Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 29, 2020

बाबरी मशीद पाडण्याचा आरोप असलेल्या या पाच व्यक्तींविषयी तुम्हाला माहिती आहे का?
बाबरी मशीद खटला: लालकृष्ण अडवाणींसह सर्व आरोपींनी हजर राहावे; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
वैभववाडीत प्रशिक्षण खर्च संशयाच्या भोवऱ्यात 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रूपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणापासून ते पेन खरेदीपर्यंत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. या सर्व प्रकारात पीपीई खरेदीत स्वत:चा हंडा भरून घेतलेल्या "त्या' अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा आहे. 
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत तालुक्‍यातील पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे 15 व 16 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले होते. ग्रामपंचायत आराखड्यासंदर्भात हे दोन दिवशीय प्रशिक्षण होते. 

या प्रशिक्षण कार्यक्रमावर पंचायत समिती स्तरावरून 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च झाला आहे. यामध्ये जेवण व नाष्ट्यावर तब्बल 41 हजार 520 रूपये, प्रोजेक्‍टर, बॅनर आणि इतर 16 हजार रूपये, साऊंड सिस्टीमवर 9 हजार रूपये, चहा व पाणी 9 हजार 675 रूपये, स्टेशनरी साहित्य 39 हजार 220 रूपये आणि मार्गदर्शक तज्ञांना मानधन म्हणून 14 हजार रूपये, असे एकुण 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च दाखविला आहे. या दोन दिवशीय प्रशिक्षणाला 130 प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे दाखविले आहे.

प्रशिक्षणासाठी एका शेतकरी गटाला दोन दिवसांचे जेवण, नाष्टा आणि चहाचे काम 20 हजार रूपयाला देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याच्या नावे 41 हजार 520 रूपयांचा धनादेश देवून त्यांच्याकडून इतर खर्च देखील याच रक्कमेतून करावयाचा असल्याचे सांगुन त्यांच्याकडून 21 हजार रूपये एका अधिकाऱ्याने परत घेतले. एक दिवस शाकाहरी आणि एक दिवस चिकन जेवण त्या गटाने दिले. प्रत्यक्षात बिल मात्र स्पेशल सुरमई जेवणाचे काढले आहे. एक थाळीचा दर 250 रूपये दाखविण्यात आला आहे. चहा त्याच गटाने पुरविला असताना स्वतंत्र चहावर 4 हजार 875 रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. याशिवाय पाण्यावर देखील अवास्तव खर्च दाखविण्यात आला आहे. 

पंचायत समितीच्या मालकीची साऊंड सिस्टीम आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाला हीच साऊंड सिस्टीम वापरण्यात आली; परंतु साऊंड सिस्टीमचे भाडे म्हणून 9 हजार रूपये खर्च झाला आहे. स्टेशनरीवर केलेला खर्चही अवाजवी आहे. प्रशिक्षणार्थीना एक दोन रूपयाचे पेन आणि चार पाच रूपयाचे पॅड दिले होते; परंतु दिलेला पेन 30 रूपये किंमतीचा आणि पॅड 30 रूपये किंमतीचे आहे.

शासन निर्णयाची झेरॉक्‍स काढून तयार केलेल्या पुस्तकाची किंमत 180 रूपये आहे. स्टेशनरीवर तब्बल 39 हजार 220 रूपये खर्च झाला आहे. या प्रशिक्षणात दिलेल्या स्टेशनरी साहित्य, चहा, जेवण, नाष्टा यासंदर्भात अनेक सरपंच आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी प्रशिक्षणाला सुरमई जेवण कधीच दिले नसल्याचे सांगितले. पंचायत समितीचे पदाधिकारी देखील या खर्चाबद्दल अनभिज्ञ आहेत. 

वैभववाडी पंचायत समितीचा कार्यभार आताच स्वीकारला आहे. सध्या एका कामासाठी दुसरीकडे आहे; परंतु आल्यानंतर या खर्चासंदर्भात माहिती घेईन आणि योग्य तो निर्णय घेईन. 
- विद्या गमरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वैभववाडी 

प्रशिक्षणावर नेमका किती आणि कसा खर्च झाला, याची माहिती घेवून त्याची खातरजमा केली जाईल. जर चुकीच्या पद्धतीने खर्च झाला असेल तर त्यासंदर्भात नक्कीच ती बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून देण्यात येईल. 
- अक्षता डाफळे, सभापती, पंचायत समिती वैभववाडी 

सरपंच आणि ग्रामसेवक प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला खर्चात घोळ असेल तर त्याबाबतीत शहानिशा करून मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. 
- लक्ष्मण रावराणे, माजी सभापती, पंचायत समिती सदस्य

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वैभववाडीत प्रशिक्षण खर्च संशयाच्या भोवऱ्यात  वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रूपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणापासून ते पेन खरेदीपर्यंत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. या सर्व प्रकारात पीपीई खरेदीत स्वत:चा हंडा भरून घेतलेल्या "त्या' अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा आहे.  राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत तालुक्‍यातील पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे 15 व 16 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले होते. ग्रामपंचायत आराखड्यासंदर्भात हे दोन दिवशीय प्रशिक्षण होते.  या प्रशिक्षण कार्यक्रमावर पंचायत समिती स्तरावरून 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च झाला आहे. यामध्ये जेवण व नाष्ट्यावर तब्बल 41 हजार 520 रूपये, प्रोजेक्‍टर, बॅनर आणि इतर 16 हजार रूपये, साऊंड सिस्टीमवर 9 हजार रूपये, चहा व पाणी 9 हजार 675 रूपये, स्टेशनरी साहित्य 39 हजार 220 रूपये आणि मार्गदर्शक तज्ञांना मानधन म्हणून 14 हजार रूपये, असे एकुण 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च दाखविला आहे. या दोन दिवशीय प्रशिक्षणाला 130 प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे दाखविले आहे. प्रशिक्षणासाठी एका शेतकरी गटाला दोन दिवसांचे जेवण, नाष्टा आणि चहाचे काम 20 हजार रूपयाला देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याच्या नावे 41 हजार 520 रूपयांचा धनादेश देवून त्यांच्याकडून इतर खर्च देखील याच रक्कमेतून करावयाचा असल्याचे सांगुन त्यांच्याकडून 21 हजार रूपये एका अधिकाऱ्याने परत घेतले. एक दिवस शाकाहरी आणि एक दिवस चिकन जेवण त्या गटाने दिले. प्रत्यक्षात बिल मात्र स्पेशल सुरमई जेवणाचे काढले आहे. एक थाळीचा दर 250 रूपये दाखविण्यात आला आहे. चहा त्याच गटाने पुरविला असताना स्वतंत्र चहावर 4 हजार 875 रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. याशिवाय पाण्यावर देखील अवास्तव खर्च दाखविण्यात आला आहे.  पंचायत समितीच्या मालकीची साऊंड सिस्टीम आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाला हीच साऊंड सिस्टीम वापरण्यात आली; परंतु साऊंड सिस्टीमचे भाडे म्हणून 9 हजार रूपये खर्च झाला आहे. स्टेशनरीवर केलेला खर्चही अवाजवी आहे. प्रशिक्षणार्थीना एक दोन रूपयाचे पेन आणि चार पाच रूपयाचे पॅड दिले होते; परंतु दिलेला पेन 30 रूपये किंमतीचा आणि पॅड 30 रूपये किंमतीचे आहे. शासन निर्णयाची झेरॉक्‍स काढून तयार केलेल्या पुस्तकाची किंमत 180 रूपये आहे. स्टेशनरीवर तब्बल 39 हजार 220 रूपये खर्च झाला आहे. या प्रशिक्षणात दिलेल्या स्टेशनरी साहित्य, चहा, जेवण, नाष्टा यासंदर्भात अनेक सरपंच आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी प्रशिक्षणाला सुरमई जेवण कधीच दिले नसल्याचे सांगितले. पंचायत समितीचे पदाधिकारी देखील या खर्चाबद्दल अनभिज्ञ आहेत.  वैभववाडी पंचायत समितीचा कार्यभार आताच स्वीकारला आहे. सध्या एका कामासाठी दुसरीकडे आहे; परंतु आल्यानंतर या खर्चासंदर्भात माहिती घेईन आणि योग्य तो निर्णय घेईन.  - विद्या गमरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वैभववाडी  प्रशिक्षणावर नेमका किती आणि कसा खर्च झाला, याची माहिती घेवून त्याची खातरजमा केली जाईल. जर चुकीच्या पद्धतीने खर्च झाला असेल तर त्यासंदर्भात नक्कीच ती बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून देण्यात येईल.  - अक्षता डाफळे, सभापती, पंचायत समिती वैभववाडी  सरपंच आणि ग्रामसेवक प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला खर्चात घोळ असेल तर त्याबाबतीत शहानिशा करून मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.  - लक्ष्मण रावराणे, माजी सभापती, पंचायत समिती सदस्य संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n24mGt
Read More
बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी हाती

कुडाळ (सिंधुदुर्ग) - पावशी धरणात काल (ता.28) सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या अभिषेक दळवी (वय 21) या युवकाचा मृतदेह आज दुपारी सापडला. काल रात्री साडेआठपर्यंत शोध घेऊनही त्याचा शोध लागला नव्हता. आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळाले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंच बाळा कोरगावकर यांनी व्यक्त केली. 

