Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 2, 2020

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दोनच प्रवेश फेऱ्या; सीईटी सेलकडून नियमावली जाहीर

पुणे : कोरोनामुळे व्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबल्याने ही प्रक्रिया गतीने व्हावी, यासाठी सीईटी सेलने नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये इंजिनिअरींग, फार्मसीसह सर्वच अभ्यासक्रमासाठी दोन प्रवेश फेऱ्या होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यंदा एक प्रवेश फेरी कमी करण्यात आली आहे. 

- ...फक्त लग्न मोडले म्हणून!​

इंजिनिअरिंग प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मसी प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मा डी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, हाॅटेल मॅनेजमेंट प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश, बॅचलर ऑफ प्लानिंग या अभ्यासक्रमांसाठी दोन प्रवेश फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना ३०० महाविद्यालयांपर्यंत पसंतीक्रम देता येतील, पण दोनच फेऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना जेथे प्रवेश मिळेल तेथे जागा निश्चित करावी लागणार आहे. 

- कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू​

सीईटी सेल नुकतेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर केले. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक प्रक्रिया जुलै-ऑगस्ट ऐवजी डिसेंबर महिन्यात सुरू होत आहे. २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष देखील कोलमडले आहे. आता लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने सीईटी सेलने पाऊल उचलले आहे. पुढील तीन चार दिवसात पहिली फेरी व 
प्रवेशाची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

- पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री

महाविद्यालय सस्तरावर प्रवेशास सवलत नाही? 
प्रवेश फेर्यां झाल्यानंतर महाविद्यालयात अनेक जागा रिक्त रहातात. त्यानंतर तेथे महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रियेला परवानगी दिली जाते. पण यामधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची कोणतीही सवलत मिळत नाही. याबाबत शासनाने विचार करावा, असे  सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. श्यामकांत देशमुख यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दोनच प्रवेश फेऱ्या; सीईटी सेलकडून नियमावली जाहीर पुणे : कोरोनामुळे व्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबल्याने ही प्रक्रिया गतीने व्हावी, यासाठी सीईटी सेलने नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये इंजिनिअरींग, फार्मसीसह सर्वच अभ्यासक्रमासाठी दोन प्रवेश फेऱ्या होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यंदा एक प्रवेश फेरी कमी करण्यात आली आहे.  - ...फक्त लग्न मोडले म्हणून!​ इंजिनिअरिंग प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मसी प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मा डी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, हाॅटेल मॅनेजमेंट प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश, बॅचलर ऑफ प्लानिंग या अभ्यासक्रमांसाठी दोन प्रवेश फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना ३०० महाविद्यालयांपर्यंत पसंतीक्रम देता येतील, पण दोनच फेऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना जेथे प्रवेश मिळेल तेथे जागा निश्चित करावी लागणार आहे.  - कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू​ सीईटी सेल नुकतेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर केले. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक प्रक्रिया जुलै-ऑगस्ट ऐवजी डिसेंबर महिन्यात सुरू होत आहे. २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष देखील कोलमडले आहे. आता लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने सीईटी सेलने पाऊल उचलले आहे. पुढील तीन चार दिवसात पहिली फेरी व  प्रवेशाची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. - पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री महाविद्यालय सस्तरावर प्रवेशास सवलत नाही?  प्रवेश फेर्यां झाल्यानंतर महाविद्यालयात अनेक जागा रिक्त रहातात. त्यानंतर तेथे महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रियेला परवानगी दिली जाते. पण यामधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची कोणतीही सवलत मिळत नाही. याबाबत शासनाने विचार करावा, असे  सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. श्यामकांत देशमुख यांनी सांगितले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mAwCiT
Read More
वरळीमध्ये एक अपार्टमेंट 42 कोटीला, लक्झरी फ्लॅटच्या खरेदीत तेजी

मुंबई: लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या ही महिन्यात रियल इस्टेट उद्योग आर्थिक संकटात सापडले होता. मात्र कोविड संसर्ग कमी होताना गृहनिर्माण क्षेत्र पुन्हा जोमाने उभारी घेत असल्याचे चित्र आहे. यामध्ये विशेषता लक्झरी फ्लॅट्स खरेदीचे प्रमाण वाढले आहे. नुकताच वरळी भागात एक आलिशान फ्लॅट तब्बल 42 कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आला.  कोविड काळातील घर खरेदीमधील ही महागडी डील असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी एका उद्योगपतीने वरळी भागात 76 कोटीला दोन फ्लॅट खरेदी केले होते. 

गेल्या दोन महिन्यांपासून लक्झरी सदरातील घर खरेदीला वेग आलाय. किंबहुना लॉकडाऊन काळातही या सेगमेंटमधील घरे विकली जात होती. वरळी भागात एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष आणि सीईओ अर्नाझ मिस्त्री यांनी 41.23 कोटी रुपये मोजून एक अपार्टमेंट खरेदी केली आहे. के रहेजा यांच्या आर्टेशीया या गृहनिर्माण प्रकल्पातील 35 व्या माळ्यावर हे अपार्टमेंट आहे. 18 नोव्हेंबरला हा सौदा पक्का झाला. या फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ 8,132 चौरस फूट एवढे आहे. या फ्लॅटसाठी जवळपास 96 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी मोजण्यात आली आहे. अर्नाझ मिस्त्री यांना या फ्लॅटसोबत एकूण आठ पार्कीग जागा  मिळाल्या आहेत. या फ्लॅटची एकूण खरेदी 44 कोटी 57 लाख पडली आहे. यापूर्वी प्रसिध्द बँकर्स रोमेश सोबती यांनी वरळीमध्ये 76 कोटी रुपयांमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते.

अधिक वाचा-  धारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात

 तयार लक्झरी फ्लॅटच्या खरेदीला चांगली मागणी आहे. जीएसटी आणि मुद्रांक शुल्क सवलतीमुळेही घर खरेदी होत असल्याचे नरडेकोचे राज्य अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी म्हटलं आहे.

मुंबई विभागातल्या अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यापूर्वीच्या मोठ्या घर खरेदी डील

ऑक्टोबर महिन्यात अनुराग जैन यांनी 1.22 लाख प्रति चौरस फूट या दराने कर्मिशयल प्रोजेक्टमध्ये अपार्टमेंट खरेदी केली.

यापूर्वी जुलै महिन्यात त्यांनी 1.56 लाख प्रति चौरस फूट या दराने इथेच अपार्टमेंट घेतली होती.

जुलै महिन्यात वांद्राच्या नवरोज बिल्डींगमध्ये सुशीलकुमार जैन यांनी 1.30 लाख  रुपये प्रति चौरस फुटाने अपार्टमेंट घेतली.

प्रतिक अग्रवाल यांनी समुद्र महल येथे 1.12 लाख रुपये प्रति चौरस फूट या दराने फ्लॅट खरेदी केला.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

An apartment in Worli for Rs 42 crore a boom in the purchase of luxury flats

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वरळीमध्ये एक अपार्टमेंट 42 कोटीला, लक्झरी फ्लॅटच्या खरेदीत तेजी मुंबई: लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या ही महिन्यात रियल इस्टेट उद्योग आर्थिक संकटात सापडले होता. मात्र कोविड संसर्ग कमी होताना गृहनिर्माण क्षेत्र पुन्हा जोमाने उभारी घेत असल्याचे चित्र आहे. यामध्ये विशेषता लक्झरी फ्लॅट्स खरेदीचे प्रमाण वाढले आहे. नुकताच वरळी भागात एक आलिशान फ्लॅट तब्बल 42 कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आला.  कोविड काळातील घर खरेदीमधील ही महागडी डील असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी एका उद्योगपतीने वरळी भागात 76 कोटीला दोन फ्लॅट खरेदी केले होते.  गेल्या दोन महिन्यांपासून लक्झरी सदरातील घर खरेदीला वेग आलाय. किंबहुना लॉकडाऊन काळातही या सेगमेंटमधील घरे विकली जात होती. वरळी भागात एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष आणि सीईओ अर्नाझ मिस्त्री यांनी 41.23 कोटी रुपये मोजून एक अपार्टमेंट खरेदी केली आहे. के रहेजा यांच्या आर्टेशीया या गृहनिर्माण प्रकल्पातील 35 व्या माळ्यावर हे अपार्टमेंट आहे. 18 नोव्हेंबरला हा सौदा पक्का झाला. या फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ 8,132 चौरस फूट एवढे आहे. या फ्लॅटसाठी जवळपास 96 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी मोजण्यात आली आहे. अर्नाझ मिस्त्री यांना या फ्लॅटसोबत एकूण आठ पार्कीग जागा  मिळाल्या आहेत. या फ्लॅटची एकूण खरेदी 44 कोटी 57 लाख पडली आहे. यापूर्वी प्रसिध्द बँकर्स रोमेश सोबती यांनी वरळीमध्ये 76 कोटी रुपयांमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते. अधिक वाचा-  धारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात  तयार लक्झरी फ्लॅटच्या खरेदीला चांगली मागणी आहे. जीएसटी आणि मुद्रांक शुल्क सवलतीमुळेही घर खरेदी होत असल्याचे नरडेकोचे राज्य अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी म्हटलं आहे. मुंबई विभागातल्या अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. यापूर्वीच्या मोठ्या घर खरेदी डील ऑक्टोबर महिन्यात अनुराग जैन यांनी 1.22 लाख प्रति चौरस फूट या दराने कर्मिशयल प्रोजेक्टमध्ये अपार्टमेंट खरेदी केली. यापूर्वी जुलै महिन्यात त्यांनी 1.56 लाख प्रति चौरस फूट या दराने इथेच अपार्टमेंट घेतली होती. जुलै महिन्यात वांद्राच्या नवरोज बिल्डींगमध्ये सुशीलकुमार जैन यांनी 1.30 लाख  रुपये प्रति चौरस फुटाने अपार्टमेंट घेतली. प्रतिक अग्रवाल यांनी समुद्र महल येथे 1.12 लाख रुपये प्रति चौरस फूट या दराने फ्लॅट खरेदी केला. --------------------------------------- (संपादन- पूजा विचारे) An apartment in Worli for Rs 42 crore a boom in the purchase of luxury flats News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2I40Qfb
Read More
शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी जवळपास एक हजार झाडांचा बळी

मुंबई:  शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथील 946 झाडांचा  बळी जाणार आहे. सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पूल आणि महालक्ष्मी येथील दोन उड्डाण पुलांच्या कामासाठी 288 झाडावर कुऱ्हाड चालणार आहे. सार्वजनिक प्रकल्पांसाठी 1 हजार 234 झाडे कापणे आणि पुनर्रोपित करण्याच्या प्रस्तावांना बुधवारी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

शिवडी न्हावाशेव हा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामुळे मुंबई ते न्हावाशेवा हा प्रवास अवघ्या काही मिनिटात शक्य होणार आहे. हा मार्ग शिवडी खाडी परीसरातून जात आहे. हा मुंबईचा पूर्व किनारपट्टीचा भाग आहे. या भागात मोठी वृक्ष संपदा आहे. या भागात सामान्य नागरिकांचा वावर फार तुरळक आहे. या भागातील 420 झाडे कापण्याचा 526 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी मिळण्याची विनंती MMRDA कडून महानगर पालिकेला करण्यात आली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मांडला होता. या प्रस्तावाला बुधवारी मंजूरी देण्यात आली आहे. त्याच बरोबर महालक्ष्मी येथील रेल्वे मार्गावरील जुन्या पुलाला पर्याय म्हणून नवा पुल बांधण्यात येणार आहे. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच या भागात दुसराही उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या दोन पुलांसाठी 175 झाडे कापणे 81 पुनर्रोपित करण्याची परवानगी बुधवारी वृक्ष प्राधिकरणाने दिली. सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पुलाच्या कामात अडथळा ठरणारी 20 झाडे कापणे आणि 12 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगीही वृक्ष प्राधिकरणने दिली आहे. प्रकल्पांसाठी झाडे कापण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून महापालिका गेल्या काही वर्षांपासून झाडांच्या पुनर्रोपणाला भर देत आहे. मात्र, पुनर्रोपीत केलेली झाडे जगण्याचे प्रमाण नगण्य आहे. तसेच त्यांचा कोणताही हिशोब महानगर पालिकेकडून ठेवला जात नाही.

अधिक वाचा-  मध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा

 सार्वजनिक प्रकल्पांसह अंधेरी येथील मोगरा गावातील झोपू योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतीसाठीही 41 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर नाहूर येथील इमारतीच्या बांधकामा आड येणारी 119 वृक्ष कापण्यास आणि 66 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 
शिवडीच्या बदलत्यात वसईला झाडे

शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथून कापण्यात आलेली झाडे वसई येथील राजवली, कामन गावात करण्यात येणार आहे. येथे साधारण दोन हजार झाडे लावण्यात येणार आहे. महालक्ष्मी येथे कापण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात रेसकोर्सच्या परिसरात झाडे लावली जाणार आहे. मुंबईच्या कॉक्रिटच्या जंगलात अनेक दशकांपासून तग धरुन असलेली झाडे प्रकल्पांसाठी कापण्यात येणार आहे. त्या बदल्यात वसई तालुक्यातील राजावली आणि कामन या दोन गावात झाडे लावली जाणार आहेत.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Nearly one thousand trees sacrificed for sewri nhava sheva project

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी जवळपास एक हजार झाडांचा बळी मुंबई:  शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथील 946 झाडांचा  बळी जाणार आहे. सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पूल आणि महालक्ष्मी येथील दोन उड्डाण पुलांच्या कामासाठी 288 झाडावर कुऱ्हाड चालणार आहे. सार्वजनिक प्रकल्पांसाठी 1 हजार 234 झाडे कापणे आणि पुनर्रोपित करण्याच्या प्रस्तावांना बुधवारी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. शिवडी न्हावाशेव हा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामुळे मुंबई ते न्हावाशेवा हा प्रवास अवघ्या काही मिनिटात शक्य होणार आहे. हा मार्ग शिवडी खाडी परीसरातून जात आहे. हा मुंबईचा पूर्व किनारपट्टीचा भाग आहे. या भागात मोठी वृक्ष संपदा आहे. या भागात सामान्य नागरिकांचा वावर फार तुरळक आहे. या भागातील 420 झाडे कापण्याचा 526 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी मिळण्याची विनंती MMRDA कडून महानगर पालिकेला करण्यात आली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मांडला होता. या प्रस्तावाला बुधवारी मंजूरी देण्यात आली आहे. त्याच बरोबर महालक्ष्मी येथील रेल्वे मार्गावरील जुन्या पुलाला पर्याय म्हणून नवा पुल बांधण्यात येणार आहे.  मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच या भागात दुसराही उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या दोन पुलांसाठी 175 झाडे कापणे 81 पुनर्रोपित करण्याची परवानगी बुधवारी वृक्ष प्राधिकरणाने दिली. सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पुलाच्या कामात अडथळा ठरणारी 20 झाडे कापणे आणि 12 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगीही वृक्ष प्राधिकरणने दिली आहे. प्रकल्पांसाठी झाडे कापण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून महापालिका गेल्या काही वर्षांपासून झाडांच्या पुनर्रोपणाला भर देत आहे. मात्र, पुनर्रोपीत केलेली झाडे जगण्याचे प्रमाण नगण्य आहे. तसेच त्यांचा कोणताही हिशोब महानगर पालिकेकडून ठेवला जात नाही. अधिक वाचा-  मध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा  सार्वजनिक प्रकल्पांसह अंधेरी येथील मोगरा गावातील झोपू योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतीसाठीही 41 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर नाहूर येथील इमारतीच्या बांधकामा आड येणारी 119 वृक्ष कापण्यास आणि 66 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.   शिवडीच्या बदलत्यात वसईला झाडे शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथून कापण्यात आलेली झाडे वसई येथील राजवली, कामन गावात करण्यात येणार आहे. येथे साधारण दोन हजार झाडे लावण्यात येणार आहे. महालक्ष्मी येथे कापण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात रेसकोर्सच्या परिसरात झाडे लावली जाणार आहे. मुंबईच्या कॉक्रिटच्या जंगलात अनेक दशकांपासून तग धरुन असलेली झाडे प्रकल्पांसाठी कापण्यात येणार आहे. त्या बदल्यात वसई तालुक्यातील राजावली आणि कामन या दोन गावात झाडे लावली जाणार आहेत. -------------------------------- (संपादन- पूजा विचारे) Nearly one thousand trees sacrificed for sewri nhava sheva project News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3g2H2FN
Read More
दिव्यांगत्व निदान झालेल्या तब्बल ८३ टक्के बालकांच्या उपचारात पडतो खंड

जन्मजात व्यंगांसंबंधिच्या पुणे जिल्ह्यात झालेल्या संशोधनाचा निष्कर्ष
पुणे - चालताना अडखळते, जन्मतःच हृदयाला छिद्रे असणे, थॅलसेमिया आदी विकासात्मक दिव्यांगत्व बालकांमध्ये आढळतात. वाढत्या वयाबरोबरच हे दिव्यांगत्व जाईल, असा जर तुमचा समज असले, तर सावधान ! पुण्यातील एका सर्वेक्षणानुसार निदान झालेल्या बालकांपैकी तब्बल ८३ टक्के बालकांच्या उपचारांत खंड पडला असून, जनजागृतीचा अभाव हे यामागील मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जन्मजात व्यंग आणि बालकांचे दिव्यांगत्व संशोधन संस्था (बीडीसीडीआरसी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आरोग्यशास्त्र विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाच्या माहितीच्या आधारे संशोधन केले आहे. अपंगत्व किंवा जन्मदोष असलेल्या बालकांची ओळख पटविली असून, त्यांच्यावर उपचारही सुरू केले आहे. पण त्यापैकी अनेक बालकांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसल्याचे बीडीसीडीआरसीच्या संचालिका डॉ. अनिता कार यांनी सांगितले. या संशोधनामध्ये भाग्यश्री राधाक्रिष्णन, तृष्णा गिरासे, धम्मसागर उजागरे, अर्चना पाटील यांचा समावेश आहे.

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू

या उपाययोजना आवश्‍यक

जन्मलेल्या प्रत्येक बालकाचे वेळोवेळी निदान करणे आवश्‍यक.

बालकाच्या विकासावर सातत्याने लक्ष द्यायला हवे.

ग्रामीण भागात उपचाराची सुविधा जवळच उपलब्ध व्हायला हवी.

पालकांसह समाजातील सर्वच घटकांची जनजागृती करणे आवश्‍यक.

संबंधी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वाढविणे गरजेचे.

...फक्त लग्न मोडले म्हणून!

बालकांना वेळेवर उपचार मिळाले तर त्यांना शारीरिक दिव्यांगत्वावर आणि जन्मजात व्यंगांवर मात करता येते. त्यासाठी सरकारची आरबीएसके ही योजना आहे. परंतु, जनजागृतीचा अभाव आणि दूरवर असणारे आरोग्य केंद्र यामुळे बालकांच्या उपचारात खंड पडत आहे.
- डॉ. अनिता कार, संचालक, जन्मजात व्यंग आणि बालकांचे अपंगत्व संशोधन संस्था, पुणे

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दिव्यांगत्व निदान झालेल्या तब्बल ८३ टक्के बालकांच्या उपचारात पडतो खंड जन्मजात व्यंगांसंबंधिच्या पुणे जिल्ह्यात झालेल्या संशोधनाचा निष्कर्ष पुणे - चालताना अडखळते, जन्मतःच हृदयाला छिद्रे असणे, थॅलसेमिया आदी विकासात्मक दिव्यांगत्व बालकांमध्ये आढळतात. वाढत्या वयाबरोबरच हे दिव्यांगत्व जाईल, असा जर तुमचा समज असले, तर सावधान ! पुण्यातील एका सर्वेक्षणानुसार निदान झालेल्या बालकांपैकी तब्बल ८३ टक्के बालकांच्या उपचारांत खंड पडला असून, जनजागृतीचा अभाव हे यामागील मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जन्मजात व्यंग आणि बालकांचे दिव्यांगत्व संशोधन संस्था (बीडीसीडीआरसी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आरोग्यशास्त्र विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाच्या माहितीच्या आधारे संशोधन केले आहे. अपंगत्व किंवा जन्मदोष असलेल्या बालकांची ओळख पटविली असून, त्यांच्यावर उपचारही सुरू केले आहे. पण त्यापैकी अनेक बालकांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसल्याचे बीडीसीडीआरसीच्या संचालिका डॉ. अनिता कार यांनी सांगितले. या संशोधनामध्ये भाग्यश्री राधाक्रिष्णन, तृष्णा गिरासे, धम्मसागर उजागरे, अर्चना पाटील यांचा समावेश आहे. कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू या उपाययोजना आवश्‍यक जन्मलेल्या प्रत्येक बालकाचे वेळोवेळी निदान करणे आवश्‍यक. बालकाच्या विकासावर सातत्याने लक्ष द्यायला हवे. ग्रामीण भागात उपचाराची सुविधा जवळच उपलब्ध व्हायला हवी. पालकांसह समाजातील सर्वच घटकांची जनजागृती करणे आवश्‍यक. संबंधी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वाढविणे गरजेचे. ...फक्त लग्न मोडले म्हणून! बालकांना वेळेवर उपचार मिळाले तर त्यांना शारीरिक दिव्यांगत्वावर आणि जन्मजात व्यंगांवर मात करता येते. त्यासाठी सरकारची आरबीएसके ही योजना आहे. परंतु, जनजागृतीचा अभाव आणि दूरवर असणारे आरोग्य केंद्र यामुळे बालकांच्या उपचारात खंड पडत आहे. - डॉ. अनिता कार, संचालक, जन्मजात व्यंग आणि बालकांचे अपंगत्व संशोधन संस्था, पुणे Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37xZlhY
Read More
रेखा जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी पाचजण ताब्यात

पारनेर/नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी पदाधिकारी रेखा भाऊसाहेब जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 18 तासांत तिघांना अटक केली.

पारनेर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिसांनी उशिरा आणखी दोघांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतल्याचे समजते. फिरोज राजू शेख (वय 26, रा. संक्रापूर, आंबी, ता. राहुरी), ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे (वय 24, रा. फत्तेबाद, ता. श्रीरामपूर) व आदित्य सुधाकर चोळके (वय 25, रा. तिसगाव फाटा, कोल्हार, ता. राहाता), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

अधिक माहिती अशी : रेखा जरे पाटील, त्यांची आई, मुलगा व मैत्रीण, असे चौघे मोटारीतून सोमवारी (ता. 30) सायंकाळी पुण्याहून नगरकडे येत होते. नगर-पुणे रस्त्यावर जातेगाव घाटाजवळ त्यांच्या मोटारीस दुचाकीस्वारांनी कट मारला. त्यानंतर पुढे जाऊन जातेगाव घाटात दुचाकी आडवी लावून जरे यांची मोटार अडविली. त्यावेळी दुचाकीस्वारांसोबत जरे यांची बाचाबाची झाली. वाद सुरू असतानाच, एका आरोपीने रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच जरे यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी जरे यांच्या आई सिंधूबाई सुखदेव वायकर यांच्या फिर्यादीवरून सुपे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी सोमवारी रात्रीच गुन्ह्याचा तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी काल (मंगळवार) रात्री संक्रापूर येथून आरोपी फिरोज शेख याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून अन्य आरोपी ज्ञानेश्‍वर शिंदे व आदित्य चोळके यांना राहाता व श्रीरामपूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

भक्‍कम पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली. पारनेर न्यायालयाने त्यांना सात डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी दोघांना कोल्हापूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. 

आरोपीचा फोटोच ठरला मुख्य दुवा 
जरे यांच्या हत्येनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या 18 तासांत आरोपी जेरबंद केले. विशेषत: जरे यांच्या मुलाने मोटारीतूनच मोबाईलमध्ये आरोपीचा घेतलेला फोटो पोलिस तपासात मोठा दुवा ठरला. हा आरोपी फिरोज शेख आहे. 
 

अपघाताचा बनाव करून रेखा जरे पाटील यांची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. परंतु, यामागे दुसरे कारण असण्याचीही शक्‍यता आहे. याबाबत कसून तपास करीत असून, तपासाअंती सत्य समोर येईल. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, नगर 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रेखा जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी पाचजण ताब्यात पारनेर/नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी पदाधिकारी रेखा भाऊसाहेब जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 18 तासांत तिघांना अटक केली. पारनेर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिसांनी उशिरा आणखी दोघांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतल्याचे समजते. फिरोज राजू शेख (वय 26, रा. संक्रापूर, आंबी, ता. राहुरी), ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे (वय 24, रा. फत्तेबाद, ता. श्रीरामपूर) व आदित्य सुधाकर चोळके (वय 25, रा. तिसगाव फाटा, कोल्हार, ता. राहाता), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  अधिक माहिती अशी : रेखा जरे पाटील, त्यांची आई, मुलगा व मैत्रीण, असे चौघे मोटारीतून सोमवारी (ता. 30) सायंकाळी पुण्याहून नगरकडे येत होते. नगर-पुणे रस्त्यावर जातेगाव घाटाजवळ त्यांच्या मोटारीस दुचाकीस्वारांनी कट मारला. त्यानंतर पुढे जाऊन जातेगाव घाटात दुचाकी आडवी लावून जरे यांची मोटार अडविली. त्यावेळी दुचाकीस्वारांसोबत जरे यांची बाचाबाची झाली. वाद सुरू असतानाच, एका आरोपीने रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच जरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जरे यांच्या आई सिंधूबाई सुखदेव वायकर यांच्या फिर्यादीवरून सुपे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी सोमवारी रात्रीच गुन्ह्याचा तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी काल (मंगळवार) रात्री संक्रापूर येथून आरोपी फिरोज शेख याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून अन्य आरोपी ज्ञानेश्‍वर शिंदे व आदित्य चोळके यांना राहाता व श्रीरामपूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. भक्‍कम पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली. पारनेर न्यायालयाने त्यांना सात डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी दोघांना कोल्हापूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.  आरोपीचा फोटोच ठरला मुख्य दुवा  जरे यांच्या हत्येनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या 18 तासांत आरोपी जेरबंद केले. विशेषत: जरे यांच्या मुलाने मोटारीतूनच मोबाईलमध्ये आरोपीचा घेतलेला फोटो पोलिस तपासात मोठा दुवा ठरला. हा आरोपी फिरोज शेख आहे.    अपघाताचा बनाव करून रेखा जरे पाटील यांची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. परंतु, यामागे दुसरे कारण असण्याचीही शक्‍यता आहे. याबाबत कसून तपास करीत असून, तपासाअंती सत्य समोर येईल.  - मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, नगर  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lC58bk
Read More
राज्यातील कांद्याच्या भावात घसरण

मार्केट यार्ड - राज्यातील बाजार समित्या आणि उपबाजारात जुन्या कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याचे दर वाढतील, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. परंतु, पुढील काही दिवसांत नवीन कांद्याचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी जुना कांदा बाजारात विक्रीस पाठवत असल्याने महिन्यापूर्वी तेजीत असलेल्या जुन्या कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात घसरण झाली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजारात येणारा नवीन कांदा वाळवलेला असेल. त्यामुळे त्याची प्रतवारी चांगली असेल. परिणामी, जुन्या कांद्याला फारशी मागणी राहणार नाही. पंधरा दिवसानंतर बाजारात फक्त नवीन कांदाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर जुना कांदा विक्रीस पाठविण्यात येत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी गणेश यादव यांनी सांगितले.

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू

कांदा व्यापारी, रितेश पोमण म्हणाले, दिवाळीनंतर जुन्या कांद्याला १०० रुपये किलो दर मिळेल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती. दिवाळीपूर्वी घाऊक बाजारात ५० ते ७० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या जुन्या कांद्याची विक्री सध्या २५ ते ३५ रुपये दराने केली जात आहे.

घाऊक बाजारात प्रतवारीनुसार कांद्याचे १० किलोचे भाव रुपयांत
२५० ते ३३० - नवीन कांदा
२५० ते ३५० - जुना कांदा

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील कांद्याच्या भावात घसरण मार्केट यार्ड - राज्यातील बाजार समित्या आणि उपबाजारात जुन्या कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याचे दर वाढतील, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. परंतु, पुढील काही दिवसांत नवीन कांद्याचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी जुना कांदा बाजारात विक्रीस पाठवत असल्याने महिन्यापूर्वी तेजीत असलेल्या जुन्या कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात घसरण झाली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाजारात येणारा नवीन कांदा वाळवलेला असेल. त्यामुळे त्याची प्रतवारी चांगली असेल. परिणामी, जुन्या कांद्याला फारशी मागणी राहणार नाही. पंधरा दिवसानंतर बाजारात फक्त नवीन कांदाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर जुना कांदा विक्रीस पाठविण्यात येत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी गणेश यादव यांनी सांगितले. कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू कांदा व्यापारी, रितेश पोमण म्हणाले, दिवाळीनंतर जुन्या कांद्याला १०० रुपये किलो दर मिळेल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती. दिवाळीपूर्वी घाऊक बाजारात ५० ते ७० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या जुन्या कांद्याची विक्री सध्या २५ ते ३५ रुपये दराने केली जात आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार कांद्याचे १० किलोचे भाव रुपयांत २५० ते ३३० - नवीन कांदा २५० ते ३५० - जुना कांदा Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33C34Kp
Read More
पुण्याचे ‘गुरुजी’ ठरविणार शिक्षक आमदार

विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघात विक्रमी ७३.०४ टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीत पुणे वगळता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चारही जिल्ह्यांत ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले. पुण्यात ५८.५४ टक्के मतदान झाले असले तरी तब्बल १८ हजार ८४९ शिक्षकांनी मतदान केले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत किमान सात हजार मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराच्या पारड्यात पुण्यातील ‘गुरुजीं’चे जास्त मतदान पडणार आहे, त्यांचा विजय आणखी सोपा होणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षक मतदारसंघातात ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिक्षक मतदारसंघात ५२ टक्के मतदान झाले होते. त्यात दत्तात्रेय सावंत यांनी बाजी मारली होती. आता जवळपास २१ टक्के जास्त मतदान झाल्याने त्याचा फायदा कोणाला होणार, याची उत्सुकता लागली आहे. 

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने व शिक्षक पूर्ण क्षमतेने कामावर नव्हते. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना एवढ्या मोठ्या मतदारसंघात मतदार शिक्षकांपर्यंत पोचणे आव्हानात्मक बनले होते. प्रचारात गटबाजी झाली असली तरी प्रत्यक्षात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुणे जिह्यात टक्केवारी सर्वात कमी असली तरी सर्वाधिक १८ हजार ८४९ मतदान झाले आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात ११ हजार ५३८, कोल्हापूर १० हजार ६०९, सांगली ५हजार ६५१ आणि सातारा जिल्ह्यात ६ हजार ३२० असे एकूण ५२ हजार ९८७ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

...फक्त लग्न मोडले म्हणून!

प्रमुख उमेदवारांना पाचही जिह्यात मतदान त्यांच्या हक्काचा मतदार आहे; पण निर्णायक आघाडी मिळवून देण्यात व विजय सोपा करण्यात पुण्यातील मतदान महत्वाचे ठरणार आहे. गुरूवारी मतमोजणी सुरू होणार असून, त्यामध्ये कोणी कोणाच्या पारड्यात किती मते टाकली हे स्पष्ट होईल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्याचे ‘गुरुजी’ ठरविणार शिक्षक आमदार विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघात विक्रमी ७३.०४ टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीत पुणे वगळता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चारही जिल्ह्यांत ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले. पुण्यात ५८.५४ टक्के मतदान झाले असले तरी तब्बल १८ हजार ८४९ शिक्षकांनी मतदान केले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत किमान सात हजार मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराच्या पारड्यात पुण्यातील ‘गुरुजीं’चे जास्त मतदान पडणार आहे, त्यांचा विजय आणखी सोपा होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिक्षक मतदारसंघातात ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिक्षक मतदारसंघात ५२ टक्के मतदान झाले होते. त्यात दत्तात्रेय सावंत यांनी बाजी मारली होती. आता जवळपास २१ टक्के जास्त मतदान झाल्याने त्याचा फायदा कोणाला होणार, याची उत्सुकता लागली आहे.  मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने व शिक्षक पूर्ण क्षमतेने कामावर नव्हते. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना एवढ्या मोठ्या मतदारसंघात मतदार शिक्षकांपर्यंत पोचणे आव्हानात्मक बनले होते. प्रचारात गटबाजी झाली असली तरी प्रत्यक्षात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुणे जिह्यात टक्केवारी सर्वात कमी असली तरी सर्वाधिक १८ हजार ८४९ मतदान झाले आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात ११ हजार ५३८, कोल्हापूर १० हजार ६०९, सांगली ५हजार ६५१ आणि सातारा जिल्ह्यात ६ हजार ३२० असे एकूण ५२ हजार ९८७ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ...फक्त लग्न मोडले म्हणून! प्रमुख उमेदवारांना पाचही जिह्यात मतदान त्यांच्या हक्काचा मतदार आहे; पण निर्णायक आघाडी मिळवून देण्यात व विजय सोपा करण्यात पुण्यातील मतदान महत्वाचे ठरणार आहे. गुरूवारी मतमोजणी सुरू होणार असून, त्यामध्ये कोणी कोणाच्या पारड्यात किती मते टाकली हे स्पष्ट होईल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36vsKKC
Read More
एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये ‘वर्क फ्रॉम नेचर’ 

पर्यटकांसाठी डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूटचीही सुविधा 
पुणे - आयटीसह काही बड्या कंपन्यांतील बहुतांश कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळले आहेत. अशा परिस्थितीत निसर्गरम्य डोंगररांगांच्या सान्निध्यात थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पर्यटक निवासस्थानातून कंपनीचे कामकाज करता आले तर... महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी ‘वर्क फ्रॉम नेचर’ची संकल्पना आणली आहे. या ठिकाणी कार्पोरेट कंपन्यांना त्यांच्या बैठकाही घेता येतील. यासोबतच इतर हौशी पर्यटकांना डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूट, रिसेप्शन फोटोशूट करता येणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आयटी कंपन्यांसह अनेक उद्योग-व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’वर भर दिला. बहुतांश आयटीसह काही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी घरीच बसून कामकाज करीत आहेत. मात्र, तेच कार्यालयीन कामकाज निसर्गाच्या सानिध्यात बसून केल्यास कार्यालयीन कामकाजासोबत निसर्गाचाही सुखद अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून लॉकडाउनपासून परिसर, खोल्या, उपहारगृहांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटक निवासांसाठी निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना पुढील दोन वर्षे करण्यात येणार आहेत. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज स्प्रे, ऑक्‍सीमिटर अशी खास व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी तसेच त्यांना मास्क, फेस शील्ड, हॅन्ड ग्लोव्हज आणि सॅनिटायझर दिले आहेत. कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबत खबरदारीचे प्रशिक्षण दिल्याची माहिती ‘एमटीडीसी’ने दिली.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

कोयना लेक खुले होणार 
कोयना अभयारण्य आणि धरण क्षेत्राच्या परिसरातील कोयनानगर येथील पर्यटक निवास कोयना लेक या आठवड्यात पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. कोयना लेकमधून धरणाचे नयनरम्य दृश्‍य आणि निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे. याठिकाणी 22 कॉटेज रूम्स, बंगलो, फॅमिली रुम्स असून रुचकर भोजनासाठी उपाहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.

...फक्त लग्न मोडले म्हणून! 

लोणावळा-कार्ला, महाबळेश्‍वर, माळशेज घाट, पानशेत, माथेरान आणि भीमाशंकरसोबत कोयनानगर येथील पर्यटक निवासस्थानांमध्ये ‘वर्क फ्रॉम नेचर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्वच्छ, रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या परिसरातील पर्यटक निवासस्थानांमध्ये खाद्यपदार्थांचीही मेजवानी असेल. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महामंडळ पर्यटकांची आतुरतेने वाट पहात आहे. 
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये ‘वर्क फ्रॉम नेचर’  पर्यटकांसाठी डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूटचीही सुविधा  पुणे - आयटीसह काही बड्या कंपन्यांतील बहुतांश कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळले आहेत. अशा परिस्थितीत निसर्गरम्य डोंगररांगांच्या सान्निध्यात थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पर्यटक निवासस्थानातून कंपनीचे कामकाज करता आले तर... महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी ‘वर्क फ्रॉम नेचर’ची संकल्पना आणली आहे. या ठिकाणी कार्पोरेट कंपन्यांना त्यांच्या बैठकाही घेता येतील. यासोबतच इतर हौशी पर्यटकांना डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूट, रिसेप्शन फोटोशूट करता येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आयटी कंपन्यांसह अनेक उद्योग-व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’वर भर दिला. बहुतांश आयटीसह काही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी घरीच बसून कामकाज करीत आहेत. मात्र, तेच कार्यालयीन कामकाज निसर्गाच्या सानिध्यात बसून केल्यास कार्यालयीन कामकाजासोबत निसर्गाचाही सुखद अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून लॉकडाउनपासून परिसर, खोल्या, उपहारगृहांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटक निवासांसाठी निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना पुढील दोन वर्षे करण्यात येणार आहेत. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज स्प्रे, ऑक्‍सीमिटर अशी खास व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी तसेच त्यांना मास्क, फेस शील्ड, हॅन्ड ग्लोव्हज आणि सॅनिटायझर दिले आहेत. कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबत खबरदारीचे प्रशिक्षण दिल्याची माहिती ‘एमटीडीसी’ने दिली. मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली कोयना लेक खुले होणार  कोयना अभयारण्य आणि धरण क्षेत्राच्या परिसरातील कोयनानगर येथील पर्यटक निवास कोयना लेक या आठवड्यात पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. कोयना लेकमधून धरणाचे नयनरम्य दृश्‍य आणि निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे. याठिकाणी 22 कॉटेज रूम्स, बंगलो, फॅमिली रुम्स असून रुचकर भोजनासाठी उपाहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...फक्त लग्न मोडले म्हणून!  लोणावळा-कार्ला, महाबळेश्‍वर, माळशेज घाट, पानशेत, माथेरान आणि भीमाशंकरसोबत कोयनानगर येथील पर्यटक निवासस्थानांमध्ये ‘वर्क फ्रॉम नेचर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्वच्छ, रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या परिसरातील पर्यटक निवासस्थानांमध्ये खाद्यपदार्थांचीही मेजवानी असेल. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महामंडळ पर्यटकांची आतुरतेने वाट पहात आहे.  - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39CYTSb
Read More
शेतकरी आहेत; देशद्रोही नाहीत!

पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान इत्यादी राज्यातील शेतकरी, आंदोलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे एकवटले आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी अत्याचार केला जात असल्याने महाराष्ट्रातील विचारवंत, लेखक उद्विग्न झाले आहेत. ते शेतकरी आहेत, देशद्रोही नाहीत, त्यांच्याशी सन्मानाने बोला, असे त्यांचे म्हणणे आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लेखक राजन गवस, भास्कर चंदनशिव, अतुल देऊळगावकर, नारायण कुळकर्णी कवठेकर, आसाराम लोमटे, आनंद विंगकर, प्रमोद मुनघाटे, बालाजी सुतार, जयंत पवार, कृष्णात खोरे, सुरेखा दळवी, अरुणा सबाने यांनी निवेदन प्रसिद्धीसाठी दिले आहे. त्यात म्हटले आहे, की केंद्र सरकार आणि स्थानिक पोलिसांकडून सुरुवातीला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्‍याच्या थंडीतही पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठीहल्ला करत सरकारने अमानुषपणे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तरीही निर्धाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता, न जुमानता केंद्र सरकारने ही विधेयके मंजूर केली. या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करत गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे, असे मत लेखकांनी मांडले आहे.

...फक्त लग्न मोडले म्हणून!

सरकारच्या भूमिकेवर टीका
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचा हा असंतोष खदखदत असताना त्यांच्याशी संवाद करण्याचे दायित्वसुद्धा हे सरकार पार पाडत नाही, हे संतापजनक आहे. सरकारने तातडीने या शेतकऱ्यांशी संवाद साधावा. शेतीच्या शोषणव्यवस्थेची मांडणी करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंत अनेक धुरिणांनी याच मातीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढे दिले. आज दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे या निवेदनात म्हटले आहे.

एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात, तर दुसरीकडे नवा कायद्यात काय आहे, याची चिंता त्यांना आहे. त्यामुळे त्यांच्याशी सन्मानाने संवाद साधला पाहिजे. केंद्र सरकार ते करीत नाहीत. आंदोलन करणारे हे शेतकरी आहे, देशद्रोही नाहीत. म्हणूनच आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
- अतुल देऊळगावकर, लेखक

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शेतकरी आहेत; देशद्रोही नाहीत! पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान इत्यादी राज्यातील शेतकरी, आंदोलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे एकवटले आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी अत्याचार केला जात असल्याने महाराष्ट्रातील विचारवंत, लेखक उद्विग्न झाले आहेत. ते शेतकरी आहेत, देशद्रोही नाहीत, त्यांच्याशी सन्मानाने बोला, असे त्यांचे म्हणणे आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लेखक राजन गवस, भास्कर चंदनशिव, अतुल देऊळगावकर, नारायण कुळकर्णी कवठेकर, आसाराम लोमटे, आनंद विंगकर, प्रमोद मुनघाटे, बालाजी सुतार, जयंत पवार, कृष्णात खोरे, सुरेखा दळवी, अरुणा सबाने यांनी निवेदन प्रसिद्धीसाठी दिले आहे. त्यात म्हटले आहे, की केंद्र सरकार आणि स्थानिक पोलिसांकडून सुरुवातीला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्‍याच्या थंडीतही पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठीहल्ला करत सरकारने अमानुषपणे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तरीही निर्धाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता, न जुमानता केंद्र सरकारने ही विधेयके मंजूर केली. या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करत गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे, असे मत लेखकांनी मांडले आहे. ...फक्त लग्न मोडले म्हणून! सरकारच्या भूमिकेवर टीका गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचा हा असंतोष खदखदत असताना त्यांच्याशी संवाद करण्याचे दायित्वसुद्धा हे सरकार पार पाडत नाही, हे संतापजनक आहे. सरकारने तातडीने या शेतकऱ्यांशी संवाद साधावा. शेतीच्या शोषणव्यवस्थेची मांडणी करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंत अनेक धुरिणांनी याच मातीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढे दिले. आज दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे या निवेदनात म्हटले आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात, तर दुसरीकडे नवा कायद्यात काय आहे, याची चिंता त्यांना आहे. त्यामुळे त्यांच्याशी सन्मानाने संवाद साधला पाहिजे. केंद्र सरकार ते करीत नाहीत. आंदोलन करणारे हे शेतकरी आहे, देशद्रोही नाहीत. म्हणूनच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. - अतुल देऊळगावकर, लेखक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3obxCKK
Read More
महागड्या श्‍वानांची आता ऑनलाइन खरेदी

उत्तमोत्तम जातीचे प्राणी पाळण्याचा ट्रेंड; दिल्ली, चेन्नईमधून विमानाने आणतात पिले
पिंपरी - दारात साखळदंडाने बांधलेला पाळीव श्‍वान आणि त्याला घेऊन ‘मॉर्निग वॉक’ करणे पिंपरी-चिंचवडकरांचा आवडीचा विषय आहे. त्यामुळे सध्या उत्तमोत्तम जातीचे श्‍वान खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, शहरात मोजक्‍या जातीचे श्‍वान असल्यामुळे थेट दिल्ली, हरियाना, मुंबई, चेन्नई व बेंगळुरूहून विदेशी श्‍वानांची ‘ऑनलाइन’ खरेदी करण्यात येत आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्‍वान पाळणे ही पारंपरिक संकल्पना जाऊन नव्या ट्रेंडनुसार ‘फॅमिली मेंबर’ झाले आहे. त्यामुळे शहरात विविध जातीचे श्‍वान पाळण्याकडे कल वर्षागणिक वाढत आहे. काही वर्षांपूर्वी लॅब्रेडॉर, जर्मन शेफर्ड, पग, पामेरिअन, डॉबरमॅन या मोजक्‍याच जातीची कुत्री दिसत. आता नवीन विदेशी जातीचे श्‍वान थेट ‘ऑनलाइन’ मागविण्याचा ट्रेंड वाढला आहे. श्‍वानांबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच खाद्य, शाम्पू, गादी, खेळणी, पट्टे, साखळी याच्याकडे लोक आवर्जून लक्ष देतात, असे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवड शहरात 223 नवीन रुग्ण; तर ९ जणांचा मृत्यू

महापालिकेकडे केवळ ४५० नोंद
पाळीव श्‍वानांची नोंदणी महापालिकेत करणे बंधनकारक आहे. शहरात १५ हजारांहून अधिक पाळीव श्‍वान आहेत. परंतु नोंदणीबाबत नागरिक अनुत्सुक आहे. तसेच केवळ एकाच कर्मचाऱ्यावर नोंदणीचा भार असल्याने त्याचाही परिणाम होत आहे. श्‍वान नोंदणीसाठी ७५ रुपये, तर नूतनीकरणासाठी दरवर्षी ५० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते. महापालिकेकडे फक्त ४५० श्‍वानांची नोंद झाली आहे.

...तर वायसीएम पुन्हा कोविड सेंटर

लाख मोलाचे श्‍वानप्रेम
सध्या शहरात पॉमेरिअन, डॉबरमॅन, जर्मनशेफर्ड, लॅब्रेडॉर, बेल्जियम शेफर्ड, इंग्लिश मॉस्टिफ, पिट बुल, बिगल, डॅशहाउल, पग, सेंट बर्नार्ड, ग्रेडडेन, यॉर्कशायर, टेरिअर, बुलमॅस्टिफ,  निॲपोलिटनमॅस्टिफ, बॉक्‍सर आणि रॉटव्हिलर या कुत्र्यांना विशेष मागणी आहे. डौलदार रुबाब आणि संबंधित प्रजातीचे पुरेपूर गुण असलेल्या श्‍वानांची किंमत १० हजार ते दीड लाख रुपये आहे. बहुतेक श्‍वानांची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे श्‍वानप्रेमी भरमसाट खर्च करून त्यांना जपत आहेत. हवामान बदलल्यानंतर त्यांना तपासण्यासाठीदेखील दवाखान्यात गर्दी होत आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिक राबविणार कुष्ठरोग, क्षयरोग निदान मोहीम

अशी होतेय नोंदणी
वेगवेगळे गॅझेट आणि वेबसाइटद्वारे रुबाबदार श्‍वानांची नोंदणी होते. दिल्लीहून सर्वाधिक श्‍वान मागवले जात असून, एखादे श्‍वान पिलं देणार असेल, त्यावेळी त्यांची सोनोग्राफी केल्यानंतरच पिलांची संख्या पाहून ‘बुकिंग’ होते. संबंधित ग्राहकाला किंमत सांगून नोंदणी करतात. ऑनलाइन खरेदीद्वारे दिल्लीहून अवघ्या तीन तासांत पिलू विमानाने केजमध्ये (चौकोनी हवेशीर पेटी) सुरक्षित येते. सुरक्षेमुळे ऑनलाइनचा फंडा भलताच लोकप्रिय होत आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महागड्या श्‍वानांची आता ऑनलाइन खरेदी उत्तमोत्तम जातीचे प्राणी पाळण्याचा ट्रेंड; दिल्ली, चेन्नईमधून विमानाने आणतात पिले पिंपरी - दारात साखळदंडाने बांधलेला पाळीव श्‍वान आणि त्याला घेऊन ‘मॉर्निग वॉक’ करणे पिंपरी-चिंचवडकरांचा आवडीचा विषय आहे. त्यामुळे सध्या उत्तमोत्तम जातीचे श्‍वान खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, शहरात मोजक्‍या जातीचे श्‍वान असल्यामुळे थेट दिल्ली, हरियाना, मुंबई, चेन्नई व बेंगळुरूहून विदेशी श्‍वानांची ‘ऑनलाइन’ खरेदी करण्यात येत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा श्‍वान पाळणे ही पारंपरिक संकल्पना जाऊन नव्या ट्रेंडनुसार ‘फॅमिली मेंबर’ झाले आहे. त्यामुळे शहरात विविध जातीचे श्‍वान पाळण्याकडे कल वर्षागणिक वाढत आहे. काही वर्षांपूर्वी लॅब्रेडॉर, जर्मन शेफर्ड, पग, पामेरिअन, डॉबरमॅन या मोजक्‍याच जातीची कुत्री दिसत. आता नवीन विदेशी जातीचे श्‍वान थेट ‘ऑनलाइन’ मागविण्याचा ट्रेंड वाढला आहे. श्‍वानांबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच खाद्य, शाम्पू, गादी, खेळणी, पट्टे, साखळी याच्याकडे लोक आवर्जून लक्ष देतात, असे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.  पिंपरी-चिंचवड शहरात 223 नवीन रुग्ण; तर ९ जणांचा मृत्यू महापालिकेकडे केवळ ४५० नोंद पाळीव श्‍वानांची नोंदणी महापालिकेत करणे बंधनकारक आहे. शहरात १५ हजारांहून अधिक पाळीव श्‍वान आहेत. परंतु नोंदणीबाबत नागरिक अनुत्सुक आहे. तसेच केवळ एकाच कर्मचाऱ्यावर नोंदणीचा भार असल्याने त्याचाही परिणाम होत आहे. श्‍वान नोंदणीसाठी ७५ रुपये, तर नूतनीकरणासाठी दरवर्षी ५० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते. महापालिकेकडे फक्त ४५० श्‍वानांची नोंद झाली आहे. ...तर वायसीएम पुन्हा कोविड सेंटर लाख मोलाचे श्‍वानप्रेम सध्या शहरात पॉमेरिअन, डॉबरमॅन, जर्मनशेफर्ड, लॅब्रेडॉर, बेल्जियम शेफर्ड, इंग्लिश मॉस्टिफ, पिट बुल, बिगल, डॅशहाउल, पग, सेंट बर्नार्ड, ग्रेडडेन, यॉर्कशायर, टेरिअर, बुलमॅस्टिफ,  निॲपोलिटनमॅस्टिफ, बॉक्‍सर आणि रॉटव्हिलर या कुत्र्यांना विशेष मागणी आहे. डौलदार रुबाब आणि संबंधित प्रजातीचे पुरेपूर गुण असलेल्या श्‍वानांची किंमत १० हजार ते दीड लाख रुपये आहे. बहुतेक श्‍वानांची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे श्‍वानप्रेमी भरमसाट खर्च करून त्यांना जपत आहेत. हवामान बदलल्यानंतर त्यांना तपासण्यासाठीदेखील दवाखान्यात गर्दी होत आहे.  पिंपरी चिंचवड महापालिक राबविणार कुष्ठरोग, क्षयरोग निदान मोहीम अशी होतेय नोंदणी वेगवेगळे गॅझेट आणि वेबसाइटद्वारे रुबाबदार श्‍वानांची नोंदणी होते. दिल्लीहून सर्वाधिक श्‍वान मागवले जात असून, एखादे श्‍वान पिलं देणार असेल, त्यावेळी त्यांची सोनोग्राफी केल्यानंतरच पिलांची संख्या पाहून ‘बुकिंग’ होते. संबंधित ग्राहकाला किंमत सांगून नोंदणी करतात. ऑनलाइन खरेदीद्वारे दिल्लीहून अवघ्या तीन तासांत पिलू विमानाने केजमध्ये (चौकोनी हवेशीर पेटी) सुरक्षित येते. सुरक्षेमुळे ऑनलाइनचा फंडा भलताच लोकप्रिय होत आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3olK9vp
Read More
Beauty Tips : बेसनात दडलंय सौंदर्याचं 'राज', तरुणींसाठी नव्हे तरुणांच्याही फायद्याचं

beauty tips सुंदर असणे आणि सुंदर दिसणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सौंदर्याची व्याख्या करणं खूपच अवघड टास्क आहे. अनेकदा आपल्याकडे रंगावरुन सुंदरता ठरवली जाते. पण मुळात रंग हा सौंदर्याचा निकषच ठरु शकत नाही. तसे असते तर बॉलिवूडमध्ये नावजलेली आणि मराठी अस्मिता म्हणून ओळख निर्माण करणारी स्मिता पाटील हिट ठरली नसती.

पण चेहरा उजळ दिसावा (याचा अर्थ गोरी दिसणं एवढा न घेता तेलकट किंवा डागांनी मळकट चेहरा न दिसणे असा घ्यावा) यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सौदर्य प्रसाधने तरुणी सर्वाधिक वापरत असली तरी आजकालची पोरही नटापटा करायला कमी नाहीत.  घरगुती आणि चेहऱ्याची उत्तम निगा राखण्याठी घरात रोज वापरात येणारे आणि स्वस्तात मस्त फेश वॉशचा सर्वोत्त देणारा पर्याय म्हणजे बेसनाचे पिठ. जाणून घेऊयात या बेसनात दडलेल्या सौदर्याच्या गुपतीबद्दल...    

1)बेसन च्या पिठामध्ये दही मिसळून चेहऱ्यावर लावल्याने रंग उजळतो व चेहऱ्यावरचे डागही जातात

2)बेसनामध्ये मध लिंबाचा रस मिसळून याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने मुरूम कमी होतात व रंगही उजळतो
. 
3)बेसनात हळद पावडर व लिंबाचा रस मिसळून लावल्याने उन्हापासून त्वचेचे रक्षण होते त्वचा काळी पडत नाही 

4)बेसन मध्ये कच्चे दूध मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील तेलकट पण कमी होण्यास मदत होते.

5)बेसन मध्ये हळद पावडर व मध मिसळून लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. नारळाचे दूध मिसळून लावल्याने सुध्दा चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Beauty Tips : बेसनात दडलंय सौंदर्याचं 'राज', तरुणींसाठी नव्हे तरुणांच्याही फायद्याचं beauty tips सुंदर असणे आणि सुंदर दिसणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सौंदर्याची व्याख्या करणं खूपच अवघड टास्क आहे. अनेकदा आपल्याकडे रंगावरुन सुंदरता ठरवली जाते. पण मुळात रंग हा सौंदर्याचा निकषच ठरु शकत नाही. तसे असते तर बॉलिवूडमध्ये नावजलेली आणि मराठी अस्मिता म्हणून ओळख निर्माण करणारी स्मिता पाटील हिट ठरली नसती. पण चेहरा उजळ दिसावा (याचा अर्थ गोरी दिसणं एवढा न घेता तेलकट किंवा डागांनी मळकट चेहरा न दिसणे असा घ्यावा) यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सौदर्य प्रसाधने तरुणी सर्वाधिक वापरत असली तरी आजकालची पोरही नटापटा करायला कमी नाहीत.  घरगुती आणि चेहऱ्याची उत्तम निगा राखण्याठी घरात रोज वापरात येणारे आणि स्वस्तात मस्त फेश वॉशचा सर्वोत्त देणारा पर्याय म्हणजे बेसनाचे पिठ. जाणून घेऊयात या बेसनात दडलेल्या सौदर्याच्या गुपतीबद्दल...     1)बेसन च्या पिठामध्ये दही मिसळून चेहऱ्यावर लावल्याने रंग उजळतो व चेहऱ्यावरचे डागही जातात 2)बेसनामध्ये मध लिंबाचा रस मिसळून याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने मुरूम कमी होतात व रंगही उजळतो .  3)बेसनात हळद पावडर व लिंबाचा रस मिसळून लावल्याने उन्हापासून त्वचेचे रक्षण होते त्वचा काळी पडत नाही  4)बेसन मध्ये कच्चे दूध मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील तेलकट पण कमी होण्यास मदत होते. 5)बेसन मध्ये हळद पावडर व मध मिसळून लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. नारळाचे दूध मिसळून लावल्याने सुध्दा चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JlD8Mk
Read More
पुणे जिल्ह्यात आणखी दोन नव्या ग्रामपंचायती

पुणे - जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करावे आणि या विभाजनातून प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करावी, अशी शिफारस पुणे जिल्हा परिषदेने बुधवारी (ता.2) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. यामुळे जिल्ह्यात आणखी दोन नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या 1 हजार 409 वर जाणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेच्या या शिफारशीनुसार जुन्नर तालुक्‍यातील हिवरे बुद्रूक ग्रामपंचायतीचे विभाजन केले जाणार आहे. या ग्रामपंचायतीच्या विभाजनानंतर पुनर्वसित गावठाण असलेल्या कैलासनगरला स्वतंत्र नवी ग्रामपंचायत होणार आहे. याशिवाय खेड तालुक्‍यातील बिबी ग्रामपंचायतीचे विभाजन करून, बुरसेवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येणार आहे.

पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री

याआधी मार्च महिन्यात आठ नवीन ग्रामपंचायतींची स्थापना झाली आहे. या नव्या ग्रामपंचायतींमुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या एक हजार 407 झाली होती. त्यात आणखी दोनची भर पडणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या मागणीनुसारच ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव हा संबंधित पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे येत असतो. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हे विभागीय आयुक्तांना याबाबत शिफारस करत असतात. या शिफारशींच्या आधारे विभागीय आयुक्त राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवत असतात. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येत असते, असे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी संदीप कोहीनकर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे जिल्ह्यात आणखी दोन नव्या ग्रामपंचायती पुणे - जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करावे आणि या विभाजनातून प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करावी, अशी शिफारस पुणे जिल्हा परिषदेने बुधवारी (ता.2) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. यामुळे जिल्ह्यात आणखी दोन नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या 1 हजार 409 वर जाणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जिल्हा परिषदेच्या या शिफारशीनुसार जुन्नर तालुक्‍यातील हिवरे बुद्रूक ग्रामपंचायतीचे विभाजन केले जाणार आहे. या ग्रामपंचायतीच्या विभाजनानंतर पुनर्वसित गावठाण असलेल्या कैलासनगरला स्वतंत्र नवी ग्रामपंचायत होणार आहे. याशिवाय खेड तालुक्‍यातील बिबी ग्रामपंचायतीचे विभाजन करून, बुरसेवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येणार आहे. पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री याआधी मार्च महिन्यात आठ नवीन ग्रामपंचायतींची स्थापना झाली आहे. या नव्या ग्रामपंचायतींमुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या एक हजार 407 झाली होती. त्यात आणखी दोनची भर पडणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या मागणीनुसारच ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव हा संबंधित पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे येत असतो. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हे विभागीय आयुक्तांना याबाबत शिफारस करत असतात. या शिफारशींच्या आधारे विभागीय आयुक्त राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवत असतात. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येत असते, असे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी संदीप कोहीनकर यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JCskcg
Read More
कोरोनाच्या संभाव्य लसीकरणासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना

पुणे - कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी बाजारात येऊ घातलेल्या संभाव्य लसीकरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने बुधवारी (ता.2) जिल्हानिहाय जिल्हा कृती दलाची स्थापना केली आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेच या कृती दलाचे अध्यक्ष असणार आहेत. या कृती दलाची पहिली बैठक येत्या 12 डिसेंबरपूर्वी घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दर आठवड्याला या कृती दलाची बैठक होणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आदेशानुसार पुणे जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख असणार आहेत. अन्य सदस्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे आदींसह जिल्हा क्रीडा अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, कॅटोंमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सहआयुक्त, जिल्हा माहिती अधिकारी, कामगार सहआयुक्त आदींचा या कृती दलात समावेश करण्यात आला आहे.

पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री

या कृती दलाने आपापल्या जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन करावयाचे आहे. यानुसार जिल्ह्यासाठी आवश्‍यक लसींची संख्या, लस देण्याबाबतचा प्राधान्यक्रम आणि त्यासाठीचे तालुकानिहाय नियोजन हे कृती करणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार हे या दलाचे संयोजक असणार आहेत.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाच्या संभाव्य लसीकरणासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना पुणे - कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी बाजारात येऊ घातलेल्या संभाव्य लसीकरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने बुधवारी (ता.2) जिल्हानिहाय जिल्हा कृती दलाची स्थापना केली आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेच या कृती दलाचे अध्यक्ष असणार आहेत. या कृती दलाची पहिली बैठक येत्या 12 डिसेंबरपूर्वी घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दर आठवड्याला या कृती दलाची बैठक होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या आदेशानुसार पुणे जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख असणार आहेत. अन्य सदस्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे आदींसह जिल्हा क्रीडा अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, कॅटोंमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सहआयुक्त, जिल्हा माहिती अधिकारी, कामगार सहआयुक्त आदींचा या कृती दलात समावेश करण्यात आला आहे. पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री या कृती दलाने आपापल्या जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन करावयाचे आहे. यानुसार जिल्ह्यासाठी आवश्‍यक लसींची संख्या, लस देण्याबाबतचा प्राधान्यक्रम आणि त्यासाठीचे तालुकानिहाय नियोजन हे कृती करणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार हे या दलाचे संयोजक असणार आहेत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VtRvQX
Read More