लॉकडाउनमध्येही रंगतेय मेंदी! पुणे - लग्नं म्हटलं की नवरी आणि तिच्या घरातील महिला मंडळींना नटण्याथटण्यासाठी एक सुवर्णसंधीच असते. यात मेंदीचे स्थान तर वरचे आहे. सध्या मेंदी काढून देणारे उपलब्ध होऊ लागल्याने नवरी मुलींच्या आनंदात भर पडली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाउनमुळे सर्व लग्न सोहळे व इतर कार्यक्रम भव्य पद्धतीत करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे काही जोडप्याने ऑनलाइन माध्यमाचा वापर करत, अगदी साध्या पद्धतीत लग्न केले. मात्र, लॉकडाउन शिथिल होत असल्याने पुन्हा लग्न सोहळ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. मेंदीच्या ऑर्डर्स पण येत आहेत. सध्या ठराविक माणसांच्या उपस्थितीत लग्न होत आहेत. त्यामुळे केवळ नवरी मुलगी व तिची आई, काकू आणि बहीण असे चार ते पाच लोकांनाच मेंदी लावण्यात येत आहे. लहान सोहळा असल्यामुळे मेंदीचे दरदेखील कमी करण्यात येत आहेत, अशी माहिती मेहंदी आर्टिस्ट धनश्री हेंद्र यांनी दिली. सध्या दररोज तीन ते चार नवरी मुलींना धरून फक्त २० ते २५ महिलांनाच मेंदी लावली जाते. पूर्वी ही संख्या शंभरच्या घरात होती. त्यात सात ते आठ नवरी मुली असायच्या, असे हेंद्र यांनी सांगितले. पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू! मेहंदी आर्टिस्ट अनिता गोरे म्हणाल्या, ‘आपलं लग्न आहे आणि हातावर मेंदी नाही, याची खंत मुलींना नक्कीच वाटते. त्यात केवळ वीस पंचवीस लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या लग्नासाठी मेंदीच्या किमती कमी करा, असा अनेक मुलींचा आग्रह असतो.’’ लॉकडाउनमुळे बरेच निर्बंध आहेत; मला माझा लग्नसोहळा अविस्मरणीय बनवायचा आहे. खरेदी, मेकअप, मेंदी, फोटोग्राफर अशी पूर्ण तयारी योग्य ती काळजी घेत करत आहे. - नेहा वायकुळ, (नवरी) लग्नाच्या बोहल्यावरून सभापती उतरले थेट कोरोनाच्या लढाईत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मेंदी किंवा पार्लरमध्ये जाऊन तयार होणे आपल्यासाठी सुरक्षित असेल का, ही चिंता वर- वधू आणि कुटुंबीयांना असायची; पण आता योग्य ती काळजी घेत, मेंदी काढून घेण्यासाठी मुली येत आहेत. तसेच आम्हीसुद्धा पूर्ण खबरदारी घेऊन, मेंदी काढत आहोत.  - अनिता अधिकारी, मेहंदी आर्टिस्ट माझ्या लग्नाची तयारी गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. संगीत आणि मेंदीसाठी मोठे कार्यक्रम असतात; पण सध्या ते शक्‍य नाही. मात्र, आज हातावर मेंदी लावून घेतली तेव्हा मला माझं लग्न आहे, असे वाटले. हा क्षण खूप आनंदाचा आहे. - आरती शिंदीकर - काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार अशी घेतली जातेय काळजी मेंदीसाठी नवरी किंवा नवऱ्या मुलाच्या घराला पसंती  मेंदीपूर्वी आर्टिस्टने हात स्वच्छ धुणे आणि हातावर सॅनिटायझर लावणे  सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे शक्‍य नसल्याने संपर्क होईल तितका कमी आणि मास्क व स्कार्फचा वापर घरी बनविण्यात आलेल्या मेंदी कोनचा वापर News Story Feeds https://ift.tt/3d8IhA4 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, June 18, 2020

लॉकडाउनमध्येही रंगतेय मेंदी! पुणे - लग्नं म्हटलं की नवरी आणि तिच्या घरातील महिला मंडळींना नटण्याथटण्यासाठी एक सुवर्णसंधीच असते. यात मेंदीचे स्थान तर वरचे आहे. सध्या मेंदी काढून देणारे उपलब्ध होऊ लागल्याने नवरी मुलींच्या आनंदात भर पडली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाउनमुळे सर्व लग्न सोहळे व इतर कार्यक्रम भव्य पद्धतीत करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे काही जोडप्याने ऑनलाइन माध्यमाचा वापर करत, अगदी साध्या पद्धतीत लग्न केले. मात्र, लॉकडाउन शिथिल होत असल्याने पुन्हा लग्न सोहळ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. मेंदीच्या ऑर्डर्स पण येत आहेत. सध्या ठराविक माणसांच्या उपस्थितीत लग्न होत आहेत. त्यामुळे केवळ नवरी मुलगी व तिची आई, काकू आणि बहीण असे चार ते पाच लोकांनाच मेंदी लावण्यात येत आहे. लहान सोहळा असल्यामुळे मेंदीचे दरदेखील कमी करण्यात येत आहेत, अशी माहिती मेहंदी आर्टिस्ट धनश्री हेंद्र यांनी दिली. सध्या दररोज तीन ते चार नवरी मुलींना धरून फक्त २० ते २५ महिलांनाच मेंदी लावली जाते. पूर्वी ही संख्या शंभरच्या घरात होती. त्यात सात ते आठ नवरी मुली असायच्या, असे हेंद्र यांनी सांगितले. पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू! मेहंदी आर्टिस्ट अनिता गोरे म्हणाल्या, ‘आपलं लग्न आहे आणि हातावर मेंदी नाही, याची खंत मुलींना नक्कीच वाटते. त्यात केवळ वीस पंचवीस लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या लग्नासाठी मेंदीच्या किमती कमी करा, असा अनेक मुलींचा आग्रह असतो.’’ लॉकडाउनमुळे बरेच निर्बंध आहेत; मला माझा लग्नसोहळा अविस्मरणीय बनवायचा आहे. खरेदी, मेकअप, मेंदी, फोटोग्राफर अशी पूर्ण तयारी योग्य ती काळजी घेत करत आहे. - नेहा वायकुळ, (नवरी) लग्नाच्या बोहल्यावरून सभापती उतरले थेट कोरोनाच्या लढाईत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मेंदी किंवा पार्लरमध्ये जाऊन तयार होणे आपल्यासाठी सुरक्षित असेल का, ही चिंता वर- वधू आणि कुटुंबीयांना असायची; पण आता योग्य ती काळजी घेत, मेंदी काढून घेण्यासाठी मुली येत आहेत. तसेच आम्हीसुद्धा पूर्ण खबरदारी घेऊन, मेंदी काढत आहोत.  - अनिता अधिकारी, मेहंदी आर्टिस्ट माझ्या लग्नाची तयारी गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. संगीत आणि मेंदीसाठी मोठे कार्यक्रम असतात; पण सध्या ते शक्‍य नाही. मात्र, आज हातावर मेंदी लावून घेतली तेव्हा मला माझं लग्न आहे, असे वाटले. हा क्षण खूप आनंदाचा आहे. - आरती शिंदीकर - काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार अशी घेतली जातेय काळजी मेंदीसाठी नवरी किंवा नवऱ्या मुलाच्या घराला पसंती  मेंदीपूर्वी आर्टिस्टने हात स्वच्छ धुणे आणि हातावर सॅनिटायझर लावणे  सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे शक्‍य नसल्याने संपर्क होईल तितका कमी आणि मास्क व स्कार्फचा वापर घरी बनविण्यात आलेल्या मेंदी कोनचा वापर News Story Feeds https://ift.tt/3d8IhA4


via News Story Feeds https://ift.tt/37FmzCu

No comments:

Post a Comment