Video : महाराष्ट्रातील पारंपरिक चित्रकलेचा रंजक अभ्यास वडार, मरिआईवाले, डक्कलवार आणि चित्रकथी यांच्यासारख्या भटक्या जमातींनी महाराष्ट्राची चित्रपरंपरा ही देव्हाऱ्यांच्या माध्यमातून आजतागायत जिवंत ठेवली आहे. पुण्यातील चित्रकार प्रा. विक्रम कुलकर्णी हे या लोकपरंपरेवरील संशोधन प्रकल्प राबवत आहेत. सध्या ते सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी येथे टागोर फेलो म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील लोकचित्रकला परंपरेचा इतिहास त्यांनी छायाचित्रं व दृकश्राव्य फितींच्या स्वरूपातही दस्तऐवज म्हणून जपला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कुलकर्णी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील भटक्या जातींशी संबंधित चित्रकला परंपरा या विषयावर, मी प्रत्यक्ष फिरून सर्वेक्षण करून झालं आहे. आता त्या माहितीचं विश्लेषण, तपशीलवार मांडणी आदी काम सुरू आहे. मी केलेल्या अभ्यासात पारंपरिक चित्रांकनाबरोबरच त्या-त्या काळातील वास्तव प्रतिबिंबित झालेलं आढळलं. उदाहरणार्थ, इंग्रजी राजवटीत वडार समाजातील लोकांना गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हेगार समजलं जायचं. दोन्ही हात बांधून न्यायालयात उभं केलं जायचं. हे वर्णन करणारी चित्रं वडार मंडळींच्या देव्हाऱ्यांवर बघायला मिळाली. मरिआईवाल्यांच्या देव्हाऱ्यांवर बलुतेदारांची चित्रं पहायला मिळाली. यमपुराणात पापाबद्दल सांगितलेल्या शिक्षा दर्शविणारी चित्रं दिसली. परंपरागत पुराणकथांप्रमाणेच जत्रा, शेती आदी लोकजीवन काही चित्रांतून, तर काहींमधून निसर्गाचं मानवजीवनाशी असलेलं नातं प्रकटलेलं जाणवलं.’’ कुलकर्णी यांनी असंही सांगितलं की, महाराष्ट्रात एकीकडे अजिंठ्याची निराळ्याच शैलीची चित्रकला आहे. त्याखेरीज तुरळक प्रमाणात ऐतिहासिक चित्रकला दिसते. उत्तर पेशवाईत वाई, मेणवलीसारख्या ठिकाणी वाड्यातील भिंतींवर चित्रं साकारली जात, पण ती तत्कालीन शासक वर्ग किंवा सुबत्ता असलेल्यांकरवीच. याउलट भटक्या जमातींनी आर्थिक पाठबळ नसतानाही चित्रपरंपरेचं मनोभावे जतन केलं. जेथून आलेत, त्या प्रांताच्या चित्र परंपरेला महाराष्ट्रातील लोकजीवनातील संदर्भांची जोड दिली. लोकचित्रकलेतील परंपरेत नवतेची भर घातली. ती कालसुसंगत करून लोकांसमोर नित्य ठेवत सांभाळली, हे या मंडळींचं मोलाचं योगदान आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 16, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3914Ar0 Read More Read more No comments:
मद्यविक्रीतून खर्चही निघेना, दुकानदार शटर बंद करण्याच्या मनस्थितीत; कोठे ते वाचा मुंबई - लॉकडाउनमुळे मद्यविक्रीच्या व्यवसायाचेही आर्थिक गणित बिघडले असून ऑनलाइन विक्रीचा पर्याय अव्यवहार्य असल्याची तक्रार बहुतांश मद्यविक्रेत्यांनी केली आहे. नुकसानामुळे मुंबईतील २० टक्के विक्रेते दुकानाचे शटर कायमचे बंद करुन परवाना विकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मद्यविक्रीला बंदी होती. मद्यविक्रीला सरकारने ४ मेपासून काही प्रमाणात मंजुरी दिली. त्यातही रेड झोन, प्रतिबंधित क्षेत्रांची आडकाठी होती. त्यानंतर दुकानापुढे झालेल्या गर्दीमुळे १५ मेपासून ऑनलाइन विक्री, घरपोच सेवा असे पर्याय अंमलात आणले. मात्र ऑनलाइनच्या माध्यमातून पुरेशी विक्री होत नसल्याचे मद्यविक्रेत्यांचे म्हणणे आहे. कोट्यवधींचा परवाना खर्च निघत नसल्याने मुंबईच्या ४७५ पैकी १०० मद्यविक्रेते परवानाच विकण्या मनस्थितीत आहेत. मद्यविक्रीचा परवाना दोन कोटी ते पाच कोटीपर्यंत विकला जातो. त्यामुळे काही व्यावसायिकांनी तो विक्रीस काढल्याचे सांगितले. अनेक मद्य विक्रेत्यांनी परवाने भाडेतत्तावर घेतले आहेत. त्यामुळे महिन्याकाठी काही लाख रुपये द्यावेच लागतात. अशात मद्याचे दुकान चालवणे कठण असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/2OubHyN Latest news updates July 16, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2WttkD3 Read More Read more No comments:
चंद्रकांत पाटील यांनी माझी तसेच सरकारची बदनामी केली; म्हणून.... मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथिक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदिक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल केली आहे. माझी तसेच सरकारची बदनामी केली आहे. याबाबत त्यांनी माफी किंवा दिलगिरी व्यक्त करावी, असे न केल्यास त्यांच्याविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्यात येईल, असे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पाटील यांनी दावा केल्यानुसार अर्सेनिक अल्बम हे औषध दोन रुपये इतक्या कमी किमतीत मिळत असल्यास ते उपलब्ध करून द्यावे, यासाठी जिल्हा परिषदांना त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना देऊ, असेही मुश्रीफ यांनी पत्रात नमूद केले आहे. औषध खरेदीचे सर्व अधिकार जिल्हा परिषदांना दिले आहेत. राज्यात बारावीचा निकाल ९०.६६ टक्के लागला बाजारात दोन रुपये दराने मिळणारे अर्सेनिक अल्बम ३० हे औषध राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाने २३ रुपये दराने खरेदी केल्याची चुकीची माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांमार्फत देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. वास्तविक अशी कोणतीही खरेदी राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाने केलेली नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 16, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3937FXv Read More Read more No comments:
गर्दी केल्यास होणार इस्लामपुरात कठोर कारवाई इस्लामपूर : शहरातील विविध ठिकाणी होणारी गर्दी विचारात घेऊन पालिका प्रशासनाने गंभीर कारवाईचा इशारा दिला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा नव्याने वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सक्षमपणे राबविणे अत्यावश्यक आहे, असे सांगत मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांनी कारवाई केली जाईल, असे पत्रक जारी केले आहे. त्या स्वतः शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करीत आहेत आणि नियम न पाळणाऱ्या व्यावसायिक, नागरिकांवर कारवाई केली जात आहे. मुख्याधिकारी पवार यांनी म्हटले आहे, की आपल्या व कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी, व्यावसायिक सार्वजनिक जागेमध्ये मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, व्यवसायाच्या ठिकाणी सॅनिटायझर सुविधा उपलब्ध करून देणे, लग्न समारंभ व अंत्यसंस्कारावेळी जास्तीत जास्त 50 नागरिक उपस्थित असणे, शहरातील सर्व प्रकारचे कोचींग क्लासेस, जीम पूर्णपणे बंद ठेवणे, भाजी व्यापा-यांनी नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या जागेत गर्दी न करता व्यवसाय करणे, व्यवसायांच्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश न देणे, शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच व्यवसाय करणे अशा सर्व बाबी कायद्यानुसार बंधनकारक आहेत. त्याचप्रमाणे उरूण इस्लामपूरमध्ये परगावहून, परराज्य, तसेच परदेशातून येणा-या नागरिकांनी स्वतःहून नगरपालिकेला तसेच पोलीस ठाण्याला कळवणे बंधनकारक आहे. या सर्व आवश्यक बाबींचे पालन न केल्याचे आढळून आल्यास नागरी जिवीतास धोका निर्माण केला म्हणून व्यापक नागरी जनहितार्थ आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंडात्मक, फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. प्राथमिक व नैतिक जबाबदारी... नागरिकांनी स्वतः, कुटुंबातील वृध्द, लहान मुले, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, अपंग व्यक्तींचे संरक्षण करणे प्राथमिक व नैतिक जबाबदारी आहे. कुटुंबातील अथवा संपर्कातील कोणीही व्यक्ती सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखीने व इतर कारणाने आजारी असल्याचे आढळल्यास तातडीने उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय (इस्लामपूर, 02342-223158), शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेडकरनगर येथे संपर्क साधावा. संपादन : प्रफुल्ल सुतार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3fzI2jB Read More Read more No comments:
`तो` सरकारचा जावई?, असा प्रश्न करत आमदार राणे का संतापले? वैभववाडी (सिंधुदुर्ग) - दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदाराला पुनः-पुन्हा मुख्यमंत्री सडक योजनेची कामे दिली जातात, तो सरकारचा जावई आहे का? असा संतप्त सवाल आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केला. जोपर्यंत अशा ठेकेदारांना कामे द्यायची बंद होत नाहीत, तोपर्यंत कितीही कोटीची कामे केली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे ठाम मतही आमदार राणे यांनी व्यक्त केले. येथील पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक झाली. या सभेला सभापती अक्षता डाफळे, उपजिल्हाधिकारी डॉ. वर्षा शिंगण, तहसीलदार रामदास झळके, शारदा कांबळे, सुधीर नकाशे, नासीर काझी, शुभदा पाटील, अरविंद रावराणे, हर्षदा हरयाण आदी उपस्थित होते. आजच्या आढावा सभेत मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. या मुद्यावरून आमदार राणे संतप्त झाले. सतत दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा तालुक्यातील तिन्ही कामे दिली आहेत. उर्वरित मंजूर दोन कामेही त्यालाच दिली जाणार आहेत. कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेस हा ठेकेदारच जबाबदार आहे. अशी कामे होणार असतील तर पंतप्रधान सडक योजनेंतर्गत कामे मंजूर करून आणायची की नाहीत, असा प्रश्न आहे. याच मुद्यावरून रस्त्याचा दर्जा तपासल्याचे सांगत असलेल्या अधिकाऱ्यालाही त्यांनी फटकारले. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरून आमदार राणेंनी बांधकामच्या उपअभियंत्यांची कानउघाडणी केली. खड्डे कधी भरणार, असा प्रश्न त्यांनी केला असता उपअभियंत्यांनी आठ दिवसांत जांभा मुरमाने खड्डे भरतो, असे सांगितले. या वेळी तळेरे-वैभववाडी मार्गावरील खड्डे मातीने का भरले, असा प्रश्न त्यांनी करीत यापुढे दगड व मातीने अजिबात खड्डे भरू नका, असे सुनावले. गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे डांबराने पक्क्या स्वरूपात भरावेत, अशी सूचना त्यांनी केली. पाणीटंचाई कामांच्या आढाव्याला काहींनी आक्षेप घेतला. प्रत्यक्षात अपूर्ण कामे पूर्ण झाल्याचे अधिकारी सांगताहेत. वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे आमदार राणेंच्या निदर्शनास आणून दिले. त्या वेळी राणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींची मुदत 3 ऑगस्टला संपत आहे. या ग्रामपंचायतींवर वेगळा प्रशासक न नेमता असलेल्या सरपंचांनाच प्रशासक म्हणून संधी द्यावी, अशी मागणी झाली. निधी नाही फक्त घोषणा राज्य शासन निव्वळ फसव्या घोषणा करीत आहे. त्या योजनेला निधीच मिळत नाही. निधी नसेल तर योजनांना काहीच अर्थ नाही, असे स्पष्ट करतानाच ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचांनाच संधी देणे आवश्यक आहे. प्रशासक नेमणुकीचा निर्णय काढून गावागावांत वाद निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरपंच, सदस्य आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिकाऱ्याला फटकारले सभेला उपस्थित असलेल्या सर्वांनीच "महावितरण'च्या उपअभियंत्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. कुणाच्याही प्रश्नाला ते समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांना बसण्यास सांगण्यात आले; परंतु ते सभेतून निघून जात होते. आमदारांनी त्यांना थांबविले. परवानगी न घेता कुठे निघालात, अशा पद्धतीने सभेतून जाता येते का? तुम्हाला काही शिस्त आहे का? अशा शब्दांत त्यांना फटकारले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3jaS0tE Read More Read more No comments:
दोषींवर कारवाईचा पालकमंत्र्यांचा इशारा, काय आहे प्रकरण? कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवलीत उड्डाणपुलाची भिंत कोसळली ही गंभीर बाब आहे. या घटनेची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल. त्यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. कणकवलीतील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत दोन दिवसांपूर्वी कोसळली होती. त्या घटनेची पाहणी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, अधीक्षक अभियंता सलीम शेख, तांत्रिक सल्लागार श्री. सिंग, संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, शैलेश भोगले आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, ""कणकवलीतील उड्डाणपूल जोड रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी कणकवलीवासीयांनी केल्या होत्या. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी महामार्ग अधिकारी आणि ठेकेदार प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावून कामातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले होते, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने पुढील काम सुरू ठेवले ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळेच या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर करवाई व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. गडकरींशी चर्चा करणार शहरातील बॉक्सेलचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. त्यामुळे बॉक्सेल हटवून जानवली पुलापर्यंत उड्डाणपूल विस्तारित करावा, अशी कणकवलीतील नागरिकांसह लोकप्रतिनिधींची मागणी आहे. या मागणीबाबत खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3eyny9p Read More Read more No comments:
रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? वाहन चालक बेजार, कुठली ही स्थिती? वैभववाडी (सिंधुदुर्ग) - बांधकाम विभागाचे कामचलाऊ धोरण आणि कोरोनामुळे मंजुर कामांमध्ये आलेले अडथळे यामुळे जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे यावर्षीही खड्ड्यातूनच प्रवास करण्याची मानसिक तयारी वाहनचालकांना करावी लागणार आहे. जिल्ह्यात सध्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा महामार्गाचा प्रवास पूर्णत्वाकडे आहे; परंतु या महामार्गाला अनेक राज्यमार्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून मिळतात. यातील बहुतांशी महामार्गाची अवस्था बिकट आहे. जिल्ह्यातील प्रमुख राज्यमार्गावर खड्डेच खड्डे पडले असून पावसाळा सुरू होऊन अजून दीडच महिना झाला आहे. निम्मा पावसाळा अजूनही बाकी आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना यावर्षी रस्त्यापेक्षा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार असल्याची स्थिती आहे. बांधकाम विभागाचे तकलादू आणि कामचलाऊ धोरणामुळे रस्त्यांची ही स्थिती बनली आहे. या रस्त्यांची दुरूस्ती करण्यास बांधकाम विभागाने हेळसांड केल्याने सध्याची परिस्थिती उद्भवल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यातच यावर्षी कोरोनामुळे यातील अनेक रस्ते मंजुर असूनही होऊ शकलेले नाहीत. यामध्ये कणकवली विभागातील वरवडे-पिसेकामते, जानवली-तरदंळे-भरणी, वागदे-कसवण-तळवडे, राशीवडे-ओवीळीये-कळसुली, तिरवडे तर्फे सौंदळ, खारेपाटण-गगनबावडा, उंबर्डे-फोंडा याशिवाय सांवतवाडी विभागातील अनेक रस्त्यांचा समावेश आहे. हे सर्व रस्ते मंजुर असून त्यासाठी सुमारे 20 कोटीहून अधिक निधी मंजुर आहे; परंतु कोरोनामुळे मार्चमध्ये लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे ही कामे होऊ शकलेली नाहीत. त्याचा मोठा परिणाम झाला आहे. यातील अनेक रस्ते वाहतुकीस अयोग्य बनले आहेत. काही राज्यमार्गाचा तर रस्त्यापेक्षा खड्ड्यांनी अधिक भाग व्यापला आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. उंबर्डे-फोंडा हा राज्यमार्गाची अवस्था तर भयानक आहे. या रस्त्याने प्रवास करणेच जिकरीचे झाले आहे. 27 किलोमीटरचा या मार्गावरील फक्त तीन ते चार किलोमीटर रस्ताच सुस्थितीत आहे. मंजुर रस्त्यांची निविदा प्रकियाही पूर्ण झाली होती; परंतु कोरोनामुळे शसन आदेशामुळे बहुतांशी कामे थांबली; परंतु तरीही ज्या रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्या रस्त्यांच्या कामांना परवानगी मिळावी, अशा आशयाचे पत्र शासनाला पाठविले आहे. अजूनही त्याबाबत निर्णय झाला नाही; परंतु तोपर्यंत खड्डे जांभा दगडाने भरण्यात येतील. - संजय शेवाळे, कार्यकारी अभियंता, सांर्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली. रस्त्यांची दुरवस्था झाली असून या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साचल्यानंतर नेमका कुठे खड्डा आहे हेच समजत नाही. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे वैभववाडी-फोंडा मार्गावरील खड्डे गणेशोत्सवापुर्वी बुजवावेत. - गणेश पवार, चालक, वैभववाडी संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/30g1NWJ Read More Read more No comments:
डोक्यावर कर्जाचा बोजा अन् शासनाचा नवा नियम! वाचा... गणेश मूर्तीकारांच्या व्यथा सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे सावट गणेश मूर्तिकारांवरही दिसून आले. तरीही मूर्ती व्यवसाय सावरण्यासाठी बॅंकेतून लाखो रुपयांची कर्जे घेतलेली असताना केंद्राने गणेश उत्सवासाठी घरगुती दोन फुटांपर्यंतच मूर्ती असावी, असा नियम घातला आहे. त्यातच अनेक मूर्तिकारांनी मागणीप्रमाणे आधीच चार फुटांची गणेशमूर्ती बनवून ठेवल्याने आता मूर्तिकारांसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे. चार फुटाच्या गणेशमूर्ती ग्राहकांनी न घेतल्यास काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने परिस्थितीनुसार नियमावली जाहीर केली आहे. कोरोना अद्यापही पूर्ण हद्दपार न झाल्याने जिल्ह्यातील धार्मिक कार्यक्रम, सभा, बैठका, सण-उत्सव यावर शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यातच अवघ्या दीड महिन्यात गणेश चतुर्थी येणार आहे. चतुर्थी सणाचा अंदाज घेऊन दरवर्षी एप्रिल, मे आणि जूनपासूनच मूर्तिकामाला सुरुवात करतात. त्यानुसार यंदा अनेक मूर्तिशाळांमध्ये ऑर्डरप्रमाणे मूर्तिकारांनी एक फुटापासून चार फुटांच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. दोन ते चार फुटांच्या मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांना मातीचा साठाही जास्त वापरात आणावा लागतो. मूर्तीवरही विशेष मेहनत घ्यावी लागते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था बंद असल्याने जिल्हा तसेच गोवा येथून सर्वांना मातीची आयात न करता आल्याने बऱ्याच मूर्तिकारांना आर्थिक फटका बसला. वाहतूक भाड्यामागे 3 ते 4 हजार रुपये तर मूर्तिकामासाठी बनविण्यात येणाऱ्या मातीच्या मजुरीसाठी एक ते दीड हजार रुपये एवढा खर्च आल्याने खिशाला कात्री लागली आहे. जिल्ह्यातील अनेक मूर्तिशाळांत मूर्तिकारांनी दोन फुटांच्या वर म्हणजेच अडीच, तीन, चार फूट उंचीच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. बरेच मूर्तिकार भाड्याने साचे आणतात. हे साचेकाम तत्काळ पूर्ण करावे लागत असल्याने कच्चे मूर्तिकाम आधी करावे लागते. मूर्तिकारांनी कर्ज काढून तसेच आर्थिक तोटा सहन करून मूर्ती बनविल्या असतानाही आता शासनाच्या धोरणामुळे काही मूर्तिकार वेगळ्याच पेचात सापडले आहेत. नियमावलीने पेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने चतुर्थीत काही नियमावली जाहीर केली आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाची गणेशमूर्ती चार फुटांची तर घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांची असावी, असा नियम असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. त्यामुळे आता एवढी मेहनत घेऊन बनविलेल्या दोन फुटापेक्षा मोठ्या चार फुटांच्या मूर्ती ग्राहकांनी न नेल्यास करायचे काय? शासन त्याची भरपाई देणार का? असा प्रश्न आहे. गेले कित्येक दिवस ही समस्या मूर्तिकारांना भेडसावत आहे. मोठी मेहनत निगुडेतील मूर्तिकार गुरुदास गवंडे म्हणाले, ""मूर्तिकार अनेक आर्थिक समस्या व संकटातून मूर्ती व्यवसाय करत असतो. दरवर्षी शासन मूर्तिकारांच्या तोंडाला पाने पुसत आहे. आमदार, लोकप्रतिनिधी फक्त आश्वासने देतात. आमच्या मूर्तिशाळेत लोकांच्या मागणीनुसार चार फुटांच्या मातीच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. साधारण 30 मूर्ती या चार फुटांच्या आहेत. त्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली आहे.'' तोडगा काढावा गणेशमूर्ती बनवण्याचा कालावधी सुरू होण्यापूर्वी त्याचे आर्थिक नियोजन करावे लागते. यावेळी मातीचा दर, वाहतुकीचे भाडे, माती बनविण्यासाठी मंजुरी, मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साचे व त्याचे भाडे, रंगकामासाठी लागणारे रंग, कामगारांचा खर्च यातून मूर्तिकाराला फारसे उत्पन्न मिळत नाही. असे असताना आता शासनाच्या या निर्णयामुळे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यातून शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी आहे. मूर्तिशाळेत 4 फुटांच्या गणेशमूर्ती आधीच बनविल्या आहेत; मात्र आता शासनाच्या नियमानुसार 2 फुटांच्या मूर्ती घरात पुजण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी मूर्ती न नेल्यास मोठे संकट उभे राहणार आहे. - गुरुदास गवंडे, मूर्तिकार तथा निगुडे उपसरपंच संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2WFfu0L Read More Read more No comments:
काय सांगता! पुण्यातल्या हॉस्पिटल्समध्ये शिल्लक नाही एकही बेड! पुणे : पुण्यात महापालिका आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये एकही बेड शिल्लक नसतानाच कोरोना रुग्णांची संख्या दीड हजाराच्या टप्प्यात गेली आहे. अशा गंभीर स्थितीत कोरोनाच्या मृतांचा आकडाही नऊशेच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणेकरांना दिलासा मिळाला तो, साडेसातशेजण कोरोनामुक्त झाले त्याचा. दिवसभरात ६ हजार ३४३ जणांची तपासणी करण्यात आली. सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पाचशेहून अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील ७६ जण व्हेंटिलेटरवर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. - नाट्य निर्माता संघाने शरद पवारांना पाठवलं पत्र; काय आहे कारण? शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी, हॉस्पिटलमध्ये बेड विशेषत :व्हेंटिलेटर, आयसीयू बेड मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. त्यातच, बुधवारी पुन्हा १ हजार ४१६ नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीती पसरली आहे. मृतांमध्ये दहा पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. मृत व्यक्तींना कोरोनासोबत अन्यही आजार असल्याचे निष्पन्न झाले. - पुणे : अखेर लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी दूध पुरवठा सुरळीत; मात्र... महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, "तपासणी वाढल्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, नव्या रूग्णांमध्ये साधापरणे ६० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे अशा बहुतांशी रुग्णांना घरी ठेवण्यात येत आहे. तर गरजेनुसार रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करीत आहोत. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/39819ik Read More Read more No comments:
मनमानी खपवून घेणार नाही, असे का म्हणतायत शिवसेना नगरसेवक? वाचा... सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेची जागा खासगी ठेकेदारांच्या घशात घालू देणार नाही, अशी भूमिका आज पालिकेच्या शिवसनेच्या ज्येष्ठ नगरसेविका तथा गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी मांडत नगराध्यक्ष संजू परब यांनी जाहीर केलेल्या 100 कोटीच्या प्रोजेक्टला विरोध दर्शविला. कंटेनर थिएटरप्रमाणे या खासजी प्रोजेक्टबाबत नगराध्यक्ष मनमानी करत असून यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. येथील माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी लोबो यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबु कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, नगसेविका शुभांगी सुकी आदी उपस्थित होते. श्रीमती लोबो म्हणाल्या, ""नगराध्यक्ष पालिकेचा कारभार हाकताना अभ्यास करूनच संजू परब यांनी हाकावा. कुठलाही निर्णय घेताना तो कौन्सिलच्या ठरावाने सर्वानुमते होतो. असे असताना कोणालाही कल्पना न देता व विश्वासात न घेता एकटे संजू परब सभागृहात भाजी मार्केटच्या जागेत खासगी तत्वावर शंभर कोटी रूपयाचा प्रोजेक्ट उभारण्याची घोषणा करतात. हा कौन्सिलचा एकप्रकारे अपमान आहे. मुळात परब हेच ठेकेदार असल्याने त्यांनी शहरातील पालिकेच्या जागेवर नजर ठेऊ नये. मुळात कोणत्या ठेकेदाराकडून परब हा प्रकल्प उभा करणार आहेत? यामागे नेमका कोणाचा हात आहे ?'' बाबु कुडतरकर म्हणाले, ""नगराध्यक्ष पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करताना एकही नगरसेवक त्यांच्यासोबत का नाही ? त्यावेळी सभागृहात कोण होते ? एवढी मोठी घोषणा करताना नगरसेवकांना सोडा मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा यांची कल्पना नाही हे चुकीचे आहे.'' चुकीच्या गोष्टीला समर्थन नाहीच श्रीमती लोबो म्हणाल्या, ""मार्केट आज ना उद्या उभे राहील; पण आलेले पाच कोटी रूपये तरी त्यांनी खर्चे केले पाहिजे होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत खासगी ठेकेदारांच्या ताब्यात पालिकेची जमिन देणार नाही. यासाठी आम्ही कौन्सिल सभेत जोरदार विरोध करणार असून जे नियमात आहे त्याला नेहमी पाठिंबा राहणार असुन चुकीच्या गोष्टीला कदापी समर्थन करणार नाही.'' संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2CiYy9d Read More Read more No comments:
विदर्भातील हिल स्टेशन "लॉक'च, हॉटेल असोसिएशननेही घेतला मोठा निर्णय... नागपूर, : विदर्भातील "हिल स्टेशन' म्हणून ओळख निर्माण झालेल्या चिखलदऱ्याकडे पाऊस सुरू झाला की पर्यटकांची पावले आपसूकच वळतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निसर्गप्रेमी पर्यटकांना खुणावणारे हे पर्यटन क्षेत्र बंद आहे. डोंगर, दऱ्या हिरवाईने नटल्या आहेत, काही ठिकाणी झरेही खळाळू लागले आहेत. तरी पर्यटकांना तेथे येण्यास परवानगी नाही. नागरिकही खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर जाणे टाळत असताना हॉटेल्स असोसिएशनने बंदचा निर्णय घेतला आहे. यामुळे गाइड आणि लहानमोठ्या व्यावसायिकांच्या हक्काचा रोजगार बुडाला आहे. मुंबई-पुणे येथील पर्यटक रविवार व शनिवारी लोणावळा वा खंडाळ्याला भेट देतात. त्याचप्रमाणे विदर्भासह शेजारच्या राज्यांमधून या हंगामात अंदाजे दोन ते तीन लाख पर्यटक येथे येऊन जातात. त्यामुळे या भागातील सुमारे दोन हजार कुटुंबाना रोजगार मिळतो. त्यात रिसॉर्टपासून छोट्या हॉटेलपर्यंत, गाइडपासून मदतनिसापर्यंतचा व्यवसाय चालतो. अलीकडे तंबूत आणि जंगलात राहण्याची "क्रेझ' आल्याने सुशिक्षित तरुणांनीही या सेवा उपलब्ध करून देण्याचे व्यवसाय सुरू केले आहेत. यामुळे आजूबाजूच्या आलाडोह, लवादा आणि शहापूर या तीन गावांतील नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. यंदा पर्यटनच बंद असल्याने अंदाजे दहा कोटींचा व्यवसाय बुडाला आहे. 'रिसोर्ट घेता का रिसोर्ट', का आली ही वेळ... यावर्षी व्यवसायापेक्षा आरोग्याला महत्त्व देत चिखलदरा हॉटेल्स ओनर असोसिएशनने मुख्याधिकारी नगर परिषद चिखलदार यांना पत्र दिले आहे. त्यात चिखलदरा येथे कोरोना संसर्ग असलेल्या एकही रुग्ण अद्याप आढळलेला नसून पुढेही कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी 31 जुलैपर्यंत पर्यटन हॉटेल्स बंद ठेवले जाणार असल्याचे म्हटले आहे. यात स्टे होम, न्याहारी योजना आणि जंगल रिसोर्टचाही समावेश आहे. आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांवर सक्तीची कारवाई करण्यात यावी, असेही असोसिएशनचे म्हणणे आहे. शहरातून येणारा पर्यटकच आमचा आधार आहेत. परिसरातील छोटे व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांचे जीवनही आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. दुर्गम भागात कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पावसाळ्यातील पर्यटनातूनच सर्वाधिक रोजगार येथील हजारो स्थानिकांना मिळत असतो. कोरोनामुळे हा व्यवसाय बुडाला आहे. प्रवीण चावजी, संचालक, रिसोर्ट मेळघाट News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2Zx05Bd Read More Read more No comments:
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १६ जुलै पंचांग - गुरुवार - आषाढ कृ. ११, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१५, कामिका एकादशी चंद्रोदय रा. २.०८, चंद्रास्त दु. ३.२८, भारतीय सौर २५, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४४ - संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे इंग्रजीत भाषांतर करणारे डेक्कन कॉलेजातील प्राध्यापक काशिनाश बाळकृष्ण मराठे यांचा जन्म. १८७२ - दक्षिण ध्रुवावर प्रथम पाऊल ठेवणारे नॉर्वेजियन संशोधक रोआल आमुन्सेन यांचा जन्म. १९०३ मध्ये त्यांनी गोया नावाची छोटी होडी तयार केली व सहा सोबत्यांबरोबर ‘नॉर्थ वेस्ट पॅसेज’ शोधून काढला. १९१० मध्ये ते दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्यास निघाले. १९११ मध्ये ते दक्षिण ध्रुवाजवळील रॉस बेटावर उतरले व तेथून १४ डिसेंबर रोजी दक्षिण ध्रुवावर पोचले. १९१४ - साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचा जन्म. १९४५ - अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या अणुबाँबची न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात चाचणी. १९९२ - भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड. १९९६ - ‘स्वाध्याय’ परिवाराचे संस्थापक व क्रियाशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामात यश लाभेल. मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कर्क : आर्थिक क्षेत्रात यश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सिंह : व्यवसायाची उलाढाल वाढेल. एखादी चांगली घटना घडेल. कन्या : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. मनोरंजनाकडे कल वाढेल. वृश्चिक : कौटुंबिक जीवनात विशेष सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. धनु : खर्च योग्य कामासाठी होतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. कुंभ : व्यवसायात वाढ होईल. कुटुंबात समाधानी वातावरण राहील. मीन : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायात व नोकरीत समाधानकारक स्थिती. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3jaS2lg Read More Read more No comments:
लडाखसारख्या अतिदुर्गम युद्धभूमीवर भारताला शत्रूशी दोन हात करणे सहज शक्य; कसे ते वाचा सविस्तर नवी दिल्ली - चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने देखील आपली संरक्षणसज्जता वाढवायला सुरवात केली असून आता अति उंचावरील ठिकाणांवर तैनात करणे शक्य असणाऱ्या वजनाला हलक्या रणगाड्यांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या शस्त्रामुळे लडाखसारख्या अतिदुर्गम युद्धभूमीवर भारताला शत्रूशी दोन हात करणे सहज शक्य होईल. विशेष म्हणजे या रणगाड्यांची मारक क्षमता देखील अवजड रणगाड्यांसारखीच असेल. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या केवळ रशियाच अशाप्रकारच्या वजनाला हलक्या रणगाड्यांची निर्मिती करतो. रशियन बनावटीच्या ‘स्प्रुट- एसडीएम १’ या रणगाड्यांची मारक क्षमता अधिक आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये तैनात केलेल्या रणगाड्यांचे नाव हे ‘टी-१५/झेडटीपीक्यू’ असे आहे. मुळातच हे रणगाडे वजनाला हलके असल्याने त्यांची वाहतूक करणे देखील अधिक सोपे असते. अगदी पॅराशूटच्या माध्यमातून देखील या रणगाड्यांना सहज टेकडीवर पोचविता येईल. चीनने रणनितीक व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या स्थळांवर पोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची उभारणी केली आहे. राजस्थानच्या राजकीयनाट्यात बसपाची उडी; काँग्रेसविरोधात न्यायालयात जाणार भारताकडून देखील वेगाने अशाप्रकारचे रस्ते उभारले जात असले तरीसुद्धा ते प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी बराच वेळ लागणार आहे, त्यामुळे सध्या तरी हे रणगाडेच भारतासाठी महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे. विशेष म्हणजे चीनकडे सध्या अशाप्रकारचे रणगाडे असून त्यांनी ते पूर्व लडाखमध्ये तैनात देखील केल्याने भारताच्या चिंता वाढल्या आहेत. भाजपने राजस्थानमध्ये एका आमदाराला किती पैसे देण्याचे ठरवले होते? गेहलोत म्हणतात... काय आहे एअर ड्रॉप सिस्टिम? प्रत्यक्ष आणीबाणीच्यावेळी किंवा युद्धसरावादरम्यान लष्कराला दारूगोळ्याची टंचाई भासू लागते तेव्हा रसद पुरविण्यासाठी पारंपरिक रस्त्याच्या मार्गाऐवजी या प्रणालीचा वापर करून आकाशातून रसद पुरविण्यात येते. एखाद्या विशिष्टस्थळी विमान उतरविण्याऐवजी पॅराशूटच्या माध्यमातून तेथे शस्त्रे टाकली जातात. विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी फार वेळही लागत नसल्याने ही प्रणाली लष्करासाठी सोयीचे असते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2ZzYNWl Read More Read more No comments: