Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, September 5, 2020

लहान मुलांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं कोरोनाची असू शकतात...
अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी; काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष

अमरावती : असे म्हणतात पृथ्वीवर तब्बल १९ कोटी वर्षांपूर्वी डायनासोर नावाचे प्राणी राहत होते. गेल्या कित्येक वर्षांपासून डायनासोर, त्यांच्या प्रजाती, त्यांचे राहणीमान आणि त्यांची राहण्याची ठिकाणे याबाबत संशोधन सुरु आहे. शास्त्रज्ञांना अनेकदा डायनासोरबाबतचे पुरावेही मिळाले आहे. मात्र यापैकी सर्वात महत्वाचा पुरावा मिळाला तो म्हणजे सालबर्डीत.    

२०१३ साली विदर्भातील अमरावती जिल्ह्यात असलेल्या सालबर्डीमध्ये डायनासोरच्या आकाराची हाडे आणि अंड्यांचे जीवाष्म सापडले होते. तेव्हापासूनच इथे संशोधन सुरू करण्यात आले होते. या संशोधनात  मादी डायनासोर या ठिकाणी अंडी घालत असत, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. विदर्भात आढळणारे डायनासोर हे सोरोपॉडा प्रजातीचे असावेत असा युक्त‌िवाद शास्त्रज्ञ करीत आहेत.

हे सत्य शहरातील भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या जीवाश्म विज्ञान शाखेने केलेल्या अभ्यासातून समोर आले होते. अमरावती विद्यापीठाच्या भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागातील ए.के. श्रीवास्तव आणि आर.एस. मानकर यांनी सर्वप्रथम यावर शोधप्रबंधातून प्रकाश टाकला होता.

हेही वाचा - काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर; जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या गोष्टी

एकावेळी घालायचे १० पेक्षा जास्त अंडी

सोरोपॉडा या प्रजातीचे डायनासोर हे एकावेळेस दहा किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालत असत. एक अंडं घातल्यावर दुसरे अंडे देताना  डायनासोर वर्तुळ मार्गाने फिरून एका वर्तुळात अंडी देत असत. शास्त्रज्ञांनी केलेलय अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे.  

अंडी उबण्यासाठी करत होते या खडकाची निवड 

डायनासॉरची अंड्यांचे वजन त्यांच्या शरीराप्रमाणेच खूप जास्त प्रमाणात असायचे. त्यामुळे मादी डायनॅसोरला या अंड्यांवर बसून त्यांना उबवणे शक्य नव्हते. त्यामुळे अंडी देण्याकरिता डायनासोर एका विशिष्ट खडकाची म्हणजेच वाळूच्या खडकाची निवड करत असत. हा खडक दिवसभरात उष्णता शोषून घेऊन रात्रीच्या वेळीही डायनासॉरच्या अंड्यांना उष्णता पुरवत असे अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.  

सालबर्डीत सुरु असलेले संशोधनाचे काम अजूनही सुरु आहे आणि संशोधक डायनासॉरच्या रहाणीमानातील अधिक पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी; काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष अमरावती : असे म्हणतात पृथ्वीवर तब्बल १९ कोटी वर्षांपूर्वी डायनासोर नावाचे प्राणी राहत होते. गेल्या कित्येक वर्षांपासून डायनासोर, त्यांच्या प्रजाती, त्यांचे राहणीमान आणि त्यांची राहण्याची ठिकाणे याबाबत संशोधन सुरु आहे. शास्त्रज्ञांना अनेकदा डायनासोरबाबतचे पुरावेही मिळाले आहे. मात्र यापैकी सर्वात महत्वाचा पुरावा मिळाला तो म्हणजे सालबर्डीत.     २०१३ साली विदर्भातील अमरावती जिल्ह्यात असलेल्या सालबर्डीमध्ये डायनासोरच्या आकाराची हाडे आणि अंड्यांचे जीवाष्म सापडले होते. तेव्हापासूनच इथे संशोधन सुरू करण्यात आले होते. या संशोधनात  मादी डायनासोर या ठिकाणी अंडी घालत असत, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. विदर्भात आढळणारे डायनासोर हे सोरोपॉडा प्रजातीचे असावेत असा युक्त‌िवाद शास्त्रज्ञ करीत आहेत. हे सत्य शहरातील भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या जीवाश्म विज्ञान शाखेने केलेल्या अभ्यासातून समोर आले होते. अमरावती विद्यापीठाच्या भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागातील ए.के. श्रीवास्तव आणि आर.एस. मानकर यांनी सर्वप्रथम यावर शोधप्रबंधातून प्रकाश टाकला होता. हेही वाचा - काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर; जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या गोष्टी एकावेळी घालायचे १० पेक्षा जास्त अंडी सोरोपॉडा या प्रजातीचे डायनासोर हे एकावेळेस दहा किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालत असत. एक अंडं घातल्यावर दुसरे अंडे देताना  डायनासोर वर्तुळ मार्गाने फिरून एका वर्तुळात अंडी देत असत. शास्त्रज्ञांनी केलेलय अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे.   अंडी उबण्यासाठी करत होते या खडकाची निवड  डायनासॉरची अंड्यांचे वजन त्यांच्या शरीराप्रमाणेच खूप जास्त प्रमाणात असायचे. त्यामुळे मादी डायनॅसोरला या अंड्यांवर बसून त्यांना उबवणे शक्य नव्हते. त्यामुळे अंडी देण्याकरिता डायनासोर एका विशिष्ट खडकाची म्हणजेच वाळूच्या खडकाची निवड करत असत. हा खडक दिवसभरात उष्णता शोषून घेऊन रात्रीच्या वेळीही डायनासॉरच्या अंड्यांना उष्णता पुरवत असे अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.   सालबर्डीत सुरु असलेले संशोधनाचे काम अजूनही सुरु आहे आणि संशोधक डायनासॉरच्या रहाणीमानातील अधिक पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3i8t996
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 06 सप्टेंबर

पंचांग -
रविवार - भाद्रपद कृ.4, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.45, चंद्रोदय रा.9.26, चंद्रास्त स. 9.33, भारतीय सौर 15, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९०१ - मराठी रंगभूमीवरील अभिनेत्री कमलाबाई गोखले यांचा जन्म. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले, नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनयाचे क्षेत्र गाजविले. ‘मृच्छकटिक’, ‘विद्याहरण’, ‘मानापमान’, ‘शारदा’, ‘मूकनायक’ आदी संगीत नाटकांत भूमिका करून त्यांनी नाव मिळविले. तसेच ‘संशयकल्लोळ’, ‘पेशव्यांचा पेशवा’, ‘उःशाप’, ‘हॅम्लेट’ या नाटकांतून महत्त्वाच्या भूमिका केल्या.
१९६३ - कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा-संशोधक गोविंद पै यांचे निधन. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्मय, तत्त्वज्ञान, इतिहास या विषयांचा त्यांनी व्यासंग केला. त्यांच्या संशोधनपर लेखांची संख्या १६० हून अधिक भरते.
१९६५ - पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची ‘ऑपरेशन ग्रॅंड स्लॅम’ म्हणून योजना होती. मात्र, पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असतानाही पाकिस्तानला भारताने सपाटून मार दिला.
१९७२ - हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील महर्षितुल्य कलाकार उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांचे निधन. सरोद, व्हायोलिन व अन्य अनेक वाद्ये ते तयारीने वाजवीत असत. त्यांनी हेमंत, हेमबिहाग, शोभावती, मदनमंजिरी इ. रागांची रचना केली. 
१९७९ - नामवंत क्रिकेटपटू व भारतीय संघाचे कसोटीतील पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन.
१९९३ - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान पुरस्कारा’साठी ज्येष्ठ मराठी कवी गोविंद विनायक ऊर्फ विंदा करंदीकर यांची निवड.
१९९७ - अमेरिकेतील ‘नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस’ या संस्थेतर्फे विख्यात सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांची ‘नॅशनल हेरिटेज’ फेलोशिपसाठी निवड.
१९९८ - जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचे निधन. त्यांचे ‘समथिंग लाईफ ॲन ऑटोबायोग्राफी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक अनेकांना चित्रपटगाथेसारखे महत्त्वाचे वाटते.
२००० - आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवा परकीय उद्योगांसाठी खुली करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्त व्यवहारविषयक समितीचा निर्णय.
२००० - सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ वृक्षमित्र व सागरेश्वर अभयारण्याचे शिल्पकार धोंडिराम महादेव मोहिते यांचे निधन.
२००० - अनेक सामाजिक संस्थांचा आधार असणारे कोल्हापूरचे दानशूर उद्योगपती शांताराम कृष्णाजीपंत वालावलकर यांचे निधन.
२००३ - रिझर्व्ह बॅंक गव्हर्नरपदाची वाय. व्ही. रेड्डी यांनी सूत्रे स्वीकारली.

दिनमान -
मेष  : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 
वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मिथुन : अनेकांशी सुसंवाद  साधाल. संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. 
कर्क  :  नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. 
सिंह : आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटन घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : कामात अडचणी जाणवतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 
तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. 
वृश्‍चिक  : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु : मुलामुलींसाठी खर्च करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मकर  : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. मित्रमैत्रिणींवर अवलंबून राहू नका.संततिसौख्य लाभेल. 
मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कुटुंबासाठी खर्च होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 06 सप्टेंबर पंचांग - रविवार - भाद्रपद कृ.4, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.45, चंद्रोदय रा.9.26, चंद्रास्त स. 9.33, भारतीय सौर 15, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९०१ - मराठी रंगभूमीवरील अभिनेत्री कमलाबाई गोखले यांचा जन्म. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले, नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनयाचे क्षेत्र गाजविले. ‘मृच्छकटिक’, ‘विद्याहरण’, ‘मानापमान’, ‘शारदा’, ‘मूकनायक’ आदी संगीत नाटकांत भूमिका करून त्यांनी नाव मिळविले. तसेच ‘संशयकल्लोळ’, ‘पेशव्यांचा पेशवा’, ‘उःशाप’, ‘हॅम्लेट’ या नाटकांतून महत्त्वाच्या भूमिका केल्या. १९६३ - कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा-संशोधक गोविंद पै यांचे निधन. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्मय, तत्त्वज्ञान, इतिहास या विषयांचा त्यांनी व्यासंग केला. त्यांच्या संशोधनपर लेखांची संख्या १६० हून अधिक भरते. १९६५ - पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची ‘ऑपरेशन ग्रॅंड स्लॅम’ म्हणून योजना होती. मात्र, पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असतानाही पाकिस्तानला भारताने सपाटून मार दिला. १९७२ - हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील महर्षितुल्य कलाकार उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांचे निधन. सरोद, व्हायोलिन व अन्य अनेक वाद्ये ते तयारीने वाजवीत असत. त्यांनी हेमंत, हेमबिहाग, शोभावती, मदनमंजिरी इ. रागांची रचना केली.  १९७९ - नामवंत क्रिकेटपटू व भारतीय संघाचे कसोटीतील पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. १९९३ - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान पुरस्कारा’साठी ज्येष्ठ मराठी कवी गोविंद विनायक ऊर्फ विंदा करंदीकर यांची निवड. १९९७ - अमेरिकेतील ‘नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस’ या संस्थेतर्फे विख्यात सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांची ‘नॅशनल हेरिटेज’ फेलोशिपसाठी निवड. १९९८ - जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचे निधन. त्यांचे ‘समथिंग लाईफ ॲन ऑटोबायोग्राफी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक अनेकांना चित्रपटगाथेसारखे महत्त्वाचे वाटते. २००० - आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवा परकीय उद्योगांसाठी खुली करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्त व्यवहारविषयक समितीचा निर्णय. २००० - सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ वृक्षमित्र व सागरेश्वर अभयारण्याचे शिल्पकार धोंडिराम महादेव मोहिते यांचे निधन. २००० - अनेक सामाजिक संस्थांचा आधार असणारे कोल्हापूरचे दानशूर उद्योगपती शांताराम कृष्णाजीपंत वालावलकर यांचे निधन. २००३ - रिझर्व्ह बॅंक गव्हर्नरपदाची वाय. व्ही. रेड्डी यांनी सूत्रे स्वीकारली. दिनमान - मेष  : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.  वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मिथुन : अनेकांशी सुसंवाद  साधाल. संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.  कर्क  :  नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.  सिंह : आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटन घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कन्या : कामात अडचणी जाणवतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.  तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.  वृश्‍चिक  : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. धनु : मुलामुलींसाठी खर्च करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मकर  : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्य चांगले राहील. कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. मित्रमैत्रिणींवर अवलंबून राहू नका.संततिसौख्य लाभेल.  मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कुटुंबासाठी खर्च होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/324FENw
Read More
विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी! सीईटीसाठी शेवटची संधी; 'या' तारखेला भरता येणार अर्ज

मुंबई: लॉकडाऊनमुळे यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता सोमवारी (ता. 7) आणि मंगळवारी (ता. 8) अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून नोंदणीची ही शेवटची संधी असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. 

अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

राज्यातील अभियांत्रिकी, औषधी, स्थापत्यशास्त्र, कृषी, हॉटेल मॅनेजमेंट आणि लॉ अभ्यासक्रम यांसारख्या 12 विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा बंधनकारक आहे. 1 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान ही परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले होते. सीईटी सेलमार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचे अर्ज अनेक विद्यार्थी भरू शकले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून 7 आणि 8 सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच अर्ज भरले आहेत, त्यांना नवीन अर्ज करता येणार नाही, महितीमध्ये बदल करता येणार नाही. तसेच आधीचे शुल्कही परत मिळणार नसल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी! सीईटीसाठी शेवटची संधी; 'या' तारखेला भरता येणार अर्ज मुंबई: लॉकडाऊनमुळे यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता सोमवारी (ता. 7) आणि मंगळवारी (ता. 8) अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून नोंदणीची ही शेवटची संधी असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.  अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण राज्यातील अभियांत्रिकी, औषधी, स्थापत्यशास्त्र, कृषी, हॉटेल मॅनेजमेंट आणि लॉ अभ्यासक्रम यांसारख्या 12 विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा बंधनकारक आहे. 1 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान ही परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले होते. सीईटी सेलमार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचे अर्ज अनेक विद्यार्थी भरू शकले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून 7 आणि 8 सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच अर्ज भरले आहेत, त्यांना नवीन अर्ज करता येणार नाही, महितीमध्ये बदल करता येणार नाही. तसेच आधीचे शुल्कही परत मिळणार नसल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  ---------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lR2KPo
Read More
दहनघाटांवर कोरोनाबळींच्या अंत्यसंस्काराला का होतोय विरोध? वाचा सविस्तर

नागपूर : शहरात दररोज चाळीसपेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असून त्यांच्यावर अंत्यसंस्काराचा भार केवळ तीनच घाटांवरील शवदाहिनीवर आहे. शवदाहिनी एकच असल्याने घाटावर पार्थिवाची रांग लागत आहे. एवढेच नव्हे तर अंत्यसंस्कारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या पीपीई किट थेट घाटाच्या आवारातच फेकून देण्यात येत आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिक कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारास विरोध करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने कोरोनाने मानवी संवेदनाही बोथड केल्या की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात कोरोनाबळींच्या वाढत्या संख्येने महापालिकेपुढे वेगवेगळी आव्हाने उभी केली आहे. यात आता कोरोनाबळींच्या अंत्यसंस्काराच्या आव्हानाचा समावेश होत आहे.

पुढील काही दिवसांत तयारी न केल्यास महापालिकेपुढे नागरिकांच्या संतापाचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. दररोज चाळीसवर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत आहे. यात शहर व ग्रामीण भागातील किंवा जिल्ह्याबाहेरील कोरोनाबळींचाही समावेश आहे. या सर्वांच्या पार्थिवावर शहरातील दहनघाटांवर शास्त्रीय पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.

कोरोनाबळींचे पार्थिव शवदाहिनीमध्येच जाळण्याचे बंधनकारक आहे. शहरात १६ घाट असून वैशालीनगर, गंगाबाई घाट व अंबाझरी घाटांवरच शवदाहिनी उपलब्ध आहे. दररोज चाळीस जणांचा कोरोनाने मृत्यू होत असल्याने या घाटांवर अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव येत आहे. शवदाहिनीमध्ये एक पार्थिव जळण्यास तीन तासांचा अवधी लागत असल्याचे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नमुद केले.

त्यामुळे एकापेक्षा जास्त पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणल्या गेल्यास घाटांवर पार्थिवाची रांग लागत आहे. काही वेळ पार्थिव जाळण्यासाठी नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. पार्थिव बराच काळ घाटांवर राहात असल्याने गंगाबाई घाट परिसरात नागरिकांचा विरोध सुरू झाला आहे. याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांकडून पीपीई किट घाटाच्या आवारातच मोकळ्या जागेवर फेकण्यात येत असल्याने गंगाबाई घाट परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

मास्क न वापरता हिरोगिरी करणाऱ्यांना महापालिकेने कसा दिला धक्का ? वाचा सविस्तर

मृतदेहांची संख्या वाढत असताना केवळ तीनच घाटांवर अंत्यसंस्काराचा भार आहे. विशेष म्हणजे बाहेर गावावरून आलेल्या कोरोनाबाधितांची मृत्यू झाल्यास त्यांचेही पार्थिव येथेच जाळण्यात येत आहे. त्यामुळेही नागरिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. नुकताच महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठककीत आमदार प्रवीण दटके यांनी बाहेरगावच्या पार्थिवासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती.  त्यामुळे महापालिकेला आता इतर घाटांवरही शवदाहिनी सुरू करण्याची मागणी वाढत आहे. 

गंगाबाई घाटानजिक दोनशेवर कुटुंब राहतात. कोरोनाबळींचे अनेक मृतदेह एकाचवेळी येत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. अंत्यसंस्कारानंतर कर्मचारी पीपीई किट उघड्यावर टाकून देतात. या वापरलेल्या पीपीई किट घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या विशेष वाहनातील कर्मचारी उघड्यावरील पीपीई किटला हातही लावत नाही. केवळ कॅरीबॅग किंवा डस्टबीनमधील किट नेतात. त्यामुळे त्या पीपीई किट पडून राहतात. यातून परिसरात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. महापालिकेने एकाचवेळी अनेक मृतदेह येथे आणण्याऐवजी इतर घाटांचाही विचार करावा.
बल्लू शहारे, गंगाबाई घाट परिसरातील निवासी.
 
शहरात १६ घाट आहेत. यातील गंगाबाई घाट, अंबाझरी आणि वैशालीनगर घाटांवर शववाहिनी उपलब्ध आहे. अंबाझरी घाटांवर एलपीजी शवदाहिनी आहे. सद्यस्थितीत मानेवाडा व सहकारनगर घाटांवर शवदाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त, महापालिका.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दहनघाटांवर कोरोनाबळींच्या अंत्यसंस्काराला का होतोय विरोध? वाचा सविस्तर नागपूर : शहरात दररोज चाळीसपेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असून त्यांच्यावर अंत्यसंस्काराचा भार केवळ तीनच घाटांवरील शवदाहिनीवर आहे. शवदाहिनी एकच असल्याने घाटावर पार्थिवाची रांग लागत आहे. एवढेच नव्हे तर अंत्यसंस्कारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या पीपीई किट थेट घाटाच्या आवारातच फेकून देण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारास विरोध करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने कोरोनाने मानवी संवेदनाही बोथड केल्या की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात कोरोनाबळींच्या वाढत्या संख्येने महापालिकेपुढे वेगवेगळी आव्हाने उभी केली आहे. यात आता कोरोनाबळींच्या अंत्यसंस्काराच्या आव्हानाचा समावेश होत आहे. पुढील काही दिवसांत तयारी न केल्यास महापालिकेपुढे नागरिकांच्या संतापाचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. दररोज चाळीसवर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत आहे. यात शहर व ग्रामीण भागातील किंवा जिल्ह्याबाहेरील कोरोनाबळींचाही समावेश आहे. या सर्वांच्या पार्थिवावर शहरातील दहनघाटांवर शास्त्रीय पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. कोरोनाबळींचे पार्थिव शवदाहिनीमध्येच जाळण्याचे बंधनकारक आहे. शहरात १६ घाट असून वैशालीनगर, गंगाबाई घाट व अंबाझरी घाटांवरच शवदाहिनी उपलब्ध आहे. दररोज चाळीस जणांचा कोरोनाने मृत्यू होत असल्याने या घाटांवर अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव येत आहे. शवदाहिनीमध्ये एक पार्थिव जळण्यास तीन तासांचा अवधी लागत असल्याचे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नमुद केले. त्यामुळे एकापेक्षा जास्त पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणल्या गेल्यास घाटांवर पार्थिवाची रांग लागत आहे. काही वेळ पार्थिव जाळण्यासाठी नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. पार्थिव बराच काळ घाटांवर राहात असल्याने गंगाबाई घाट परिसरात नागरिकांचा विरोध सुरू झाला आहे. याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांकडून पीपीई किट घाटाच्या आवारातच मोकळ्या जागेवर फेकण्यात येत असल्याने गंगाबाई घाट परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मास्क न वापरता हिरोगिरी करणाऱ्यांना महापालिकेने कसा दिला धक्का ? वाचा सविस्तर मृतदेहांची संख्या वाढत असताना केवळ तीनच घाटांवर अंत्यसंस्काराचा भार आहे. विशेष म्हणजे बाहेर गावावरून आलेल्या कोरोनाबाधितांची मृत्यू झाल्यास त्यांचेही पार्थिव येथेच जाळण्यात येत आहे. त्यामुळेही नागरिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. नुकताच महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठककीत आमदार प्रवीण दटके यांनी बाहेरगावच्या पार्थिवासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती.  त्यामुळे महापालिकेला आता इतर घाटांवरही शवदाहिनी सुरू करण्याची मागणी वाढत आहे.  गंगाबाई घाटानजिक दोनशेवर कुटुंब राहतात. कोरोनाबळींचे अनेक मृतदेह एकाचवेळी येत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. अंत्यसंस्कारानंतर कर्मचारी पीपीई किट उघड्यावर टाकून देतात. या वापरलेल्या पीपीई किट घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या विशेष वाहनातील कर्मचारी उघड्यावरील पीपीई किटला हातही लावत नाही. केवळ कॅरीबॅग किंवा डस्टबीनमधील किट नेतात. त्यामुळे त्या पीपीई किट पडून राहतात. यातून परिसरात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. महापालिकेने एकाचवेळी अनेक मृतदेह येथे आणण्याऐवजी इतर घाटांचाही विचार करावा. बल्लू शहारे, गंगाबाई घाट परिसरातील निवासी.   शहरात १६ घाट आहेत. यातील गंगाबाई घाट, अंबाझरी आणि वैशालीनगर घाटांवर शववाहिनी उपलब्ध आहे. अंबाझरी घाटांवर एलपीजी शवदाहिनी आहे. सद्यस्थितीत मानेवाडा व सहकारनगर घाटांवर शवदाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे. डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त, महापालिका. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Felvv6
Read More
समृद्धी महामार्गाची गती मंदावली

मुंबई - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी राबणारे ३० हजार कामगार लॉकडाउन आणि पावसामुळे कमी झाले आहेत; मात्र अद्याप या प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) स्पष्ट करण्यात आले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबई-नागपूर या ७०१ किलोमीटर मार्गापैकी इगतपुरी ते नागपूर हा ६२३ किलोमीटरचा मार्ग प्रथम पूर्ण करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापर्यंत नागपूर ते इगतपुरीपर्यंतचे मार्गाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर चार-पाच महिन्यांनी इगतपुरी ते मुंबईपर्यंतचे काम पूर्ण होईल. सरकारला २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे नागपूर ते इगतपुरी हा टप्पा २०२१ च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्च येणार असून आता १८ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे.

शिक्षक होण्याचे अजुनही स्वप्नचं; शिक्षक भरती पुन्हा कधी सुरू होणार?

कसारा घाटात ८ किलोमीटरचा बोगदा असून त्यापैकी २ किलोमीटरचे काम झाले आहे. हा महामार्ग आठपदरी असून त्यावर वाहनांचा वेग ताशी १५० किलोमीटरपर्यंत असणार आहे. 

महामार्गाची वैशिष्ट्ये 

५० हून अधिक उड्डाणपूल

२४ हून अधिक इंटरचेंज

५ पेक्षा जास्त बोगदे

१० जिल्हे, ३९१ गावे मार्ग जाणार

इतर १४ जिल्ह्यांना फायदा होणार

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

समृद्धी महामार्गाची गती मंदावली मुंबई - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी राबणारे ३० हजार कामगार लॉकडाउन आणि पावसामुळे कमी झाले आहेत; मात्र अद्याप या प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) स्पष्ट करण्यात आले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मुंबई-नागपूर या ७०१ किलोमीटर मार्गापैकी इगतपुरी ते नागपूर हा ६२३ किलोमीटरचा मार्ग प्रथम पूर्ण करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापर्यंत नागपूर ते इगतपुरीपर्यंतचे मार्गाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर चार-पाच महिन्यांनी इगतपुरी ते मुंबईपर्यंतचे काम पूर्ण होईल. सरकारला २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे नागपूर ते इगतपुरी हा टप्पा २०२१ च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्च येणार असून आता १८ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. शिक्षक होण्याचे अजुनही स्वप्नचं; शिक्षक भरती पुन्हा कधी सुरू होणार? कसारा घाटात ८ किलोमीटरचा बोगदा असून त्यापैकी २ किलोमीटरचे काम झाले आहे. हा महामार्ग आठपदरी असून त्यावर वाहनांचा वेग ताशी १५० किलोमीटरपर्यंत असणार आहे.  महामार्गाची वैशिष्ट्ये  ५० हून अधिक उड्डाणपूल २४ हून अधिक इंटरचेंज ५ पेक्षा जास्त बोगदे १० जिल्हे, ३९१ गावे मार्ग जाणार इतर १४ जिल्ह्यांना फायदा होणार Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Za9Dlb
Read More
अयोध्येतील नवी मशीद पूर्वीएवढीच असणार

लखनौ - अयोध्येमध्ये आता मशिदीच्या उभारणीलादेखील वेग आला असून, येथे नव्याने उभारली जाणारी मशिदीची वास्तू पूर्वीच्या बाबरी मशिदीएवढीच मोठी असेल, अशी माहिती या वास्तूच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या  ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अयोध्येतील धान्नीपूर खेड्यामध्ये पाच एकरच्या परिसरात ही वास्तू उभारली जाणार असून त्यामध्ये रुग्णालय, वाचनालय आणि संग्रहालय देखील असेल. येथील संग्रहालयाची सूत्रे ही ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक पुष्पेश पंत यांच्याकडे सोपविली जाणार आहेत. मशिदीच्या परिसरामध्येच उभारण्यात येणाऱ्या इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटरमध्ये (आयआयसीएफ) हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मशिदीची ही वास्तू पंधरा हजार स्क्वेअर फूट परिसरामध्ये उभारण्यात येईल, उर्वरित जागेमध्ये अन्य सुविधा उभारण्यात येतील असे आयआयसीएफचे प्रवक्ते अतहर हुसैन यांनी सांगितले. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अयोध्येतील नवी मशीद पूर्वीएवढीच असणार लखनौ - अयोध्येमध्ये आता मशिदीच्या उभारणीलादेखील वेग आला असून, येथे नव्याने उभारली जाणारी मशिदीची वास्तू पूर्वीच्या बाबरी मशिदीएवढीच मोठी असेल, अशी माहिती या वास्तूच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या  ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अयोध्येतील धान्नीपूर खेड्यामध्ये पाच एकरच्या परिसरात ही वास्तू उभारली जाणार असून त्यामध्ये रुग्णालय, वाचनालय आणि संग्रहालय देखील असेल. येथील संग्रहालयाची सूत्रे ही ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक पुष्पेश पंत यांच्याकडे सोपविली जाणार आहेत. मशिदीच्या परिसरामध्येच उभारण्यात येणाऱ्या इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटरमध्ये (आयआयसीएफ) हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मशिदीची ही वास्तू पंधरा हजार स्क्वेअर फूट परिसरामध्ये उभारण्यात येईल, उर्वरित जागेमध्ये अन्य सुविधा उभारण्यात येतील असे आयआयसीएफचे प्रवक्ते अतहर हुसैन यांनी सांगितले.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EVSXqO
Read More
कोणी घेतला काळ्या फिती लावून काम करण्याचा पवित्रा, वाचा सविस्तर. 

औरंगाबाद :  महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना ही वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची राज्यस्तरीय संघटना असून मागील बऱ्याच कालावधीपासून कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे. परंतु संघटनेच्या मागण्यांकडे ग्रामविकास विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.०७) काळ्या फिती लावून आपापले नियमित कर्तव्य बजावणार असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष अतुल मुळे, कार्याध्यक्ष विष्णू घुगे, राज्य सरचिटणीस पंकज गोरले यांनी कळविले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..
संघटनेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, जिल्हास्तरावर सोमवारी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपापले नियत असलेले कर्तव्य बजावून दुपारच्या जेवणाच्या वेळेमध्ये जिल्ह्यातील संघटनेच्या प्रतिनिधींनी आपापल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करावे व  सदर निवेदन शासनास पाठविण्याबाबत विनंती करावी असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कनिष्ठ सहाय्यक या पदाची सेवाप्रवेश नियम तात्काळ प्रसिद्ध  करण्यात यावे, परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां प्रमाणे पदोन्नतीने समायोजन करावे, जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात, तीन लाभांची  आश्वासित प्रगती योजना नियमीत दहा वर्ष, बारा वर्षे कालावधीत २० सेवेनंतर दुसरा लाभ मंजूर करण्यात यावा तसेच लाभांची थकबाकी तत्काळ प्रदान करण्यात यावी आदी मागण्यांसाठी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला जाणार आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(संपादन - प्रताप अवचार)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोणी घेतला काळ्या फिती लावून काम करण्याचा पवित्रा, वाचा सविस्तर.  औरंगाबाद :  महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना ही वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची राज्यस्तरीय संघटना असून मागील बऱ्याच कालावधीपासून कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे. परंतु संघटनेच्या मागण्यांकडे ग्रामविकास विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.०७) काळ्या फिती लावून आपापले नियमित कर्तव्य बजावणार असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष अतुल मुळे, कार्याध्यक्ष विष्णू घुगे, राज्य सरचिटणीस पंकज गोरले यांनी कळविले आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा.. संघटनेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, जिल्हास्तरावर सोमवारी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपापले नियत असलेले कर्तव्य बजावून दुपारच्या जेवणाच्या वेळेमध्ये जिल्ह्यातील संघटनेच्या प्रतिनिधींनी आपापल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करावे व  सदर निवेदन शासनास पाठविण्याबाबत विनंती करावी असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कनिष्ठ सहाय्यक या पदाची सेवाप्रवेश नियम तात्काळ प्रसिद्ध  करण्यात यावे, परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां प्रमाणे पदोन्नतीने समायोजन करावे, जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात, तीन लाभांची  आश्वासित प्रगती योजना नियमीत दहा वर्ष, बारा वर्षे कालावधीत २० सेवेनंतर दुसरा लाभ मंजूर करण्यात यावा तसेच लाभांची थकबाकी तत्काळ प्रदान करण्यात यावी आदी मागण्यांसाठी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला जाणार आहे. देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (संपादन - प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2FekHGA
Read More
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा 15 सप्टेंबरपासून? महाविद्यालये ऑनलाईन परीक्षेला तयार 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत आदेश दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाना परीक्षेचे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शनिवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी याबाबत प्राचार्यांची बैठक घेतली. या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षा 15 सप्टेंबरपासून सुरू करण्याबाबत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात प्रात्यक्षिक व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार असून . या परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

राज्यातील विद्यापीठांनी परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने समिती नेमून परीक्षांसाठी कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांचा पर्याय स्वीकारल्याचे समजत आहे. प्राचार्यांचे मत जाणून घेण्यासाठी शनिवारी मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते. सध्या बहुतांश महाविद्यालयात ऑनलाइन व्याख्याने सुरू आहेत. तसेच बहुतांश विद्यार्थी याला उपस्थित असतात असे महाविद्यालयांनी सांगितले. यावरून परीक्षाही शक्य होऊ शकतील असेही मत काही प्राचार्यांनी यावेळी मांडले. विद्यापीठाने 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा तर 1 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन लेखी परीक्षा पूर्ण करण्याचे ध्येय प्राचार्यांना दिले आहेत. यानंतर 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर करण्यात येईल असा विश्वासही कुलगुरुंनी या बैठकीत व्यक्त केला आहे.

ऑनलाइन परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्नांची असेल तसेच नेहमीपेक्षा निम्म्या गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाईल असेही या बैठकीत ठरविण्यात आले. याबाबत आता परीक्षा मंडळाची बैठक घेऊन पुढील दोन दिवसांत अंतिम मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुशांतसिंग राजपुतचा नोकर दिपेश सावंतला एनसीबीकडून अटक

ऑफलाइनचाही पर्याय बहुतांश विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑनलाइनच घेण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही त्यांच्यासाठी ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत कॉलेज स्तरावर निर्णय घेण्यात यावा मात्र त्यासाठी विद्यापीठाने तयार कलेल्या मार्गदर्शक सुचना बंधनकाकर असतील असेही यावेळी सांगण्यात आले.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा 15 सप्टेंबरपासून? महाविद्यालये ऑनलाईन परीक्षेला तयार  मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत आदेश दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाना परीक्षेचे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शनिवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी याबाबत प्राचार्यांची बैठक घेतली. या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षा 15 सप्टेंबरपासून सुरू करण्याबाबत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात प्रात्यक्षिक व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार असून . या परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले.  अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण राज्यातील विद्यापीठांनी परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने समिती नेमून परीक्षांसाठी कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांचा पर्याय स्वीकारल्याचे समजत आहे. प्राचार्यांचे मत जाणून घेण्यासाठी शनिवारी मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते. सध्या बहुतांश महाविद्यालयात ऑनलाइन व्याख्याने सुरू आहेत. तसेच बहुतांश विद्यार्थी याला उपस्थित असतात असे महाविद्यालयांनी सांगितले. यावरून परीक्षाही शक्य होऊ शकतील असेही मत काही प्राचार्यांनी यावेळी मांडले. विद्यापीठाने 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा तर 1 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन लेखी परीक्षा पूर्ण करण्याचे ध्येय प्राचार्यांना दिले आहेत. यानंतर 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर करण्यात येईल असा विश्वासही कुलगुरुंनी या बैठकीत व्यक्त केला आहे. ऑनलाइन परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्नांची असेल तसेच नेहमीपेक्षा निम्म्या गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाईल असेही या बैठकीत ठरविण्यात आले. याबाबत आता परीक्षा मंडळाची बैठक घेऊन पुढील दोन दिवसांत अंतिम मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सुशांतसिंग राजपुतचा नोकर दिपेश सावंतला एनसीबीकडून अटक ऑफलाइनचाही पर्याय बहुतांश विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑनलाइनच घेण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही त्यांच्यासाठी ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत कॉलेज स्तरावर निर्णय घेण्यात यावा मात्र त्यासाठी विद्यापीठाने तयार कलेल्या मार्गदर्शक सुचना बंधनकाकर असतील असेही यावेळी सांगण्यात आले. ------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lXzPsO
Read More
समृद्धी महामार्गाला अजूनही मुदतवाढ नाही; एमएसआरडीसीने दिले 'हे' कारण

मुंबई : मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी राबणारे 30 हजार कामगार लॉकडाऊन आणि पावसामुळे कमी झाले आहेत. मात्र, अद्याप या प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) स्पष्ट करण्यात आले.

कोरोनासोबत जगताना SMS ही त्रिसूत्री महत्त्वाची : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई-नागपूर या 701 किलोमीटर मार्गापैकी इगतपुरी ते नागपूर हा 623 किलोमीटरचा मार्ग प्रथम पूर्ण करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापर्यंत नागपूर ते इगतपुरीपर्यंतचे मार्गाचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर चार-पाच महिन्यांनी इगतपुरी ते मुंबई पर्यंतचे काम पूर्ण होईल. सरकारला 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे नागपूर ते इगतपुरी हा टप्पा 2021च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्च येणार असून आता 18 हजार कोटीहून अधिक खर्च झाला आहे.

कसारा घाटात 8 किलोमीटरचा बोगदा असून त्यापैकी 2 किलोमीटरचे काम झाले आहे. हा महामार्ग आठ पदरी असून त्यावर वाहानांचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत असणार आहे. सध्या नागपूर ते मुंबई अंतर पार करण्यासाठी 16 तासांचा कालावधी लागतो. या महामार्गामुळे हा कालावधी 8 तासांवर येणार आहे. तर मुंबई ते औरंगाबाद हे अंतर 4 तासात पूर्ण होणार आहे.

 

अहंकार जपण्यासाठी परिक्षा घेण्याचे नाटक! भाजप आमदाराची राज्यपालांकडे तक्रार

लॉकडाऊनपूर्वी या प्रकल्पासाठी तब्बल 30 हजार कामगार राबत होते. मात्र, लॉकडाऊन आणि पावसाळ्यामुळे ही संख्या निम्मी झाली आहे. मात्र, अद्याप प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास निर्णय घेण्यात येईल. 
- अनिलकुमार गायकवाड,
सह संचालक, एमएसआरडीसी

 

महामार्गाची वैशिष्ट्ये :

- 50 हून अधिक उड्डाणपूल

- 24 हून अधिक इंटरचेंज

- 5 पेक्षा जास्त बोगदे

- 10 जिल्ह्यांतील 391 गावातून मार्ग जाणार

- इतर 14 जिल्ह्यांना फायदा होणार

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

समृद्धी महामार्गाला अजूनही मुदतवाढ नाही; एमएसआरडीसीने दिले 'हे' कारण मुंबई : मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी राबणारे 30 हजार कामगार लॉकडाऊन आणि पावसामुळे कमी झाले आहेत. मात्र, अद्याप या प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) स्पष्ट करण्यात आले. कोरोनासोबत जगताना SMS ही त्रिसूत्री महत्त्वाची : आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई-नागपूर या 701 किलोमीटर मार्गापैकी इगतपुरी ते नागपूर हा 623 किलोमीटरचा मार्ग प्रथम पूर्ण करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापर्यंत नागपूर ते इगतपुरीपर्यंतचे मार्गाचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर चार-पाच महिन्यांनी इगतपुरी ते मुंबई पर्यंतचे काम पूर्ण होईल. सरकारला 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे नागपूर ते इगतपुरी हा टप्पा 2021च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्च येणार असून आता 18 हजार कोटीहून अधिक खर्च झाला आहे. कसारा घाटात 8 किलोमीटरचा बोगदा असून त्यापैकी 2 किलोमीटरचे काम झाले आहे. हा महामार्ग आठ पदरी असून त्यावर वाहानांचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत असणार आहे. सध्या नागपूर ते मुंबई अंतर पार करण्यासाठी 16 तासांचा कालावधी लागतो. या महामार्गामुळे हा कालावधी 8 तासांवर येणार आहे. तर मुंबई ते औरंगाबाद हे अंतर 4 तासात पूर्ण होणार आहे.   अहंकार जपण्यासाठी परिक्षा घेण्याचे नाटक! भाजप आमदाराची राज्यपालांकडे तक्रार लॉकडाऊनपूर्वी या प्रकल्पासाठी तब्बल 30 हजार कामगार राबत होते. मात्र, लॉकडाऊन आणि पावसाळ्यामुळे ही संख्या निम्मी झाली आहे. मात्र, अद्याप प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास निर्णय घेण्यात येईल.  - अनिलकुमार गायकवाड, सह संचालक, एमएसआरडीसी   महामार्गाची वैशिष्ट्ये : - 50 हून अधिक उड्डाणपूल - 24 हून अधिक इंटरचेंज - 5 पेक्षा जास्त बोगदे - 10 जिल्ह्यांतील 391 गावातून मार्ग जाणार - इतर 14 जिल्ह्यांना फायदा होणार ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3h3QqI7
Read More
पुढील वर्षीही कोरोना राहणार - डॉ. रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग भारतात पुढील वर्षीही (२०२१) कायम राहण्याची भीती आहे. केंद्र सरकारच्या कोरोना कृती गटाचे सदस्य व दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीच ती व्यक्त केली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोठ्या प्रमाणावर लोक आरोग्याचे नियम पाळत नसल्याने दिल्लीसह देशाच्या अन्य काही भागांत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसत आहे असेही त्यांनी सांगितले. 

उद्योगस्नेही टॉप टेन राज्यात महाराष्ट्र नाहीच; शेजारी राज्य पहिल्या क्रमांकावर

सारे काही निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत होत गेले तर कोरोनावरील भारतीय लस यावर्षीच्या अखेरपर्यंत निश्‍चित येईल  अशी आशा व्यक्त करून डॉ. गुलेरिया म्हणाले, की भारतात तीन लसींच्या चाचण्या प्रगतिपथावर आहेत. मात्र कोणतीही लस जनतेला उपलब्ध करून देण्याआधी तिची सुरक्षितता सर्व बाजूंनी व्यवस्थित तपासणे गरजेचे असते. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुढील वर्षीही कोरोना राहणार - डॉ. रणदीप गुलेरिया नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग भारतात पुढील वर्षीही (२०२१) कायम राहण्याची भीती आहे. केंद्र सरकारच्या कोरोना कृती गटाचे सदस्य व दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीच ती व्यक्त केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मोठ्या प्रमाणावर लोक आरोग्याचे नियम पाळत नसल्याने दिल्लीसह देशाच्या अन्य काही भागांत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसत आहे असेही त्यांनी सांगितले.  उद्योगस्नेही टॉप टेन राज्यात महाराष्ट्र नाहीच; शेजारी राज्य पहिल्या क्रमांकावर सारे काही निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत होत गेले तर कोरोनावरील भारतीय लस यावर्षीच्या अखेरपर्यंत निश्‍चित येईल  अशी आशा व्यक्त करून डॉ. गुलेरिया म्हणाले, की भारतात तीन लसींच्या चाचण्या प्रगतिपथावर आहेत. मात्र कोणतीही लस जनतेला उपलब्ध करून देण्याआधी तिची सुरक्षितता सर्व बाजूंनी व्यवस्थित तपासणे गरजेचे असते.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z7HMlp
Read More
कोरोनासोबत जगताना ‘एसएमएस’ त्रिसूत्री अवलंबा - राजेश टोपे

मुंबई - कोरोना उपचाराबाबत राज्य सरकारने सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून विविध निर्णय घेतले आहेत. कोरोनासोबत जगताना ‘एसएमएस’ ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात सांगितले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘आपल्याला एसएमएस (एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सॅनिटायझर म्हणजेच सॅनिटाईज्ड हॅंड) पद्धतीने जगावे लागेल. ‘एसएमएस’ पद्धतीचा वापर करून कार्य करावे आणि जेवढे टाळता येऊ शकत असेल, त्या अनावश्‍यक गोष्टी जरूर टाळाव्यात.

शिक्षक होण्याचे अजुनही स्वप्नचं; शिक्षक भरती पुन्हा कधी सुरू होणार?

राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू आहे. त्यामध्ये १००० रुग्णालये आहेत. ज्यामध्ये आपण १०० टक्के कॅशलेस सेवा, एक रुपया न घेता या सगळ्या सुविधा देऊ शकतो. राज्य सरकारचे एकच लक्ष्य राहिले आहे, की सामान्य माणूस हा आमच्या डोळ्यांसमोर आहे, त्या दृष्टिकोनातून धोरणे आखली आहेत.
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनासोबत जगताना ‘एसएमएस’ त्रिसूत्री अवलंबा - राजेश टोपे मुंबई - कोरोना उपचाराबाबत राज्य सरकारने सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून विविध निर्णय घेतले आहेत. कोरोनासोबत जगताना ‘एसएमएस’ ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात सांगितले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘आपल्याला एसएमएस (एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सॅनिटायझर म्हणजेच सॅनिटाईज्ड हॅंड) पद्धतीने जगावे लागेल. ‘एसएमएस’ पद्धतीचा वापर करून कार्य करावे आणि जेवढे टाळता येऊ शकत असेल, त्या अनावश्‍यक गोष्टी जरूर टाळाव्यात. शिक्षक होण्याचे अजुनही स्वप्नचं; शिक्षक भरती पुन्हा कधी सुरू होणार? राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू आहे. त्यामध्ये १००० रुग्णालये आहेत. ज्यामध्ये आपण १०० टक्के कॅशलेस सेवा, एक रुपया न घेता या सगळ्या सुविधा देऊ शकतो. राज्य सरकारचे एकच लक्ष्य राहिले आहे, की सामान्य माणूस हा आमच्या डोळ्यांसमोर आहे, त्या दृष्टिकोनातून धोरणे आखली आहेत. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/358OfQZ
Read More
#MokaleVha : मानसिक ताणांचे शारीरिक परिणाम

सुमेधा रडविली, उदास अशी समोर येऊन बसली. हसतमुख, उत्साही सुमेधाला असे बघून काहीतरी बिनसले आहे, हे लक्षात आले.
‘मॅडम मला सध्या खूप अशक्तपणा जाणवतोय. चक्कर आल्यासारखे वाटते. प्रमोशन मिळाले म्हणून मी किती खूश होते. त्या आनंदात नवीन ब्रँचमध्ये जॉईन झाले. हे प्रमोशन काही मला लाभत नाहीये. म्हणून आज रजा घेऊन तुम्हाला भेटायला आले.’ 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सुमेधा शांत हो. थोडे पाणी पी. मला नीट सगळे सांग.’
‘मॅडम सतत ताण जाणवतोय. कोणतीच कामे नीट होत नाहीत, मग माझी चिडचिड होते. मग येणारा दिवस अजूनच वाईट जातो. मग नैराश्य येऊ लागते. जवळजवळ महिनाभर हेच चालू आहे.’
मी तिचे रुटीन बी.पी. चेकअप केले. सर्व व्यवस्थित होते. आता गरज होती मानसिक तपासणी व उपचारांची. यासाठी तिला अजून बोलते करायला हवे होते.

‘सुमेधा या सगळ्याची सुरुवात ब्रँच बदलल्यावर झाली का? ही ब्रँच पहिल्यापेक्षा थोडी लांब आहे का?’
‘हो मॅडम. मला आधीपेक्षा घरून लवकर निघावे लागते.’ 
‘सुमेधा लवकर उठून आवरून निघायचे, शिवाय तू ऑफिसर असल्याने आपल्याला उशीर झाला तर काय, आपल्या कामात चुका होता कामा नये, सगळ्या स्टाफबरोबर जुळवून कसे घ्यायचे या सगळ्या समस्यांचा डोंगर तुझ्यासमोर आहे.’ 
‘हो, ना. आता यातून बाहेर कशी पडू?’

‘हे बघ सुमेधा भावना निर्माण होणे हा मनुष्य स्वभाव आहे. या भावनांना तू प्रतिसाद दिलास तर तुझे दडपण, भीती वाढेल. त्याची प्रतिक्रिया म्हणून गोंधळ होणे, काम बिघडणे, चिडचिड असे क्रमाने घडेल. त्याने परत लक्षणात वाढ असे चक्र सुरू राहील.’
‘मग मी काय करू?’

‘टाईम मॅनेजमेंट, वर्क लाइफ बॅलन्स या संकल्पना प्रत्यक्षात आण. प्रथम कामांचे नियोजन कर. घर व ऑफिसमधली कामांचे अत्यावश्यक, आवश्यक, नंतर केले तरी चालेल असे वर्गीकरण कर. सुट्टीच्या दिवशी या पद्धतीने सर्व कामांची यादी कर. त्या कामांची पूर्वतयारी, लागणारा वेळ याचा आढावा घे. यामुळे रोजची धावपळ होणार नाही.’ 

‘ऑफिसमधला स्टाफ अनोळखी आहे. त्यांच्याशी कसे जुळेल असे वाटते.’
‘ब्रँचमध्ये सगळ्यांची अनौपचारिक मिटिंग बोलव. त्या सगळ्यांचे कामाच्या संदर्भातील विचार, अडचणी जाणून घे. त्यांना विश्वासात घे. वेळप्रसंगी अनुभवी, तज्ज्ञ लोकांचा सल्ला घे.’

‘हो, नक्कीच. पण मला अशक्तपणा जाणवतो व मधूनमधून चक्कर येते ते कशामुळे?’
‘सुमेधा आपला ताण, भीती शारीरिक लक्षणात प्रतिबिंबित होते. आपण न घडणाऱ्या घटनांचा (worst case scenario) विचार करून स्वतःला शिणवतो. मग चक्कर, धडधड अशी लक्षणे दिसतात. सगळ्यात आधी तुझा दृष्टिकोन बदल. प्रमोशन ही समस्या नसून ती तुला मिळालेली संधी आहे हे लक्षात घे.’
‘हो मी योग्य पद्धतीने विचार करून नियोजन करेन.’

आपण आपल्या भावनांना कसे सामोरे जातो, त्यावर परिणाम अवलंबून असतात. आपण समस्येच्या मुळात जाऊन ती निर्माण होण्याच्या कारणांचा विचार केला पाहिजे. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यावर सकारात्मक विचार केला की आपल्याकडून सकारात्मक कृती घडते व सकारात्मक परिणाम दिसतात.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

#MokaleVha : मानसिक ताणांचे शारीरिक परिणाम सुमेधा रडविली, उदास अशी समोर येऊन बसली. हसतमुख, उत्साही सुमेधाला असे बघून काहीतरी बिनसले आहे, हे लक्षात आले. ‘मॅडम मला सध्या खूप अशक्तपणा जाणवतोय. चक्कर आल्यासारखे वाटते. प्रमोशन मिळाले म्हणून मी किती खूश होते. त्या आनंदात नवीन ब्रँचमध्ये जॉईन झाले. हे प्रमोशन काही मला लाभत नाहीये. म्हणून आज रजा घेऊन तुम्हाला भेटायला आले.’  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘सुमेधा शांत हो. थोडे पाणी पी. मला नीट सगळे सांग.’ ‘मॅडम सतत ताण जाणवतोय. कोणतीच कामे नीट होत नाहीत, मग माझी चिडचिड होते. मग येणारा दिवस अजूनच वाईट जातो. मग नैराश्य येऊ लागते. जवळजवळ महिनाभर हेच चालू आहे.’ मी तिचे रुटीन बी.पी. चेकअप केले. सर्व व्यवस्थित होते. आता गरज होती मानसिक तपासणी व उपचारांची. यासाठी तिला अजून बोलते करायला हवे होते. ‘सुमेधा या सगळ्याची सुरुवात ब्रँच बदलल्यावर झाली का? ही ब्रँच पहिल्यापेक्षा थोडी लांब आहे का?’ ‘हो मॅडम. मला आधीपेक्षा घरून लवकर निघावे लागते.’  ‘सुमेधा लवकर उठून आवरून निघायचे, शिवाय तू ऑफिसर असल्याने आपल्याला उशीर झाला तर काय, आपल्या कामात चुका होता कामा नये, सगळ्या स्टाफबरोबर जुळवून कसे घ्यायचे या सगळ्या समस्यांचा डोंगर तुझ्यासमोर आहे.’  ‘हो, ना. आता यातून बाहेर कशी पडू?’ ‘हे बघ सुमेधा भावना निर्माण होणे हा मनुष्य स्वभाव आहे. या भावनांना तू प्रतिसाद दिलास तर तुझे दडपण, भीती वाढेल. त्याची प्रतिक्रिया म्हणून गोंधळ होणे, काम बिघडणे, चिडचिड असे क्रमाने घडेल. त्याने परत लक्षणात वाढ असे चक्र सुरू राहील.’ ‘मग मी काय करू?’ ‘टाईम मॅनेजमेंट, वर्क लाइफ बॅलन्स या संकल्पना प्रत्यक्षात आण. प्रथम कामांचे नियोजन कर. घर व ऑफिसमधली कामांचे अत्यावश्यक, आवश्यक, नंतर केले तरी चालेल असे वर्गीकरण कर. सुट्टीच्या दिवशी या पद्धतीने सर्व कामांची यादी कर. त्या कामांची पूर्वतयारी, लागणारा वेळ याचा आढावा घे. यामुळे रोजची धावपळ होणार नाही.’  ‘ऑफिसमधला स्टाफ अनोळखी आहे. त्यांच्याशी कसे जुळेल असे वाटते.’ ‘ब्रँचमध्ये सगळ्यांची अनौपचारिक मिटिंग बोलव. त्या सगळ्यांचे कामाच्या संदर्भातील विचार, अडचणी जाणून घे. त्यांना विश्वासात घे. वेळप्रसंगी अनुभवी, तज्ज्ञ लोकांचा सल्ला घे.’ ‘हो, नक्कीच. पण मला अशक्तपणा जाणवतो व मधूनमधून चक्कर येते ते कशामुळे?’ ‘सुमेधा आपला ताण, भीती शारीरिक लक्षणात प्रतिबिंबित होते. आपण न घडणाऱ्या घटनांचा (worst case scenario) विचार करून स्वतःला शिणवतो. मग चक्कर, धडधड अशी लक्षणे दिसतात. सगळ्यात आधी तुझा दृष्टिकोन बदल. प्रमोशन ही समस्या नसून ती तुला मिळालेली संधी आहे हे लक्षात घे.’ ‘हो मी योग्य पद्धतीने विचार करून नियोजन करेन.’ आपण आपल्या भावनांना कसे सामोरे जातो, त्यावर परिणाम अवलंबून असतात. आपण समस्येच्या मुळात जाऊन ती निर्माण होण्याच्या कारणांचा विचार केला पाहिजे. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यावर सकारात्मक विचार केला की आपल्याकडून सकारात्मक कृती घडते व सकारात्मक परिणाम दिसतात. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lTqxOx
Read More