पावशी धरणवाडी येथील अभिषेक हा युवक मित्रांसमवेत काल (ता.28) सायंकाळी पावशी धरणवाडी येथील धरणात पोहण्यास गेला होता. तलाव पावसाने पूर्ण भरलेला असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याची पातळी खोलवर होती. अलीकडेच हा युवक कधीतरी पोहण्यासाठी जात असे.

काल सायंकाळी तो बुडाल्याचे समजताच पावशी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन त्याचा शोध घेतला. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सरपंच बाळा कोरगावकर, माजी सभपती राजन जाधव, पप्या तवटे, उपसरपंच दीपक आगणे यांनी भेट दिली. येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 8.30 पर्यंत शोध मोहीम सुरू होती. काळोख झाल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली. आज मालवण येथील स्कुबा डायव्हिंग दाखल झाले होते. त्यांनी होडीतून शोध मोहीम सुरू केली असता त्याचा मृतदेह आढळला. 

आपत्कालीन यंत्रणेबाबत संताप 
ज्यावेळी काल सायंकाळी शोधमोहीम सुरू असताना आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली; मात्र या मागणीला सहकार्य मिळाले नाही. याबाबत सरपंच बाळा कोरगावकर यांनी संताप व्यक्त केला. अभिषेकची घरची परिस्थिती हलाखीची असून एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्‍चात आई आहे. त्याच्या जाण्याने दळवी कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी हाती कुडाळ (सिंधुदुर्ग) - पावशी धरणात काल (ता.28) सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या अभिषेक दळवी (वय 21) या युवकाचा मृतदेह आज दुपारी सापडला. काल रात्री साडेआठपर्यंत शोध घेऊनही त्याचा शोध लागला नव्हता. आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळाले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंच बाळा कोरगावकर यांनी व्यक्त केली.  पावशी धरणवाडी येथील अभिषेक हा युवक मित्रांसमवेत काल (ता.28) सायंकाळी पावशी धरणवाडी येथील धरणात पोहण्यास गेला होता. तलाव पावसाने पूर्ण भरलेला असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याची पातळी खोलवर होती. अलीकडेच हा युवक कधीतरी पोहण्यासाठी जात असे. काल सायंकाळी तो बुडाल्याचे समजताच पावशी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन त्याचा शोध घेतला. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सरपंच बाळा कोरगावकर, माजी सभपती राजन जाधव, पप्या तवटे, उपसरपंच दीपक आगणे यांनी भेट दिली. येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 8.30 पर्यंत शोध मोहीम सुरू होती. काळोख झाल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली. आज मालवण येथील स्कुबा डायव्हिंग दाखल झाले होते. त्यांनी होडीतून शोध मोहीम सुरू केली असता त्याचा मृतदेह आढळला.  आपत्कालीन यंत्रणेबाबत संताप  ज्यावेळी काल सायंकाळी शोधमोहीम सुरू असताना आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली; मात्र या मागणीला सहकार्य मिळाले नाही. याबाबत सरपंच बाळा कोरगावकर यांनी संताप व्यक्त केला. अभिषेकची घरची परिस्थिती हलाखीची असून एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्‍चात आई आहे. त्याच्या जाण्याने दळवी कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3487nfP
Read More
या १० कामांना जाणार असाल तर आधार कार्ड नेण्यास चुकूनही विसरू नका; अन्यथा सेवांचे दरवाजे होणार बंद

नागपूर : सामन्यांचा अधिकार असे संबोधल्या जाणाऱ्या 'आधार कार्ड' ला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. विमानाच्या तिकिटापासून ते रेशनच्या धान्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड दाखवल्याशिवाय काम होत नाही. अगदी नवजात बालकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे आधार कार्ड असणे अनिवार्य झाले आहे.

आधार कार्ड म्हणजे आपण भारतीय असण्याचा पुरावा आहे. आता प्रत्येक कामात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. एखाद्या कामानिमित्त गेलात आणि तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला परत पाठवण्यात येते या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. पण आता अजिबात चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशी १० ठिकाणे सांगणार आहोत जिथे आधार कार्ड सक्तीचे आहे.       

स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवायचे आहे, तर जाणून घ्या महत्वाच्या बाबी

या ठिकाणी जाताना सोबत ठेवा आधार कार्ड 

बँकेत नवीन खाते सुरू करण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य.

५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँकिंग व्यवहारासाठी आधार नंबर अनिवार्य

म्युच्युअल फंडच्या अकाउंटसाठीही आधार अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी सरकारने मुदत दिली आहे. जर आधार नंबर दिला नाही तर संबंधित खाते निष्क्रिय होईल.

मोबाइल नंबरसाठी ई - केवायसी : दूरसंचार मंत्रालयाने सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की, ग्राहकांच्या आधार कार्डच्या साहाय्याने ई व्हेरिफिकेशन करावे.

कोणताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याचा आधार नंबर ईपीएफशी जोडलेला असेल.

सरकारी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आधार नंबर बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य आहे.

जर आपल्याला प्राप्तिकर रिटर्न दाखल करायचा असेल वा बँक खाते सुरू करायचे आहे, तर तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार आहे. अनेक सामाजिक आणि सरकारी उपक्रमांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अन्य काही योजनांसाठीही लवकरच आधार बंधनकारक होणार आहे.

आपल्याकडे आधार कार्ड असल्यास प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार कार्ड आपल्या पॅन  कार्डशी लिंक करावे लागेल. आधारमुळे प्राप्तिकरचे ई-व्हेरिफिकेशन सोपे होईल.

पालकांनो सावधान! मुलांवर कधीही हात उगारू नका; नाही तर भोगावे लागतील भयंकर परिणाम

वैयक्तिक दस्तऐवज संग्रहित (डिजिटल लॉकर) करण्यासाठी सरकारने आॅनलाइन लॉकर प्रणाली सुरू केली आहे. डिजीलॉकर सुरू करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य.

गॅस सबसिडीचा थेट हस्तांतरणाचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार नंबर आवश्यक केलेला आहे.

ईपीएफप्रमाणेच पेन्शन प्राप्त करण्यासाठीही आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. फसवणूक होऊ नये, यासाठी हे केले आहे.

