्रत्येक बालकाचे वेळोवेळी निदान करणे आवश्‍यक.

बालकाच्या विकासावर सातत्याने लक्ष द्यायला हवे.

ग्रामीण भागात उपचाराची सुविधा जवळच उपलब्ध व्हायला हवी.

पालकांसह समाजातील सर्वच घटकांची जनजागृती करणे आवश्‍यक.

संबंधी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वाढविणे गरजेचे.

...फक्त लग्न मोडले म्हणून!

बालकांना वेळेवर उपचार मिळाले तर त्यांना शारीरिक दिव्यांगत्वावर आणि जन्मजात व्यंगांवर मात करता येते. त्यासाठी सरकारची आरबीएसके ही योजना आहे. परंतु, जनजागृतीचा अभाव आणि दूरवर असणारे आरोग्य केंद्र यामुळे बालकांच्या उपचारात खंड पडत आहे.
- डॉ. अनिता कार, संचालक, जन्मजात व्यंग आणि बालकांचे अपंगत्व संशोधन संस्था, पुणे

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दिव्यांगत्व निदान झालेल्या तब्बल ८३ टक्के बालकांच्या उपचारात पडतो खंड जन्मजात व्यंगांसंबंधिच्या पुणे जिल्ह्यात झालेल्या संशोधनाचा निष्कर्ष पुणे - चालताना अडखळते, जन्मतःच हृदयाला छिद्रे असणे, थॅलसेमिया आदी विकासात्मक दिव्यांगत्व बालकांमध्ये आढळतात. वाढत्या वयाबरोबरच हे दिव्यांगत्व जाईल, असा जर तुमचा समज असले, तर सावधान ! पुण्यातील एका सर्वेक्षणानुसार निदान झालेल्या बालकांपैकी तब्बल ८३ टक्के बालकांच्या उपचारांत खंड पडला असून, जनजागृतीचा अभाव हे यामागील मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जन्मजात व्यंग आणि बालकांचे दिव्यांगत्व संशोधन संस्था (बीडीसीडीआरसी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आरोग्यशास्त्र विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाच्या माहितीच्या आधारे संशोधन केले आहे. अपंगत्व किंवा जन्मदोष असलेल्या बालकांची ओळख पटविली असून, त्यांच्यावर उपचारही सुरू केले आहे. पण त्यापैकी अनेक बालकांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसल्याचे बीडीसीडीआरसीच्या संचालिका डॉ. अनिता कार यांनी सांगितले. या संशोधनामध्ये भाग्यश्री राधाक्रिष्णन, तृष्णा गिरासे, धम्मसागर उजागरे, अर्चना पाटील यांचा समावेश आहे. कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू या उपाययोजना आवश्‍यक जन्मलेल्या प्रत्येक बालकाचे वेळोवेळी निदान करणे आवश्‍यक. बालकाच्या विकासावर सातत्याने लक्ष द्यायला हवे. ग्रामीण भागात उपचाराची सुविधा जवळच उपलब्ध व्हायला हवी. पालकांसह समाजातील सर्वच घटकांची जनजागृती करणे आवश्‍यक. संबंधी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वाढविणे गरजेचे. ...फक्त लग्न मोडले म्हणून! बालकांना वेळेवर उपचार मिळाले तर त्यांना शारीरिक दिव्यांगत्वावर आणि जन्मजात व्यंगांवर मात करता येते. त्यासाठी सरकारची आरबीएसके ही योजना आहे. परंतु, जनजागृतीचा अभाव आणि दूरवर असणारे आरोग्य केंद्र यामुळे बालकांच्या उपचारात खंड पडत आहे. - डॉ. अनिता कार, संचालक, जन्मजात व्यंग आणि बालकांचे अपंगत्व संशोधन संस्था, पुणे Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37xZlhY
Read More
रेखा जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी पाचजण ताब्यात

पारनेर/नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी पदाधिकारी रेखा भाऊसाहेब जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 18 तासांत तिघांना अटक केली.

पारनेर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिसांनी उशिरा आणखी दोघांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतल्याचे समजते. फिरोज राजू शेख (वय 26, रा. संक्रापूर, आंबी, ता. राहुरी), ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे (वय 24, रा. फत्तेबाद, ता. श्रीरामपूर) व आदित्य सुधाकर चोळके (वय 25, रा. तिसगाव फाटा, कोल्हार, ता. राहाता), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

अधिक माहिती अशी : रेखा जरे पाटील, त्यांची आई, मुलगा व मैत्रीण, असे चौघे मोटारीतून सोमवारी (ता. 30) सायंकाळी पुण्याहून नगरकडे येत होते. नगर-पुणे रस्त्यावर जातेगाव घाटाजवळ त्यांच्या मोटारीस दुचाकीस्वारांनी कट मारला. त्यानंतर पुढे जाऊन जातेगाव घाटात दुचाकी आडवी लावून जरे यांची मोटार अडविली. त्यावेळी दुचाकीस्वारांसोबत जरे यांची बाचाबाची झाली. वाद सुरू असतानाच, एका आरोपीने रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच जरे यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी जरे यांच्या आई सिंधूबाई सुखदेव वायकर यांच्या फिर्यादीवरून सुपे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी सोमवारी रात्रीच गुन्ह्याचा तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी काल (मंगळवार) रात्री संक्रापूर येथून आरोपी फिरोज शेख याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून अन्य आरोपी ज्ञानेश्‍वर शिंदे व आदित्य चोळके यांना राहाता व श्रीरामपूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

भक्‍कम पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली. पारनेर न्यायालयाने त्यांना सात डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी दोघांना कोल्हापूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. 

आरोपीचा फोटोच ठरला मुख्य दुवा 
जरे यांच्या हत्येनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या 18 तासांत आरोपी जेरबंद केले. विशेषत: जरे यांच्या मुलाने मोटारीतूनच मोबाईलमध्ये आरोपीचा घेतलेला फोटो पोलिस तपासात मोठा दुवा ठरला. हा आरोपी फिरोज शेख आहे. 
 

अपघाताचा बनाव करून रेखा जरे पाटील यांची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. परंतु, यामागे दुसरे कारण असण्याचीही शक्‍यता आहे. याबाबत कसून तपास करीत असून, तपासाअंती सत्य समोर येईल. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, नगर 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रेखा जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी पाचजण ताब्यात पारनेर/नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी पदाधिकारी रेखा भाऊसाहेब जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 18 तासांत तिघांना अटक केली. पारनेर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिसांनी उशिरा आणखी दोघांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतल्याचे समजते. फिरोज राजू शेख (वय 26, रा. संक्रापूर, आंबी, ता. राहुरी), ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे (वय 24, रा. फत्तेबाद, ता. श्रीरामपूर) व आदित्य सुधाकर चोळके (वय 25, रा. तिसगाव फाटा, कोल्हार, ता. राहाता), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  अधिक माहिती अशी : रेखा जरे पाटील, त्यांची आई, मुलगा व मैत्रीण, असे चौघे मोटारीतून सोमवारी (ता. 30) सायंकाळी पुण्याहून नगरकडे येत होते. नगर-पुणे रस्त्यावर जातेगाव घाटाजवळ त्यांच्या मोटारीस दुचाकीस्वारांनी कट मारला. त्यानंतर पुढे जाऊन जातेगाव घाटात दुचाकी आडवी लावून जरे यांची मोटार अडविली. त्यावेळी दुचाकीस्वारांसोबत जरे यांची बाचाबाची झाली. वाद सुरू असतानाच, एका आरोपीने रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच जरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जरे यांच्या आई सिंधूबाई सुखदेव वायकर यांच्या फिर्यादीवरून सुपे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी सोमवारी रात्रीच गुन्ह्याचा तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी काल (मंगळवार) रात्री संक्रापूर येथून आरोपी फिरोज शेख याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून अन्य आरोपी ज्ञानेश्‍वर शिंदे व आदित्य चोळके यांना राहाता व श्रीरामपूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. भक्‍कम पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली. पारनेर न्यायालयाने त्यांना सात डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी दोघांना कोल्हापूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.  आरोपीचा फोटोच ठरला मुख्य दुवा  जरे यांच्या हत्येनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या 18 तासांत आरोपी जेरबंद केले. विशेषत: जरे यांच्या मुलाने मोटारीतूनच मोबाईलमध्ये आरोपीचा घेतलेला फोटो पोलिस तपासात मोठा दुवा ठरला. हा आरोपी फिरोज शेख आहे.    अपघाताचा बनाव करून रेखा जरे पाटील यांची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. परंतु, यामागे दुसरे कारण असण्याचीही शक्‍यता आहे. याबाबत कसून तपास करीत असून, तपासाअंती सत्य समोर येईल.  - मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, नगर  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lC58bk
Read More
राज्यातील कांद्याच्या भावात घसरण

