Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, June 11, 2020

अश्वेत को Ugly पढ़ाने पर बंगाल सरकार की कार्रवाई, दो टीचर सस्पेंड https://ift.tt/2UvHUZV
दिल्ली: डॉक्टरों को 3 महीने से नहीं मिला वेतन, DMA ने शाह को लिखा खत https://ift.tt/2XUH1w7
Horoscope Today, 12 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2XUH0s3
CPIM के वरिष्ठ नेता पी के कुंजनंदन का 73 साल की उम्र में निधन https://ift.tt/3hn2Fk2
दिल्ली: अस्पताल में बेड नहीं, सोसाइटी में लोगों ने किया ऑक्सीजन बेड का इंतजाम https://ift.tt/2MOJqlo
श्रद्धा कपूर को पसंद स्ट्रीट फूड, वडा पाव खाते हुए थ्रोबैक वीडियो वायरल https://ift.tt/30yI7iL
अंडे फूटने पर मां ने बेटी का सिर दीवार पर दे मारा, मासूम ने तोड़ा दम https://ift.tt/37n7a9I
लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!

औरंगाबाद : एकीकडे लॉकडाउन सुरू असताना घराबाहेर निघण्याचीच कोंडी झाली असतानाच दुसरीकडे कमी लोकांच्या उपस्थितीत, कमी खर्चात बालविवाह ‘उरकून’ घेण्याकडे ग्रामीण भागात जणू पेव फुटले आहे. असे असले तरी लॉकडाउनच्या काळातही बालसंरक्षण कक्ष तत्पर असून, जिल्हाभरात तब्बल आठ बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या पथकाला यश आले आहे. 

कक्षाच्या पथकाने तसेच गावपातळीवरील स्थानिकांच्या मदतीने गंगापूर तालुक्यातील दोन, पैठण- दोन, सिल्लोड-दोन, सोयगाव -दोन तसेच शहर परिसरातील एक असे आठ बालविवाह रोखण्यात आले आहेत. 
 

बालविवाह लावताय...ही होईल शिक्षा 
बालविवाह लावल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ सुधारित (२०१६) अन्वये मुलीचे वय १८ वर्षे, मुलाचे २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच विवाह केला तर बालविवाह समजून शिक्षा केली जाते. हा अजामीनपात्र गुन्हा ठरतो व संबंधितास दोन वर्षे कैद, एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच बालविवाह घडवून आणण्यास प्रत्यक्ष मदत केली असल्यास सर्वांना दोषीही मानले जाते. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 
 

बालसंरक्षण  कक्षाचे प्रशंसनीय कार्य 
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांनी सांगितले, की लॉकडाउनच्या काळातही बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्षाची करडी नजर आहे. यामध्ये जिल्हा बालसंरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, संरक्षण अधिकारी कल्पना मोहिते, समाजकार्यकर्ता दीपक बजारे, मनीषा खंडाळे, समुपदेशक सोनू राहिंज, कायदा व परिवीक्षा अधिकारी सुप्रिया इंगळे, क्षेत्रीय कार्यकर्ते कैलास पंडित, सुनील गायकवाड यांच्या चमूने कोरोनाची भीती न बाळगता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन प्रयत्न केल्याने तसेच संबंधित पोलिस प्रशासन, चाइल्डलाइन, बालकल्याण, संबंधित सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामबालसंरक्षण समितीच्या सहकार्यानेच हे आठ बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास
 

लॉकडाउनमध्ये घरातल्या घरात बालविवाह उरकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची टीम सतर्क आहे. मुळात बालविवाह हा गुन्हा तर आहेच, शिवाय यामुळे मुलींच्या आरोग्य, मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो. बालविवाह लावणाऱ्या पालकांना याविषयी समुपदेशन केल्यानंतर त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो. 
- हर्षा डी. देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’! औरंगाबाद : एकीकडे लॉकडाउन सुरू असताना घराबाहेर निघण्याचीच कोंडी झाली असतानाच दुसरीकडे कमी लोकांच्या उपस्थितीत, कमी खर्चात बालविवाह ‘उरकून’ घेण्याकडे ग्रामीण भागात जणू पेव फुटले आहे. असे असले तरी लॉकडाउनच्या काळातही बालसंरक्षण कक्ष तत्पर असून, जिल्हाभरात तब्बल आठ बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या पथकाला यश आले आहे.  कक्षाच्या पथकाने तसेच गावपातळीवरील स्थानिकांच्या मदतीने गंगापूर तालुक्यातील दोन, पैठण- दोन, सिल्लोड-दोन, सोयगाव -दोन तसेच शहर परिसरातील एक असे आठ बालविवाह रोखण्यात आले आहेत.    बालविवाह लावताय...ही होईल शिक्षा  बालविवाह लावल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ सुधारित (२०१६) अन्वये मुलीचे वय १८ वर्षे, मुलाचे २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच विवाह केला तर बालविवाह समजून शिक्षा केली जाते. हा अजामीनपात्र गुन्हा ठरतो व संबंधितास दोन वर्षे कैद, एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच बालविवाह घडवून आणण्यास प्रत्यक्ष मदत केली असल्यास सर्वांना दोषीही मानले जाते.  औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात    बालसंरक्षण  कक्षाचे प्रशंसनीय कार्य  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांनी सांगितले, की लॉकडाउनच्या काळातही बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्षाची करडी नजर आहे. यामध्ये जिल्हा बालसंरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, संरक्षण अधिकारी कल्पना मोहिते, समाजकार्यकर्ता दीपक बजारे, मनीषा खंडाळे, समुपदेशक सोनू राहिंज, कायदा व परिवीक्षा अधिकारी सुप्रिया इंगळे, क्षेत्रीय कार्यकर्ते कैलास पंडित, सुनील गायकवाड यांच्या चमूने कोरोनाची भीती न बाळगता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन प्रयत्न केल्याने तसेच संबंधित पोलिस प्रशासन, चाइल्डलाइन, बालकल्याण, संबंधित सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामबालसंरक्षण समितीच्या सहकार्यानेच हे आठ बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे.  मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास   लॉकडाउनमध्ये घरातल्या घरात बालविवाह उरकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची टीम सतर्क आहे. मुळात बालविवाह हा गुन्हा तर आहेच, शिवाय यामुळे मुलींच्या आरोग्य, मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो. बालविवाह लावणाऱ्या पालकांना याविषयी समुपदेशन केल्यानंतर त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो.  - हर्षा डी. देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XVmjfi
Read More
63 वर्षांपूर्वी विदर्भाने व्हीसीएवर फोडला होता उत्तर प्रदेशला घाम!

नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळून जेमतेम दहा वर्षे लोटली होती. त्या काळात बीसीसीआयचे घरगुती सामने होत असले तरी, विभागवार लढती मात्र 1956-57 पासून सुरू झाल्या. दुसऱ्याच वर्षी नागपूरकरांना विदर्भ आणि उत्तर प्रदेश यांच्यातील तीनदिवसीय रणजी सामना जवळून पाहायला मिळाला. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या त्या ऐतिहासिक लढतीत उत्तर प्रदेशने पहिल्या डावातील आघाडीवर निसटती बाजी मारली. मात्र, सामना वाचविताना पाहुण्या संघाची शेवटीशेवटी चांगलीच दमछाक झाली. 

कमी धावसंख्येचे (लो स्कोअरिंग) सामने नेहमीच रोमांचक व नाट्यमय ठरतात. 63 वर्षांपूर्वी (डिसेंबर 1957 मध्ये) झालेला तो सामनाही असाच अनुभव देणारा होता. बलाढ्य उत्तर प्रदेश संघात महान क्रिकेटपटू कर्नल सी. के. नायडू यांचे धाकटे बंधू कर्णधार सी. एस. नायडू, विजय मांजरेकर, ए. के. चतुर्वेदी, आर. मारवाह, आर. कृष्णमूर्ती, के. एम. तिवारी, व्ही. एस. मोदी, ए. डी. भंडारींसारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश होता. तर एस. ए. रहिम यांच्या नेतृत्वाखालील यजमान विदर्भ संघही टॅलेंटच्या बाबतीत कुठेच कमी नव्हता. संघात एम. के. जोशी, पी. डब्ल्यू. बारलिंगे, व्ही. डी. सांबरे, पी. एम. गोखले, आर. नरसिम्हन, एस. के. साहू, एन. मनियन, डब्ल्यू. डी. साने, डी. डी. देशपांडे, एम. एच. साठेसारखे नावाजलेले फलंदाज व गोलंदाज होते. 

हेही वाचा  : विदर्भाने 29 वर्षांपूर्वी दाखवला होता राजस्थानला इंगा

"मॅटिन विकेट'वर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विदर्भाची सी. एस. नायडू यांच्या अचूक माऱ्यापुढे चांगलीच दाणादाण उडाली. अख्खा संघ पहिल्याच दिवशी 166 धावांत गारद झाला. नायडूंनी सर्वाधिक सात, तर मांजरेकर यांनी एकही धाव न देता तीन गडी बाद केले. खेळपट्‌टीवर "अनइव्हन बाऊन्स' असल्याने उत्तर प्रदेशलाही धावा काढणे कठीण जाणार होते. आणि घडलेही तसेच. त्यांचाही डाव अवघ्या 178 धावांवरच गडगडला. पण, पहिल्या डावात 12 धावांची निसटती आघाडी घेत उत्तर प्रदेशने अर्धीअधिक लढाई जिंकली. विदर्भाच्या दुसऱ्या डावातही नायडू भारी पडले. त्यांनी पुन्हा सहा गडी बाद करून विदर्भाला 194 धावांवर थोपवून धरले. विदर्भाची अवस्था याहून वाईट झाली असती. सुदैवाने नवव्या स्थानावर फलंदाजीस आलेले डी. डी. देशपांडे (49 धावा) व दहाव्या स्थानावरील साने (नाबाद 40) यांनी चिवट फलंदाजी केल्याने विदर्भ 194 धावांपर्यंत पोहोचू शकला. 

केसाच्या अंतराने हुकला विदर्भाचा विजय 

उत्तर प्रदेशला सामना जिंकण्यासाठी 65 षटकांमध्ये 183 धावा हव्या होत्या. विदर्भ सामना जिंकू शकतो, अशी शक्‍यता बळावल्याने मैदानावर प्रेक्षकांचीही बऱ्यापैकी गर्दी होती. आघाडी फळीतील मारवाह व मांजरेकर यांनी दमदार सुरुवात करून उत्तर प्रदेशच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण, साने यांनी एकापाठोपाठ चार गडी बाद करून सामन्याचे चित्र विदर्भाच्या दिशेने झुकविले. विदर्भाला विजयासाठी दोन गड्यांची आवश्‍यकता असताना नायडू यांनी फलंदाजीतही योगदान देत विदर्भाच्या आशेवर पाणी फेरले. सामना अनिर्णीत संपला तेव्हा उत्तर प्रदेशची दुसऱ्या डावात 8 बाद 112 धावा अशी घसरगुंडी उडाली होती. अखेर पहिल्या डावाच्या आघाडीवर उत्तर प्रदेश विजयी ठरला. सामन्याच्या निकालाने वैदर्भी चाहत्यांची निराशा झाली. पण, अटीतटीचा सामना पाहायला मिळाल्याचे त्यांना समाधानही होते. त्या काळात खेळलेले बहुतांश खेळाडू आता हयात नाहीत. पण, त्यांनी केलेली कामगिरी आजही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

63 वर्षांपूर्वी विदर्भाने व्हीसीएवर फोडला होता उत्तर प्रदेशला घाम! नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळून जेमतेम दहा वर्षे लोटली होती. त्या काळात बीसीसीआयचे घरगुती सामने होत असले तरी, विभागवार लढती मात्र 1956-57 पासून सुरू झाल्या. दुसऱ्याच वर्षी नागपूरकरांना विदर्भ आणि उत्तर प्रदेश यांच्यातील तीनदिवसीय रणजी सामना जवळून पाहायला मिळाला. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या त्या ऐतिहासिक लढतीत उत्तर प्रदेशने पहिल्या डावातील आघाडीवर निसटती बाजी मारली. मात्र, सामना वाचविताना पाहुण्या संघाची शेवटीशेवटी चांगलीच दमछाक झाली.  कमी धावसंख्येचे (लो स्कोअरिंग) सामने नेहमीच रोमांचक व नाट्यमय ठरतात. 63 वर्षांपूर्वी (डिसेंबर 1957 मध्ये) झालेला तो सामनाही असाच अनुभव देणारा होता. बलाढ्य उत्तर प्रदेश संघात महान क्रिकेटपटू कर्नल सी. के. नायडू यांचे धाकटे बंधू कर्णधार सी. एस. नायडू, विजय मांजरेकर, ए. के. चतुर्वेदी, आर. मारवाह, आर. कृष्णमूर्ती, के. एम. तिवारी, व्ही. एस. मोदी, ए. डी. भंडारींसारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश होता. तर एस. ए. रहिम यांच्या नेतृत्वाखालील यजमान विदर्भ संघही टॅलेंटच्या बाबतीत कुठेच कमी नव्हता. संघात एम. के. जोशी, पी. डब्ल्यू. बारलिंगे, व्ही. डी. सांबरे, पी. एम. गोखले, आर. नरसिम्हन, एस. के. साहू, एन. मनियन, डब्ल्यू. डी. साने, डी. डी. देशपांडे, एम. एच. साठेसारखे नावाजलेले फलंदाज व गोलंदाज होते.  हेही वाचा  : विदर्भाने 29 वर्षांपूर्वी दाखवला होता राजस्थानला इंगा "मॅटिन विकेट'वर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विदर्भाची सी. एस. नायडू यांच्या अचूक माऱ्यापुढे चांगलीच दाणादाण उडाली. अख्खा संघ पहिल्याच दिवशी 166 धावांत गारद झाला. नायडूंनी सर्वाधिक सात, तर मांजरेकर यांनी एकही धाव न देता तीन गडी बाद केले. खेळपट्‌टीवर "अनइव्हन बाऊन्स' असल्याने उत्तर प्रदेशलाही धावा काढणे कठीण जाणार होते. आणि घडलेही तसेच. त्यांचाही डाव अवघ्या 178 धावांवरच गडगडला. पण, पहिल्या डावात 12 धावांची निसटती आघाडी घेत उत्तर प्रदेशने अर्धीअधिक लढाई जिंकली. विदर्भाच्या दुसऱ्या डावातही नायडू भारी पडले. त्यांनी पुन्हा सहा गडी बाद करून विदर्भाला 194 धावांवर थोपवून धरले. विदर्भाची अवस्था याहून वाईट झाली असती. सुदैवाने नवव्या स्थानावर फलंदाजीस आलेले डी. डी. देशपांडे (49 धावा) व दहाव्या स्थानावरील साने (नाबाद 40) यांनी चिवट फलंदाजी केल्याने विदर्भ 194 धावांपर्यंत पोहोचू शकला.  केसाच्या अंतराने हुकला विदर्भाचा विजय  उत्तर प्रदेशला सामना जिंकण्यासाठी 65 षटकांमध्ये 183 धावा हव्या होत्या. विदर्भ सामना जिंकू शकतो, अशी शक्‍यता बळावल्याने मैदानावर प्रेक्षकांचीही बऱ्यापैकी गर्दी होती. आघाडी फळीतील मारवाह व मांजरेकर यांनी दमदार सुरुवात करून उत्तर प्रदेशच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण, साने यांनी एकापाठोपाठ चार गडी बाद करून सामन्याचे चित्र विदर्भाच्या दिशेने झुकविले. विदर्भाला विजयासाठी दोन गड्यांची आवश्‍यकता असताना नायडू यांनी फलंदाजीतही योगदान देत विदर्भाच्या आशेवर पाणी फेरले. सामना अनिर्णीत संपला तेव्हा उत्तर प्रदेशची दुसऱ्या डावात 8 बाद 112 धावा अशी घसरगुंडी उडाली होती. अखेर पहिल्या डावाच्या आघाडीवर उत्तर प्रदेश विजयी ठरला. सामन्याच्या निकालाने वैदर्भी चाहत्यांची निराशा झाली. पण, अटीतटीचा सामना पाहायला मिळाल्याचे त्यांना समाधानही होते. त्या काळात खेळलेले बहुतांश खेळाडू आता हयात नाहीत. पण, त्यांनी केलेली कामगिरी आजही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30FXplE
Read More
मॉन्सून महाराष्ट्रात दाखल

पुणे - नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी महाराष्ट्रात दाखल झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. येत्या शनिवारपर्यंत (ता. १३) राज्याच्या आणखी काही भागात मॉन्सून हजेरी लावेल. त्यासाठी पोषक वातावरण आहे, असे हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आले. 

केरळ किनारपट्टीवर बरोबर एक तारखेला दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यात सलामी दिली. संपूर्ण कर्नाटक, गोवा, आणि रायलसीमाचा भाग व्यापणाऱ्या मॉन्सूनने रत्नागिरीतील हर्णे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याचा काही भाग व्यापला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अरबी समुद्रातील मॉन्सूनच्या शाखेला निसर्ग चक्रीवादळामुळे गती मिळाली. ही शाखा गुरुवारी कारवारपर्यंत येऊन थांबली. तब्बल सहा दिवस मॉन्यूनने कर्नाटकातील या भागात मुक्काम ठोकला. हा मुक्काम गुरुवारी उठवत गोवा, सिंधुदुर्ग  आणि हर्णेपर्यंतचा प्रवास एका  दिवसात पूर्ण केला. मॉन्सूनच्या या शाखेला पुढील प्रवास करण्यासाठी पोषक वातावरण राज्यात निर्माण झाले आहे. 

अमिताभ बच्चनकडून कामगारांसाठी विशेष विमान सेवा

त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, तेलंगणापर्यंत मॉन्सून पोचेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बंगालच्या उपसागरातील आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. पाकिस्तानपासून या कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रिय आहे.

पोषक वातावरण
अरबी समुद्राबरोबरच बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनच्या शाखेची दमदार वाटचाल सुरू आहे. तेथे तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सून वाटचालीस पोषक ठरत आहे. ईशान्य भारतातून पुढे चाल करत, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा ही राज्ये संपूर्णपणे व्यापून अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयाच्या काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मॉन्सून महाराष्ट्रात दाखल पुणे - नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी महाराष्ट्रात दाखल झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. येत्या शनिवारपर्यंत (ता. १३) राज्याच्या आणखी काही भागात मॉन्सून हजेरी लावेल. त्यासाठी पोषक वातावरण आहे, असे हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आले.  केरळ किनारपट्टीवर बरोबर एक तारखेला दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यात सलामी दिली. संपूर्ण कर्नाटक, गोवा, आणि रायलसीमाचा भाग व्यापणाऱ्या मॉन्सूनने रत्नागिरीतील हर्णे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याचा काही भाग व्यापला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  अरबी समुद्रातील मॉन्सूनच्या शाखेला निसर्ग चक्रीवादळामुळे गती मिळाली. ही शाखा गुरुवारी कारवारपर्यंत येऊन थांबली. तब्बल सहा दिवस मॉन्यूनने कर्नाटकातील या भागात मुक्काम ठोकला. हा मुक्काम गुरुवारी उठवत गोवा, सिंधुदुर्ग  आणि हर्णेपर्यंतचा प्रवास एका  दिवसात पूर्ण केला. मॉन्सूनच्या या शाखेला पुढील प्रवास करण्यासाठी पोषक वातावरण राज्यात निर्माण झाले आहे.  अमिताभ बच्चनकडून कामगारांसाठी विशेष विमान सेवा त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, तेलंगणापर्यंत मॉन्सून पोचेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा बंगालच्या उपसागरातील आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. पाकिस्तानपासून या कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रिय आहे. पोषक वातावरण अरबी समुद्राबरोबरच बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनच्या शाखेची दमदार वाटचाल सुरू आहे. तेथे तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सून वाटचालीस पोषक ठरत आहे. ईशान्य भारतातून पुढे चाल करत, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा ही राज्ये संपूर्णपणे व्यापून अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयाच्या काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MRsHOI
Read More
ऑनलाईन शिक्षणाच्या सर्वेक्षणात झाले धक्कादायक खुलासे, नक्की वाचा ही बातमी...

नागपूर : कोरोना संक्रमानामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीतही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी "लर्निग फ्रॉर्म होम' या संकल्पनेचा पुरस्कार करीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) विविध उपक्रम राबविले. या ऑनलाइन लर्निगचा फायदा खरोखरच विद्यार्थ्यांनी घेतला का? हे जाणून घेण्यासाठी एससीईआरटी आणि युनिसेफ ने केलेल्या रॅपिड सर्वेक्षणात बरेच धक्कादायक खुलासे झाल्याने ऑनलाइन शिक्षणाचे बिंग फुटले आहे.

राज्यात 28 एप्रिल पासून घरी राहून शिक्षण म्हणजेच "लर्निग फ्रॉर्म होम' ला सुरुवात करण्यात आली. यामध्ये "शाळा बंद ..... पण शिक्षण सुरु' या उपक्रमांअंतर्गत इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी विविध कार्यक्रम, दीक्षा ऍप, सह्यांद्री वाहिनीवरील "गली गली सिम सिम' हा कार्यक्रम, मिस कॉल करा व गोष्ट ऐका ( प्रथम ),"बुकेबो कोविड-19' माहितीवर आधारित मुलांचे पुस्तक या सारख्या साधनांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना घरी राहून शिकण्याचे काम सुरू करण्यात आले.

हेही वाचा : अकरावीचे ऑनलाईन प्रवेश नकोच, का होतेय ही मागणी...

या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना खरोखरच उपयोग झाला काय?, विशेषत: ग्रामीण भागातील मुलांना त्याबाबत असलेले विशेष कुतूहल असल्याने त्यांनी यात रस घेतला काय?, त्यांना नेमक्‍या कोणत्या अडचणी आल्यात या विविध प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्यासाठी एससीईआरटी आणि युनिसेफने सर्वेक्षण केले. मात्र, या सर्वेक्षणातून एकच मोबाईल क्रमांक वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांकडे असल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे अनेकांनी आपल्या शेजाऱ्यांचे मोबाईल क्रमांक दिल्याचेही आढळून आलेत. त्यामुळे अनेकदा मोबाईलवर शेजारच्याशीच संपर्क होत असल्याचे दिसून आले. केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरातील शाळांचीही हिच अवस्था आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा चांगलाच बोजवारा निघालेला आहे.
 

असे झाले सर्वेक्षण
एससीईआरटी आणि युनिसेफने 36 जिल्ह्यातील 74 तालुक्‍यांची निवड केली. शिवाय प्रत्येक जिल्हयातील सर्वात जास्त साक्षरता दर असणारा एक तालुका व सर्वात कमी साक्षरता दर असणारा दुसरा तालुका अशा एकूण 36 जिल्हयातून प्रत्येकी दोन ते तीन तालुक्‍यांची निवड करण्यात आली. त्यासाठी या तालुक्‍यातील दहा 10 शाळेतून एका वर्गाची रॅन्डम सॅम्पलींग मेथड'ने निवड करण्यात आली. या वर्गात 10 पेक्षा जास्त आणि 15 पेक्षा कमी विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ऑनलाईन शिक्षणाच्या सर्वेक्षणात झाले धक्कादायक खुलासे, नक्की वाचा ही बातमी... नागपूर : कोरोना संक्रमानामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीतही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी "लर्निग फ्रॉर्म होम' या संकल्पनेचा पुरस्कार करीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) विविध उपक्रम राबविले. या ऑनलाइन लर्निगचा फायदा खरोखरच विद्यार्थ्यांनी घेतला का? हे जाणून घेण्यासाठी एससीईआरटी आणि युनिसेफ ने केलेल्या रॅपिड सर्वेक्षणात बरेच धक्कादायक खुलासे झाल्याने ऑनलाइन शिक्षणाचे बिंग फुटले आहे. राज्यात 28 एप्रिल पासून घरी राहून शिक्षण म्हणजेच "लर्निग फ्रॉर्म होम' ला सुरुवात करण्यात आली. यामध्ये "शाळा बंद ..... पण शिक्षण सुरु' या उपक्रमांअंतर्गत इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी विविध कार्यक्रम, दीक्षा ऍप, सह्यांद्री वाहिनीवरील "गली गली सिम सिम' हा कार्यक्रम, मिस कॉल करा व गोष्ट ऐका ( प्रथम ),"बुकेबो कोविड-19' माहितीवर आधारित मुलांचे पुस्तक या सारख्या साधनांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना घरी राहून शिकण्याचे काम सुरू करण्यात आले. हेही वाचा : अकरावीचे ऑनलाईन प्रवेश नकोच, का होतेय ही मागणी... या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना खरोखरच उपयोग झाला काय?, विशेषत: ग्रामीण भागातील मुलांना त्याबाबत असलेले विशेष कुतूहल असल्याने त्यांनी यात रस घेतला काय?, त्यांना नेमक्‍या कोणत्या अडचणी आल्यात या विविध प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्यासाठी एससीईआरटी आणि युनिसेफने सर्वेक्षण केले. मात्र, या सर्वेक्षणातून एकच मोबाईल क्रमांक वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांकडे असल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे अनेकांनी आपल्या शेजाऱ्यांचे मोबाईल क्रमांक दिल्याचेही आढळून आलेत. त्यामुळे अनेकदा मोबाईलवर शेजारच्याशीच संपर्क होत असल्याचे दिसून आले. केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरातील शाळांचीही हिच अवस्था आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा चांगलाच बोजवारा निघालेला आहे.   असे झाले सर्वेक्षण एससीईआरटी आणि युनिसेफने 36 जिल्ह्यातील 74 तालुक्‍यांची निवड केली. शिवाय प्रत्येक जिल्हयातील सर्वात जास्त साक्षरता दर असणारा एक तालुका व सर्वात कमी साक्षरता दर असणारा दुसरा तालुका अशा एकूण 36 जिल्हयातून प्रत्येकी दोन ते तीन तालुक्‍यांची निवड करण्यात आली. त्यासाठी या तालुक्‍यातील दहा 10 शाळेतून एका वर्गाची रॅन्डम सॅम्पलींग मेथड'ने निवड करण्यात आली. या वर्गात 10 पेक्षा जास्त आणि 15 पेक्षा कमी विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UAJcTz
Read More
निसर्ग चक्रीवादळ तडाखा : रायगड, रत्नागिरीतील बाधितांना दहा किलो गहू, तांदळाचे मोफत वाटप

निसर्ग चक्रीवादळ तडाखा : रायगड, रत्नागिरीतील बाधितांना दहा किलो गहू, तांदळाचे मोफत वाटप

June 11, 2020 0 Comments
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  from Zee24 Taas: Maharashtra News...
Read More

Wednesday, June 10, 2020

सार्वजनिक आरोग्याची व्याप्ती ६४ टक्के

पुणे - कोरोनाची साथ सुरू होण्यापूर्वी देशाच्या सार्वजनिक आरोग्यसेवांची व्याप्ती फक्त ६४ टक्‍क्‍यांवर होती. स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनी आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आयुष्यमान भारत यांसारख्या २४ आरोग्य योजनांच्या गाज्यावाज्यानंतरही सार्वजनिक आरोग्यात आपण अद्यापही अप्रगतच आहोत. त्यामुळे कोरोनासारख्या साथींचा वाढता प्रादुर्भाव बघता, साथींविरुद्धच्या राष्ट्रीय धोरणांचा फेरविचार आवश्‍यक आहे, असे मत सार्वजनिक आरोग्यसेवेतील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगाच्या इतिहासात कोरोनासारख्या अनेक साथी आजवर आल्या आणि येतीलही. पण, एकदा का साथीची तीव्रता कमी झाली आणि आर्थिक धोरणांनी वेग घेतला, की सोईस्कररीत्या साथींमध्ये मिळालेल्या धड्यांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा धोरणांचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ डॉ. राजेश भाटिया आणि राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या संचालिका डॉ. प्रिया अब्राहम यांनी सांगितले. यासंबंधी त्यांनी ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’मध्ये निबंधही प्रकाशित केला आहे.

राज्यात आज सर्वाधिक 3254 कोरोना रुग्णांची नोंद; राज्यातील रुग्णसंख्या तब्बल 94, 041 वर..

आरोग्य धोरणात काय बदल हवा...
राज्याचे धोरण -

राज्यस्तरावरही दीर्घकालीन धोरण असावे.

आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्यासंबंधी त्याचा राष्ट्रीय धोरणाशी समन्वय आवश्‍यक.

विमान आणि जल वाहतूक, प्रदेशाच्या सीमा यासंबंधीचे निर्णय सुलभ.

खासगी क्षेत्राचा सहभाग -

देशातील रोगनिवारणात ७० टक्के खासगी क्षेत्र.

आरोग्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वाढवावी.

प्रचंड पसारा, आधुनिकता आणि सहज उपलब्धतेचा सहभाग वाढावा.

समाजाचा सहभाग -

साथीचे रोग थोपविण्यासाठी समाजाचा सहभाग ही गुरुकिल्ली.

सर्व धोरणांत सामाजिक स्थितीचा विचार हवा.

सांस्कृतिक सहसंबंध, शैक्षणिक स्थिती, भाषा, श्रद्धा, विश्वास यांचा अंतर्भाव.

संशोधन आणि विकास -

शैक्षणिक, संशोधन आणि औषधनिर्माण संस्थांचा समन्वय.

औषधे, लस, निदान आणि उपचारासाठी स्थानिक तंत्रज्ञानाचा सहभाग.

स्थानिक वैद्यकीय उपकरणे आणि सेवा देणाऱ्या स्टार्टअप्सला बूस्टर करावे.

सोशल मीडिया -

चुकीच्या व अपुऱ्या माहितीमुळे सामाजिक अपघात शक्‍य.

साथीची भीती कमी करण्यासाठी जबाबदारी निश्‍चित करावी.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सार्वजनिक आरोग्याची व्याप्ती ६४ टक्के पुणे - कोरोनाची साथ सुरू होण्यापूर्वी देशाच्या सार्वजनिक आरोग्यसेवांची व्याप्ती फक्त ६४ टक्‍क्‍यांवर होती. स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनी आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आयुष्यमान भारत यांसारख्या २४ आरोग्य योजनांच्या गाज्यावाज्यानंतरही सार्वजनिक आरोग्यात आपण अद्यापही अप्रगतच आहोत. त्यामुळे कोरोनासारख्या साथींचा वाढता प्रादुर्भाव बघता, साथींविरुद्धच्या राष्ट्रीय धोरणांचा फेरविचार आवश्‍यक आहे, असे मत सार्वजनिक आरोग्यसेवेतील तज्ज्ञांनी व्यक्त केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जगाच्या इतिहासात कोरोनासारख्या अनेक साथी आजवर आल्या आणि येतीलही. पण, एकदा का साथीची तीव्रता कमी झाली आणि आर्थिक धोरणांनी वेग घेतला, की सोईस्कररीत्या साथींमध्ये मिळालेल्या धड्यांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा धोरणांचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ डॉ. राजेश भाटिया आणि राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या संचालिका डॉ. प्रिया अब्राहम यांनी सांगितले. यासंबंधी त्यांनी ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’मध्ये निबंधही प्रकाशित केला आहे. राज्यात आज सर्वाधिक 3254 कोरोना रुग्णांची नोंद; राज्यातील रुग्णसंख्या तब्बल 94, 041 वर.. आरोग्य धोरणात काय बदल हवा... राज्याचे धोरण - राज्यस्तरावरही दीर्घकालीन धोरण असावे. आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्यासंबंधी त्याचा राष्ट्रीय धोरणाशी समन्वय आवश्‍यक. विमान आणि जल वाहतूक, प्रदेशाच्या सीमा यासंबंधीचे निर्णय सुलभ. खासगी क्षेत्राचा सहभाग - देशातील रोगनिवारणात ७० टक्के खासगी क्षेत्र. आरोग्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वाढवावी. प्रचंड पसारा, आधुनिकता आणि सहज उपलब्धतेचा सहभाग वाढावा. समाजाचा सहभाग - साथीचे रोग थोपविण्यासाठी समाजाचा सहभाग ही गुरुकिल्ली. सर्व धोरणांत सामाजिक स्थितीचा विचार हवा. सांस्कृतिक सहसंबंध, शैक्षणिक स्थिती, भाषा, श्रद्धा, विश्वास यांचा अंतर्भाव. संशोधन आणि विकास - शैक्षणिक, संशोधन आणि औषधनिर्माण संस्थांचा समन्वय. औषधे, लस, निदान आणि उपचारासाठी स्थानिक तंत्रज्ञानाचा सहभाग. स्थानिक वैद्यकीय उपकरणे आणि सेवा देणाऱ्या स्टार्टअप्सला बूस्टर करावे. सोशल मीडिया - चुकीच्या व अपुऱ्या माहितीमुळे सामाजिक अपघात शक्‍य. साथीची भीती कमी करण्यासाठी जबाबदारी निश्‍चित करावी. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dN2zQG
Read More