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

या १० कामांना जाणार असाल तर आधार कार्ड नेण्यास चुकूनही विसरू नका; अन्यथा सेवांचे दरवाजे होणार बंद नागपूर : सामन्यांचा अधिकार असे संबोधल्या जाणाऱ्या 'आधार कार्ड' ला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. विमानाच्या तिकिटापासून ते रेशनच्या धान्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड दाखवल्याशिवाय काम होत नाही. अगदी नवजात बालकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे आधार कार्ड असणे अनिवार्य झाले आहे. आधार कार्ड म्हणजे आपण भारतीय असण्याचा पुरावा आहे. आता प्रत्येक कामात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. एखाद्या कामानिमित्त गेलात आणि तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला परत पाठवण्यात येते या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. पण आता अजिबात चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशी १० ठिकाणे सांगणार आहोत जिथे आधार कार्ड सक्तीचे आहे.        स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवायचे आहे, तर जाणून घ्या महत्वाच्या बाबी या ठिकाणी जाताना सोबत ठेवा आधार कार्ड  बँकेत नवीन खाते सुरू करण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य. ५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँकिंग व्यवहारासाठी आधार नंबर अनिवार्य म्युच्युअल फंडच्या अकाउंटसाठीही आधार अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी सरकारने मुदत दिली आहे. जर आधार नंबर दिला नाही तर संबंधित खाते निष्क्रिय होईल. मोबाइल नंबरसाठी ई - केवायसी : दूरसंचार मंत्रालयाने सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की, ग्राहकांच्या आधार कार्डच्या साहाय्याने ई व्हेरिफिकेशन करावे. कोणताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याचा आधार नंबर ईपीएफशी जोडलेला असेल. सरकारी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आधार नंबर बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य आहे. जर आपल्याला प्राप्तिकर रिटर्न दाखल करायचा असेल वा बँक खाते सुरू करायचे आहे, तर तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार आहे. अनेक सामाजिक आणि सरकारी उपक्रमांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अन्य काही योजनांसाठीही लवकरच आधार बंधनकारक होणार आहे. आपल्याकडे आधार कार्ड असल्यास प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार कार्ड आपल्या पॅन  कार्डशी लिंक करावे लागेल. आधारमुळे प्राप्तिकरचे ई-व्हेरिफिकेशन सोपे होईल. पालकांनो सावधान! मुलांवर कधीही हात उगारू नका; नाही तर भोगावे लागतील भयंकर परिणाम वैयक्तिक दस्तऐवज संग्रहित (डिजिटल लॉकर) करण्यासाठी सरकारने आॅनलाइन लॉकर प्रणाली सुरू केली आहे. डिजीलॉकर सुरू करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य. गॅस सबसिडीचा थेट हस्तांतरणाचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार नंबर आवश्यक केलेला आहे. ईपीएफप्रमाणेच पेन्शन प्राप्त करण्यासाठीही आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. फसवणूक होऊ नये, यासाठी हे केले आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3n4KNNJ
Read More
सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबतीने काम करणार ‘गार्बेज पिकिंग मशीन’

नागपूर  : स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांना धुळीमुळे अनेक रोगांची लागण होताना दिसून येते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कामात सुलभता आणण्यासाठी तीन अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले ‘गार्बेज पिकिंग मशीन’तयार केले आहे. हे मशीन केवळ रस्त्यावरील धूळच स्वच्छ करीत नाही, तर रस्त्यावर पडलेली पाने, प्लॅस्टिक आणि बटल्याही अगदी आरामात उचलू शकते. त्यामुळे आता नागरिकांना रस्त्यावरील धुळीचा त्रास होणार नाही.

महापालिकेतील सफाई कामगार दररोज रस्ता स्वछ करण्याची कामे करीत असतात. यात झाडूचा वापर होत असल्याने त्यातून उडणारी धूळ कर्मचाऱ्यांच्या नाकातोंडात जाते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दमा, जॉइंट पेन आणि इतर आजार होतात. यामुळे पुढे कामाची क्षमता कमी होत असते. तसेच मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते. याचा त्रास नागरिकांनाही होतो. 

या सगळ्याचा अभ्यास करीत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील निहाल वरगंटीवार, महेश शेंडे आणि नितीन परशुरामकर या तिघांनी इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता गार्बेज पिकिंग मशीन तयार केले. या मशीनच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे धूळ न उडविता ती स्वच्छ करण्यात येते. 

सविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व
 

केवळ धूळ नाही, तर काचेच्या बटल्या, झाडांची पाने आणि इतर जड कचरा उचलण्यात मदत होते. हे मशीन कर्मचाऱ्यांना वापरण्यास दिल्यास त्यांची कामाची क्षमता वाढविण्यास बरीच मदत होईल. बाजारात ‘ट्रक माउंटेड’ अनेक मशीन उपलब्ध आहेत. मात्र, त्यांची किंमत २० ते ३० लाखांच्या घरात आहे. या मशीनच्या माध्यमातून प्लॅस्टिक आणि काचेच्या बाटल्या उचलल्या जात नाही. मात्र, त्या तुलनेत हे मशीन अधिक प्रभावी असून, केवळ ४० हजारात उपलब्ध होईल, असे निहाल वरगंटीवार याने सांगितले.
 

तीन ट्रायल यशस्वी

निहाल वरगंटीवार याच्यासह तिघांनी तयार केलेल्या उत्पादनाचे तीनदा यशस्वी ट्रायल घेण्यात आले आहे. लवकरच याबाबत विद्यार्थी महापालिकेशी बोलणार असल्याचे निहाल याने सांगितले. 

संपादन  : अतुल मांगे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबतीने काम करणार ‘गार्बेज पिकिंग मशीन’ नागपूर  : स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांना धुळीमुळे अनेक रोगांची लागण होताना दिसून येते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कामात सुलभता आणण्यासाठी तीन अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले ‘गार्बेज पिकिंग मशीन’तयार केले आहे. हे मशीन केवळ रस्त्यावरील धूळच स्वच्छ करीत नाही, तर रस्त्यावर पडलेली पाने, प्लॅस्टिक आणि बटल्याही अगदी आरामात उचलू शकते. त्यामुळे आता नागरिकांना रस्त्यावरील धुळीचा त्रास होणार नाही. महापालिकेतील सफाई कामगार दररोज रस्ता स्वछ करण्याची कामे करीत असतात. यात झाडूचा वापर होत असल्याने त्यातून उडणारी धूळ कर्मचाऱ्यांच्या नाकातोंडात जाते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दमा, जॉइंट पेन आणि इतर आजार होतात. यामुळे पुढे कामाची क्षमता कमी होत असते. तसेच मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते. याचा त्रास नागरिकांनाही होतो.  या सगळ्याचा अभ्यास करीत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील निहाल वरगंटीवार, महेश शेंडे आणि नितीन परशुरामकर या तिघांनी इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता गार्बेज पिकिंग मशीन तयार केले. या मशीनच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे धूळ न उडविता ती स्वच्छ करण्यात येते.  सविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व   केवळ धूळ नाही, तर काचेच्या बटल्या, झाडांची पाने आणि इतर जड कचरा उचलण्यात मदत होते. हे मशीन कर्मचाऱ्यांना वापरण्यास दिल्यास त्यांची कामाची क्षमता वाढविण्यास बरीच मदत होईल. बाजारात ‘ट्रक माउंटेड’ अनेक मशीन उपलब्ध आहेत. मात्र, त्यांची किंमत २० ते ३० लाखांच्या घरात आहे. या मशीनच्या माध्यमातून प्लॅस्टिक आणि काचेच्या बाटल्या उचलल्या जात नाही. मात्र, त्या तुलनेत हे मशीन अधिक प्रभावी असून, केवळ ४० हजारात उपलब्ध होईल, असे निहाल वरगंटीवार याने सांगितले.   तीन ट्रायल यशस्वी निहाल वरगंटीवार याच्यासह तिघांनी तयार केलेल्या उत्पादनाचे तीनदा यशस्वी ट्रायल घेण्यात आले आहे. लवकरच याबाबत विद्यार्थी महापालिकेशी बोलणार असल्याचे निहाल याने सांगितले.  संपादन  : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cHk0T3
Read More
चाचणी किटच्या तुटवड्याने बाधितांच्या संख्येत घट

नागपूर :  सध्या तरी कोरोनावर तत्काळ उपचार हाच उपाय आहे. मात्र, चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने चाचण्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत कमी झाले आहे. परिणामी चाचणीलाच मर्यादा आल्याने कोरोनाचे निदान व त्यानंतर उपचार कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चाचणी केंद्रावरून परत जावे लागत असल्याने नागरिकांत नैराश्य दिसून येत आहे. लक्षणे असलेल्यांंनाही परत जावे लागत असल्याने कुटुंबीयांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्या काही दिवसांत चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने बाधितांची संख्याही कमी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा फिरण्याचा हुरूप येण्याची शक्यता आहे. मात्र, बाधितांची कमी दिसून येत असलेली संख्या फार्स असल्याचे चाचण्याच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांत चाचण्याच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीतून अधोरेखित झाले.

शुक्रवारी ५५९५, रविवारी ४३५५ तर काल, सोमवारी २७०१ चाचण्या झाल्या. या चाचण्या कमी झाल्याने बाधितांच्या संख्येतही घट झाली. आरटीपीसीआर तसेच ॲऩ्टिजिन, या दोन्ही चाचण्यांच्या संख्येत घट झाल्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे. चाचण्यासाठी आवश्यक किटचा तुटवडा निर्माण झाल्याचे सुत्राने नमुद केले. शहरात महापालिकेचे ५१ कोव्हीड चाचणी केंद्र आहेत. प्रत्येक प्रभागात एक चाचणी केंद्र असून सिव्हिल लाईन मनपा मुख्यालयाताही केंद्र आहे.

या केंद्रावर डॉक्टरांकडून आरटीपीसीआर तसेच ॲन्टीजिन टेस्टसाठी नागरिकांचे नमुणे घेतले जाते. आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुणे घेण्यासाठी आवश्यक किटच्या साठ्यालाच ओहोटी लागल्याचे चित्र आहे. शहरात एका दिवसांत आठ ते दहा हजारांपर्यंत नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. परंतु आता किटचाच तुटवडा निर्माण झाला असून नव्या किट येईस्तोवर चाचण्यांच्या संख्येत घट दिसून येणार असल्याचे सुत्राने नमुद केले.

खाण्यासाठी मरमर, खवय्यांना ना चिंता, ना भिती !

त्यामुळे लक्षणे असलेल्या नागरिकांना चाचणीसाठी प्राधान्य देण्यात येत असले तरी अनेकांना चाचणी केंद्रावरून परत जावे लागत असल्याने त्यांच्यात कोरोनासंबंधी भीती वाढत आहेत. नागरिकांवर तत्काळ उपचारासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱी महापालिकाही पेचात पडली आहे.
 
चार दिवसांतील चाचण्या व बाधित

दिनांक             चाचण्या          आढळून आलेले बाधित
२५ सप्टेंबर         ५५९५                 ९७१
२६ सप्टेंबर         ५०२६                 १२०५
२७ सप्टेंबर         ४३५५                  ५९०
२८ सप्टेंबर         २७०१                   ८६२

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चाचणी किटच्या तुटवड्याने बाधितांच्या संख्येत घट नागपूर :  सध्या तरी कोरोनावर तत्काळ उपचार हाच उपाय आहे. मात्र, चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने चाचण्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत कमी झाले आहे. परिणामी चाचणीलाच मर्यादा आल्याने कोरोनाचे निदान व त्यानंतर उपचार कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चाचणी केंद्रावरून परत जावे लागत असल्याने नागरिकांत नैराश्य दिसून येत आहे. लक्षणे असलेल्यांंनाही परत जावे लागत असल्याने कुटुंबीयांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  गेल्या काही दिवसांत चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने बाधितांची संख्याही कमी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा फिरण्याचा हुरूप येण्याची शक्यता आहे. मात्र, बाधितांची कमी दिसून येत असलेली संख्या फार्स असल्याचे चाचण्याच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांत चाचण्याच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीतून अधोरेखित झाले. शुक्रवारी ५५९५, रविवारी ४३५५ तर काल, सोमवारी २७०१ चाचण्या झाल्या. या चाचण्या कमी झाल्याने बाधितांच्या संख्येतही घट झाली. आरटीपीसीआर तसेच ॲऩ्टिजिन, या दोन्ही चाचण्यांच्या संख्येत घट झाल्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे. चाचण्यासाठी आवश्यक किटचा तुटवडा निर्माण झाल्याचे सुत्राने नमुद केले. शहरात महापालिकेचे ५१ कोव्हीड चाचणी केंद्र आहेत. प्रत्येक प्रभागात एक चाचणी केंद्र असून सिव्हिल लाईन मनपा मुख्यालयाताही केंद्र आहे. या केंद्रावर डॉक्टरांकडून आरटीपीसीआर तसेच ॲन्टीजिन टेस्टसाठी नागरिकांचे नमुणे घेतले जाते. आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुणे घेण्यासाठी आवश्यक किटच्या साठ्यालाच ओहोटी लागल्याचे चित्र आहे. शहरात एका दिवसांत आठ ते दहा हजारांपर्यंत नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. परंतु आता किटचाच तुटवडा निर्माण झाला असून नव्या किट येईस्तोवर चाचण्यांच्या संख्येत घट दिसून येणार असल्याचे सुत्राने नमुद केले. खाण्यासाठी मरमर, खवय्यांना ना चिंता, ना भिती ! त्यामुळे लक्षणे असलेल्या नागरिकांना चाचणीसाठी प्राधान्य देण्यात येत असले तरी अनेकांना चाचणी केंद्रावरून परत जावे लागत असल्याने त्यांच्यात कोरोनासंबंधी भीती वाढत आहेत. नागरिकांवर तत्काळ उपचारासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱी महापालिकाही पेचात पडली आहे.   चार दिवसांतील चाचण्या व बाधित दिनांक             चाचण्या          आढळून आलेले बाधित २५ सप्टेंबर         ५५९५                 ९७१ २६ सप्टेंबर         ५०२६                 १२०५ २७ सप्टेंबर         ४३५५                  ५९० २८ सप्टेंबर         २७०१                   ८६२ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ifUm91
Read More
Corona Update : औरंगाबादेत नवे २३७ कोरोनारुग्ण, उपचारानंतर बरे झाले २६५ जण

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता.२९) नवे २३७ कोरोनाबाधित आढळले.
अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७१, ग्रामीण भागात ६२ रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या २६५ जणांना सुटी देण्यात आली.
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३३ हजार ४११ झाली असून सध्या ५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.२६ हजार ६२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९३० जणांचा मृत्यू झाला आहे. सोयगाव तालुक्यातील ठाणा येथील ३७ वर्षीय पुरुष, पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथील ८५ वर्षीय महिला, शहरातील एन-एकमधील ६७ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबादेतही ड्रग्जचा काळाबाजार ! 

ग्रामीण भागातील बाधित
परिसर, कंसात रुग्णसंख्या) ः औरंगाबाद (१९), फुलंब्री (२), गंगापूर (९), कन्नड (६), खुलताबाद (४), वैजापूर (७), पैठण (११), सोयगाव (४) अडगाव (१), इंदापूर (१), करमाड (१), मांडकी (१), सिडको वाळूज महानगर (१), छत्रपतीनगर, वाळूज (१), आंबेडकरनगर, बजाजनगर (१), अनंतपूर, कन्नड (१), सरस्वती कॉलनी, कन्नड (१), पवार गल्ली, कन्नड (१), करंजखेडा, कन्नड (२), समर्थनगर, कन्नड (१), कन्नड पोलिस स्टेशन परिसर (१), नवजीवन कॉलनी, कन्नड (१), समर्थनगर, कन्नड (१), शेकटा (१), अनंतपूर वडवळी (२), पाटेगाव, पैठण (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१), मयूर पार्क, गंगापूर (१), माऊलीनगर, गंगापूर (१), लासूर (२), सारोळा (१), मोहडा (१), शिवाजी रोड, वैजापूर (२), जाधव गल्ली, वैजापूर (१), डव्हाळा, वैजापूर (१), शंकरनगर, वैजापूर (१), परदेशी गल्ली (१).

शहरातील बाधित
सैनिक कॉलनी (१), घाटी परिसर (१), एमजीएम हॉस्पिटल परिसर (१), पानदरिबा रोड (१), कासलीवाल सो. (१), सुंदरवाडी (१), ज्योतीनगर (१), भवानीनगर (१), देवळाई परिसर, म्हाडा कॉलनी (१), बन्सीलाल नगर (२), बनकरवाडी (३), सिंहगड कॉलनी (२), प्राइड फिनिक्स (१), सुराणानगर (१), गणेश वसाहत (१), बकवालनगर (१), जुना बाजार (१), भीमनगर, भावसिंगपुरा (१), नंदनवन कॉलनी (३), बीड बायपास (३), दर्गा चौक (१), मिलिनियम पार्क (१), एन-चार सिडको (६), संभाजी कॉलनी (१), सत्त्वक सोसायटी, गुलमोहर कॉलनी (२), पवननगर (१), हर्सूल (१), औताडे गल्ली (१), पदमपुरा (३), हनुमाननगर (१), मयूरबन कॉलनी (१), गजानननगर (१), अकरावी योजना, शिवाजीनगर (१), रेणुकानगर (१), पैठण रोड (१), मिलिटरी हॉस्पिटल (१), हिमायत बाग (१), म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर (२), बालाजीनगर (१), सनी हाऊस (२), स्नेहनगर (१), किराडपुरा (१), काजीवाडा (१), नक्षत्रवाडी (१), न्यू नंदनवन कॉलनी (१), ठाकरेनगर (१), खत्री कॉलनी (१), मिटमिटा (१), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (१), देवानगरी (१), बालाजीनगर (१), अन्य (२).

 

Edited - Ganesh Pitekar

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Update : औरंगाबादेत नवे २३७ कोरोनारुग्ण, उपचारानंतर बरे झाले २६५ जण औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता.२९) नवे २३७ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७१, ग्रामीण भागात ६२ रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या २६५ जणांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३३ हजार ४११ झाली असून सध्या ५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.२६ हजार ६२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९३० जणांचा मृत्यू झाला आहे. सोयगाव तालुक्यातील ठाणा येथील ३७ वर्षीय पुरुष, पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथील ८५ वर्षीय महिला, शहरातील एन-एकमधील ६७ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबादेतही ड्रग्जचा काळाबाजार !  ग्रामीण भागातील बाधित परिसर, कंसात रुग्णसंख्या) ः औरंगाबाद (१९), फुलंब्री (२), गंगापूर (९), कन्नड (६), खुलताबाद (४), वैजापूर (७), पैठण (११), सोयगाव (४) अडगाव (१), इंदापूर (१), करमाड (१), मांडकी (१), सिडको वाळूज महानगर (१), छत्रपतीनगर, वाळूज (१), आंबेडकरनगर, बजाजनगर (१), अनंतपूर, कन्नड (१), सरस्वती कॉलनी, कन्नड (१), पवार गल्ली, कन्नड (१), करंजखेडा, कन्नड (२), समर्थनगर, कन्नड (१), कन्नड पोलिस स्टेशन परिसर (१), नवजीवन कॉलनी, कन्नड (१), समर्थनगर, कन्नड (१), शेकटा (१), अनंतपूर वडवळी (२), पाटेगाव, पैठण (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१), मयूर पार्क, गंगापूर (१), माऊलीनगर, गंगापूर (१), लासूर (२), सारोळा (१), मोहडा (१), शिवाजी रोड, वैजापूर (२), जाधव गल्ली, वैजापूर (१), डव्हाळा, वैजापूर (१), शंकरनगर, वैजापूर (१), परदेशी गल्ली (१). शहरातील बाधित सैनिक कॉलनी (१), घाटी परिसर (१), एमजीएम हॉस्पिटल परिसर (१), पानदरिबा रोड (१), कासलीवाल सो. (१), सुंदरवाडी (१), ज्योतीनगर (१), भवानीनगर (१), देवळाई परिसर, म्हाडा कॉलनी (१), बन्सीलाल नगर (२), बनकरवाडी (३), सिंहगड कॉलनी (२), प्राइड फिनिक्स (१), सुराणानगर (१), गणेश वसाहत (१), बकवालनगर (१), जुना बाजार (१), भीमनगर, भावसिंगपुरा (१), नंदनवन कॉलनी (३), बीड बायपास (३), दर्गा चौक (१), मिलिनियम पार्क (१), एन-चार सिडको (६), संभाजी कॉलनी (१), सत्त्वक सोसायटी, गुलमोहर कॉलनी (२), पवननगर (१), हर्सूल (१), औताडे गल्ली (१), पदमपुरा (३), हनुमाननगर (१), मयूरबन कॉलनी (१), गजानननगर (१), अकरावी योजना, शिवाजीनगर (१), रेणुकानगर (१), पैठण रोड (१), मिलिटरी हॉस्पिटल (१), हिमायत बाग (१), म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर (२), बालाजीनगर (१), सनी हाऊस (२), स्नेहनगर (१), किराडपुरा (१), काजीवाडा (१), नक्षत्रवाडी (१), न्यू नंदनवन कॉलनी (१), ठाकरेनगर (१), खत्री कॉलनी (१), मिटमिटा (१), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (१), देवानगरी (१), बालाजीनगर (१), अन्य (२).   Edited - Ganesh Pitekar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GlNKJb
Read More
कृषी विधेयकाच्या विरोधात 'एक गाव, एक ठराव' करा : गणेश देवी

मार्केट यार्ड - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी, पणन आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने "एक गाव, एक ठराव' करावा. तसेच, राज्यातील एक लाख ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांनी केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारचे विधेयक शेतकरी आणि कामगारविरोधी आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यभरात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. ही यात्रा मंगळवारी पुण्यात आली. त्यावेळी देवी यांनी पुणे बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, कामगार, अडते यांच्याबरोबर संवाद साधला. राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सुभाष वारे, कामगार युनियनचे संतोष नांगरे आदी उपस्थित होते.

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

देवी म्हणाले, 'केंद्र सरकारने कृषी, पणन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा अपप्रचार केला आहे. प्रत्यक्षात हे विधेयक शेतकरी, कामगारविरोधी आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी राज्यात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने या विधेयकाच्या विरोधात ठराव करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. या ठरावांमुळे केंद्र सरकारला विधेयकात बदल करावा लागणार आहे.''

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कृषी विधेयकाच्या विरोधात 'एक गाव, एक ठराव' करा : गणेश देवी मार्केट यार्ड - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी, पणन आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने "एक गाव, एक ठराव' करावा. तसेच, राज्यातील एक लाख ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांनी केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्र सरकारचे विधेयक शेतकरी आणि कामगारविरोधी आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यभरात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. ही यात्रा मंगळवारी पुण्यात आली. त्यावेळी देवी यांनी पुणे बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, कामगार, अडते यांच्याबरोबर संवाद साधला. राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सुभाष वारे, कामगार युनियनचे संतोष नांगरे आदी उपस्थित होते. राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ देवी म्हणाले, 'केंद्र सरकारने कृषी, पणन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा अपप्रचार केला आहे. प्रत्यक्षात हे विधेयक शेतकरी, कामगारविरोधी आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी राज्यात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने या विधेयकाच्या विरोधात ठराव करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. या ठरावांमुळे केंद्र सरकारला विधेयकात बदल करावा लागणार आहे.'' Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36eQjHP
Read More
पिंपरी-चिंचवडकरांनो कोरोनाचा संसर्ग घटतोय, फक्त स्वयंसेवकांना खरी माहिती द्या

पिंपरी : कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसांपासून घटले आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण स्थिर असून त्यात अन्य आजार असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी व नातेवाइकांनी घरी आलेल्या स्वयंसेवकांनी खरी माहिती सांगून वेळीच उपचार करून घेण्याची आवश्‍यकता आहे, या बाबत स्वयंसेवकांमार्फत जनजागृती केली जात आहे. 

पिंपरी-चिंचवडकरांनो सावध राहा; कुत्र्यांचे हल्ले वाढले, पाच महिन्यांत दोन हजार 430 जणांना चावा

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात 17 हजार 615 जणांना आणि दुसऱ्या पंधरवड्यात मंगळवारपर्यंत (ता. 29) आठ हजार 379 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. जवळपास निम्म्याने रुग्णसंख्या घटली आहे. विशेषतः 15 सप्टेंबरपासून शहरात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबवली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत 11 लाख 25 हजार नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. "लवकर रुग्ण शोधून लवकर उपचार करणे' हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, काही नागरिक चुकीची माहिती देत आहेत. संसर्ग झाल्याचे किंवा त्याची लक्षणे असल्याचे लपवून ठेवत आहेत का? या दृष्टिने कसून चौकशी केली जात आहे. रुग्णसंख्या कमी आढळत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र स्थिर आहे. त्याचा दर 1.6 ते 1.7 च्या दरम्यान स्थिर राहिला आहे. तो कमी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून तपासणी करून घेणे व काहीही माहिती न लपवणे, उपयुक्त ठरणार आहे. 

कुत्र्याने केला घात, दुचाकीस्वार तरुणाचा गेला नाहक बळी

"जुलै व ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांत मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदींबाबत जागृतता निर्माण झाल्याचा हा परिणाम असावा. मात्र, हृदयविकार, मधुमेह, किडनीविकार, फुफ्फुसाचा विकार, रक्तदाबाचा त्रास असलेल्या नागरिकांनी वेळीच तपासणी करून घ्यायला हवी. घरी आलेल्या स्वयंसेवकांनी खरी माहिती द्यायला हवी. यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल.'' 
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

दृष्टिक्षेपात सप्टेंबर 

तारीख/रुग्ण/मत्यू 

1 ते 15/17615/211 

16 ते 29/8329/213 

एकूण/25944/424 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवडकरांनो कोरोनाचा संसर्ग घटतोय, फक्त स्वयंसेवकांना खरी माहिती द्या पिंपरी : कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसांपासून घटले आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण स्थिर असून त्यात अन्य आजार असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी व नातेवाइकांनी घरी आलेल्या स्वयंसेवकांनी खरी माहिती सांगून वेळीच उपचार करून घेण्याची आवश्‍यकता आहे, या बाबत स्वयंसेवकांमार्फत जनजागृती केली जात आहे.  पिंपरी-चिंचवडकरांनो सावध राहा; कुत्र्यांचे हल्ले वाढले, पाच महिन्यांत दोन हजार 430 जणांना चावा सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात 17 हजार 615 जणांना आणि दुसऱ्या पंधरवड्यात मंगळवारपर्यंत (ता. 29) आठ हजार 379 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. जवळपास निम्म्याने रुग्णसंख्या घटली आहे. विशेषतः 15 सप्टेंबरपासून शहरात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबवली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत 11 लाख 25 हजार नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. "लवकर रुग्ण शोधून लवकर उपचार करणे' हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, काही नागरिक चुकीची माहिती देत आहेत. संसर्ग झाल्याचे किंवा त्याची लक्षणे असल्याचे लपवून ठेवत आहेत का? या दृष्टिने कसून चौकशी केली जात आहे. रुग्णसंख्या कमी आढळत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र स्थिर आहे. त्याचा दर 1.6 ते 1.7 च्या दरम्यान स्थिर राहिला आहे. तो कमी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून तपासणी करून घेणे व काहीही माहिती न लपवणे, उपयुक्त ठरणार आहे.  कुत्र्याने केला घात, दुचाकीस्वार तरुणाचा गेला नाहक बळी "जुलै व ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांत मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदींबाबत जागृतता निर्माण झाल्याचा हा परिणाम असावा. मात्र, हृदयविकार, मधुमेह, किडनीविकार, फुफ्फुसाचा विकार, रक्तदाबाचा त्रास असलेल्या नागरिकांनी वेळीच तपासणी करून घ्यायला हवी. घरी आलेल्या स्वयंसेवकांनी खरी माहिती द्यायला हवी. यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल.''  - संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका  दृष्टिक्षेपात सप्टेंबर  तारीख/रुग्ण/मत्यू  1 ते 15/17615/211  16 ते 29/8329/213  एकूण/25944/424    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2S7AcUh
Read More
लातूर भूकंपानंतरची २७ वर्ष ! 

उमरगा (उस्मानाबाद) : ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपाला आज २७ वर्ष पूर्ण होत आहेत. भूकंपात तालुक्यातील अनेक गावे उद्धवस्त झाली. सरकार, सेवाभावी संस्था यांच्या मदतीने टुमदार घरे उभी राहिली, घरात नागरिक राहण्यासाठी गेले. मात्र मालकी हक्कापासून आजही नागरिक वंचित आहेत. दरम्यान भूकंप ही नैसर्गिक आपत्ती. आणि सध्या सुरू असलेले कोरोना संसर्गाची आपत्ती. या दोन्ही बाबी मानवी मनाला वेदना देणाऱ्या आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

भूकंपानंतर नऊ हजार ९७ नागरिक घरासाठी प्राप्त ठरले. आज पर्यंत सहा हजार ५७५ कबाल्याचे (जमिन मालकी हक्क) वाटप करण्यात आले आहे तर दोन हजार ५२२ लाभधारकाना कबाल्याची प्रतीक्षा लागली आहे. कांही दिवसा पूर्वी एक हजार ६२४ लाभधारकाना कबाले मिळावेत म्हणून तहसील कार्यालयातुन जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर उर्वरित ८९८ लाभधारकाच्या त्रुटी असून त्याची पूर्तता झाल्यास कबाले वाटप करण्यात येतील असे महसूल प्रशासनाने कळवले आहे. उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त अ वर्गवारीत एकूण दहा गावे येतात तर ब वर्गवारीत ९ गावे आहेत. या सर्व गावाचे पुनर्वसन झाले आहे त्यात अ वर्गवारीत गावे पेठसांगवी, सावळसूर, नाईचाकुर, कलदेव निंबाळा, बोरी, मातोळा, बाबळसुर, काळ निंबाळा, समुद्राळ, नारंगवाडी आहेत तर ब वर्ग वारीत एकुरगा, येणेगुर, बेटजवळगा, माडज, बलसुर, व्हंताळ, कोराळ, कडदोरा आदी गावाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

घराचे मालकी हक्क नसल्याने अनेक योजनांचा मिळेना लाभ
भूकंपग्रस्तांना पूर्नवसन क्षेत्रात ऐसपैस जागा मिळाली, मोठे रस्ते मिळाले. घराचे कबाले मिळाले मात्र मालकी हक्क नसल्याने अनेक योजनांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येताहेत. पंचवीस वर्षानंतर कुटुंबाचा विस्तार वाढल्याने विभक्त कुटुंबामुळे दुसऱ्या घराचे काम करण्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र मालकी हक्क मिळत नसल्याने घरकुल मंजूर असूनही लाभ मिळणे कठीण झाले आहे. 

भूकंपानंतर कोरोनाची आपत्ती !
भूकंपात जिवीत व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. नात्यातील जिवाभावाची माणसं गेली. त्या वेदनांची आठवण अजूनही कुटुंबातील व्यक्तींना येते. गेल्या सहा महिन्यापासुन कोरोना संसर्गाची आपत्ती अनेकावर येत आहे. उमरगा तालुक्यात अठराशेहुन अधिक कोरोना पॉझिटिव्हची संख्या झाली आहे. पन्नास व्यक्तींना मृत्यूला सामोरे जावे लागले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

" भूकंपात गावातील ७३६ व्यक्ती दगावल्या, त्यांच्या आठवणीचे स्मरण अजुनही होते. पूर्नवसन गावामुळे घराचे घरपणं गेले. रस्ते मोठे झाले परंतू त्याची दुरावस्था दुर करण्यासाठी निधी मिळत नाही. कोरोनाचे संकट सावधगिरीने व उपचाराने घालवू शकतो मात्र भूकंपाच्या संकटाचे भयावह विसारण्यासारखे नाही.

- गणेश पाटील, सरपंच पेठसांगवी

" घराच्या मालकी हक्काचे अधिकार मिळत नसल्याने घरकुलाची उभारणी होत नाही. गावातील प्राथमिक सुविधासाठी विशेष निधी मिळत नसल्याने समस्यांचा ढिग आहे. शासनाने भूकंपग्रस्त भागाच्या विकासासाठी निधीची खास तरतूद करायला हवी.

- प्रभाकर बिराजदार, नागरिक बेटजवळगा
 

(संपादन-प्रताप अवचार) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लातूर भूकंपानंतरची २७ वर्ष !  उमरगा (उस्मानाबाद) : ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपाला आज २७ वर्ष पूर्ण होत आहेत. भूकंपात तालुक्यातील अनेक गावे उद्धवस्त झाली. सरकार, सेवाभावी संस्था यांच्या मदतीने टुमदार घरे उभी राहिली, घरात नागरिक राहण्यासाठी गेले. मात्र मालकी हक्कापासून आजही नागरिक वंचित आहेत. दरम्यान भूकंप ही नैसर्गिक आपत्ती. आणि सध्या सुरू असलेले कोरोना संसर्गाची आपत्ती. या दोन्ही बाबी मानवी मनाला वेदना देणाऱ्या आहेत.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! भूकंपानंतर नऊ हजार ९७ नागरिक घरासाठी प्राप्त ठरले. आज पर्यंत सहा हजार ५७५ कबाल्याचे (जमिन मालकी हक्क) वाटप करण्यात आले आहे तर दोन हजार ५२२ लाभधारकाना कबाल्याची प्रतीक्षा लागली आहे. कांही दिवसा पूर्वी एक हजार ६२४ लाभधारकाना कबाले मिळावेत म्हणून तहसील कार्यालयातुन जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर उर्वरित ८९८ लाभधारकाच्या त्रुटी असून त्याची पूर्तता झाल्यास कबाले वाटप करण्यात येतील असे महसूल प्रशासनाने कळवले आहे. उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त अ वर्गवारीत एकूण दहा गावे येतात तर ब वर्गवारीत ९ गावे आहेत. या सर्व गावाचे पुनर्वसन झाले आहे त्यात अ वर्गवारीत गावे पेठसांगवी, सावळसूर, नाईचाकुर, कलदेव निंबाळा, बोरी, मातोळा, बाबळसुर, काळ निंबाळा, समुद्राळ, नारंगवाडी आहेत तर ब वर्ग वारीत एकुरगा, येणेगुर, बेटजवळगा, माडज, बलसुर, व्हंताळ, कोराळ, कडदोरा आदी गावाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. घराचे मालकी हक्क नसल्याने अनेक योजनांचा मिळेना लाभ भूकंपग्रस्तांना पूर्नवसन क्षेत्रात ऐसपैस जागा मिळाली, मोठे रस्ते मिळाले. घराचे कबाले मिळाले मात्र मालकी हक्क नसल्याने अनेक योजनांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येताहेत. पंचवीस वर्षानंतर कुटुंबाचा विस्तार वाढल्याने विभक्त कुटुंबामुळे दुसऱ्या घराचे काम करण्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र मालकी हक्क मिळत नसल्याने घरकुल मंजूर असूनही लाभ मिळणे कठीण झाले आहे.  भूकंपानंतर कोरोनाची आपत्ती ! भूकंपात जिवीत व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. नात्यातील जिवाभावाची माणसं गेली. त्या वेदनांची आठवण अजूनही कुटुंबातील व्यक्तींना येते. गेल्या सहा महिन्यापासुन कोरोना संसर्गाची आपत्ती अनेकावर येत आहे. उमरगा तालुक्यात अठराशेहुन अधिक कोरोना पॉझिटिव्हची संख्या झाली आहे. पन्नास व्यक्तींना मृत्यूला सामोरे जावे लागले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.     " भूकंपात गावातील ७३६ व्यक्ती दगावल्या, त्यांच्या आठवणीचे स्मरण अजुनही होते. पूर्नवसन गावामुळे घराचे घरपणं गेले. रस्ते मोठे झाले परंतू त्याची दुरावस्था दुर करण्यासाठी निधी मिळत नाही. कोरोनाचे संकट सावधगिरीने व उपचाराने घालवू शकतो मात्र भूकंपाच्या संकटाचे भयावह विसारण्यासारखे नाही. - गणेश पाटील, सरपंच पेठसांगवी " घराच्या मालकी हक्काचे अधिकार मिळत नसल्याने घरकुलाची उभारणी होत नाही. गावातील प्राथमिक सुविधासाठी विशेष निधी मिळत नसल्याने समस्यांचा ढिग आहे. शासनाने भूकंपग्रस्त भागाच्या विकासासाठी निधीची खास तरतूद करायला हवी. - प्रभाकर बिराजदार, नागरिक बेटजवळगा   (संपादन-प्रताप अवचार)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/348SABM
Read More
मध्य, उत्तर प्रदेशमध्येही पोटनिवडणुका; शिवराजसिंह यांचे भवितव्य दहा नोव्हेंबरला ठरणार

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीपाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने आता मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह 11 राज्यांमधील विधानसभेच्या 56 जागांसाठी आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारचे भवितव्य ठरविणाऱ्या या पोटनिवडणुकांसाठी तीन नोव्हेंबरला मतदान होईल. तर बिहारमधील लोकसभेच्या रिक्त जागेसाठी सात नोव्हेंबरला मतदान होईल. या सर्व जागांसाठी मतमोजणी 10 नोव्हेंबरला होईल. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार छत्तीसगढ, तेलंगण आणि हरियानातील प्रत्येकी एक, झारखंड, कर्नाटक, मणिपूर, नागालँड आणि ओडिशा या राज्यातील प्रत्येकी दोन, उत्तर प्रदेशातील सात, गुजरातमधील आठ आणि मध्य प्रदेशातील 28 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहे. तर बिहारमधील वाल्मिकी नगर लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूकही याचसोबत होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत जिंकलेले संयुक्त जनता दलाचे खासदार वैद्यनाथ प्रसाद महातो यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. या सर्व पोटनिवडणुकांसाठीही निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून कोरोना साथीपासून निवडणूक कर्मचारी आणि मतदारांच्या बचावासाठी मतदान केंद्रांवर हॅन्ड सॅनिटायझर, मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ह्ज यासारख्या साहित्याची व्यवस्था केली जाणार आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशात महिलांचे अस्तित्व धोक्यात!

ऐन कोरोना संकटात कमलनाथ सरकार उलथून पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळविलेल्या शिवराजसिंह चौहान यांच्या सत्तास्थैर्यासाठी या पोटनिवडणुका निर्णायक आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काॅंग्रेसमधून बंडखोरी करून आपल्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यामुळे काठावरचे बहुमत असलेले कमलनाथ सरकार कोसळले होते. हे सर्व समर्थक आमदार राजीनामा दिल्यानंतर भाजपतर्फे आता पुन्हा नशीब आजमावत आहे.

...म्हणून नवरी झाली विवाहापूर्वीच व्हायरल

मध्य प्रदेशातील बलाबल
230 संख्याबळ असलेल्या मध्यप्रदेश विधानसभेमध्ये बहुमताचा जादुई आकडा  116 आमदारांचा आहे. भाजपकडे 107 आमदार आहेत. तर विरोधात असलेल्या काॅंग्रेसकडे 88, बहुजन समाज पक्षाकडे 2 आणि समाजवादी पक्षाकडे 1 आमदार आहे. या व्यतिरिक्त 4 अपक्ष आमदार आहेत. भाजपला सत्ता टिकविण्यासाठी 9 आमदारांची आवश्यकता असून काॅंग्रेसला सत्तेत पुनरागमनासाठी सर्व 28 जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील चुरस वाढली आहे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मध्य, उत्तर प्रदेशमध्येही पोटनिवडणुका; शिवराजसिंह यांचे भवितव्य दहा नोव्हेंबरला ठरणार नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीपाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने आता मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह 11 राज्यांमधील विधानसभेच्या 56 जागांसाठी आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारचे भवितव्य ठरविणाऱ्या या पोटनिवडणुकांसाठी तीन नोव्हेंबरला मतदान होईल. तर बिहारमधील लोकसभेच्या रिक्त जागेसाठी सात नोव्हेंबरला मतदान होईल. या सर्व जागांसाठी मतमोजणी 10 नोव्हेंबरला होईल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार छत्तीसगढ, तेलंगण आणि हरियानातील प्रत्येकी एक, झारखंड, कर्नाटक, मणिपूर, नागालँड आणि ओडिशा या राज्यातील प्रत्येकी दोन, उत्तर प्रदेशातील सात, गुजरातमधील आठ आणि मध्य प्रदेशातील 28 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहे. तर बिहारमधील वाल्मिकी नगर लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूकही याचसोबत होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत जिंकलेले संयुक्त जनता दलाचे खासदार वैद्यनाथ प्रसाद महातो यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. या सर्व पोटनिवडणुकांसाठीही निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून कोरोना साथीपासून निवडणूक कर्मचारी आणि मतदारांच्या बचावासाठी मतदान केंद्रांवर हॅन्ड सॅनिटायझर, मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ह्ज यासारख्या साहित्याची व्यवस्था केली जाणार आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशात महिलांचे अस्तित्व धोक्यात! ऐन कोरोना संकटात कमलनाथ सरकार उलथून पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळविलेल्या शिवराजसिंह चौहान यांच्या सत्तास्थैर्यासाठी या पोटनिवडणुका निर्णायक आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काॅंग्रेसमधून बंडखोरी करून आपल्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यामुळे काठावरचे बहुमत असलेले कमलनाथ सरकार कोसळले होते. हे सर्व समर्थक आमदार राजीनामा दिल्यानंतर भाजपतर्फे आता पुन्हा नशीब आजमावत आहे. ...म्हणून नवरी झाली विवाहापूर्वीच व्हायरल मध्य प्रदेशातील बलाबल 230 संख्याबळ असलेल्या मध्यप्रदेश विधानसभेमध्ये बहुमताचा जादुई आकडा  116 आमदारांचा आहे. भाजपकडे 107 आमदार आहेत. तर विरोधात असलेल्या काॅंग्रेसकडे 88, बहुजन समाज पक्षाकडे 2 आणि समाजवादी पक्षाकडे 1 आमदार आहे. या व्यतिरिक्त 4 अपक्ष आमदार आहेत. भाजपला सत्ता टिकविण्यासाठी 9 आमदारांची आवश्यकता असून काॅंग्रेसला सत्तेत पुनरागमनासाठी सर्व 28 जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील चुरस वाढली आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3im9diw
Read More
इचलकरंजी पालिकेसमोर घरफाळा वसुलीचे आव्हान

इचलकरंजी : पालिकेचे सर्वात मोठे महसुली उत्पन्न घरफाळा आणि पाणी पट्टी आहे, पण गेल्यावर्षीनंतर यंदाही घरफाळा वसुलीचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे. गेल्या वर्षी महापुराचा घरफाळा वसुलीवर मोठा परिणाम झाला होता, तर यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे घरफाळा वसुली करताना पालिका प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा- मजुरांच्या तांड्याला मधमाशांनी घेरले ; साहित्य टाकून जीवाच्या आकांताने पळ

कोरोनामुळे शासनाकडून भरीव निधी मिळणे सध्यातरी अशक्‍य दिसत आहे. सहायक अनुदानातील कपातीमुळे आर्थिक नियोजन करताना पालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे सध्या घरफाळा व पाणीपट्टी यातून मिळणारे महसुली उत्पन्नच पालिकेला आर्थिक आधार ठरणार आहे. गेल्यावर्षी महापूर आला होता. शहरातील मोठा भाग महापुराच्या विळख्यात सापडला होता. त्याचा परिणाम घरफाळा व पाणीपट्टी वसुलीवर झाला. महापूर बाधित क्षेत्रातील घरफाळा माफ करण्याचा ठराव झाला आहे, पण त्यावरील निर्णय शासन पातळीवर प्रलंबित आहे.

मार्चअखेरच्या टप्प्यात घरफाळा व पाणीपट्टी वसुली जोरात असतानाच कोरोनाचे संकट आले. लॉकडाउन जाहीर केला. परिणामी सक्षमतेने वसुली झाली नाही. 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वसुली अपेक्षित असताना केवळ 66.89 टक्केच वसुली झाली. त्यामुळे गेल्यावर्षीची सुमारे 7 कोटीपेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यामुळे यंदा थकबाकीमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी लॉकडाउनमुळे सर्वच घटकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर सर्वच घटक आर्थिक स्थैर्यासाठी धडपडत आहेत. उद्योगाची घडी आता रुळावर येत आहे.

हेही वाचा-  रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

या पार्श्‍वभूमीवर नेहमीप्रमाणे यंदाही पालिकेच्या कर विभागाकडून घरफाळा व पाणीपट्टी वसुलीच्या बिलांचे वाटप सुरू केले आहे. 30 डिसेंबरपर्यंत घरफाळा व पाणीपट्टी भरण्याची मुदत आहे. त्यानंतर दंडाची आकारणी केली जाते, पण यंदा एकूणच परिस्थिती पाहता घरफाळा व पाणीपट्टी वसुली करताना पालिका प्रशासनाला कसरत करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. मुळात गेल्यावर्षीची मोठी थकबाकी आहे. यंदाही मिळकतधारकांची आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. अशा परिस्थितीत यावर्षीही घरफाळा व पाणीपट्टी वसुलीचे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे.
 

मिळकतधारकांना 1 टक्के रिबेटचा फटका
घरफाळा बिल मिळाल्यापासून पंधरा दिवसांत भरल्यास संयुक्त करात 1 टक्का रिबेटची सवलत दिली जाते, पण यंदा याबाबत गोंधळाची स्थिती आहे. बिलाची प्रिंट कॉपी काढल्यापासून 15 दिवसांत भरल्यानंतर ही सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत तक्रारी होत आहेत.

संपादन - अमरसिंह घोरपडे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

इचलकरंजी पालिकेसमोर घरफाळा वसुलीचे आव्हान इचलकरंजी : पालिकेचे सर्वात मोठे महसुली उत्पन्न घरफाळा आणि पाणी पट्टी आहे, पण गेल्यावर्षीनंतर यंदाही घरफाळा वसुलीचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे. गेल्या वर्षी महापुराचा घरफाळा वसुलीवर मोठा परिणाम झाला होता, तर यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे घरफाळा वसुली करताना पालिका प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. हेही वाचा- मजुरांच्या तांड्याला मधमाशांनी घेरले ; साहित्य टाकून जीवाच्या आकांताने पळ कोरोनामुळे शासनाकडून भरीव निधी मिळणे सध्यातरी अशक्‍य दिसत आहे. सहायक अनुदानातील कपातीमुळे आर्थिक नियोजन करताना पालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे सध्या घरफाळा व पाणीपट्टी यातून मिळणारे महसुली उत्पन्नच पालिकेला आर्थिक आधार ठरणार आहे. गेल्यावर्षी महापूर आला होता. शहरातील मोठा भाग महापुराच्या विळख्यात सापडला होता. त्याचा परिणाम घरफाळा व पाणीपट्टी वसुलीवर झाला. महापूर बाधित क्षेत्रातील घरफाळा माफ करण्याचा ठराव झाला आहे, पण त्यावरील निर्णय शासन पातळीवर प्रलंबित आहे. मार्चअखेरच्या टप्प्यात घरफाळा व पाणीपट्टी वसुली जोरात असतानाच कोरोनाचे संकट आले. लॉकडाउन जाहीर केला. परिणामी सक्षमतेने वसुली झाली नाही. 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वसुली अपेक्षित असताना केवळ 66.89 टक्केच वसुली झाली. त्यामुळे गेल्यावर्षीची सुमारे 7 कोटीपेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यामुळे यंदा थकबाकीमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी लॉकडाउनमुळे सर्वच घटकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर सर्वच घटक आर्थिक स्थैर्यासाठी धडपडत आहेत. उद्योगाची घडी आता रुळावर येत आहे. हेही वाचा-  रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव या पार्श्‍वभूमीवर नेहमीप्रमाणे यंदाही पालिकेच्या कर विभागाकडून घरफाळा व पाणीपट्टी वसुलीच्या बिलांचे वाटप सुरू केले आहे. 30 डिसेंबरपर्यंत घरफाळा व पाणीपट्टी भरण्याची मुदत आहे. त्यानंतर दंडाची आकारणी केली जाते, पण यंदा एकूणच परिस्थिती पाहता घरफाळा व पाणीपट्टी वसुली करताना पालिका प्रशासनाला कसरत करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. मुळात गेल्यावर्षीची मोठी थकबाकी आहे. यंदाही मिळकतधारकांची आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. अशा परिस्थितीत यावर्षीही घरफाळा व पाणीपट्टी वसुलीचे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे.   मिळकतधारकांना 1 टक्के रिबेटचा फटका घरफाळा बिल मिळाल्यापासून पंधरा दिवसांत भरल्यास संयुक्त करात 1 टक्का रिबेटची सवलत दिली जाते, पण यंदा याबाबत गोंधळाची स्थिती आहे. बिलाची प्रिंट कॉपी काढल्यापासून 15 दिवसांत भरल्यानंतर ही सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत तक्रारी होत आहेत. संपादन - अमरसिंह घोरपडे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2S7lVXE
Read More