मार्केट यार्ड - राज्यातील बाजार समित्या आणि उपबाजारात जुन्या कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याचे दर वाढतील, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. परंतु, पुढील काही दिवसांत नवीन कांद्याचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी जुना कांदा बाजारात विक्रीस पाठवत असल्याने महिन्यापूर्वी तेजीत असलेल्या जुन्या कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात घसरण झाली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजारात येणारा नवीन कांदा वाळवलेला असेल. त्यामुळे त्याची प्रतवारी चांगली असेल. परिणामी, जुन्या कांद्याला फारशी मागणी राहणार नाही. पंधरा दिवसानंतर बाजारात फक्त नवीन कांदाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर जुना कांदा विक्रीस पाठविण्यात येत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी गणेश यादव यांनी सांगितले.

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू

कांदा व्यापारी, रितेश पोमण म्हणाले, दिवाळीनंतर जुन्या कांद्याला १०० रुपये किलो दर मिळेल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती. दिवाळीपूर्वी घाऊक बाजारात ५० ते ७० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या जुन्या कांद्याची विक्री सध्या २५ ते ३५ रुपये दराने केली जात आहे.

घाऊक बाजारात प्रतवारीनुसार कांद्याचे १० किलोचे भाव रुपयांत
२५० ते ३३० - नवीन कांदा
२५० ते ३५० - जुना कांदा

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील कांद्याच्या भावात घसरण मार्केट यार्ड - राज्यातील बाजार समित्या आणि उपबाजारात जुन्या कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याचे दर वाढतील, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. परंतु, पुढील काही दिवसांत नवीन कांद्याचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी जुना कांदा बाजारात विक्रीस पाठवत असल्याने महिन्यापूर्वी तेजीत असलेल्या जुन्या कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात घसरण झाली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाजारात येणारा नवीन कांदा वाळवलेला असेल. त्यामुळे त्याची प्रतवारी चांगली असेल. परिणामी, जुन्या कांद्याला फारशी मागणी राहणार नाही. पंधरा दिवसानंतर बाजारात फक्त नवीन कांदाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर जुना कांदा विक्रीस पाठविण्यात येत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी गणेश यादव यांनी सांगितले. कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू कांदा व्यापारी, रितेश पोमण म्हणाले, दिवाळीनंतर जुन्या कांद्याला १०० रुपये किलो दर मिळेल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती. दिवाळीपूर्वी घाऊक बाजारात ५० ते ७० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या जुन्या कांद्याची विक्री सध्या २५ ते ३५ रुपये दराने केली जात आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार कांद्याचे १० किलोचे भाव रुपयांत २५० ते ३३० - नवीन कांदा २५० ते ३५० - जुना कांदा Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33C34Kp
Read More
पुण्याचे ‘गुरुजी’ ठरविणार शिक्षक आमदार

विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघात विक्रमी ७३.०४ टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीत पुणे वगळता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चारही जिल्ह्यांत ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले. पुण्यात ५८.५४ टक्के मतदान झाले असले तरी तब्बल १८ हजार ८४९ शिक्षकांनी मतदान केले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत किमान सात हजार मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराच्या पारड्यात पुण्यातील ‘गुरुजीं’चे जास्त मतदान पडणार आहे, त्यांचा विजय आणखी सोपा होणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षक मतदारसंघातात ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिक्षक मतदारसंघात ५२ टक्के मतदान झाले होते. त्यात दत्तात्रेय सावंत यांनी बाजी मारली होती. आता जवळपास २१ टक्के जास्त मतदान झाल्याने त्याचा फायदा कोणाला होणार, याची उत्सुकता लागली आहे. 

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने व शिक्षक पूर्ण क्षमतेने कामावर नव्हते. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना एवढ्या मोठ्या मतदारसंघात मतदार शिक्षकांपर्यंत पोचणे आव्हानात्मक बनले होते. प्रचारात गटबाजी झाली असली तरी प्रत्यक्षात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुणे जिह्यात टक्केवारी सर्वात कमी असली तरी सर्वाधिक १८ हजार ८४९ मतदान झाले आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात ११ हजार ५३८, कोल्हापूर १० हजार ६०९, सांगली ५हजार ६५१ आणि सातारा जिल्ह्यात ६ हजार ३२० असे एकूण ५२ हजार ९८७ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

...फक्त लग्न मोडले म्हणून!

प्रमुख उमेदवारांना पाचही जिह्यात मतदान त्यांच्या हक्काचा मतदार आहे; पण निर्णायक आघाडी मिळवून देण्यात व विजय सोपा करण्यात पुण्यातील मतदान महत्वाचे ठरणार आहे. गुरूवारी मतमोजणी सुरू होणार असून, त्यामध्ये कोणी कोणाच्या पारड्यात किती मते टाकली हे स्पष्ट होईल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्याचे ‘गुरुजी’ ठरविणार शिक्षक आमदार विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघात विक्रमी ७३.०४ टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीत पुणे वगळता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चारही जिल्ह्यांत ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले. पुण्यात ५८.५४ टक्के मतदान झाले असले तरी तब्बल १८ हजार ८४९ शिक्षकांनी मतदान केले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत किमान सात हजार मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराच्या पारड्यात पुण्यातील ‘गुरुजीं’चे जास्त मतदान पडणार आहे, त्यांचा विजय आणखी सोपा होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिक्षक मतदारसंघातात ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिक्षक मतदारसंघात ५२ टक्के मतदान झाले होते. त्यात दत्तात्रेय सावंत यांनी बाजी मारली होती. आता जवळपास २१ टक्के जास्त मतदान झाल्याने त्याचा फायदा कोणाला होणार, याची उत्सुकता लागली आहे.  मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने व शिक्षक पूर्ण क्षमतेने कामावर नव्हते. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना एवढ्या मोठ्या मतदारसंघात मतदार शिक्षकांपर्यंत पोचणे आव्हानात्मक बनले होते. प्रचारात गटबाजी झाली असली तरी प्रत्यक्षात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुणे जिह्यात टक्केवारी सर्वात कमी असली तरी सर्वाधिक १८ हजार ८४९ मतदान झाले आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात ११ हजार ५३८, कोल्हापूर १० हजार ६०९, सांगली ५हजार ६५१ आणि सातारा जिल्ह्यात ६ हजार ३२० असे एकूण ५२ हजार ९८७ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ...फक्त लग्न मोडले म्हणून! प्रमुख उमेदवारांना पाचही जिह्यात मतदान त्यांच्या हक्काचा मतदार आहे; पण निर्णायक आघाडी मिळवून देण्यात व विजय सोपा करण्यात पुण्यातील मतदान महत्वाचे ठरणार आहे. गुरूवारी मतमोजणी सुरू होणार असून, त्यामध्ये कोणी कोणाच्या पारड्यात किती मते टाकली हे स्पष्ट होईल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36vsKKC
Read More