Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 31, 2020

लोकमान्य टिळकः पंचहौद मिशनच्या चहा प्रकरणामुळे महाराष्ट्राचं समाजमन कसं ढवळून निघालं?
कोरोना लॉकडाऊन: पंजाबमध्ये बनावट दारुमुळे 38 जणांचा मृत्यू
वर्धेतील संगीत विशारद रसिका मालिकांमधून घराघरांत, जाणून घ्या त्यांच्याबाबत... 

वर्धा : टिव्ही मालिका, चित्रपट यावर पुण्या-मुंबईकडील लोकांचे अधिराज्य समजले जाते. विदर्भातील लोकांना तिथे संधी नाही, असा सर्वसामान्य समज आहे. परंतु रसिका धामणकर यांनी तो समज पूर्णतः खोटा ठरवला. वर्धा जिल्ह्यातील छोट्याशा गावात जन्मलेल्या रसिका यांनी मालिकांमधून घराघरांत पोहचल्या आहेत. 

जिल्ह्यातील आर्वी पुलगांव मार्गावर असलेले रोहणा हे रसिकाचे मूळ गाव आहे. येथून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मध्यप्रदेशात त्यांनी शिक्षण घेतले आहे. मूळ विदर्भातील असलेल्या रसिका संगीत विशारद व इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत. आता त्या अभिनय क्षेत्रात सातत्याने काम करीत आहेत. रसिका धामणकर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वाशीतील एका महाविद्यालयात इतिहासाच्या प्राध्यापक होत्या. 

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात त्या विशारद आहेत. लॉकडाऊनमधील अनुभव सांगताना रसिका म्हणाल्या, मी संगीत विशारद आहे. लॉकडाऊनदरम्यान मी गाण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे मला रियाझ करण्यास आणि संगीताचा अभ्यास करण्यास खूप वेळ मिळाला. महाविद्यालयात असताना सांस्कृतिक कार्यक्रमातून माझ्या अभिनयाला पाठिंबा मिळाला. लॉकडाऊनच्या काळात मी ऑनलाईन क्‍लासेस घेतले. 

महत्त्वाची बातमी - विद्यार्थ्यांनो व्हा सज्ज! चार ऑगस्टपासून होणार तुमच्या शाळा सुरू...
 

एका मराठी वाहिनीवरील सुपरहिट मालिकेत नायकाच्या आईची भूमिका रसिका धामणकर यांच्या वाट्याला आली आहे. नागपंचमीच्या दिवशीपासून (25 जुलै) हा बदल प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ही मालिका पाहण्याची मजा काही वेगळीच असून, रसिकाच्या एन्ट्रीने ती आणखीच मजेदार होणार आहे. 

लॉकडाऊनमुळे तब्बल चार महिने मालिकांचे शूटिंग बंद होते. यानंतर या मालिकेत रसिकाची एन्ट्री झाली आहे. यापूर्वी ही भूमिका इरावती लागू साकारत होत्या. कोवीडमुळे इरावती यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. निर्माते व वाहिनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या जागी रसिका धामणकर व शेखर फडके यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांच्या भूमिका असलेले एपिसोड वाहिनीवर प्रसारित केले जात आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वर्धेतील संगीत विशारद रसिका मालिकांमधून घराघरांत, जाणून घ्या त्यांच्याबाबत...  वर्धा : टिव्ही मालिका, चित्रपट यावर पुण्या-मुंबईकडील लोकांचे अधिराज्य समजले जाते. विदर्भातील लोकांना तिथे संधी नाही, असा सर्वसामान्य समज आहे. परंतु रसिका धामणकर यांनी तो समज पूर्णतः खोटा ठरवला. वर्धा जिल्ह्यातील छोट्याशा गावात जन्मलेल्या रसिका यांनी मालिकांमधून घराघरांत पोहचल्या आहेत.  जिल्ह्यातील आर्वी पुलगांव मार्गावर असलेले रोहणा हे रसिकाचे मूळ गाव आहे. येथून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मध्यप्रदेशात त्यांनी शिक्षण घेतले आहे. मूळ विदर्भातील असलेल्या रसिका संगीत विशारद व इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत. आता त्या अभिनय क्षेत्रात सातत्याने काम करीत आहेत. रसिका धामणकर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वाशीतील एका महाविद्यालयात इतिहासाच्या प्राध्यापक होत्या.  हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात त्या विशारद आहेत. लॉकडाऊनमधील अनुभव सांगताना रसिका म्हणाल्या, मी संगीत विशारद आहे. लॉकडाऊनदरम्यान मी गाण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे मला रियाझ करण्यास आणि संगीताचा अभ्यास करण्यास खूप वेळ मिळाला. महाविद्यालयात असताना सांस्कृतिक कार्यक्रमातून माझ्या अभिनयाला पाठिंबा मिळाला. लॉकडाऊनच्या काळात मी ऑनलाईन क्‍लासेस घेतले.  महत्त्वाची बातमी - विद्यार्थ्यांनो व्हा सज्ज! चार ऑगस्टपासून होणार तुमच्या शाळा सुरू...   एका मराठी वाहिनीवरील सुपरहिट मालिकेत नायकाच्या आईची भूमिका रसिका धामणकर यांच्या वाट्याला आली आहे. नागपंचमीच्या दिवशीपासून (25 जुलै) हा बदल प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ही मालिका पाहण्याची मजा काही वेगळीच असून, रसिकाच्या एन्ट्रीने ती आणखीच मजेदार होणार आहे.  लॉकडाऊनमुळे तब्बल चार महिने मालिकांचे शूटिंग बंद होते. यानंतर या मालिकेत रसिकाची एन्ट्री झाली आहे. यापूर्वी ही भूमिका इरावती लागू साकारत होत्या. कोवीडमुळे इरावती यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. निर्माते व वाहिनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या जागी रसिका धामणकर व शेखर फडके यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांच्या भूमिका असलेले एपिसोड वाहिनीवर प्रसारित केले जात आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30h2BMd
Read More
सिंधुदुर्गात निर्बंध शिथिल; पण...

सिंधुदुर्गनगरी - "मिशन बिगीन अगेन' अंतर्गत उद्यापासून (ता.1) जिल्ह्यात काही नियम शिथिल केले आहेत; मात्र लॉकडाउनचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत वाढविल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिली. 

यापूर्वी परवानगी दिलेली दुकाने, सेवेची ठिकाणे सुरू राहणार आहेत. जिल्ह्याअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेने, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण व स्वच्छता विषयक उपाययोजनांच्या अधिन राहून सुरू राहतील. जिल्हा बंदी कायम असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पूर्वी प्रमाणेच निर्बंध लागू राहतील. जिल्ह्यातील बाजारपेठा, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरू राहतील, मॉल आणि व्यापारी संकुले दिनांक 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. यामध्ये नाट्यगुहे, प्रेक्षागृहे (थिएटर्स) फुड कोर्ट व उपहारगृहे यांचा समावेश नाही.

वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश

तथापि मॉलमधील उपहारगृहातील स्वयंपाकगृह फक्त घरपोच सेवेसाठी सुरू राहील. लग्न समारंभ, खुली जागा, लॉन, वातानुकुलीत नसलेले हॉल 23 जूनच्या निर्बंधासह चालू राहतील. मोकळ्या मैदानावरील व्यायाम निर्बंधासह सुरू राहतील. वर्तमान पत्राची छपाई, वितरण हे घरपोच सेवेसह सुरू राहील. शैक्षणिक संस्थांची कार्यालये, कर्मचारी ( विद्यापीठे, महाविद्यालय, शाळा) शिकविण्याव्यतिरिक्त अशैक्षणिक कामकाज जसे ई-साहित्याचा विकास, उत्तपत्रिकाची मुल्यांकन, निकालाची घोषणा यासाठी सुरू राहतील. सलुन, ब्युटीपार्लस, स्पा दुकाने राज्य शासनाच्या 25 जूनच्या आदेशाप्रमाणे सुरू राहतील. गोल्फ कोर्स, आऊड डोअर फायरिंग रेंज, जिमनॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन व मल्लखांब या सारख्या मैदानी खेळांना दिनांक 5 ऑगस्टपासून समाजिक अंतर, निर्जंतुकीकरण याच्या अधिन राहून सुरू राहतील; मात्र जलतरण तलाव चालविण्यास परवानगी असणार नाही. 

हेही वाचा - साहेब माझ्या मुलाचा स्वॅब घ्या, तो पण पॉझिटिव्ह आला तर सोयीच होईल...'

काही महत्त्वाच्या सूचना 
दुचाकीवर दोन व्यक्ती मास्क व हेल्मेटसह, तीन चाकीमध्ये तीन व्यक्ती व चार चाकी वाहनामध्ये चार व्यक्ती प्रवास करू शकतील. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासा दरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमधील अंतर किमान 6 फूट ठेवावे. दुकानात ग्राहकांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त असणार नाही व योग्य त्या सामाजिक अंतराचे पालन केले जाईल. गर्दीचे कार्यक्रम, संमेलन, मेळावे, परिषदांना बंदी राहील. विवाहास 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नसेल. अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी धम्रपानास बंदी आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात निर्बंध शिथिल; पण... सिंधुदुर्गनगरी - "मिशन बिगीन अगेन' अंतर्गत उद्यापासून (ता.1) जिल्ह्यात काही नियम शिथिल केले आहेत; मात्र लॉकडाउनचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत वाढविल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिली.  यापूर्वी परवानगी दिलेली दुकाने, सेवेची ठिकाणे सुरू राहणार आहेत. जिल्ह्याअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेने, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण व स्वच्छता विषयक उपाययोजनांच्या अधिन राहून सुरू राहतील. जिल्हा बंदी कायम असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पूर्वी प्रमाणेच निर्बंध लागू राहतील. जिल्ह्यातील बाजारपेठा, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरू राहतील, मॉल आणि व्यापारी संकुले दिनांक 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. यामध्ये नाट्यगुहे, प्रेक्षागृहे (थिएटर्स) फुड कोर्ट व उपहारगृहे यांचा समावेश नाही. वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश तथापि मॉलमधील उपहारगृहातील स्वयंपाकगृह फक्त घरपोच सेवेसाठी सुरू राहील. लग्न समारंभ, खुली जागा, लॉन, वातानुकुलीत नसलेले हॉल 23 जूनच्या निर्बंधासह चालू राहतील. मोकळ्या मैदानावरील व्यायाम निर्बंधासह सुरू राहतील. वर्तमान पत्राची छपाई, वितरण हे घरपोच सेवेसह सुरू राहील. शैक्षणिक संस्थांची कार्यालये, कर्मचारी ( विद्यापीठे, महाविद्यालय, शाळा) शिकविण्याव्यतिरिक्त अशैक्षणिक कामकाज जसे ई-साहित्याचा विकास, उत्तपत्रिकाची मुल्यांकन, निकालाची घोषणा यासाठी सुरू राहतील. सलुन, ब्युटीपार्लस, स्पा दुकाने राज्य शासनाच्या 25 जूनच्या आदेशाप्रमाणे सुरू राहतील. गोल्फ कोर्स, आऊड डोअर फायरिंग रेंज, जिमनॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन व मल्लखांब या सारख्या मैदानी खेळांना दिनांक 5 ऑगस्टपासून समाजिक अंतर, निर्जंतुकीकरण याच्या अधिन राहून सुरू राहतील; मात्र जलतरण तलाव चालविण्यास परवानगी असणार नाही.  हेही वाचा - साहेब माझ्या मुलाचा स्वॅब घ्या, तो पण पॉझिटिव्ह आला तर सोयीच होईल...' काही महत्त्वाच्या सूचना  दुचाकीवर दोन व्यक्ती मास्क व हेल्मेटसह, तीन चाकीमध्ये तीन व्यक्ती व चार चाकी वाहनामध्ये चार व्यक्ती प्रवास करू शकतील. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासा दरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमधील अंतर किमान 6 फूट ठेवावे. दुकानात ग्राहकांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त असणार नाही व योग्य त्या सामाजिक अंतराचे पालन केले जाईल. गर्दीचे कार्यक्रम, संमेलन, मेळावे, परिषदांना बंदी राहील. विवाहास 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नसेल. अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी धम्रपानास बंदी आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PdrRwD
Read More
चितारआळीत व्यापाऱ्यांची कोंडी, काय आहेत मागण्या? वाचा... 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील चितारआळी भाग हा कंटेनमेंट झोन आहे. याठिकाणी असलेल्या होलसेल व्यापाऱ्यांना चतुर्थी सणाच्या तोंडावर त्यांचा माल बाजारात नेता येत नाही. त्यांची समस्या लक्षात घेऊन काही कालावधीसाठी त्यांना व्यवसायास जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने केली आहे. 100 मीटरपेक्षा जास्त भागात असलेले कंटेनमेंट झोन कमी करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

याबाबतचे निवेदन सुरेश भोगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना दिले. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी खांडेकर यांची भेट घेत चर्चा केली. आपली बाजू मांडताना ते म्हणाले, की चितारआळी परिसर हा कोरोनामुळे कंटेनमेंट झोन असल्याने सर्वच बाजूनी बंद झाला आहे. त्यामुळे त्याचा तोटा येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. अनेक व्यापारी आपल्या व्यवसायापासून वंचित आहेत.

वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश

गणेश चतुर्थी, बकरी ईद हे सण तोंडावर आहेत. चितारआळी परिसरात मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग आहे. या परिसरात कापड व्यापार, लाकडी, पाठ, खेळणी, इलेक्‍ट्रिशियन, सोनार व इतर होलसेल व किरकोळ विक्रेते मोठ्या अडचणीत आहेत. तसेच कर्जबाजारी होऊन बसले आहेत. अशावेळी त्यांना आपल्या व्यवसायाकडे जाता येत नसून मोठे संकट उभे राहिले आहे. चतुर्थी सणाच्या एक महिना अगोदर व्यापाराचे नियोजन करण्यात येते.

माल नेणे-आणणे, किरकोळ व्यापाऱ्यांना घरपोच करणे अशा तऱ्हेची कामे महत्त्वाची असतात; मात्र कंटेनमेंट झोनमुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसानही झाले आहे. कंटेनमेंट झोनचे अंतर कमी करावे अथवा येथील व्यापाऱ्यांना निदान एक ते दीड तासासाठी माल बाहेर घेण्यास मुभा मिळावी, अशी मागणी भोगटे यांनी केली. यावेळी सुरेश भोगटे, विजय मुद्राळे, अभय पंडित, प्रवीण वाडकर, कुशाल सुराणा, वैभव तानावडे, महंमद व्हेंसेंन, महेश नार्वेकर आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - रत्नागिरीत अधिपरिचारिका 4 ऑगस्टला करणार काम बंद आंदोलन

नऊ रुग्ण आढळल्याने धोका 
खांडेकर म्हणाले, 100 मीटर पर्यंत कंटेनमेंट झोन कायम राहील. याबाबत पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याशी चर्चा करेन. चितार आळीत सापडलेले दाम्पत्य अनेकांच्या संपर्कात असल्यामुळे झोन कमी करता येणे अशक्‍य आहे. याठिकाणी शंभर मीटरच्या आतील सर्व व्यवहार व वाहतूक बंद राहील. आपत्कालीन परिस्थितीत झोनच्या बाहेर नेण्याची परवानगी देऊ शकतो. त्या ठिकाणी नऊ रुग्ण सापडल्यामुळे हा भाग धोकादायक आहे. तरीही व्यापाऱ्यांच्या दृष्टीने विचार करून दीड किंवा दोन तासासाठी येथील होलसेल व्यापाऱ्यांचा माल बाहेर नेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करू. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चितारआळीत व्यापाऱ्यांची कोंडी, काय आहेत मागण्या? वाचा...  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील चितारआळी भाग हा कंटेनमेंट झोन आहे. याठिकाणी असलेल्या होलसेल व्यापाऱ्यांना चतुर्थी सणाच्या तोंडावर त्यांचा माल बाजारात नेता येत नाही. त्यांची समस्या लक्षात घेऊन काही कालावधीसाठी त्यांना व्यवसायास जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने केली आहे. 100 मीटरपेक्षा जास्त भागात असलेले कंटेनमेंट झोन कमी करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.  याबाबतचे निवेदन सुरेश भोगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना दिले. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी खांडेकर यांची भेट घेत चर्चा केली. आपली बाजू मांडताना ते म्हणाले, की चितारआळी परिसर हा कोरोनामुळे कंटेनमेंट झोन असल्याने सर्वच बाजूनी बंद झाला आहे. त्यामुळे त्याचा तोटा येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. अनेक व्यापारी आपल्या व्यवसायापासून वंचित आहेत. वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश गणेश चतुर्थी, बकरी ईद हे सण तोंडावर आहेत. चितारआळी परिसरात मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग आहे. या परिसरात कापड व्यापार, लाकडी, पाठ, खेळणी, इलेक्‍ट्रिशियन, सोनार व इतर होलसेल व किरकोळ विक्रेते मोठ्या अडचणीत आहेत. तसेच कर्जबाजारी होऊन बसले आहेत. अशावेळी त्यांना आपल्या व्यवसायाकडे जाता येत नसून मोठे संकट उभे राहिले आहे. चतुर्थी सणाच्या एक महिना अगोदर व्यापाराचे नियोजन करण्यात येते. माल नेणे-आणणे, किरकोळ व्यापाऱ्यांना घरपोच करणे अशा तऱ्हेची कामे महत्त्वाची असतात; मात्र कंटेनमेंट झोनमुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसानही झाले आहे. कंटेनमेंट झोनचे अंतर कमी करावे अथवा येथील व्यापाऱ्यांना निदान एक ते दीड तासासाठी माल बाहेर घेण्यास मुभा मिळावी, अशी मागणी भोगटे यांनी केली. यावेळी सुरेश भोगटे, विजय मुद्राळे, अभय पंडित, प्रवीण वाडकर, कुशाल सुराणा, वैभव तानावडे, महंमद व्हेंसेंन, महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.  हेही वाचा - रत्नागिरीत अधिपरिचारिका 4 ऑगस्टला करणार काम बंद आंदोलन नऊ रुग्ण आढळल्याने धोका  खांडेकर म्हणाले, 100 मीटर पर्यंत कंटेनमेंट झोन कायम राहील. याबाबत पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याशी चर्चा करेन. चितार आळीत सापडलेले दाम्पत्य अनेकांच्या संपर्कात असल्यामुळे झोन कमी करता येणे अशक्‍य आहे. याठिकाणी शंभर मीटरच्या आतील सर्व व्यवहार व वाहतूक बंद राहील. आपत्कालीन परिस्थितीत झोनच्या बाहेर नेण्याची परवानगी देऊ शकतो. त्या ठिकाणी नऊ रुग्ण सापडल्यामुळे हा भाग धोकादायक आहे. तरीही व्यापाऱ्यांच्या दृष्टीने विचार करून दीड किंवा दोन तासासाठी येथील होलसेल व्यापाऱ्यांचा माल बाहेर नेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करू.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PqVJGd
Read More
मालवण पालिकेच्या इतिहासात प्रथमच उपक्रम, काय आहे तो? वाचा...

मालवण (सिंधुदुर्ग) -  शासनाच्या निर्देशाप्रमाणे येथील पालिकेची विशेष सभा काल ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. शतकामहोत्सवी मालवण पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच ऑनलाईन सभा ठरली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत 19 नगरसेवक सहभागी झाले. नगराध्यक्ष दालनात स्क्रीन प्रोजेक्‍टरद्वारे सर्व नगरसेवकांशी जोडले गेले.

यात प्रामुख्याने गणेशोत्सवाचे नियोजन झाले. यात उपनगराध्य राजन वराडकर, बांधकाम सभापती यतीन खोत, आरोग्य सभापती पूजा सरकारे, नगरसेवक सुदेश आचरेकर, मंदार केणी, नितीन वाळके, दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, पूजा करलकर, ममता वराडकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शीला गिरकर, सेजल परब आदी सहभागी झाले. 

वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला; उडाली दाणादाण 

आगामी गणेशोत्सव नियोजनाबाबत ही बैठक झाली. यावेळी उपस्थित सदस्यांनी सूचना मांडल्या. दरम्यान, लवकरच मालवण पालिका सेवाभावी संस्था, व्यापारी, नागरिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेऊन नियोजन करण्याबाबत निर्णय घेईल, असे सांगण्यात आले. 

विविध विषयांवर चर्चा 
शहरात कचरा उठाव, झाडे छाटणे, डास फवारणी याबाबत जादा कर्मचारी नेमून नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. स्ट्रीट लाईट दुरुस्ती, बंद हायमस्ट दुरुस्ती करणे, गणेश विसर्जन ठिकाणी व्यवस्था करणे याबाबतही चर्चा झाली. तर शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी घरोघर जाऊन केली जावी. शासनाच्या निर्देशाप्रमाणे कॉरंटाईन कालावधी असावा. शहरातील प्रमुख मार्गावर कर्मचारी नेमून बाहेरून आलेल्या व्यक्तींची तपासणी व्हावी. याबाबतही चर्चा झाली, असे नगराध्यक्षांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मालवण पालिकेच्या इतिहासात प्रथमच उपक्रम, काय आहे तो? वाचा... मालवण (सिंधुदुर्ग) -  शासनाच्या निर्देशाप्रमाणे येथील पालिकेची विशेष सभा काल ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. शतकामहोत्सवी मालवण पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच ऑनलाईन सभा ठरली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत 19 नगरसेवक सहभागी झाले. नगराध्यक्ष दालनात स्क्रीन प्रोजेक्‍टरद्वारे सर्व नगरसेवकांशी जोडले गेले. यात प्रामुख्याने गणेशोत्सवाचे नियोजन झाले. यात उपनगराध्य राजन वराडकर, बांधकाम सभापती यतीन खोत, आरोग्य सभापती पूजा सरकारे, नगरसेवक सुदेश आचरेकर, मंदार केणी, नितीन वाळके, दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, पूजा करलकर, ममता वराडकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शीला गिरकर, सेजल परब आदी सहभागी झाले.  वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला; उडाली दाणादाण  आगामी गणेशोत्सव नियोजनाबाबत ही बैठक झाली. यावेळी उपस्थित सदस्यांनी सूचना मांडल्या. दरम्यान, लवकरच मालवण पालिका सेवाभावी संस्था, व्यापारी, नागरिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेऊन नियोजन करण्याबाबत निर्णय घेईल, असे सांगण्यात आले.  विविध विषयांवर चर्चा  शहरात कचरा उठाव, झाडे छाटणे, डास फवारणी याबाबत जादा कर्मचारी नेमून नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. स्ट्रीट लाईट दुरुस्ती, बंद हायमस्ट दुरुस्ती करणे, गणेश विसर्जन ठिकाणी व्यवस्था करणे याबाबतही चर्चा झाली. तर शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी घरोघर जाऊन केली जावी. शासनाच्या निर्देशाप्रमाणे कॉरंटाईन कालावधी असावा. शहरातील प्रमुख मार्गावर कर्मचारी नेमून बाहेरून आलेल्या व्यक्तींची तपासणी व्हावी. याबाबतही चर्चा झाली, असे नगराध्यक्षांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hXfL7m
Read More
सिंधुदुर्गातील `वेटलँड` आता एका क्लिकवर! वाचा सविस्तर...

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्व असलेल्या जिल्ह्यातील 57 पाणथळ जागांचे पहिल्या टप्प्यातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले. या मोहिमेला अधिक बळ मिळावे, या हेतुने "सिंधुदुर्ग वेटलॅंड' शिर्षकाखाली पर्यावरण प्रेमींनी लोकसहभागातून संकेतस्थळ सुरू केले आहे. अशा पद्धतीचे भारतातील हे पहिलेच संकेतस्थळ असून त्याचे लॉंचिंग 15 ऑगस्टला सायकांळी 4 वाजता वेटलॅंड समितीचे सदस्य डॉ. अफोज अहमद यांच्या हस्ते होणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले. जिल्ह्यातील पाणथळ जागाही त्याचाच एक भाग आहे. पाणथळ ठिकाणाच्या बाजूला पर्यावरणाच्या दृष्टीने असणारी हिरवीगार झाडे, काही ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे याचा पर्यावरण आणि पर्यटनाच्या नजरेतून विचार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो ठिकाणे दुर्लक्षित राहिली. त्यामुळे विविध अंगानी जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात समुद्री किनारी, भरतीमुळे दलदलीचा भाग, कांदळवन, तलाव, नद्यांचे किनारे आणि गवताळ अन्‌ दलदलीची, अशी 373 ठिकाणे आहेत.

वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला; उडाली दाणादाण 

याव्यतिरिक्त देखील ठिकाणे असू शकतील. त्यातील इनलॅंड प्रकारात येणाऱ्या 57 पाणथळ जांगाचे सर्व्हेक्षणाचा पहिला टप्पा पुर्ण झाला आहे. यामध्ये मालवण ः 5 कुडाळ : 17, सावंतवाडी : 8, वेंगुर्ले : 9, दोडामार्ग : 2, कणकवली : 11, देवगड : 1, वैभववाडी : 4 इतक्‍या ठिकाणांचा समावेश आहे. वेटलॅंड समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक पर्यावरणप्रेमींनी हे काम लोकसहभागातून पूर्ण केले. पाणथळ जागा, नैसर्गीक जलस्तोत्राचे संरक्षण व्हावे, त्याचे महत्व नागरिकांना पटवून द्यावे आणि नागरिकांनी आपआपल्या परिसरातील अशा जागांचे जतन करावे या हेतूने जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी "सिंधुदुर्ग वेटलॅंड 'अशी जिल्ह्यातील पाणथळ जागांचे संकेतस्थळ तयार केले.

निलेश गावडे, गार्गी शिंगटे, रघुवीरसिंग राठौरे, प्रीतम कुमार, आनंद कुलकर्णी, गणेशसिंग राठौरे या टीमने त्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती या संकेतस्थळावर मिळणार आहे. देशातील हे पहिलेच संकेतस्थळ आहे. याचे उद्‌घाटन 15 ऑगस्टला "सिंधुदुर्ग वेटलॅंड' फेसबुक पेजवर ऑनलाईन होणार आहे. 

हेही वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश

दृष्टीक्षेपात 
राज्यात एकूण 21 हजार 668 पाणथळ जागा असून 10 लाख 14 हजार 522 हेक्‍टर क्षेत्र त्याखाली आहे. भौगोलिक क्षेत्राच्या 3.3 टक्के इतके हे क्षेत्र आहे. जलाशयाखाली 36.29 टक्के, तलावखाली 20.57 टक्के, नदी-ओहोळतर्गंत 29.54 टक्के, खाडीखाली 4.10 टक्के तर कांदळवनखाली 2.98 टक्के इतके क्षेत्र आहे. 

"कोकण वेटलॅंड'ची स्थापना 
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाने पाणथळ जागा सरक्षण हेतूने कोकण वेटलॅंड मंचची स्थापना करण्यात आली आहे. पाणथळ जागा उल्लघंन संदर्भात लेखी तसेच फोन, इमेलद्‌वारे तक्रार आल्यास तहसिलदार, जिल्हाधिकारी यांनी 48 तासांच्या आत ठिकाणाची पाहणी करून उल्लंघन पुर्वस्थितीत आणण्यासोबत उल्लंघन करणारावर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. 

पाणथळ जागांबाबत जागृती नसणे आणि कायद्याचे अज्ञान हे पाणथळ जागा नष्ट होण्यामागची कारणे आहेत; परंतु ताज्या पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्‍न कायम स्वरूपी मार्गी लागण्यासाठी पाणथळ नैसर्गीक स्तोत्रांचे संवर्धन करणे नागरिकांचे मुलभुत कर्तव्य आहे. नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची देखील माहिती घेणे आवश्‍यक आहे. 
- ऍड. ओमकार केणी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 57 पाणथळ जागांचे सर्व्हेक्षण पहिल्या टप्प्यात पुर्ण झाले असून हे सर्व्हेक्षण तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सत्यापित करून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे. आता हे सर्व्हेक्षण जिल्ह्यातील लोकांसमोर आणले जात आहे. गावातील सजग नागरिकांनी आपला गाव, आपला परिसर जाणुन घेण्याची गरज आहे. 
- प्रा. हसन खान, सदस्य, सिंधुदुर्ग वेटलॅंड समिती 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गातील `वेटलँड` आता एका क्लिकवर! वाचा सविस्तर... वैभववाडी (सिंधुदुर्ग) - पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्व असलेल्या जिल्ह्यातील 57 पाणथळ जागांचे पहिल्या टप्प्यातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले. या मोहिमेला अधिक बळ मिळावे, या हेतुने "सिंधुदुर्ग वेटलॅंड' शिर्षकाखाली पर्यावरण प्रेमींनी लोकसहभागातून संकेतस्थळ सुरू केले आहे. अशा पद्धतीचे भारतातील हे पहिलेच संकेतस्थळ असून त्याचे लॉंचिंग 15 ऑगस्टला सायकांळी 4 वाजता वेटलॅंड समितीचे सदस्य डॉ. अफोज अहमद यांच्या हस्ते होणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले. जिल्ह्यातील पाणथळ जागाही त्याचाच एक भाग आहे. पाणथळ ठिकाणाच्या बाजूला पर्यावरणाच्या दृष्टीने असणारी हिरवीगार झाडे, काही ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे याचा पर्यावरण आणि पर्यटनाच्या नजरेतून विचार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो ठिकाणे दुर्लक्षित राहिली. त्यामुळे विविध अंगानी जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात समुद्री किनारी, भरतीमुळे दलदलीचा भाग, कांदळवन, तलाव, नद्यांचे किनारे आणि गवताळ अन्‌ दलदलीची, अशी 373 ठिकाणे आहेत. वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला; उडाली दाणादाण  याव्यतिरिक्त देखील ठिकाणे असू शकतील. त्यातील इनलॅंड प्रकारात येणाऱ्या 57 पाणथळ जांगाचे सर्व्हेक्षणाचा पहिला टप्पा पुर्ण झाला आहे. यामध्ये मालवण ः 5 कुडाळ : 17, सावंतवाडी : 8, वेंगुर्ले : 9, दोडामार्ग : 2, कणकवली : 11, देवगड : 1, वैभववाडी : 4 इतक्‍या ठिकाणांचा समावेश आहे. वेटलॅंड समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक पर्यावरणप्रेमींनी हे काम लोकसहभागातून पूर्ण केले. पाणथळ जागा, नैसर्गीक जलस्तोत्राचे संरक्षण व्हावे, त्याचे महत्व नागरिकांना पटवून द्यावे आणि नागरिकांनी आपआपल्या परिसरातील अशा जागांचे जतन करावे या हेतूने जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी "सिंधुदुर्ग वेटलॅंड 'अशी जिल्ह्यातील पाणथळ जागांचे संकेतस्थळ तयार केले. निलेश गावडे, गार्गी शिंगटे, रघुवीरसिंग राठौरे, प्रीतम कुमार, आनंद कुलकर्णी, गणेशसिंग राठौरे या टीमने त्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती या संकेतस्थळावर मिळणार आहे. देशातील हे पहिलेच संकेतस्थळ आहे. याचे उद्‌घाटन 15 ऑगस्टला "सिंधुदुर्ग वेटलॅंड' फेसबुक पेजवर ऑनलाईन होणार आहे.  हेही वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश दृष्टीक्षेपात  राज्यात एकूण 21 हजार 668 पाणथळ जागा असून 10 लाख 14 हजार 522 हेक्‍टर क्षेत्र त्याखाली आहे. भौगोलिक क्षेत्राच्या 3.3 टक्के इतके हे क्षेत्र आहे. जलाशयाखाली 36.29 टक्के, तलावखाली 20.57 टक्के, नदी-ओहोळतर्गंत 29.54 टक्के, खाडीखाली 4.10 टक्के तर कांदळवनखाली 2.98 टक्के इतके क्षेत्र आहे.  "कोकण वेटलॅंड'ची स्थापना  मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाने पाणथळ जागा सरक्षण हेतूने कोकण वेटलॅंड मंचची स्थापना करण्यात आली आहे. पाणथळ जागा उल्लघंन संदर्भात लेखी तसेच फोन, इमेलद्‌वारे तक्रार आल्यास तहसिलदार, जिल्हाधिकारी यांनी 48 तासांच्या आत ठिकाणाची पाहणी करून उल्लंघन पुर्वस्थितीत आणण्यासोबत उल्लंघन करणारावर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे.  पाणथळ जागांबाबत जागृती नसणे आणि कायद्याचे अज्ञान हे पाणथळ जागा नष्ट होण्यामागची कारणे आहेत; परंतु ताज्या पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्‍न कायम स्वरूपी मार्गी लागण्यासाठी पाणथळ नैसर्गीक स्तोत्रांचे संवर्धन करणे नागरिकांचे मुलभुत कर्तव्य आहे. नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची देखील माहिती घेणे आवश्‍यक आहे.  - ऍड. ओमकार केणी  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 57 पाणथळ जागांचे सर्व्हेक्षण पहिल्या टप्प्यात पुर्ण झाले असून हे सर्व्हेक्षण तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सत्यापित करून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे. आता हे सर्व्हेक्षण जिल्ह्यातील लोकांसमोर आणले जात आहे. गावातील सजग नागरिकांनी आपला गाव, आपला परिसर जाणुन घेण्याची गरज आहे.  - प्रा. हसन खान, सदस्य, सिंधुदुर्ग वेटलॅंड समिती  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Dliokr
Read More
आयुक्त मुंढे स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत का पडले एकाकी ? वाचा

नागपूर : नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्तांनी कंपनीच्या सीईओपदी नसताना अनेक निर्णय घेतले. या निर्णयांना मंजुरीच्या प्रस्तावात कायदेशीर बाबींचा मुद्दा उपस्थित करीत संचालक मंडळातील १३ सदस्यांनी धुडकावून लावला.

विशेष म्हणजे हे सर्व प्रस्ताव आयुक्तांनीच आजच्या बैठकीसाठी तयार करून चेअरमन प्रवीण परदेसी यांच्याकडे पाठविले असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने बोलावण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त पुन्हा एकाकी पडल्याचा टोला महापौरांनी लगावला.

स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज महापालिकेतील कंपनीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीची आवश्‍यकता काय होती, असा प्रश्‍न सदस्यांनी विचारला. दोनच दिवसांत या बैठकीसाठी विषयपत्रिका तयार करण्यात आली. एवढ्या घाईत बैठक घेण्याची गरज काय, असा प्रश्‍न महापौरांनी उपस्थित केला होता.

बैठकीत कंपनीचे चेअरमन प्रवीण परदेसी आणि दुसरे संचालक भारत सरकारचे दीपक कोचर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. एवढ्या घाईत बैठक आयोजित केल्यामुळे प्रवीण परदेशी यांनी नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ एस. के. मिश्रा यांचे मत घेतले.

त्यावर त्यांनी उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू असून मागील संचालक मंडळाच्या बैठकीत स्पष्टपणे कायदेशीर मत घेण्याचे नमूद केले होते, असे सांगितले. त्यानंतरच १४ फेब्रुवारी ते १० जुलैपर्यंत आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करावी, असेही मिश्रा यांनी परदेसी यांना सांगितले.
आयुक्तांनी कुठल्याही कायदेतज्ज्ञांचे मत न घेता बैठक घेण्यामागचे कारण काय? असा प्रश्न महापौरांनी केला.

आजच्या बैठकीच्या विषय पत्रिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे. यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णय यांचा समावेश आहे. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला.

नागपूर मेट्रो धक्कादायक घटनेने हादरली! मेट्रो कार्यालयाची टेलिफोन लाईन झाली हॅक..तब्बल इतक्या लाखांचा फटका

अशी बैठक घेताच येत नाही, असे मत एस.के. मिश्रा यांनी या आक्षेपावर व्यक्त केल्याचेही महापौर म्हणाले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कायदेशीर मत घेतल्यानंतरच या विषयावर विचार करावी, असा निर्णय एकमताने सर्व अधिकारी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. व्हीसीवरुन सहभागी झालेले दीपक कोचर यांचेही तेच मत पडले. त्यामुळे आजच्या बैठकीतही १३ जण एका बाजूला, तर तुकाराम मुंढे एका बाजूला असल्याचे चित्र दिसल्याचे जोशी यांनी सांगितले.

महापौर जोशींनी घेतला आक्षेप 
विषय पत्रिकेतआयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे. यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णयाला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव होता. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला.
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आयुक्त मुंढे स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत का पडले एकाकी ? वाचा नागपूर : नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्तांनी कंपनीच्या सीईओपदी नसताना अनेक निर्णय घेतले. या निर्णयांना मंजुरीच्या प्रस्तावात कायदेशीर बाबींचा मुद्दा उपस्थित करीत संचालक मंडळातील १३ सदस्यांनी धुडकावून लावला. विशेष म्हणजे हे सर्व प्रस्ताव आयुक्तांनीच आजच्या बैठकीसाठी तयार करून चेअरमन प्रवीण परदेसी यांच्याकडे पाठविले असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने बोलावण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त पुन्हा एकाकी पडल्याचा टोला महापौरांनी लगावला. स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज महापालिकेतील कंपनीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीची आवश्‍यकता काय होती, असा प्रश्‍न सदस्यांनी विचारला. दोनच दिवसांत या बैठकीसाठी विषयपत्रिका तयार करण्यात आली. एवढ्या घाईत बैठक घेण्याची गरज काय, असा प्रश्‍न महापौरांनी उपस्थित केला होता. बैठकीत कंपनीचे चेअरमन प्रवीण परदेसी आणि दुसरे संचालक भारत सरकारचे दीपक कोचर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. एवढ्या घाईत बैठक आयोजित केल्यामुळे प्रवीण परदेशी यांनी नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ एस. के. मिश्रा यांचे मत घेतले. त्यावर त्यांनी उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू असून मागील संचालक मंडळाच्या बैठकीत स्पष्टपणे कायदेशीर मत घेण्याचे नमूद केले होते, असे सांगितले. त्यानंतरच १४ फेब्रुवारी ते १० जुलैपर्यंत आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करावी, असेही मिश्रा यांनी परदेसी यांना सांगितले. आयुक्तांनी कुठल्याही कायदेतज्ज्ञांचे मत न घेता बैठक घेण्यामागचे कारण काय? असा प्रश्न महापौरांनी केला. आजच्या बैठकीच्या विषय पत्रिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे. यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णय यांचा समावेश आहे. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला. नागपूर मेट्रो धक्कादायक घटनेने हादरली! मेट्रो कार्यालयाची टेलिफोन लाईन झाली हॅक..तब्बल इतक्या लाखांचा फटका अशी बैठक घेताच येत नाही, असे मत एस.के. मिश्रा यांनी या आक्षेपावर व्यक्त केल्याचेही महापौर म्हणाले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कायदेशीर मत घेतल्यानंतरच या विषयावर विचार करावी, असा निर्णय एकमताने सर्व अधिकारी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. व्हीसीवरुन सहभागी झालेले दीपक कोचर यांचेही तेच मत पडले. त्यामुळे आजच्या बैठकीतही १३ जण एका बाजूला, तर तुकाराम मुंढे एका बाजूला असल्याचे चित्र दिसल्याचे जोशी यांनी सांगितले. महापौर जोशींनी घेतला आक्षेप  विषय पत्रिकेतआयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेत रुजू झाल्यापासून स्मार्ट सिटी कंपनीबाबत घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर परवानगी द्यावी, रुजू झालेल्या तारखेपासूनच सीईओ म्हणून मान्यताही द्यावी आणि या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांना परवानगी हवी आहे. यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले नियोजन, बायोमाईनिंगच्या निविदेला परवानगी, सर्व प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहाराचे घेतलेले सर्व निर्णयाला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव होता. यावर महापौर जोशींनी आक्षेप घेतला.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33cpQsU
Read More
कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक ज्येष्ठांना अन्य आजार 

पुणे - शहरात एकीकडे कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक व्यक्तींना मूत्रपिंड, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अस्थमा यांसारखे आजार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. गंभीर बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना हे आजार आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि झालाच, तर त्यांच्यावर वेळेत योग्य उपचार व्हावेत, यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. परिणामी, कोरोनाचा मृत्यूदर कमी होण्याची आशा आहे. 

कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, सध्या रोज सरासरी 35 ते 40 जणांचा मृत्यू होत आहे. मृतांपैकी बहुतांशी रुग्णांना कोरोनासह अन्य आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावर उपाय म्हणून कोरोनाची संख्या अधिक असलेल्या भागांतील प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्यातून व्यक्तींची "मेडिकल हिस्टरी' जाणून घेत; त्या-त्या आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत काही जणांची कोरोनाची चाचणी केली जात आहे. ज्यामुळे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे शक्‍य होत आहे, असे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

पन्नास वर्षांवरील व्यक्तींची तपासणी 
घरांमधील साधारणपणे 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांना कोणाला गंभीर आजार आहेत, ती व्यक्ती नेमके कोणते उपचार घेत आहे, औषधे वेळेत घेते का, याचसोबत या रुग्णांना दोनपेक्षा अधिक दिवसांपेक्षा ताप, खोकला, सर्दी आहे का, हेही तपासले जात आहे. गरजेनुसार लोकांना महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार व्यवस्था केली आहे. 

तपासणीसाठी पथके -  609 (एका पथकात दोन व्यक्ती) 
तपासणी झालेली घरे  -  3 लाख 19 हजार 833 
अन्य आजार असलेली रुग्ण  - 1 लाख 4 720 

इतर आजार असलेल्या; परंतु कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास ते बरे होतात. त्यासाठी बाधित क्षेत्रांतील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांना अन्य आजार आहेत, त्यांच्या घरी रोज जाऊन उपचाराकडे लक्ष देण्यात येत आहे. 
-डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक ज्येष्ठांना अन्य आजार  पुणे - शहरात एकीकडे कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक व्यक्तींना मूत्रपिंड, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अस्थमा यांसारखे आजार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. गंभीर बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना हे आजार आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि झालाच, तर त्यांच्यावर वेळेत योग्य उपचार व्हावेत, यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. परिणामी, कोरोनाचा मृत्यूदर कमी होण्याची आशा आहे.  कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, सध्या रोज सरासरी 35 ते 40 जणांचा मृत्यू होत आहे. मृतांपैकी बहुतांशी रुग्णांना कोरोनासह अन्य आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावर उपाय म्हणून कोरोनाची संख्या अधिक असलेल्या भागांतील प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्यातून व्यक्तींची "मेडिकल हिस्टरी' जाणून घेत; त्या-त्या आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत काही जणांची कोरोनाची चाचणी केली जात आहे. ज्यामुळे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे शक्‍य होत आहे, असे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप        पन्नास वर्षांवरील व्यक्तींची तपासणी  घरांमधील साधारणपणे 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांना कोणाला गंभीर आजार आहेत, ती व्यक्ती नेमके कोणते उपचार घेत आहे, औषधे वेळेत घेते का, याचसोबत या रुग्णांना दोनपेक्षा अधिक दिवसांपेक्षा ताप, खोकला, सर्दी आहे का, हेही तपासले जात आहे. गरजेनुसार लोकांना महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार व्यवस्था केली आहे.  तपासणीसाठी पथके -  609 (एका पथकात दोन व्यक्ती)  तपासणी झालेली घरे  -  3 लाख 19 हजार 833  अन्य आजार असलेली रुग्ण  - 1 लाख 4 720  इतर आजार असलेल्या; परंतु कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास ते बरे होतात. त्यासाठी बाधित क्षेत्रांतील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांना अन्य आजार आहेत, त्यांच्या घरी रोज जाऊन उपचाराकडे लक्ष देण्यात येत आहे.  -डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 31, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XiOJiV
Read More
'हजची संधी गेली तरीही ईद सकारात्मक वातावरणातच साजरी करणार '