एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये ‘वर्क फ्रॉम नेचर’  पर्यटकांसाठी डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूटचीही सुविधा  पुणे - आयटीसह काही बड्या कंपन्यांतील बहुतांश कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळले आहेत. अशा परिस्थितीत निसर्गरम्य डोंगररांगांच्या सान्निध्यात थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पर्यटक निवासस्थानातून कंपनीचे कामकाज करता आले तर... महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी ‘वर्क फ्रॉम नेचर’ची संकल्पना आणली आहे. या ठिकाणी कार्पोरेट कंपन्यांना त्यांच्या बैठकाही घेता येतील. यासोबतच इतर हौशी पर्यटकांना डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूट, रिसेप्शन फोटोशूट करता येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आयटी कंपन्यांसह अनेक उद्योग-व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’वर भर दिला. बहुतांश आयटीसह काही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी घरीच बसून कामकाज करीत आहेत. मात्र, तेच कार्यालयीन कामकाज निसर्गाच्या सानिध्यात बसून केल्यास कार्यालयीन कामकाजासोबत निसर्गाचाही सुखद अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून लॉकडाउनपासून परिसर, खोल्या, उपहारगृहांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटक निवासांसाठी निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना पुढील दोन वर्षे करण्यात येणार आहेत. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज स्प्रे, ऑक्‍सीमिटर अशी खास व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी तसेच त्यांना मास्क, फेस शील्ड, हॅन्ड ग्लोव्हज आणि सॅनिटायझर दिले आहेत. कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबत खबरदारीचे प्रशिक्षण दिल्याची माहिती ‘एमटीडीसी’ने दिली. मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली कोयना लेक खुले होणार  कोयना अभयारण्य आणि धरण क्षेत्राच्या परिसरातील कोयनानगर येथील पर्यटक निवास कोयना लेक या आठवड्यात पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. कोयना लेकमधून धरणाचे नयनरम्य दृश्‍य आणि निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे. याठिकाणी 22 कॉटेज रूम्स, बंगलो, फॅमिली रुम्स असून रुचकर भोजनासाठी उपाहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...फक्त लग्न मोडले म्हणून!  लोणावळा-कार्ला, महाबळेश्‍वर, माळशेज घाट, पानशेत, माथेरान आणि भीमाशंकरसोबत कोयनानगर येथील पर्यटक निवासस्थानांमध्ये ‘वर्क फ्रॉम नेचर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्वच्छ, रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या परिसरातील पर्यटक निवासस्थानांमध्ये खाद्यपदार्थांचीही मेजवानी असेल. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महामंडळ पर्यटकांची आतुरतेने वाट पहात आहे.  - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 2, 2020

एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये ‘वर्क फ्रॉम नेचर’  पर्यटकांसाठी डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूटचीही सुविधा  पुणे - आयटीसह काही बड्या कंपन्यांतील बहुतांश कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळले आहेत. अशा परिस्थितीत निसर्गरम्य डोंगररांगांच्या सान्निध्यात थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पर्यटक निवासस्थानातून कंपनीचे कामकाज करता आले तर... महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी ‘वर्क फ्रॉम नेचर’ची संकल्पना आणली आहे. या ठिकाणी कार्पोरेट कंपन्यांना त्यांच्या बैठकाही घेता येतील. यासोबतच इतर हौशी पर्यटकांना डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूट, रिसेप्शन फोटोशूट करता येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आयटी कंपन्यांसह अनेक उद्योग-व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’वर भर दिला. बहुतांश आयटीसह काही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी घरीच बसून कामकाज करीत आहेत. मात्र, तेच कार्यालयीन कामकाज निसर्गाच्या सानिध्यात बसून केल्यास कार्यालयीन कामकाजासोबत निसर्गाचाही सुखद अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून लॉकडाउनपासून परिसर, खोल्या, उपहारगृहांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटक निवासांसाठी निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना पुढील दोन वर्षे करण्यात येणार आहेत. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज स्प्रे, ऑक्‍सीमिटर अशी खास व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी तसेच त्यांना मास्क, फेस शील्ड, हॅन्ड ग्लोव्हज आणि सॅनिटायझर दिले आहेत. कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबत खबरदारीचे प्रशिक्षण दिल्याची माहिती ‘एमटीडीसी’ने दिली. मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली कोयना लेक खुले होणार  कोयना अभयारण्य आणि धरण क्षेत्राच्या परिसरातील कोयनानगर येथील पर्यटक निवास कोयना लेक या आठवड्यात पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. कोयना लेकमधून धरणाचे नयनरम्य दृश्‍य आणि निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे. याठिकाणी 22 कॉटेज रूम्स, बंगलो, फॅमिली रुम्स असून रुचकर भोजनासाठी उपाहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...फक्त लग्न मोडले म्हणून!  लोणावळा-कार्ला, महाबळेश्‍वर, माळशेज घाट, पानशेत, माथेरान आणि भीमाशंकरसोबत कोयनानगर येथील पर्यटक निवासस्थानांमध्ये ‘वर्क फ्रॉम नेचर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्वच्छ, रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या परिसरातील पर्यटक निवासस्थानांमध्ये खाद्यपदार्थांचीही मेजवानी असेल. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महामंडळ पर्यटकांची आतुरतेने वाट पहात आहे.  - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39CYTSb

No comments:

Post a Comment