यूपी में 55 घंटे का लॉकडाउन खत्म, अब हर शनिवार-रविवार को रहेगा बंद https://ift.tt/328CR6g Latest news updates July 12, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
चिंताजनक! लालपरीमागचे शुक्लकाष्ट संपेना, प्रतिसाद तर.... कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगाव एसटी सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांकडून सध्या अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. शहरातून गावाकडे जाणाऱ्या किंवा तालुक्यातून तालुक्याकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये जेमतेम चार-पाच प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्यात आले होते. त्यानंतर कालपासून (ता. 9) एसटी बससेवा नव्या वेळापत्रकानुसार सुरू झाली. दोन दिवस शहर आणि गावांमध्ये एसटी बस सेवा सुरू आहे; पण गावातून शहराकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची रोडावली आहे. त्यातच गेले काही दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर गाठला आहे. अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. साथरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटीने केवळ 22 प्रवाशांना ने - आण करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही प्रवाशांकडून या बससेवेचा फारसा लाभ घेतला जात नाही, असेच चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण सातत्याने पुढे येत आहेत. त्यातच कणकवली सारख्या शहर आणि तालुक्यांमध्ये अधिक कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामुळे गावातील प्रवाशांमध्ये भीती आहे. विशेषतः बाजारात खरेदीसाठी येणारा ग्रामीण भागातील ग्राहक कमालीचा रोडावला आहे. गावामध्ये थेटपणे भाजीपाला उपलब्ध होत आहे. केवळ औषधे किंवा दवाखान्यात येणारा रुग्ण हा एसटीच्या प्रवासी आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे खाजगी वाहन चालकांमार्फत अनेक नागरिक शहरात येताना दिसत आहेत. जिल्ह्यात दुचाकी संख्या लाखाच्या घरात तर चारचाकी संख्या वाढलेली आहे. रिक्षा, सहाआसनी रिक्षाही मुबलक आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांमध्ये शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सध्या शाळा महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी घरातून बाहेर पडत नाहीत. तर ज्येष्ठ नागरिक भीतीपोटी शहरात येत नाहीत किंवा त्यांना एसटीमध्ये प्रवेशही दिला जात नाही. एसटी प्रवाशांच्या सवलती सध्या बंद आहेत. त्यामुळे पूर्ण तिकीट घेऊनच ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवास करावा लागत आहे. परिणामी एसटीमध्ये अगदी महत्त्वाच्या कामाला बाहेर पडणारेच प्रवासी पाहायला मिळतात. कणकवलीहून देवगडकडे धावणाऱ्या एसटीचा एका वेळेचा उत्पन्नाचा आकडा केवळ तीनशे रुपये इतकाच होता. याचा अर्थ एसटी बस सेवा सुरू झाली, असली तरी प्रवासी मात्र घरातून बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यामुळे वाहतुकीचे मार्ग ठप्प आहेत. परिणामी एसटीकडे प्रवासी फारसे वळताना दिसत नाहीत. तरीही आवश्यक मार्गावर बस सेवा सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प आहे. झाडे कोसळल्यामुळेही रस्ते बंद आहेत. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. - प्रकाश रसाळ, विभाग नियंत्रक, कणकवली जिल्ह्यात केवळ 73 फेऱ्या सुरू जिल्ह्यात पुर्वी नियमित वेळापत्रकाप्रमाणे दररोज 2100 फेऱ्या होत होत्या; मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या वेळापत्रकाप्रमाणे 73 फेऱ्या सुरू आहेत. या फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद फारच कमी आहे. जिल्हाबाहेरील किंवा आंतरराज्यफेऱ्या सध्या बंद आहेत. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 11, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/38M0e6M Read More Read more No comments:
गतवर्षीच्या समस्येचे पुन्हा डोके वर, असनियेवासीयांत धास्ती ओटवणे (सिंधुदुर्ग) - सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर वाढू लागल्याने असनिये-घारपी रस्त्यावर पुन्हा डोंगराच्या कडा ढासळू लागल्या आहेत. गतवर्षी भूउत्खनन झालेल्या या डोंगराच्या कडा ढासळू लागल्याने येथील जनसामान्यांमध्ये भीती आहे. असनिये कणेवाडी घारपी असा रस्ता पुढे जातो; मात्र या कणेवाडी रस्त्यालगतची मोठी डोंगराळ कडा पुन्हा घसरू लागल्याने गतवर्षीची समस्या पुन्हा डोके वर काढू लागली आहे. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत या ठिकाणी भूउत्खनन झाल्याने कणेवाडीतील तसेच घारपीवासीयांना स्थलांतरित व्हावे लागले होते. भीतीने पूर्ण घरांना शाळेचा आसरा घ्यावा लागला होता. अशा भयानक परिस्थितीत खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार आदित्य ठाकरे याखेरीज सर्वच लोकप्रतिनिधीनी भेटी दिल्या खऱ्या मात्र दिलेली आश्वासने हवेतच विरली. चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रस्ता तात्पुरता मोकळा करण्यात आला; परंतु त्यानंतर कायम स्वरूपी उपाययोजनांची तजवीज मात्र शासनाकडून झाली नाही. वारंवार डोंगराची माती ढासळण्याचे प्रकार घडत असून घारपीवासीयांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. प्रशासकीय ताळमेळ नाही असनिये घारपी हा रस्ता मूळचा जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून हा रस्ता हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल 4 कोटी रुपये खर्चून तयार केला होता. हा रस्ता देखभाल दुरुस्तीचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे आवश्यक होते; परंतु तो वर्ग न केल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग यावर खर्च करू शकत नाही तर पंतप्रधान ग्रामसडक विभागाचा कार्यकाळ संपल्याने दुरुस्तीसाठी निधी खर्ची करता येत नाही; मात्र या दोन्ही विभागांचा चालढकलपणा व प्रशासकीय ताळमेळ नसल्याने दुर्गम भागातील असनिये, घारपीवासीयांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भूउत्खनन झालेल्या डोंगराळ भागात त्वरित उपाययोजना अंमलात न आणल्यास पुन्हा एकदा येथील कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागणार की काय? अशीच भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 11, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3iTfCTw Read More Read more No comments:
अनधिकृत मासेमारी कराल तर सावधान! मत्स्यव्यवसाय खात्याची कडक पावले मालवण (सिंधुदुर्ग) - अनधिकृत एलईडी, पर्ससीननेटच्या मासेमारीवर कडक कारवाईसाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्याने कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात पर्ससीननेटच्या मासेमारीला चार महिन्यांचाच कालावधी दिला असल्याने या काळापुरतेच पुरेल एवढ्या डिझेल कोट्याचा प्रस्ताव पाठवावा, असा आदेश संबंधित विभागास दिला आहे. त्याचबरोबर ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नव्या मासेमारीसाठी नौकांना परवाना देण्यासाठी नवीन जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्याचेही आदेश मत्स्यव्यवसायचे सहआयुक्त रा. ज. जाधव यांनी दिले आहेत. एलईडी लाईटद्वारे व पर्ससीननेटच्या साहाय्याने मासेमारी करणे अत्यंत घातक आहे. अशा प्रकारच्या मासेमारीमुळे राज्यातील मत्स्यसाठा कमी होण्याचे प्रमाण व पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत आदेश, अधिसूचना, परिपत्रक काढून अनेकदा कारवाईही करण्यात आली आहे; परंतु या कारवाईला न जुमानता रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग व मुंबईतील काही मच्छीमार अनधिकृतरीत्या एलईडी व पर्ससीननेटद्वारे मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. लॉकडाउनमुळे मच्छीमारांना मासेमारी करता आली नाही. परिणामी त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांच्या कालावधीसाठी राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी बंदी कालावधी घोषित केला आहे. 1 ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे हितसंबंध जपण्यासाठी व शाश्वत व्यवस्थापनाद्वारे भविष्यकालीन मत्स्यसाठ्याच्या जतनासाठी कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्याने घेतला आहे. यात सर्व परवानाधारक मासेमारी नौकांना डिझेल कोटा वितरीत करण्यासाठी सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून प्रस्ताव मागविले जातात. त्यामुळे एलईडी, पर्ससीननेटच्या साहाय्याने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ज्या नौकांवर कारवाई केली आहे त्यांचा मासेमारी परवाना रद्द केला असल्यास अशा नौकांचे डिझेल कोट्याचे प्रस्ताव सादर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकृत पर्ससीनधारकांना केवळ चारच महिने मासेमारी करण्यास परवानगी आहे. त्यामुळे चार महिन्यांच्या कालावधीपुरताच डिझेल कोट्याचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. परवाना देणार 1 ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगाम सुरू होणार असल्याने सर्व सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी मासेमारीस जाणाऱ्या नौकांची तपासणी करूनच त्यांना मासेमारीचा परवाना द्यावा. हा परवाना देण्यासाठी अध्यक्ष-मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी वर्ग 2, सदस्य सचिव- परवाना अधिकारी, सदस्य- सागरी पोलिस, जिल्हा संघ सदस्यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे. या समितीमार्फतच नौकेची तपासणी करून मासेमारीचा परवाना दिला जाणार आहे. या प्रमाणपत्रावर मासेमारीच्या प्रकाराचा उल्लेख असेल. प्रमाणपत्रे नसल्यास.... दोन्ही प्रमाणपत्रे नसताना एलईडी, पर्ससीननेटच्या साहाय्याने मासेमारी करताना एखादी नौका आढळल्यास ती सागरी मासेमारी अधिनियमानुसार जप्तीची कार्यवाही करावी. नौकांची योग्य पाहणी करून प्रमाणपत्र देऊन सुद्धा एलईडी, पर्ससीननेटची संबंधित नौकामालक करत असल्याचे आढळल्यास सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त, परवाना अधिकारी, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही सहआयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी दिला आहे. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 11, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/328hSQR Read More Read more No comments:
तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण... तळेगाव स्टेशन (पुणे) : जागतिक स्तरावर दुर्मिळ होत चाललेल्या माशांच्या प्रजातींपैकीच स्पोर्टस् फिश म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोड्या पाण्यातील सर्वात मोठ्या महाशीर माशाचे जनुकीय प्रजनन आणि सजीव जनुकीय संग्रह साध्य करणारा तळेगाव दाभाडे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था संचालित प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत आहे. इंद्रायणीत बुडालेल्या तुकोबांच्या गाथा तरंगत वर आल्या हा कुठलाही दैवी चमत्कार नसून महाशीर माशांनी गाथा वर आणल्याची आख्यायिका आहे. वारकरी सांप्रदायात महाशीरला गोड्या पाण्यातील देव मासा किंवा म्हसाळ्या देखील म्हणतात. महाराष्ट्रातील काळ, सावित्री, भीमेसह इंद्रायणीसह कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील तीर्थक्षेत्रीच्या नद्यांमध्येच महाशीर मासा आढळतो. मात्र, काळानुरुप वाढत चाललेले नद्यांचे प्रदुषण, नदीवरील बांधलेल्या धरणांमुळे महाशीर मासे नामशेष होत आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने (आययुसीएन) महाशीरच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाशीर जलचर परिसंस्थेच्या आरोग्याचे जैव निर्देशांकाचे सूचक ठरतात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आशिया खंडातील एकमेव मुंबईतील वर्सोवा येथील केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली महाशीर माशाच्या संवर्धनासाठी 2010 मध्ये तळेगाव दाभाडे येथील फ्रेंडस् ऑफ नेचर या सेवाभाशी संस्थेने यशवंतनगरमध्ये हा महाशीर संवर्धन प्रकल्प उभारला होता. कृत्रिम प्रजनन पद्धतीने महाशीर माशांचे यशस्वी प्रजनन करणारी ही बहुदा एकमेव सेवाभावी संस्था ठरली. 2015 मध्ये महाशीर मॅन ऑफ इंडिया डॉ. शशांक ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली साठ हजारांहून अधिक पिल्लांचे संगोपन करून फ्रेंड्स ऑफ नेचरच्या माध्यमातून इंद्रायणीत पुन्हा महाशीर माशांचे यशश्वीपणे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. गोड्या पाण्यातील माशांच्या संवर्धनासाठीच्या हा प्रकल्प आदर्श ठरावा असाच आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाकडून संस्थेला या प्रकल्पासाठी महाशीरचे खाद्य, औषधे आणि इतर साधनसामुग्री अनुदान स्वरुपात मिळाली होते. आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...' देहुतील गाथा मंदिराजवळ इंद्रायणी नदीच्या मत्स्य डोहामध्ये महाशीर माशाचे बीजारोपण यशश्वी झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प बंदच आहे. इंद्रायणी नदीच्या धर्तीवर राज्यातील इतर नद्यांमध्ये मत्स्य बीजारोपण केल्यास महाशीरचे अस्तित्व टिकवून मासेमारीवर अवलंबून असलेल्या आदिवासी कातकरी समाजाच्या आर्थिक विकालाही हातभार लागू शकेल. महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून तळेगाव दाभाडे येथील या प्रकल्पासाठी अनुदान प्राप्त झाल्यास या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी देखील हा प्रकल्प पुरक ठरणार असल्याचा विश्वास प्रकल्पाचे समन्वयक तथा पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते महेश महाजन यांनी व्यक्त केला. वन्यजीव टिकवण्यासाठी जसे वाघांचे संवर्धन आवश्यक आहे. तसेच, गोड्या पाण्यातील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी महाशीर माशाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. - रोहित नागलगाव, निसर्ग अभ्यासक Edited by : Shivnandan Baviskar News Story Feeds https://ift.tt/2OiRXxL Latest news updates July 11, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/300JeG3 Read More Read more No comments:
‘सेव्हन मंत्रा’च्या भाजीपाल्यासाठी आज साडेअकरापर्यंत करा बुकिंग पुणे - कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (ता. १३) मध्यरात्रीपासून कडक लॉकडाउन होणार आहे. त्यामुळे ‘ॲग्रोवन’ आणि ‘सेव्हन मंत्रा’च्या वतीने सोमवारी भाजीपाला-फळांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत बुकिंग करण्याची सोय केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाउनच्या काळात दूध आणि औषधांशिवाय कोणत्याही गोष्टी खरेदी करता येणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना ताज्या भाज्या, फळे उपलब्ध करून देण्यासाठी ‘ॲग्रोवन’ आणि ‘सेव्हन मंत्रा’ सरसावला आहे. या उपक्रमात मंगळवारी भाजीपाला-फळे वितरित केली जातात; पण लॉकडाउनमुळे सोमवारी दुपारपर्यंत सर्व माल घरपोच देण्याची विशेष व्यवस्था केली आहे. रविवारी वितरित करण्यात येणाऱ्या मालासाठीचे बुकिंग ‘फुल्ल’ झाले आहे. सोमवारी वितरित करण्यात येणाऱ्या मालासाठी रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत बुकिंग स्वीकारणार आहे. त्या बुकिंगसाठीही मोठ्या प्रमाणावर मागणी आली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एकत्रित भाज्या देण्याची संकल्पना खूप आवडली. त्यामुळे ही योजना सुरू झाल्यापासून मी भाजीपाला-फळे घेत आहे. लॉकडाउनच्या काळात याचा अधिक उपयोग होईल. - सुरेखा ढाकरे (मोरवाडी, पिंपरी-चिंचवड) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि दर्जेदार भाजीपाला मिळण्याची सोय झाली आहे. लॉकडाउनच्या काळात भाजीपाल्याचे काय?, ही आमची चिंता मिटली आहे. दर्जाबाबत प्रश्नच नाही. - डॉ. अर्चना गोरे (दिघी) भाजीपाला-फळे बॉक्समध्ये येतात. पॅकिंग उत्तम आहे. भाज्यांची व्हरायटी आहे. त्यामुळे भाज्यांचा प्रश्न आता मिटला आहे. - वसुधा कुलकर्णी (पॉप्युलरनगर, वारजे) दोन महिन्यांपासून फळे व भाजीपाला घेत आहे. ही सेवा अत्यंत दर्जेदार आहे. ताजा व स्वच्छ माल असल्याने आमची चांगली सोय झाली आहे. - मानसी कुलकर्णी (सातारा रोड) शेतातून आलेली ताजी भाजी-फळं छान पॅक करून घरपोच मिळतात. त्यामुळे भाजीपाल्याची खात्री आणि सुरक्षा मिळाली आहे. - संध्या देशपांडे (कोथरूड) कोरोनाच्या काळात ताजा भाजीपाला तो ही थेट शेतातून मिळतो. घरपोच स्वच्छ आणि चांगला भाजीपाला मिळत असल्याने गर्दीत जाऊन सर्वांनी हाताळलेला भाजीपाला घेण्याची गरज उरली नाही. - उज्ज्वला पवार (विश्रांतवाडी) Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 11, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2OcK4Kq Read More Read more No comments:
या पक्षांमुळे होतोय श्वसनाच्या आजारांचा धोका; कोणत्या ते वाचा सविस्तर पुणे - एकीकडे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असताना दुसरीकडे पारव्यांच्या अनावश्यक वाढलेल्या संख्येने संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढताना दिसत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे रूग्णांना खोकला, सर्दी व श्वास घेण्यास अडचण होत आहे. हे कमी म्हणून की काय शहरात ठिकठिकाणी पारव्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या विष्ठामुळे असंख्य जंतू हवेत पसरतात. त्यामुळे फुफ्फुसाचे रोग, अस्थमा अशा प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीला यामुळे अस्थमा किंवा फुफ्फुसाचा रोग झाल्यास त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे विविध प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. मात्र, पारव्यांमुळे कोरोना पसरतो, असा कोणताही अभ्यास झाला नसून, केवळ इतर संसर्गाची शक्यता वाढू शकते, असे म्हटले जाऊ शकते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. सायबर पोलिसांचा करिष्मा; ऑनलाईन फ्रॉड झालेल्या कॉसमॉस बँक आणि नागरिकांचे पैसे केले परत! पारव्यांच्या विष्ठामधील बुरशीमुळे मानवी शरीरात ‘हिस्टोप्लाज्मोसिस’, ‘सिटॅकोसीस’ व ‘क्रिप्टोकोकोसिस’ सारख्या श्वासनाशी संबंधित रोगाचे संसर्ग होतात. त्यामुळे ताप, खोकला, छातीत दुखणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे अशा प्रकारचे लक्षणे आढळतात. यातील काहींची लक्षणे ७ ते १४ दिवसांमध्ये तर काहींची एक ते तीन आठवड्यानंतर आढळतात, अशी माहिती राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्राचे (एनसीसीएस) ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी दिली. हवेलीकरांसाठी २५० बेड उपलब्ध होणार अन्... अशी कमी करता येईल संख्या पारव्यांना मोठ्या प्रमाणात धान्य टाकणे थांबावे धान्य टाकणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी सदनिका तसेच इमारतींना जाळे बसवावे पारव्यांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. मात्र, त्यांना मारण्याऐवजी त्यांची संख्या कमी करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी नागरिकांनीही त्यांच्यासाठी धान्य टाकू नये. तसेच प्रशासनाने असे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला हवी. - धर्मराज पाटील, पक्षीशास्त्रज्ञ रास्ता पेठेतील पॉवर हाउस चौकामधील मत्स्यगंधा पुतळा येथे दररोज नागरिकांकडून या पक्ष्यांना धान्य टाकण्यात येत आहे. ते एकत्रित मोठ्या संख्येने उडत असल्याने बऱ्याच वेळा अपघातसुद्धा घडले आहेत. रात्री हे पारवे केईएम रुग्णालयात आसरा घेतात. यामुळे तिथे रुग्णांनाही याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय व आरोग्य कार्यालयात पत्र पाठविण्यात आले आहे. - प्रकाश परब, सामाजिक कार्यकर्ते कोरोना संसर्ग आणि पारव्यामुळे होणारे आजार दोन्ही फुफ्फुसांच्या एकाच भागावर परिणाम करतात. अशातच एकाद्या व्यक्तीला दोन्ही आजार झाले तर रुग्ण अधिक गंभीर होऊ शकतो. तसेच प्रत्येकी १० मधील ६ ते ७ रुग्णांना कबुतरांचा आजार त्यांच्या सोसायटी किंवा घराजवळील कबुतरांमुळे होतो. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. - डॉ. संदीप साळवी, छातीरोग तज्ज्ञ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 11, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3gQqVdA Read More Read more No comments:
बळजबरीचा लॉकडाउन कोणासाठी? तब्बल ९० दिवसांचा लॉकडाउन पुणेकरांनी यापूर्वी अनुभवला आहे. हा ‘लॉकडाउन’ भाज्या आणण्यात, किराणा साठविण्यात गेला खरा, पण त्याकाळातही कोरोनाची साखळी तोडण्यात आपल्याला यश आले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सोमवारी रात्रीपासून लागू केल्या जाणाऱ्या ‘कडक’ वगैरे लॉकडाउनचा किती फायदा होईल, याबाबत साशंकता आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुण्यात गेली आठवडाभर दररोज एक हजाराच्या आसपास नवे रुग्ण आढळून येत आहेत. दररोज सरासरी १५ ते २० जणांना जीव गमवावा लागत आहे. रूग्णवाढीचा हा गुणाकार भविष्यात हाताळण्याच्या बाहेर जाईल, अशी भीती प्रशासनाला आहे. त्यामुळेच ‘लॉकडाउन’चा मार्ग पुन्हा एकदा निवडला आहे. अर्थात ‘लॉकडाउन’ केल्यानंतर रुग्णांची संख्या अटोक्यात येईल, याला कोणताही शास्त्रीय आधार, डेटा प्रशासनाकडे नाही. कारण एप्रिल, मे मधील लॉकडाउनच्या काळात रूग्णवाढीचे आकडे, आताचे तपासणीचे आकडे आणि रुग्णांचे आकडे काढले तर त्यात सरासरी फारसा फरक दिसत नाही. सध्या चाचण्यांचे प्रमाण दररोज ४ हजार ३०० च्या आसपास आहे. त्यापैकी एक हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. रूग्णसंख्या चिंताजनक वाढते आहे, याबाबत कोणाचेच दुमत नाही. पण ही संख्या रोखण्याचा लॉकडाउन हा एकमेव उपाय निश्चितच नाही. प्रशासनाचा भर रुग्णांसाठी उपचार कसे उपलब्ध होतील यावर राहिला. ते आवश्यकही होते. त्यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालये, म्हाळुंगे-बालेवाडी येथील कोविड सेंटरची निर्मिती या उपाययोजना होऊन १८ हजार खाटांची सुविधा निर्माण झाली. पण, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आपण कमी पडलो. चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेण्यासही उशीर लागला. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांचे ट्रेसिंग योग्य पद्धतीने झाले नाही. नागरिकांमध्ये जागृती करण्यासही आपण कमी पडलो. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत गेली. पण, लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे जिणे मुश्कील झाले, बेकारी वाढली, हजारोंच्या संख्येने नोकऱ्या गेल्या. हे परिणाम कोरोनापेक्षाही भयंकर आहेत. अनलॉकमध्ये आता कुठे परिस्थिती सुधारतेय असे वाटत असताना सहाव्यांदा ‘लॉकडाउन’ची घोषणा करून मोठा दणका दिला आहे. लॉकडाउनमध्ये हजारो उद्योग बंद पडले. त्यासाठी सरकारने काय केले? किती नवे उद्योग-व्यवसाय उभे करण्यास मदत केली, असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. बळजबरीच्या लॉकडाउनपूर्वी त्याची उत्तरे मिळायला हवीत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 11, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/38NZjmo Read More Read more No comments:
वळूऐवजी कालवडच येणार जन्माला! पण कधी?...लॅबच्या घोषणेला झाले वर्ष औरंगाबाद : यांत्रिकीकरणामुळे शेतीकामातून बैलांचे महत्त्व कमी झाल्याने वळूऐवजी कालवडीच जन्माला याव्यात, ज्यामुळे दुधाचे उत्पादन वाढेल या उद्देशाने औरंगाबादमध्ये ‘सेक्स सॉर्टेड सिमेन लॅब’ सुरू करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली होती. याला वर्ष होऊनही या लॅबसाठी आवश्यक असलेला निधी मिळाला नसल्याने ही लॅब सुरू होऊ शकली नाही. ही लॅब सुरु झाल्यास संपूर्ण मराठवाड्याला फायदा होणार आहे. बैलाशिवाय शेती पूर्वी अशक्यप्राय होती. ज्यांच्या दावणीला जास्त बैलजोडी ती गावातली मोठी असामी मानली जायची, मात्र यांत्रिकीकरणामुळे शेतीतील बैलांचा सहभाग कमी होत गेला. आता दावणीही फारशा दिसत नाहीत. औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा यामुळे गायीला वळू होण्याऐवजी कालवड झाल्यास पशुपालकांना फायदा होईल, दूधाचे उत्पादन वाढेल यासाठी औरंगाबादमध्ये सेक्स सॉर्टेड सिमेन लॅब सुरू करण्याची घोषणा फेब्रुवारी २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जालना येथील ‘महापशु एक्स्पो’मध्ये केली होती. यासाठी ४५ कोटींच्या निधीची तरतुदही करण्यात आली. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन या विषयीची माहिती दिली होती. काय आहे या लॅबचे वैशिष्ट्य पशुसंवर्धन विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हर्सुल येथील गोठीत रेत प्रयोगशाळेतून चांगल्या दर्जाच्या वळूच्या सिमेनपासून गायींना कृत्रिम रेतन करण्यात येते. मात्र त्यात वळू किंवा कालवड दोन्हीपैकी एक जन्माला येऊ शकते. सेक्स सॉर्टेड सिमेन लॅबमधून केवळ चांगल्या दर्जाच्या, जास्त दूध देणाऱ्या वंशावळीतील कालवडीच जन्माला येतील यासाठी गोठीत रेत तयार केले जातील. नरामध्ये XY तर मादीमध्ये XX गुणसूत्रे असतात. यातुन नराचे X गुणसुत्रे घेऊन त्याचे गोठीत रेत तयार करून ते गायींना दिले जातील. यामुळे गाय कालवडीलाच जन्म देईल. ही लॅब झाल्यास संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी व पशुपालकांना फायदा होणार आहे. मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा वर्षानंतरही कागदावरच वर्षभरापूर्वी या लॅबची घोषणा करण्यात आली. या लॅबसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. मात्र, निधीची उपलब्धताच नसल्याने ही लॅब सध्या कागदावरच असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 11, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2ZYc21S Read More Read more No comments:
या कारणाने बुडाला विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नागपूर : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयात दररोज शेकडो विद्यार्थी असतात. या ग्रंथालयात अभ्यास करताना समूह चर्चा आणि विविध स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन मिळत असते. याशिवाय विविध उपयुक्त पुस्तकेही या ठिकाणी उपलब्ध होत असतात. याशिवाय शहरातील महापालिकेच्या विविध वाचनालयांत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येतात. वाचनालयात तसे वातावरण उपलब्ध होत असल्याने आजवर सरकारी नोकऱ्यांसाठी विविध विभागांद्वारे घेण्यात येत असलेल्या परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ ग्रंथालयासह वाचनालयांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र, मार्च महिन्यापासून राज्यासह देशभरात टाळेबंदी लावण्यात आली. यामुळे महाविद्यालय, विद्यापीठांसह महापालिकेतील वाचनालयेही बंद झालीत. वाचनालये बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास जवळपास बंद झाला. स्पर्धा परीक्षेत समूह चर्चेला अतिशय महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांमधील संवाद जवळपास कमी झाला आहे. तसेच पुस्तक खरेदी बंद असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्यक असलेली पुस्तके मिळणे अशक्य होत आहे. शिवाय इतर कामे बंद झाल्याने इंटरनेटसाठी आवश्यक असलेला पैसे नसल्यानेही विद्यार्थ्यांवर मर्यादा आल्या आहेत. परीक्षा लांबणीवर देशात भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन बोर्ड, रेल्वेतील एनटीपीसी ग्रुप डीसह इतर स्पर्धात्मक परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. याशिवाय राज्यातही सध्या भरती प्रक्रिया जवळपास बंद आहे. यामुळेही विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मूड गेला आहे. यात टाळेबंदीमुळे समस्या निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचा पुरता हिरमोड झालेला आहे. शहरातील प्रमुख ग्रथांलय आणि वाचनालय नागपूर विद्यापीठ ग्रंथालय, राममनोहर लोहिया वाचनालय, राष्ट्रीय वाचनालय, बाजीराव साखरे, कुंदनलाल शाह वाचनालय, जिल्हा वाचनालय. हेही वाचा : नक्षलवादी असल्याचे सांगून ते सर्रास लुटायचे प्रवाशांना! नेमके ते होते कोण? विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर टाच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत एकीकडे ऑनलाइन शिक्षण महत्त्वपूर्ण ठरत असले, तरी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो तरुणांना या वातावरणाचा मोठा फटका बसतो आहे. टाळेबंदीमुळे शहरातील प्रमुख ग्रंथालये आणि वाचनालये बंद झाल्याने या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरच टाच आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. देशाची बिघडती अर्थव्यवस्था आणि देशात होणारे खासगीकरण यामुळे स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. बाजारात जरी गर्दी दिसून आली, तरीही शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे वाचनालय आणि अभ्यासिका सध्या बंद आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाचे वातावरण जवळपास नाहीसे झाले आहे. -सुबोध चहांदे स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थी संपादन : मेघराज मेश्राम News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 11, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3gP6spj Read More Read more No comments:
Horoscope Today, 12 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3j0YlIr Latest news updates July 11, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
अमिताभ-अभिषेक बच्चन कोरोना पॉजिटिव, स्वास्थ्य मंत्री ने बताया- तबीयत ठीक https://ift.tt/327H3Db Latest news updates July 11, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
मां के अवैध संबंधों के चलते 5 साल की मासूम की हत्या, गम में पिता ने दी जान https://ift.tt/2ATtwnG Latest news updates July 11, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments: