Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 14, 2020

Horoscope Today, 15 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3e9cEry
लंदन में प्रदर्शन, सुरक्षा के लिए गांधी, मंडेला, चर्चिल की प्रतिमाएं तोड़ी जा रहीं https://ift.tt/37uCcMX
सुशांत की डेड बॉडी की फोटो वायरल, महाराष्ट्र साइबर सेल ने दी चेतावनी https://ift.tt/2YyFESW
IRS अफसर ने की खुदकुशी, कोरोना से संक्रमित होने का था शक https://ift.tt/3d3IhRU
शिवराज पर बने वीडियो पर गरमाई सियासत, बीजेपी ने की दिग्विजय की शिकायत https://ift.tt/30EeEUF
दुनिया को अलविदा कह गए सुशांत सिंह राजपूत, पीछे छोड़ गए ये अधूरी फिल्में https://ift.tt/2C7SP5H
सुशांत की मौत से दुखी पवित्र रिश्ता फेम एक्ट्रेस, शूटिंग के दिन किए याद https://ift.tt/2BZKNvs
सुशांत सिंह राजपूत : 'कलाकारांच्या आत्महत्येची चर्चा होते शेतकऱ्यांच्या नाही'
विदर्भाने 61 वर्षांपूर्वी मिळविला होता पहिला रणजी विजय, नेमके काय घडले वाचा

नागपूर  : कोणत्याही संघासाठी पहिला निर्णायक विजय नेहमीच अविस्मरणीय असतो. आणि तो विजय जर घरच्या मैदानावर मिळविला असेल तर, त्याची मजा औरच असते. असाच एक विजय विदर्भ रणजी संघाने 61 वर्षांपूर्वी छल्ला नरसिंहन यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशविरुद्ध व्हीसीए मैदानावर मिळविला होता. त्या सामन्यात वैदर्भी क्रिकेटपटूंनी दाखविलेली एकजूटता सहा दशके लोटूनही आजही नागपूरकरांच्या स्मरणात आहे. 

1959-60 च्या मोसमात 4 ते 6 डिसेंबर या काळात खेळल्या गेलेल्या तीनदिवसीय सामन्यात विदर्भाकडून कर्णधार छल्ला नरसिंहनशिवाय डी. डी. देशपांडे, एम. के. जोशी, एस. ए. रहिम, व्ही. डी. गोसावी, एस. के. साहू, ए. एन. अभ्यंकर, के. व्ही. गिजरे, यु. कुमरे, एस. गणोरकर, एन. बोकेसारखे रथीमहारथी होते. तर, सी. सरवटे यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात सी. ए. नायडू, पी. सी. ब्रम्हो, एम. आर. शर्मा, एच. दळवी, एल. टी. सब्बू, एस. बॅनर्जी, एम. रवींद्र, एस. गायकवाड, ए. एस. भगवानदास व एल. श्‍यामलाल हे त्या काळातील नावाजलेले फलंदाज व गोलंदाज होते. गोलंदाजांसाठी अनुकूल ठरलेल्या खेळपट्‌टीवर मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, विदर्भाच्या गोलंदाजांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. पाहुण्या संघाचा डाव पहिल्याच दिवशी अवघ्या 186 धावांत गुंडाळला. मध्य प्रदेशकडून एकही फलंदाज अर्धशतक नोंदवू शकला नाही, हे उल्लेखनीय. सर्वाधिक नाबाद 38 धावा रवींद्र यांनी काढल्या. विदर्भाकडून रहिम यांनी पाच गडी बाद करून खऱ्या अर्थाने पहिला दिवस गाजविला. तीन बळी टिपून गणोरकर यांनी त्यांना उत्तम साथ दिली. 

हेही वाचा  : विंडीजच्या तोफखान्याविरुद्‌ध एकटेच लढले होते विदर्भाचे मुर्तीराजन
 

मध्य प्रदेशला कमी धावांमध्ये गुंडाळल्या आनंद वैदर्भी खेळाडूंच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही. कारण त्यानंतर विदर्भाचाही डाव केवळ 190 धावांत आटोपला. मात्र, चार धावांची निसटती आघाडी घेतल्याचे त्यांना निश्‍चितच समाधान होते. विदर्भाला आघाडी मिळवून देण्यात स्वत: कर्णधार नरसिंहन यांची निर्णायक भूमिका राहिली. त्यांच्या 58 व रहिम यांच्या नाबाद 34 धावा मोलाच्या ठरल्या. चार धावांची का होईना आघाडी मिळाल्याने विदर्भाच्या "ड्रेसिंग रूम'मध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, लढाई अजून संपलेली नव्हती. दुसरा डाव अद्याप बाकी होता. त्यामुळे आता सर्व भिस्त गोलंदाजांवर होती. सुदैवाने त्यांनीही निराश केले नाही. गोलंदाजांनी मध्य प्रदेशचा दुसराही डाव 131 धावांत गुंडाळून विजयाच्या आशा उंचावल्या. रहिम व गणोरकर यांनी पुन्हा चार व तीन गडी बाद करून पाहुण्यांची दाणादाण उडविली. 

 
अन्‌ व्हीसीएवर झाला विजयी जल्लोष 

विदर्भाला निर्णायक विजयासाठी 128 धावांचे माफक लक्ष्य मिळाले. मात्र, खेळपट्‌टीचे स्वरूप लक्षात घेता, चौथ्या डावात हे आव्हान सहजसोपे नव्हते. मध्य प्रदेशचे गोलंदाज गायकवाड यांनी लागोपाठ तीन गडी बाद करून एकप्रकारे विदर्भाला धोक्‍याचा इशाराच देऊन टाकला होता. सामना हातून निसटतो की काय असे वाटू लागले होते. त्यामुळे साहजिकच नैराश्‍याचे वातावरण होते. मात्र, सलामीवीर गोसावी यांनी संघावर ती वेळ येऊ दिली नाही. त्यांनी एका टोकाने चिवट फलंदाजी करीत विदर्भाला तीन गड्यांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. गोवासींच्या 67 व रहिम यांच्या नाबाद 22 धावांनी विदर्भाची नाव तिरावर लागली. सांघिक प्रदर्शन आणि रहिम यांच्या अष्टपैलू कामगिरीने गाजलेला तो सामना रणजी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय ठरला. विजयानंतर अर्थातच व्हीसीएवर जल्लोषही झाला. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विदर्भाने 61 वर्षांपूर्वी मिळविला होता पहिला रणजी विजय, नेमके काय घडले वाचा नागपूर  : कोणत्याही संघासाठी पहिला निर्णायक विजय नेहमीच अविस्मरणीय असतो. आणि तो विजय जर घरच्या मैदानावर मिळविला असेल तर, त्याची मजा औरच असते. असाच एक विजय विदर्भ रणजी संघाने 61 वर्षांपूर्वी छल्ला नरसिंहन यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशविरुद्ध व्हीसीए मैदानावर मिळविला होता. त्या सामन्यात वैदर्भी क्रिकेटपटूंनी दाखविलेली एकजूटता सहा दशके लोटूनही आजही नागपूरकरांच्या स्मरणात आहे.  1959-60 च्या मोसमात 4 ते 6 डिसेंबर या काळात खेळल्या गेलेल्या तीनदिवसीय सामन्यात विदर्भाकडून कर्णधार छल्ला नरसिंहनशिवाय डी. डी. देशपांडे, एम. के. जोशी, एस. ए. रहिम, व्ही. डी. गोसावी, एस. के. साहू, ए. एन. अभ्यंकर, के. व्ही. गिजरे, यु. कुमरे, एस. गणोरकर, एन. बोकेसारखे रथीमहारथी होते. तर, सी. सरवटे यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात सी. ए. नायडू, पी. सी. ब्रम्हो, एम. आर. शर्मा, एच. दळवी, एल. टी. सब्बू, एस. बॅनर्जी, एम. रवींद्र, एस. गायकवाड, ए. एस. भगवानदास व एल. श्‍यामलाल हे त्या काळातील नावाजलेले फलंदाज व गोलंदाज होते. गोलंदाजांसाठी अनुकूल ठरलेल्या खेळपट्‌टीवर मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, विदर्भाच्या गोलंदाजांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. पाहुण्या संघाचा डाव पहिल्याच दिवशी अवघ्या 186 धावांत गुंडाळला. मध्य प्रदेशकडून एकही फलंदाज अर्धशतक नोंदवू शकला नाही, हे उल्लेखनीय. सर्वाधिक नाबाद 38 धावा रवींद्र यांनी काढल्या. विदर्भाकडून रहिम यांनी पाच गडी बाद करून खऱ्या अर्थाने पहिला दिवस गाजविला. तीन बळी टिपून गणोरकर यांनी त्यांना उत्तम साथ दिली.  हेही वाचा  : विंडीजच्या तोफखान्याविरुद्‌ध एकटेच लढले होते विदर्भाचे मुर्तीराजन   मध्य प्रदेशला कमी धावांमध्ये गुंडाळल्या आनंद वैदर्भी खेळाडूंच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही. कारण त्यानंतर विदर्भाचाही डाव केवळ 190 धावांत आटोपला. मात्र, चार धावांची निसटती आघाडी घेतल्याचे त्यांना निश्‍चितच समाधान होते. विदर्भाला आघाडी मिळवून देण्यात स्वत: कर्णधार नरसिंहन यांची निर्णायक भूमिका राहिली. त्यांच्या 58 व रहिम यांच्या नाबाद 34 धावा मोलाच्या ठरल्या. चार धावांची का होईना आघाडी मिळाल्याने विदर्भाच्या "ड्रेसिंग रूम'मध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, लढाई अजून संपलेली नव्हती. दुसरा डाव अद्याप बाकी होता. त्यामुळे आता सर्व भिस्त गोलंदाजांवर होती. सुदैवाने त्यांनीही निराश केले नाही. गोलंदाजांनी मध्य प्रदेशचा दुसराही डाव 131 धावांत गुंडाळून विजयाच्या आशा उंचावल्या. रहिम व गणोरकर यांनी पुन्हा चार व तीन गडी बाद करून पाहुण्यांची दाणादाण उडविली.    अन्‌ व्हीसीएवर झाला विजयी जल्लोष  विदर्भाला निर्णायक विजयासाठी 128 धावांचे माफक लक्ष्य मिळाले. मात्र, खेळपट्‌टीचे स्वरूप लक्षात घेता, चौथ्या डावात हे आव्हान सहजसोपे नव्हते. मध्य प्रदेशचे गोलंदाज गायकवाड यांनी लागोपाठ तीन गडी बाद करून एकप्रकारे विदर्भाला धोक्‍याचा इशाराच देऊन टाकला होता. सामना हातून निसटतो की काय असे वाटू लागले होते. त्यामुळे साहजिकच नैराश्‍याचे वातावरण होते. मात्र, सलामीवीर गोसावी यांनी संघावर ती वेळ येऊ दिली नाही. त्यांनी एका टोकाने चिवट फलंदाजी करीत विदर्भाला तीन गड्यांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. गोवासींच्या 67 व रहिम यांच्या नाबाद 22 धावांनी विदर्भाची नाव तिरावर लागली. सांघिक प्रदर्शन आणि रहिम यांच्या अष्टपैलू कामगिरीने गाजलेला तो सामना रणजी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय ठरला. विजयानंतर अर्थातच व्हीसीएवर जल्लोषही झाला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zuNzrI
Read More
जाणा ई-लर्निंगचे तंत्र आणि मंत्र

सध्या ठिकठिकाणी ई-लर्निंगच्या प्राथमिक पातळीची अंमलबजावणी बघत आहोत. याची चांगली समज व त्यात परिपक्वता यायला वेळ लागेल. कोरोनामुळे घरात अडकलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासमोर ई-लर्निंग हा मार्ग पुढे आला. आभासी जगात पटकन रमणाऱ्या नव्या पिढीला हा मार्ग न रुचण्याचा प्रश्‍न नव्हता.

मी २००१मध्ये एक ई-लर्निंगवरील तयार केलेल्या सॉफ्टवेअरला ‘सर्वोत्तम कल्पक सॉफ्टवेअर’ म्हणून एका ‘आयईईई’प्रायोजित कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला. या सॉफ्टवेअरच्या पुढील विकासासाठी गुंतवणूकदारांकडे थोडे प्रयत्न केले, ‘तुम्ही काळाच्या खूप पुढचा विचार करताय...आपल्या इथे चांगले शिक्षक सहज उपलब्ध आहेत. आत्ता यासाठी भारतात मार्केट तयार नाहीये...’ असे मला सांगण्यात आले. मी ते सॉफ्टवेअर अमेरिकेत विकून टाकले. मात्र आज ई-लर्निंग ही अन्न, वस्त्र, निवारा यासारखीच मूलभूत गरज झाल्याचे पाहून गम्मत वाटली!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ई-लर्निंग म्हणजे काय?
ई-लर्निंगचे मुख्य दोन मार्ग असतात.
१) शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळेला समोरासमोर असतात. इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेला आभासी (व्हर्चुअल) क्लास.
२) शिक्षक लिखाण, चित्र, ध्वनी, व्हिडिओ आदींच्या माध्यमातून शिकण्याचे साहित्य तयार करतो आणि विद्यार्थांच्या सोयीप्रमाणे वेळ मिळेल तेव्हा सीडी, इंटरनेट, टीव्हीवर बघतो आणि विषय शिकतो. यात दोघे एकमेकांशी एकाच वेळी संवाद साधू शकत नाहीत.
शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पहिल्या मार्गाकडे वळतात. त्या वयात शिकताना संवादाची जास्त गरज असते. दुसऱ्या मार्गासाठी चांगल्या प्रतीचे आणि लक्षवेधक शिकण्याचे साहित्य तयार करणे हे वेळखाऊ आणि महागडे असते.

व्हर्चुअल क्लासचे पैलू
काही आठवड्यांत अनेक क्लास, शाळा, महाविद्यालयांचे ई-लर्निंगची (व्हर्चुअल क्लास) पद्धत आणि त्या वर्गाचे केलेले रेकॉर्डिंग बघितल्यावर ताबडतोब लक्षात आलं की दोष ई-लर्निंग तंत्रज्ञानात नसून राबविण्यात आहे. सर्वच ठिकाणी व्हाईटबोर्डसमोर कॅमेरा ठेवून क्लास घेतला जात होता. कॅमेरा फळ्यावर लिहिल्या जाणाऱ्या अक्षरावर केंद्रित करायचा की माणसावर, हा प्रश्‍न होता. यातील वापरलेले इतर मार्गही ठीक नव्हते.

ई-लर्निंगमधील चार मुद्दे विचारात घेतले पाहिजेत.
तंत्रज्ञानाची बाब : ऑनलाइन क्लाससाठी विविध सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. शिकविणाऱ्याकडे आणि शिकणाऱ्याकडे इंटरनेटचा वेग चांगला असल्यास अपेक्षित परिणाम मिळतात. शिक्षण खऱ्या वर्गातल्यासाखेच किंवा त्याहूनही परिणामकारक करण्यासाठी डिजिटल बोर्ड, डिजिटल पॅड आदी साधने आहेत. यामध्ये फळा पुसण्याची गरज भासत नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शिकविण्याची तंत्रे : नेहमीच्या वर्गात विद्यार्थी पाहिजे तेव्हा शिक्षकाकडे आणि पाहिजे तेव्हा फळ्याकडे पाहतो. त्याला दोन्ही पूर्ण दिसत असतात. आपण काय शिकवितोय त्याप्रमाणे इथे मात्र, फक्त स्क्रीनवर फळा दाखवायचा व आवाज ऐकावयाचा, केव्हा व्हिडिओमधून शिक्षकाचा चेहरा दाखवायचा, केव्हा शिक्षक पूर्णपणे दाखवायचा आणि केव्हा फळा व व्हिडिओ दोन्ही दाखवायचा, हे एकाच तासात वेळोवेळी बदलावे लागते. गोष्टीचे काठिण्य, विषयातील कुठला भाग आपण शिकवतोय, विषयाचा परिचय देतोय की परिचय संपवून आपण त्यातील विविध उदाहरणे सोडवतोय, खोलात जाऊन काही अभ्यासतोय का? आदी गोष्टींवर स्क्रीनवर काय काय दाखवायचे हे ठरते.

विद्यार्थ्यांची मानसिकता : नेहमीच्या वर्गात २ मिनिटाची शांतता, काहीच घडत नसल्यास मुलांचं लक्ष विचलित होते. आभासी जगात समोर ३० सेकंद काही न झाल्यास विद्यार्थी मनाने दुसऱ्या जगात जाऊ शकतो. एका वेळी अनेक मुले व्हर्चुअल क्लासमध्ये येतात आणि शिक्षक जेव्हा ‘मी बोलतो, तुम्ही फक्त ऐका’ हे बराच वेळ राबवितो तेव्हा मुलांचे लक्ष जास्त काळ केंद्रित होऊ शकत नाही. तंत्रज्ञान आणि त्यांची वैशिष्टये योग्य मार्गाने वापरून एवढ्या विद्यार्थ्यात परस्पर संवादी क्लास कसा चालवायचा हे माहीत असले, तरच हे फक्त स्वगत असलेले एकतर्फी भाष्य थांबते.

विद्यार्थ्यांच्या सामाजिक नात्याचे भान : मुले शिकायला एकत्र जमतात तेव्हा काही दिवसांतच त्यांचे आपापसात सामाजिक नाते तयार होते. तंत्रज्ञानाची काही वैशिष्ठ्ये वापरून विद्यार्थी शिकताना व इतर थोडा वेळही छोटे छोटे आभासी गट करून त्यांचे एकमेकांशी संवाद, (आभासी) मिसळणे हे उपलब्ध करून देता येते. अर्थात हे शिकलेले पक्के करायलाही उपयुक्त ठरते.

शिकविण्यातील ऊर्जा 
आपण हे विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून बघतोय. मात्र शिक्षकाला शिकविण्यातून मिळणाऱ्या प्रेरणेचे काय, असेही शिक्षक भेटले की त्यांना असे शिकण्यातून थकवा, निराशा आलीये. नेहमी विद्यार्थी समोर दिसतात. त्यांच्याशी बोलल्यामुळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरून शिक्षकाला ऊर्जा आणि समाधान मिळते. चांगला शिक्षक खऱ्या क्लासमध्ये शिकवताना वर्गात कितीही मुले असली तरीही प्रत्येकाकडे नजर टाकत असतो. त्या नजरेने ते दोघे हा वर्ग सुरू असताना एकमेकांशी बांधलेले असतात. आभासी जगात हे कुठल्या मार्गाने करायचे? 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ई-लर्निंग चे फायदे 
व्हर्चुअल क्लास या माध्यमातून शिक्षकाला लांब राहणारे विद्यार्थी मिळू शकतात आणि विद्यार्थ्याला उत्तम शिक्षकही. घरून शिकताना मुलांचा जाण्यायेण्यातला वेळ, पैसे, श्रम वाचतात. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिकण्याला/शिकविण्याला नेहमीच्या वर्गातील पद्धतीपेक्षा अधिक आकर्षक बनवण्याचीही यात क्षमता, व्याप्ती आहे. ई-लर्निंगमधील कुठेलेही तंत्रज्ञान हे शिक्षकालाही अजून सक्षम करण्यासाठी आहे.

ई-लर्निंगचे भविष्य 
लादलेले ई-लर्निंग केवळ पुढील दोन-तीन महिन्यांसाठी नसेल. लॉकडाउननंतर क्लासच्या क्षमतेच्या अर्ध्या क्षमतेने वर्ग भरवायला परवानगी दिली गेल्यास सुरक्षेची हमी आल्याशिवाय किती पालक आपल्या पाल्यांना वर्गात पाठवतील यात शंकाच आहे. अर्ध्या क्षमतेने वर्ग भरल्यास असे सर्वांसाठी वर्ग दुपटीने घेणार की याला तंत्रज्ञान काही वेगळे मार्ग देते ते अवलंबणार हे आपल्याला बघायला मिळेल. एकदा प्रभावी ई-लर्निंगवर पकड आल्यास लॉकडाउन पूर्ण उठल्यावरही हे नेहमीच्या वर्गातील पद्धतीला पूरक म्हणून राहू शकेल.

विविध पैलू लक्षात घेऊन ई-लर्निंगची समग्रपणे बांधणी करून राबविल्यास विद्यार्थी व शिक्षक दोघांसाठीही ते प्रभावी माध्यम आहे!

(लेखक सॉफ्टवेअर व ई-लर्निंग सल्लागार आहेत.)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जाणा ई-लर्निंगचे तंत्र आणि मंत्र सध्या ठिकठिकाणी ई-लर्निंगच्या प्राथमिक पातळीची अंमलबजावणी बघत आहोत. याची चांगली समज व त्यात परिपक्वता यायला वेळ लागेल. कोरोनामुळे घरात अडकलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासमोर ई-लर्निंग हा मार्ग पुढे आला. आभासी जगात पटकन रमणाऱ्या नव्या पिढीला हा मार्ग न रुचण्याचा प्रश्‍न नव्हता. मी २००१मध्ये एक ई-लर्निंगवरील तयार केलेल्या सॉफ्टवेअरला ‘सर्वोत्तम कल्पक सॉफ्टवेअर’ म्हणून एका ‘आयईईई’प्रायोजित कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला. या सॉफ्टवेअरच्या पुढील विकासासाठी गुंतवणूकदारांकडे थोडे प्रयत्न केले, ‘तुम्ही काळाच्या खूप पुढचा विचार करताय...आपल्या इथे चांगले शिक्षक सहज उपलब्ध आहेत. आत्ता यासाठी भारतात मार्केट तयार नाहीये...’ असे मला सांगण्यात आले. मी ते सॉफ्टवेअर अमेरिकेत विकून टाकले. मात्र आज ई-लर्निंग ही अन्न, वस्त्र, निवारा यासारखीच मूलभूत गरज झाल्याचे पाहून गम्मत वाटली! ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ई-लर्निंग म्हणजे काय? ई-लर्निंगचे मुख्य दोन मार्ग असतात. १) शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळेला समोरासमोर असतात. इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेला आभासी (व्हर्चुअल) क्लास. २) शिक्षक लिखाण, चित्र, ध्वनी, व्हिडिओ आदींच्या माध्यमातून शिकण्याचे साहित्य तयार करतो आणि विद्यार्थांच्या सोयीप्रमाणे वेळ मिळेल तेव्हा सीडी, इंटरनेट, टीव्हीवर बघतो आणि विषय शिकतो. यात दोघे एकमेकांशी एकाच वेळी संवाद साधू शकत नाहीत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पहिल्या मार्गाकडे वळतात. त्या वयात शिकताना संवादाची जास्त गरज असते. दुसऱ्या मार्गासाठी चांगल्या प्रतीचे आणि लक्षवेधक शिकण्याचे साहित्य तयार करणे हे वेळखाऊ आणि महागडे असते. व्हर्चुअल क्लासचे पैलू काही आठवड्यांत अनेक क्लास, शाळा, महाविद्यालयांचे ई-लर्निंगची (व्हर्चुअल क्लास) पद्धत आणि त्या वर्गाचे केलेले रेकॉर्डिंग बघितल्यावर ताबडतोब लक्षात आलं की दोष ई-लर्निंग तंत्रज्ञानात नसून राबविण्यात आहे. सर्वच ठिकाणी व्हाईटबोर्डसमोर कॅमेरा ठेवून क्लास घेतला जात होता. कॅमेरा फळ्यावर लिहिल्या जाणाऱ्या अक्षरावर केंद्रित करायचा की माणसावर, हा प्रश्‍न होता. यातील वापरलेले इतर मार्गही ठीक नव्हते. ई-लर्निंगमधील चार मुद्दे विचारात घेतले पाहिजेत. तंत्रज्ञानाची बाब : ऑनलाइन क्लाससाठी विविध सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. शिकविणाऱ्याकडे आणि शिकणाऱ्याकडे इंटरनेटचा वेग चांगला असल्यास अपेक्षित परिणाम मिळतात. शिक्षण खऱ्या वर्गातल्यासाखेच किंवा त्याहूनही परिणामकारक करण्यासाठी डिजिटल बोर्ड, डिजिटल पॅड आदी साधने आहेत. यामध्ये फळा पुसण्याची गरज भासत नाही. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा शिकविण्याची तंत्रे : नेहमीच्या वर्गात विद्यार्थी पाहिजे तेव्हा शिक्षकाकडे आणि पाहिजे तेव्हा फळ्याकडे पाहतो. त्याला दोन्ही पूर्ण दिसत असतात. आपण काय शिकवितोय त्याप्रमाणे इथे मात्र, फक्त स्क्रीनवर फळा दाखवायचा व आवाज ऐकावयाचा, केव्हा व्हिडिओमधून शिक्षकाचा चेहरा दाखवायचा, केव्हा शिक्षक पूर्णपणे दाखवायचा आणि केव्हा फळा व व्हिडिओ दोन्ही दाखवायचा, हे एकाच तासात वेळोवेळी बदलावे लागते. गोष्टीचे काठिण्य, विषयातील कुठला भाग आपण शिकवतोय, विषयाचा परिचय देतोय की परिचय संपवून आपण त्यातील विविध उदाहरणे सोडवतोय, खोलात जाऊन काही अभ्यासतोय का? आदी गोष्टींवर स्क्रीनवर काय काय दाखवायचे हे ठरते. विद्यार्थ्यांची मानसिकता : नेहमीच्या वर्गात २ मिनिटाची शांतता, काहीच घडत नसल्यास मुलांचं लक्ष विचलित होते. आभासी जगात समोर ३० सेकंद काही न झाल्यास विद्यार्थी मनाने दुसऱ्या जगात जाऊ शकतो. एका वेळी अनेक मुले व्हर्चुअल क्लासमध्ये येतात आणि शिक्षक जेव्हा ‘मी बोलतो, तुम्ही फक्त ऐका’ हे बराच वेळ राबवितो तेव्हा मुलांचे लक्ष जास्त काळ केंद्रित होऊ शकत नाही. तंत्रज्ञान आणि त्यांची वैशिष्टये योग्य मार्गाने वापरून एवढ्या विद्यार्थ्यात परस्पर संवादी क्लास कसा चालवायचा हे माहीत असले, तरच हे फक्त स्वगत असलेले एकतर्फी भाष्य थांबते. विद्यार्थ्यांच्या सामाजिक नात्याचे भान : मुले शिकायला एकत्र जमतात तेव्हा काही दिवसांतच त्यांचे आपापसात सामाजिक नाते तयार होते. तंत्रज्ञानाची काही वैशिष्ठ्ये वापरून विद्यार्थी शिकताना व इतर थोडा वेळही छोटे छोटे आभासी गट करून त्यांचे एकमेकांशी संवाद, (आभासी) मिसळणे हे उपलब्ध करून देता येते. अर्थात हे शिकलेले पक्के करायलाही उपयुक्त ठरते. शिकविण्यातील ऊर्जा  आपण हे विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून बघतोय. मात्र शिक्षकाला शिकविण्यातून मिळणाऱ्या प्रेरणेचे काय, असेही शिक्षक भेटले की त्यांना असे शिकण्यातून थकवा, निराशा आलीये. नेहमी विद्यार्थी समोर दिसतात. त्यांच्याशी बोलल्यामुळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरून शिक्षकाला ऊर्जा आणि समाधान मिळते. चांगला शिक्षक खऱ्या क्लासमध्ये शिकवताना वर्गात कितीही मुले असली तरीही प्रत्येकाकडे नजर टाकत असतो. त्या नजरेने ते दोघे हा वर्ग सुरू असताना एकमेकांशी बांधलेले असतात. आभासी जगात हे कुठल्या मार्गाने करायचे?  आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा ई-लर्निंग चे फायदे  व्हर्चुअल क्लास या माध्यमातून शिक्षकाला लांब राहणारे विद्यार्थी मिळू शकतात आणि विद्यार्थ्याला उत्तम शिक्षकही. घरून शिकताना मुलांचा जाण्यायेण्यातला वेळ, पैसे, श्रम वाचतात. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिकण्याला/शिकविण्याला नेहमीच्या वर्गातील पद्धतीपेक्षा अधिक आकर्षक बनवण्याचीही यात क्षमता, व्याप्ती आहे. ई-लर्निंगमधील कुठेलेही तंत्रज्ञान हे शिक्षकालाही अजून सक्षम करण्यासाठी आहे. ई-लर्निंगचे भविष्य  लादलेले ई-लर्निंग केवळ पुढील दोन-तीन महिन्यांसाठी नसेल. लॉकडाउननंतर क्लासच्या क्षमतेच्या अर्ध्या क्षमतेने वर्ग भरवायला परवानगी दिली गेल्यास सुरक्षेची हमी आल्याशिवाय किती पालक आपल्या पाल्यांना वर्गात पाठवतील यात शंकाच आहे. अर्ध्या क्षमतेने वर्ग भरल्यास असे सर्वांसाठी वर्ग दुपटीने घेणार की याला तंत्रज्ञान काही वेगळे मार्ग देते ते अवलंबणार हे आपल्याला बघायला मिळेल. एकदा प्रभावी ई-लर्निंगवर पकड आल्यास लॉकडाउन पूर्ण उठल्यावरही हे नेहमीच्या वर्गातील पद्धतीला पूरक म्हणून राहू शकेल. विविध पैलू लक्षात घेऊन ई-लर्निंगची समग्रपणे बांधणी करून राबविल्यास विद्यार्थी व शिक्षक दोघांसाठीही ते प्रभावी माध्यम आहे! (लेखक सॉफ्टवेअर व ई-लर्निंग सल्लागार आहेत.) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UGhAft
Read More
घर खरेदीचे स्वप्न करा साकार!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जाहीर केलेल्या रु.20 लाख कोटींच्या पॅकेजमधील मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे, परवडणाऱ्या घर खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या सरकारी अनुदान योजनेला दिलेली मुदतवाढ. या योजनेला "प्रधानमंत्री आवास  योजनेअंतर्गत क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम' असे नाव असून तिची मुदत 31 मार्च 2020 रोजी संपली होती, जी आता 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही योजना 2017 पासून अस्तित्वात असून आतापर्यंत सुमारे 3.30 लाख लोकांनी लाभ घेतला आहे. पुढील वर्षापर्यंत आणखी 2.50 लाख मध्यमवर्गीय याचा फायदा घेतली असा अंदाज आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ज्या कुटुंबाकडे स्वतःचे पक्के घर नाही, असे कुटुंब या योजनेखाली घर खरेदी करू शकते. एखाद्या कुटुंबातील एखादी कमावती व्यक्तीही (लग्न झालेले असो किंवा नसो) घर खरेदी करू शकते. पुर्नखरेदीच्या (रिसेल) घरासाठी देखील अनुदान मिळू शकते. अनुदानासाठी आपण ज्या ठिकाणाहून गृहकर्ज घेणार आहात, तिथूनच अर्ज करायचा असतो. सुमारे 3 ते 6 महिन्यांत अनुदानाची रक्कम आपल्या गृहकर्ज खात्यात जमा करण्यात येते. तेव्हापासून तुमचे कर्ज व "ईएमआय' कमी होतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रु.सहा लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना 6.5 टक्क्यांपर्यंत अनुदान (2.67 लाख रुपयांपर्यंत) मिळू शकते;ज्या योजनेला "ईडब्लूएस/एलआयजी' असे नाव आहे. अनुदान जास्तीतजास्त रु.9 आणि रु 12 लाखांवर मिळते. पण त्यापेक्षा अधिक कर्ज घेऊ शकता. गृहकर्जावरील कमी झालेले व्याजदर आणि योजनेला दिलेली मुदतवाढ ही घरखरेदीसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

हेही वाचा : ईएमआय हॉलिडे कोणासाठी? 

"असावे घर ते आपुले छान' असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. घर खरेदी प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. इतरवेळी कर्ज  काढण्यास बिचकणारे सुद्धा घरासाठी कर्ज घेतात. कारण यातून "ऍसेट' निर्माण होते. जुन्या करप्रणालीत कर सवलत मिळतेच. त्यात आणखी सरकारी अनुदान म्हणजे दुग्धशर्करा योग!

लेखक निवृत्त बँक अधिकारी आहेत.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

घर खरेदीचे स्वप्न करा साकार! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जाहीर केलेल्या रु.20 लाख कोटींच्या पॅकेजमधील मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे, परवडणाऱ्या घर खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या सरकारी अनुदान योजनेला दिलेली मुदतवाढ. या योजनेला "प्रधानमंत्री आवास  योजनेअंतर्गत क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम' असे नाव असून तिची मुदत 31 मार्च 2020 रोजी संपली होती, जी आता 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही योजना 2017 पासून अस्तित्वात असून आतापर्यंत सुमारे 3.30 लाख लोकांनी लाभ घेतला आहे. पुढील वर्षापर्यंत आणखी 2.50 लाख मध्यमवर्गीय याचा फायदा घेतली असा अंदाज आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ज्या कुटुंबाकडे स्वतःचे पक्के घर नाही, असे कुटुंब या योजनेखाली घर खरेदी करू शकते. एखाद्या कुटुंबातील एखादी कमावती व्यक्तीही (लग्न झालेले असो किंवा नसो) घर खरेदी करू शकते. पुर्नखरेदीच्या (रिसेल) घरासाठी देखील अनुदान मिळू शकते. अनुदानासाठी आपण ज्या ठिकाणाहून गृहकर्ज घेणार आहात, तिथूनच अर्ज करायचा असतो. सुमारे 3 ते 6 महिन्यांत अनुदानाची रक्कम आपल्या गृहकर्ज खात्यात जमा करण्यात येते. तेव्हापासून तुमचे कर्ज व "ईएमआय' कमी होतो. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा रु.सहा लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना 6.5 टक्क्यांपर्यंत अनुदान (2.67 लाख रुपयांपर्यंत) मिळू शकते;ज्या योजनेला "ईडब्लूएस/एलआयजी' असे नाव आहे. अनुदान जास्तीतजास्त रु.9 आणि रु 12 लाखांवर मिळते. पण त्यापेक्षा अधिक कर्ज घेऊ शकता. गृहकर्जावरील कमी झालेले व्याजदर आणि योजनेला दिलेली मुदतवाढ ही घरखरेदीसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. हेही वाचा : ईएमआय हॉलिडे कोणासाठी?  "असावे घर ते आपुले छान' असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. घर खरेदी प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. इतरवेळी कर्ज  काढण्यास बिचकणारे सुद्धा घरासाठी कर्ज घेतात. कारण यातून "ऍसेट' निर्माण होते. जुन्या करप्रणालीत कर सवलत मिळतेच. त्यात आणखी सरकारी अनुदान म्हणजे दुग्धशर्करा योग! लेखक निवृत्त बँक अधिकारी आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37wNkZH
Read More
पुणे महापालिकेच्या निर्णयामुळे जुन्या सोसायट्यांचा होणार पुनर्विकास 

पुणे - शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांचे नऊ मीटर रुंदीकरण करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयामुळे जुन्या हद्दीतील रखडलेल्या अनेक सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास 28 जानेवारी 2016 रोजी राज्य सरकारने बंदी घातली आहे. तोच निर्णय जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यास 2017 मान्यता देताना बांधकाम नियंत्रण नियमावलीमध्ये कायम करण्यात आला. या निर्णयामुळे कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर, बिबवेवाडी, सातारा स्त्याचा बराचसा परिसर, सॅलसबरी पार्क, गुलटेकडी, बोट क्‍लब रस्ता आदी जुन्या हद्दीतील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावर असलेल्या सुमारे तीस ते चाळीस वर्षे जुन्या असलेल्या सोसायट्यांचा पुनर्विकास रखडला होता. त्यामुळे या सोसायट्यांतील रहिवाशांचे मोठ्या घराचे स्वप्न कागदावरच राहिले होते. त्यातून मार्ग काढावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांकडून केली जात होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांचे 210 कलमाखाली नऊ मीटर रुंदीकरण करून त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मांडला होता. स्थायी समितीने त्यास मान्यता दिली. त्यावर हरकती-सूचना मागवून त्यानंतर त्यास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 323 रस्त्यांचा समावेश असला, तरी टप्प्याटप्प्प्याने शहराच्या जुन्या हद्दीतील सर्वच रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कोथरूडमधील मधुकोमल सोसायटीत मी राहतो. चाळीस वर्षे जुनी सोसायटी आहे. परिसरात अशा दहा सोसायट्या आहेत. सोसायटीपुढील रस्ता सहा मीटर रुंद आहे. त्यामुळे सोसायटीचा पुनर्विकास रखडला आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे तो मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. 
-चंद्रशेखर कुलकर्णी, रहिवासी 

आमची प्रभात रस्त्यावर विनायक सोसायटी आहे. सोसायटीपुढील रस्ता सहा मीटर रुंदीचा आहे. "टीडीआर' मिळत नसल्यामुळे बांधकाम व्यावसायिक पुनर्विकासासाठी पुढे येत नव्हते. या निर्णयामुळे सोसायट्यांचे पुनर्विकासाची स्वप्ने मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. 
-संजीव फणसळकर, रहिवासी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे महापालिकेच्या निर्णयामुळे जुन्या सोसायट्यांचा होणार पुनर्विकास  पुणे - शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांचे नऊ मीटर रुंदीकरण करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयामुळे जुन्या हद्दीतील रखडलेल्या अनेक सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास 28 जानेवारी 2016 रोजी राज्य सरकारने बंदी घातली आहे. तोच निर्णय जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यास 2017 मान्यता देताना बांधकाम नियंत्रण नियमावलीमध्ये कायम करण्यात आला. या निर्णयामुळे कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर, बिबवेवाडी, सातारा स्त्याचा बराचसा परिसर, सॅलसबरी पार्क, गुलटेकडी, बोट क्‍लब रस्ता आदी जुन्या हद्दीतील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावर असलेल्या सुमारे तीस ते चाळीस वर्षे जुन्या असलेल्या सोसायट्यांचा पुनर्विकास रखडला होता. त्यामुळे या सोसायट्यांतील रहिवाशांचे मोठ्या घराचे स्वप्न कागदावरच राहिले होते. त्यातून मार्ग काढावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांकडून केली जात होती.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांचे 210 कलमाखाली नऊ मीटर रुंदीकरण करून त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मांडला होता. स्थायी समितीने त्यास मान्यता दिली. त्यावर हरकती-सूचना मागवून त्यानंतर त्यास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 323 रस्त्यांचा समावेश असला, तरी टप्प्याटप्प्प्याने शहराच्या जुन्या हद्दीतील सर्वच रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  कोथरूडमधील मधुकोमल सोसायटीत मी राहतो. चाळीस वर्षे जुनी सोसायटी आहे. परिसरात अशा दहा सोसायट्या आहेत. सोसायटीपुढील रस्ता सहा मीटर रुंद आहे. त्यामुळे सोसायटीचा पुनर्विकास रखडला आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे तो मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.  -चंद्रशेखर कुलकर्णी, रहिवासी  आमची प्रभात रस्त्यावर विनायक सोसायटी आहे. सोसायटीपुढील रस्ता सहा मीटर रुंदीचा आहे. "टीडीआर' मिळत नसल्यामुळे बांधकाम व्यावसायिक पुनर्विकासासाठी पुढे येत नव्हते. या निर्णयामुळे सोसायट्यांचे पुनर्विकासाची स्वप्ने मार्गी लागण्याची शक्‍यता आहे.  -संजीव फणसळकर, रहिवासी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ADQnn5
Read More
आयुर्विमा पॉलिसीविषयी A टू Z

1. प्रपोजल फॉर्मचे महत्त्व: प्रपोजल फॉर्म भरताना स्वतःचे आणि कुटुंबियांचे आरोग्य आणि सवयी, पूर्वीच्या पॉलिसी, आर्थिक उत्पन्न याविषयी संपूर्ण सत्य माहिती देणे आवश्यक आहे. यात असत्यतता आढळल्यास पॉलिसी रद्दबातल ठरून भरलेल्या प्रीमियमची रक्कम जप्त होऊ शकते.

2. फ्री लुक पिरियड: पॉलिसी करारातील काही अटी/शर्ती मान्य नसल्यास पॉलिसी मिळाल्या पासून 15  दिवसांच्या काळात पॉलिसी दस्तावेज विमा कंपनीला  परत देऊन आपले भरलेले पैसे आपण परत मिळवू शकता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

3. ग्रेस पिरियड: "ग्रेस पिरियड'मध्ये प्रीमियम न भरल्यास पॉलिसी बंद पडून विमेदाराचे नुकसान होऊ शकते.

4. पॉलिसीचे पुनरुज्जीवन: सर्वसामान्यपणे पॉलिसी बंद पडल्या पासून 5 वर्षाच्या काळात  थकलेले सर्व प्रीमियम व्याजासह भरून आणि प्रकृतिविषयक दाखला, वैद्यकीय तपासणी अहवाल इ. जरूर त्या कागदपत्रांची पूर्तता करून बंद पॉलिसी पुन्हा चालू करता येते.

5. सरेंडर टाळा: पारंपरिक विमा योजनांमध्ये पॉलिसी सरेंडर करणे हे आर्थिक नुकसानीचे ठरते. त्यापेक्षा अल्पकालीन गरजेसाठी पॉलिसीवर कर्ज घेणे आधिक चांगले. युलिप्स प्रकारातील पॉलिसीमध्ये मात्र सामान्यपणे 5 वर्षानंतर सरेंडर चार्ज लागत नाही. त्यामुळे आकर्षक फंड व्हॅल्यू मिळत असेल तर पॉलिसी सरेंडर करणे  नुकसानीचे  ठरत नाही.

हेही वाचा : युलिप्स म्हणजे काय? 

6. टर्म इन्शुरन्स...आवश्यकच: पॉलिसीचा प्रमुख हेतु "विमा संरक्षण' हा आहे. त्या दृष्टीने अत्यल्प प्रीमियम मध्ये भरघोस  संरक्षण देणारी "टर्म इन्शुरन्स' ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.

7. रायडर्स: मूळ पॉलिसीबरोबर अपघाती फायदा, अपंगत्व फायदा, "क्रिटिकल इलनेस रायडर' असे काही रायडर्स घेऊन आपण परिपूर्ण संरक्षण मिळवू शकतो.

8. प्राप्तिकरात सूट: आयुर्विमा पॉलिसीचे भरलेले प्रीमियम प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सी नुसार सूट मिळण्यास पात्र ठरतात. शिवाय बोनससह क्लेमपोटी मिळणारी रक्कम कलम 10 (10डी) नुसार करमुक्त असते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

9.कोलॅटरल: गृहकर्ज घेताना "कोलॅटरल' (ज्यादाची सुरक्षितता) म्हणून आयुर्विमा पॉलिसी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

10. मृत्युदाव्या विषयी: मृत्यु दाव्याच्यावेळी नॉमिनीने विमा कंपनीस विमेदाराच्या मृत्युविषयी सूचित केल्यानंतर विमा कंपनी जरूर त्या कागदपत्रांची मागणी करते. सामान्यपणे मूळ पॉलिसी, मूळ मृत्यु दाखला आणि नॉमिनीने "डिस्चार्ज फॉर्म'सह भरावयाचा एक छोटा फॉर्म एवढेच कागदपत्र लागतात. ज्यायोगे, क्लेम विनासायास मंजूर होऊन नॉमिनीच्या खात्यावर रक्कम जमा होते. जर विमाधारकाचा मृत्यू पॉलिसी घेतल्यापासून अल्पकाळात झाला असेल तर शेवटच्या आजारात उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सर्टिफिकेट, हॉस्पिटल रिपोर्ट इ. कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते. अपघाती मृत्यू झाल्यास पंचनामा, एफआयआर, पोस्टमार्टम रिपोर्ट याची आवश्यकता असते.

लेखक निवृत्त विमा अधिकारी आणि प्रशिक्षण सल्लागार आहेत.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आयुर्विमा पॉलिसीविषयी A टू Z 1. प्रपोजल फॉर्मचे महत्त्व: प्रपोजल फॉर्म भरताना स्वतःचे आणि कुटुंबियांचे आरोग्य आणि सवयी, पूर्वीच्या पॉलिसी, आर्थिक उत्पन्न याविषयी संपूर्ण सत्य माहिती देणे आवश्यक आहे. यात असत्यतता आढळल्यास पॉलिसी रद्दबातल ठरून भरलेल्या प्रीमियमची रक्कम जप्त होऊ शकते. 2. फ्री लुक पिरियड: पॉलिसी करारातील काही अटी/शर्ती मान्य नसल्यास पॉलिसी मिळाल्या पासून 15  दिवसांच्या काळात पॉलिसी दस्तावेज विमा कंपनीला  परत देऊन आपले भरलेले पैसे आपण परत मिळवू शकता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  3. ग्रेस पिरियड: "ग्रेस पिरियड'मध्ये प्रीमियम न भरल्यास पॉलिसी बंद पडून विमेदाराचे नुकसान होऊ शकते. 4. पॉलिसीचे पुनरुज्जीवन: सर्वसामान्यपणे पॉलिसी बंद पडल्या पासून 5 वर्षाच्या काळात  थकलेले सर्व प्रीमियम व्याजासह भरून आणि प्रकृतिविषयक दाखला, वैद्यकीय तपासणी अहवाल इ. जरूर त्या कागदपत्रांची पूर्तता करून बंद पॉलिसी पुन्हा चालू करता येते. 5. सरेंडर टाळा: पारंपरिक विमा योजनांमध्ये पॉलिसी सरेंडर करणे हे आर्थिक नुकसानीचे ठरते. त्यापेक्षा अल्पकालीन गरजेसाठी पॉलिसीवर कर्ज घेणे आधिक चांगले. युलिप्स प्रकारातील पॉलिसीमध्ये मात्र सामान्यपणे 5 वर्षानंतर सरेंडर चार्ज लागत नाही. त्यामुळे आकर्षक फंड व्हॅल्यू मिळत असेल तर पॉलिसी सरेंडर करणे  नुकसानीचे  ठरत नाही. हेही वाचा : युलिप्स म्हणजे काय?  6. टर्म इन्शुरन्स...आवश्यकच: पॉलिसीचा प्रमुख हेतु "विमा संरक्षण' हा आहे. त्या दृष्टीने अत्यल्प प्रीमियम मध्ये भरघोस  संरक्षण देणारी "टर्म इन्शुरन्स' ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. 7. रायडर्स: मूळ पॉलिसीबरोबर अपघाती फायदा, अपंगत्व फायदा, "क्रिटिकल इलनेस रायडर' असे काही रायडर्स घेऊन आपण परिपूर्ण संरक्षण मिळवू शकतो. 8. प्राप्तिकरात सूट: आयुर्विमा पॉलिसीचे भरलेले प्रीमियम प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सी नुसार सूट मिळण्यास पात्र ठरतात. शिवाय बोनससह क्लेमपोटी मिळणारी रक्कम कलम 10 (10डी) नुसार करमुक्त असते. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 9.कोलॅटरल: गृहकर्ज घेताना "कोलॅटरल' (ज्यादाची सुरक्षितता) म्हणून आयुर्विमा पॉलिसी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. 10. मृत्युदाव्या विषयी: मृत्यु दाव्याच्यावेळी नॉमिनीने विमा कंपनीस विमेदाराच्या मृत्युविषयी सूचित केल्यानंतर विमा कंपनी जरूर त्या कागदपत्रांची मागणी करते. सामान्यपणे मूळ पॉलिसी, मूळ मृत्यु दाखला आणि नॉमिनीने "डिस्चार्ज फॉर्म'सह भरावयाचा एक छोटा फॉर्म एवढेच कागदपत्र लागतात. ज्यायोगे, क्लेम विनासायास मंजूर होऊन नॉमिनीच्या खात्यावर रक्कम जमा होते. जर विमाधारकाचा मृत्यू पॉलिसी घेतल्यापासून अल्पकाळात झाला असेल तर शेवटच्या आजारात उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सर्टिफिकेट, हॉस्पिटल रिपोर्ट इ. कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते. अपघाती मृत्यू झाल्यास पंचनामा, एफआयआर, पोस्टमार्टम रिपोर्ट याची आवश्यकता असते. लेखक निवृत्त विमा अधिकारी आणि प्रशिक्षण सल्लागार आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3e0Rcok
Read More