चीन का दावा, LAC के चीनी हिस्से में है गलवान घाटी, भारतीय सैनिकों ने किया सीमा पार https://ift.tt/3hDCIgm Latest news updates June 19, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
पर्यटकांसाठी ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ पुणे - लॉकडाउन संपल्यानंतर रिसॉर्ट खुली होताच, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी रिसॉर्टवर ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना खास मागणीनुसार ऑरगॅनिक फूड, तज्ज्ञांकडून पंचकर्म, आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाउनमुळे अनेक नागरिक घरात अडकून पडले आहेत. कोरोनामुळे परदेशांमधील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाउन संपताच भारतातील पर्यटक बाहेरच्या देशात पर्यटनासाठी जाण्याची शक्यता कमीच आहे. पेपरवाल्या काकांना 'त्यांनी' दिला असा मदतीचा हात अशा परिस्थितीत पर्यटकांना महामंडळाच्या माध्यमातून राज्य- देशांतर्गत पर्यटनाच्या चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना आणि आखणी करण्यात येत आहे. त्यानुसार महाबळेश्वर, माळशेज, लोणावळा यासह निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या महामंडळाच्या २३ रिसॉर्टमध्ये ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना नैसर्गिक खाद्यपदार्थही उपलब्ध करून देण्यात येतील. पालकांनो, मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्या, कारण... पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपाहारगृहांची संख्या वाढवणे, फूड पॅकेजेस, कॉन्फरन्स, ग्रुप टूर्सचे आयोजन करून पर्यटकांना उत्तम सेवा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कमीत कमी खर्चात उत्तम दर्जाच्या सेवा देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून देण्यात आली. महामंडळाचे कर्मचारी या कठीण काळातही परिसर आणि खोल्या स्वच्छ ठेवत आहेत. पर्यटक निवासांची किरकोळ दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यात येणार असून, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर स्प्रेची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 19, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2YSG9Hn Read More Read more No comments:
‘शिवसैनिकाला पंतप्रधान झालेलं पहायचंय!’ मुंबई - विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, संस्कृती आहे. ‘प्राण जाय पर वचन ना जाये ही आपली संस्कृती आहे’, पण आपल्यासोबत राजकरण करण्याचा प्रयत्न झाला. ते मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री झालो. शिवसैनिक सोबत असेपर्यंत मला कुणाचीही भीती नाही. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. शिवसैनिक प्रत्येक संकटात धावून जात आहेत. चक्रीवादळ, कोरोनाच्या संकट काळी शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा आहे. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने झाल्या आहेत. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जिवाची पर्वा न करता शिवसैनिक झटत असून शिवसैनिक कधीही संकटाला डगमगला नाही. शिवसेना हेच वादळ आहे, त्यामुळे आम्हाला इतर वादळांची पर्वा नाही, असेही त्यांनी सांगितले. मोठी बातमी - अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय अखेर उत्तीर्ण... या वेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक सादही घातली. शिवसैनिक हे माझ्याभोवतीचे कवच आहे, असे ते म्हणाले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 19, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3hKqlPS Read More Read more No comments:
Video : कागदकामाची विलक्षण कला कागदापासून वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांची मॉडेल्स तयार करण्याचं माधव सहस्रबुद्धे यांचं कौशल्य थक्क करणारं आहे. कागदाच्या चरख्यावर ते सूतकताई करू शकतात. नक्षीदार जाळी, थ्रीडी ग्रीटिंग कार्ड, गरगर फिरणाऱ्या कागदी ब्लॉक्सची गंमत अशा कितीतरी गोष्टी करण्याचा त्यांना छंद आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विविध प्रकारच्या यंत्रांची मॉडेल्स चक्क कागदापासून तयार करण्याचा छंद पुण्यातील माधव सहस्रबुद्धे यांनी जोपासला आहे. ते म्हणाले, ‘‘मी मॅकेनिकल इंजिनिअर असून, निवृत्तीनंतर कागदाच्या तऱ्हेतऱ्हेच्या कलाकृती बनवण्याचा छंद मला आनंद देणारा ठरला आहे. कागदापासून यंत्रांची दहा- बारा मॉडेल्स बनवली आहेत. ती चालवता येतात. त्या-त्या यंत्रात कोणकोणते घटक आहेत, ते कशा पद्धतीने काम करतात, हे या मॉडेल्सवरून शालेय विद्यार्थ्यांना समजावून घेता येतं. या जपानी कलेला ‘काराकुरी’ या नावाने ओळखतात. ‘किरिगामी’ या आगळ्यावेगळ्या कलापद्धतीत कागदाला घड्या पाडून, विशिष्ट जागी कापून त्रिमिती (थ्रीडी) रचना करता येतात. यानुसार मी अनेक पॉपअप भेटकार्डे तयार केली आहेत. त्यांत उंच इमारतीच्या खिडक्या, पायऱ्या वगैरे पाहायला मौज वाटते. मूव्हिंग ब्लॉक्स या प्रकारात कागदाचे ठोकळे सेलो टेपने जोडायचे असतात. ते फिरवल्यावर मजेशीर आकृतिबंध पाहायला मिळतात.’’ सहस्रबुद्धे यांनी असंही सांगितलं की, बारीक तुकडे जुळवित मी जाळीदार रचना तयार केल्या आहेत. वरवर पाहता जाळी दिसत असली तरी तिच्यातील अंतर्गत सौंदर्यपूर्ण रचना असते. या कलाप्रकारातून उत्कृष्ट चित्रकृती साकारता येतात. त्या फ्रेम करून लावता येतात किंवा पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लावल्यावरही छान दिसतात. लाकडी चरख्यावर सूतकताई करण्याची मला आवड आहेच, पण मी कागदापासून एक चरखा तयार केला आहे. त्यावर सूतकताई करता येते. स्वतःच्या हाताचं कौशल्य वाढवणं आणि ते कायम वाढवत राहाणं, हे व्हायला हवं. पुढे जाण्याची ऊर्मी तेवत ठेवण्यासाठी अशा कला व कारागिरी फारच उपयोगी पडतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 19, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2NfAp56 Read More Read more No comments:
44 वर्षांपूर्वी व्हीसीएवर रंगला होता "तेलंग शो' नागपूर : घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले विदर्भाचे विजय तेलंग यांची फटकेबाजी प्रत्यक्ष मैदानावर बघताना कमालीचा आनंद मिळायचा. क्रिकेटप्रेमींसाठी ती एकप्रकारे मेजवानी असत. तेलंग यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आक्रमक डाव खेळून विदर्भाला विजय मिळवून दिलेत. परंतु, 44 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर उत्तर प्रदेशविरुद्ध ठोकलेली "सेंच्युरी' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. सध्या हयात नसलेले तेलंग यांनी दुसऱ्या डावात 117 धावा फटकावून उत्तर प्रदेशच्या आशेवर पाणी फेरले. पहिल्या डावात 177 धावांनी मागे पडूनही विदर्भाने त्या लढतीत सर्वाधिक गुणांची कमाई केली होती, हे उल्लेखनीय. 1976 मध्ये 18 ते 20 डिसेंबरदरम्यान व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स मैदानावरील तो तीनदिवसीय रणजी सामना खऱ्या अर्थाने "तेलंग शो' म्हणून क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहिला. त्या सामन्यात विदर्भाचे नेतृत्व इम्रान अलींनी केले होते, तर उत्तर प्रदेशची धुरा महंमद शाहिद यांच्याकडे होती. नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विदर्भाचा डाव चहापानापूर्वीच 158 धावांत गडगडला. शुक्ला (पाच बळी) यांच्या अचूक माऱ्यापुढे सलामीवीर तेलंग (63 धावा) व प्रकाश सहस्रबुद्धे (नाबाद 30 धावा) यांचा अपवाद वगळता विदर्भाचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही. प्रत्युत्तरात सलामीवीर विजय चोप्रांच्या (121 धावा) शतकी तडाख्याच्या जोरावर उत्तर प्रदेशने 335 धावा काढून पहिल्या डावात 177 धावांची भक्कम आघाडी घेतली. मार्कंड यांचे पाच बळीही उत्तर प्रदेशच्या धावगतीवर नियंत्रण ठेवू शकले नाही. हेही वाचा : भिलाईमध्ये 55 वर्षांपूर्वी ठरला होता विदर्भ शेरास सव्वाशेर पहिल्या डावात पावणेदोनशे धावांनी मागे पडल्यानंतर विदर्भावर घरच्याच मैदानावर डावाने पराभवाचे सावट पसरले होते. त्यामुळे विदर्भाच्या "ड्रेसिंग रूम'मध्ये काहीशी निराशा पसरली होती. परंतु, तेलंग यांनी संघावर नामुष्कीची वेळ येऊ दिली नाही. त्यांनी "वनडे स्टाइल' जोरदार फटकेबाजी करीत 117 धावा ठोकून डावाने पराभवाचे संकट दूर केले. विदर्भाला 291 धावांपर्यंत पोहोचविण्यात नजबिले यांच्याही 68 धावा मोलाच्या ठरल्या. शुक्ला यांनी दुसऱ्याही डावात सर्वाधिक सहा बळी टिपले. हेही वाचा : अमरावतीकरांनी 40 वर्षांपूर्वी केली होती रणजी सामन्याला तुफान गर्दी उत्तर प्रदेशचा विजय थोडक्यात हुकला उत्तर प्रदेशला निर्णायक विजयासाठी 16 षटकांत 115 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रतिषटक सात धावांचे विजयी लक्ष्य त्या काळात जरा कठीणच होते. तरीही अधिक गुणांच्या लोभापायी उत्तर प्रदेशने ती "रिस्क' घेतली. त्यात त्यांना बऱ्याच प्रमाणात यशही मिळाले. दुर्दैवाने षटके संपल्याने उत्तर प्रदेशचा विजय अवघ्या 17 धावांनी हुकला. अब्दुल हाई यांनी नाबाद 40 व अष्टपैलू शुक्ला यांनी 35 धावा काढून वैदर्भी खेळाडूंच्या तोंडचे पाणी पळविले होते. सामना अनिर्णीत सुटला तेव्हा उत्तर प्रदेशची दुसऱ्या डावात 5 बाद 98 अशी धावसंख्या होती. पहिल्या दिवसापासून सामन्यावर वर्चस्व गाजवूनही उत्तर प्रदेशला केवळ तीन गुणांवर समाधान मानावे लागले. विदर्भाच्या पारड्यात सर्वाधिक पाच गुण पडले. सामन्याचे साक्षीदार ठरलेले विदर्भाचे सुहास फडकर यांनीही त्या लढतीला त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक संबोधले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 19, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3hJMbCX Read More Read more No comments:
मोठी बातमी : भारताची विमानं देणार चीनला प्रत्युत्तर नवी दिल्ली - चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताच्या लष्कराने लडाखच्या लेहभागावर विशेष लक्ष केंद्रित केले असून आज दिवसभर येथील आकाशामध्ये लढाऊ विमानांच्या घिरट्या पाहायला मिळाल्या. हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल आर.के.एस.भदौरिया यांनी बुधवारी रात्री लेह येथील हवाईतळाचा दौरा करत पाहणी केली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘सुखोई-३०’ एमकेआय, ‘मिराज-२०००’ आणि जग्वार ही लढाऊ विमाने येथील हवाईतळांवर सज्ज ठेवण्यात आली असून ती कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. पूर्व लडाखमध्ये भारताच्या लष्करास हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरची साथ असेल. लेहमधील हवाईतळांवर चिनूक हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली असून खोऱ्यातील मालाची वाहतूक आणि जवानांच्या तैनातीसाठी त्यांचा वापर शक्य होईल. ‘एमआय-१७ व्ही ५’ ही मध्यम स्वरूपाचे वजनी सामान वाहून नेण्याची क्षमता असणारे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. बरेलीतील हवाईतळावर लष्करी हालचालींना वेग आला असून श्रीनगर, अम्बाला, आदमपूर, हलवाडामध्येही वायूदलाने विमाने तैनात ठेवली आहेत. इंच इंच लढू; पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही, चीनला इशारा दहा जवानांना सोडले? गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षात भारताच्या दहा जवानांना चीनने ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली होती. मात्र आपला एकही सैनिक बेपत्ता नाही, असेच भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनीही, कोणत्याही भारतीय जवानाला चिनी सैन्याने ताब्यात घेतले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच, तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये संवादप्रक्रिया सुरू असल्याचे चिनी प्रवक्त्याचे म्हणणे असले, तरी आज दोन्ही देशांची लष्करी अथवा राजनैतिक पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे कळते. चीनने मुक्त केलेल्या १० जवानांमध्ये दोन मेजर पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. काल त्यांची मुक्तता करण्यात आल्याची माहिती समोर आली. दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल पातळीवर झालेल्या चर्चेनंतर या दहा जवानांना सोडण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी सरकारी पातळीवरून या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मशिदीत लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates June 19, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3ehvJb3 Read More Read more No comments:
लखनऊ: केमिकल फैक्ट्री में धमाका, एक मजदूर की मौत दो घायल https://ift.tt/37HJSvC Latest news updates June 19, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
चीन विवाद: PM की सर्वदलीय बैठक आज, जानें कौन होगा शामिल, किसे न्योता नहीं https://ift.tt/2AGWdEp Latest news updates June 18, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
आज देश के 8 राज्यों की 19 राज्यसभा सीटों पर चुनाव, दांव पर कई दिग्गजों की साख https://ift.tt/3deO0nZ Latest news updates June 18, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
Horoscope Today, 19 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2YMAZwB Latest news updates June 18, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
LAC पर चीन को मिलेगा उसी की भाषा में जवाब, सेना ने बदले नियम https://ift.tt/30XyFFF Latest news updates June 18, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
क्या शरद केलकर होंगे कसौटी के नए मिस्टर बजाज? एक्टर ने दिया जवाब https://ift.tt/3dgAmk2 Latest news updates June 18, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
आर्थिक राशिफल: जानें आज किसे मिलेगी खुशखबरी और किसे होगा नुकसान https://ift.tt/2Cdf6Pp Latest news updates June 18, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments: