Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 31, 2020

उगच म्हणत नाहीत ‘गाव करी ते न राव करी’; म्हणून त्यांनी तब्बल पाच बंधारे दुरुस्त

राहुरी (अहमदनगर) : शेरी- चिखलठाण येथे गेल्यावर्षी पावसाळ्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाच बंधारे फुटले. ग्रामस्थांनी ११ लाख रुपये लोकवर्गणी केली. फुटलेल्या एका बंधाऱ्याची दुरुस्ती केली. एक बंधारा नवीन बांधला. दीड महिन्यापूर्वी लोकसहभागातून दोन बंधारे तयार झाले. पाठोपाठ जोरदार पाऊस सुरु झाला. महिनाभरात दोन्ही बंधारे तुडुंब भरले. ग्रामस्थांच्या पुढाकाराने जलसंधारणाचे काम मार्गी लागले.

शेरी- चिखलठाण येथे ४ नोव्हेंबर 2019 रोजी अती मुसळधार पाऊस कोसळला. जिरेदरा व कुरणदरा येथे प्रसाद तनपुरे यांनी २० वर्षांपूर्वी जलसंधारणासाठी बांधलेले चार व लोकवर्गणीतून बांधलेला एक असे पाच बंधारे फुटले. कुरणदरा ओढ्याला महापूर आला. ओढ्याचे पात्र सोडून पाणी शेतजमिनींमधून चिखलठाण येथे मुळा नदीपात्रात गेले. 

ओढ्याच्या दुतर्फा १० किलोमीटर शेतजमीनी मातीसह खरडून उभ्या पिकांसह वाहून गेल्या. काही ठिकाणी दहा- वीस फूट व्यासाचे, अडीच- तीन फूट खोलीचे खड्डे तयार झाले. काही ठिकाणी तीन फुटापर्यंत उंचीची माती जमा झाली. जमिनी नापीक झाल्या. पंचनामे झाले. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी कागदपत्रे रंगली. परंतु, लाल फितीत अडकली. अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची अल्पशी मदत मिळाली. परंतु, खरडून नापिकी झालेल्या शेतजमिनींच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. 

बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारच्या निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी ११ लाख रुपये वर्गणी जमविली. त्यातून एका बंधाऱ्याची दुरुस्ती केली. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मोफत पोकलेन दिले. त्याचा डिझेल खर्च वर्गणीतून करून, नवीन बंधारा बांधला. दोन्ही बंधारे दोन दिवसांपूर्वी तुडुंब भरले. जलसंधारणामुळे आसपासच्या विहिरी व कूपनलिकांचा जलस्त्रोत बळकट झाला. ग्रामस्थांचा पाणी प्रश्न मिटला.

ग्रामस्थांच्या पुढाकाराने दोन बंधारे उभे राहिले. आता शासनाची जबाबदारी आहे. उर्वरित चार बंधाऱ्यांच्या कामासाठी निधी मिळावा. मागील वर्षी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतजमिनींचे अतोनात नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले. त्याची नुकसान भरपाई मिळावी. 
- डॉ. सुभाष काकडे, सरपंच, शेरी- चिखलठाण 

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

उगच म्हणत नाहीत ‘गाव करी ते न राव करी’; म्हणून त्यांनी तब्बल पाच बंधारे दुरुस्त राहुरी (अहमदनगर) : शेरी- चिखलठाण येथे गेल्यावर्षी पावसाळ्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाच बंधारे फुटले. ग्रामस्थांनी ११ लाख रुपये लोकवर्गणी केली. फुटलेल्या एका बंधाऱ्याची दुरुस्ती केली. एक बंधारा नवीन बांधला. दीड महिन्यापूर्वी लोकसहभागातून दोन बंधारे तयार झाले. पाठोपाठ जोरदार पाऊस सुरु झाला. महिनाभरात दोन्ही बंधारे तुडुंब भरले. ग्रामस्थांच्या पुढाकाराने जलसंधारणाचे काम मार्गी लागले. शेरी- चिखलठाण येथे ४ नोव्हेंबर 2019 रोजी अती मुसळधार पाऊस कोसळला. जिरेदरा व कुरणदरा येथे प्रसाद तनपुरे यांनी २० वर्षांपूर्वी जलसंधारणासाठी बांधलेले चार व लोकवर्गणीतून बांधलेला एक असे पाच बंधारे फुटले. कुरणदरा ओढ्याला महापूर आला. ओढ्याचे पात्र सोडून पाणी शेतजमिनींमधून चिखलठाण येथे मुळा नदीपात्रात गेले.  ओढ्याच्या दुतर्फा १० किलोमीटर शेतजमीनी मातीसह खरडून उभ्या पिकांसह वाहून गेल्या. काही ठिकाणी दहा- वीस फूट व्यासाचे, अडीच- तीन फूट खोलीचे खड्डे तयार झाले. काही ठिकाणी तीन फुटापर्यंत उंचीची माती जमा झाली. जमिनी नापीक झाल्या. पंचनामे झाले. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी कागदपत्रे रंगली. परंतु, लाल फितीत अडकली. अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची अल्पशी मदत मिळाली. परंतु, खरडून नापिकी झालेल्या शेतजमिनींच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही.  बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारच्या निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी ११ लाख रुपये वर्गणी जमविली. त्यातून एका बंधाऱ्याची दुरुस्ती केली. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मोफत पोकलेन दिले. त्याचा डिझेल खर्च वर्गणीतून करून, नवीन बंधारा बांधला. दोन्ही बंधारे दोन दिवसांपूर्वी तुडुंब भरले. जलसंधारणामुळे आसपासच्या विहिरी व कूपनलिकांचा जलस्त्रोत बळकट झाला. ग्रामस्थांचा पाणी प्रश्न मिटला. ग्रामस्थांच्या पुढाकाराने दोन बंधारे उभे राहिले. आता शासनाची जबाबदारी आहे. उर्वरित चार बंधाऱ्यांच्या कामासाठी निधी मिळावा. मागील वर्षी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतजमिनींचे अतोनात नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले. त्याची नुकसान भरपाई मिळावी.  - डॉ. सुभाष काकडे, सरपंच, शेरी- चिखलठाण  संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XiXNEt
Read More
लॉकडाउननंतर मिरजकर पुन्हा लागले गर्दी जमवू 

मिरज : आठ दिवसांच्या लॉकडाउननंतर पुन्हा वैद्यकीयनगरी धावू लागली आहे. शहरातील दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, मार्केट परिसरातील भाजी बाजार आणि मुख्य रस्त्यावरील गर्दीमध्ये सोशल डिस्टन्स राखला जात नसल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. सध्या मिरज शहरात शासन दरबारी 426 कोरोना बाधित रूग्णांची नोंद आहे. तर 21 जणांचा बळी गेला आहे. ही सध्यस्थिती असताना पुन्हा मिरजकर गर्दी जमवू लागले आहेत. 

यातच आलेली बकरी ईद यामुळे देखिल शहरात साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स न राखता गर्दी केली आहे. वैद्यकीयनगरीत सध्या 21 कंटेनमेंट झोन आहेत. या कंटेनमेंट झोनमध्ये रॅपिड टेस्ट घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहे. यामध्ये दिवसागणिक रूग्ण संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत असताना पुन्हा सोशल डिस्टन्स न राखणे हे मिरजकरांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. याकडे महापालिकेच्या भरारी पथकाने दुर्लक्ष केल्याचे दिसले. मिरज शहरात बहुसंख्येने मुस्लिम समाज आहे.

आजच्या बकरी ईदच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी होती. यामध्ये शहरातील मार्केट यार्ड परिसरात भरविला जाणार जनावरांचा बाजार प्रशासनाकडून रद्द केल्यामुळे आज नागरिकांनी रस्त्यावरच जनावरांचा बाजार मांडल्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली. या ठिकाणी वेळीच गांधी चौकीच्या पोलिसांनी धाव घेतल्यामुळे विक्रेत्यांनी आपला मोर्चा शहरातील उपगनरात वळविला. 

विक्रेत्यांना हटकले... 
मुस्लिम धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण मानला जाणारी बकरी ईदमुळे लॉकडाउन उठल्यानंतर नागरिकांनी साहित्य खऱेदीसाठी मार्केट परिसरात गर्दी केली होती. यावेळी पोलिस यंत्रणेकडून गर्दी आटोक्‍यात आणण्यासाठी विक्रेत्यांना हुसकावून लावले. 
 

बकऱ्यांना भाव कमी 
लॉकडाऊन आणि साध्या पध्दतीने साजरा होणारी बकरी ईद यामुळे बकऱ्यांचे दर उतरल्यामुळे शतेकरी आणि शेळीपालन व्यवसायकांना तोटा सहन करावा लागत आहे. 

पोलिस प्रशासनाकडून सुचना... 
बकरी ईदच्या पार्श्‍वभुमीवर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण न करता घऱीच थांबून वैयक्तिक नमाज पठण करून बकरी ईद साजरी करण्याच्या सुचना मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपसिंह गिल यांनी बैठकीद्वारे दिल्या आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

 

सांगली 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउननंतर मिरजकर पुन्हा लागले गर्दी जमवू  मिरज : आठ दिवसांच्या लॉकडाउननंतर पुन्हा वैद्यकीयनगरी धावू लागली आहे. शहरातील दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, मार्केट परिसरातील भाजी बाजार आणि मुख्य रस्त्यावरील गर्दीमध्ये सोशल डिस्टन्स राखला जात नसल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. सध्या मिरज शहरात शासन दरबारी 426 कोरोना बाधित रूग्णांची नोंद आहे. तर 21 जणांचा बळी गेला आहे. ही सध्यस्थिती असताना पुन्हा मिरजकर गर्दी जमवू लागले आहेत.  यातच आलेली बकरी ईद यामुळे देखिल शहरात साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स न राखता गर्दी केली आहे. वैद्यकीयनगरीत सध्या 21 कंटेनमेंट झोन आहेत. या कंटेनमेंट झोनमध्ये रॅपिड टेस्ट घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहे. यामध्ये दिवसागणिक रूग्ण संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत असताना पुन्हा सोशल डिस्टन्स न राखणे हे मिरजकरांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. याकडे महापालिकेच्या भरारी पथकाने दुर्लक्ष केल्याचे दिसले. मिरज शहरात बहुसंख्येने मुस्लिम समाज आहे. आजच्या बकरी ईदच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी होती. यामध्ये शहरातील मार्केट यार्ड परिसरात भरविला जाणार जनावरांचा बाजार प्रशासनाकडून रद्द केल्यामुळे आज नागरिकांनी रस्त्यावरच जनावरांचा बाजार मांडल्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली. या ठिकाणी वेळीच गांधी चौकीच्या पोलिसांनी धाव घेतल्यामुळे विक्रेत्यांनी आपला मोर्चा शहरातील उपगनरात वळविला.  विक्रेत्यांना हटकले...  मुस्लिम धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण मानला जाणारी बकरी ईदमुळे लॉकडाउन उठल्यानंतर नागरिकांनी साहित्य खऱेदीसाठी मार्केट परिसरात गर्दी केली होती. यावेळी पोलिस यंत्रणेकडून गर्दी आटोक्‍यात आणण्यासाठी विक्रेत्यांना हुसकावून लावले.    बकऱ्यांना भाव कमी  लॉकडाऊन आणि साध्या पध्दतीने साजरा होणारी बकरी ईद यामुळे बकऱ्यांचे दर उतरल्यामुळे शतेकरी आणि शेळीपालन व्यवसायकांना तोटा सहन करावा लागत आहे.  पोलिस प्रशासनाकडून सुचना...  बकरी ईदच्या पार्श्‍वभुमीवर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण न करता घऱीच थांबून वैयक्तिक नमाज पठण करून बकरी ईद साजरी करण्याच्या सुचना मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपसिंह गिल यांनी बैठकीद्वारे दिल्या आहेत.    संपादन : प्रफुल्ल सुतार    सांगली  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30fzkBO
Read More
निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे 'आधारवड' बनले सातकर गुरुजी!

पुणे : एखादा छंद जडला की, तो व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही, असं म्हणतात. याचाच प्रत्यय जिल्हा परिषदेच्या शाळेत सलग ३८ वर्षे सेवा केलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातकर गुरूजींच्या माध्यमातून सध्या पुणे जिल्ह्यातील शाळा आणि शालेय विद्यार्धी घेत आहेत.

निवृत्तीनंतर मागील दहा वर्षांपासून सातकर गुरूजी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना पूर्वाश्रमीच्या इयत्ता चौथी, सातवी आणि सध्याच्या इयत्ता पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परिक्षेचे मोफत धडे देत आहेत. केवळ मार्गदर्शनच मोफत नव्हे, तर ते स्वखर्चाने शाळांमध्ये जात आहेत. यामुळे सातकर गुरूजी हे निवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळा, या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचे आधारवड बनले आहेत. 

- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आता तुमची दहावीची शाळा भरणार तुमचा अकरावीचा अॅडमिशन फॉर्म!​

जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये प्रथम सलग ३२ वर्षे उपशिक्षक आणि त्यानंतरची सहा वर्षं मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. शिक्षक असताना त्यांचे १०० विद्यार्थी चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत. 

सन २०११ मध्ये ते जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. तेव्हापासून आजतागायत त्यांनी पुणे जिल्ह्यातील सुमारे १०० शाळा आणि अडीच हजार विद्यार्थ्यांना स्वखर्चाने संबंधित शाळेत जाऊन मोफत मार्गदर्शन केले आहे. त्यांचे हे काम आजही अव्याहतपणे चालू आहे.

सातकर गुरुजींना त्यांच्या शिक्षकी सेवेत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांसह विविध ३० पुरस्कार मिळाले आहेत. ते १९७३ मध्ये शिक्षणपशास्त्र पदविका अभ्यासक्रमात (डी.एड.) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर १७ सप्टेंबर १९७३ ला जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाले. त्यांची पहिली नियुक्ती आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द या शाळेत झाली होती, तर २०११ मध्ये ते पिंपळगाव (ता.आंबेगाव) या शाळेतून मुख्याध्यापक पदावर असताना सेवानिवृत्त झाले.

- आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोट : इंजिनिरिंग क्षेत्रातील या आहेत करिअर संधी

सेवानिवृत्तीनंतरही सातकर गुरूजींनी शैक्षणिक कार्यातच स्वत:ला वाहून घेतले आहे. सातत्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ते शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन करत आहेत. पूर्वाश्रमीच्या चौथी आणि सध्याच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत १०० शाळांमधील सुमारे दीड हजार आणि पूर्वाश्रमीच्या सातवी आणि सध्याच्या आठवीच्या वर्गातील ५० शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंत मोफत मार्गदर्शन केले आहे. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी काही शाळा दत्तक घेतल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, नागापूर, वडगाव काशिंबे, काठापूर, जारगडवाडी, शिंगवे, गावडेवाडी आणि जुन्नर तालुक्यातील आनंदवाडी, गुळूंजवाडी आदी काही शाळांमध्ये सातत्याने मार्गदर्शन केले आहे.

- कोण आहेत नवं शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष के कस्तुरीरंगन?​

गुणवत्ता वाढीतील योगदान  

- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यासमवेत २९ जानेवारी १९९१ ला नवीन शैक्षणिक धोरण व माहिती तंत्रज्ञान विषयावर चर्चा.

-  राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासमवेत चर्चा.

-  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना सुरू करण्यात सहभाग.

- पिंपळगावतर्फे म्हाळुंगे शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्पाची उभारणी. 

-  स्काऊट गाईडचे प्रमुख म्हणून काम.

- सलग २५ वर्षे गृहरक्षक दलात (होमगार्ड) सेवा.

- दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप.

- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन.

- शिरोली (ता.जुन्नर) झेडपी शाळेच्या प्रवेशद्वारासाठी २१ हजार रुपयांची देणगी.

-  पिंपळगाव (ता.आंबेगाव) येथील माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीस २५ हजार ५५५ रुपयांची देणगी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे 'आधारवड' बनले सातकर गुरुजी! पुणे : एखादा छंद जडला की, तो व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही, असं म्हणतात. याचाच प्रत्यय जिल्हा परिषदेच्या शाळेत सलग ३८ वर्षे सेवा केलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातकर गुरूजींच्या माध्यमातून सध्या पुणे जिल्ह्यातील शाळा आणि शालेय विद्यार्धी घेत आहेत. निवृत्तीनंतर मागील दहा वर्षांपासून सातकर गुरूजी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना पूर्वाश्रमीच्या इयत्ता चौथी, सातवी आणि सध्याच्या इयत्ता पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परिक्षेचे मोफत धडे देत आहेत. केवळ मार्गदर्शनच मोफत नव्हे, तर ते स्वखर्चाने शाळांमध्ये जात आहेत. यामुळे सातकर गुरूजी हे निवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळा, या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचे आधारवड बनले आहेत.  - विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आता तुमची दहावीची शाळा भरणार तुमचा अकरावीचा अॅडमिशन फॉर्म!​ जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये प्रथम सलग ३२ वर्षे उपशिक्षक आणि त्यानंतरची सहा वर्षं मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. शिक्षक असताना त्यांचे १०० विद्यार्थी चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत.  सन २०११ मध्ये ते जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. तेव्हापासून आजतागायत त्यांनी पुणे जिल्ह्यातील सुमारे १०० शाळा आणि अडीच हजार विद्यार्थ्यांना स्वखर्चाने संबंधित शाळेत जाऊन मोफत मार्गदर्शन केले आहे. त्यांचे हे काम आजही अव्याहतपणे चालू आहे. सातकर गुरुजींना त्यांच्या शिक्षकी सेवेत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांसह विविध ३० पुरस्कार मिळाले आहेत. ते १९७३ मध्ये शिक्षणपशास्त्र पदविका अभ्यासक्रमात (डी.एड.) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर १७ सप्टेंबर १९७३ ला जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाले. त्यांची पहिली नियुक्ती आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द या शाळेत झाली होती, तर २०११ मध्ये ते पिंपळगाव (ता.आंबेगाव) या शाळेतून मुख्याध्यापक पदावर असताना सेवानिवृत्त झाले. - आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोट : इंजिनिरिंग क्षेत्रातील या आहेत करिअर संधी सेवानिवृत्तीनंतरही सातकर गुरूजींनी शैक्षणिक कार्यातच स्वत:ला वाहून घेतले आहे. सातत्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ते शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन करत आहेत. पूर्वाश्रमीच्या चौथी आणि सध्याच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत १०० शाळांमधील सुमारे दीड हजार आणि पूर्वाश्रमीच्या सातवी आणि सध्याच्या आठवीच्या वर्गातील ५० शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंत मोफत मार्गदर्शन केले आहे. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी काही शाळा दत्तक घेतल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, नागापूर, वडगाव काशिंबे, काठापूर, जारगडवाडी, शिंगवे, गावडेवाडी आणि जुन्नर तालुक्यातील आनंदवाडी, गुळूंजवाडी आदी काही शाळांमध्ये सातत्याने मार्गदर्शन केले आहे. - कोण आहेत नवं शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष के कस्तुरीरंगन?​ गुणवत्ता वाढीतील योगदान   - माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यासमवेत २९ जानेवारी १९९१ ला नवीन शैक्षणिक धोरण व माहिती तंत्रज्ञान विषयावर चर्चा. -  राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासमवेत चर्चा. -  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना सुरू करण्यात सहभाग. - पिंपळगावतर्फे म्हाळुंगे शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्पाची उभारणी.  -  स्काऊट गाईडचे प्रमुख म्हणून काम. - सलग २५ वर्षे गृहरक्षक दलात (होमगार्ड) सेवा. - दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप. - दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन. - शिरोली (ता.जुन्नर) झेडपी शाळेच्या प्रवेशद्वारासाठी २१ हजार रुपयांची देणगी. -  पिंपळगाव (ता.आंबेगाव) येथील माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीस २५ हजार ५५५ रुपयांची देणगी. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hYWZwu
Read More
सांगलीकरांना दिलासा...तब्बल हजार जणांनी हरवलं कोरोनाला 

सांगली : ऑगस्ट हा क्रांतीचा महिना...या महिन्यात स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी पडली, देश स्वतंत्रही या महिन्यातच झाला. कोरोना साथीच्या जागतिक संकटाशी लढ्यातही ऑगस्ट महिना महत्वाचा असेल. जिल्ह्यात वाढत्या रुग्ण संख्येला या महिन्यात आळा बसेल, वेग कमी होईल, अशी अपेक्षा साऱ्यांना आहे. जुलै महिना जिल्ह्यासाठी तणाव वाढवणारा ठरला, मात्र जाता-जाता या महिन्याने एका विक्रमाची नोंद केली. 30 जुलैला कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल एक हजार झाली. हजार लोकांनी कोरोनाला हरवलं. 

जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना भितीचे वातावरण आहे. या स्थितीत काही चांगले घडते आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. अशावेळी एक हजार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आशादायक चित्र समोर आले आहे. 20 जुलै रोजी हा आकडा 1033 एवढा होता. तो वाढत जाईल आणि लवकरच कोरोनामुक्त जिल्हा होईल, अशी साऱ्यांना आशा आहे. 

कोरोना झाल्यानंतर मिरजेत उपचार घेणारे मणदूरचे 100 वर्षे वय पार केलेले आजोबा बरे झाले. ते घरी जायला निघाले. व्हील चेअरवर होते. त्यांना निरोप द्यायला रुग्णालयातील सारे कर्मचारी, स्वतः अधिष्ठाता हजर होते. त्यांना गुलाबाचे फुल दिले गेले आण टाळ्या वाजवून त्यांची गावी रवानगी केली. कोरोनाला हरवणारे ते जिल्ह्यातील सर्वात वयस्कर रुग्ण ठरले. एक ते दीड वर्ष वय असणारे सहा ते सात बालके कोरोनाला हरवून नवे आयुष्य जगायला तयार झाली. कोरोनावर अजून औषध सापडलेलं नाही, असं असताना हे घडलं, हे विशेष. त्यात केवळ तरुण होते, असेही नाही. 84 वर्षाच्या आजीनं, जिला कोरोना म्हणजे काय हेही माहिती झालं नाही, तिनं कोरोनावर मात केली. 

मात केली...ते घरी गेले
हे सांगली जिल्ह्यात घडलं ते गेल्या चार महिन्यात. 24 मार्चला पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर पुढच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्येचा आलेख वाढतच गेला. तो खाली कधी येईल, याची प्रतिक्षा आहेच. मात्र या साऱ्यात एक सुखद बातमी आली. ती म्हणजे, तब्बल एक हजार रुग्णांनी कोरोनाला हरवून टाकलं. त्यावर मात केली आणि ते घरी गेले. जिल्ह्यात दोन हजार 307 रुग्णांना कोरोना झाला. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. पैकी महापालिका क्षेत्रात 1212 रुग्ण आहे तर ग्रामीण भागात 917, शहरी भागात 178 रुग्णांना बाधा झाली आहे. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सांगलीकरांना दिलासा...तब्बल हजार जणांनी हरवलं कोरोनाला  सांगली : ऑगस्ट हा क्रांतीचा महिना...या महिन्यात स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी पडली, देश स्वतंत्रही या महिन्यातच झाला. कोरोना साथीच्या जागतिक संकटाशी लढ्यातही ऑगस्ट महिना महत्वाचा असेल. जिल्ह्यात वाढत्या रुग्ण संख्येला या महिन्यात आळा बसेल, वेग कमी होईल, अशी अपेक्षा साऱ्यांना आहे. जुलै महिना जिल्ह्यासाठी तणाव वाढवणारा ठरला, मात्र जाता-जाता या महिन्याने एका विक्रमाची नोंद केली. 30 जुलैला कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल एक हजार झाली. हजार लोकांनी कोरोनाला हरवलं.  जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना भितीचे वातावरण आहे. या स्थितीत काही चांगले घडते आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. अशावेळी एक हजार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आशादायक चित्र समोर आले आहे. 20 जुलै रोजी हा आकडा 1033 एवढा होता. तो वाढत जाईल आणि लवकरच कोरोनामुक्त जिल्हा होईल, अशी साऱ्यांना आशा आहे.  कोरोना झाल्यानंतर मिरजेत उपचार घेणारे मणदूरचे 100 वर्षे वय पार केलेले आजोबा बरे झाले. ते घरी जायला निघाले. व्हील चेअरवर होते. त्यांना निरोप द्यायला रुग्णालयातील सारे कर्मचारी, स्वतः अधिष्ठाता हजर होते. त्यांना गुलाबाचे फुल दिले गेले आण टाळ्या वाजवून त्यांची गावी रवानगी केली. कोरोनाला हरवणारे ते जिल्ह्यातील सर्वात वयस्कर रुग्ण ठरले. एक ते दीड वर्ष वय असणारे सहा ते सात बालके कोरोनाला हरवून नवे आयुष्य जगायला तयार झाली. कोरोनावर अजून औषध सापडलेलं नाही, असं असताना हे घडलं, हे विशेष. त्यात केवळ तरुण होते, असेही नाही. 84 वर्षाच्या आजीनं, जिला कोरोना म्हणजे काय हेही माहिती झालं नाही, तिनं कोरोनावर मात केली.  मात केली...ते घरी गेले हे सांगली जिल्ह्यात घडलं ते गेल्या चार महिन्यात. 24 मार्चला पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर पुढच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्येचा आलेख वाढतच गेला. तो खाली कधी येईल, याची प्रतिक्षा आहेच. मात्र या साऱ्यात एक सुखद बातमी आली. ती म्हणजे, तब्बल एक हजार रुग्णांनी कोरोनाला हरवून टाकलं. त्यावर मात केली आणि ते घरी गेले. जिल्ह्यात दोन हजार 307 रुग्णांना कोरोना झाला. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. पैकी महापालिका क्षेत्रात 1212 रुग्ण आहे तर ग्रामीण भागात 917, शहरी भागात 178 रुग्णांना बाधा झाली आहे.    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3giLwav
Read More
आनंदवार्ता, महाराजबागेत येणार नवीन पाहुणा...कोणता?

नागपूर,  ः गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील सर्व पिंजरे सध्या भरले असल्याने येथील वाघाला आता महाराजबाग प्राणिसंग्रहालयात हालविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गोरेवाडा प्रशासनाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पत्र पाठवून एनटी १ वाघाला महाराजबागेत पाठवले जाऊ शकते असे म्हटले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर या वाघाचा मुक्काम महाराजबागेत हालवला जाण्याचे संकेत आहेत. 

ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात चार जणांचा जीव घेणाऱ्या एनटी १  वाघाला गोरेवाड्यात आणले आहे. तो अजूनही विलगीकरणात आहे. पिंजरेही हाऊसफुल्ल झाल्याने या वाघाला महाराजबागेत हालवण्यात आल्यास ‘जान' वाघिणीला एनटी १  च्या रूपाने जोडीदार मिळणार आहे. ‘ली’ या वाघिणीला गोरेवाडा केंद्रात महाराजबागतून ब्रीडिंगसाठी पाठविले आहे. तर, दुसरी वाघीण ‘चेरी’ हिची छत्तीसगडमधील काननपेंढरी प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. ‘जान'ला जोडीदार मिळावा यासाठी महाराजबाग व्यवस्थापन वन विभाग आणि अन्य प्राणिसंग्रहालयाकडे नर वाघाची मागणी करीत आहे. 

आम्हालाही क्वारंटाइन करा असे विनंतीपत्र दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी का दिले जाणून घ्या...

गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रामध्ये वाघांसाठी १० पिंजरे आहेत. सध्या येथे दहा वाघ आहेत. महाराजबागेतील ‘जान' वाघिणीचे वय ११ वर्षांचे झाले आहे. तिला जोडीदार देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून यामुळे महाराजबागेत नवीन पाहुणा येणार हे निश्चित झाले आहे. मात्र, तारीख निश्चित झालेली नाही. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आनंदवार्ता, महाराजबागेत येणार नवीन पाहुणा...कोणता? नागपूर,  ः गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील सर्व पिंजरे सध्या भरले असल्याने येथील वाघाला आता महाराजबाग प्राणिसंग्रहालयात हालविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गोरेवाडा प्रशासनाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पत्र पाठवून एनटी १ वाघाला महाराजबागेत पाठवले जाऊ शकते असे म्हटले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर या वाघाचा मुक्काम महाराजबागेत हालवला जाण्याचे संकेत आहेत.  ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात चार जणांचा जीव घेणाऱ्या एनटी १  वाघाला गोरेवाड्यात आणले आहे. तो अजूनही विलगीकरणात आहे. पिंजरेही हाऊसफुल्ल झाल्याने या वाघाला महाराजबागेत हालवण्यात आल्यास ‘जान' वाघिणीला एनटी १  च्या रूपाने जोडीदार मिळणार आहे. ‘ली’ या वाघिणीला गोरेवाडा केंद्रात महाराजबागतून ब्रीडिंगसाठी पाठविले आहे. तर, दुसरी वाघीण ‘चेरी’ हिची छत्तीसगडमधील काननपेंढरी प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. ‘जान'ला जोडीदार मिळावा यासाठी महाराजबाग व्यवस्थापन वन विभाग आणि अन्य प्राणिसंग्रहालयाकडे नर वाघाची मागणी करीत आहे.  आम्हालाही क्वारंटाइन करा असे विनंतीपत्र दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी का दिले जाणून घ्या... गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रामध्ये वाघांसाठी १० पिंजरे आहेत. सध्या येथे दहा वाघ आहेत. महाराजबागेतील ‘जान' वाघिणीचे वय ११ वर्षांचे झाले आहे. तिला जोडीदार देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून यामुळे महाराजबागेत नवीन पाहुणा येणार हे निश्चित झाले आहे. मात्र, तारीख निश्चित झालेली नाही.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DkxgPU
Read More
गाड झोपेत असतानाच पहाटे दोनच्या सुमारास थेट घरात घुसले पाणी अन्‌...

संगमनेर (नगर) : बुधवारी आश्वी गटात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील वस्तीवरील घरात मध्यरात्रीनंतर अचानक घुसलेल्या पाण्यामुळे एका कुटूंबातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.

यावर्षी पावसाने चांगलाच जोर धरल्याने संगमनेर तालुक्यातील बहुसंख्य गावातील जलस्तर वाढला आहे. काही दिवसातील पावसाची सरासरी पाहता आश्वी गटात अतिवृष्टी झाल्याचे दिसते. संततधार पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले, पूर्वांपार ओढे नाले त्यांचे अस्तित्व हरवून बसल्याने, पावसाचे पाणी वाट मिळेल तेथून पुढे जाते. परिणामी वाटेत आलेल्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात हानी होते. गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात शेतकरी वर्गाची जमिनीच्या तुकड्याची हाव यामुळे गावातील कधी काळी वाहते असलेले ओढे, नाले केवळ कागदोपत्रीच उरले आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्याच्याकडेच्या साईड गटारीही अतिक्रमीत झाल्याने नैसर्गिक आपत्ती आल्यास पाणी वाहून जाण्यासही मार्ग उरला नाही. 

आश्वी बुद्रूक येथे निमगावजाळीकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबते. या वर्षी नेहमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने, रस्त्याने वाहणारे पाणी उत्तरेला असलेल्या चाँदशहावली बाबा दर्ग्याजवळच्या वस्तीत घुसले. रात्री दोनच्या सुमारास थेट घरात आलेल्या पाण्यामुळे इक्बाल शेख यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य खराब झाले आहे. आजही त्यांच्या घरात व आसपास सुमारे गुडघाभर पाणी आहे.

हे पाणी काढून देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चर खोदण्याचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. मात्र या ओढ्याची नोंद कुठेही आढळत नसल्याने सर्वांना पेच पडला आहे. रहिवाशी वस्ती नसलेल्या ठिकाणी चर खोदले असले तरी, प्रवरा डाव्या कालव्याच्या दक्षिणेला रस्त्याच्या कडेला काही रहिवाशी वस्त्या असल्याने, अनेक ठिकाणी पूर्वीचे चर बुजले आहेत.

आज ग्रामपंचायतीचे सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, पंकज कोळपकर आदींसह मंडलाधिकारी श्रीमती एस. ए. चतुरे, तलाठी संग्राम देशमुख, ग्रामविकास अधिकारी रमेश भालेराव, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड आदींसह सदस्यांनी या कामाची पहाणी केली. रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहुन जाण्यासाठी मोठे चर खोदण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

परवाच्या पावसामुळे आमच्या संसारातील चिजवस्तू खराब झाल्या आहेत. अद्यापही घरात पाणी आहे. प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी तसेच पाणी काढून देण्यासाठी पंपाचा वापर करुन आम्हाला दिलासा द्यावा. 
- इक्बाल शेख, आश्वी बुद्रूक 

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गाड झोपेत असतानाच पहाटे दोनच्या सुमारास थेट घरात घुसले पाणी अन्‌... संगमनेर (नगर) : बुधवारी आश्वी गटात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील वस्तीवरील घरात मध्यरात्रीनंतर अचानक घुसलेल्या पाण्यामुळे एका कुटूंबातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. यावर्षी पावसाने चांगलाच जोर धरल्याने संगमनेर तालुक्यातील बहुसंख्य गावातील जलस्तर वाढला आहे. काही दिवसातील पावसाची सरासरी पाहता आश्वी गटात अतिवृष्टी झाल्याचे दिसते. संततधार पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले, पूर्वांपार ओढे नाले त्यांचे अस्तित्व हरवून बसल्याने, पावसाचे पाणी वाट मिळेल तेथून पुढे जाते. परिणामी वाटेत आलेल्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात हानी होते. गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात शेतकरी वर्गाची जमिनीच्या तुकड्याची हाव यामुळे गावातील कधी काळी वाहते असलेले ओढे, नाले केवळ कागदोपत्रीच उरले आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्याच्याकडेच्या साईड गटारीही अतिक्रमीत झाल्याने नैसर्गिक आपत्ती आल्यास पाणी वाहून जाण्यासही मार्ग उरला नाही.  आश्वी बुद्रूक येथे निमगावजाळीकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबते. या वर्षी नेहमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने, रस्त्याने वाहणारे पाणी उत्तरेला असलेल्या चाँदशहावली बाबा दर्ग्याजवळच्या वस्तीत घुसले. रात्री दोनच्या सुमारास थेट घरात आलेल्या पाण्यामुळे इक्बाल शेख यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य खराब झाले आहे. आजही त्यांच्या घरात व आसपास सुमारे गुडघाभर पाणी आहे. हे पाणी काढून देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चर खोदण्याचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. मात्र या ओढ्याची नोंद कुठेही आढळत नसल्याने सर्वांना पेच पडला आहे. रहिवाशी वस्ती नसलेल्या ठिकाणी चर खोदले असले तरी, प्रवरा डाव्या कालव्याच्या दक्षिणेला रस्त्याच्या कडेला काही रहिवाशी वस्त्या असल्याने, अनेक ठिकाणी पूर्वीचे चर बुजले आहेत. आज ग्रामपंचायतीचे सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, पंकज कोळपकर आदींसह मंडलाधिकारी श्रीमती एस. ए. चतुरे, तलाठी संग्राम देशमुख, ग्रामविकास अधिकारी रमेश भालेराव, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड आदींसह सदस्यांनी या कामाची पहाणी केली. रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहुन जाण्यासाठी मोठे चर खोदण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.   परवाच्या पावसामुळे आमच्या संसारातील चिजवस्तू खराब झाल्या आहेत. अद्यापही घरात पाणी आहे. प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी तसेच पाणी काढून देण्यासाठी पंपाचा वापर करुन आम्हाला दिलासा द्यावा.  - इक्बाल शेख, आश्वी बुद्रूक  संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Pawbga
Read More
गणेशोत्सवाच्या पार्शभूमीवर मालवण पंचायत समितीचे कठोर निर्णय

मालवण (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थी कालावधीत जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना किमान 14 दिवस कॉरंटाइन करणे अत्यावश्‍यक आहे. यात बदल करून शासनाने 7 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी ठेवल्यास ते घातक ठरणार आहे. त्यामुळे शासनाने कॉरंटाइन कालावधी कमी करू नये, अशी आग्रही मागणी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत सत्ताधारी गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी केली असुन तशी शिफारस शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे. 

दरम्यान, शासनाला जर जिल्हा धोक्‍यातच टाकायचा असेल तर कॉरंटाइनची अट रद्द करून चाकरमान्यांना थेट घरात प्रवेश द्या, कॉरंटाईन ठेवूच नका. अशा शब्दांत घाडीगांवकर यांनी संताप व्यक्त केला. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी शासन जे धोरण ठरवेल त्याचे पालन करावे लागेल असे सांगत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. 

वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला ; उडाली दाणादाण  

येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्‍य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या सभेत सुनील घाडीगांवकर यांनी चाकरमान्यांच्या विषयांवर आक्रमकपणे भावना मांडली. मालवण तालुक्‍यात आम्हाला 7 दिवसांचे कॉरंटाइन मान्य नाही. जिल्ह्यात 19 व्या दिवशी देखील रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे 7 दिवस कॉरंटाइन केल्यास उद्या ग्रामीण भागात मोठी अडचण निर्माण होईल.

चाकरमान्यांनी गावात येऊ नये, अशी आमची भूमिका नाही, उलट शासनाने परप्रांतियांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ज्याप्रमाणे मोफत बसेस, रेल्वे उपलब्ध करून दिल्या, त्याचप्रमाणे चाकरमान्यांना गावी येण्यासाठी मोफत एसटी आणि रेल्वे उपलब्ध करून द्यावी, प्रशासनाकडून मुख्यमंत्री यांना याबाबत विशेष मागणी पत्र पाठवा अशी भूमिका घाडीगांवकर यांनी मांडली. 
शासनाने कॉरंटाइन बाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे गावागावात स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांमध्ये वाद भडकण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी उपसभापती राजू परुळेकर आणि घाडीगांवकर यांनी केली.

लग्नाला 50 लोकांना परवानगी मग गावात 10, 20 नागरिकांच्या उपस्थितीत होणाऱ्या भजन आरतीला बंदी का ? असा सवाल उपस्थित करत गणेशोत्सव वात वाडीत भजन आरतीला परवानगी मिळावी अशी मागणीही घाडीगावकर यांनी केली आहे. कोकणात जाण्यासाठी ई पासची सक्ती केल्यानंतर मुंबईत बोगस पास बनवून देणारे रॅकेट कार्यरत झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उद्या बनावट कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट देणारेही असतील हे नाकारता येत नाही. त्यामुळे खारेपाटण चेकपोस्टवर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी करावी. अशीही मागणी घाडीगावकर यांनी केली. मालवण ग्रामीण रुग्णालयात सध्या डॉ. बालाजी पाटील हे एकमेव डॉक्‍टर आहेत तरी रुग्णालयात तात्काळ डॉक्‍टर उपलब्ध व्हावा, असा ठराव घाडीगावकर यांनी मांडला. 

हेही वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश

वर्क ऑर्डर झाली पण... 
रेवंडी गावात जाणारा ओझर व्हरंडा मार्ग पूर्णपणे खड्डेमय आहे. जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या या रस्ता कामाची वर्कऑर्डर झाली; मात्र ठेकेदाराने काम न केल्याने वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. रखडलेल्या या रास्ताप्रश्‍नी माजी सभापती सोनाली कोदे यांनी आक्रमक होत बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, हा रस्ता ठेकेदाराने न केल्याने ग्रामस्थ स्वनिधीतून रस्ता करत आहेत. तरी या रस्ताकामाचे कोणतेही बिल ठेकेदारास देऊ नये. अन्यथा ठेकेदाराने तत्काळ रस्ता काम करावे अशी भूमिका कोदे यांनी घेतली. ठेकेदारास तत्काळ सूचना द्या, काम कधी सुरू होणार? याबाबत माहिती मागवा, असे आदेश सभापती अजिंक्‍य पाताडे यांनी बांधकामला दिले. 

बंधाऱ्याची 5 रोजी पाहणी 
कालावल खाडी पात्रातील मसुरकर जुवा बेटावर पतन विभागाने बांधलेला बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधला आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुनील घाडीगावकर यांनी केला. दरम्यान, बंधाऱ्याचे काम योग्य असल्याची भूमिका मसुरे पंचायत समिती सदस्या गायत्री ठाकूर यांनी मांडली; मात्र घाडीगावकर यांनी अधिकारी व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली. 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजता बंधाऱ्याची पाहणीचा निर्णय सभापती अजिंक्‍य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी घेतला. ठाकूर यांनी या निर्णयास पाठिंबा दर्शवला.  

संपादन ः राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गणेशोत्सवाच्या पार्शभूमीवर मालवण पंचायत समितीचे कठोर निर्णय मालवण (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थी कालावधीत जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना किमान 14 दिवस कॉरंटाइन करणे अत्यावश्‍यक आहे. यात बदल करून शासनाने 7 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी ठेवल्यास ते घातक ठरणार आहे. त्यामुळे शासनाने कॉरंटाइन कालावधी कमी करू नये, अशी आग्रही मागणी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत सत्ताधारी गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी केली असुन तशी शिफारस शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे.  दरम्यान, शासनाला जर जिल्हा धोक्‍यातच टाकायचा असेल तर कॉरंटाइनची अट रद्द करून चाकरमान्यांना थेट घरात प्रवेश द्या, कॉरंटाईन ठेवूच नका. अशा शब्दांत घाडीगांवकर यांनी संताप व्यक्त केला. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी शासन जे धोरण ठरवेल त्याचे पालन करावे लागेल असे सांगत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.  वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला ; उडाली दाणादाण   येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्‍य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या सभेत सुनील घाडीगांवकर यांनी चाकरमान्यांच्या विषयांवर आक्रमकपणे भावना मांडली. मालवण तालुक्‍यात आम्हाला 7 दिवसांचे कॉरंटाइन मान्य नाही. जिल्ह्यात 19 व्या दिवशी देखील रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे 7 दिवस कॉरंटाइन केल्यास उद्या ग्रामीण भागात मोठी अडचण निर्माण होईल. चाकरमान्यांनी गावात येऊ नये, अशी आमची भूमिका नाही, उलट शासनाने परप्रांतियांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ज्याप्रमाणे मोफत बसेस, रेल्वे उपलब्ध करून दिल्या, त्याचप्रमाणे चाकरमान्यांना गावी येण्यासाठी मोफत एसटी आणि रेल्वे उपलब्ध करून द्यावी, प्रशासनाकडून मुख्यमंत्री यांना याबाबत विशेष मागणी पत्र पाठवा अशी भूमिका घाडीगांवकर यांनी मांडली.  शासनाने कॉरंटाइन बाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे गावागावात स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांमध्ये वाद भडकण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी उपसभापती राजू परुळेकर आणि घाडीगांवकर यांनी केली. लग्नाला 50 लोकांना परवानगी मग गावात 10, 20 नागरिकांच्या उपस्थितीत होणाऱ्या भजन आरतीला बंदी का ? असा सवाल उपस्थित करत गणेशोत्सव वात वाडीत भजन आरतीला परवानगी मिळावी अशी मागणीही घाडीगावकर यांनी केली आहे. कोकणात जाण्यासाठी ई पासची सक्ती केल्यानंतर मुंबईत बोगस पास बनवून देणारे रॅकेट कार्यरत झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उद्या बनावट कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट देणारेही असतील हे नाकारता येत नाही. त्यामुळे खारेपाटण चेकपोस्टवर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी करावी. अशीही मागणी घाडीगावकर यांनी केली. मालवण ग्रामीण रुग्णालयात सध्या डॉ. बालाजी पाटील हे एकमेव डॉक्‍टर आहेत तरी रुग्णालयात तात्काळ डॉक्‍टर उपलब्ध व्हावा, असा ठराव घाडीगावकर यांनी मांडला.  हेही वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश वर्क ऑर्डर झाली पण...  रेवंडी गावात जाणारा ओझर व्हरंडा मार्ग पूर्णपणे खड्डेमय आहे. जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या या रस्ता कामाची वर्कऑर्डर झाली; मात्र ठेकेदाराने काम न केल्याने वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. रखडलेल्या या रास्ताप्रश्‍नी माजी सभापती सोनाली कोदे यांनी आक्रमक होत बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, हा रस्ता ठेकेदाराने न केल्याने ग्रामस्थ स्वनिधीतून रस्ता करत आहेत. तरी या रस्ताकामाचे कोणतेही बिल ठेकेदारास देऊ नये. अन्यथा ठेकेदाराने तत्काळ रस्ता काम करावे अशी भूमिका कोदे यांनी घेतली. ठेकेदारास तत्काळ सूचना द्या, काम कधी सुरू होणार? याबाबत माहिती मागवा, असे आदेश सभापती अजिंक्‍य पाताडे यांनी बांधकामला दिले.  बंधाऱ्याची 5 रोजी पाहणी  कालावल खाडी पात्रातील मसुरकर जुवा बेटावर पतन विभागाने बांधलेला बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधला आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुनील घाडीगावकर यांनी केला. दरम्यान, बंधाऱ्याचे काम योग्य असल्याची भूमिका मसुरे पंचायत समिती सदस्या गायत्री ठाकूर यांनी मांडली; मात्र घाडीगावकर यांनी अधिकारी व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली. 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजता बंधाऱ्याची पाहणीचा निर्णय सभापती अजिंक्‍य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी घेतला. ठाकूर यांनी या निर्णयास पाठिंबा दर्शवला.   संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30fuQel
Read More
Horoscope Today, 1 अगस्त: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2Pgp2Lw
देशभर में मनाई जा रही बकरीद, जामा मस्जिद में अदा की गई ईद की नमाज https://ift.tt/2Xi40QR
एक्टर कुणाल खेमू ने पत्नी संग ऐसे मनाया लूटकेस की रिलीज का सेलिब्रेशन https://ift.tt/3k77QGz
बकरीद: कोरोना काल में बदल गया तरीका, जानें कुर्बानी और ईदगाह पर नमाज की पूरी कहानी https://ift.tt/2Xi3ZMN
यूपी: कोरोना काल में आम आदमी पार्टी हर घर में पहुंचाएगी ऑक्सीमीटर https://ift.tt/33bfSbf
सोमनाथ की तर्ज पर पीएम मोदी शुरू करेंगे राम मंदिर का निर्माणः उमा भारती https://ift.tt/2BRnapo