Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 1, 2020

लॉकडाऊन : बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन, जीईएम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर

लॉकडाऊन : बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन, जीईएम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर

July 01, 2020 0 Comments
कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/31As3xr ...
Read More
कोरोना व्हायरसः सोनं का महागलं? गुंतवणुकदारांनी काय करावं?
कोरोना कुपोषणः येमेनमधील दहा लाख मुलांचा जीव धोक्यात
2020 के 6 महीने- केवल 50 फिल्में रिलीज, टॉप पर अजय देवगन- पहली बार ऐसा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

2020 के 6 महीने- केवल 50 फिल्में रिलीज, टॉप पर अजय देवगन- पहली बार ऐसा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

July 01, 2020 0 Comments
साल 2020 की शुरुआत में शायद ही किसी ने सोचा होगा कि आने वाले कुछ दिनों में ऐसा वक्त देखने को मिलेगा, जहां घर से निकलना भी दूभर होगा। लगभग ती...
Read More
(व्हिडीओ) : तेरी मेरी यारी... "गंगी'-"भागी'ची जमलीय गट्टी..

शेवगाव : "गंगी' आणि "भागी'... एक वानरीण, तर दुसरी कुत्री.. तालुक्‍यातील खुंटेफळ येथील ग्रामस्थांनी त्यांना ही नावे दिलीत.. या दोघींची चांगलीच गट्टी जमली आहे. दिवसभर त्यांच्या लीला पाहताना ग्रामस्थांचे चांगलेच मनोरंजन होते. त्यांच्या मैत्रीची कहाणीही फार मनोरंजक आहे.

हेही वाचा : इंदोरीकर महाराजांना वाढता पाठिंबा.. 

तालुक्‍यातील खुंटेफळ येथे पाच-सहा वर्षांपूर्वी वानरांचा कळप आला होता. कळपासोबत वानरांची दोन-तीन छोटी पिलेही होती. गावाचा परिसर मोठा. बागायती शेती. फळ-भाजीपाल्याची पिके. त्यामुळे हा कळप या परिसरात चांगलाच रमला. 

 

काही दिवसांनी कळप निघून गेला; पण कळपासोबत चुकामूक झाल्याने वानराचे छोटे पिलू गावातच राहिले. आई दिसेना, मित्रमंडळी गायब झाली. पिलू सैरभैर झाले. आकांत करीत ओरडू लागले. आईचा शोध घेत परिसरात फिरू लागले. 

"भागी'ची पिल्ले मात्र दगावली 

ग्रामस्थांना, लहान मुलांना त्याची दया आली. मोठ्या मायेने त्यांनी त्याला खायला-प्यायला दिले. सुरवातीला माणसांना घाबरून हे पिलू लपून बसत असे. मात्र, हळूहळू त्याची भीड चेपली. माणसांचा, विशेषतः लहान मुलांचा चांगलाच लळा त्याला लागला. गावातील इतर पाळीव प्राणीही त्याच्यासोबत खेळू लागले. काळ लोटला. आता या पिलाचे मादीवानरात रूपांतर झालेय. ग्रामस्थांनी तिला "भागी' असे नाव दिले. तीन-चार पिलांनंतर गावात या "भागी'चाही कुटुंबकबिला तयार झाला होता. मात्र, काही कारणांनी तिची पिले दगावली. 

देव राहत असल्याची भावना 

गावातील लहान-मोठ्या माणसांच्या अंगा-खांद्यावर "भागी' खेळते. कोणी त्रास दिला, तरी उलटून तिने कधी कोणाला इजा केलेली नाही. जणू गावातील एक सदस्य बनूनच ती वावरत असते. तिच्या रूपाने साक्षात देवच गावात राहत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. त्यामुळे तिच्या खाण्याचीही चैन होते. ग्रामस्थ रोज तिला फळे, पोळ्या, भाकरी व इतर अन्नपदार्थ देतात. 

मैत्रीचा नवा अध्याय 

गावातील "गंगी'सोबत म्हणजे कुत्रीसोबत "भागी'ची चांगलीच गट्टी जमलीय. दिवसभर त्यांची एकमेकींशी थट्टामस्करी सुरू असते. त्यांच्यातील कुरापतीच्या मजेदार खेळांनी गावकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होते. "भागी' आणि "गंगी'च्या रूपाने साकार झालेला प्राण्यांतील मैत्रीचा नवा अध्याय खुंटेफळ परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. 

खुंटेफळच्या नागरिकच 

भागी व गंगी या दोघींचा गावाला चांगलाच लळा लागला आहे. दिवसभर त्या दिसल्या नाहीत तर ग्रामस्थ बेचैन होतात. दोघींकडे आधार व रेशनकार्ड नाही; बाकी त्या खुंटेफळच्या नागरिकच बनल्या आहेत. 
- गणेश पागर, ग्रामस्थ, खुंटेफळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

(व्हिडीओ) : तेरी मेरी यारी... "गंगी'-"भागी'ची जमलीय गट्टी.. शेवगाव : "गंगी' आणि "भागी'... एक वानरीण, तर दुसरी कुत्री.. तालुक्‍यातील खुंटेफळ येथील ग्रामस्थांनी त्यांना ही नावे दिलीत.. या दोघींची चांगलीच गट्टी जमली आहे. दिवसभर त्यांच्या लीला पाहताना ग्रामस्थांचे चांगलेच मनोरंजन होते. त्यांच्या मैत्रीची कहाणीही फार मनोरंजक आहे. हेही वाचा : इंदोरीकर महाराजांना वाढता पाठिंबा..  तालुक्‍यातील खुंटेफळ येथे पाच-सहा वर्षांपूर्वी वानरांचा कळप आला होता. कळपासोबत वानरांची दोन-तीन छोटी पिलेही होती. गावाचा परिसर मोठा. बागायती शेती. फळ-भाजीपाल्याची पिके. त्यामुळे हा कळप या परिसरात चांगलाच रमला.    काही दिवसांनी कळप निघून गेला; पण कळपासोबत चुकामूक झाल्याने वानराचे छोटे पिलू गावातच राहिले. आई दिसेना, मित्रमंडळी गायब झाली. पिलू सैरभैर झाले. आकांत करीत ओरडू लागले. आईचा शोध घेत परिसरात फिरू लागले.  "भागी'ची पिल्ले मात्र दगावली  ग्रामस्थांना, लहान मुलांना त्याची दया आली. मोठ्या मायेने त्यांनी त्याला खायला-प्यायला दिले. सुरवातीला माणसांना घाबरून हे पिलू लपून बसत असे. मात्र, हळूहळू त्याची भीड चेपली. माणसांचा, विशेषतः लहान मुलांचा चांगलाच लळा त्याला लागला. गावातील इतर पाळीव प्राणीही त्याच्यासोबत खेळू लागले. काळ लोटला. आता या पिलाचे मादीवानरात रूपांतर झालेय. ग्रामस्थांनी तिला "भागी' असे नाव दिले. तीन-चार पिलांनंतर गावात या "भागी'चाही कुटुंबकबिला तयार झाला होता. मात्र, काही कारणांनी तिची पिले दगावली.  देव राहत असल्याची भावना  गावातील लहान-मोठ्या माणसांच्या अंगा-खांद्यावर "भागी' खेळते. कोणी त्रास दिला, तरी उलटून तिने कधी कोणाला इजा केलेली नाही. जणू गावातील एक सदस्य बनूनच ती वावरत असते. तिच्या रूपाने साक्षात देवच गावात राहत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. त्यामुळे तिच्या खाण्याचीही चैन होते. ग्रामस्थ रोज तिला फळे, पोळ्या, भाकरी व इतर अन्नपदार्थ देतात.  मैत्रीचा नवा अध्याय  गावातील "गंगी'सोबत म्हणजे कुत्रीसोबत "भागी'ची चांगलीच गट्टी जमलीय. दिवसभर त्यांची एकमेकींशी थट्टामस्करी सुरू असते. त्यांच्यातील कुरापतीच्या मजेदार खेळांनी गावकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होते. "भागी' आणि "गंगी'च्या रूपाने साकार झालेला प्राण्यांतील मैत्रीचा नवा अध्याय खुंटेफळ परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.  खुंटेफळच्या नागरिकच  भागी व गंगी या दोघींचा गावाला चांगलाच लळा लागला आहे. दिवसभर त्या दिसल्या नाहीत तर ग्रामस्थ बेचैन होतात. दोघींकडे आधार व रेशनकार्ड नाही; बाकी त्या खुंटेफळच्या नागरिकच बनल्या आहेत.  - गणेश पागर, ग्रामस्थ, खुंटेफळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eQZcJd
Read More
पुण्यामध्ये आजपासून नवे नियम लागू; बाधित क्षेत्रे ३६ने वाढली

पुणे- लॉकडाउनमध्ये सवलती मिळाल्यानंतर पुण्यात कोरोना पसरत असल्याची बाब महापालिकेने गांभीर्याने घेतली आहे. ज्या परिसरात, सोसायट्यांत रुग्ण सापडतील, तो भाग लगेचच "सील' करून, रहिवाशांसाठी बंधने घालण्यात आली आहेत. रुग्ण वाढल्याने सूक्ष्म बाधित क्षेत्रांची संख्या 109 इतकी झाली असून, नव्या आणि जुन्या बाधित क्षेत्रांत ये-जा करण्यासही मर्यादा आणल्या आहेत. अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत. हा आदेश बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुण्यासह राज्यात येत्या 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. त्यातच पुण्यात रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरांसाठी नवी भूमिका ठरवली असून, त्यात रुग्ण संख्या वाढत असलेल्या भागांचा बाधित क्षेत्रात समावेश करून, खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. याआधीच्या 73 क्षेत्रात बदल करून, आता नव्याने 109 क्षेत्र बाधित म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. 

सूक्ष्म बाधित क्षेत्रात नव्याने रस्ते बंद करून, विनाकारण ये जा करणाऱ्यांना रोखले जाणार आहे. तर ज्या भागांतील रुग्ण कमी झाले आहेत, तेथील मर्यादा कमी करून, नागरिकांना सवलती देण्यात येणार आहेत. रस्ते बंद करणे आणि वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्याबाबत महापालिका आणि पोलिस यंत्रणा एकत्र काम करेल. पुढील आदेश येईपर्यंत नवा निर्णय अमलात असेल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आवश्‍यक त्या उपाययोजना करीत आहोत. त्यातूनच रूग्ण वाढलेल्या काही भागांत बंधने घालण्यात आली आहेत तर रुग्ण कमी झालेल्या भागातील नागरिकांना सवलती देण्यात येणार आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने बंधने व नियम पाळण्याची गरज आहे. 
-शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यामध्ये आजपासून नवे नियम लागू; बाधित क्षेत्रे ३६ने वाढली पुणे- लॉकडाउनमध्ये सवलती मिळाल्यानंतर पुण्यात कोरोना पसरत असल्याची बाब महापालिकेने गांभीर्याने घेतली आहे. ज्या परिसरात, सोसायट्यांत रुग्ण सापडतील, तो भाग लगेचच "सील' करून, रहिवाशांसाठी बंधने घालण्यात आली आहेत. रुग्ण वाढल्याने सूक्ष्म बाधित क्षेत्रांची संख्या 109 इतकी झाली असून, नव्या आणि जुन्या बाधित क्षेत्रांत ये-जा करण्यासही मर्यादा आणल्या आहेत. अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत. हा आदेश बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    पुण्यासह राज्यात येत्या 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. त्यातच पुण्यात रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरांसाठी नवी भूमिका ठरवली असून, त्यात रुग्ण संख्या वाढत असलेल्या भागांचा बाधित क्षेत्रात समावेश करून, खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. याआधीच्या 73 क्षेत्रात बदल करून, आता नव्याने 109 क्षेत्र बाधित म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.  सूक्ष्म बाधित क्षेत्रात नव्याने रस्ते बंद करून, विनाकारण ये जा करणाऱ्यांना रोखले जाणार आहे. तर ज्या भागांतील रुग्ण कमी झाले आहेत, तेथील मर्यादा कमी करून, नागरिकांना सवलती देण्यात येणार आहेत. रस्ते बंद करणे आणि वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्याबाबत महापालिका आणि पोलिस यंत्रणा एकत्र काम करेल. पुढील आदेश येईपर्यंत नवा निर्णय अमलात असेल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आवश्‍यक त्या उपाययोजना करीत आहोत. त्यातूनच रूग्ण वाढलेल्या काही भागांत बंधने घालण्यात आली आहेत तर रुग्ण कमी झालेल्या भागातील नागरिकांना सवलती देण्यात येणार आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने बंधने व नियम पाळण्याची गरज आहे.  -शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NJhJem
Read More
मेट्रो मार्गासाठी "टीओडी झोन'; हिंजवडी ते शिवाजीनगरसाठी सरकारची मान्यता 

पुणे - पुणे महापालिकेपाठोपाठ आता महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाच्या मार्गावरही टीओडी झोन (ट्रान्झिट ओरिएन्टेड झोन) लागू करण्यास राज्य सरकारने अखेर मान्यता दिली. त्यामुळे या मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरातदेखील चार एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो मार्गाला राज्य आणि केंद्र सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग इलिव्हेटेड असणार आहे. पुणे महापालिकेने महामेट्रोच्या माध्यमातून वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे. हे दोन्ही मार्ग आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावेत, यासाठी मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या पाचशे मीटर परिसरात चार एफएसआय वापरून, बांधकाम करण्यास परवानगी द्यावी, अशी शिफारस पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे केली होती. त्यास राज्य सरकारने मध्यंतरी मान्यता दिली. 

पुणे महापालिकेच्या धर्तीवर पीएमआरडीएनेदेखील हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यानच्या मेट्रो मार्गावर स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात टीओडी झोन वापरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारला केली होती. परंतु राज्य सरकारच्या पातळीवर हा प्रस्ताव प्रलंबित होता. राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने त्यास आज मान्यता दिली. याबाबतचे आदेश नगर विकास खात्याचे अवर सचिव किशोर गोखले यांनी काढले आहेत. त्यामुळे पीएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात चार एफएसआय वापरून बांधकाम करणे शक्‍य होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाणेर, बालेवाडीलाही फायदा 
हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आहे. ही मेट्रो शिवाजीनगर येथे महामेट्रोला जोडली जाणार आहे. या मार्गावर एकूण 23 मेट्रो स्टेशन असणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातून ही मेट्रो जाते. या मेट्रो स्टेशनच्या परिसरात टीओडी झोन लागू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे आता हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, वाकड, माण आणि शिवाजीनगर या भागातून जाणाऱ्या मेट्रोच्या परिसरात चार एफएसआय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हरकती-सूचनांसाठी प्रक्रिया सुरू 
राज्य सरकारने एमआरटीपी ऍक्‍टमधील कलम 154 खाली याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आजपासून हे आदेश लागू झाले आहेत. एकीकडे त्यांची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेदेखील आदेश दिले आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मेट्रो मार्गासाठी "टीओडी झोन'; हिंजवडी ते शिवाजीनगरसाठी सरकारची मान्यता  पुणे - पुणे महापालिकेपाठोपाठ आता महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाच्या मार्गावरही टीओडी झोन (ट्रान्झिट ओरिएन्टेड झोन) लागू करण्यास राज्य सरकारने अखेर मान्यता दिली. त्यामुळे या मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरातदेखील चार एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो मार्गाला राज्य आणि केंद्र सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग इलिव्हेटेड असणार आहे. पुणे महापालिकेने महामेट्रोच्या माध्यमातून वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे. हे दोन्ही मार्ग आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावेत, यासाठी मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या पाचशे मीटर परिसरात चार एफएसआय वापरून, बांधकाम करण्यास परवानगी द्यावी, अशी शिफारस पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे केली होती. त्यास राज्य सरकारने मध्यंतरी मान्यता दिली.  पुणे महापालिकेच्या धर्तीवर पीएमआरडीएनेदेखील हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यानच्या मेट्रो मार्गावर स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात टीओडी झोन वापरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारला केली होती. परंतु राज्य सरकारच्या पातळीवर हा प्रस्ताव प्रलंबित होता. राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने त्यास आज मान्यता दिली. याबाबतचे आदेश नगर विकास खात्याचे अवर सचिव किशोर गोखले यांनी काढले आहेत. त्यामुळे पीएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात चार एफएसआय वापरून बांधकाम करणे शक्‍य होणार आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाणेर, बालेवाडीलाही फायदा  हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आहे. ही मेट्रो शिवाजीनगर येथे महामेट्रोला जोडली जाणार आहे. या मार्गावर एकूण 23 मेट्रो स्टेशन असणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातून ही मेट्रो जाते. या मेट्रो स्टेशनच्या परिसरात टीओडी झोन लागू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे आता हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, वाकड, माण आणि शिवाजीनगर या भागातून जाणाऱ्या मेट्रोच्या परिसरात चार एफएसआय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  हरकती-सूचनांसाठी प्रक्रिया सुरू  राज्य सरकारने एमआरटीपी ऍक्‍टमधील कलम 154 खाली याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आजपासून हे आदेश लागू झाले आहेत. एकीकडे त्यांची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेदेखील आदेश दिले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZxyZsq
Read More
महिला सुरक्षेसाठी पोलिस विभागाचे एक पाऊल पुढे, केली ही सुविधा... 

नागपूर : नागपूर शहर वाहतूक विभागातर्फे शहरातील ऑटोरिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी "क्‍यूआर कोड' लावण्यात आले आहेत. या अभियानाचा त्याचा शुभारंभ सोमवारी वाहतूकचे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयातून करण्यात आला. नागपूर शहरामधील प्रथमत: एकूण 20 हजार ऑटोरिक्षांना क्‍यूआर कोड स्टीकर्स लावण्यात येणार आहेत, हे विशेष. 

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...
 

वाहतूक पोलिस या अभिनव अभियानात परवानाधारक ऑटोरिक्षांना क्‍यूआर कोड लावण्यात येणार आहे. त्याचा उपयोग ऑटोरिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना होणार आहे. क्‍यूआर कोड स्कॅन केला असता, त्याद्वारे त्यांना ऑटोचालकाचे नाव, वाहन क्रमांक, फोटो अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. 

संबंधित प्रवासी प्रवास करताना ही संपूर्ण माहिती त्याचे कुटुंबीय किंवा नातेवाइकांना व्हॉट्‌सऍप किंवा इतर मॅसेज प्रणालीदद्वारे पाठवू शकेल. तसेच चालकाची वागणूक, प्रवासाचा अनुभव शेअर करू शकतील. क्‍यूआर कोड लावण्यात आलेला ऑटोरिक्षा टॅग केला जाऊ शकतो. प्रवाशांना ज्या पदद्धतीने क्‍यूआर कोडचा फायदा होणार तसाच ऑटोचालकांना होणार आहे. त्यामुळे प्रवासी क्‍यूआर कोड लावलेल्या ऑटोनेच प्रवास करणे पसंत करतील. यावेळी वाहतूक विभागाच्या सर्व 10 झोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते. 
 

वाहतूक शाखा डिजिटल करण्याचा मानस 
वाहतूक शाखा पूर्णपणे डिजिटल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही ऑनलाइन लक्ष असावे. तसेच महिलांना अधिक सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे, यावर भर दिला जात आहे. क्‍यूआर कोडमुळे ऑटोबाबत आणि चालकाची सर्व माहिती एकाच क्‍लिकवर मिळू शकेल. रात्री-बेरात्री प्रवास करणाऱ्या महिलांनासुद्धा आता सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. 
विक्रम साळी, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महिला सुरक्षेसाठी पोलिस विभागाचे एक पाऊल पुढे, केली ही सुविधा...  नागपूर : नागपूर शहर वाहतूक विभागातर्फे शहरातील ऑटोरिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी "क्‍यूआर कोड' लावण्यात आले आहेत. या अभियानाचा त्याचा शुभारंभ सोमवारी वाहतूकचे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयातून करण्यात आला. नागपूर शहरामधील प्रथमत: एकूण 20 हजार ऑटोरिक्षांना क्‍यूआर कोड स्टीकर्स लावण्यात येणार आहेत, हे विशेष.  हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...   वाहतूक पोलिस या अभिनव अभियानात परवानाधारक ऑटोरिक्षांना क्‍यूआर कोड लावण्यात येणार आहे. त्याचा उपयोग ऑटोरिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना होणार आहे. क्‍यूआर कोड स्कॅन केला असता, त्याद्वारे त्यांना ऑटोचालकाचे नाव, वाहन क्रमांक, फोटो अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.  संबंधित प्रवासी प्रवास करताना ही संपूर्ण माहिती त्याचे कुटुंबीय किंवा नातेवाइकांना व्हॉट्‌सऍप किंवा इतर मॅसेज प्रणालीदद्वारे पाठवू शकेल. तसेच चालकाची वागणूक, प्रवासाचा अनुभव शेअर करू शकतील. क्‍यूआर कोड लावण्यात आलेला ऑटोरिक्षा टॅग केला जाऊ शकतो. प्रवाशांना ज्या पदद्धतीने क्‍यूआर कोडचा फायदा होणार तसाच ऑटोचालकांना होणार आहे. त्यामुळे प्रवासी क्‍यूआर कोड लावलेल्या ऑटोनेच प्रवास करणे पसंत करतील. यावेळी वाहतूक विभागाच्या सर्व 10 झोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते.    वाहतूक शाखा डिजिटल करण्याचा मानस  वाहतूक शाखा पूर्णपणे डिजिटल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही ऑनलाइन लक्ष असावे. तसेच महिलांना अधिक सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे, यावर भर दिला जात आहे. क्‍यूआर कोडमुळे ऑटोबाबत आणि चालकाची सर्व माहिती एकाच क्‍लिकवर मिळू शकेल. रात्री-बेरात्री प्रवास करणाऱ्या महिलांनासुद्धा आता सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.  विक्रम साळी, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3giOtaF
Read More
पेंच, ताडोबा पुन्हा सेवेत, एवढ्या पर्यटकांनी घेतला पहिल्या दिवशी आनंद

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील टाळेबंदीमुळे तब्बल 105 दिवस बंद असलेल्या पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी उघडण्यात आले. पेंचमधील सुरेवाणी, नागलवाडी, कऱ्हांडला प्रवेशद्वारापैकी केवळ एकच प्रवेशद्वारातून दोन वाहनांतून सहा पर्यटकांनी तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 13 प्रवेशद्वारापैकी दोन प्रवेशद्वारातून 22 निसर्गप्रेमींनी सफारी केली. निसर्ग पर्यटनाला नियमित जात असलो तरी आज मात्र, प्रथमच निसर्ग पर्यटनाला जाताना भीती वाटत होती, अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली. 

पेंच व्याघ्र प्रकल्पात नियमित वाघाचे दर्शन होत असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा असतो. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. मात्र, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि 18 मार्चपासून पेंच व उमरेड-कऱ्हाडला अभयारण्य एनटीसीएच्या निर्देशानुसार पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायाला मोठा फटका बसला. परिसराती रिसॉर्ट, जिप्सीचालक, गाईडचा रोजगार गेला. त्यामुळे हे पर्यटन सुरू करावे अशी मागणी होत होती. 

'पैसे वापस चाहिये या जान', अशी धमकी द्यायचा शिवसेनेचा शहरप्रमुख; वाचा कच्चाचिठ्ठा

वनमंत्री संजय राठोड यांनी पुढाकार घेत आजपासून पर्यटन सुरू करण्याचे निर्देश दिले आणि पर्यटनाचा श्रीगणेशा झाला. पर्यटन करताना सुरेवाणी प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांच्या हस्ते फित कापून वाहनाला प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी या वाहनांना निर्जंतुक करण्यात आले. सकाळी तीन आणि सायंकाळी तीन अशा सहा पर्यटकांनी पहिल्या दिवशी भेट दिली. पर्यटक नागपुरातील होते. 

ताडोबात 22 पर्यटक 
बफर झोनमधील 13 प्रवेशद्वार खुले करण्यात आले. यात आगरझरी, देवाळा, कोलारा, मदनापूर, शिरकाळा, पांगडी, अलिझंझा, नवेगाव, कसलाघाट, झरीपेठ, नवगाव आणि रामदेगी या प्रवेशद्वारांचा समावेश आहे. मात्र, आज सफारीला आगरझरी आणि कोलारा प्रवेशद्वार वगळता एकही प्रवेशद्वार पर्यटन न आल्याने उघडले नाही. या दोन प्रवेशद्वारातून केवळ पाच जिप्सी आत गेल्या. सफारीत 22 पर्यटकांचा समावेश आहे. त्यातही एक नागपूरचा पर्यटक वगळता सर्व पर्यटक हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते. 

 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वनविभागाची सुविधा उत्तम 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निसर्ग पर्यटन बंद होते, हे सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे होते. दरवर्षी उन्हाळ्यात निसर्ग पर्यटनासाठी नियमित जात असतो. आज प्रथमच मनात भीती बाळगून निसर्ग पर्यटनाला गेलो. निसर्गाचा आनंद लुटला अशी भावना पर्यटकांनी सांगितले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने केलेली सुविधा उत्तम आहे.  प्रेम कटरे, पर्यटक  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पेंच, ताडोबा पुन्हा सेवेत, एवढ्या पर्यटकांनी घेतला पहिल्या दिवशी आनंद नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील टाळेबंदीमुळे तब्बल 105 दिवस बंद असलेल्या पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी उघडण्यात आले. पेंचमधील सुरेवाणी, नागलवाडी, कऱ्हांडला प्रवेशद्वारापैकी केवळ एकच प्रवेशद्वारातून दोन वाहनांतून सहा पर्यटकांनी तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 13 प्रवेशद्वारापैकी दोन प्रवेशद्वारातून 22 निसर्गप्रेमींनी सफारी केली. निसर्ग पर्यटनाला नियमित जात असलो तरी आज मात्र, प्रथमच निसर्ग पर्यटनाला जाताना भीती वाटत होती, अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली.  पेंच व्याघ्र प्रकल्पात नियमित वाघाचे दर्शन होत असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा असतो. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. मात्र, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि 18 मार्चपासून पेंच व उमरेड-कऱ्हाडला अभयारण्य एनटीसीएच्या निर्देशानुसार पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायाला मोठा फटका बसला. परिसराती रिसॉर्ट, जिप्सीचालक, गाईडचा रोजगार गेला. त्यामुळे हे पर्यटन सुरू करावे अशी मागणी होत होती.  'पैसे वापस चाहिये या जान', अशी धमकी द्यायचा शिवसेनेचा शहरप्रमुख; वाचा कच्चाचिठ्ठा वनमंत्री संजय राठोड यांनी पुढाकार घेत आजपासून पर्यटन सुरू करण्याचे निर्देश दिले आणि पर्यटनाचा श्रीगणेशा झाला. पर्यटन करताना सुरेवाणी प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांच्या हस्ते फित कापून वाहनाला प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी या वाहनांना निर्जंतुक करण्यात आले. सकाळी तीन आणि सायंकाळी तीन अशा सहा पर्यटकांनी पहिल्या दिवशी भेट दिली. पर्यटक नागपुरातील होते.  ताडोबात 22 पर्यटक  बफर झोनमधील 13 प्रवेशद्वार खुले करण्यात आले. यात आगरझरी, देवाळा, कोलारा, मदनापूर, शिरकाळा, पांगडी, अलिझंझा, नवेगाव, कसलाघाट, झरीपेठ, नवगाव आणि रामदेगी या प्रवेशद्वारांचा समावेश आहे. मात्र, आज सफारीला आगरझरी आणि कोलारा प्रवेशद्वार वगळता एकही प्रवेशद्वार पर्यटन न आल्याने उघडले नाही. या दोन प्रवेशद्वारातून केवळ पाच जिप्सी आत गेल्या. सफारीत 22 पर्यटकांचा समावेश आहे. त्यातही एक नागपूरचा पर्यटक वगळता सर्व पर्यटक हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते.   कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वनविभागाची सुविधा उत्तम  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निसर्ग पर्यटन बंद होते, हे सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे होते. दरवर्षी उन्हाळ्यात निसर्ग पर्यटनासाठी नियमित जात असतो. आज प्रथमच मनात भीती बाळगून निसर्ग पर्यटनाला गेलो. निसर्गाचा आनंद लुटला अशी भावना पर्यटकांनी सांगितले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने केलेली सुविधा उत्तम आहे.  प्रेम कटरे, पर्यटक   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2CUzp4w
Read More
कोरोनामुळे 78 टक्के लघु, सूक्ष्म उद्योगांचे काम बंद 

पुणे - कोरोनाचा देशभरातील उद्योग आणि सामाजिक क्षेत्रावर गंभीर परिणाम होत असून, आर्थिक उदासीनता, शून्य महसूल निर्मिती यामुळे सुमारे 78 टक्के लघु, सूक्ष्म उद्योगांना (एमएसएमईंना) आपले कामकाज बंद करावे लागल्याचे डेटा विश्‍लेषक-आधारित बॅंकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी "स्पोक्‍टो'ने केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. 

स्पोक्‍टोने "द ग्राउंड ट्रुथ-व्हॉइस ऑफ इंडियन बॉरोव्हर्स' अंतर्गत मुदत कर्ज देणाऱ्या संस्थांचा आणि ग्राहकांचा अभ्यास केला. मुंबई, पुणे, नवी दिल्ली, बंगळुरू आदींसारख्या 185 शहरांमधून "स्पोक्‍टो'ने हा अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे. सुमारे 59 टक्के ग्राहकांचे कोरोनाच्या काळात उत्पन्नात नुकसान झाले आहे. तर केवळ 4 टक्के ग्राहकांच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही. सध्याच्या कामगार शक्तीतील 34 
टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. 

दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सुमारे 56 टक्के ग्राहकांनी वैयक्तिक कर्ज घेतले आहे तर गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या 23 टक्के आहे. यानंतर व्यावसायिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा (17 टक्के), कार लोन (16 टक्के), दुचाकी कर्ज (15 टक्के), इतर कर्ज (5 टक्के) यांचा क्रमांक लागतो. एकूण खातेदारांपैकी 76 टक्के लोकांनी ईएमआयमध्ये 50,000 रुपयांची लहान कर्जे घेतली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुढच्या वर्षभराचा विचार केल्यास 38 टक्के ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या कर्जाची गरज भासणार नसून, 37 टक्के ग्राहकांना मात्र लग्न, शिक्षण यांसारख्या वैयक्तिक खर्चकरिता कर्जाची आवश्‍यकता असणार आहे. 16 टक्के ग्राहकांना गृहकर्जाची आवश्‍यकता भासणार असून, स्वतःचे वाहन विकत घेण्यासाठी 9 टक्के ग्राहकांना कर्जाची गरज लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पोक्‍टो सोल्यूशन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समित श्रीवास्तव म्हणाले,""देशातील उद्योग आणि व्यावसायिकांसाठी 2020 हे वर्ष एखाद्या दु:स्वप्नासारखे आहे. बॅंकिंग आणि कर्ज देणाऱ्या इको सिस्टिमला आपली एंगेजमेंट धोरणे आणि योजना नव्याने विकसित कराव्या लागतील.'' 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनामुळे 78 टक्के लघु, सूक्ष्म उद्योगांचे काम बंद  पुणे - कोरोनाचा देशभरातील उद्योग आणि सामाजिक क्षेत्रावर गंभीर परिणाम होत असून, आर्थिक उदासीनता, शून्य महसूल निर्मिती यामुळे सुमारे 78 टक्के लघु, सूक्ष्म उद्योगांना (एमएसएमईंना) आपले कामकाज बंद करावे लागल्याचे डेटा विश्‍लेषक-आधारित बॅंकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी "स्पोक्‍टो'ने केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे.  स्पोक्‍टोने "द ग्राउंड ट्रुथ-व्हॉइस ऑफ इंडियन बॉरोव्हर्स' अंतर्गत मुदत कर्ज देणाऱ्या संस्थांचा आणि ग्राहकांचा अभ्यास केला. मुंबई, पुणे, नवी दिल्ली, बंगळुरू आदींसारख्या 185 शहरांमधून "स्पोक्‍टो'ने हा अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे. सुमारे 59 टक्के ग्राहकांचे कोरोनाच्या काळात उत्पन्नात नुकसान झाले आहे. तर केवळ 4 टक्के ग्राहकांच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही. सध्याच्या कामगार शक्तीतील 34  टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.  दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सुमारे 56 टक्के ग्राहकांनी वैयक्तिक कर्ज घेतले आहे तर गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या 23 टक्के आहे. यानंतर व्यावसायिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा (17 टक्के), कार लोन (16 टक्के), दुचाकी कर्ज (15 टक्के), इतर कर्ज (5 टक्के) यांचा क्रमांक लागतो. एकूण खातेदारांपैकी 76 टक्के लोकांनी ईएमआयमध्ये 50,000 रुपयांची लहान कर्जे घेतली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    पुढच्या वर्षभराचा विचार केल्यास 38 टक्के ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या कर्जाची गरज भासणार नसून, 37 टक्के ग्राहकांना मात्र लग्न, शिक्षण यांसारख्या वैयक्तिक खर्चकरिता कर्जाची आवश्‍यकता असणार आहे. 16 टक्के ग्राहकांना गृहकर्जाची आवश्‍यकता भासणार असून, स्वतःचे वाहन विकत घेण्यासाठी 9 टक्के ग्राहकांना कर्जाची गरज लागणार आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा स्पोक्‍टो सोल्यूशन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समित श्रीवास्तव म्हणाले,""देशातील उद्योग आणि व्यावसायिकांसाठी 2020 हे वर्ष एखाद्या दु:स्वप्नासारखे आहे. बॅंकिंग आणि कर्ज देणाऱ्या इको सिस्टिमला आपली एंगेजमेंट धोरणे आणि योजना नव्याने विकसित कराव्या लागतील.''  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BTVLTs
Read More
तब्बल 60 वर्षांनंतर इंदूरमध्ये झाली विदर्भाची स्वप्नपुर्ती, कशी वाचा 

नागपूर : घरगुती रणजी क्रिकेटमध्ये कितीही सामने जिंकले, तरीही तुमची चर्चा होत नाही. तुमच्या कामगिरीदेखील कुणी दखल घेत नाही. मात्र, तुम्ही जर "चॅम्पियन' झाला असाल, तर सारेच तुमचे गुणगाण करतात. विदर्भ रणजी संघाला तीन वर्षांपूर्वी इंदूरमध्ये असाच काहीसा अनुभव आला. "ग्रॅण्ड फायनल'मध्ये दिल्लीचा धुव्वा उडवून प्रथमच रणजी करंडक जिंकल्यानंतर विदर्भाची देशभर वाहवा व चर्चा झाली आणि येथूनच सुरू झाला विदर्भाच्या विजयाचा प्रवास. विदर्भाने त्या दिवशी केवळ रणजी करंडकच जिंकला नाही, तर रणजीपाठोपाठ सलग दोनवेळा इराणी करंडकावर नाव कोरले. 

2017-18 च्या मोसमात विदर्भाच्या यशात प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले. निर्णायक क्षणी एकतरी खेळाडू आपल्या कामगिरीने संघासाठी धावून येत होता आणि त्यांच्या सोबतीला होते कडक शिस्तीचे चंद्रकांत पंडित सर. विदर्भाच्या खेळाडूंत क्षमता होती, कौशल्य होते. मात्र, जिंकण्याचा आत्मविश्‍वास नव्हता किंवा भूक नव्हती. तो आत्मविश्‍वास, ती भूक पंडित सरांनी निर्माण केली आणि इतिहास घडला. पंजाबला त्यांच्या घरच्या मैदानावरच गारद करून विदर्भाने मोसमाची दणक्‍यात सुरुवात केली होती. मात्र, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या सामन्याने चिंता वाढवली होती. तरीही 31 गुण घेऊन विदर्भाने "ड' गटात आघाडीचे स्थान मिळविले. साखळी फेरीनंतरच विदर्भाची खरी परीक्षा होती. मात्र, सुरत येथे झालेला केरळविरुद्धचा बाद फेरीचा पहिला पेपर विदर्भाच्या फैज फजल (119), अक्षय वाडकर (53), रजनीश गुरबानी (5-38) आणि अक्षय कर्णेवार (6-41) यांनी लीलया सोडविला. 

*विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा* 
 

सर्वांत कठीण सामना 

उपांत्य फेरीत चिवट असा कर्नाटक संघ होता. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेला हा सामना बहुधा विदर्भाचा हा सर्वांत कठीण सामना होता. कर्नाटकचा शेवटचा फलंदाज सहजपणे खेळत असल्याने विदर्भाची घोडदौड उपांत्य फेरीतच आटोपणार असे वाटत होते. कर्नाटकपुढे नाममात्र 198 धावांचे आव्हान होते. रजनीश गुरबानी जिवाच्या आकांताने गोलंदाजी करीत होता. एकापाठोपाठ षटके टाकत होता. 8 बाद 141 अशी स्थिती आल्यावर विदर्भाचा विजय सोपा झाला असे चित्र होते. श्रेयस गोपाल आणि अभिमन्यू मिथुनने 48 धावांची भागीदारी करून कर्नाटकला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. येथे गुरबानीने मिथुनला टिपले (9-189). शेवटच्या एस. अरविंदसाठी जाळे टाकण्यात आले. उंचपुऱ्या अपूर्व वानखेडेला मुद्दाम पॉइंटवर उभे करण्यात आले आणि कर्णधार फैजने गुरबानीला चेंडू बाहेर टाकण्याचा इशारा केला आणि अरविंद नेमका या जाळ्यात अडकला. झेल घेतल्यावर अपूर्वने घेतलेली धाव ही उसेन बोल्टच्या शंभर मीटरपेक्षाही वेगवान होती. कारण अवघ्या पाच धावांनी विजय मिळवून विदर्भ संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता. 

हेही वाचा : निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय
 

रजनीशची हॅट्‌ट्रीक व वाडकरचे शतक 

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 29 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान खेळल्या गेलेला अंतिम सामना पाहण्यासाठी नागपुरातून व्हीसीए पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी इंदोरच्या दिशेने प्रयाण केले होते. संघ थेट कोलकाता येथून दाखल झाला. दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असला तरी त्यांची भिस्त दोन-तीन खेळाडूंवरच होती, याची जाणीव प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि कर्णधार फैजला होती. त्यानुसार त्यांनी डावपेच आखले आणि आदित्य ठाकरे या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिली. गुरबानीला थांबविणे तर अवघडच होते. पहिल्या डावात हॅट्‌ट्रीक घेताना केलेली गोलंदाजी त्याच्या क्षमतेची साक्ष देत होती. असे असताना भविष्यात त्याच्याऐवजी नवदीप सैन्नीला संधी मिळाली, हे दुर्दैव. यष्टिरक्षक अक्षय वाडकरचे शतक विदर्भाच्या विजेतेपदाच्या आनंदात आणखी भर टाकून गेले. 

हेही वाचा : प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच

आणि तो ऐतिहासिक क्षण... 

ऐतिहासिक विजयासाठी विदर्भाला केवळ 29 धावांची आवश्‍यकता होती. फैज व संजयनेच ही औपचारिकता पूर्ण करावी, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही. फैज लवकर बाद झाल्यानंतर जाफर व संजयने आवश्‍यक धावा काढून विजेतेपदाला गवसणी घातली. नववर्षाच्या आदल्याच दिवशी वैदर्भी खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना अविस्मरणीय भेट दिली. तब्बल सहा दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विदर्भाने रणजी करंडक जिंकून देशभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांसह खेळाडूंचे कुटुंबीय व असंख्य चाहते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेत. त्या दिवशी साऱ्यांनीच भावनिक विजय थाटात "सेलिब्रेट' केला. 

 

संक्षिप्त धावफलक ः दिल्ली पहिला डाव 295 (ध्रुव शोरी 145, हिम्मत सिंग 66, नितेश राणा 21, ऋषभ पंत 21, गौतम गंभीर 15, रजनीश गुरबानी 6-59, आदित्य ठाकरे 2-74), विदर्भ पहिला डाव 547 (फैज फजल 67, आर. संजय 31, वसीम जाफर 78, अपूर्व वानखेडे 28, अक्षय वाडकर 133, सिद्धेश नेरळ 74, आदित्य सरवटे 79, नवदीप सैन्नी 5-135, आकाश सुदान 2-102, के. खेजरोलिया 2-132), दिल्ली दुसरा डाव 280 (गौतम गंभीर 36, ध्रुव शोरी 62, नितेश राणा 64, ऋषभ पंत 32, विकास मिश्रा 34, अक्षय वखरे 4-95, आदित्य सरवटे 3-30, गुरबानी 2-92), विदर्भ दुसरा डाव 1 बाद 32 (फैज फजल 2, आर. संजय नाबाद 9, वसीम जाफर नाबाद 17, खेजरोलिया 1-21). 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तब्बल 60 वर्षांनंतर इंदूरमध्ये झाली विदर्भाची स्वप्नपुर्ती, कशी वाचा  नागपूर : घरगुती रणजी क्रिकेटमध्ये कितीही सामने जिंकले, तरीही तुमची चर्चा होत नाही. तुमच्या कामगिरीदेखील कुणी दखल घेत नाही. मात्र, तुम्ही जर "चॅम्पियन' झाला असाल, तर सारेच तुमचे गुणगाण करतात. विदर्भ रणजी संघाला तीन वर्षांपूर्वी इंदूरमध्ये असाच काहीसा अनुभव आला. "ग्रॅण्ड फायनल'मध्ये दिल्लीचा धुव्वा उडवून प्रथमच रणजी करंडक जिंकल्यानंतर विदर्भाची देशभर वाहवा व चर्चा झाली आणि येथूनच सुरू झाला विदर्भाच्या विजयाचा प्रवास. विदर्भाने त्या दिवशी केवळ रणजी करंडकच जिंकला नाही, तर रणजीपाठोपाठ सलग दोनवेळा इराणी करंडकावर नाव कोरले.  2017-18 च्या मोसमात विदर्भाच्या यशात प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले. निर्णायक क्षणी एकतरी खेळाडू आपल्या कामगिरीने संघासाठी धावून येत होता आणि त्यांच्या सोबतीला होते कडक शिस्तीचे चंद्रकांत पंडित सर. विदर्भाच्या खेळाडूंत क्षमता होती, कौशल्य होते. मात्र, जिंकण्याचा आत्मविश्‍वास नव्हता किंवा भूक नव्हती. तो आत्मविश्‍वास, ती भूक पंडित सरांनी निर्माण केली आणि इतिहास घडला. पंजाबला त्यांच्या घरच्या मैदानावरच गारद करून विदर्भाने मोसमाची दणक्‍यात सुरुवात केली होती. मात्र, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या सामन्याने चिंता वाढवली होती. तरीही 31 गुण घेऊन विदर्भाने "ड' गटात आघाडीचे स्थान मिळविले. साखळी फेरीनंतरच विदर्भाची खरी परीक्षा होती. मात्र, सुरत येथे झालेला केरळविरुद्धचा बाद फेरीचा पहिला पेपर विदर्भाच्या फैज फजल (119), अक्षय वाडकर (53), रजनीश गुरबानी (5-38) आणि अक्षय कर्णेवार (6-41) यांनी लीलया सोडविला.  *विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा*    सर्वांत कठीण सामना  उपांत्य फेरीत चिवट असा कर्नाटक संघ होता. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेला हा सामना बहुधा विदर्भाचा हा सर्वांत कठीण सामना होता. कर्नाटकचा शेवटचा फलंदाज सहजपणे खेळत असल्याने विदर्भाची घोडदौड उपांत्य फेरीतच आटोपणार असे वाटत होते. कर्नाटकपुढे नाममात्र 198 धावांचे आव्हान होते. रजनीश गुरबानी जिवाच्या आकांताने गोलंदाजी करीत होता. एकापाठोपाठ षटके टाकत होता. 8 बाद 141 अशी स्थिती आल्यावर विदर्भाचा विजय सोपा झाला असे चित्र होते. श्रेयस गोपाल आणि अभिमन्यू मिथुनने 48 धावांची भागीदारी करून कर्नाटकला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. येथे गुरबानीने मिथुनला टिपले (9-189). शेवटच्या एस. अरविंदसाठी जाळे टाकण्यात आले. उंचपुऱ्या अपूर्व वानखेडेला मुद्दाम पॉइंटवर उभे करण्यात आले आणि कर्णधार फैजने गुरबानीला चेंडू बाहेर टाकण्याचा इशारा केला आणि अरविंद नेमका या जाळ्यात अडकला. झेल घेतल्यावर अपूर्वने घेतलेली धाव ही उसेन बोल्टच्या शंभर मीटरपेक्षाही वेगवान होती. कारण अवघ्या पाच धावांनी विजय मिळवून विदर्भ संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता.  हेही वाचा : निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय   रजनीशची हॅट्‌ट्रीक व वाडकरचे शतक  इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 29 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान खेळल्या गेलेला अंतिम सामना पाहण्यासाठी नागपुरातून व्हीसीए पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी इंदोरच्या दिशेने प्रयाण केले होते. संघ थेट कोलकाता येथून दाखल झाला. दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असला तरी त्यांची भिस्त दोन-तीन खेळाडूंवरच होती, याची जाणीव प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि कर्णधार फैजला होती. त्यानुसार त्यांनी डावपेच आखले आणि आदित्य ठाकरे या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिली. गुरबानीला थांबविणे तर अवघडच होते. पहिल्या डावात हॅट्‌ट्रीक घेताना केलेली गोलंदाजी त्याच्या क्षमतेची साक्ष देत होती. असे असताना भविष्यात त्याच्याऐवजी नवदीप सैन्नीला संधी मिळाली, हे दुर्दैव. यष्टिरक्षक अक्षय वाडकरचे शतक विदर्भाच्या विजेतेपदाच्या आनंदात आणखी भर टाकून गेले.  हेही वाचा : प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच आणि तो ऐतिहासिक क्षण...  ऐतिहासिक विजयासाठी विदर्भाला केवळ 29 धावांची आवश्‍यकता होती. फैज व संजयनेच ही औपचारिकता पूर्ण करावी, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही. फैज लवकर बाद झाल्यानंतर जाफर व संजयने आवश्‍यक धावा काढून विजेतेपदाला गवसणी घातली. नववर्षाच्या आदल्याच दिवशी वैदर्भी खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना अविस्मरणीय भेट दिली. तब्बल सहा दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विदर्भाने रणजी करंडक जिंकून देशभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांसह खेळाडूंचे कुटुंबीय व असंख्य चाहते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेत. त्या दिवशी साऱ्यांनीच भावनिक विजय थाटात "सेलिब्रेट' केला.    संक्षिप्त धावफलक ः दिल्ली पहिला डाव 295 (ध्रुव शोरी 145, हिम्मत सिंग 66, नितेश राणा 21, ऋषभ पंत 21, गौतम गंभीर 15, रजनीश गुरबानी 6-59, आदित्य ठाकरे 2-74), विदर्भ पहिला डाव 547 (फैज फजल 67, आर. संजय 31, वसीम जाफर 78, अपूर्व वानखेडे 28, अक्षय वाडकर 133, सिद्धेश नेरळ 74, आदित्य सरवटे 79, नवदीप सैन्नी 5-135, आकाश सुदान 2-102, के. खेजरोलिया 2-132), दिल्ली दुसरा डाव 280 (गौतम गंभीर 36, ध्रुव शोरी 62, नितेश राणा 64, ऋषभ पंत 32, विकास मिश्रा 34, अक्षय वखरे 4-95, आदित्य सरवटे 3-30, गुरबानी 2-92), विदर्भ दुसरा डाव 1 बाद 32 (फैज फजल 2, आर. संजय नाबाद 9, वसीम जाफर नाबाद 17, खेजरोलिया 1-21).    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ikUeWZ
Read More
जीएसटी वसुलीमध्ये वाढ झाल्याने सरकारला दिलासा 

नवी दिल्ली - लॉकडाउननंतर अर्थव्यवस्थेचा गाडा हळुहळू रुळावर येऊ लागला असून मागील महिन्यात ९०,९१७ कोटी रुपये ‘जीएसटी’ची (वस्तू आणि सेवा कर) वसुली झाली आहे. एप्रिल आणि मे मधील कोलमडलेला महसूल पाहता जूनच्या आकडेवारीने सरकारला हायसे वाटले आहे. 

कोविड १९ संकट आणि लॉकडाउनमुळे महसूल लक्षणीय प्रमाणात घटला आहे. लॉकडाउनच्या अंमलबजावणीमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने एप्रिलमध्ये फक्त ३२,२९४ कोटी रुपये जीएसटी वसुल झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची वसुली फक्त २८ टक्के होती. मे मध्ये काही प्रमाणात वसुलीत वाढ होऊन रक्कम ६२,००९ कोटी रुपये झाली. हे प्रमाण मागील वर्षाच्या जीएसटी वसुलीच्या तुलनेत ६२ टक्के होते. आता जीएसटी विवरणपत्र भरण्यात आणि कर भरण्यात सूट दिली त्यानंतर जूनमध्ये बऱ्यापैकी कर वसुली वाढली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के आहे. मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीएसटी वसुलीचे प्रमाण ५९ टक्के असले तरी मे महिन्याचा जीएसटी भरण्यासाठी वाढीव मुदत दिल्याने एकत्रित वसुली आणखी वाढण्याची सरकारला अपेक्षा आहे. सरकारने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे जीएसटी विवरणपत्र जून महिन्यात सादर करण्यास परवानगी दिली होती. तर मे चीही काही विवरणपत्रे जुलैमध्ये भरण्यास संमती देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

जूनमध्ये झालेल्या ९०,१९७ कोटी जीएसटी वसुलीत रकमेत केंद्रीय जीएसटीचा (सीजीएसटी) वाटा १८,९८० कोटी रुपयांचा तर राज्य जीएसटीचा (एसजीएसटी) वाटा २३,९७० कोटी रुपयांचा आहे. त्यासोबतच आयजीएसटी म्हणजे एकत्रित जीएसटीचा हिस्सा यामध्ये ४०,३०२ कोटी रुपयांचा आहे. यात १५,७०९ कोटी रुपये आयात वस्तूंवरील करातून वसुल करण्यात आले. दरम्यान, सरकारला उपकरापोटी ७,६६५ कोटी रुपये मिळाले आहेत. सरकारने सीजीएसटीचे १३,३२५ कोटीचे तर एसजीएसटी आणि आयजीएसटीचे ११,११७ कोटी रुपयांचे दावे निकाली काढले आहेत. त्यामुळे सर्व दावे निकाली काढल्यानंतर केंद्र आणि राज्यांना जून २०२० मध्ये सीजीएसटीपोटी ३२,३०५ कोटी आणि एसजीएसटीपोटी ३५,०८७ कोटी रुपये मिळाले. यात आयातीवरील करवसुलीपोटी ७१ टक्के तर देशांतर्गत व्यवहारांपोटीची करवसुली ९७ टक्के आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जीएसटी वसुली- 
एप्रिल २०१९-२० मध्ये - १,१३८६६ कोटी 
एप्रिल २०२०-२१ मध्ये - ३२२९४ कोटी 

मे २०१९-२० मध्ये - १,००२८९ कोटी 
मे २०२०-२१ मध्ये - ६२००९ कोटी 

जून २०१९-२० मध्ये - ९९९४० कोटी 
जून २०२०-२१ मध्ये - ९०९१७ कोटी 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जीएसटी वसुलीमध्ये वाढ झाल्याने सरकारला दिलासा  नवी दिल्ली - लॉकडाउननंतर अर्थव्यवस्थेचा गाडा हळुहळू रुळावर येऊ लागला असून मागील महिन्यात ९०,९१७ कोटी रुपये ‘जीएसटी’ची (वस्तू आणि सेवा कर) वसुली झाली आहे. एप्रिल आणि मे मधील कोलमडलेला महसूल पाहता जूनच्या आकडेवारीने सरकारला हायसे वाटले आहे.  कोविड १९ संकट आणि लॉकडाउनमुळे महसूल लक्षणीय प्रमाणात घटला आहे. लॉकडाउनच्या अंमलबजावणीमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने एप्रिलमध्ये फक्त ३२,२९४ कोटी रुपये जीएसटी वसुल झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची वसुली फक्त २८ टक्के होती. मे मध्ये काही प्रमाणात वसुलीत वाढ होऊन रक्कम ६२,००९ कोटी रुपये झाली. हे प्रमाण मागील वर्षाच्या जीएसटी वसुलीच्या तुलनेत ६२ टक्के होते. आता जीएसटी विवरणपत्र भरण्यात आणि कर भरण्यात सूट दिली त्यानंतर जूनमध्ये बऱ्यापैकी कर वसुली वाढली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के आहे. मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीएसटी वसुलीचे प्रमाण ५९ टक्के असले तरी मे महिन्याचा जीएसटी भरण्यासाठी वाढीव मुदत दिल्याने एकत्रित वसुली आणखी वाढण्याची सरकारला अपेक्षा आहे. सरकारने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे जीएसटी विवरणपत्र जून महिन्यात सादर करण्यास परवानगी दिली होती. तर मे चीही काही विवरणपत्रे जुलैमध्ये भरण्यास संमती देण्यात आली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    जूनमध्ये झालेल्या ९०,१९७ कोटी जीएसटी वसुलीत रकमेत केंद्रीय जीएसटीचा (सीजीएसटी) वाटा १८,९८० कोटी रुपयांचा तर राज्य जीएसटीचा (एसजीएसटी) वाटा २३,९७० कोटी रुपयांचा आहे. त्यासोबतच आयजीएसटी म्हणजे एकत्रित जीएसटीचा हिस्सा यामध्ये ४०,३०२ कोटी रुपयांचा आहे. यात १५,७०९ कोटी रुपये आयात वस्तूंवरील करातून वसुल करण्यात आले. दरम्यान, सरकारला उपकरापोटी ७,६६५ कोटी रुपये मिळाले आहेत. सरकारने सीजीएसटीचे १३,३२५ कोटीचे तर एसजीएसटी आणि आयजीएसटीचे ११,११७ कोटी रुपयांचे दावे निकाली काढले आहेत. त्यामुळे सर्व दावे निकाली काढल्यानंतर केंद्र आणि राज्यांना जून २०२० मध्ये सीजीएसटीपोटी ३२,३०५ कोटी आणि एसजीएसटीपोटी ३५,०८७ कोटी रुपये मिळाले. यात आयातीवरील करवसुलीपोटी ७१ टक्के तर देशांतर्गत व्यवहारांपोटीची करवसुली ९७ टक्के आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जीएसटी वसुली-  एप्रिल २०१९-२० मध्ये - १,१३८६६ कोटी  एप्रिल २०२०-२१ मध्ये - ३२२९४ कोटी  मे २०१९-२० मध्ये - १,००२८९ कोटी  मे २०२०-२१ मध्ये - ६२००९ कोटी  जून २०१९-२० मध्ये - ९९९४० कोटी  जून २०२०-२१ मध्ये - ९०९१७ कोटी    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NMGPZV
Read More

Tuesday, June 30, 2020

जिल्ह्यात विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता घ्या

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील तिन्ही मंत्र्यांसह प्रशासन विशेषत: पोलिस, आरोग्य, महसूल या सर्वांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले. नियोजनामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला आहे. यापुढेही असेच चांगले काम करा, जिल्ह्यामध्ये विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता यापुढील काळात घ्या, अशा सूचना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी आज दिल्या. 

शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात देसाई यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते. 

मित्तल यांनी कोविडबाबत सद्यःस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकारी देसाई यांनी या 18 प्रवेश नाक्‍यांवरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी अहवालाबाबतही त्यांनी माहिती दिली. डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि कोरोनातील कामकाजाबाबत सादरीकरण केले. 

मंत्री देसाई म्हणाले, ""पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोरोना रोखण्यासाठी प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनाने युनिक पॅटर्न राबवून कोरोनाचा संसर्ग रोखला आहे. "चोवीस बाय सात' फिल्डवर राहून परिस्थिती हाताळली. पोलिस, महसूल, आरोग्य यांच्यावर अधिक जबाबदारी होती. या सर्वांचे आभार मानून देसाई यांनी सांगली जिल्ह्यातही पालकमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह प्रशासनाने चांगले काम केले आहे, असे सांगितले. 

अधिक काम करून महसूल वाढवा
पणन, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर विभाग यांनीही अधिक काम करून महसूल वाढवावा. लोकाभिमुख आणि स्वच्छ प्रशासन राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. यापुढेही आपण सर्व चांगले काम कराल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जिल्ह्यात विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता घ्या कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील तिन्ही मंत्र्यांसह प्रशासन विशेषत: पोलिस, आरोग्य, महसूल या सर्वांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले. नियोजनामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला आहे. यापुढेही असेच चांगले काम करा, जिल्ह्यामध्ये विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता यापुढील काळात घ्या, अशा सूचना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी आज दिल्या.  शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात देसाई यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.  मित्तल यांनी कोविडबाबत सद्यःस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकारी देसाई यांनी या 18 प्रवेश नाक्‍यांवरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी अहवालाबाबतही त्यांनी माहिती दिली. डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि कोरोनातील कामकाजाबाबत सादरीकरण केले.  मंत्री देसाई म्हणाले, ""पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोरोना रोखण्यासाठी प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनाने युनिक पॅटर्न राबवून कोरोनाचा संसर्ग रोखला आहे. "चोवीस बाय सात' फिल्डवर राहून परिस्थिती हाताळली. पोलिस, महसूल, आरोग्य यांच्यावर अधिक जबाबदारी होती. या सर्वांचे आभार मानून देसाई यांनी सांगली जिल्ह्यातही पालकमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह प्रशासनाने चांगले काम केले आहे, असे सांगितले.  अधिक काम करून महसूल वाढवा पणन, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर विभाग यांनीही अधिक काम करून महसूल वाढवावा. लोकाभिमुख आणि स्वच्छ प्रशासन राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. यापुढेही आपण सर्व चांगले काम कराल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31yyIsa
Read More