सरकार मायबाप आर्थिक मदत देणार काय, नागपूरकरच्या खेळाडूंचा टाहो नागपूर : लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ऑलिंपिक क्रीडा प्रकारांत सहभागी झालेल्या द्रारिद्य्ररेषेखालील खेळाडूंना राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, महिना लोटूनही अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. नागपुरातील अनेक खेळाडूंची सध्या उपासमार सुरू असल्यामुळे ते मदतीची वाट पाहात आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील असंख्य खेळाडू व त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले. दैनिक "सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर क्रीडामंत्री सुनील केदार यांनी आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती चौहानला 25 हजारांची तातडीची मदत केली होती. त्यानंतर इतरही खेळाडूंनी मदतीसंदर्भात ओरड केल्यानंतर क्रीडा विभागाने बीपीएल कार्डधारक खेळाडूंना मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र, ही मदत देताना शासनाने काही जाचक अटी ठेवल्या होत्या. या अटींनुसार, केवळ ऑलिंपिक क्रीडा प्रकारांत खेळलेल्या आणि बीपीएल रेशन कार्डधारक खेळाडूंनाच ही आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे नागपूरच्या अनेक आजी-माजी खेळाडूंनी जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांना निवेदन देऊन अटी शिथिल करण्याची विनंती केली होती. दरम्यान, खेळाडूंना मदत करण्यासंदर्भातील प्रस्ताव बालेवाडी (पुणे) येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय कार्यालयातून शासनाकडे 20 दिवसांपूर्वीच पाठविण्यात आला आहे. त्यावर आता सकारात्मक निर्णय होण्याची खेळाडू वाट पाहात आहेत. नोकऱ्या नसल्यामुळे नागपुरातील असंख्य खेळाडू उदरनिर्वाहासाठी संघर्ष करीत आहेत. हेही वाचा : इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो ! प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव मदतीसाठी 13 खेळाडूंचे अर्ज जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत आर्थिक मदतीसाठी अर्ज मागविण्यात आल्यानंतर नागपूरच्या एकूण 13 बीपीएल कार्डधारक खेळाडूंनी ऑनलाइन अर्ज केले असल्याची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी पुंड यांनी दिली. शिवाय त्यांनी अटी शिथिल करण्यासंदर्भात केलेल्या मागण्यांचे निवेदनही पुण्याला पाठविल्याचे ते म्हणाले. "लॉकडाउन काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील खेळाडूंना मदत करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून, तो मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. शासनाचा सकारात्मक प्रतिसाद असून, लवकरच खेळाडूंना मदत मिळण्याची शक्यता आहे.' -ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा आयुक्त. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 08, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2W1XL31 Read More Read more No comments:
जीवनावश्यक वस्तूंमध्ये या वस्तू नाहीच नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या काळात प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या मास्क व सॅनिटायजर यांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असताना याबाबतच्या आधीच्या निर्णयाला मुदतवाढ देण्याचे सरकारने नाकारल्याने हा निर्णय वादात सापडण्याची चिन्हे आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाशी लढण्यासाठीची शस्त्रे मानल्या गेलेल्या या दोन्ही गोष्टी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून वगळल्याने त्यांची साठेबाजी व काळाबाजार पुन्हा सुरू होईल, या शंकेस भाजप सूत्रांनीही दुजोरा दिला. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क-सॅनिटायजर वापरण्याबाबत स्वतः पंतप्रधानांपासून सर्वांनीच आग्रह धरला होता. अर्थात त्याच्या केवळ ६ दिवस आधी (१८ मार्च) मास्क घालून सभागृहात आलेल्या खासदारांना संसदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी "मास्क घालून तुम्हाला सभागृहात बसता येणार नाही. ते तत्काळ हटवा'' असे आदेश दिले होते. अखेर लडाखमधील सैन्य मागे; 'तो' वादग्रस्त भाग नवा बफर झोन म्हणून घोषित! पंतप्रधानांनी, घरगुती मास्क बनवून वापरा असे आवाहन केल्यानंतर भाजपसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी देशभरात कोट्यवधी मास्कचे वाटप केले. काळाबाजार, निकृष्ट दर्जाच्या मास्क, सॅनिटायजरची निर्मिती आणि विक्री रोखण्यासाठी सार्वजनिक पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी या दोन्ही गोष्टी ३० जूनपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत सामील करण्याची घोषणा केली होती. कुख्यात गुंड विकास दुबे CCTV कॅमेऱ्यात कैद; पण... यासाठी आवश्यक वस्तू अधिनियम-१९५५ मध्ये दुरुस्ती करण्याचा वटहुकूमही सरकारने आणला होता. २ व ३ प्रकारचे प्लाय सर्जिकल फेस मास्क, एन- ९५ मास्क व हॅंड सॅनिटाइजर यांचा त्यात समावेश केला गेला. मात्र तेव्हापेक्षा आता कोरोनाचा प्रकोप वाढलेला असताना सरकारने त्या निर्णयाला मुदतवाढ न देता काल त्या यादीतून दोन्ही गोष्टी कमी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे दुकानदार आता पुन्हा या दोन्ही गोष्टी मनमानी भावाने विकू लागतील अशी भीतीही व्यक्त होते आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 08, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2CfvRJS Read More Read more No comments:
‘सीबीएसई’ने गाळलेल्या धड्यांमध्ये धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर कात्री नवी दिल्ली - राज्यघटनेचे स्वरूप, संघराज्य रचना, राज्य सरकार, प्रादेशिक अस्मिता, नागरिकता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही अधिकार...हे आहेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) यावर्षीसाठी ९ वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमातून संपूर्णपणे वगळलेले काही धडे. कोरोनाच्या संसर्गामुळे २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षात ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचे ठरविल्यावर सीबीएसईने ज्या वेचक धड्यांवर कात्री चालविली त्यात यांचा समावेश आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘धर्मनिरपेक्षता’ हा राज्यघटनेत नंतर घुसडलेला शब्द असल्याची टीका संघपरिवार वारंवार करत असतो. त्या पार्श्वभूमीवर वरील काटछाट वादाचा विषय ठरला आहे. अभ्यासक्रमांतील ही काटछाट राष्ट्रीय शिक्षण मंडळ (एनसीईआरटी) व ‘सीबीएसई’ने देशभरातील १५०० शिक्षणतज्ज्ञांचा ‘सल्ला’ घेऊन केल्याचे सांगण्यात आले होते. विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी म्हणून केलेल्या या बदलांमध्ये नागरिकत्व, अन्नसुरक्षा याबाबतचे धडेही वगळण्यात आले आहेत. आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमांत शाळांनी ‘त्यांच्या त्यांच्या हिशोबाने’ काटछाट करावी असे सांगण्यात आले आहे. अखेर लडाखमधील सैन्य मागे; 'तो' वादग्रस्त भाग नवा बफर झोन म्हणून घोषित! बदल यावर्षापुरताच - निशंक दरम्यान, याबाबत चर्चा सुरू झाल्यावर मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी खुलासा करून सांगितले की, हा बदल फक्त २०२०-२१ साठी आहे. अभ्यासक्रमातून वगळलेले धडेही विद्यार्थ्यांना शिकविले जातील. त्यांच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात यासाठी तेही भाग शिकविण्याचे निर्देश शाळांना दिले जातील. मात्र ‘सकाळ’ ला मिळालेल्या माहितीनुसार परीक्षेत त्या भागांचे प्रश्न विचारू नयेत, असे शाळांना याआधीच कळविण्यात आले आहे. यात सर्वाधिक कात्री ११ वी अभ्यासक्रमातील पहिल्या व दुसऱ्या पुस्तकांना लावण्यात आली आहे. वगळलेल्या अभ्यासक्रमांबाबत ‘सीबीएसई’ने शाळांना कळविलेले निर्देशही ‘सकाळ’कडे उपलब्ध आहेत. कुख्यात गुंड विकास दुबे CCTV कॅमेऱ्यात कैद; पण... या काटछाटीचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले की नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, संघीय रचना, फाळणी यासारखे धडे अभ्यासक्रमातून वगळणे धक्कादायक आहे. माझा पक्ष याचा तीव्र निषेध करतो. हे धडे पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत, अशी मागणी मी शिक्षण मंत्रालयाकडे करते. - नेहरुंच्या लडाख भेटीचा दाखला देत शरद पवार म्हणाले, 'PM मोदींनी...' हे ठळक भाग वगळले ९ वी राज्यशास्त्र - लोकशाही अधिकार, भारतीय राज्यघटनेचे स्वरूप अर्थशास्त्र - भारताची अन्नसुरक्षा. १० वी राज्यशास्त्र - लोकशाही व विविधता, लिंग, धर्म, जाती प्रथा - लोकप्रिय संघर्ष व आंदोलने, लोकशाहीसमोरील आव्हाने आदी. विज्ञान - मानवी दृष्टी, विकासाच्या पायाभूत कल्पना समकालीन भारतात जंगले व वन्य जीवनावरील समाजविज्ञान. ११ वी राज्यशास्त्र : संघीय रचना, राज्य सरकार, नागरिकता, राष्ट्रवाद, स्थानिक सरकारांची गरज व त्यांची भारतातील वाढ, धर्मनिरपेक्षता. इंग्रजी : संपादकांना पत्र, नोकरीसाठी आपल्या अल्पपरिचयासह अर्ज करा. १२ वी अर्थशास्त्र : जीएसटी, भारतीय अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप, नीती आयोग, उदारीकरण, खासगीकरण, सरकारीकरण, व्यापार व जागतिकीकरण राज्यशास्त्र : लोकशाहीबाबतचे ६ धडे वगळले. समकालीन जगाची सुरक्षितता, भारतातील सामाजिक व असामाजिक आंदोलने, प्रादेशिक अस्मिता नियोजनबद्ध विकास : आर्थिक विकासाचे बदलते स्वरूप योजना आयोग व पंचवार्षिक योजना पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका व म्यानमार या शेजाऱ्यांशी भारताचे संबंध. ही काटछाट कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली हे मला माहिती नाही. मात्र भारताच्या विविधतेच्या संकल्पनेशी संबंधित धडे वगळणे हे पुस्तकाच्या मूळ रचनेशीच नव्हे तर, लोकशाहीच्या संकल्पनेबरोबर केलेली हिंसाच ठरते. विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा बोजा किंवा ताण कमी करण्याचे अन्य मार्गही असू शकतात. - प्रा. सुहास पळशीकर (एनसीईआरटीच्या पुस्तकांचे लेखक व राज्यशास्त्र तज्ज्ञ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 08, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2VZDk6J Read More Read more No comments:
महाराष्ट्रातील उद्योगांना राष्ट्रीयकृत बॅंकांनी वाटप करताना फक्त एवढाच केला पत पुरवठा; वाचा सविस्तर पुणे - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पतपुरवठा वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी, त्यातील एक लाख १४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रातील उद्योगांच्या पदरी फक्त सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयेच पडले आहेत. राज्यात १५ लाखांपेक्षा जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक असताना, फक्त एक लाख जणांना त्याचा थेट फायदा झाला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा देशात सर्वाधिक सूक्ष्म, लघु आणि मध्म उद्योग असलेल्या राज्यांत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यातून राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) सुमारे १६ टक्क्यांची भर पडत असताना, राष्ट्रीयकृत बॅंकांनी ६५ हजार कोटी रुपयांचे वाटप करताना महाराष्ट्रातील या उद्योगांना फक्त सुमारे १० टक्केच पत पुरवठा केला आहे. उर्वरित पतपुरवठा खासगी बॅंकांनी केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमधून हा प्रकार उघड झाला आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांची आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची काही प्रमाणात उदासीनता त्याला कारणीभूत ठरत आहे. या उद्योगांनी घेतलेल्या कर्जाच्या २० टक्के आणखी रक्कम त्यांनी मागणी केल्यावर विना कागदपत्रे दोन दिवसांत देण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यानुसार कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले आहे. ॲम्बुलन्ससाठी होणारी लूट थांबणार; नवे दर काय आहेत ते जाणून घ्या! सहकारी बँकांसाठीही योजना हवी राज्यातील अनेक उद्योगांची सहकारी बॅंकांत खाती आहेत. सहकारी बॅंकांना ही योजना लागू नसल्यामुळेही त्यांची कुचुंबना झाली आहे, त्यामुळे ही योजना सहकारी बॅंकांनाही लागू करावी, अशी मागणी पुण्यातील उद्योजक अरुण माने यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार उद्योगांना वित्त पुरवठा करून देण्यात येत आहे. त्यांनी काही कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्यांना वाढीव रक्कम देण्यात येते. त्याची पूर्तता त्यांनी केल्यावर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. ही योजना उद्योगांपर्यंत पोचविण्यासाठी स्टेट बॅंक प्रयत्नशील आहे. - अभय पाटील, एमएसएमई विभागाचे झोनल मॅनेजर, स्टेट बॅंक ऑफ इंडिया पुण्यात घर घ्यायचंय? तर ही बातमी नक्की वाचा! देशाच्या विकासासाठी उद्योगांची वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारची वाढीव पतपुरवठा देण्याची घोषणा स्वागतार्ह आहे. या बाबत उद्योगांना माहिती व्हावी, यासाठी एमसीसीआयएतर्फे राष्ट्रीयकृत बॅंकांच्या मदतीने ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करून उद्योजकांना माहिती देऊन त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. - प्रशांत गिरबने (महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर) महाराष्ट्रात झालेला वित्त पुरवठा (४ जुलैपर्यंत) २,६८,९०९ - कंपन्यांची प्रकरणे मंजूर १,०३,३२४ - प्रत्यक्ष पैसे मिळालेले ६,८५६.५३ कोटी - रक्कम मंजूर ३,६०५.६१ कोटी - रक्कम वितरीत ६.३३ कोटी - देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या १५,२५,२१० - महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 08, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3iNCOCW Read More Read more No comments:
मुसळधार, पूरस्थिती, पडझड अन् धास्ती सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -दोन ते तिन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसासोबतच वादळी वाऱ्याचाही जोर असल्याने किनारी भागाला असस्त्र लाटांचा तडाखा बसत आहे. एकूणच या मुसळधार पावसामुळे कोकणतील जनजीवन विस्कळीत झाले आहेच, शिवाय कोकणवासीयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मालवण, आचरा, दोडामार्ग भागांतील पावसाचा हा एकत्रीत वृत्तांत. मालवणला झोडपले मालवण ः शहरासह संपूर्ण तालुक्यास मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे नद्या, नाले दुधडी भरून वाहत होत्या. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. शहरातील मेढा येथील पुरातन नाभानाथ मंदिर मुसळधार पावसात कोसळले. जेसीबीच्या साहाय्याने ते हटविण्याचे काम सुरू होते. गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखीनच वाढल्याचे दिसून आले. समुद्राच्या अजस्र लाटांचा तडाखा किनारपट्टी भागात सुरू होता. तालुक्यातील नद्या, नाल्यांना पूर आल्याने अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेले होते. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. यात साळेल येथील सहदेव आचरेकर यांच्या घरावर रतांब्याचे झाड पडून 1400 रुपयांचे नुकसान झाले. कोळंब न्हिवे येथील स्वप्नील परब यांच्या राहत्या घरावर फणसाचे झाड पडून 5 हजार रुपयांचे नुकसान झाले. कुणकवळे येथील सूर्यकांत निकम यांच्या राहत्या घरावर दुपारी सागाच्या झाडाची फांदी पडून 1525 रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित तलाठ्यांनी घटनास्थळी जात नुकसानीची पंचयादी केली आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यात मेढा येथील पुरातन नाभानाथ मंदिर कोसळल्याची घटना घडली आहे. हे पुरातन जीर्ण झाले होते. दुपारी मुसळधार पावसात ते पूर्णतः कोसळले. जेसीबीच्या साहाय्याने मंदिराचे जीर्ण अवशेष हटविण्याचे काम सुरू होते. आचऱ्यात जोरदार पाऊस आचरा ः थोडी उसंत घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासूनच जोरदार सुरुवात केल्याने नदी नाल्यांना पूर आले आहेत. गडनदीला पूर आल्याने आचरा कणकवली रोडवर ठिक ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर श्रावण नदी वाडी येथे रस्त्यावरच आकेशियाचा मोठा वृक्ष पडून रस्ता बंद झाला होता. गडनदीला आलेल्या पूरामुळे वरवडे इंग्लिश मिडीयम स्कूल जवळील पूलानजिक दोन अडीच फूट पाणी साचले होते. श्रावण नदी वाडी येथेही रस्त्यावर पाणी आले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आकेशियाचा वृक्ष रस्त्यावर पडल्याने ड्यूटी संपवून घरी जाणारया शासकीय कर्मचारी अडकून पडले होते. याची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलीस कर्मचारी देसाई, सावंत, पाडावे यांच्या सहकार्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सदर वृक्ष हटवून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला होता. नदी वाडी येथे पाण्यात अडकलेल्या वाहनांनाही पोलिसांनी पाण्याबाहेर काढण्यास मदत केली जात होती. उशिरापर्यंत पाणी कमी न झाल्याने रामगड सांडवेमार्गे वाहनचालकांनी कणकवलीला जाण्याचा पर्याय निवडला होता. दोडामार्गात मुसळधार दोडामार्ग ः तालुक्याला आज सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपले. संततधार पावसामुळे नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहेत. अनेक कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले होते. खानयाळे येथील पूल पाण्याखाली गेल्याने शिरंगे पुनर्वसन वसाहत आणि खानयाळे येथील ग्रामस्थांचे हाल झाले. बराच काळ पुलावरून पाणी वाहत असल्याने साटेली-भेडशी खानयाळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्यात कालपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. दिवसभर वीज नसल्याने ग्राहक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. वीज नसली की बीएसएनएलची रेंजही गायब होते. त्यामुळे कालपासून बीएसएनएलच्या ग्राहकांना रेंज मिळत नसल्याने त्यांची गैरसोय झाली. विद्युत वितरण कंपनी आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडून मात्र सतत वीज आणि रेंज खंडित होत असताना त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 07, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3f9UcPW Read More Read more No comments:
तिसरी यादी अडकली, शेतकरी चिंतेत..काय आहे प्रकरण? ओरोस (सिंधुदुर्ग) - महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019ची तिसरी यादी तीन महिन्यांहून अधिक काळ रखडली आहे. परिणामी जिल्ह्यातील एक हजार 183 लाभार्थी कर्जमाफी यादीत नाव येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यादीत नाव आले आहे; पण आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने 782 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा होऊ शकली नाही. ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनाही जाहीर केली होती. त्याचा अध्यादेश 27 डिसेंबरला काढला होता. पहिली यादी 28 फेब्रुवारीला काढण्यात आली. त्यानंतर दुसरी यादी जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेत 11 हजार 3 शेतकरी पात्र ठरले होते. यातील पहिल्या दोन यादीत मिळून 9 हजार 820 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध केली होती. एक हजार 183 नावे प्रसिद्ध झाली नव्हती. उर्वरित नावे तिसऱ्या यादीत जाहीर करण्यात येतील, असे शासनाने जाहीर केले होते. अल्प मुदतीचे शेती कर्ज घेत व्याजासह 2 लाख रुपयांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी जाहीर केली होती. पहिल्या व दुसऱ्या यादीत मिळून नावे प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे बंधन आहे. जिल्ह्यात पहिल्या दोन यादीत मिळून प्रसिद्ध 9 हजार 820 शेतकऱ्यांपैकी 9 हजार 51 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. 782 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले नाही; मात्र यातील 8 हजार 152 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे. यादीत नाव येऊनही आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने 782 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झालेली नाही. आधार प्रमाणीकरण रखडले मार्चमध्ये दुसरी यादी आली; मात्र त्यानंतर तीन महिने उलटले तरी प्रसिद्ध झालेल्या यादीतील 782 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण होऊ शकलेले नाही. याच काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरु झाले. अलीकडे लॉकडाउन उठले तरी आधार केंद्रामध्ये जाण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आधार प्रमाणीकरण रखडले आहे. तीन महिन्यांत 85 जणांना रक्कम कोरोनामुळे सर्वच थांबले आहे. त्याप्रमाणे कर्जमाफीची तिसरी यादी शासनाने जाहीर केलेली नाही. 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील 8 हजार 77 शेतकऱ्यांना 32 कोटी 69 लाख एवढी कर्जमाफी त्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्यानंतर एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत आणखी केवळ 85 शेतकऱ्यांच्या खात्यात ही कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे. 38 लाख 25 हजार 315 रुपये एवढी ही रक्कम आहे. परिणामी आतापर्यंत 8 हजार 152 शेतकऱ्यांच्या खात्यात 33 कोटी 7 लाख 25 हजार 315 रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. तर यादीत नाव न आलेली 1 हजार 183 आणि यादीत नाव येऊन आधार प्रमाणीकरण न झालेली 782, असे एकूण 1 हजार 965 शेतकरी कर्जमाफीपासून अजून वंचित आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 07, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2DhE2G1 Read More Read more No comments:
पुन्हा झोडपले, माणगाव खोरे संपर्कहीन वैभववाडी / ओरोस (सिंधुदुर्ग) - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले. संततधारेमुळे जिल्ह्यातील काही नद्यांना पूर आला असून अनेक पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे काही मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. काही भागातील विज पुरवठा खंडीत झाला आहे; परंतु दोन दिवसानंतर चांगला पाऊस पडत असल्यामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात 3 व 4 जुलैला मुसळधार पाऊस झाला. यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना देखील घडल्या होत्या; मात्र त्यानंतर गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. काल (ता.6) सायंकाळनंतर पावसाने जोर धरला. रात्रभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. आज सकाळपासुन तर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. संततधारेमुळे नदीनाल्यांना पुर आला आहे. माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. कणकवली-कुंभवडे मार्गावरील पुलावर पाणी चढल्याने मुख्यरस्ता ते गावठणवाडी रस्त्यावरील वाहतुक बंद आहे. निरूखे पुलावरून देखील पुराचे पाणी वाहत असुन हा मार्ग देखील वाहतुकीस बंद झाला आहे. आचरा-कणकवली मार्गावर पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतुक देखील ठप्प झाली आहे. याशिवाय अन्य काही मार्गावर पुराचे पाणी आले आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. सह्याद्रीपट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटरस्त्यांमध्ये किरकोळ दगड पडण्याचे प्रकार असले तरी त्याचा वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. दरम्यान मुसळधार पावसामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासुन रेंगाळलेल्या भातलावणीने वेग घेतला आहे. पावसाअभावी भातलावणी खोळंबली होती; मात्र काल रात्रीपासुन पाऊस सुरू झाल्यामुळे शेतशिवारे गजबजल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीचा इशारा जिल्ह्यात 8 ते 11 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय समुद्रात लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तविली आहे. मालवण ते वसई या समुद्र किनारी 3 ते 4.6 मीटर उंचीच्या तर वेंगुर्ले ते वास्को समुद्रकिनारी 2.9 ते 4.2 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 07, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2VR9JfV Read More Read more No comments:
शेतकऱ्यांचा कल `बाहुबली`कडे! काय आहे ही शेती? वाचा... सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील तालुक्यात मोठी मागणी असलेल्या "सुवर्णा' भाताच्या बियाण्याची कमतरता असल्याने शेतकऱ्यांनी आपला कल "बाहुबली' बियाण्याकडे वळविला असून नांगरणीची कामे पूर्णत्वास आल्याने पेरणीच्या व लावणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यात मेच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली; परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतीच्या कामांना आणखी वेग आला आहे. गेले कित्येक दिवस शेतकरी शेतात कंबर कसून राबत आहेत. नांगरणी 100 टक्के पूर्ण झाली असून आता पेराणीच्या आणि लावणीच्या कामांना जोर आला आहे. त्यामुळे भात बियाणे गोळा करण्याची लगबगही वाढली आहे. लॉकडाउन असल्यामुळे भाताच्या बियाणांची कमतरता भासणार असल्याची खात्री शेतकऱ्यांना होती; परंतु प्रशासनाकडून आवश्यक ती बियाणी पुरविण्यात येतील, असा विश्वासही होता. मात्र, जून उजाडला तरी बहुतांश शेतकऱ्यांना मागणी असलेले "सुवर्णा' बियाणे मिळाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली. जया, कोमल, प्रसन्ना, रुचिका, अस्मिता, लीडर, विश्वा, सुप्रिमसोना, चिंटू, कावेरा सोना, वैष्णवी, मधुमती, पार्वती, मोहिनी, सिल्की, शुभांगी, बाहुबली, श्रीलता, कस्तुरी अशा बियाण्यांचा फलक तालुकास्तरावरील कृषी केंद्रावर लावले आहेत; परंतु ज्या बियाण्याची मागणी जास्त आहे, असे सुवर्णा बियाणे कुठेही असल्याचे निदर्शनास आले नाही. त्यामुळे नव्याने शेतीत उतरलेल्या युवक वर्गांतून नाराजी व्यक्त होत आहे. अनुदानाची मागणी बाजारात नवीन आलेल्या "बाहुबली' बियाण्याचा प्रयोग करून पाहण्याचा मानसही काही युवा शेतकऱ्यांनी दाखविला. शेतकऱ्याच्या डोक्यावर निसर्गाचे संकटही कायम असते. अतिवृष्टी किंवा दुष्काळाचा मार झेलत तो इतरही संकटे झेलतो. महागाई वाढल्यास सर्वच वस्तूंचे भाव वाढतात; पण शेतीमालाचे त्या प्रमाणात वाढत नाहीत. उलट शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, फवारणी व मजुरी असे सर्वच महाग झालेले असते. शेतीचा वाढता खर्च आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शेतीसाठी अनुदानाची मागणीही होत आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 07, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/38zotoG Read More Read more No comments:
Horoscope Today 8 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/38zSN2J Latest news updates July 07, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
UP: विकास दुबे के करीबी अमर दुबे का एनकाउंटर, हमीरपुर में मार गिराया गया https://ift.tt/2VXUe5L Latest news updates July 07, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
बाबा साहेब अंबेडकर के मुंबई वाले घर में तोड़फोड़, जांच में जुटी पुलिस https://ift.tt/3fbbUlV Latest news updates July 07, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
नीले रंग की टीशर्ट पहनकर फरीदाबाद होटल से फरार हुआ विकास दुबे, दो साथी पकड़े https://ift.tt/2ZO4FKd Latest news updates July 07, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
KRK के नाम फ्लॉप का रिकॉर्ड, वो मौके जब बेतुके बयानों से विवादों में रहे https://ift.tt/2ABNsv0 Latest news updates July 07, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments: