Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, September 5, 2020

चीनबाबत अमेरिकेचे धोरण अपयशी - रॉबर्ट ओब्रायन

वॉशिंग्टन - गेल्या ४० वर्षांमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र धोरण चीनबाबत सर्वाधिक अपयशी ठरले, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटले आहे, ते व्हाइट व्हाउसमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धोरण बदलण्यासाठी पावले उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीन श्रीमंत झाल्यानंतर अमेरिकेने चीनच्या चुकीच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले. चीनने अमेरिकेचे आयपी ॲड्रेस चोरले. चीनच्या शेजारी देशांना धमक्या देणे, स्वत:च्याच नागरिकांना तियानमेन चौकात धमकावण्यासारख्या गोष्टींकडेही अमेरिकेने दुर्लक्ष केले, असा घरचा आहेरही त्यांनी दिला.  ते पुढे म्हणाले, की जगात प्रत्येक देश अमेरिकेसारखा अधिक लोकशाहीवादी व्हावा, असे अमेरिकेला वाटते. मात्र, त्याच्या विरुद्ध घडले. चीनमध्ये वर्षानुवर्षे मानवाधिकारांचे अधिक उल्लंघन होत आहे. चीनकडून बौद्धिक संपत्तीची एवढी मोठी लूट होत आहे की, अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हिस्टिगेशन या खात्याचे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी चीनने अमेरिकेच्या बौद्धिक संपत्तीच्या लुटीतून पैशांचे मानवी इतिहासातील सर्वांत मोठे हस्तांतरण केले, असा आरोप केला.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चीनबाबत अमेरिकेचे धोरण अपयशी - रॉबर्ट ओब्रायन वॉशिंग्टन - गेल्या ४० वर्षांमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र धोरण चीनबाबत सर्वाधिक अपयशी ठरले, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटले आहे, ते व्हाइट व्हाउसमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धोरण बदलण्यासाठी पावले उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीन श्रीमंत झाल्यानंतर अमेरिकेने चीनच्या चुकीच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले. चीनने अमेरिकेचे आयपी ॲड्रेस चोरले. चीनच्या शेजारी देशांना धमक्या देणे, स्वत:च्याच नागरिकांना तियानमेन चौकात धमकावण्यासारख्या गोष्टींकडेही अमेरिकेने दुर्लक्ष केले, असा घरचा आहेरही त्यांनी दिला.  ते पुढे म्हणाले, की जगात प्रत्येक देश अमेरिकेसारखा अधिक लोकशाहीवादी व्हावा, असे अमेरिकेला वाटते. मात्र, त्याच्या विरुद्ध घडले. चीनमध्ये वर्षानुवर्षे मानवाधिकारांचे अधिक उल्लंघन होत आहे. चीनकडून बौद्धिक संपत्तीची एवढी मोठी लूट होत आहे की, अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हिस्टिगेशन या खात्याचे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी चीनने अमेरिकेच्या बौद्धिक संपत्तीच्या लुटीतून पैशांचे मानवी इतिहासातील सर्वांत मोठे हस्तांतरण केले, असा आरोप केला. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bwxvEs
Read More
तुम्ही खासगी कंपनी स्थापा, आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ - अजित पवार

पुणे - तुम्ही खासगी कंपनी स्थापन करताय, हा गावांच्या विकासासाठी चांगलाच निर्णय आहे. त्यामुळे हा विषय केवळ पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता, तो राज्यातील अन्य सर्वच जिल्हा परिषदांननाही अंमलात आणता आले पाहिजे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त खासगी कंपनी स्थापन करा. आम्ही याबाबत राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्र्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. ५) पुणे जिल्हा परिषदेला दिले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या विषयावर मार्ग काढण्यासाठी लवकरच या विषयांशी संबंधित सर्वच जसे ग्रामविकास, महसूल, पर्यावरण, उद्योग उर्जा आदींसह विविध विभागांची संयुक्त बैठक घेतली जाईल, अशी ग्वाहीही पवार यांनी यावेळी दिली.

पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील गावां-गावांतील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन जिल्हा परिषदेची स्वतंत्र खासगी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्वसाधारण सभेची मंजुरी घेत, हा निर्णय अंतिम केला आहे. मात्र राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या या ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित येत आहेत. त्यामुळे या संस्थांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्य सरकारची परवानगी घेणे अनिवार्य आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे.

- कोरोनाला आळा घालण्यासाठी शरद पवार मैदानात; पुण्यात घेतल्या बैठकांवर बैठका!​

दरम्यान, पवार यांनी आज पुण्यात जिल्हा परिषदेच्या राज्य सरकारकडील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीत उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी हा मुद्दा पवार यांच्यापुढे उपस्थित केला ‌ अशा पद्धतीचा प्रयत्न करणारी पुणे ही देशातील पहिलीच जिल्हा परिषद असल्याचे शिवतारे यांनी ‌पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

- Breaking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; १२ सप्टेंबरपासून धावणार विशेष रेल्वेगाड्या!​

पवार म्हणाले, "हा प्रश्न केवळ पुणे जिल्हा परिषदेचापुरता अन्य जिल्हा परिषदांच्या बाबतीतही निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्हा परिषदांनाही अशी खासगी कंपनी स्थापन करता आली पाहिजे. यासाठी याबाबत लवकरच राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल."

झेडपीच्या कंपनीचे विश्र्वत कोण असणार?
- मुख्य कार्यकारी अधिकारी.
- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.
- जिल्हा परिषद अध्यक्ष.
- जिल्हा परिषद उपाध्यक्ष.
- विषय समित्यांचे सभापती.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तुम्ही खासगी कंपनी स्थापा, आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ - अजित पवार पुणे - तुम्ही खासगी कंपनी स्थापन करताय, हा गावांच्या विकासासाठी चांगलाच निर्णय आहे. त्यामुळे हा विषय केवळ पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता, तो राज्यातील अन्य सर्वच जिल्हा परिषदांननाही अंमलात आणता आले पाहिजे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त खासगी कंपनी स्थापन करा. आम्ही याबाबत राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्र्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. ५) पुणे जिल्हा परिषदेला दिले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या विषयावर मार्ग काढण्यासाठी लवकरच या विषयांशी संबंधित सर्वच जसे ग्रामविकास, महसूल, पर्यावरण, उद्योग उर्जा आदींसह विविध विभागांची संयुक्त बैठक घेतली जाईल, अशी ग्वाहीही पवार यांनी यावेळी दिली. पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील गावां-गावांतील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन जिल्हा परिषदेची स्वतंत्र खासगी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्वसाधारण सभेची मंजुरी घेत, हा निर्णय अंतिम केला आहे. मात्र राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या या ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित येत आहेत. त्यामुळे या संस्थांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्य सरकारची परवानगी घेणे अनिवार्य आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. - कोरोनाला आळा घालण्यासाठी शरद पवार मैदानात; पुण्यात घेतल्या बैठकांवर बैठका!​ दरम्यान, पवार यांनी आज पुण्यात जिल्हा परिषदेच्या राज्य सरकारकडील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीत उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी हा मुद्दा पवार यांच्यापुढे उपस्थित केला ‌ अशा पद्धतीचा प्रयत्न करणारी पुणे ही देशातील पहिलीच जिल्हा परिषद असल्याचे शिवतारे यांनी ‌पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. - Breaking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; १२ सप्टेंबरपासून धावणार विशेष रेल्वेगाड्या!​ पवार म्हणाले, "हा प्रश्न केवळ पुणे जिल्हा परिषदेचापुरता अन्य जिल्हा परिषदांच्या बाबतीतही निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्हा परिषदांनाही अशी खासगी कंपनी स्थापन करता आली पाहिजे. यासाठी याबाबत लवकरच राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल." झेडपीच्या कंपनीचे विश्र्वत कोण असणार? - मुख्य कार्यकारी अधिकारी. - अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी. - जिल्हा परिषद अध्यक्ष. - जिल्हा परिषद उपाध्यक्ष. - विषय समित्यांचे सभापती. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZatP6w
Read More
बापरे! - लंपीचा वाघांनाही धोका

नागपूर :  देशासह राज्यात गेल्या पाच महिन्यापासून कोरोना विरुद्ध लढाई सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोनावर अद्यापही लस नसल्याने माणसातील प्रतिकार शक्ती वाढविण्यावरच भर दिला जात असतानाच राज्यातील जनावरांमध्येही लंपी या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केल्याने पशुपालक चिंतेत सापडले आहेत. या संसर्गजन्य आजार आता पूर्व विदर्भातील जंगला शेजारील काही गावांमधील जनावरांना झाल्याने वन्यप्राण्यांनाही हा आजार होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळेच वन विभागाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

गोचीड, गोमाशी किंवा आजारी जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांमध्ये लंपी स्कीन डिसीस या साथीच्या आजाराने घेरले आहे. हा आजार गायी, म्हशी, शेळ्यांमध्ये दिसून येत असला तरी गायींमध्ये याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. रानगवा हा गायवर्गीय प्राणी असल्याने यामध्ये याचा संसर्ग जाणवू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जंगला शेजारील गावातील जनावरे जंगलात चराईसाठी जातात. या जनावरांची शिकार करून वाघ, बिबट, कोल्हे, रानकुत्रा हे वन्यप्राणी खातात. त्यामुळे यातूनही त्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे का याबद्दल वनाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, त्यांनी लंपी हा आजार गायवर्गीय जनावरांना होतो. रानगवा हा गायवर्गीय प्राणी असल्याने याच्या माध्यमातून या आजाराचा शिरकाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पात होऊ नये म्हणून सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच जंगलाशेजारील, बफर आणि जंगलातील गावांमधील जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने हे काम युद्धपातळीवर या भागात सुरू आहेत. या आजाराची नोंद अद्यापही वन्यप्राण्यांमध्ये झालेली नसली तरी सर्वस्तरावर काळजी घेतली जात आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. 

बापरे... दिडशे दिवसांत तब्बल १९ लाख कोटींचे नुकसान, काय असावे कारण

लंपी स्किन डिसीज हा संसर्गजन्य आजार असल्याने यामुळे आजारी असलेल्या जनावरांच्या सांनिध्यात येणारे जनावरे बाधीत होत असतात. त्यामुळे आजारी जनावरांना विलगीकरणात ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आलेल्या आहेत. या जनावरांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने लसीकरण केले जात आहे. त्याच बरोबर जनावरांच्या रक्ताच्या नमुन्याचेही तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आमच्याकडे अशा प्रकारच्या आजाराची नोंद नसल्याचे सांगितले. 

 

जंगलाशेजारील गावांमधील जनावरांचे लसीकरण 

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, कोळसा या दोन गावांमधील पाळीव जनावरांना लंपी आजाराचे लसीकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पशुवैद्यकीय विभागाकडून जंगलाशेजारील गावांमधील जनावरांवरही लसीकरण केले जात आहे. त्याचा प्रसार वन्यप्राण्यांना होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. इतर प्रकल्पाकडून याबद्दल कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. त्याची माहिती आल्यानंतर त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातील.  नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बापरे! - लंपीचा वाघांनाही धोका नागपूर :  देशासह राज्यात गेल्या पाच महिन्यापासून कोरोना विरुद्ध लढाई सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोनावर अद्यापही लस नसल्याने माणसातील प्रतिकार शक्ती वाढविण्यावरच भर दिला जात असतानाच राज्यातील जनावरांमध्येही लंपी या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केल्याने पशुपालक चिंतेत सापडले आहेत. या संसर्गजन्य आजार आता पूर्व विदर्भातील जंगला शेजारील काही गावांमधील जनावरांना झाल्याने वन्यप्राण्यांनाही हा आजार होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळेच वन विभागाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.  गोचीड, गोमाशी किंवा आजारी जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांमध्ये लंपी स्कीन डिसीस या साथीच्या आजाराने घेरले आहे. हा आजार गायी, म्हशी, शेळ्यांमध्ये दिसून येत असला तरी गायींमध्ये याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. रानगवा हा गायवर्गीय प्राणी असल्याने यामध्ये याचा संसर्ग जाणवू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जंगला शेजारील गावातील जनावरे जंगलात चराईसाठी जातात. या जनावरांची शिकार करून वाघ, बिबट, कोल्हे, रानकुत्रा हे वन्यप्राणी खातात. त्यामुळे यातूनही त्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे का याबद्दल वनाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, त्यांनी लंपी हा आजार गायवर्गीय जनावरांना होतो. रानगवा हा गायवर्गीय प्राणी असल्याने याच्या माध्यमातून या आजाराचा शिरकाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पात होऊ नये म्हणून सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच जंगलाशेजारील, बफर आणि जंगलातील गावांमधील जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने हे काम युद्धपातळीवर या भागात सुरू आहेत. या आजाराची नोंद अद्यापही वन्यप्राण्यांमध्ये झालेली नसली तरी सर्वस्तरावर काळजी घेतली जात आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.  बापरे... दिडशे दिवसांत तब्बल १९ लाख कोटींचे नुकसान, काय असावे कारण लंपी स्किन डिसीज हा संसर्गजन्य आजार असल्याने यामुळे आजारी असलेल्या जनावरांच्या सांनिध्यात येणारे जनावरे बाधीत होत असतात. त्यामुळे आजारी जनावरांना विलगीकरणात ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आलेल्या आहेत. या जनावरांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने लसीकरण केले जात आहे. त्याच बरोबर जनावरांच्या रक्ताच्या नमुन्याचेही तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आमच्याकडे अशा प्रकारच्या आजाराची नोंद नसल्याचे सांगितले.    जंगलाशेजारील गावांमधील जनावरांचे लसीकरण  ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, कोळसा या दोन गावांमधील पाळीव जनावरांना लंपी आजाराचे लसीकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पशुवैद्यकीय विभागाकडून जंगलाशेजारील गावांमधील जनावरांवरही लसीकरण केले जात आहे. त्याचा प्रसार वन्यप्राण्यांना होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. इतर प्रकल्पाकडून याबद्दल कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. त्याची माहिती आल्यानंतर त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातील.  नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2F5yDD8
Read More
विस्कळीत पाण्याच्या गोंधळावरून सोमवारी महापालिकेत बैठक नेमका दोष कोणाचा?

पिंपरी - महावितरणचा फिडर शुक्रवारी (ता. 4) रात्री बंद पडला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतपुरवठा खंडित झाला. परिणामी अशुद्ध जलउपसा बंद झाला. त्यामुळे गुरुवार, शुक्रवार व शनिवारी, रविवारी सलग चार दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरीक हैराण झाले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे सांगून महापालिकेनेही हात झटकले आहेत. नागरीकांची पाण्याविना दैना झाली, यामागे दोष नेमका कोणाचा हा प्रश्‍न निर्माण झाला आहे याबाबत पाणीपुरवठा विभागाने सोमवारी (ता.7)सर्व अभियंत्याची बैठक बोलावली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 943 नवे रुग्ण; 24 जणांचा मृत्यू

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जल उपसा केला जातो. त्यासाठी रावेत येथे पंप हाऊस उभारले आहे. त्यातून वीस पंपाद्वारे अशुद्ध पाणी उचलून पाईपद्वारे निगडी प्राधिकरण सेक्‍टर 22 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. शुध्द केलेले पाणी वेगवेगळ्या भागातील टाक्‍यांमध्ये पोचवून त्याद्वारे शहरात वितरित केले जाते.

कोरोनामुक्त झालेले नागरिक प्लाझ्मा दानासाठी पुढे येताहेत पण...

रावेत बंधारा येथून दररोज सरासरी 510 दशलक्ष लिटर अशुद्ध जल उपसा होतो. मात्र, समन्याय पद्धतीने सर्वांना समान पाणी मिळावे यासाठी, गेल्या 25 नोव्हेंबर पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय, गुरुवारी रावेत अशुद्ध जल उपसा केंद्र, निगडी जल शुद्धीकरण केंद्र व शहरातील काही ठिकाणच्या पाणी वितरण यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यात आली.

त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित झाला. आता विजपुरवठा खंडित झाल्याने अशुद्ध जल उपसा बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

पाणी जपून वापरा
शुक्रवारी (ता. 4) रात्री 11 वाजता फिडर नादुरुस्त झाल्याने, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र येथील विद्युतपुरवठा खंडित होऊन संपूर्ण पंपिंग बंद झाले आहे. त्यामुळे, शहरातील ता.5 व रविवार ता.6 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. दुरुस्तीचे काम सुरु असून विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरावे असे पाणीपुरवठा विभागने सांगितले.

शनिवारीही (ता.5)सायंकाळी अर्धा तास वीजपुरवठा खंडीत झाला. याबाबत महावितरणाला दोष देत नाही. मात्र, या चुका पुन्हा होऊ नयेत. शेवटी काही काळ वीज बंद राहिली. वेळ तर गेलाच. पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाणी पुरवठा विभागतील अभियंत्याची बैठक सोमवारी आहे. भविष्यात अशा चुका होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जाईल.
- रामदास तांबे, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विस्कळीत पाण्याच्या गोंधळावरून सोमवारी महापालिकेत बैठक नेमका दोष कोणाचा? पिंपरी - महावितरणचा फिडर शुक्रवारी (ता. 4) रात्री बंद पडला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतपुरवठा खंडित झाला. परिणामी अशुद्ध जलउपसा बंद झाला. त्यामुळे गुरुवार, शुक्रवार व शनिवारी, रविवारी सलग चार दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरीक हैराण झाले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे सांगून महापालिकेनेही हात झटकले आहेत. नागरीकांची पाण्याविना दैना झाली, यामागे दोष नेमका कोणाचा हा प्रश्‍न निर्माण झाला आहे याबाबत पाणीपुरवठा विभागाने सोमवारी (ता.7)सर्व अभियंत्याची बैठक बोलावली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 943 नवे रुग्ण; 24 जणांचा मृत्यू शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जल उपसा केला जातो. त्यासाठी रावेत येथे पंप हाऊस उभारले आहे. त्यातून वीस पंपाद्वारे अशुद्ध पाणी उचलून पाईपद्वारे निगडी प्राधिकरण सेक्‍टर 22 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. शुध्द केलेले पाणी वेगवेगळ्या भागातील टाक्‍यांमध्ये पोचवून त्याद्वारे शहरात वितरित केले जाते. कोरोनामुक्त झालेले नागरिक प्लाझ्मा दानासाठी पुढे येताहेत पण... रावेत बंधारा येथून दररोज सरासरी 510 दशलक्ष लिटर अशुद्ध जल उपसा होतो. मात्र, समन्याय पद्धतीने सर्वांना समान पाणी मिळावे यासाठी, गेल्या 25 नोव्हेंबर पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय, गुरुवारी रावेत अशुद्ध जल उपसा केंद्र, निगडी जल शुद्धीकरण केंद्र व शहरातील काही ठिकाणच्या पाणी वितरण यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित झाला. आता विजपुरवठा खंडित झाल्याने अशुद्ध जल उपसा बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार पाणी जपून वापरा शुक्रवारी (ता. 4) रात्री 11 वाजता फिडर नादुरुस्त झाल्याने, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र येथील विद्युतपुरवठा खंडित होऊन संपूर्ण पंपिंग बंद झाले आहे. त्यामुळे, शहरातील ता.5 व रविवार ता.6 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. दुरुस्तीचे काम सुरु असून विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरावे असे पाणीपुरवठा विभागने सांगितले. शनिवारीही (ता.5)सायंकाळी अर्धा तास वीजपुरवठा खंडीत झाला. याबाबत महावितरणाला दोष देत नाही. मात्र, या चुका पुन्हा होऊ नयेत. शेवटी काही काळ वीज बंद राहिली. वेळ तर गेलाच. पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाणी पुरवठा विभागतील अभियंत्याची बैठक सोमवारी आहे. भविष्यात अशा चुका होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जाईल. - रामदास तांबे, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35bcAWf
Read More
मुंबईत कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवा! मुख्यमंत्र्यांचे BMC च्या अधिकाऱ्यांना निर्देश 

मुंबई : मुंबईत कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवून एका रुग्णामागे 20 नव्हे, तर 30 जणांचे ट्रेसिंग करा. 48 तासांच्या आत हाय रिस्क व्यक्तींच्या चाचण्या करा, असे निर्देश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. अनलॉकमुळे सध्या इमारतींमधील रुग्णांची संख्या वाढली असून 80 ते 85 टक्के रुग्ण या भागांमधील आहे. त्यामुळे वाढीव ऑक्‍सिजन आणि आयसीयू बेड्‌स वाढवण्याची तयारी करण्याचे आदेशही ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. 

'शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे'! या बड्या नेत्याने दिला सल्ला

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही राज्यस्तरीय मोहीम राबवत आहोत. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

काही निर्बंध शिथिल केल्यानंतर मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, "चेस द व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वच्छतेला महत्त्व देणे अत्यंत गरजेचे. मास्क या पिढीसाठी आवश्‍यक बाब बनली आहे. लोकांनी स्वतःहून काळजी घ्यावी त्यादृष्टीने जागृती करणे आवश्‍यक आहे.' 

अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

अजून दोन ते तीन महिने आव्हान 
धारावी आणि वरळीत पालिका कोरोना रोखण्यात यशस्वी झाली. त्यासाठी कौतुकही झाले, पण त्यामुळे हुरळून जात ढिलाई न दाखवता अधिक जोमाने काम करा. मुंबईत दिवसाला 1000 किंवा 1100 रुग्ण सापडत असताना आपण या साथीच्या शिखरावर आहोत असे वाटत होते, पण गेल्या दोन दिवसांपासून 1900 आणि 1700 रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचे आहे, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. 

ऑक्‍सिजनचे उत्पादन वाढवणार 
मुंबईत आणखी पाच ते सहा हजार बेडस्‌ उपलब्ध करून देऊ शकतो, तसेच ऑक्‍सिजन बेड आणि आयसीयू बेडच्या नियोजनाची गरज असल्याचे मत बैठकीत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईतच नव्हे, तर राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज लक्षात घेऊन राज्यात ऑक्‍सिजनचे उत्पादन वाढवून ते जास्तीत जास्त प्रमाणात वैद्यकीय कारणासाठी उपयोगात आणण्यासाठी आदेश काढावे लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

सुशांतसिंग राजपुतचा नोकर दिपेश सावंतला एनसीबीकडून अटक

कोव्हिडपश्‍चात उपचार महत्त्वाचे 
कोव्हिडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत पुन्हा दुष्परिणाम दिसत आहेत; मात्र हे दुष्परिणाम कोव्हिडचेच आहेत की आक्रमक औषधोपचाराचे आहेत, याची तपासणी केली पाहिजे. पोस्ट कोव्हिड उपचारांना तितकेच महत्त्व आहे. त्यासाठी चांगली व्यवस्था उभारा. त्यामुळे मृत्यू दर कमी होऊ शकतो, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. 
------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईत कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवा! मुख्यमंत्र्यांचे BMC च्या अधिकाऱ्यांना निर्देश  मुंबई : मुंबईत कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवून एका रुग्णामागे 20 नव्हे, तर 30 जणांचे ट्रेसिंग करा. 48 तासांच्या आत हाय रिस्क व्यक्तींच्या चाचण्या करा, असे निर्देश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. अनलॉकमुळे सध्या इमारतींमधील रुग्णांची संख्या वाढली असून 80 ते 85 टक्के रुग्ण या भागांमधील आहे. त्यामुळे वाढीव ऑक्‍सिजन आणि आयसीयू बेड्‌स वाढवण्याची तयारी करण्याचे आदेशही ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.  'शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे'! या बड्या नेत्याने दिला सल्ला कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही राज्यस्तरीय मोहीम राबवत आहोत. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  काही निर्बंध शिथिल केल्यानंतर मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, "चेस द व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वच्छतेला महत्त्व देणे अत्यंत गरजेचे. मास्क या पिढीसाठी आवश्‍यक बाब बनली आहे. लोकांनी स्वतःहून काळजी घ्यावी त्यादृष्टीने जागृती करणे आवश्‍यक आहे.'  अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण अजून दोन ते तीन महिने आव्हान  धारावी आणि वरळीत पालिका कोरोना रोखण्यात यशस्वी झाली. त्यासाठी कौतुकही झाले, पण त्यामुळे हुरळून जात ढिलाई न दाखवता अधिक जोमाने काम करा. मुंबईत दिवसाला 1000 किंवा 1100 रुग्ण सापडत असताना आपण या साथीच्या शिखरावर आहोत असे वाटत होते, पण गेल्या दोन दिवसांपासून 1900 आणि 1700 रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचे आहे, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.  ऑक्‍सिजनचे उत्पादन वाढवणार  मुंबईत आणखी पाच ते सहा हजार बेडस्‌ उपलब्ध करून देऊ शकतो, तसेच ऑक्‍सिजन बेड आणि आयसीयू बेडच्या नियोजनाची गरज असल्याचे मत बैठकीत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईतच नव्हे, तर राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज लक्षात घेऊन राज्यात ऑक्‍सिजनचे उत्पादन वाढवून ते जास्तीत जास्त प्रमाणात वैद्यकीय कारणासाठी उपयोगात आणण्यासाठी आदेश काढावे लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.  सुशांतसिंग राजपुतचा नोकर दिपेश सावंतला एनसीबीकडून अटक कोव्हिडपश्‍चात उपचार महत्त्वाचे  कोव्हिडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत पुन्हा दुष्परिणाम दिसत आहेत; मात्र हे दुष्परिणाम कोव्हिडचेच आहेत की आक्रमक औषधोपचाराचे आहेत, याची तपासणी केली पाहिजे. पोस्ट कोव्हिड उपचारांना तितकेच महत्त्व आहे. त्यासाठी चांगली व्यवस्था उभारा. त्यामुळे मृत्यू दर कमी होऊ शकतो, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.  ------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z8Ue4u
Read More

Friday, September 4, 2020

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपामधून मुक्त करा; पुरोहितची उच्च न्यायालयात याचिका 

मुंबई: सन 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितने मुंबई उच्च न्यायालयात या आरोपामधून मुक्त करावे, यासाठी याचिका दाखल केली आहे. एनआयएने या मागणीला विरोध केला आहे. 

दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे आज यावर सुनावणी झाली. पुरोहित लष्करी सेवेत होता. अधिकारी म्हणूनच तो काही बैठकांना वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे हजर होता. त्यामुळे त्याला आरोपी करण्यासाठी प्रथम संरक्षण विभागाची परवानगी आवश्‍यक आहे, असा युक्तिवाद पुरोहितच्या वतीने ऍड. मुकुल रोहतगी यांनी केला. त्याला या प्रकरणात अडकविले आहे, असा दावाही त्यांनी केला. 

मात्र, एनआयएने या दाव्याचे खंडन केले. पुरोहितने बॉम्बस्फोटच्या कटकारस्थानाशी संबंधित बैठकांना हजेरी लावली तेव्हा तो लष्करी सेवेत नव्हता. त्यामुळे त्याला आरोपी करण्यासाठी संरक्षण विभागाच्या परवानगीची गरज नाही, असे तपास यंत्रणेने म्हटले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. 

क्रॉफर्ड मार्केट अपघात प्रकरण; चालकाच्या मानसिक स्थितीची तपासणी; परवाना रद्द करण्याबाबत पोलिसांची विनंती

मालेगावमध्ये सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहा जण मृत्युमुखी पडले होते; तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. खासदार प्रज्ञासिंह ठाकूरदेखील यामध्ये आरोपी आहे. 

यापूर्वी याचिका 
पुरोहितने यापूर्वी विशेष आणि उच्च न्यायालयात आरोपमुक्त होण्यासाठी याचिका केल्या होत्या. मात्र, त्या अमान्य झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा तो नवीन याचिका करू शकत नाही, असेही एनआयएने म्हटले. यावर पुरोहितने लेखी खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपामधून मुक्त करा; पुरोहितची उच्च न्यायालयात याचिका  मुंबई: सन 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितने मुंबई उच्च न्यायालयात या आरोपामधून मुक्त करावे, यासाठी याचिका दाखल केली आहे. एनआयएने या मागणीला विरोध केला आहे.  दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे आज यावर सुनावणी झाली. पुरोहित लष्करी सेवेत होता. अधिकारी म्हणूनच तो काही बैठकांना वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे हजर होता. त्यामुळे त्याला आरोपी करण्यासाठी प्रथम संरक्षण विभागाची परवानगी आवश्‍यक आहे, असा युक्तिवाद पुरोहितच्या वतीने ऍड. मुकुल रोहतगी यांनी केला. त्याला या प्रकरणात अडकविले आहे, असा दावाही त्यांनी केला.  मात्र, एनआयएने या दाव्याचे खंडन केले. पुरोहितने बॉम्बस्फोटच्या कटकारस्थानाशी संबंधित बैठकांना हजेरी लावली तेव्हा तो लष्करी सेवेत नव्हता. त्यामुळे त्याला आरोपी करण्यासाठी संरक्षण विभागाच्या परवानगीची गरज नाही, असे तपास यंत्रणेने म्हटले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 23 सप्टेंबर रोजी होणार आहे.  क्रॉफर्ड मार्केट अपघात प्रकरण; चालकाच्या मानसिक स्थितीची तपासणी; परवाना रद्द करण्याबाबत पोलिसांची विनंती मालेगावमध्ये सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहा जण मृत्युमुखी पडले होते; तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. खासदार प्रज्ञासिंह ठाकूरदेखील यामध्ये आरोपी आहे.  यापूर्वी याचिका  पुरोहितने यापूर्वी विशेष आणि उच्च न्यायालयात आरोपमुक्त होण्यासाठी याचिका केल्या होत्या. मात्र, त्या अमान्य झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा तो नवीन याचिका करू शकत नाही, असेही एनआयएने म्हटले. यावर पुरोहितने लेखी खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jMtyON
Read More
नेटवर्कविना अनेक अडचणी, आवाज उठवताच घेतली दखल

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बीएसएनएल अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर दिली गेल्याने कलंबिस्त येथील समस्यांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आजच्या आज ठप्प असलेली सेवा पूर्ववत केली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले. 

गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना बीएसएनएलची सेवा मिळत नव्हती. बीएसएनएलची नेटवर्क सेवा, फोन बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फ्राॅम होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील लोकांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विजय कदम यांचे लक्ष वेधले होते.

याबाबत वारंवार तक्रार करून दखल न घेतल्याने कदम यांनी आक्रमक होत याचा संबंधित अधिकाऱ्याला जाब विचाराला. या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर दिली गेल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना जाब विचारला. 
बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्याला समज देण्यात आली.

आजच्या आज ठप्प असलेली सेवा पूर्ववत केली जाईल, असे आश्‍वासन यावेळी तेथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. या घटनेबाबत तसेच कोविड काळात यंत्रणेवर आलेला ताण, तसेच ग्राहकांची होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून निदर्शनास आणून देत जनतेला न्याय मिळवून देवू, असे मत राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले. यावेळी न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, उद्योग व व्यापारचे कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, पद्मराज मुणगेकर, आर्यन रेडीज आदी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नेटवर्कविना अनेक अडचणी, आवाज उठवताच घेतली दखल सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बीएसएनएल अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर दिली गेल्याने कलंबिस्त येथील समस्यांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आजच्या आज ठप्प असलेली सेवा पूर्ववत केली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले.  गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना बीएसएनएलची सेवा मिळत नव्हती. बीएसएनएलची नेटवर्क सेवा, फोन बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फ्राॅम होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील लोकांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विजय कदम यांचे लक्ष वेधले होते. याबाबत वारंवार तक्रार करून दखल न घेतल्याने कदम यांनी आक्रमक होत याचा संबंधित अधिकाऱ्याला जाब विचाराला. या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर दिली गेल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना जाब विचारला.  बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्याला समज देण्यात आली. आजच्या आज ठप्प असलेली सेवा पूर्ववत केली जाईल, असे आश्‍वासन यावेळी तेथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. या घटनेबाबत तसेच कोविड काळात यंत्रणेवर आलेला ताण, तसेच ग्राहकांची होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून निदर्शनास आणून देत जनतेला न्याय मिळवून देवू, असे मत राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले. यावेळी न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, उद्योग व व्यापारचे कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, पद्मराज मुणगेकर, आर्यन रेडीज आदी उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bAxuiT
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 05 सप्टेंबर

पंचांग -
शनिवार - भाद्रपद कृ.3, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय रा.8.52, चंद्रास्त स. 8.45, भारतीय सौर 14, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
शिक्षक दिन
१८८८ - जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून ओळखला जातो. त्यांना १९५४ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
१८९५ - भाषा संशोधक व लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. त्यांनी संपादिलेल्या विविध ग्रंथांत रघुनाथपंडितकृत ‘दमयंती स्वयंवर’, ‘मुक्तेश्वरकृत महाभारताचे आदिपर्व (खंड १ ते ४)’ हे उल्लेखनीय होत. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे आत्मचरित्र त्यांनी संपादिले. ‘द प्रिटिंग प्रेस इन इंडिया’, ‘गोवा री डिस्कव्हर्ड’, ‘द गोवा इंक्रिझिशन’, ‘ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोली’ हे त्यांचे काही ग्रंथ होत. 
१९०४ -  संत वाङ्मयाचे गाढे उपासक व संशोधक डॉ. भा. पं. तथा बाबुरावजी बहिरट यांचा जन्म. त्यांचा ‘फिलॉसॉफी ऑफ ज्ञानदेव’ हा इंग्रजी ग्रंथ संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातही मान्य पावला.
१९१८ - भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी कापड गिरण्या, जलविद्युत प्रकल्प उभारणारे उद्योगपती, सर रतनजी जमशेटजी टाटा यांचे निधन. त्यांच्या नावे उभारलेल्या सर रतन टाटा ट्रस्ट न्यासाला त्यांनी सर्व वैयक्तिक संपत्ती दिली. 
१९२० - बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म. बालसाहित्याचे कथा, कादंबरी, चरित्र, नाटुकली इ. वाङ्‌मय प्रकार त्यांनी समृद्ध केले. सहजसुंदर ओघवती भाषा, चित्रमय वर्णन, बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. नॅशनल बुक ट्रस्टने ‘स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला. बालसाहित्याच्या संदर्भात साडेचारशे पृष्ठांचा ‘मराठी बालसाहित्य - प्रवाह आणि स्वरूप’ हा ग्रंथ लिहिला. 
१९७८ - मराठी साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ रामचंद्र ऊर्फ रॉय किणीकर यांचे निधन. ते मुंबई आकाशवाणीवरील ‘वाऱ्यावरची वरात’ व ‘मेघदूत’ या ध्वनिक्षेपित झालेल्या श्राव्य नियतकालिकांचे निर्माते व लेखक होते. ‘पन्ना’ (हिंदी), ‘भक्त पुंडलिक’, ‘शिर्डीचे साईबाबा’, ‘झाला महार पंढरीनाथ’ इ. चित्रपटांचे कथा-पटकथा, संवादलेखन त्यांनी केले. त्यांच्या ‘ये गं ये गं विठाबाई’ या नाटकास महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले.
१९९२ - ज्येष्ठ उद्योगपती अतुर संगतानी यांचे निधन.
१९९५ - हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार सलील चौधरी यांचे निधन. आजा रे परदेसी, दिल तडप तडप के (मधुमती), जिंदगी ख्वाब है, जागो मोहन प्यारे (जागते रहो), ओ सजना बरखा बहार (परख), ए मेरे प्यारे वतन (काबुलीवाला), कही दूर जब दिन ढल जाये (आनंद), रजनीगंधा फूल तुम्हारे (रजनीगंधा) इ. त्यांची गीते अविस्मरणीय आहेत.
१९९६ - नामवंत मल्याळी कवयित्री बालमणी अम्मा यांची त्यांच्या ‘निवेद्यम’ या काव्यसंग्रहाबद्दल पाचव्या ‘सरस्वती सम्मान’ या पुरस्कारासाठी निवड.
१९९७ - नोबेल पारितोषिक विजेत्या, शांततेचे प्रतीक व मानवतेचे आशास्थान असलेल्या थोर समाजसेविका मदर तेरेसा यांचे निधन. त्यांना ‘भारतरत्न’ या सन्मानाने गौरविण्यात आले.
२००० - सलामीचे फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरीने आपला ठसा उमटविलेले वेस्ट इंडीजचे माजी कसोटी क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्‍स यांचे लंडन येथे निधन.
२००० - गेली सुमारे पाच दशके उत्तमोत्तम व दर्जेदार चित्रपट बनविणारे ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर.
२००२ - ज्येष्ठ तत्त्वचिंतक, महाभारताचे व्यासंगी आणि संतकवी श्री दासगणू महाराजांचे उत्तराधिकारी प्राचार्य अनंतराव दामोदर आठवले तथा स्वामी वरदानंद भारती निधन.
२००४ - शहीद भगतसिंग यांचे बंधू स्वातंत्र्यसैनिक आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री कुलतारसिंग यांचे निधन.

दिनमान -
मेष  : मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : अपेक्षित गाठीभेटी होतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. 
मिथुन : सार्वजनिक, राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. 
कर्क  : तुमच्या क्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. गुरूकृपा लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.
सिंह : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वादविवाद टाळावेत. चिडचिडेपणा जाणवेल.
कन्या : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल. 
तुळ : प्रवास शक्यतो टाळावेत. सहकार्याची अपेक्षा नको. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृश्‍चिक  : नवीन परिचय होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. 
धनु : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. उत्साह वाढेल. आत्मविश्‍वास वाढेल.
मकर  : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 
कुंभ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. 
मीन : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 05 सप्टेंबर पंचांग - शनिवार - भाद्रपद कृ.3, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय रा.8.52, चंद्रास्त स. 8.45, भारतीय सौर 14, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - शिक्षक दिन १८८८ - जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून ओळखला जातो. त्यांना १९५४ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. १८९५ - भाषा संशोधक व लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. त्यांनी संपादिलेल्या विविध ग्रंथांत रघुनाथपंडितकृत ‘दमयंती स्वयंवर’, ‘मुक्तेश्वरकृत महाभारताचे आदिपर्व (खंड १ ते ४)’ हे उल्लेखनीय होत. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे आत्मचरित्र त्यांनी संपादिले. ‘द प्रिटिंग प्रेस इन इंडिया’, ‘गोवा री डिस्कव्हर्ड’, ‘द गोवा इंक्रिझिशन’, ‘ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोली’ हे त्यांचे काही ग्रंथ होत.  १९०४ -  संत वाङ्मयाचे गाढे उपासक व संशोधक डॉ. भा. पं. तथा बाबुरावजी बहिरट यांचा जन्म. त्यांचा ‘फिलॉसॉफी ऑफ ज्ञानदेव’ हा इंग्रजी ग्रंथ संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातही मान्य पावला. १९१८ - भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी कापड गिरण्या, जलविद्युत प्रकल्प उभारणारे उद्योगपती, सर रतनजी जमशेटजी टाटा यांचे निधन. त्यांच्या नावे उभारलेल्या सर रतन टाटा ट्रस्ट न्यासाला त्यांनी सर्व वैयक्तिक संपत्ती दिली.  १९२० - बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म. बालसाहित्याचे कथा, कादंबरी, चरित्र, नाटुकली इ. वाङ्‌मय प्रकार त्यांनी समृद्ध केले. सहजसुंदर ओघवती भाषा, चित्रमय वर्णन, बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. नॅशनल बुक ट्रस्टने ‘स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला. बालसाहित्याच्या संदर्भात साडेचारशे पृष्ठांचा ‘मराठी बालसाहित्य - प्रवाह आणि स्वरूप’ हा ग्रंथ लिहिला.  १९७८ - मराठी साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ रामचंद्र ऊर्फ रॉय किणीकर यांचे निधन. ते मुंबई आकाशवाणीवरील ‘वाऱ्यावरची वरात’ व ‘मेघदूत’ या ध्वनिक्षेपित झालेल्या श्राव्य नियतकालिकांचे निर्माते व लेखक होते. ‘पन्ना’ (हिंदी), ‘भक्त पुंडलिक’, ‘शिर्डीचे साईबाबा’, ‘झाला महार पंढरीनाथ’ इ. चित्रपटांचे कथा-पटकथा, संवादलेखन त्यांनी केले. त्यांच्या ‘ये गं ये गं विठाबाई’ या नाटकास महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. १९९२ - ज्येष्ठ उद्योगपती अतुर संगतानी यांचे निधन. १९९५ - हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार सलील चौधरी यांचे निधन. आजा रे परदेसी, दिल तडप तडप के (मधुमती), जिंदगी ख्वाब है, जागो मोहन प्यारे (जागते रहो), ओ सजना बरखा बहार (परख), ए मेरे प्यारे वतन (काबुलीवाला), कही दूर जब दिन ढल जाये (आनंद), रजनीगंधा फूल तुम्हारे (रजनीगंधा) इ. त्यांची गीते अविस्मरणीय आहेत. १९९६ - नामवंत मल्याळी कवयित्री बालमणी अम्मा यांची त्यांच्या ‘निवेद्यम’ या काव्यसंग्रहाबद्दल पाचव्या ‘सरस्वती सम्मान’ या पुरस्कारासाठी निवड. १९९७ - नोबेल पारितोषिक विजेत्या, शांततेचे प्रतीक व मानवतेचे आशास्थान असलेल्या थोर समाजसेविका मदर तेरेसा यांचे निधन. त्यांना ‘भारतरत्न’ या सन्मानाने गौरविण्यात आले. २००० - सलामीचे फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरीने आपला ठसा उमटविलेले वेस्ट इंडीजचे माजी कसोटी क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्‍स यांचे लंडन येथे निधन. २००० - गेली सुमारे पाच दशके उत्तमोत्तम व दर्जेदार चित्रपट बनविणारे ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर. २००२ - ज्येष्ठ तत्त्वचिंतक, महाभारताचे व्यासंगी आणि संतकवी श्री दासगणू महाराजांचे उत्तराधिकारी प्राचार्य अनंतराव दामोदर आठवले तथा स्वामी वरदानंद भारती निधन. २००४ - शहीद भगतसिंग यांचे बंधू स्वातंत्र्यसैनिक आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री कुलतारसिंग यांचे निधन. दिनमान - मेष  : मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. वृषभ : अपेक्षित गाठीभेटी होतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल.  मिथुन : सार्वजनिक, राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.  कर्क  : तुमच्या क्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. गुरूकृपा लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल. सिंह : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वादविवाद टाळावेत. चिडचिडेपणा जाणवेल. कन्या : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.  तुळ : प्रवास शक्यतो टाळावेत. सहकार्याची अपेक्षा नको. मानसिक अस्वस्थता जाणवेल. वृश्‍चिक  : नवीन परिचय होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.  धनु : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. उत्साह वाढेल. आत्मविश्‍वास वाढेल. मकर  : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.  कुंभ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.  मीन : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QXqweg
Read More
जालन्यात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

जालन्यात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

September 04, 2020 0 Comments
पानशेंद्रामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3jK...
Read More
मध्य रेल्वे 'या' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष गाड्या चालवणार

मध्य रेल्वे 'या' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष गाड्या चालवणार

September 04, 2020 0 Comments
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ४, ५ आणि ६  सप्टेंबर २०२० रोजी मध्य रेल्वे  विशेष गा...
Read More
शिक्षक दिन: डीएडचे शिक्षण म्हणजे बेरोजगारी असे तरुणांना का वाटते?
स्मशानभूमीत स्वॅब घेतल्याचा आक्षेप, कुठले हे प्रकरण? वाचा...

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोळपे येथील आत्महत्याग्रस्त व्यक्तींचे रात्री उशिरा स्मशानभुमीत जाऊन स्वॅब घेतले. या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये कोरोनाबद्दलची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने स्वॅब घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वजा मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे केली आहे.

जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिलेल्या निवेदनात श्री.काझी यांनी म्हटले आहे की, 29 ऑगस्टला कोळपे बौध्दवाडी येथील महादेव सखाराम कांबळे यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ग्रामीण रूग्णालय वैभववाडी येथे आणला; परंतु तेथील डॉक्‍टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

ते शव कोळपे येथे नेण्यात आले; परंतु मृताचे नातेवाईक मुंबईहून येणार असल्यामुळे अंत्यविधी करण्यात आले नव्हते. त्याच रात्री दीड वाजता शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या डॉक्‍टरने स्मशानात जाऊन स्वॅब घेतले. या सर्व प्रकारामुळे कोळपे येथील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्वॅब त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून घेतला. स्वॅब घेण्यापुर्वी त्यांनी वरिष्ठांची पुर्वपरवानगी घेतली आहे का ?

शवविच्छेदनापुर्वी स्वॅब घेतले का असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत या सर्व प्रकाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, प्रशासनाने कारवाई केली नाही तर जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री. काझी यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना दिला आहे. 

पाळत ठेवल्याची तक्रार 
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश पाटील हे आपल्या पाळत ठेवणे, मला त्रास होईल असे कृत्य करणे असे प्रकार वारंवार करीत आहेत. अशा आशयाचा तक्रार अर्ज डॉ.सचिन बरगे यांनी 24 ऑगस्टला पोलीसात दिला आहे. 

 

कोळपे हा गाव कंटेन्मेंट झोन आहे. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठांच्या सल्ल्याने आणि पुर्वपरवानगी घेवुनच मृत व्यक्तीचा स्वॅब घेतला. त्यात वाईट हेतू नव्हता; परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. ज्या दिवशी हा प्रकार झाला त्या दिवशी माझी ड्युटी नव्हती तरीही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी माझ्याकडुन कटरचे काम करून घेतले. याशिवाय वेगवेगळ्या पध्दतीने मला त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यासंदर्भात मी त्यांच्याविरोधात 24 ऑगस्टला देखील पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. 
- डॉ. सचिन बरगे, बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय वैभववाडी. 

 

डॉ. सचिन बरगे हे ग्रामीण रूग्णालयात काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा माझा संबंधच येत नाही; परंतु कोळपे प्रकरणात ते चुकीचे वागले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी काल तहसिदारांच्या समक्ष माफी मागीतली आहे. स्वॅब घेण्याच्या काही पध्दती प्रशासनाने निश्‍चित केलेल्या आहेत. त्या पद्धतीनुसारच काम करावे लागते. डॉ. बरगे यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आरोग्य बदनाम झाला आहे. याबाबतच अहवाल वरिष्ठांना दिला आहे. 
- डॉ. उमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैभववाडी. 

संपादन - राहुल पाटील

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्मशानभूमीत स्वॅब घेतल्याचा आक्षेप, कुठले हे प्रकरण? वाचा... वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोळपे येथील आत्महत्याग्रस्त व्यक्तींचे रात्री उशिरा स्मशानभुमीत जाऊन स्वॅब घेतले. या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये कोरोनाबद्दलची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने स्वॅब घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वजा मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे केली आहे. जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिलेल्या निवेदनात श्री.काझी यांनी म्हटले आहे की, 29 ऑगस्टला कोळपे बौध्दवाडी येथील महादेव सखाराम कांबळे यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ग्रामीण रूग्णालय वैभववाडी येथे आणला; परंतु तेथील डॉक्‍टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. ते शव कोळपे येथे नेण्यात आले; परंतु मृताचे नातेवाईक मुंबईहून येणार असल्यामुळे अंत्यविधी करण्यात आले नव्हते. त्याच रात्री दीड वाजता शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या डॉक्‍टरने स्मशानात जाऊन स्वॅब घेतले. या सर्व प्रकारामुळे कोळपे येथील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्वॅब त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून घेतला. स्वॅब घेण्यापुर्वी त्यांनी वरिष्ठांची पुर्वपरवानगी घेतली आहे का ? शवविच्छेदनापुर्वी स्वॅब घेतले का असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत या सर्व प्रकाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, प्रशासनाने कारवाई केली नाही तर जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री. काझी यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना दिला आहे.  पाळत ठेवल्याची तक्रार  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश पाटील हे आपल्या पाळत ठेवणे, मला त्रास होईल असे कृत्य करणे असे प्रकार वारंवार करीत आहेत. अशा आशयाचा तक्रार अर्ज डॉ.सचिन बरगे यांनी 24 ऑगस्टला पोलीसात दिला आहे.    कोळपे हा गाव कंटेन्मेंट झोन आहे. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठांच्या सल्ल्याने आणि पुर्वपरवानगी घेवुनच मृत व्यक्तीचा स्वॅब घेतला. त्यात वाईट हेतू नव्हता; परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. ज्या दिवशी हा प्रकार झाला त्या दिवशी माझी ड्युटी नव्हती तरीही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी माझ्याकडुन कटरचे काम करून घेतले. याशिवाय वेगवेगळ्या पध्दतीने मला त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यासंदर्भात मी त्यांच्याविरोधात 24 ऑगस्टला देखील पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.  - डॉ. सचिन बरगे, बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय वैभववाडी.    डॉ. सचिन बरगे हे ग्रामीण रूग्णालयात काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा माझा संबंधच येत नाही; परंतु कोळपे प्रकरणात ते चुकीचे वागले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी काल तहसिदारांच्या समक्ष माफी मागीतली आहे. स्वॅब घेण्याच्या काही पध्दती प्रशासनाने निश्‍चित केलेल्या आहेत. त्या पद्धतीनुसारच काम करावे लागते. डॉ. बरगे यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आरोग्य बदनाम झाला आहे. याबाबतच अहवाल वरिष्ठांना दिला आहे.  - डॉ. उमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैभववाडी.  संपादन - राहुल पाटील   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31ZYQff
Read More
चिंता मिटली, येणे-जाणे झाले सोपे, चाकरमानीही आनंदी

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - इ-पास आणि आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध उठविल्यानंतर खारेपाटण तपासणी नाका मोकळा झाला आहे. तपासणी नाक्‍यावरील अडथळे दूर झाल्याने खारेपाटणच्या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या राजापूर, वैभववाडी तालुक्‍यातील अनेक गावच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान येथील तपासणी नाक्‍यावर मुंबई व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या चाकरमान्यांची फक्‍त नोंदणी आणि थर्मल तपासणी केली जात आहे. 

देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खारेपाटण तपासणी नाक्‍यावर 15 मार्च पासून बॅरिकेट लावून जिल्हा बंदी करण्यात आली होती. यात सुरवातीला अत्यावश्‍यक सेवेतील वाहन चालकांनाच प्रवेश दिला जात होता. त्यानंतर फक्‍त ई पास असलेल्या वाहनांनाच जिल्ह्यात येण्यास परवानगी दिली जात होती. मात्र जिल्ह्यात मोठ्या संख्येने येणारे चाकरमानी आणि तपासणी नाक्‍यावर असणारा अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे चाकरमान्यांना सिंधुदुर्ग प्रवेशासाठी चार ते सहा तास ताटकळत राहावे लागत होते.

राज्य शासनाने मिशन बिगेन अंतर्गत ई पास सक्‍ती तसेच आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध हटविले. त्यानंतर येथील तपासणी नाक्‍यावरील अतिरिक्‍त लावण्यात आलेले अडथळे काढून टाकण्यात आले आहेत. तर केवळ मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची नोंदणी आणि थर्मल गनने तपासणी केली जात आहे. 

आता येणे-जाणे सोपे 
खारेपाटण तपासणी नाका खुला झाल्याचा मोठा दिलासा जिल्ह्याच्या सीमावर्ती असणाऱ्या राजापूर तालुक्‍यातील अनेक गावांना झाला आहे. राजापूर तालुक्‍यातील पंधराहून अधिक गावे खारेपाटण बाजारपेठेशी जोडली गेली आहेत. याखेरीज देवगड आणि वैभववाडी तालुक्‍यातील अनेक गावांना खारेपाटण बाजारपेठ जवळची आहे. या नागरिकांनाही आता निर्धोकपणे तपासणी नाका ओलांडून बाजारपेठेत येणे-जाणे सोपे झाले आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चिंता मिटली, येणे-जाणे झाले सोपे, चाकरमानीही आनंदी खारेपाटण (सिंधुदुर्ग) - इ-पास आणि आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध उठविल्यानंतर खारेपाटण तपासणी नाका मोकळा झाला आहे. तपासणी नाक्‍यावरील अडथळे दूर झाल्याने खारेपाटणच्या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या राजापूर, वैभववाडी तालुक्‍यातील अनेक गावच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान येथील तपासणी नाक्‍यावर मुंबई व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या चाकरमान्यांची फक्‍त नोंदणी आणि थर्मल तपासणी केली जात आहे.  देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खारेपाटण तपासणी नाक्‍यावर 15 मार्च पासून बॅरिकेट लावून जिल्हा बंदी करण्यात आली होती. यात सुरवातीला अत्यावश्‍यक सेवेतील वाहन चालकांनाच प्रवेश दिला जात होता. त्यानंतर फक्‍त ई पास असलेल्या वाहनांनाच जिल्ह्यात येण्यास परवानगी दिली जात होती. मात्र जिल्ह्यात मोठ्या संख्येने येणारे चाकरमानी आणि तपासणी नाक्‍यावर असणारा अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे चाकरमान्यांना सिंधुदुर्ग प्रवेशासाठी चार ते सहा तास ताटकळत राहावे लागत होते. राज्य शासनाने मिशन बिगेन अंतर्गत ई पास सक्‍ती तसेच आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध हटविले. त्यानंतर येथील तपासणी नाक्‍यावरील अतिरिक्‍त लावण्यात आलेले अडथळे काढून टाकण्यात आले आहेत. तर केवळ मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची नोंदणी आणि थर्मल गनने तपासणी केली जात आहे.  आता येणे-जाणे सोपे  खारेपाटण तपासणी नाका खुला झाल्याचा मोठा दिलासा जिल्ह्याच्या सीमावर्ती असणाऱ्या राजापूर तालुक्‍यातील अनेक गावांना झाला आहे. राजापूर तालुक्‍यातील पंधराहून अधिक गावे खारेपाटण बाजारपेठेशी जोडली गेली आहेत. याखेरीज देवगड आणि वैभववाडी तालुक्‍यातील अनेक गावांना खारेपाटण बाजारपेठ जवळची आहे. या नागरिकांनाही आता निर्धोकपणे तपासणी नाका ओलांडून बाजारपेठेत येणे-जाणे सोपे झाले आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jO2z5I
Read More