Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, June 18, 2020

ब्रिटेन में एक नाबालिग पर इस्लामी आतंकी हमले की साजिश का आरोप https://ift.tt/3hBftUl
भिलाईमध्ये 55 वर्षांपूर्वी ठरला होता विदर्भ शेरास सव्वाशेर

नागपूर : 1965 मध्ये भारत-चीन युद्धाचे वारे वाहत असतानाच घरगुती क्रिकेट मात्र ऐन भरात होते. त्यात विदर्भ रणजी संघाने भिलाईत रंगलेल्या सामन्यात यजमान मध्य प्रदेशवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. "लो स्कोअरिंग' लढतीत इम्रान अलींनी सर्वाधिक धावा व सिद्दीकी यांनी आठ गडी बाद करून विदर्भाच्या विजयात निर्णायक योगदान दिले होते. 

तीनदिवसीय सामन्यात विदर्भ संघात कर्णधार एस. ए. रहिम, ए. एम. बघे, विजय पिंप्रीकर, अरुण ओगिराल, के. वाय. प्रधान, पी. एन. खोत, आर. एन. अभ्यंकर, एस. के. पेंढारकर, इम्रान अली, एम. सिद्दीकी, पी. एस. साठेंसारखे दिग्गज क्रिकेटपटू होते. तर, चंदू सरवटे यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळेंचे बंधू अशोक जगदाळे, एम. के. जोशी, आर. भाटिया, व्ही. एन. पेंढारकर, बी. जी. खेर, एस. भगवानदास, सुरिंदरसिंग, जे. शाह, उदयसिंग व जे. खट्‌टरसारखे मोठे नाव होते. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना रंगतदार होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु, विदर्भाच्या फलंदाज व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून सामन्याचा निकाल एकतर्फी आपल्या बाजूने लावला. 

हेही वाचा  : अमरावतीकरांनी 40 वर्षांपूर्वी केली होती रणजी सामन्याला तुफान गर्दी
 

"मॅटिन विकेट'वर विदर्भाचा पहिला डाव अवघ्या 142 धावांमध्येच आटोपला. जगदाळे-खट्‌टर या मध्यमगती जोडीने सात गडी बाद करून विदर्भाची चांगलीच दाणादाण उडविली. ओगिराल यांच्या 39 धावा व अभ्यंकर यांच्या 25 धावा विदर्भाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले होते. विदर्भाच्या गोलंदाजांनीही मध्य प्रदेशचा डाव 134 धावांत गुंडाळून आठ धावांची निसटती आघाडी घेतली. फिरकीपटू सिद्दीकी यांनी सर्वाधिक चार विकेट्‌स घेऊन विदर्भाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावातील चुकांपासून धडा घेत विदर्भाने दुसऱ्या डावात 220 धावा काढून सामन्याला निर्णायक कलाटणी दिली. आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या इम्रान अलींनी "टेलेंडर्स'च्या मदतीने किल्ला लढवत संघाला दोनशेपार नेले. अली यांची नाबाद 83 धावांची जिगरबाज खेळी सामन्याचा खऱ्या अर्थाने "टर्निंग पॉइंट' ठरली. सिद्दीकी यांचेही 26 धावांचे योगदान बहुमूल्य ठरले. 

 

विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर
 

सिद्दीकी ठरले विजयाचे शिलेदार 

शेवटच्या दिवशी विदर्भाने विजयासाठी मध्य प्रदेशसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले होते. खेळपट्‌टीचे स्वरूप लक्षात घेता विदर्भाचा विजय आणि मध्य प्रदेशचा पराभव निश्‍चित होता. विदर्भ किती वेळात विजयाची औपचारिकता पूर्ण करतो, याचीच क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती. विदर्भाच्या गोलंदाजांनी 53 षटकांतच मध्य प्रदेशचा दुसरा डाव 128 धावांत गुंडाळून 100 धावांनी दणदणीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. विजयाचे शिल्पकार सिद्दीकी यांनी पुन्हा चार गडी बाद करून विदर्भाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सांघिक कामगिरीचा तो विजय वैदर्भी क्रिकेटपटूंसाठी सर्वार्थाने आनंद व समाधान देणारा होता. 
 

 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भिलाईमध्ये 55 वर्षांपूर्वी ठरला होता विदर्भ शेरास सव्वाशेर नागपूर : 1965 मध्ये भारत-चीन युद्धाचे वारे वाहत असतानाच घरगुती क्रिकेट मात्र ऐन भरात होते. त्यात विदर्भ रणजी संघाने भिलाईत रंगलेल्या सामन्यात यजमान मध्य प्रदेशवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. "लो स्कोअरिंग' लढतीत इम्रान अलींनी सर्वाधिक धावा व सिद्दीकी यांनी आठ गडी बाद करून विदर्भाच्या विजयात निर्णायक योगदान दिले होते.  तीनदिवसीय सामन्यात विदर्भ संघात कर्णधार एस. ए. रहिम, ए. एम. बघे, विजय पिंप्रीकर, अरुण ओगिराल, के. वाय. प्रधान, पी. एन. खोत, आर. एन. अभ्यंकर, एस. के. पेंढारकर, इम्रान अली, एम. सिद्दीकी, पी. एस. साठेंसारखे दिग्गज क्रिकेटपटू होते. तर, चंदू सरवटे यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळेंचे बंधू अशोक जगदाळे, एम. के. जोशी, आर. भाटिया, व्ही. एन. पेंढारकर, बी. जी. खेर, एस. भगवानदास, सुरिंदरसिंग, जे. शाह, उदयसिंग व जे. खट्‌टरसारखे मोठे नाव होते. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना रंगतदार होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु, विदर्भाच्या फलंदाज व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून सामन्याचा निकाल एकतर्फी आपल्या बाजूने लावला.  हेही वाचा  : अमरावतीकरांनी 40 वर्षांपूर्वी केली होती रणजी सामन्याला तुफान गर्दी   "मॅटिन विकेट'वर विदर्भाचा पहिला डाव अवघ्या 142 धावांमध्येच आटोपला. जगदाळे-खट्‌टर या मध्यमगती जोडीने सात गडी बाद करून विदर्भाची चांगलीच दाणादाण उडविली. ओगिराल यांच्या 39 धावा व अभ्यंकर यांच्या 25 धावा विदर्भाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले होते. विदर्भाच्या गोलंदाजांनीही मध्य प्रदेशचा डाव 134 धावांत गुंडाळून आठ धावांची निसटती आघाडी घेतली. फिरकीपटू सिद्दीकी यांनी सर्वाधिक चार विकेट्‌स घेऊन विदर्भाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावातील चुकांपासून धडा घेत विदर्भाने दुसऱ्या डावात 220 धावा काढून सामन्याला निर्णायक कलाटणी दिली. आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या इम्रान अलींनी "टेलेंडर्स'च्या मदतीने किल्ला लढवत संघाला दोनशेपार नेले. अली यांची नाबाद 83 धावांची जिगरबाज खेळी सामन्याचा खऱ्या अर्थाने "टर्निंग पॉइंट' ठरली. सिद्दीकी यांचेही 26 धावांचे योगदान बहुमूल्य ठरले.    विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर   सिद्दीकी ठरले विजयाचे शिलेदार  शेवटच्या दिवशी विदर्भाने विजयासाठी मध्य प्रदेशसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले होते. खेळपट्‌टीचे स्वरूप लक्षात घेता विदर्भाचा विजय आणि मध्य प्रदेशचा पराभव निश्‍चित होता. विदर्भ किती वेळात विजयाची औपचारिकता पूर्ण करतो, याचीच क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती. विदर्भाच्या गोलंदाजांनी 53 षटकांतच मध्य प्रदेशचा दुसरा डाव 128 धावांत गुंडाळून 100 धावांनी दणदणीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. विजयाचे शिल्पकार सिद्दीकी यांनी पुन्हा चार गडी बाद करून विदर्भाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सांघिक कामगिरीचा तो विजय वैदर्भी क्रिकेटपटूंसाठी सर्वार्थाने आनंद व समाधान देणारा होता.        News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eaufzb
Read More
लॉकडाउनमध्ये ३५ कोटींची शेतमाल तारण कर्जे वितरित

पुणे - कोरोना टाळेबंदीत बाजार समित्या बंदबरोबरच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानंतर शेतमालाचे दर घसरले होते. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांचा कल शेतमाल तारण योजनेकडे वाढला. गेल्या तीन महिन्यांत ९३ बाजार समित्यांद्वारे सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांनी दीड लाख क्विंटल शेतमाल तारण ठेवून ३५ कोटींची कर्जे घेतली आहेत, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्‍ट्र राज्य कृषी पणन मंडळ हे शेतमाल तारण योजना राबविणारे देशातील एकमेव पणन मंडळ असून, याची दखल घेत केंद्र पातळीवर संपूर्ण देशात तारण योजना राबविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

- काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार

पवार म्हणाले, ‘‘कोरोना टाळेबंदीत बाजार समित्या बंद होत्या. देशांतर्गत वाहतूकही ठप्प होती. त्यामुळे शेतमालाची खरेदी विक्री थांबली होती. या परिस्थितीत काढणी झालेला शेतमाल कुठे ठेवायचा असा प्रश्‍न शेतकऱ्यांना होता. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पणन मंडळाने प्रयत्न केले. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर शेतमाल तारण ठेवून सुमारे ३५ कोटींचे कर्जे घेतली आहेत. बाजार समित्यांसह पुरवठा साखळी हळूहळू सुरळीत झाल्यावर शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील. 

- सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर

अशी आहे योजना 
शेतमाल तारण योजनेत शेतकऱ्यांना बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्के कर्ज ६ महिन्यांसाठी ६ टक्के व्याज दराने दिले जाते. यात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, हरभरा, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, घेवडा, काजू, बेदाणा, सुपारी, हळद आदी शेतमालाचा समावेश आहे. ही योजना राबविण्यासाठी ज्या बाजार समित्यांकडे स्वनिधी नसेल अशा बाजार समित्यांना ५ लाखांचा निधी पणन मंडळाकडून दिला जातो. 

- महावितरणकडून आवाहन, पावसाळ्यात अशी घ्या काळजी

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनमध्ये ३५ कोटींची शेतमाल तारण कर्जे वितरित पुणे - कोरोना टाळेबंदीत बाजार समित्या बंदबरोबरच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानंतर शेतमालाचे दर घसरले होते. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांचा कल शेतमाल तारण योजनेकडे वाढला. गेल्या तीन महिन्यांत ९३ बाजार समित्यांद्वारे सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांनी दीड लाख क्विंटल शेतमाल तारण ठेवून ३५ कोटींची कर्जे घेतली आहेत, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महाराष्‍ट्र राज्य कृषी पणन मंडळ हे शेतमाल तारण योजना राबविणारे देशातील एकमेव पणन मंडळ असून, याची दखल घेत केंद्र पातळीवर संपूर्ण देशात तारण योजना राबविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. - काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार पवार म्हणाले, ‘‘कोरोना टाळेबंदीत बाजार समित्या बंद होत्या. देशांतर्गत वाहतूकही ठप्प होती. त्यामुळे शेतमालाची खरेदी विक्री थांबली होती. या परिस्थितीत काढणी झालेला शेतमाल कुठे ठेवायचा असा प्रश्‍न शेतकऱ्यांना होता. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पणन मंडळाने प्रयत्न केले. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर शेतमाल तारण ठेवून सुमारे ३५ कोटींचे कर्जे घेतली आहेत. बाजार समित्यांसह पुरवठा साखळी हळूहळू सुरळीत झाल्यावर शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील.  - सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर अशी आहे योजना  शेतमाल तारण योजनेत शेतकऱ्यांना बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्के कर्ज ६ महिन्यांसाठी ६ टक्के व्याज दराने दिले जाते. यात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, हरभरा, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, घेवडा, काजू, बेदाणा, सुपारी, हळद आदी शेतमालाचा समावेश आहे. ही योजना राबविण्यासाठी ज्या बाजार समित्यांकडे स्वनिधी नसेल अशा बाजार समित्यांना ५ लाखांचा निधी पणन मंडळाकडून दिला जातो.  - महावितरणकडून आवाहन, पावसाळ्यात अशी घ्या काळजी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YNYgOH
Read More
एका क्‍लिकवर मिळवा जॉब... बेरोजगारांना जाळ्यात ओढताहेत सायबर क्रिमिनल्स 

नागपूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक कंपन्यांनी कामगार, नोकरदार, मजुरांना कामावरून कमी केले. तर परप्रांतीय कामगार घराकडे परतले. त्यामुळे सध्या अनेक कंपन्यांमध्ये जागा रिक्‍त आहेत. सध्या बेरोजगारांची संख्या पाहता सायबर क्रिमिनल्सची गॅंग सक्रिय झाली आहे. गलेलठ्ठ पगार, जॉब सिक्‍युरिटी, पीएफ आणि निवास यांसारख्या सुविधा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन नोंदणीच्या नावावर सावज टिपत आहेत. त्यासाठी फेसबुक, वॉट्‌सऍप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि एसएमएसवरून बेरोजगारांना जाळे टाकण्याचा प्रयत्न सायबर किमिनल्स करीत आहेत. 

आठवी, दहावी आणि बारावीपासून ते इंजिनिअर्सपर्यंत नोकरी उपलब्ध आहे. नोकरीची सुवर्ण संधी... लॉकडाऊनमुळे त्वरित नोकरी देणे आहे... हॅंडसम सॅलरी, पॅकेज.. प्रॉव्हिडंट फंड, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तसेच कंपनीतून घरापर्यंत प्रवासासाठी स्टाफबस... त्वरित नोंदणी करा किंवा त्वरित लिंकवर क्‍लिक करा... तुमचा एक फॉरवर्ड मॅसेज तुमच्या मित्रांना नोकरी मिळवून देऊ शकतो... असे असंख्य मॅसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"
 

तसेच अनेकांना एसएमएसच्या स्वरूपातही जाळे पसरविले जात आहे. सध्या नोकरी किंवा हाताला कामाच्या शोध असलेले शेकडो बेरोजगार आहेत. पगार आणि सुविधा बघता अनेक जण लिंकवर किंवा दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करतात. चौकशी करतात आणि त्यांच्या जाळ्यात अलगद फसतात. 

असे अडकवितात जाळ्यात 

सायबर गुन्हेगारांनी पाठविलेल्या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर एक फॉर्म येतो. त्यावर आपली स्वतःची माहिती भरावी लागते. त्यामध्ये बॅंकेला सलग्न असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीसुद्धा आपण टाकतो. ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर 500 ते हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगितले जाते. गरजवंत असल्याने 20 ते 30 हजार रुपये महिन्याच्या नोकरीसाठी तो पैसे टाकतो. 

असा करतात गेम 

जॉब कन्सल्टन्सी कंपनीतून बोलत असल्याचे सांगून पाच ते सहा ठिकाणी जॉब असल्याचे सांगितले जाते. पगार 30 हजार ते 40 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली जाते. आमिषाला बळी पडल्यानंतर पुन्हा 2 ते 5 हजार रुपये "जॉब सर्चिंग चार्ज' म्हणून भरण्यास सांगितले जाते. पगाराचा आकडा पाहता तेवढे पैसे बॅंक खात्यात भरून अपॉइंटमेंट लेटरची वाट पाहण्यास सांगितले जाते. अशाप्रकारे दर आठ दिवसात कॉल करून असे शुल्क आकारतात. शेवटपर्यंत नोकरी मात्र मिळत नाही. 

अशी घ्या काळजी 

"नोकरीची सुवर्ण संधी' अशा सोशल मीडियावर व्हायरल मॅसेजवर विश्‍वास ठेवू नका 

स्वतःची शैक्षणिक पात्रता, कौशल्य पहा, त्यानुसार किती पगार आणि कोणते काम मिळू शकते, यावर विचार करा 

थेट कंपनीची वेबसाईट बघा, तेथील एचआर विभागाशी संपर्क करा 

 कोणत्याही दलालाच्या माध्यमातून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करू नका 

  नोकरी मिळविण्यासाठी कुणालाही पैशाचा व्यवहार करू नका 

 

ओटीपी शेअर करू नका 
बेरोजगारांनी मोबाईल क्रमांकावर कॉल करू नका. कोणत्याही लिंकवर क्‍लिक करू नका. नव्याने बनावट बेवसाईट बनवू शकतात. वेबसाईट बनविल्याच्या तारखेवर लक्ष द्या. नुकताच बनविलेली असेल तर विश्‍वास ठेवू नका. शक्‍यतो बॅंक ट्रॅंझॅक्‍शन करू नका. ओटीपी किंवा बॅंक टिडेल्स शेअर करू नका. 
- डॉ. अर्जुन माने, सायबर एक्‍सपर्ट 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एका क्‍लिकवर मिळवा जॉब... बेरोजगारांना जाळ्यात ओढताहेत सायबर क्रिमिनल्स  नागपूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक कंपन्यांनी कामगार, नोकरदार, मजुरांना कामावरून कमी केले. तर परप्रांतीय कामगार घराकडे परतले. त्यामुळे सध्या अनेक कंपन्यांमध्ये जागा रिक्‍त आहेत. सध्या बेरोजगारांची संख्या पाहता सायबर क्रिमिनल्सची गॅंग सक्रिय झाली आहे. गलेलठ्ठ पगार, जॉब सिक्‍युरिटी, पीएफ आणि निवास यांसारख्या सुविधा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन नोंदणीच्या नावावर सावज टिपत आहेत. त्यासाठी फेसबुक, वॉट्‌सऍप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि एसएमएसवरून बेरोजगारांना जाळे टाकण्याचा प्रयत्न सायबर किमिनल्स करीत आहेत.  आठवी, दहावी आणि बारावीपासून ते इंजिनिअर्सपर्यंत नोकरी उपलब्ध आहे. नोकरीची सुवर्ण संधी... लॉकडाऊनमुळे त्वरित नोकरी देणे आहे... हॅंडसम सॅलरी, पॅकेज.. प्रॉव्हिडंट फंड, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तसेच कंपनीतून घरापर्यंत प्रवासासाठी स्टाफबस... त्वरित नोंदणी करा किंवा त्वरित लिंकवर क्‍लिक करा... तुमचा एक फॉरवर्ड मॅसेज तुमच्या मित्रांना नोकरी मिळवून देऊ शकतो... असे असंख्य मॅसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"   तसेच अनेकांना एसएमएसच्या स्वरूपातही जाळे पसरविले जात आहे. सध्या नोकरी किंवा हाताला कामाच्या शोध असलेले शेकडो बेरोजगार आहेत. पगार आणि सुविधा बघता अनेक जण लिंकवर किंवा दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करतात. चौकशी करतात आणि त्यांच्या जाळ्यात अलगद फसतात.  असे अडकवितात जाळ्यात  सायबर गुन्हेगारांनी पाठविलेल्या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर एक फॉर्म येतो. त्यावर आपली स्वतःची माहिती भरावी लागते. त्यामध्ये बॅंकेला सलग्न असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीसुद्धा आपण टाकतो. ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर 500 ते हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगितले जाते. गरजवंत असल्याने 20 ते 30 हजार रुपये महिन्याच्या नोकरीसाठी तो पैसे टाकतो.  असा करतात गेम  जॉब कन्सल्टन्सी कंपनीतून बोलत असल्याचे सांगून पाच ते सहा ठिकाणी जॉब असल्याचे सांगितले जाते. पगार 30 हजार ते 40 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली जाते. आमिषाला बळी पडल्यानंतर पुन्हा 2 ते 5 हजार रुपये "जॉब सर्चिंग चार्ज' म्हणून भरण्यास सांगितले जाते. पगाराचा आकडा पाहता तेवढे पैसे बॅंक खात्यात भरून अपॉइंटमेंट लेटरची वाट पाहण्यास सांगितले जाते. अशाप्रकारे दर आठ दिवसात कॉल करून असे शुल्क आकारतात. शेवटपर्यंत नोकरी मात्र मिळत नाही.  अशी घ्या काळजी  "नोकरीची सुवर्ण संधी' अशा सोशल मीडियावर व्हायरल मॅसेजवर विश्‍वास ठेवू नका  स्वतःची शैक्षणिक पात्रता, कौशल्य पहा, त्यानुसार किती पगार आणि कोणते काम मिळू शकते, यावर विचार करा  थेट कंपनीची वेबसाईट बघा, तेथील एचआर विभागाशी संपर्क करा   कोणत्याही दलालाच्या माध्यमातून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करू नका    नोकरी मिळविण्यासाठी कुणालाही पैशाचा व्यवहार करू नका    ओटीपी शेअर करू नका  बेरोजगारांनी मोबाईल क्रमांकावर कॉल करू नका. कोणत्याही लिंकवर क्‍लिक करू नका. नव्याने बनावट बेवसाईट बनवू शकतात. वेबसाईट बनविल्याच्या तारखेवर लक्ष द्या. नुकताच बनविलेली असेल तर विश्‍वास ठेवू नका. शक्‍यतो बॅंक ट्रॅंझॅक्‍शन करू नका. ओटीपी किंवा बॅंक टिडेल्स शेअर करू नका.  - डॉ. अर्जुन माने, सायबर एक्‍सपर्ट  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30SqJFT
Read More
सकाळ इंडिया फाउंडेशनचे शिष्यवृत्तीसाठी आवाहन

पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीबाबत आवाहन करण्यात येत आहे. फाउंडेशनने शैक्षणिक कार्यातील ६० वर्षांचा प्रदीर्घ प्रवास २०१९-२० मध्ये पूर्ण केला आहे. फाउंडेशनतर्फे प्रत्येकी ७५ हजार रुपयांची एक अशा ५५ शिष्यवृत्त्या देण्यात येतात. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशात पीएच.डी. करण्यासाठी किंवा परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना २०१९-२० पासून प्रत्येकी ७५ हजारांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या भारतीय पदवीधारक विद्यार्थ्यांना देशाबाहेरील विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०२०-२१) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र मिळाले आहे, किंवा ज्या पदवीधरांकडे देशातील विद्यापीठांमध्ये, राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएच.डी.च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे २०१८ किंवा त्यापूर्वीचे लेखी पत्र असेल, असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र समजले जातील.

लग्नाच्या बोहल्यावरून सभापती उतरले थेट कोरोनाच्या लढाईत

शिष्यवृत्तीची रक्कम दोन वर्षांत किंवा त्या आधी परतफेड करायची आहे. पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा त्यामध्ये पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल.

येथे करा ऑनलाइन अर्ज
www.sakalindiafoundation.org  
कालावधी - २० जून ते २० जुलै २०२० 
पत्ता - सकाळ इंडिया फाउंडेशन, प्लॉट नं. २७, नरवीर तानाजी वाडी, पीएमटी डेपोजवळ, शिवाजीनगर, पुणे-५ 
संपर्क क्रमांक - ०२०-६६२६२३७३ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सकाळ इंडिया फाउंडेशनचे शिष्यवृत्तीसाठी आवाहन पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीबाबत आवाहन करण्यात येत आहे. फाउंडेशनने शैक्षणिक कार्यातील ६० वर्षांचा प्रदीर्घ प्रवास २०१९-२० मध्ये पूर्ण केला आहे. फाउंडेशनतर्फे प्रत्येकी ७५ हजार रुपयांची एक अशा ५५ शिष्यवृत्त्या देण्यात येतात.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा देशात पीएच.डी. करण्यासाठी किंवा परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना २०१९-२० पासून प्रत्येकी ७५ हजारांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या भारतीय पदवीधारक विद्यार्थ्यांना देशाबाहेरील विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०२०-२१) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र मिळाले आहे, किंवा ज्या पदवीधरांकडे देशातील विद्यापीठांमध्ये, राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएच.डी.च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे २०१८ किंवा त्यापूर्वीचे लेखी पत्र असेल, असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र समजले जातील. लग्नाच्या बोहल्यावरून सभापती उतरले थेट कोरोनाच्या लढाईत शिष्यवृत्तीची रक्कम दोन वर्षांत किंवा त्या आधी परतफेड करायची आहे. पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा त्यामध्ये पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल. येथे करा ऑनलाइन अर्ज www.sakalindiafoundation.org   कालावधी - २० जून ते २० जुलै २०२०  पत्ता - सकाळ इंडिया फाउंडेशन, प्लॉट नं. २७, नरवीर तानाजी वाडी, पीएमटी डेपोजवळ, शिवाजीनगर, पुणे-५  संपर्क क्रमांक - ०२०-६६२६२३७३  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YHcCAk
Read More
ग्रामपंचायतींकडील थकबाकी 'मुद्रांक'मुळे वसूल

पुणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडील ४ कोटी ७९  लाख १ हजार ९६४ रुपयांची थकबाकी यंदा वसूल करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही थकबाकी जिल्हा परिषदेकडे जमा करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या मदतीला मुद्रांक शुल्क अनुदान धाऊन आले आहे, असे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी आज (ता. १८) सांगितले.

लग्नाच्या बोहल्यावरून सभापती उतरले थेट कोरोनाच्या लढाईत

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींकडे उत्पन्नाची  फारसी साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायती या ग्राम निधीतून जिल्हा परिषदेकडून कर्ज घेत असतात, असेही कोहीनकर यांनी सांगितले.

पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू!

याशिवाय प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचे  हातपंप दुरुस्तीसाठीची यंत्रणा ग्रामपंचायतींकडे उपलब्ध नसते. त्यामुळे हातपंपांची दुरुस्ती ही जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत करावी लागते. यासाठी देखभाल व दुरुस्ती खर्च म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रतिवर्षी प्रत्येकी एक हजार रुपये जिल्हा परिषदेकडे जमा करावे लागतात. मात्र या देखभाल व दुरुस्तीची रक्कमही निधीअभावी काही ग्रामपंचायतींकडे थकली होती.

- महावितरणकडून आवाहन, पावसाळ्यात अशी घ्या काळजी

जमा झालेली थकबाकी (रुपयांत) 
- जिल्हा ग्रामनिधी कर्ज ---- ८४ लाख ८२ हजार ७७.
- हातपंप देखभाल व दुरुस्ती ---- १ कोटी १७ लाख ४१ हजार ८१६.
- प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पाणीपट्टी ---- १ कोटी ९२ लाख ६३ हजार ४२१.
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ---- १५ लाख ४७ हजार ७०.
- आपले सरकार ---- ६८ लाख ६७ हजार ५८०
- एकूण ---- ४ कोटी ७९ लाख १ हजार ९६४.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ग्रामपंचायतींकडील थकबाकी 'मुद्रांक'मुळे वसूल पुणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडील ४ कोटी ७९  लाख १ हजार ९६४ रुपयांची थकबाकी यंदा वसूल करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ही थकबाकी जिल्हा परिषदेकडे जमा करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या मदतीला मुद्रांक शुल्क अनुदान धाऊन आले आहे, असे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी आज (ता. १८) सांगितले. लग्नाच्या बोहल्यावरून सभापती उतरले थेट कोरोनाच्या लढाईत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींकडे उत्पन्नाची  फारसी साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायती या ग्राम निधीतून जिल्हा परिषदेकडून कर्ज घेत असतात, असेही कोहीनकर यांनी सांगितले. पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू! याशिवाय प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचे  हातपंप दुरुस्तीसाठीची यंत्रणा ग्रामपंचायतींकडे उपलब्ध नसते. त्यामुळे हातपंपांची दुरुस्ती ही जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत करावी लागते. यासाठी देखभाल व दुरुस्ती खर्च म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रतिवर्षी प्रत्येकी एक हजार रुपये जिल्हा परिषदेकडे जमा करावे लागतात. मात्र या देखभाल व दुरुस्तीची रक्कमही निधीअभावी काही ग्रामपंचायतींकडे थकली होती. - महावितरणकडून आवाहन, पावसाळ्यात अशी घ्या काळजी जमा झालेली थकबाकी (रुपयांत)  - जिल्हा ग्रामनिधी कर्ज ---- ८४ लाख ८२ हजार ७७. - हातपंप देखभाल व दुरुस्ती ---- १ कोटी १७ लाख ४१ हजार ८१६. - प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पाणीपट्टी ---- १ कोटी ९२ लाख ६३ हजार ४२१. - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ---- १५ लाख ४७ हजार ७०. - आपले सरकार ---- ६८ लाख ६७ हजार ५८० - एकूण ---- ४ कोटी ७९ लाख १ हजार ९६४. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UYNzrB
Read More
लॉकडाउनमध्येही रंगतेय मेंदी!

पुणे - लग्नं म्हटलं की नवरी आणि तिच्या घरातील महिला मंडळींना नटण्याथटण्यासाठी एक सुवर्णसंधीच असते. यात मेंदीचे स्थान तर वरचे आहे. सध्या मेंदी काढून देणारे उपलब्ध होऊ लागल्याने नवरी मुलींच्या आनंदात भर पडली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे सर्व लग्न सोहळे व इतर कार्यक्रम भव्य पद्धतीत करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे काही जोडप्याने ऑनलाइन माध्यमाचा वापर करत, अगदी साध्या पद्धतीत लग्न केले. मात्र, लॉकडाउन शिथिल होत असल्याने पुन्हा लग्न सोहळ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. मेंदीच्या ऑर्डर्स पण येत आहेत. सध्या ठराविक माणसांच्या उपस्थितीत लग्न होत आहेत. त्यामुळे केवळ नवरी मुलगी व तिची आई, काकू आणि बहीण असे चार ते पाच लोकांनाच मेंदी लावण्यात येत आहे. लहान सोहळा असल्यामुळे मेंदीचे दरदेखील कमी करण्यात येत आहेत, अशी माहिती मेहंदी आर्टिस्ट धनश्री हेंद्र यांनी दिली. सध्या दररोज तीन ते चार नवरी मुलींना धरून फक्त २० ते २५ महिलांनाच मेंदी लावली जाते. पूर्वी ही संख्या शंभरच्या घरात होती. त्यात सात ते आठ नवरी मुली असायच्या, असे हेंद्र यांनी सांगितले.

पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू!

मेहंदी आर्टिस्ट अनिता गोरे म्हणाल्या, ‘आपलं लग्न आहे आणि हातावर मेंदी नाही, याची खंत मुलींना नक्कीच वाटते. त्यात केवळ वीस पंचवीस लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या लग्नासाठी मेंदीच्या किमती कमी करा, असा अनेक मुलींचा आग्रह असतो.’’

लॉकडाउनमुळे बरेच निर्बंध आहेत; मला माझा लग्नसोहळा अविस्मरणीय बनवायचा आहे. खरेदी, मेकअप, मेंदी, फोटोग्राफर अशी पूर्ण तयारी योग्य ती काळजी घेत करत आहे.
- नेहा वायकुळ, (नवरी)

लग्नाच्या बोहल्यावरून सभापती उतरले थेट कोरोनाच्या लढाईत

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मेंदी किंवा पार्लरमध्ये जाऊन तयार होणे आपल्यासाठी सुरक्षित असेल का, ही चिंता वर- वधू आणि कुटुंबीयांना असायची; पण आता योग्य ती काळजी घेत, मेंदी काढून घेण्यासाठी मुली येत आहेत. तसेच आम्हीसुद्धा पूर्ण खबरदारी घेऊन, मेंदी काढत आहोत. 
- अनिता अधिकारी, मेहंदी आर्टिस्ट

माझ्या लग्नाची तयारी गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. संगीत आणि मेंदीसाठी मोठे कार्यक्रम असतात; पण सध्या ते शक्‍य नाही. मात्र, आज हातावर मेंदी लावून घेतली तेव्हा मला माझं लग्न आहे, असे वाटले. हा क्षण खूप आनंदाचा आहे.
- आरती शिंदीकर

- काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार

अशी घेतली जातेय काळजी

मेंदीसाठी नवरी किंवा नवऱ्या मुलाच्या घराला पसंती 

मेंदीपूर्वी आर्टिस्टने हात स्वच्छ धुणे आणि हातावर सॅनिटायझर लावणे 

सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे शक्‍य नसल्याने संपर्क होईल तितका कमी आणि मास्क व स्कार्फचा वापर

घरी बनविण्यात आलेल्या मेंदी कोनचा वापर

News Story Feeds https://ift.tt/3d8IhA4

लॉकडाउनमध्येही रंगतेय मेंदी! पुणे - लग्नं म्हटलं की नवरी आणि तिच्या घरातील महिला मंडळींना नटण्याथटण्यासाठी एक सुवर्णसंधीच असते. यात मेंदीचे स्थान तर वरचे आहे. सध्या मेंदी काढून देणारे उपलब्ध होऊ लागल्याने नवरी मुलींच्या आनंदात भर पडली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाउनमुळे सर्व लग्न सोहळे व इतर कार्यक्रम भव्य पद्धतीत करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे काही जोडप्याने ऑनलाइन माध्यमाचा वापर करत, अगदी साध्या पद्धतीत लग्न केले. मात्र, लॉकडाउन शिथिल होत असल्याने पुन्हा लग्न सोहळ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. मेंदीच्या ऑर्डर्स पण येत आहेत. सध्या ठराविक माणसांच्या उपस्थितीत लग्न होत आहेत. त्यामुळे केवळ नवरी मुलगी व तिची आई, काकू आणि बहीण असे चार ते पाच लोकांनाच मेंदी लावण्यात येत आहे. लहान सोहळा असल्यामुळे मेंदीचे दरदेखील कमी करण्यात येत आहेत, अशी माहिती मेहंदी आर्टिस्ट धनश्री हेंद्र यांनी दिली. सध्या दररोज तीन ते चार नवरी मुलींना धरून फक्त २० ते २५ महिलांनाच मेंदी लावली जाते. पूर्वी ही संख्या शंभरच्या घरात होती. त्यात सात ते आठ नवरी मुली असायच्या, असे हेंद्र यांनी सांगितले. पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू! मेहंदी आर्टिस्ट अनिता गोरे म्हणाल्या, ‘आपलं लग्न आहे आणि हातावर मेंदी नाही, याची खंत मुलींना नक्कीच वाटते. त्यात केवळ वीस पंचवीस लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या लग्नासाठी मेंदीच्या किमती कमी करा, असा अनेक मुलींचा आग्रह असतो.’’ लॉकडाउनमुळे बरेच निर्बंध आहेत; मला माझा लग्नसोहळा अविस्मरणीय बनवायचा आहे. खरेदी, मेकअप, मेंदी, फोटोग्राफर अशी पूर्ण तयारी योग्य ती काळजी घेत करत आहे. - नेहा वायकुळ, (नवरी) लग्नाच्या बोहल्यावरून सभापती उतरले थेट कोरोनाच्या लढाईत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मेंदी किंवा पार्लरमध्ये जाऊन तयार होणे आपल्यासाठी सुरक्षित असेल का, ही चिंता वर- वधू आणि कुटुंबीयांना असायची; पण आता योग्य ती काळजी घेत, मेंदी काढून घेण्यासाठी मुली येत आहेत. तसेच आम्हीसुद्धा पूर्ण खबरदारी घेऊन, मेंदी काढत आहोत.  - अनिता अधिकारी, मेहंदी आर्टिस्ट माझ्या लग्नाची तयारी गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. संगीत आणि मेंदीसाठी मोठे कार्यक्रम असतात; पण सध्या ते शक्‍य नाही. मात्र, आज हातावर मेंदी लावून घेतली तेव्हा मला माझं लग्न आहे, असे वाटले. हा क्षण खूप आनंदाचा आहे. - आरती शिंदीकर - काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार अशी घेतली जातेय काळजी मेंदीसाठी नवरी किंवा नवऱ्या मुलाच्या घराला पसंती  मेंदीपूर्वी आर्टिस्टने हात स्वच्छ धुणे आणि हातावर सॅनिटायझर लावणे  सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे शक्‍य नसल्याने संपर्क होईल तितका कमी आणि मास्क व स्कार्फचा वापर घरी बनविण्यात आलेल्या मेंदी कोनचा वापर News Story Feeds https://ift.tt/3d8IhA4

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37FmzCu
Read More
जलमंत्री शेखावत की शिकायत पर सीबीआई ने किया करोड़ों के घोटाले का पर्दाफाश https://ift.tt/3d8FIxW

Wednesday, June 17, 2020

वाराणसीः दशाश्वमेध घाट पर 501 दीप जलाकर गलवान के शहीदों को श्रद्धांजलि https://ift.tt/3fAQcaO
पोते ने बताया दादा गलवान के नाम पर कैसे पड़ा लद्दाख की घाटी का नाम https://ift.tt/2CiAKC2
'सामना'मध्ये संजय राऊतांनी माझ्याबद्दल लिहिलं, ते खरं नव्हतं- सोनू सूद #5मोठ्याबातम्या
चला वारीला : वाटे तुडवू काटेकुटे, तेव्हा विठाई उरी भेटे

वारी २०२० : अवघड दिवे घाट चढून आल्यावर सासवडला दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी असतो. त्यामुळे दुसरा दिवस तसा आरामाचा... या दोन दिवशी सासवडला जणू यात्राच भरते. पुरंदरच्या पंचक्रोशीतून भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सासवड शहरापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा परिसर वारकऱ्यांच्या दिंड्यांनी भरून गेलेला असतो. रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची गर्दी असते. कपाळी गंध लावून मुले फिरत असतात. छोट्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यत सारे माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने येत असतात. दरवर्षी माऊलींच्या सोहळ्याच्या उपस्थितीत धाकटे बंधू सोपानदेवांचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. जणू माऊली सोपानदेवांना पुढे घेतात. माऊलींच्या सोहळ्यातील वारकरी सोपानदेवांच्या समाधीचे रांग लावून दर्शन घेतात. नैमित्यिक पूजाअर्चा करून वारकरी आजचा दिवस विश्रांतीसाठीच देतात. अवघड दिवे घाटाची चढण आणि 32 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर थकवा येणे स्वाभाविकच आहे.

मनाचिये वारी : पांडुरंगा, कशासाठी आमच्या पदरी झुरणीची वारी

नामस्मरणात चालताना काही वाटत नाही, मात्र थांबल्यानंतर पाय बोलणारच ना..! परंतु वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची ओढ इतकी तीव्र असते की शरीराला होणाऱ्या वेदनाही वारीत बोथड बनतात. काही झाले तरी त्याचा गजर करीत, त्याची वारी त्याच्या चरणी पूर्ण करायची, हे वारकऱ्यांच्या मनाने पक्के ठरलेले असते. त्यामुळे हे चालल्यावर पाय दुखणार, ही आपल्यासारख्यांची कारणे वारकरी कधीच देत नाहीत. याबाबतचा किस्सा आठवला तो सांगतो. आम्ही सर्व पत्रकार विसाव्याला किंवा जेवणाच्या ठिकाणी देवस्थानच्या तंबूत जाऊन बसायचो... तेथे कोणाला काही अडचणी आल्या तर समजायच्या म्हणून. देवस्थानचेही काही निवेदन असेल तर तेही आम्हाला तेथेच कळायचे. तेव्हा काही आधिकारीही तेथे येतात, काही कमी जास्त आहे का विचारायला. विश्वस्त मंडळ त्यांच्याशी चर्चा करते. तेव्हा आम्हाला बातमीचे काही विषय मिळतात. रस्ता खराब असल्याचा विषय निघाला, तेव्हा साइडपट्ट्या भरल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. अधिकारी निघून गेले. तेथे संतानाना चोपदार बसले होते. निष्ठावान माणूस. बोलायला खूप कडक पण मनाने तितकाच मोकळा...

आठवे सोहळ्याचा थाट, आनंदे पार करी दिवे घाट

आम्ही त्यांना विचारले, काय वाटते नाना तुम्हाला रस्त्याबाबत. नाना उखडलेच आमच्यावर. रस्ता खराब आहे म्हणून काय झाले? तेव्हा नाना जे वाक्य बोलले ते माझ्या आजही लक्षात आहे. ते म्हणाले, ‘माऊलीच्या सोबतीने देवाकडे जाताना वारकऱ्याला जेवढी सोय, तेवढी ती गैरसोय असते आणि जेवढी गैरसोय, तेवढी सोय असते.’ आम्हाला ते बोलणे झेपलेच नाही. म्हणून मी खोदून विचारले, कसं नाना? तेव्हा ते म्हणाले, देवाकडे जाताना जेवढी गैरसोय होईल, तेवढी पारमार्थिक अर्थाने ती देवावरील भक्ती वाढविण्यास सोयीची असते. पण चालताना जेवढी सोय होईल, तेवढे कष्ट कमी होतील. स्वाभाविकच पारमार्थिक साधना म्हणजे कायिक वारीतील साधना कमी होत जाते. म्हणून सोय तेवढी गैरसोय. आम्ही नानांचे दर्शन घेतले आणि मार्गाला लागलो. तेव्हा कळाले, किती आध्यात्म जगतात ही माणसे...! वारीत वारकऱ्याच्या प्रत्येक कर्माला तात्विक अर्थ असतो, हे नानांच्या एका वाक्यातून जाणवले. तेव्हा कळाले ही वारी म्हणजे नुसते चालत पंढरपूरला जाणे, विठ्ठलाच्या पाया पडणे आणि घरी येणे, असे नाही. ही वारी सात्विक कर्मभावना जगणारी वारी आहे. त्यानंतर आपले (नसलेले) बौद्धिक डोके वारकऱ्यांच्या भावनांशी कधी लावायचे नाही. आपली मर्यादा तेव्हा मी आखून घेतली. त्यानंतर अनेक गोष्टी मला अनुभूतीला आल्या. कारण नानांच्या माध्यमातून वारकरी म्हणजे काय आणि वारी म्हणजे काय, याचा एक प्रकारे पाठच आम्हा पत्रकारांना मिळाला. असो. सासवडला मुक्कामामुळे सारे निवांत तंबूत असतात.

मनाचिये वारी : विठ्ठलाचे अखंड चिंतन हीच यंदाची वारी

यंदा सारे काही वेगळेच आहे. माऊलींची पालखी सोहळाच निघाला नाही. हे सासवडकरांसह प्रत्येक गावकऱ्याच्या पचनी पडणे अवघड आहे. कारण वारीच्या मार्गावर गावांचे वारकऱ्यांशी नाते जुळलेले असते. न्याहारीला, जेवणाला, मुक्कामाला ज्या ठिकाणी पालखी सोहळा थांबतो, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांचीही नाळ जुळलेली असते. त्यामुळे ते बेचैन होणे स्वाभाविक आहे. यंदा माऊलींचा सोहळा सासवडनगरीत नाही. तेथील ग्रामस्थांना सुनेसुने वाटणार. यंदा माऊली गावात न आल्याने सोपानदेवही हिरमुसले असणार. पंढरपूर जवळ आल्यावर माऊलींची भेट होते. पण त्याआधी माऊलींचे त्यांच्या नगरीत आगमन होते. तेव्हा निश्चित सोपानदेवांना आनंद होत असणार. पण आज मात्र माऊली ना सासवडला आले, ना टप्प्याजवळ सोपानदेव माऊली भेट होणार. यंदा भेटीचा सोहळा होणार नाही, याचे शल्य निश्चित सोपानदेवांना असणार. कोरोनाच्या साथीने साऱ्या परंपरांना यंदा छेद गेला. पण त्या परंपरा पुढे नित्यनेमाने सुरू राहतील, याबाबत एकाही वारकऱ्याच्या मनात शंका नाही... हे दिवसही जातील.... कोरोना हरेल अन् परंपरा जिंकतील...!
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चला वारीला : वाटे तुडवू काटेकुटे, तेव्हा विठाई उरी भेटे वारी २०२० : अवघड दिवे घाट चढून आल्यावर सासवडला दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी असतो. त्यामुळे दुसरा दिवस तसा आरामाचा... या दोन दिवशी सासवडला जणू यात्राच भरते. पुरंदरच्या पंचक्रोशीतून भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सासवड शहरापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा परिसर वारकऱ्यांच्या दिंड्यांनी भरून गेलेला असतो. रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची गर्दी असते. कपाळी गंध लावून मुले फिरत असतात. छोट्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यत सारे माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने येत असतात. दरवर्षी माऊलींच्या सोहळ्याच्या उपस्थितीत धाकटे बंधू सोपानदेवांचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. जणू माऊली सोपानदेवांना पुढे घेतात. माऊलींच्या सोहळ्यातील वारकरी सोपानदेवांच्या समाधीचे रांग लावून दर्शन घेतात. नैमित्यिक पूजाअर्चा करून वारकरी आजचा दिवस विश्रांतीसाठीच देतात. अवघड दिवे घाटाची चढण आणि 32 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर थकवा येणे स्वाभाविकच आहे. मनाचिये वारी : पांडुरंगा, कशासाठी आमच्या पदरी झुरणीची वारी नामस्मरणात चालताना काही वाटत नाही, मात्र थांबल्यानंतर पाय बोलणारच ना..! परंतु वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची ओढ इतकी तीव्र असते की शरीराला होणाऱ्या वेदनाही वारीत बोथड बनतात. काही झाले तरी त्याचा गजर करीत, त्याची वारी त्याच्या चरणी पूर्ण करायची, हे वारकऱ्यांच्या मनाने पक्के ठरलेले असते. त्यामुळे हे चालल्यावर पाय दुखणार, ही आपल्यासारख्यांची कारणे वारकरी कधीच देत नाहीत. याबाबतचा किस्सा आठवला तो सांगतो. आम्ही सर्व पत्रकार विसाव्याला किंवा जेवणाच्या ठिकाणी देवस्थानच्या तंबूत जाऊन बसायचो... तेथे कोणाला काही अडचणी आल्या तर समजायच्या म्हणून. देवस्थानचेही काही निवेदन असेल तर तेही आम्हाला तेथेच कळायचे. तेव्हा काही आधिकारीही तेथे येतात, काही कमी जास्त आहे का विचारायला. विश्वस्त मंडळ त्यांच्याशी चर्चा करते. तेव्हा आम्हाला बातमीचे काही विषय मिळतात. रस्ता खराब असल्याचा विषय निघाला, तेव्हा साइडपट्ट्या भरल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. अधिकारी निघून गेले. तेथे संतानाना चोपदार बसले होते. निष्ठावान माणूस. बोलायला खूप कडक पण मनाने तितकाच मोकळा... आठवे सोहळ्याचा थाट, आनंदे पार करी दिवे घाट आम्ही त्यांना विचारले, काय वाटते नाना तुम्हाला रस्त्याबाबत. नाना उखडलेच आमच्यावर. रस्ता खराब आहे म्हणून काय झाले? तेव्हा नाना जे वाक्य बोलले ते माझ्या आजही लक्षात आहे. ते म्हणाले, ‘माऊलीच्या सोबतीने देवाकडे जाताना वारकऱ्याला जेवढी सोय, तेवढी ती गैरसोय असते आणि जेवढी गैरसोय, तेवढी सोय असते.’ आम्हाला ते बोलणे झेपलेच नाही. म्हणून मी खोदून विचारले, कसं नाना? तेव्हा ते म्हणाले, देवाकडे जाताना जेवढी गैरसोय होईल, तेवढी पारमार्थिक अर्थाने ती देवावरील भक्ती वाढविण्यास सोयीची असते. पण चालताना जेवढी सोय होईल, तेवढे कष्ट कमी होतील. स्वाभाविकच पारमार्थिक साधना म्हणजे कायिक वारीतील साधना कमी होत जाते. म्हणून सोय तेवढी गैरसोय. आम्ही नानांचे दर्शन घेतले आणि मार्गाला लागलो. तेव्हा कळाले, किती आध्यात्म जगतात ही माणसे...! वारीत वारकऱ्याच्या प्रत्येक कर्माला तात्विक अर्थ असतो, हे नानांच्या एका वाक्यातून जाणवले. तेव्हा कळाले ही वारी म्हणजे नुसते चालत पंढरपूरला जाणे, विठ्ठलाच्या पाया पडणे आणि घरी येणे, असे नाही. ही वारी सात्विक कर्मभावना जगणारी वारी आहे. त्यानंतर आपले (नसलेले) बौद्धिक डोके वारकऱ्यांच्या भावनांशी कधी लावायचे नाही. आपली मर्यादा तेव्हा मी आखून घेतली. त्यानंतर अनेक गोष्टी मला अनुभूतीला आल्या. कारण नानांच्या माध्यमातून वारकरी म्हणजे काय आणि वारी म्हणजे काय, याचा एक प्रकारे पाठच आम्हा पत्रकारांना मिळाला. असो. सासवडला मुक्कामामुळे सारे निवांत तंबूत असतात. मनाचिये वारी : विठ्ठलाचे अखंड चिंतन हीच यंदाची वारी यंदा सारे काही वेगळेच आहे. माऊलींची पालखी सोहळाच निघाला नाही. हे सासवडकरांसह प्रत्येक गावकऱ्याच्या पचनी पडणे अवघड आहे. कारण वारीच्या मार्गावर गावांचे वारकऱ्यांशी नाते जुळलेले असते. न्याहारीला, जेवणाला, मुक्कामाला ज्या ठिकाणी पालखी सोहळा थांबतो, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांचीही नाळ जुळलेली असते. त्यामुळे ते बेचैन होणे स्वाभाविक आहे. यंदा माऊलींचा सोहळा सासवडनगरीत नाही. तेथील ग्रामस्थांना सुनेसुने वाटणार. यंदा माऊली गावात न आल्याने सोपानदेवही हिरमुसले असणार. पंढरपूर जवळ आल्यावर माऊलींची भेट होते. पण त्याआधी माऊलींचे त्यांच्या नगरीत आगमन होते. तेव्हा निश्चित सोपानदेवांना आनंद होत असणार. पण आज मात्र माऊली ना सासवडला आले, ना टप्प्याजवळ सोपानदेव माऊली भेट होणार. यंदा भेटीचा सोहळा होणार नाही, याचे शल्य निश्चित सोपानदेवांना असणार. कोरोनाच्या साथीने साऱ्या परंपरांना यंदा छेद गेला. पण त्या परंपरा पुढे नित्यनेमाने सुरू राहतील, याबाबत एकाही वारकऱ्याच्या मनात शंका नाही... हे दिवसही जातील.... कोरोना हरेल अन् परंपरा जिंकतील...!   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2C9MYg3
Read More
पेपरवाल्या काकांना द्या मदतीचा हात!

कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर, व्यावसायिकांवर व नोकरदारवर्गावर आर्थिक परिणाम झाला. त्यात काही व्यवसायांवर हजारो लोकांचे कुटुंब अवलंबून असल्याने अशा कुटुंबांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इलेक्‍ट्रॉनिक व सोशल माध्यमातून कोरोना संसर्गाबद्दल चुकीचा संदेश समाजात गेल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून वृत्तपत्र विक्री व्यवसाय चालू अन्‌ बंद, या चक्रात अडकला आहे. आज सोशल आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या भडक आणि बेजबाबदार बातम्यांच्या काळात वृत्तपत्राची विश्वासार्हता अबाधित आहे. ‘टीआरपी’च्या चढाओढीमध्ये प्रत्येक बातमीमध्ये ‘ब्रेकिंग न्यूज’ शोधण्यापेक्षा, मिळालेल्या प्रत्येक बातमीची पूर्ण शहानिशा करूनच बातमी प्रसिद्ध करण्याची परंपरा आजही वृत्तपत्र माध्यमांनी जपली आहे आणि हेच खात्रीलायक व विश्वासपूर्ण बातमीचे स्रोत आपल्यापर्यंत पोचविणारा घटक म्हणजे आपला वृत्तपत्र विक्रेता.

मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन

अखंड सेवा पुरविणारा घटक
ऊन, पाऊस व वाऱ्याची पर्वा न करता अखंड सेवा पुरविणारा हा घटक आज व्यवसायाची लढाई लढत आहे. मुसळधार पावसातही वर्तमानपत्र अगदी कोठेही ओले न करता आपल्या सर्वांपर्यंत पोचविताना स्वतः ओलेचिंब होणारे, स्वतःच्या घरातील आनंदाचा क्षण असो अथवा दुःखद घटना, याचे कोणतेही कारण न देता ठरलेल्या वेळेत आपल्यापर्यंत पेपर पोचविणारे, शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असली, तरी आपला पेपर आपल्याला वेळेत देणारे हेच ते ‘पेपरवाले काका’ आज अनेक अडचणींना सामोरे जात आहेत.

तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने!

कोरोनाच्या संकटात उपेक्षा
ग्राहकांमध्ये होणारे समज-गैरसमजाचे वातावरण, अंक वितरणासाठी मनुष्यबळाच्या उपलब्धतेची समस्या, प्रत्यक्ष ग्राहकाकडे मासिक बिल मिळविण्यासाठी फिरण्यास आलेल्या मर्यादा, त्यामुळे रोजचे भांडवल पाहावे की कुटुंबाचा उदरनिर्वाह, या कात्रीमध्ये वृत्तपत्र विक्रेते सापडले आहेत. या अतिशय अडचणीच्या काळातही वृत्तपत्र विक्रेते आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत. आपल्या प्रत्येकाची वाचनाची भूक भागवत आहे. ही खरेतर कौतुकाची बाब आहे. परंतु, आता हा आपला विश्वासार्ह बातम्या पुरविणारा घटक कोरोनाच्या संकटात उपेक्षित आहे.

मुळशीत आणखी एकाला कोरोना, 33 जण क्वारंटाइन  

दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या व आस्थापना, सार्वजनिक मंडळे व वाचकांकडून मदतीची अपेक्षा करीत आहेत. या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी मदतीचा हात पुढे करून वृत्तपत्र विक्रेत्यांना अधिक सक्षम करण्यासाठी मदत करावी.

येथे पाठवा मदत...
Bank - बॅंक ऑफ महाराष्ट्र, बाजीराव रोड, पुणे
A/C Name - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ, पुणे
A/C No. - ६०१३१०८८७३०
IFSC Code - MAHB००००००१

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पेपरवाल्या काकांना द्या मदतीचा हात! कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर, व्यावसायिकांवर व नोकरदारवर्गावर आर्थिक परिणाम झाला. त्यात काही व्यवसायांवर हजारो लोकांचे कुटुंब अवलंबून असल्याने अशा कुटुंबांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा इलेक्‍ट्रॉनिक व सोशल माध्यमातून कोरोना संसर्गाबद्दल चुकीचा संदेश समाजात गेल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून वृत्तपत्र विक्री व्यवसाय चालू अन्‌ बंद, या चक्रात अडकला आहे. आज सोशल आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या भडक आणि बेजबाबदार बातम्यांच्या काळात वृत्तपत्राची विश्वासार्हता अबाधित आहे. ‘टीआरपी’च्या चढाओढीमध्ये प्रत्येक बातमीमध्ये ‘ब्रेकिंग न्यूज’ शोधण्यापेक्षा, मिळालेल्या प्रत्येक बातमीची पूर्ण शहानिशा करूनच बातमी प्रसिद्ध करण्याची परंपरा आजही वृत्तपत्र माध्यमांनी जपली आहे आणि हेच खात्रीलायक व विश्वासपूर्ण बातमीचे स्रोत आपल्यापर्यंत पोचविणारा घटक म्हणजे आपला वृत्तपत्र विक्रेता. मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन अखंड सेवा पुरविणारा घटक ऊन, पाऊस व वाऱ्याची पर्वा न करता अखंड सेवा पुरविणारा हा घटक आज व्यवसायाची लढाई लढत आहे. मुसळधार पावसातही वर्तमानपत्र अगदी कोठेही ओले न करता आपल्या सर्वांपर्यंत पोचविताना स्वतः ओलेचिंब होणारे, स्वतःच्या घरातील आनंदाचा क्षण असो अथवा दुःखद घटना, याचे कोणतेही कारण न देता ठरलेल्या वेळेत आपल्यापर्यंत पेपर पोचविणारे, शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असली, तरी आपला पेपर आपल्याला वेळेत देणारे हेच ते ‘पेपरवाले काका’ आज अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने! कोरोनाच्या संकटात उपेक्षा ग्राहकांमध्ये होणारे समज-गैरसमजाचे वातावरण, अंक वितरणासाठी मनुष्यबळाच्या उपलब्धतेची समस्या, प्रत्यक्ष ग्राहकाकडे मासिक बिल मिळविण्यासाठी फिरण्यास आलेल्या मर्यादा, त्यामुळे रोजचे भांडवल पाहावे की कुटुंबाचा उदरनिर्वाह, या कात्रीमध्ये वृत्तपत्र विक्रेते सापडले आहेत. या अतिशय अडचणीच्या काळातही वृत्तपत्र विक्रेते आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत. आपल्या प्रत्येकाची वाचनाची भूक भागवत आहे. ही खरेतर कौतुकाची बाब आहे. परंतु, आता हा आपला विश्वासार्ह बातम्या पुरविणारा घटक कोरोनाच्या संकटात उपेक्षित आहे. मुळशीत आणखी एकाला कोरोना, 33 जण क्वारंटाइन   दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या व आस्थापना, सार्वजनिक मंडळे व वाचकांकडून मदतीची अपेक्षा करीत आहेत. या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी मदतीचा हात पुढे करून वृत्तपत्र विक्रेत्यांना अधिक सक्षम करण्यासाठी मदत करावी. येथे पाठवा मदत... Bank - बॅंक ऑफ महाराष्ट्र, बाजीराव रोड, पुणे A/C Name - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ, पुणे A/C No. - ६०१३१०८८७३० IFSC Code - MAHB००००००१ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Bk4yNW
Read More