Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 4, 2020

Coronavirus : वृत्तपत्रांच्या वितरणात अडथळा चिंताजनक

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाची तीव्रता वाढत असताना विश्‍वासार्ह माहिती देणाऱ्या, सरकार तसेच प्रशासनाच्या प्रयत्नांना सकारात्मक हातभार लावणाऱ्या वृत्तपत्रांच्या वितरणात अडथळा येणे चिंताजनक असल्याची एकमुखी प्रतिक्रिया देशातील ज्येष्ठ कायदेतज्ञांनी व्यक्त केली. वितरण हा वृत्तपत्रांचा घटनात्मक अधिकारी असल्याचा मुद्दाही ठसविण्यात आला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल महिंदर सिंग यांनी सांगितले की, वितरण हा वृत्तपत्रांचा घटनात्मक अधिकार असून तो अनुच्छेद १९ (१) अ, १९ (१) ग द्वारे सुरक्षित करण्यात आला आहे. मुळात गोदामात ठेवण्यासाठी कोणताही समूह वृत्तपत्रांची छपाई करीत नाही. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, वृत्तपत्र वितरणावर सरकारने कोणतेही निर्बंध घातले नाहीत, तसेच अत्यावश्‍यक सेवेत समावेश केला आहे. त्यामुळे कुणीही अडथळे वितरणात आणू नयेत.

वृत्तपत्रांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. अत्यावश्‍यक सेवा देखभाल कायद्यानुसार (इस्मा) वितरणात अडथळा हा गुन्हा ठरतो. आरोग्याच्या पातळीवर आणीबाणीसदृश परिस्थिती असताना नागरिकांना विश्वासार्ह माहितीपासून वंचित ठेवले जाणे निराशाजनक असल्याचे या तज्ञांनी सांगितले. माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी सांगितले की, सोशल मीडियामुळे अफवांचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात काम करीत आहेत.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : वृत्तपत्रांच्या वितरणात अडथळा चिंताजनक नवी दिल्ली - कोरोना संसर्गाची तीव्रता वाढत असताना विश्‍वासार्ह माहिती देणाऱ्या, सरकार तसेच प्रशासनाच्या प्रयत्नांना सकारात्मक हातभार लावणाऱ्या वृत्तपत्रांच्या वितरणात अडथळा येणे चिंताजनक असल्याची एकमुखी प्रतिक्रिया देशातील ज्येष्ठ कायदेतज्ञांनी व्यक्त केली. वितरण हा वृत्तपत्रांचा घटनात्मक अधिकारी असल्याचा मुद्दाही ठसविण्यात आला.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल महिंदर सिंग यांनी सांगितले की, वितरण हा वृत्तपत्रांचा घटनात्मक अधिकार असून तो अनुच्छेद १९ (१) अ, १९ (१) ग द्वारे सुरक्षित करण्यात आला आहे. मुळात गोदामात ठेवण्यासाठी कोणताही समूह वृत्तपत्रांची छपाई करीत नाही. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, वृत्तपत्र वितरणावर सरकारने कोणतेही निर्बंध घातले नाहीत, तसेच अत्यावश्‍यक सेवेत समावेश केला आहे. त्यामुळे कुणीही अडथळे वितरणात आणू नयेत. वृत्तपत्रांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. अत्यावश्‍यक सेवा देखभाल कायद्यानुसार (इस्मा) वितरणात अडथळा हा गुन्हा ठरतो. आरोग्याच्या पातळीवर आणीबाणीसदृश परिस्थिती असताना नागरिकांना विश्वासार्ह माहितीपासून वंचित ठेवले जाणे निराशाजनक असल्याचे या तज्ञांनी सांगितले. माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी सांगितले की, सोशल मीडियामुळे अफवांचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात काम करीत आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2X5aIdQ
Read More
प्रशासनाला ठेंगा..चक्क तेरेखोल नदीतून बेकायदा दारू वाहतूक

बांदा (सिंधुदुर्ग) - देशात लॉकडाऊन आहे. यामुळे बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्यांनाही चाप बसला. सिंधुदुर्ग-गोवा सीमा सील असल्याने व्यावसायिकांनी दारू वाहतूक करण्यासाठी चक्क तेरेखोल नदीचा वापर सुरु केला आहे. नदी दोन्ही राज्यांच्या सीमेवरून वाहते. रात्री वाळू उत्खनन करणाऱ्या होड्यांमधून गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू येत आहे. 

गोवा बनावटीची दारू अंधाराचा फायदा घेत जिल्ह्यात वितरित होते. लॉकडाऊनमुळे गोव्यातील मद्यालये बंद असल्याने चोरट्या पद्धतीने जिल्ह्यात आणण्यात येणारी कास, मडुरा, शेर्ले, बांदा मार्गे ठिकठिकाणी पाठविण्यात येते. ती 30 टक्के चढ्या किमतीने विकली जात आहे. 
बांदा पोलिसांनी सिंधुदुर्ग-गोवा सीमा सटमटवाडी येथे तर गोवा पोलिसांनी पत्रादेवी येथे सीमा सील केली आहे. शहरातून जाणारा जुना मुंबई-गोवा महामार्ग देखील सील आहे. जिल्ह्यातून गोव्यात जाणारी व गोव्यातून जिल्ह्यात येणारी वाहतूक पूर्णपणे रोखली आहे. गोव्यातील मद्यालये लॉकडाऊन आहेत. जिल्ह्यात दारूचा पुरवठा बंद झाल्याने तळीरामांची पंचाईत झाली आहे. त्यावर उपाय म्हणून 

दारू व्यावसायिकांनी तेरेखोल नदीतील जलमार्गाचा वापर केला आहे. ओहोटीच्या वेळा पाहून नदीपात्रातून गोव्यातून सिंधुदुर्गात दारूची दररोज मध्यरात्री 12 ते 2 या वेळेत वाहतूक होते. किनाऱ्यावर तैनात गाड्यांमधून दारू जिल्ह्यात वितरित होते. यामध्ये मोठी साखळी कार्यरत आहे. 
तेरेखोल नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खननासाठी परप्रांतीय कामगार व होड्यांचा वापर करण्यात येतो. वाळू उत्खनन बंद असल्याने होड्यांचा वापर दारू वाहतुकीसाठी होत आहे.

परप्रांतीय कामगारांचाही वापर होतो. कामगारांना प्रत्येक खेपेमागे पैसे देण्यात येतात. या साऱ्या प्रकाराबाबत बांदा पोलीस अनभिज्ञ असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास बंदी आहे; मात्र दारू वाहतूक सुरू आहे. दरम्यान यासंदर्भात बांद्याचे पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

दारू वाहतुकीसाठी तेरेखोल नदीत जलमार्गाचा वापर सुरू केल्याने बांदा पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनमुळे दारू व्यावसायिकांनी नवीन शक्कल लढविली आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊन पोलिसांच्या मदतीने निश्‍चितच कारवाई करण्यात येईल.
- राजाराम म्हात्रे, तहसीलदार, सावंतवाडी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रशासनाला ठेंगा..चक्क तेरेखोल नदीतून बेकायदा दारू वाहतूक बांदा (सिंधुदुर्ग) - देशात लॉकडाऊन आहे. यामुळे बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्यांनाही चाप बसला. सिंधुदुर्ग-गोवा सीमा सील असल्याने व्यावसायिकांनी दारू वाहतूक करण्यासाठी चक्क तेरेखोल नदीचा वापर सुरु केला आहे. नदी दोन्ही राज्यांच्या सीमेवरून वाहते. रात्री वाळू उत्खनन करणाऱ्या होड्यांमधून गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू येत आहे.  गोवा बनावटीची दारू अंधाराचा फायदा घेत जिल्ह्यात वितरित होते. लॉकडाऊनमुळे गोव्यातील मद्यालये बंद असल्याने चोरट्या पद्धतीने जिल्ह्यात आणण्यात येणारी कास, मडुरा, शेर्ले, बांदा मार्गे ठिकठिकाणी पाठविण्यात येते. ती 30 टक्के चढ्या किमतीने विकली जात आहे.  बांदा पोलिसांनी सिंधुदुर्ग-गोवा सीमा सटमटवाडी येथे तर गोवा पोलिसांनी पत्रादेवी येथे सीमा सील केली आहे. शहरातून जाणारा जुना मुंबई-गोवा महामार्ग देखील सील आहे. जिल्ह्यातून गोव्यात जाणारी व गोव्यातून जिल्ह्यात येणारी वाहतूक पूर्णपणे रोखली आहे. गोव्यातील मद्यालये लॉकडाऊन आहेत. जिल्ह्यात दारूचा पुरवठा बंद झाल्याने तळीरामांची पंचाईत झाली आहे. त्यावर उपाय म्हणून  दारू व्यावसायिकांनी तेरेखोल नदीतील जलमार्गाचा वापर केला आहे. ओहोटीच्या वेळा पाहून नदीपात्रातून गोव्यातून सिंधुदुर्गात दारूची दररोज मध्यरात्री 12 ते 2 या वेळेत वाहतूक होते. किनाऱ्यावर तैनात गाड्यांमधून दारू जिल्ह्यात वितरित होते. यामध्ये मोठी साखळी कार्यरत आहे.  तेरेखोल नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खननासाठी परप्रांतीय कामगार व होड्यांचा वापर करण्यात येतो. वाळू उत्खनन बंद असल्याने होड्यांचा वापर दारू वाहतुकीसाठी होत आहे. परप्रांतीय कामगारांचाही वापर होतो. कामगारांना प्रत्येक खेपेमागे पैसे देण्यात येतात. या साऱ्या प्रकाराबाबत बांदा पोलीस अनभिज्ञ असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास बंदी आहे; मात्र दारू वाहतूक सुरू आहे. दरम्यान यासंदर्भात बांद्याचे पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  दारू वाहतुकीसाठी तेरेखोल नदीत जलमार्गाचा वापर सुरू केल्याने बांदा पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनमुळे दारू व्यावसायिकांनी नवीन शक्कल लढविली आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊन पोलिसांच्या मदतीने निश्‍चितच कारवाई करण्यात येईल. - राजाराम म्हात्रे, तहसीलदार, सावंतवाडी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dStB9H
Read More
सिंधुदुर्गात अकराशे कोटींचा काजू पडून : संजय नाईक

कुडाळ (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील काजू बागायतदारांवर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या लॉकडाउनचा गंभीर परिणाम झाला आहे. यामध्ये जवळपास पूर्ण कोकणात एक लाख टन म्हणजेच अकराशे कोटींचा काजू पडून आहे, अशी माहिती तेंडोली येथील प्रसिद्ध बागायतदार संजय नाईक यांनी दिली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बागायतदारांच्या व्यथा मांडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

श्री. नाईक म्हणाले, ""काजू बागायतदारांच्या व्यथा श्री. प्रभू यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना समजाव्यात म्हणून दिल्ली येथून पीटीआय संस्थेकडून माहिती घेण्यात आली. यासाठी पत्रकार राजन नाईक यांचेसुद्धा सहकार्य लाभले. काजू बी पुढील प्रक्रियेसाठी सुकणे फार आवश्‍यक आहे; मात्र ट्रान्झिस्ट पास मिळत नसल्याने काजू बी शेतकऱ्यांकडून कारखानदारांपर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी ओली बी खराब होण्याची शक्‍यता आहे.

कोकणातील शेतकऱ्यांचा अन्न, वस्त्र, निवारा काजूवरच अवलंबून आहे. कोकणातील शेतकऱ्यांवर यामुळे उपासमारीची वेळ येण्याचे संकट उद्‌भवले आहे. गोवा येथे वायनरीसाठी जाणारा बोंडू केवळ वाहतुकीअभावी जिल्ह्यातच पडून सडून गेल्याने बागायतदार शेतकरी यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. लहान-लहान गरीब बागायतदारांचे तसेच हातावर पोट असणाऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. हे लक्षात आणून देणे काळाची गरज आहे. कोरोनातून भारत सहीसलामत सुटावा. पंतप्रधानांच्या प्रयत्नांना यश येऊ दे.'' 

तत्काळ मार्ग काढा 
कोकणातील काजू बागायतदारांना या भीषण आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रभू यांनी मार्ग काढावा, अशी मागणी जिल्ह्यातील बागायतदारांनी केली आहे. कोकणातील प्रसार माध्यम प्रतिनिधींनीही हे प्रश्न दिल्ली दरबारी कळावेत, यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत, असेही श्री. नाईक यांनी सांगितले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात अकराशे कोटींचा काजू पडून : संजय नाईक कुडाळ (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील काजू बागायतदारांवर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या लॉकडाउनचा गंभीर परिणाम झाला आहे. यामध्ये जवळपास पूर्ण कोकणात एक लाख टन म्हणजेच अकराशे कोटींचा काजू पडून आहे, अशी माहिती तेंडोली येथील प्रसिद्ध बागायतदार संजय नाईक यांनी दिली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बागायतदारांच्या व्यथा मांडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  श्री. नाईक म्हणाले, ""काजू बागायतदारांच्या व्यथा श्री. प्रभू यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना समजाव्यात म्हणून दिल्ली येथून पीटीआय संस्थेकडून माहिती घेण्यात आली. यासाठी पत्रकार राजन नाईक यांचेसुद्धा सहकार्य लाभले. काजू बी पुढील प्रक्रियेसाठी सुकणे फार आवश्‍यक आहे; मात्र ट्रान्झिस्ट पास मिळत नसल्याने काजू बी शेतकऱ्यांकडून कारखानदारांपर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी ओली बी खराब होण्याची शक्‍यता आहे. कोकणातील शेतकऱ्यांचा अन्न, वस्त्र, निवारा काजूवरच अवलंबून आहे. कोकणातील शेतकऱ्यांवर यामुळे उपासमारीची वेळ येण्याचे संकट उद्‌भवले आहे. गोवा येथे वायनरीसाठी जाणारा बोंडू केवळ वाहतुकीअभावी जिल्ह्यातच पडून सडून गेल्याने बागायतदार शेतकरी यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. लहान-लहान गरीब बागायतदारांचे तसेच हातावर पोट असणाऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. हे लक्षात आणून देणे काळाची गरज आहे. कोरोनातून भारत सहीसलामत सुटावा. पंतप्रधानांच्या प्रयत्नांना यश येऊ दे.''  तत्काळ मार्ग काढा  कोकणातील काजू बागायतदारांना या भीषण आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रभू यांनी मार्ग काढावा, अशी मागणी जिल्ह्यातील बागायतदारांनी केली आहे. कोकणातील प्रसार माध्यम प्रतिनिधींनीही हे प्रश्न दिल्ली दरबारी कळावेत, यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2xLtEng
Read More
घरातून बाहेर पडताना घरगुती मास्क वापरा

नवी दिल्ली - कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना घरगुती पद्धतीने तयार केलेला मास्क वापरण्याचा सल्ला केंद्राने शनिवारी दिला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउन जाहीर केला असून सध्या लॉकडाउनमुळे घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. पण महत्वाच्या कामासाठी कोणाला बाहेर पडायचे असेल तर त्या व्यक्तीने तोंड आणि नाक झाकले जाईल अशा घरगुती पद्धतीने तयार केलेला मास्कचा वापर करावा असे सरकारने म्हटले आहे. देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो आहे त्यामुळे नागरिकांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारकडून ही सूचना देण्यात आली आहे.

रेल्वेकडून मास्क, सॅनिटायजरची निर्मिती
भुवनेश्‍वर - पूर्व किनारी रेल्वेने आता त्यांच्या कार्यशाळांमध्ये मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करायला सुरवात केली आहे. तत्पूर्वी याच विभागाने अनेक डब्यांचे रूपांतर हे विलगीकरण वॉर्डमध्येही केले होते. खुर्दा रोड, वॉल्टेयर आणि संबळपूर या विभागांनी त्यांच्याकडील सर्व स्रोतांचा वापर करून या वस्तूंच्या निर्मितीला सुरवात केली आहे. वॉल्टेयर विभागाने वीस हजार मास्क आणि तीनशे लिटर हँड सॅनिटायजर तयार केले आहे. विशाखापट्टण येथील डिझेल लोकोमोटिव्हमध्ये याची निर्मिती करण्यात आली. गुजरातमध्ये देखील अहमदाबाद रेल्वे विभागाने रेल्वेच्या सत्तर डब्यांचे विलगीकरण वॉर्डांत रूपांतर केले आहे. विशेष म्हणजे या विलगीकरण वॉर्डांमध्ये सर्व अद्यायावत उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असून मणिनगर येथील रेल्वे डेपोमध्ये हे डबे सज्ज ठेवण्यात आले आहेत.

‘आयुष’च्या नियमांचे पालन करा
शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करा असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांना दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे दिवा लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत येणारे सीबीएसई, यूजीसी, एआयसीटीई, एनसीईआरटी आणि अन्य मंडळांना या संदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे.

स्वयंसहाय्यता गटांकडून  १३२ लाख मास्क 
नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसशी लढा देण्यासाठी देशातील बचतगटही पुढे आले आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत २४ राज्यांमधील स्वयंसहाय्यता गटांच्या ६५ हजार सदस्यांनी १३२ लाख मास्क तयार केले आहेत. मंत्रालयाने ही माहिती निवेदनाद्वारे दिली. आंध्र प्रदेशमधील पाच जिल्ह्यातील चार हजार २८१ स्वयंसहाय्यता गटांच्या २१ हजार ०२८ सदस्यांनी आणि तमिळनाडूतील ३२ जिल्ह्यांतील एक हजार ९२७ स्वयंसहाय्यता गटांच्या दहा हजार ७८० सदस्यांनी दहा दिवसांत अनुक्रमे २५ लाख ४१ हजार ४४० आणि २६ लाख एक हजार ७३२ मास्क तयार केले आहेत. बिहार, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील काही राज्यांमधील स्वयंसहाय्यता गटांनीही या कामात भाग घेतला आहे. एकूण १४ हजार ५२२ गटांच्या ६५ हजार ९३६ सदस्य या उपक्रमात सहभागी झाले असून त्यांनी एकत्रित १३२ लाख मास्कची निर्मिती केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

घरातून बाहेर पडताना घरगुती मास्क वापरा नवी दिल्ली - कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना घरगुती पद्धतीने तयार केलेला मास्क वापरण्याचा सल्ला केंद्राने शनिवारी दिला आहे.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउन जाहीर केला असून सध्या लॉकडाउनमुळे घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. पण महत्वाच्या कामासाठी कोणाला बाहेर पडायचे असेल तर त्या व्यक्तीने तोंड आणि नाक झाकले जाईल अशा घरगुती पद्धतीने तयार केलेला मास्कचा वापर करावा असे सरकारने म्हटले आहे. देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो आहे त्यामुळे नागरिकांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारकडून ही सूचना देण्यात आली आहे. रेल्वेकडून मास्क, सॅनिटायजरची निर्मिती भुवनेश्‍वर - पूर्व किनारी रेल्वेने आता त्यांच्या कार्यशाळांमध्ये मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करायला सुरवात केली आहे. तत्पूर्वी याच विभागाने अनेक डब्यांचे रूपांतर हे विलगीकरण वॉर्डमध्येही केले होते. खुर्दा रोड, वॉल्टेयर आणि संबळपूर या विभागांनी त्यांच्याकडील सर्व स्रोतांचा वापर करून या वस्तूंच्या निर्मितीला सुरवात केली आहे. वॉल्टेयर विभागाने वीस हजार मास्क आणि तीनशे लिटर हँड सॅनिटायजर तयार केले आहे. विशाखापट्टण येथील डिझेल लोकोमोटिव्हमध्ये याची निर्मिती करण्यात आली. गुजरातमध्ये देखील अहमदाबाद रेल्वे विभागाने रेल्वेच्या सत्तर डब्यांचे विलगीकरण वॉर्डांत रूपांतर केले आहे. विशेष म्हणजे या विलगीकरण वॉर्डांमध्ये सर्व अद्यायावत उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असून मणिनगर येथील रेल्वे डेपोमध्ये हे डबे सज्ज ठेवण्यात आले आहेत. ‘आयुष’च्या नियमांचे पालन करा शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करा असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांना दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे दिवा लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत येणारे सीबीएसई, यूजीसी, एआयसीटीई, एनसीईआरटी आणि अन्य मंडळांना या संदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. स्वयंसहाय्यता गटांकडून  १३२ लाख मास्क  नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसशी लढा देण्यासाठी देशातील बचतगटही पुढे आले आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत २४ राज्यांमधील स्वयंसहाय्यता गटांच्या ६५ हजार सदस्यांनी १३२ लाख मास्क तयार केले आहेत. मंत्रालयाने ही माहिती निवेदनाद्वारे दिली. आंध्र प्रदेशमधील पाच जिल्ह्यातील चार हजार २८१ स्वयंसहाय्यता गटांच्या २१ हजार ०२८ सदस्यांनी आणि तमिळनाडूतील ३२ जिल्ह्यांतील एक हजार ९२७ स्वयंसहाय्यता गटांच्या दहा हजार ७८० सदस्यांनी दहा दिवसांत अनुक्रमे २५ लाख ४१ हजार ४४० आणि २६ लाख एक हजार ७३२ मास्क तयार केले आहेत. बिहार, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील काही राज्यांमधील स्वयंसहाय्यता गटांनीही या कामात भाग घेतला आहे. एकूण १४ हजार ५२२ गटांच्या ६५ हजार ९३६ सदस्य या उपक्रमात सहभागी झाले असून त्यांनी एकत्रित १३२ लाख मास्कची निर्मिती केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2V5AFaz
Read More
सायकलने गाठले शंभर किलोमीटर अंतर अन् मध्येच चेन तुटते मग....!

गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) : कोरोनाने हॉटेल बंद झाले. कारखान्यातील कामही थांबले. त्यामुळे थांबून काय करणार म्हणून मालकाने त्यांना गावाकडे जाण्यास सांगितले. वाहन नसल्यामुळे त्याने सायकलचीही व्यवस्था करून दिली. अशा स्थितीत गड्या आपला गाव बरा याची जाणीव त्या कामगारांना झाली. अन् तेलंगणातील आसिफाबादवरून ते सायकलने निघाले. शंभर किलोमीटर अंतर गाठायचे होते पण मध्येच सायकलची चेन तुटली अन् मग पायीच गावाला येण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. गावाच्या प्रवेशद्वारावर येताच गावकऱ्यांनी अडवले. सरपंच व प्रमुख मंडळी आली. आरोग्य सेविकेने तपासणी केल्यानंतरच त्यांना गावात प्रवेश देण्यात आला.

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील आकाश वाघाडे, अनिल गोहणे, राहुल बामने, प्रवीण बामने व भोयर हे पाचही जण तेलंगणातील हॉटेल व कंपनीत काम करतात. देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. अशावेळी हॉटेल व कंपनीचे काम बंद झाले. यामुळे या मजुरांची चांगलीच आफत झाली. मालकाने तुम्ही गावाकडे जा, असे सांगितले. वाहन नसल्याने या पाचही लोकांना पाच सायकली दिल्या. बोरियाबिस्तर घेऊन ही मंडळी करंजी येथे परतण्यासाठी निघाली. आसिफाबाद ते करंजी हे जवळपास शंभर किलोमीटर अंतर. अशात एकाच्या सायकलची चेन तुटली. काही अंतर गाठतांनाच दुसऱ्याही सायकलची चेन तुटली. मग काय सायकल ढकलत ढकलत ही मंडळी सायंकाळी करंजीत दम टाकत पोहचली.

आसिफाबादवरून हे पाचही लोक गावात येत आहेत, अशी माहिती कळताच सरंपच ज्योती चिचघरे, पोलिस पाटील व अनेक मंडळी गावाच्या प्रवेशद्वारावर आल्या. त्यांनी या पाचही लोकांना तिथेच थांबवले. लागलीच आरोग्य उपकेंद्रातील पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांची पूर्ण तपासणी केल्यानंतरच त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. या पाचही लोकांना होम कारंटाईन करण्यात आले आहे.

- एका व्हेंटिलेटरद्वारे मिळणार आठ रुग्णांना श्‍वास, यांना होईल फायदा

कोरोनाला हरविण्यासाठी आपली यंत्रणा सतर्क आहे. अशात लॉकडाउनमुळे कामासाठी शहरात गेलेल्यांना गड्या आपला गाव बरा म्हणण्याची वेळ आली आहे.

करंजीत 103 लोक कॉरन्टाईन
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे साडेतीन हजार लोकसंख्यंचे गाव. गावातील अनेक जण विविध कामानिमीत्त मुंबई, पुणे, नागपूर, बुटीबोरी व अन्य  शहरात कामासाठी गेले होते. पण आता ही सगळी मंडळी गावाकडे परतली आहे. अशा 103 लोकांना होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. गावात कोरोनाबाबत जनजागृती सुरू आहे.  दवंडीचे काम सुरू असून सॅनीटायझरची फवारणी करण्यात येत आहे. अशा अतिशय संकटपूर्ण काळात तलाठी गैरहजर आहेत.
- ज्योती चिचघरे, सरपंच, करंजी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सायकलने गाठले शंभर किलोमीटर अंतर अन् मध्येच चेन तुटते मग....! गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) : कोरोनाने हॉटेल बंद झाले. कारखान्यातील कामही थांबले. त्यामुळे थांबून काय करणार म्हणून मालकाने त्यांना गावाकडे जाण्यास सांगितले. वाहन नसल्यामुळे त्याने सायकलचीही व्यवस्था करून दिली. अशा स्थितीत गड्या आपला गाव बरा याची जाणीव त्या कामगारांना झाली. अन् तेलंगणातील आसिफाबादवरून ते सायकलने निघाले. शंभर किलोमीटर अंतर गाठायचे होते पण मध्येच सायकलची चेन तुटली अन् मग पायीच गावाला येण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. गावाच्या प्रवेशद्वारावर येताच गावकऱ्यांनी अडवले. सरपंच व प्रमुख मंडळी आली. आरोग्य सेविकेने तपासणी केल्यानंतरच त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील आकाश वाघाडे, अनिल गोहणे, राहुल बामने, प्रवीण बामने व भोयर हे पाचही जण तेलंगणातील हॉटेल व कंपनीत काम करतात. देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. अशावेळी हॉटेल व कंपनीचे काम बंद झाले. यामुळे या मजुरांची चांगलीच आफत झाली. मालकाने तुम्ही गावाकडे जा, असे सांगितले. वाहन नसल्याने या पाचही लोकांना पाच सायकली दिल्या. बोरियाबिस्तर घेऊन ही मंडळी करंजी येथे परतण्यासाठी निघाली. आसिफाबाद ते करंजी हे जवळपास शंभर किलोमीटर अंतर. अशात एकाच्या सायकलची चेन तुटली. काही अंतर गाठतांनाच दुसऱ्याही सायकलची चेन तुटली. मग काय सायकल ढकलत ढकलत ही मंडळी सायंकाळी करंजीत दम टाकत पोहचली. आसिफाबादवरून हे पाचही लोक गावात येत आहेत, अशी माहिती कळताच सरंपच ज्योती चिचघरे, पोलिस पाटील व अनेक मंडळी गावाच्या प्रवेशद्वारावर आल्या. त्यांनी या पाचही लोकांना तिथेच थांबवले. लागलीच आरोग्य उपकेंद्रातील पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांची पूर्ण तपासणी केल्यानंतरच त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. या पाचही लोकांना होम कारंटाईन करण्यात आले आहे. - एका व्हेंटिलेटरद्वारे मिळणार आठ रुग्णांना श्‍वास, यांना होईल फायदा कोरोनाला हरविण्यासाठी आपली यंत्रणा सतर्क आहे. अशात लॉकडाउनमुळे कामासाठी शहरात गेलेल्यांना गड्या आपला गाव बरा म्हणण्याची वेळ आली आहे. करंजीत 103 लोक कॉरन्टाईन गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे साडेतीन हजार लोकसंख्यंचे गाव. गावातील अनेक जण विविध कामानिमीत्त मुंबई, पुणे, नागपूर, बुटीबोरी व अन्य  शहरात कामासाठी गेले होते. पण आता ही सगळी मंडळी गावाकडे परतली आहे. अशा 103 लोकांना होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. गावात कोरोनाबाबत जनजागृती सुरू आहे.  दवंडीचे काम सुरू असून सॅनीटायझरची फवारणी करण्यात येत आहे. अशा अतिशय संकटपूर्ण काळात तलाठी गैरहजर आहेत. - ज्योती चिचघरे, सरपंच, करंजी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bOsk1J
Read More
सिंधुदुर्गातून आणखी सहा नमुने पाठविले 

ओरोस (सिंधुदुर्ग) -  कोरोना तपासणीसाठी जिल्ह्यातील सहा व्यक्तींचे नमुने आज नव्याने पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालांची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून 62 नमुने पाठविले असून त्यातील केवळ एकच पॉझिटिव्ह आला. तर सहा नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. आज आयसोलेशनमध्ये नव्याने एक रुग्ण दाखल झाला असून एकूण 21 रुग्ण उपचार घेत आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 375 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. शासकीय आरोग्य संस्थेत 51 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेने दिवसभरात 1990 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली तर पोलिसांनी 250 व्यक्तींची तपासणी केली आहे. 

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर धर्मामध्ये, जातीय तेढ निर्माण होईल असे कोणतेही संदेश, फोटो अगर व्हिडिओ व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्‌वीटर, टिकटॉक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्यास संबंधित व्यक्तीवर तसेच ग्रुप ऍडमिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व सोशल मीडिया पोस्टवरील संदेशांवर पोलिस विभागाचे लक्ष असून कोणताही आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करू नये, अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात संचारबंदी असतानाही विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर 10 गुन्हे दाखल करण्यात आले असून 17 वाहने जप्त करण्यात आली. 

"त्या' रुग्णासोबत प्रवास करणाऱ्यांचा शोध 
रत्नागिरी येथे आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासोबत रेल्वेतून प्रवास केलेल्या जिल्ह्यातील नागरिकांचा तपास करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. रत्नागिरी येथे आढळून आलेल्या दुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासोबत रेल्वेच्या डब्यातून प्रवास केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गातून आणखी सहा नमुने पाठविले  ओरोस (सिंधुदुर्ग) -  कोरोना तपासणीसाठी जिल्ह्यातील सहा व्यक्तींचे नमुने आज नव्याने पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालांची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून 62 नमुने पाठविले असून त्यातील केवळ एकच पॉझिटिव्ह आला. तर सहा नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. आज आयसोलेशनमध्ये नव्याने एक रुग्ण दाखल झाला असून एकूण 21 रुग्ण उपचार घेत आहेत.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 375 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. शासकीय आरोग्य संस्थेत 51 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेने दिवसभरात 1990 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली तर पोलिसांनी 250 व्यक्तींची तपासणी केली आहे.  कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर धर्मामध्ये, जातीय तेढ निर्माण होईल असे कोणतेही संदेश, फोटो अगर व्हिडिओ व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्‌वीटर, टिकटॉक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्यास संबंधित व्यक्तीवर तसेच ग्रुप ऍडमिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व सोशल मीडिया पोस्टवरील संदेशांवर पोलिस विभागाचे लक्ष असून कोणताही आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करू नये, अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात संचारबंदी असतानाही विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर 10 गुन्हे दाखल करण्यात आले असून 17 वाहने जप्त करण्यात आली.  "त्या' रुग्णासोबत प्रवास करणाऱ्यांचा शोध  रत्नागिरी येथे आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासोबत रेल्वेतून प्रवास केलेल्या जिल्ह्यातील नागरिकांचा तपास करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. रत्नागिरी येथे आढळून आलेल्या दुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासोबत रेल्वेच्या डब्यातून प्रवास केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2xOQLxc
Read More
लाॅक डाऊनमुळे चौपदरीकरणाचे काम ठप्प

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यात महामार्ग चौपदरीकरणाचेही काम ठप्प आहे. महामार्ग विभाग पुन्हा काम सुरू करण्याचे पत्र देत नाही तोपर्यंत चौपदरीकरणाची कामे सुरू करता येत नसल्याचे ठेकेदार प्रतिनिधींकडून स्पष्ट करण्यात आले. सद्यःस्थितीत उड्डाणपूल, नद्यांवरील पूल आणि सर्व्हिस रोडची कामे ठप्प आहेत. लॉकडाउनमुळे मे अखेरपर्यंत चौपदरीकरण पूर्णत्वाचीही शक्‍यता मावळली आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम राज्य सरकारने लॉकडाउन घोषित केले. त्यानंतर केंद्रानेही 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली. यात महामार्ग चौपदरीकरणाचेही काम बंद करण्यात आले आहे. दरम्यान, शासनाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची कामे 1 एप्रिलपासून सुरू होतील असे जाहीर केले असले तरी त्याबाबतचे आदेश आले नसल्याने चौपदरीकरणाची उर्वरित कामे करता येत नसल्याची माहिती महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदार प्रतिनिधींकडून देण्यात आली. 

सिंधुदुर्गात खारेपाटण ते झाराप या 83 किलोमीटर टप्प्यामधील चौपदरीकरणाचे 90 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. कणकवली शहरासह नांदगाव, कासार्डे येथील उड्डाणपूल, कुडाळ शहर, जानवली गावातील एक किलोमीटरचा भाग तसेच कसाल, जानवली, खारेपाटण या नद्यांवरील दुसऱ्या पुलांची कामे थांबली आहेत.

याखेरीज जानवली, साकेडी येथील अंडरपासची कामेही अपूर्ण स्थितीत राहिली आहेत. यातील कणकवली शहरातील उड्डाणपूल, खारेपाटण नदीवरील पुलांची कामे वगळता उर्वरित कामे मे 2020 अखेरपर्यंत करण्याचे नियोजन दिलीप बिल्डकॉन आणि केसीसी बिल्डकॉन या कंपनीने केले होते. त्यानुसार चौपदरीकरण कामाची गती देखील वाढविण्यात आली होती; मात्र लॉकडाउनमुळे सर्वच कामे ठप्प झाली आहेत. 

अनेक मजुरांनीही आपले गाव गाठले 
दिलीप बिल्डकॉन आणि केसीसी बिल्डकॉन या ठेकेदार कंपन्यांकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील कामगार मोठ्या संख्येने आहेत. लॉकडाउननंतर यातील अनेक कामगारांनी मिळेल त्या वाहनाने आपले गाव गाठले आहे. तर जे कामगार इथेच थांबले आहेत, त्यांची त्या त्या भागातील बेस कॅम्पवर भोजन आणि निवासाची व्यवस्था केल्याची माहिती ठेकेदार प्रतिनिधींकडून देण्यात आली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लाॅक डाऊनमुळे चौपदरीकरणाचे काम ठप्प कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यात महामार्ग चौपदरीकरणाचेही काम ठप्प आहे. महामार्ग विभाग पुन्हा काम सुरू करण्याचे पत्र देत नाही तोपर्यंत चौपदरीकरणाची कामे सुरू करता येत नसल्याचे ठेकेदार प्रतिनिधींकडून स्पष्ट करण्यात आले. सद्यःस्थितीत उड्डाणपूल, नद्यांवरील पूल आणि सर्व्हिस रोडची कामे ठप्प आहेत. लॉकडाउनमुळे मे अखेरपर्यंत चौपदरीकरण पूर्णत्वाचीही शक्‍यता मावळली आहे.  कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम राज्य सरकारने लॉकडाउन घोषित केले. त्यानंतर केंद्रानेही 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली. यात महामार्ग चौपदरीकरणाचेही काम बंद करण्यात आले आहे. दरम्यान, शासनाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची कामे 1 एप्रिलपासून सुरू होतील असे जाहीर केले असले तरी त्याबाबतचे आदेश आले नसल्याने चौपदरीकरणाची उर्वरित कामे करता येत नसल्याची माहिती महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदार प्रतिनिधींकडून देण्यात आली.  सिंधुदुर्गात खारेपाटण ते झाराप या 83 किलोमीटर टप्प्यामधील चौपदरीकरणाचे 90 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. कणकवली शहरासह नांदगाव, कासार्डे येथील उड्डाणपूल, कुडाळ शहर, जानवली गावातील एक किलोमीटरचा भाग तसेच कसाल, जानवली, खारेपाटण या नद्यांवरील दुसऱ्या पुलांची कामे थांबली आहेत. याखेरीज जानवली, साकेडी येथील अंडरपासची कामेही अपूर्ण स्थितीत राहिली आहेत. यातील कणकवली शहरातील उड्डाणपूल, खारेपाटण नदीवरील पुलांची कामे वगळता उर्वरित कामे मे 2020 अखेरपर्यंत करण्याचे नियोजन दिलीप बिल्डकॉन आणि केसीसी बिल्डकॉन या कंपनीने केले होते. त्यानुसार चौपदरीकरण कामाची गती देखील वाढविण्यात आली होती; मात्र लॉकडाउनमुळे सर्वच कामे ठप्प झाली आहेत.  अनेक मजुरांनीही आपले गाव गाठले  दिलीप बिल्डकॉन आणि केसीसी बिल्डकॉन या ठेकेदार कंपन्यांकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील कामगार मोठ्या संख्येने आहेत. लॉकडाउननंतर यातील अनेक कामगारांनी मिळेल त्या वाहनाने आपले गाव गाठले आहे. तर जे कामगार इथेच थांबले आहेत, त्यांची त्या त्या भागातील बेस कॅम्पवर भोजन आणि निवासाची व्यवस्था केल्याची माहिती ठेकेदार प्रतिनिधींकडून देण्यात आली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XaeYZm
Read More
Coronavirus : आधारकार्ड ग्राह्य धरून धान्य द्या - फडणवीस

मुंबई - ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांचे आधारकार्ड प्रमाण मानून आणि ज्यांच्याकडे आधारकार्ड सुद्धा नाही, अशांची यादी तयार करून, ती तहसीलदारांकडून प्रमाणित करून त्यांनाही धान्य द्या. या कालावधीत एकही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फडणवीस यांनी आज भाजपाच्या राज्यातील सर्व मंडल अध्यक्षांशी थेट संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकारने अन्नधान्याचा साठा उपलब्ध करून दिला आहे. साधारणत: राज्यात ९ कोटी लोक हे रेशनमधून धान्य घेत असतात.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : आधारकार्ड ग्राह्य धरून धान्य द्या - फडणवीस मुंबई - ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांचे आधारकार्ड प्रमाण मानून आणि ज्यांच्याकडे आधारकार्ड सुद्धा नाही, अशांची यादी तयार करून, ती तहसीलदारांकडून प्रमाणित करून त्यांनाही धान्य द्या. या कालावधीत एकही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फडणवीस यांनी आज भाजपाच्या राज्यातील सर्व मंडल अध्यक्षांशी थेट संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकारने अन्नधान्याचा साठा उपलब्ध करून दिला आहे. साधारणत: राज्यात ९ कोटी लोक हे रेशनमधून धान्य घेत असतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wRRrlv
Read More
सलमान खान से लेकर अक्षय कुमार के साथ सुपरहिट फिल्में- असली दबंग हैं ये निर्देशक

सलमान खान से लेकर अक्षय कुमार के साथ सुपरहिट फिल्में- असली दबंग हैं ये निर्देशक

April 04, 2020 0 Comments
प्रभुदेवा एक ऐसे कलाकार हैं जिन्होंने ना सिर्फ बतौर अभिनेता बल्कि बतौर कोरियोग्राफर और निर्देशक भी खूब सराहना हासिल की है। तमिल और तेलुगु फि...
Read More
अजय देवगन की फिल्मों का बॉक्स ऑफिस रिपोर्ट, करियर की पहली फिल्म हिट और 100वीं फिल्म तानाजी सुपरहिट

अजय देवगन की फिल्मों का बॉक्स ऑफिस रिपोर्ट, करियर की पहली फिल्म हिट और 100वीं फिल्म तानाजी सुपरहिट

April 04, 2020 0 Comments
अभिनेता अजय देवगन का जन्म 2 अप्रैल 1969 को नई दिल्ली में हुआ। अपने करियर में वह 100 फिल्में कर चुके हैं। जनवरी में रिलीज हुई 'तानाजी...
Read More
BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

April 04, 2020 0 Comments
साल का पहला क्वाटर, यानि की पहले 3 महीने पूरे हो चुके हैं और बॉक्स ऑफिस पर अभी भी अजय देवगन की तान्हाजी टॉप पर बनी हुई है। कोरोना वायरस की व...
Read More
अनुभव सातासमुद्रापारचे... : भारतीय विद्यार्थी बनले स्वयंसेवक

निसर्ग सौंदर्यासाठी, पर्यटनासाठी आणि आरोग्यसंपन्न लोकांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंडमध्येही कोरोनाने नागरिकांमध्ये धाक बसवला आहे. येथे संसर्ग वाढत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेजारच्या इटलीमध्ये मृतांची संख्या वाढू लागल्यावर स्वित्झर्लंडमध्येही काहीशी घबराट पसरली आहे. पर्यटक आणि विद्यार्थी यांनी सतत गजबजलेल्या या देशात ‘लॉकडाउन’मुळे कमालीची शांतता पसरली आहे. देशाच्या सीमा रोखल्या गेल्या आहेत. शाळा बंद आहेत. रस्ते ओस पडले आहेत. गल्ल्या सुनसान आहेत. पण त्याचबरोबर लोकांना मदतीची गरजही मोठ्या प्रमाणात लागत आहे. विशेषतः वैद्यकीय विलगीकरण आवश्यक झालेल्यांना विद्यार्थी स्वयंसेवक मदतीचा हात देत आहेत.

मी जिनिव्हा येथे स्टुडंट असोसिएशन ऑफ द ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटची (जिसा) जनसंपर्क संचालिका आहे. जिनिव्हातील ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटमध्ये इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचा पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. याच इन्स्टिट्युटमधे मी शिक्षणही घेत आहे. माझा आईबरोबरचा, प्राजक्ता ढेरे, संयुक्त कवितासंग्रहही नुकताच प्रकाशित झाला आहे. 

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वित्झर्लंडमधील भारतीय विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून मदतीला उतरले आहेत. जनसंपर्क संचालिका असल्याने हे विद्यार्थी स्वयंसेवक करत असलेल्या कामाच्या समन्वयाची जबाबदारी माझ्यावर आहे. हादेखील एक वेगळाच अनुभव असून त्यातून बरेच काही शिकता येण्यासारखे आहे. गरजूंपर्यंत किराणा सामान व औषधे पोचवणे, मानसिक एकलेपण वाटणाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणे अशी कामे आपले विद्यार्थी करीत आहेत. कोरोनाविरुद्ध लढाई सुरू झाल्यावर ‘जिसा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आणि गरजूंच्या मदतीला ते धावून जात आहेत. शंभराहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांचा या स्वयंसेवकांत समावेश आहे. 

जिनिव्हा व बर्न येथील भारतीय वकिलातीही या विद्यार्थ्यांना सहकार्य करीत आहेत. 
हे स्वयंसेवक विलगीकरण कक्षातील लोकांसाठी जेवण पुरवणे, किराणा सामान पोचवणे, औषधे व स्वच्छतेच्या वस्तू पुरवणे आदी कामे तर करीत आहेतच, पण जे मानसिकदृष्ट्या खचले आहेत त्यांना मानसिक आधार देण्याचे महत्त्वाचे काम करीत आहेत. आम्ही विद्यार्थी या जगातील जबाबदार नागरिकाचे वर्तन कसे असावे, हेच जणू सध्याच्या दिवसांत शिकत आहोत.
(शब्दांकन - संतोष शेणई)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अनुभव सातासमुद्रापारचे... : भारतीय विद्यार्थी बनले स्वयंसेवक निसर्ग सौंदर्यासाठी, पर्यटनासाठी आणि आरोग्यसंपन्न लोकांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंडमध्येही कोरोनाने नागरिकांमध्ये धाक बसवला आहे. येथे संसर्ग वाढत आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेजारच्या इटलीमध्ये मृतांची संख्या वाढू लागल्यावर स्वित्झर्लंडमध्येही काहीशी घबराट पसरली आहे. पर्यटक आणि विद्यार्थी यांनी सतत गजबजलेल्या या देशात ‘लॉकडाउन’मुळे कमालीची शांतता पसरली आहे. देशाच्या सीमा रोखल्या गेल्या आहेत. शाळा बंद आहेत. रस्ते ओस पडले आहेत. गल्ल्या सुनसान आहेत. पण त्याचबरोबर लोकांना मदतीची गरजही मोठ्या प्रमाणात लागत आहे. विशेषतः वैद्यकीय विलगीकरण आवश्यक झालेल्यांना विद्यार्थी स्वयंसेवक मदतीचा हात देत आहेत. मी जिनिव्हा येथे स्टुडंट असोसिएशन ऑफ द ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटची (जिसा) जनसंपर्क संचालिका आहे. जिनिव्हातील ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटमध्ये इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचा पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. याच इन्स्टिट्युटमधे मी शिक्षणही घेत आहे. माझा आईबरोबरचा, प्राजक्ता ढेरे, संयुक्त कवितासंग्रहही नुकताच प्रकाशित झाला आहे.  कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वित्झर्लंडमधील भारतीय विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून मदतीला उतरले आहेत. जनसंपर्क संचालिका असल्याने हे विद्यार्थी स्वयंसेवक करत असलेल्या कामाच्या समन्वयाची जबाबदारी माझ्यावर आहे. हादेखील एक वेगळाच अनुभव असून त्यातून बरेच काही शिकता येण्यासारखे आहे. गरजूंपर्यंत किराणा सामान व औषधे पोचवणे, मानसिक एकलेपण वाटणाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणे अशी कामे आपले विद्यार्थी करीत आहेत. कोरोनाविरुद्ध लढाई सुरू झाल्यावर ‘जिसा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आणि गरजूंच्या मदतीला ते धावून जात आहेत. शंभराहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांचा या स्वयंसेवकांत समावेश आहे.  जिनिव्हा व बर्न येथील भारतीय वकिलातीही या विद्यार्थ्यांना सहकार्य करीत आहेत.  हे स्वयंसेवक विलगीकरण कक्षातील लोकांसाठी जेवण पुरवणे, किराणा सामान पोचवणे, औषधे व स्वच्छतेच्या वस्तू पुरवणे आदी कामे तर करीत आहेतच, पण जे मानसिकदृष्ट्या खचले आहेत त्यांना मानसिक आधार देण्याचे महत्त्वाचे काम करीत आहेत. आम्ही विद्यार्थी या जगातील जबाबदार नागरिकाचे वर्तन कसे असावे, हेच जणू सध्याच्या दिवसांत शिकत आहोत. (शब्दांकन - संतोष शेणई) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aKSx0V
Read More
ट्रम्प यांच्याकडून अधिकाऱ्याला डच्चू

वॉशिंग्टन - महाभियोगाचा खटला चालविण्यासाठी जी तक्रार कारणीभूत ठरली त्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गुप्तचर संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्याची घोषणा अमेरिकीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. या संदर्भात ट्रम्प यांनी सिनेटच्या गुप्तचर समितीला शुक्रवारी पत्र लिहित, मायकल अटकिन्सन यांच्यावरील आपला विश्वास उडाला आहे. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रम्प यांच्या विरोधातील प्रकरण समोर आणणाऱ्या अज्ञात व्यक्तीने केलेल्या तक्रारीचा अभ्यास करून ऑगस्टमध्ये अटकिन्सन यांनी ती पुढे पाठविली होती. या तक्रारीच्या आधारेच ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग दाखल करण्यात आला होता. सिनेटमध्ये जानेवारीत ट्रम्प यांच्याविरोधातील ऐतिहासिक महाभियोगाच्या खटल्याची सुनावणी झाली होती. २०२०मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील आपले संभाव्य प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची मागणी ट्रम्प यांनी युक्रेनच्या नेत्यांकडे केली होती. त्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनला अमेरिकेकडून दिली जाणारी अधिकृत मदतही रोखून धरली होती, असा आरोप ट्रम्प यांच्याविरोधात होता. या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर अटकिन्सन यांनी ही तक्रार अमेरिकी कॉंग्रेसकडे पाठविली होती. त्या अधारे ट्रम्प यांची महाभियोगाच्या खटल्यावेळी चौकशी झाली होती. अखेरीस सिनेटमध्ये ट्रम्प यांच्याबाजूने मते पडल्याने त्यांची खुर्ची बचावली होती.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ट्रम्प यांच्याकडून अधिकाऱ्याला डच्चू वॉशिंग्टन - महाभियोगाचा खटला चालविण्यासाठी जी तक्रार कारणीभूत ठरली त्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गुप्तचर संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्याची घोषणा अमेरिकीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. या संदर्भात ट्रम्प यांनी सिनेटच्या गुप्तचर समितीला शुक्रवारी पत्र लिहित, मायकल अटकिन्सन यांच्यावरील आपला विश्वास उडाला आहे. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ट्रम्प यांच्या विरोधातील प्रकरण समोर आणणाऱ्या अज्ञात व्यक्तीने केलेल्या तक्रारीचा अभ्यास करून ऑगस्टमध्ये अटकिन्सन यांनी ती पुढे पाठविली होती. या तक्रारीच्या आधारेच ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग दाखल करण्यात आला होता. सिनेटमध्ये जानेवारीत ट्रम्प यांच्याविरोधातील ऐतिहासिक महाभियोगाच्या खटल्याची सुनावणी झाली होती. २०२०मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील आपले संभाव्य प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची मागणी ट्रम्प यांनी युक्रेनच्या नेत्यांकडे केली होती. त्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनला अमेरिकेकडून दिली जाणारी अधिकृत मदतही रोखून धरली होती, असा आरोप ट्रम्प यांच्याविरोधात होता. या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर अटकिन्सन यांनी ही तक्रार अमेरिकी कॉंग्रेसकडे पाठविली होती. त्या अधारे ट्रम्प यांची महाभियोगाच्या खटल्यावेळी चौकशी झाली होती. अखेरीस सिनेटमध्ये ट्रम्प यांच्याबाजूने मते पडल्याने त्यांची खुर्ची बचावली होती. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2R6uZMj
Read More