Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 15, 2020

पादचाऱ्याला चुकवण्याच्या प्रयत्नात एसटी झाडावर आदळली, १ जण ठार तर २७ जखमी
कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू
कोरोना व्हायरसचे संशयित रूग्ण हॉस्पिटलमधून पळून का जात आहेत?
कोरोना का असर: लखनऊ, आगरा समेत 11 जिलों में सिनेमा हॉल और मॉल बंद https://ift.tt/2NfH8z5
पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाण घटले

पुणे - कोरोनाचा शहरात उद्रेक झाल्यामुळे धास्तावलेले नागरिक घरातच थांबत असल्यामुळे वाहतूक क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. विमान, एसटी, रेल्वे आणि पीएमपी बसच्या प्रवाशांची संख्या किमान २५ टक्‍क्‍यांपर्यंत घटली आहे. यात प्रामुख्याने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण कमी झाले असून शहरातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढती आहे. 

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रेल्वे आरक्षण रद्द करण्याचा ट्रेंड
पुण्याकडे रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या घटली आहे. लांब पल्ल्याच्या तसेच जवळच्या अंतराच्या प्रवाशांचा त्यात समावेश आहे. तसेच दौंडवरून पुण्याकडे येणाऱ्या आणि लोणावळा- पुणे मार्गावरील प्रवाशांचाही त्यात समावेश आहे, अशी माहिती रेल्वेतील अधिकृत सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. नियोजीत रेल्वे प्रवासाचे आरक्षण रद्द करण्याचाही ‘ट्रेंड’ आला आहे. नेमकी किती आरक्षणे रद्द झाली आहेत, याचा एकत्रित तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. मात्र, पुणे विभागात वेगवेगळ्या स्थानकांवरून वेगवेगळ्या प्रवासाची आरक्षणे रद्द होत आहेत. तसेच ‘आयआरसीटीसी’च्या सहलीही रद्द करण्यात   येत आहे अथवा पुढे ढकलल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. मात्र, कोरोनामुळे एकही रेल्वेगाडी अद्याप रद्द केलेली नाही. 

कोरोनामुळे पुण्यात रस्त्यांवर शुकशुकाट (फोटो फीचर)

पीएमपीलाही फटका
पीएमपीचे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवासी पाच दिवसांत सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घटले आहेत. त्याचा फटका उत्पन्नावरही झाला आहे. एरवी सरासरी ११ ते ११.५० लाख प्रवाशांची वाहतूक सुरू होती. सध्या ही वाहतूक ९ ते ९. ५० लाखांवर आली आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्नही एक कोटी ६० लाख रुपयांवरून एक कोटी २५ लाखांवर आले आहे, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. प्रवाशांच्या सोयीसाठी गर्दी कमी असली तरी, बस सेवा सुरू ठेवली आहे. काही परीक्षा सुरू असल्यामुळे कोठेही मार्ग बदलले नाहीत. फिनेलचा दररोज वापर करून बसचे निर्जंतुकीकरण करावे, प्रत्येक फेरीनंतर बस स्वच्छ करूनच त्या मार्गांवर सोडण्याचे आदेश १४ आगारांना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. चालक-वाहकांनी सॅनिटायझरचा वापर करावा आदी सूचनाही प्रशासानने त्यांना दिल्या आहेत.

एसटीचे ३० टक्के प्रवासी घटले 
शहरात स्वारगेट, पुणे स्टेशन व वाकडेवाडी ही एसटीची प्रमुख स्थानके आहेत. या तीनही स्थानकांतून दररोज ४५०० बसेसची ये-जा होते. मात्र, पाच सहा दिवसांपासून शहरांतून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढती आहे तर, पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या विभागीय वाहतूक नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. एसटीची एरवीपेक्षा प्रवाशांची संख्या ३० टक्‍क्‍यांनी घटली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांचा त्यात समावेश आहे. एसटीच्या गाड्यांची वाहतूक नियमितपणे सुरू आहे. तसेच बस मार्गावर सोडण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आरक्षण केंद्रावर प्रवाशांकडून पैसे देण्या-घेण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझर ठेवले आहे. बस स्वच्छ केल्याशिवाय मार्गावर सोडली जात नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाण घटले पुणे - कोरोनाचा शहरात उद्रेक झाल्यामुळे धास्तावलेले नागरिक घरातच थांबत असल्यामुळे वाहतूक क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. विमान, एसटी, रेल्वे आणि पीएमपी बसच्या प्रवाशांची संख्या किमान २५ टक्‍क्‍यांपर्यंत घटली आहे. यात प्रामुख्याने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण कमी झाले असून शहरातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढती आहे.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  रेल्वे आरक्षण रद्द करण्याचा ट्रेंड पुण्याकडे रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या घटली आहे. लांब पल्ल्याच्या तसेच जवळच्या अंतराच्या प्रवाशांचा त्यात समावेश आहे. तसेच दौंडवरून पुण्याकडे येणाऱ्या आणि लोणावळा- पुणे मार्गावरील प्रवाशांचाही त्यात समावेश आहे, अशी माहिती रेल्वेतील अधिकृत सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. नियोजीत रेल्वे प्रवासाचे आरक्षण रद्द करण्याचाही ‘ट्रेंड’ आला आहे. नेमकी किती आरक्षणे रद्द झाली आहेत, याचा एकत्रित तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. मात्र, पुणे विभागात वेगवेगळ्या स्थानकांवरून वेगवेगळ्या प्रवासाची आरक्षणे रद्द होत आहेत. तसेच ‘आयआरसीटीसी’च्या सहलीही रद्द करण्यात   येत आहे अथवा पुढे ढकलल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. मात्र, कोरोनामुळे एकही रेल्वेगाडी अद्याप रद्द केलेली नाही.  कोरोनामुळे पुण्यात रस्त्यांवर शुकशुकाट (फोटो फीचर) पीएमपीलाही फटका पीएमपीचे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवासी पाच दिवसांत सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घटले आहेत. त्याचा फटका उत्पन्नावरही झाला आहे. एरवी सरासरी ११ ते ११.५० लाख प्रवाशांची वाहतूक सुरू होती. सध्या ही वाहतूक ९ ते ९. ५० लाखांवर आली आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्नही एक कोटी ६० लाख रुपयांवरून एक कोटी २५ लाखांवर आले आहे, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. प्रवाशांच्या सोयीसाठी गर्दी कमी असली तरी, बस सेवा सुरू ठेवली आहे. काही परीक्षा सुरू असल्यामुळे कोठेही मार्ग बदलले नाहीत. फिनेलचा दररोज वापर करून बसचे निर्जंतुकीकरण करावे, प्रत्येक फेरीनंतर बस स्वच्छ करूनच त्या मार्गांवर सोडण्याचे आदेश १४ आगारांना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. चालक-वाहकांनी सॅनिटायझरचा वापर करावा आदी सूचनाही प्रशासानने त्यांना दिल्या आहेत. एसटीचे ३० टक्के प्रवासी घटले  शहरात स्वारगेट, पुणे स्टेशन व वाकडेवाडी ही एसटीची प्रमुख स्थानके आहेत. या तीनही स्थानकांतून दररोज ४५०० बसेसची ये-जा होते. मात्र, पाच सहा दिवसांपासून शहरांतून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढती आहे तर, पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या विभागीय वाहतूक नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. एसटीची एरवीपेक्षा प्रवाशांची संख्या ३० टक्‍क्‍यांनी घटली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांचा त्यात समावेश आहे. एसटीच्या गाड्यांची वाहतूक नियमितपणे सुरू आहे. तसेच बस मार्गावर सोडण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आरक्षण केंद्रावर प्रवाशांकडून पैसे देण्या-घेण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझर ठेवले आहे. बस स्वच्छ केल्याशिवाय मार्गावर सोडली जात नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39REruc
Read More
Corona Virus : पाळीव प्राण्यांसाठी पुढे आला समीर, म्हणतो "मी सांभाळतो तुमच्या प्राण्यांना"

अमरावती : संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलेल्या कोरोना व्हायरसची सर्वत्र धास्ती पसरली आहे. हा व्हायरस प्राण्यांमधून पसरत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगून सुद्धा अनेक लोक आपल्या पाळीव कुत्र्यांना तसेच इतर प्राण्यांना घरात ठेवण्यास तयार नाहीत,असं चित्र दिसत आहे. त्यामुळे आता कोरोना व्हायरसचा फटका इतर प्राण्यांनाही बसू लागलाय. याच गोष्टींचा परिमाण लक्षत घेता अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपचा संचालक समीर जवंजाळ याने आपले प्राणी बाहेर रस्त्यावर किव्हा जंगलात न सोडता "आम्हला दत्तक द्या आम्ही त्याना पोसतो" असे आवाहन केले आहे.

प्राण्यांना पोसणे , सांभाळणे फार खार्चिक गोष्ट आहे. प्राण्यांच्या मूळ अनेक आजार होतात असे सांगितले जाते त्यातच आता तर कोरोना व्हायरसचे संकट, त्यामुळे अनेक जण तातडीने या सर्व पाळीव  प्राण्यांना जंगलात किंव्हा इतर ठिकाणी सोडत आहेत. त्यामुळे हे पाळीव प्राणि सुद्धा बेघर होत आहेत. या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर ना सोडता मला दत्तक  द्या असे आवाहन अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपचा संचालक समीर जनवंजाळ याने केले आहे.

पाळीव प्राण्यांना सुद्धा बसतोय कोरोनाचा फटका
एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे लक्षात आल्यास, त्या व्यक्तीला इतरांपासून वेगळे ठेवले जाते. परिणामी त्यानं समजा कुत्रा किंवा इतर प्राणी पाळला असेल, तर त्याच्यावर बेघर होण्याची वेळ अली आहे. या कोरोना व्हायरस मूळ आली आहे. त्यामुळे अनेक जण आता आपले पाळीव प्राणी समीरकडे विश्वासने आणून देत आहेत.

सध्या वेगाने पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे  अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना  या व्हायरसची लागण झाल्याची माहिती आहे. प्राण्यांपासून हा रोग पसरत असल्याची माहिती  सगळीकडे पसरल्याने आता  काही लोकांनी आपल्याच घरातील पाळीव प्राण्यांना घरातून बाहेर काढले जात आहे. अशातच समीरने उचललेले पाऊल अत्यंत प्रेरणादायी असून त्याचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Virus : पाळीव प्राण्यांसाठी पुढे आला समीर, म्हणतो "मी सांभाळतो तुमच्या प्राण्यांना" अमरावती : संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलेल्या कोरोना व्हायरसची सर्वत्र धास्ती पसरली आहे. हा व्हायरस प्राण्यांमधून पसरत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगून सुद्धा अनेक लोक आपल्या पाळीव कुत्र्यांना तसेच इतर प्राण्यांना घरात ठेवण्यास तयार नाहीत,असं चित्र दिसत आहे. त्यामुळे आता कोरोना व्हायरसचा फटका इतर प्राण्यांनाही बसू लागलाय. याच गोष्टींचा परिमाण लक्षत घेता अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपचा संचालक समीर जवंजाळ याने आपले प्राणी बाहेर रस्त्यावर किव्हा जंगलात न सोडता "आम्हला दत्तक द्या आम्ही त्याना पोसतो" असे आवाहन केले आहे. प्राण्यांना पोसणे , सांभाळणे फार खार्चिक गोष्ट आहे. प्राण्यांच्या मूळ अनेक आजार होतात असे सांगितले जाते त्यातच आता तर कोरोना व्हायरसचे संकट, त्यामुळे अनेक जण तातडीने या सर्व पाळीव  प्राण्यांना जंगलात किंव्हा इतर ठिकाणी सोडत आहेत. त्यामुळे हे पाळीव प्राणि सुद्धा बेघर होत आहेत. या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर ना सोडता मला दत्तक  द्या असे आवाहन अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपचा संचालक समीर जनवंजाळ याने केले आहे. पाळीव प्राण्यांना सुद्धा बसतोय कोरोनाचा फटका एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे लक्षात आल्यास, त्या व्यक्तीला इतरांपासून वेगळे ठेवले जाते. परिणामी त्यानं समजा कुत्रा किंवा इतर प्राणी पाळला असेल, तर त्याच्यावर बेघर होण्याची वेळ अली आहे. या कोरोना व्हायरस मूळ आली आहे. त्यामुळे अनेक जण आता आपले पाळीव प्राणी समीरकडे विश्वासने आणून देत आहेत. सध्या वेगाने पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे  अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना  या व्हायरसची लागण झाल्याची माहिती आहे. प्राण्यांपासून हा रोग पसरत असल्याची माहिती  सगळीकडे पसरल्याने आता  काही लोकांनी आपल्याच घरातील पाळीव प्राण्यांना घरातून बाहेर काढले जात आहे. अशातच समीरने उचललेले पाऊल अत्यंत प्रेरणादायी असून त्याचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3d3v24U
Read More
काँग्रेसचा गळका हौद?

गळकी बादली, गळका हौद यांची अवस्था कशी असते? पहिल्यांदा लहानसे छिद्र पडते, ते बुजवल्यावर काही दिवसांनी आणखी एक, मग थोडे मोठे.....! त्यात भर पडत जाते ! कारण? मूळ बादली किंवा मूळ हौदच कमजोर व जुना झालेला असतो. डागडुजी केली तरी ती तात्पुरतीच ठरते. त्यामुळे पूर्ण नूतनीकरणाची गरज निर्माण होते. काँग्रेसला तशाच नूतनीकरणाची आवश्‍यकता आहे, अन्यथा गळती लागत लागत सर्वच संपुष्टात येण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून गेले म्हणून पक्ष हादरला किंवा त्यामुळे पक्ष संपणार आहे, असे मुळीच नव्हे. कारण शिंदे यांना ‘ग्वाल्हेरचे महाराज’ ही पदवी व त्यामुळे वलय प्राप्त असले तरी ते फार लोकप्रिय नेते आहेत, असा त्याचा अर्थ नाही. अन्यथा २०१९ मध्ये ते लोकसभा निवडणूक हरले नसते. आताही जे २२ आमदार बाहेर पडले आहेत, त्यातील फक्त नऊ आमदार त्यांचे कट्टर समर्थक आहेत आणि उरलेली मंडळी कधीही टोप्या फिरवू शकतात. त्यामुळे शिंदे यांच्या बहिर्गमनाचे निमित्त करून काँग्रेसचे नेतृत्व आत्मपरीक्षण करून पक्षाला केवळ सावरण्याचेच नव्हे, तर त्याला पुन्हा गतिमान व चैतन्यशील करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करू इच्छिते यावरच पक्षाचे भविष्य अवलंबून आहे.

पक्षाध्यक्षपदाबाबतचा पेच
अलीकडे दोन-तीनदा संसदेत राहुल गांधी यांच्याशी पत्रकारांचा अनौपचारिक संवाद झाला. राहुल गांधी पुन्हा पक्षाध्यक्ष न होण्यावर ठाम असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले. पक्षात ते जे बदल करू इच्छितात, ती संधी त्यांना मिळत नसल्याने पुन्हा अध्यक्ष होऊन करायचे काय, असा त्यांच्या एकंदर बोलण्याचा रोख दिसला. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. राहुल गांधी जो काही काळ अध्यक्ष होते, त्या काळात पक्षातील ‘ओल्ड गार्ड’ काहीसे पिछाडीवर गेले होते. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व पुनःश्‍च त्यांच्या मातुःश्री सोनिया गांधी यांच्याकडे गेले. त्यामुळे पिछाडीवरील ‘ओल्ड गार्ड’ पुन्हा सक्रिय झाले आणि पक्षसंघटनेची सूत्रेही त्यांनी पुन्हा ताब्यात घेतली. याचा अर्थ राहुल गांधी यांचे पक्षात काहीच चालत नाही, असा घ्यायचा म्हटले तर तो वेडगळपणा ठरेल. राज्यसभेचे उमेदवार निवडताना सोनिया, राहुल व प्रियांका या गांधी त्रिकुटानेच निर्णय घेतलेले आहेत. तसेच अन्य काही संघटनात्मक निर्णयातही त्यांचा सहभाग आहे. यामुळेच पक्षातील राहुल समर्थकांनी त्यांचे अध्यक्ष म्हणून पुनरागमन व्हावे यासाठी आरोळ्या सुरू केल्या. परंतु खुद्द राहुल गांधी यांची भूमिका आपल्याकडे जबाबदारी द्यायची असेल, तर संपूर्ण आणि त्यांना पाहिजे ते बदल करण्याच्या अधिकारांसह दिली जावी, अशी असल्याने काहीशी पेचाची स्थिती आहे. पक्षाचे एक नेते या स्वरूपात आपण पक्षाचे काम सांभाळत आहोतच, असेही राहुल गांधी काहीजणांकडे बोलल्याचे सांगण्यात येते. थोडक्‍यात क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने कर्णधारपदाऐवजी संघातील एक खेळाडू म्हणून विक्रम केले, तसा काहीसा पवित्रा राहुल गांधी यांचा दिसून येतो. या पार्श्‍वभूमीवर पक्षातील काही मंडळींनी आणि पक्षाबाहेरच्या काँग्रेसच्या हितचिंतकांनीही गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीकडे पक्षाची जबाबदारी दिली जावी, असा हाकारा सुरू केला आहे.

प्रादेशिक पक्षांची नाराजी
एका बाजूला खुद्द काँग्रेसमध्येच दिशाहीनपणा व भरकटलेपणा दिसून येत असताना, दुसरीकडे विरोधी पक्षांचे भाजप-विरोधी राजकारण व मोर्चेबांधणीतही अन्य विरोधी व प्रामुख्याने सबळ प्रादेशिक पक्ष काँग्रेसला सहभागी करून घेताना दिसत नाहीत. अर्थात ज्याप्रमाणे जुने राजे-महाराजे यांना आपल्या पूर्ववैभवाचा अहंकार असतो, तसाच काँग्रेसलाही आहे. आपण राष्ट्रीय पक्ष असल्याचा विलक्षण मद काँग्रेसमध्ये अद्याप आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे दिल्ली दंगलीच्या वेळचे आहे. दिल्लीत भीषण दंगल झाल्यानंतर दंगलग्रस्त भागात शांततायात्रा काढणे, राष्ट्रपतींना निवेदन देणे वगैरे कार्यक्रम संयुक्तपणे करण्याबाबत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी काँग्रेस नेतृत्वाला सुचविले. त्यात सर्व भाजपविरोधी पक्षांना सामील करणे व त्यातून शक्तिप्रदर्शन करण्याची त्यांची योजना होती. परंतु काँग्रेस नेतृत्वाने ‘कल्पना-चौर्य’ करून स्वतः एकट्याने व परस्पर राष्ट्रपतींना भेटण्याचा कार्यक्रम केला. शांततायात्रा काढण्याचे धैर्य नव्हते, पण दंगल शांत झाल्यानंतर पक्षाच्या स्थानिक नेत्यांबरोबर राहुल गांधी यांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. विरोधी पक्षांना ज्या पद्धतीने काँग्रेसने दगा दिला, त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे नेते काँग्रेसवर नाराज होणे स्वाभाविक होते. त्याचीच परिणिती मग शरद पवार, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी, अरुण शौरी व यशवंत सिन्हा, डी. राजा यांनी एका संयुक्त पत्राद्वारे काश्‍मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या त्वरित सुटकेची मागणी करण्यात झाली. विशेष म्हणजे तीनच दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांची सुटका करण्याची घोषणा झाली.

नवी राजकीय संस्कृती
राहुल गांधी यांचा पक्षावर, पक्षाच्या धोरणावर दिसून येणारा प्रभाव हा असा आहे. राहुल गांधी यांना आघाडीच्या राजकारणात फारसा रस नाही. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाला विरोध केला आणि तुटकपणे त्यास मान्यता दिली. ‘एनजीओ’ आणि पोथीनिष्ठेच्या आधारे राजकारण करण्याकडे राहुल गांधी यांचा कल आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळासाठी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्याची त्यांची तयारी असली तरी इतरांची ती नाही. त्यामुळेच काँग्रेसला गळती लागली आहे. राजकारणाचे स्वरूप धंदेवाईक आणि ‘करिअरिस्ट’ झाले आहे. क्रिकेटचे उदाहरण द्यायचे झाल्यास आता लोकांना पाच-पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात रस राहिलेला नाही. त्यांना ‘टी-२०’ किंवा फारतर एक दिवसाच्या सामन्यात रस आहे. जेथे चटकन चमकता येते आणि नाव, कीर्ती, मानमरातब प्राप्त होऊ शकतो. ज्योतिरादित्य शिंदे किंवा तत्सम नेत्यांना काँग्रेसमध्ये राहून काही मिळत नसेल, तर ते फार काळ ‘पक्षसेवा’ करू शकणार नाहीत. त्यांना ‘राजकीय मेवा’ मिळेल तेथे ते जातील. या प्रवृत्ती राजकारणावर वरचष्मा गाजवू लागतात, तेव्हा विचारसरणी, तत्त्वज्ञान या गोष्टी पुस्तकी होतात. राहुल गांधी अशाच काही कल्पनांना उराशी कवटाळून बसू पाहात असल्याने नव्या पिढीला आकर्षित करण्यात त्यांना अपयश येत आहे. कारण नव-राजकारणात ‘तत्काळ- परिणाम’, ‘तत्काळ फलनिष्पत्ती’ (इमिजिएट आउटकम अँड डिलिव्हरी) अपेक्षित आहे. खूप काम करून मग उद्दिष्टप्राप्ती हा दीर्घ काळाचा मार्ग निवडण्याची कुणाची तयारी नाही. त्यामुळेच ज्या पक्षाला काल नावे ठेवली, त्याच पक्षात दुसऱ्या दिवशी प्रवेश करून इच्छित पदप्राप्तीचे खेळ व सोहळे हा नियम होऊ पहात आहे. त्यामुळेच काँग्रेसला व राहुल गांधी यांना राजकारणात टिकायचे असेल, तर कार्यपद्धती बदलावी लागेल आणि नव्या परिस्थितीशी व संकल्पनांशी जुळवून घ्यावे लागेल. त्यासाठी सबळ प्रादेशिक पक्षांशीदेखील प्रसंगी हातमिळवणी करावी लागेल. या बदलत्या परिस्थितीशी जुळते न घेतल्यास काँग्रेस पक्ष बाहेर फेकला जाऊ शकतो किंवा काँग्रेस व राहुल बदलण्यास तयार नसतील तर त्यांना व अन्य गांधींना बदलण्याची तयारी काँग्रेसला ठेवावी लागेल !

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

काँग्रेसचा गळका हौद? गळकी बादली, गळका हौद यांची अवस्था कशी असते? पहिल्यांदा लहानसे छिद्र पडते, ते बुजवल्यावर काही दिवसांनी आणखी एक, मग थोडे मोठे.....! त्यात भर पडत जाते ! कारण? मूळ बादली किंवा मूळ हौदच कमजोर व जुना झालेला असतो. डागडुजी केली तरी ती तात्पुरतीच ठरते. त्यामुळे पूर्ण नूतनीकरणाची गरज निर्माण होते. काँग्रेसला तशाच नूतनीकरणाची आवश्‍यकता आहे, अन्यथा गळती लागत लागत सर्वच संपुष्टात येण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून गेले म्हणून पक्ष हादरला किंवा त्यामुळे पक्ष संपणार आहे, असे मुळीच नव्हे. कारण शिंदे यांना ‘ग्वाल्हेरचे महाराज’ ही पदवी व त्यामुळे वलय प्राप्त असले तरी ते फार लोकप्रिय नेते आहेत, असा त्याचा अर्थ नाही. अन्यथा २०१९ मध्ये ते लोकसभा निवडणूक हरले नसते. आताही जे २२ आमदार बाहेर पडले आहेत, त्यातील फक्त नऊ आमदार त्यांचे कट्टर समर्थक आहेत आणि उरलेली मंडळी कधीही टोप्या फिरवू शकतात. त्यामुळे शिंदे यांच्या बहिर्गमनाचे निमित्त करून काँग्रेसचे नेतृत्व आत्मपरीक्षण करून पक्षाला केवळ सावरण्याचेच नव्हे, तर त्याला पुन्हा गतिमान व चैतन्यशील करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करू इच्छिते यावरच पक्षाचे भविष्य अवलंबून आहे. पक्षाध्यक्षपदाबाबतचा पेच अलीकडे दोन-तीनदा संसदेत राहुल गांधी यांच्याशी पत्रकारांचा अनौपचारिक संवाद झाला. राहुल गांधी पुन्हा पक्षाध्यक्ष न होण्यावर ठाम असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले. पक्षात ते जे बदल करू इच्छितात, ती संधी त्यांना मिळत नसल्याने पुन्हा अध्यक्ष होऊन करायचे काय, असा त्यांच्या एकंदर बोलण्याचा रोख दिसला. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. राहुल गांधी जो काही काळ अध्यक्ष होते, त्या काळात पक्षातील ‘ओल्ड गार्ड’ काहीसे पिछाडीवर गेले होते. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व पुनःश्‍च त्यांच्या मातुःश्री सोनिया गांधी यांच्याकडे गेले. त्यामुळे पिछाडीवरील ‘ओल्ड गार्ड’ पुन्हा सक्रिय झाले आणि पक्षसंघटनेची सूत्रेही त्यांनी पुन्हा ताब्यात घेतली. याचा अर्थ राहुल गांधी यांचे पक्षात काहीच चालत नाही, असा घ्यायचा म्हटले तर तो वेडगळपणा ठरेल. राज्यसभेचे उमेदवार निवडताना सोनिया, राहुल व प्रियांका या गांधी त्रिकुटानेच निर्णय घेतलेले आहेत. तसेच अन्य काही संघटनात्मक निर्णयातही त्यांचा सहभाग आहे. यामुळेच पक्षातील राहुल समर्थकांनी त्यांचे अध्यक्ष म्हणून पुनरागमन व्हावे यासाठी आरोळ्या सुरू केल्या. परंतु खुद्द राहुल गांधी यांची भूमिका आपल्याकडे जबाबदारी द्यायची असेल, तर संपूर्ण आणि त्यांना पाहिजे ते बदल करण्याच्या अधिकारांसह दिली जावी, अशी असल्याने काहीशी पेचाची स्थिती आहे. पक्षाचे एक नेते या स्वरूपात आपण पक्षाचे काम सांभाळत आहोतच, असेही राहुल गांधी काहीजणांकडे बोलल्याचे सांगण्यात येते. थोडक्‍यात क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने कर्णधारपदाऐवजी संघातील एक खेळाडू म्हणून विक्रम केले, तसा काहीसा पवित्रा राहुल गांधी यांचा दिसून येतो. या पार्श्‍वभूमीवर पक्षातील काही मंडळींनी आणि पक्षाबाहेरच्या काँग्रेसच्या हितचिंतकांनीही गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीकडे पक्षाची जबाबदारी दिली जावी, असा हाकारा सुरू केला आहे. प्रादेशिक पक्षांची नाराजी एका बाजूला खुद्द काँग्रेसमध्येच दिशाहीनपणा व भरकटलेपणा दिसून येत असताना, दुसरीकडे विरोधी पक्षांचे भाजप-विरोधी राजकारण व मोर्चेबांधणीतही अन्य विरोधी व प्रामुख्याने सबळ प्रादेशिक पक्ष काँग्रेसला सहभागी करून घेताना दिसत नाहीत. अर्थात ज्याप्रमाणे जुने राजे-महाराजे यांना आपल्या पूर्ववैभवाचा अहंकार असतो, तसाच काँग्रेसलाही आहे. आपण राष्ट्रीय पक्ष असल्याचा विलक्षण मद काँग्रेसमध्ये अद्याप आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे दिल्ली दंगलीच्या वेळचे आहे. दिल्लीत भीषण दंगल झाल्यानंतर दंगलग्रस्त भागात शांततायात्रा काढणे, राष्ट्रपतींना निवेदन देणे वगैरे कार्यक्रम संयुक्तपणे करण्याबाबत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी काँग्रेस नेतृत्वाला सुचविले. त्यात सर्व भाजपविरोधी पक्षांना सामील करणे व त्यातून शक्तिप्रदर्शन करण्याची त्यांची योजना होती. परंतु काँग्रेस नेतृत्वाने ‘कल्पना-चौर्य’ करून स्वतः एकट्याने व परस्पर राष्ट्रपतींना भेटण्याचा कार्यक्रम केला. शांततायात्रा काढण्याचे धैर्य नव्हते, पण दंगल शांत झाल्यानंतर पक्षाच्या स्थानिक नेत्यांबरोबर राहुल गांधी यांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. विरोधी पक्षांना ज्या पद्धतीने काँग्रेसने दगा दिला, त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे नेते काँग्रेसवर नाराज होणे स्वाभाविक होते. त्याचीच परिणिती मग शरद पवार, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी, अरुण शौरी व यशवंत सिन्हा, डी. राजा यांनी एका संयुक्त पत्राद्वारे काश्‍मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या त्वरित सुटकेची मागणी करण्यात झाली. विशेष म्हणजे तीनच दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांची सुटका करण्याची घोषणा झाली. नवी राजकीय संस्कृती राहुल गांधी यांचा पक्षावर, पक्षाच्या धोरणावर दिसून येणारा प्रभाव हा असा आहे. राहुल गांधी यांना आघाडीच्या राजकारणात फारसा रस नाही. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाला विरोध केला आणि तुटकपणे त्यास मान्यता दिली. ‘एनजीओ’ आणि पोथीनिष्ठेच्या आधारे राजकारण करण्याकडे राहुल गांधी यांचा कल आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळासाठी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्याची त्यांची तयारी असली तरी इतरांची ती नाही. त्यामुळेच काँग्रेसला गळती लागली आहे. राजकारणाचे स्वरूप धंदेवाईक आणि ‘करिअरिस्ट’ झाले आहे. क्रिकेटचे उदाहरण द्यायचे झाल्यास आता लोकांना पाच-पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात रस राहिलेला नाही. त्यांना ‘टी-२०’ किंवा फारतर एक दिवसाच्या सामन्यात रस आहे. जेथे चटकन चमकता येते आणि नाव, कीर्ती, मानमरातब प्राप्त होऊ शकतो. ज्योतिरादित्य शिंदे किंवा तत्सम नेत्यांना काँग्रेसमध्ये राहून काही मिळत नसेल, तर ते फार काळ ‘पक्षसेवा’ करू शकणार नाहीत. त्यांना ‘राजकीय मेवा’ मिळेल तेथे ते जातील. या प्रवृत्ती राजकारणावर वरचष्मा गाजवू लागतात, तेव्हा विचारसरणी, तत्त्वज्ञान या गोष्टी पुस्तकी होतात. राहुल गांधी अशाच काही कल्पनांना उराशी कवटाळून बसू पाहात असल्याने नव्या पिढीला आकर्षित करण्यात त्यांना अपयश येत आहे. कारण नव-राजकारणात ‘तत्काळ- परिणाम’, ‘तत्काळ फलनिष्पत्ती’ (इमिजिएट आउटकम अँड डिलिव्हरी) अपेक्षित आहे. खूप काम करून मग उद्दिष्टप्राप्ती हा दीर्घ काळाचा मार्ग निवडण्याची कुणाची तयारी नाही. त्यामुळेच ज्या पक्षाला काल नावे ठेवली, त्याच पक्षात दुसऱ्या दिवशी प्रवेश करून इच्छित पदप्राप्तीचे खेळ व सोहळे हा नियम होऊ पहात आहे. त्यामुळेच काँग्रेसला व राहुल गांधी यांना राजकारणात टिकायचे असेल, तर कार्यपद्धती बदलावी लागेल आणि नव्या परिस्थितीशी व संकल्पनांशी जुळवून घ्यावे लागेल. त्यासाठी सबळ प्रादेशिक पक्षांशीदेखील प्रसंगी हातमिळवणी करावी लागेल. या बदलत्या परिस्थितीशी जुळते न घेतल्यास काँग्रेस पक्ष बाहेर फेकला जाऊ शकतो किंवा काँग्रेस व राहुल बदलण्यास तयार नसतील तर त्यांना व अन्य गांधींना बदलण्याची तयारी काँग्रेसला ठेवावी लागेल ! News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cYVZqd
Read More
पॅराग्लायडिंगमुळे तरुणाईची भरारी

कामशेत - पॅराग्लायडिंग या साहसी खेळामुळे कामशेतचे नाव जगाच्या नकाशावर झळकले आहे. या साहसी खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी गोवित्री पंचक्रोशीतील तरुण परदेशात जाऊन आले आहेत. मावळातील तरुणाईला पॅराग्लायडिंग पायलट म्हणून रोजगाराचे क्षेत्र खुले झाले असून, ही बाब मावळवासीयांच्या मनाला निश्‍चित उभारी देणारी आहे.

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गडकिल्ले, सह्याद्रीचा कडेपठार हेरिटेज वॉकसाठी प्रसिद्ध आहे. पॅराग्लायडिंग स्कोअरिंगसाठी हे नाव जगाच्या नकाशावर उमटले आहे. १९९७च्या सुमारास संजय राव, अवी मलिक, संजय पेंडूरकर यांनी याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या अनुभवातून हा खेळ बहरत गेला. ‘एक्‍स्ट्रीम ॲडव्हेंचर स्पोर्टस’मध्ये या खेळाची गणना होते. जगभरातील डोंगरदऱ्या आणि कडेकपारातील पठारावरचा हा खेळ आहे. याचे प्रशिक्षण घेतले की खेळाडूला आकाशात मुक्तविहार करता येतो. तानाजी टाकवे हा तरुण मावळातील पहिला पॅराग्लायडिंग पायलट ठरला. त्यानंतर रवींद्र शेलार, पंकज गुगळे, सचिन जाधव, गणपत नेवाळे, पप्पू शेटे यांच्यासह करंजगाव, गोवित्री, नाणे, उकसाण, जांभवली, थोरण, कांब्रे येथे सत्तर प्रशिक्षक आहेत.

हवेचा दाब हा या खेळपट्टीवरचा महत्त्वाचा दुवा आहे. स्थिर हवेचा कल या खेळाची रंगत अधिक वाढवतो. अस्थिर हवेत कसलेल्या खेळाडूंना तोल सांभाळून कौशल्य दाखवावे लागते. हवेची दिशा, वेग आणि वातावरणातील तापमान, याच्यावर पॅराग्लायडर किती उंचीवर उडवायचे, हे ठरते. समुद्र सपाटीपासून दीड हजार मीटर उंचीवर दहा ते पंधरा मिनिटांची हवेतील ही सफर अनुभवता येते. प्रशिक्षित खेळाडू दोन ते चार तास ही सफर करू शकतो. पॅराग्लाडिंगमुळे मनाची एकाग्रता वाढते, धाडस वाढते.

या प्रशिक्षकांना पंधरा ते वीस हजार रुपये मानधन मिळते. जगाच्या तुलनेत सर्वांत कमी मानधनावर येथे प्रशिक्षण दिले जाते. मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळूरसह हिवाळ्यात युरोप, कॅनडा, अमेरिका, स्वीडनमधून पर्यटक येतात. प्रशिक्षकासह हॉटेल्स, टेंट कॅम्प, कृषी पर्यटन केंद्र, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहन चालक-मालकांना यातून रोजगार मिळाला आहे.

कुसगावचा टॉवर हिल, करंजगावचा शेलार हिल, ठाकूरसाईचा पवना हिल आणि वडगावची शिंदे टेकडी पॅराग्लायडिंगच्या उड्डाणाची प्रमुख ठिकाणे आहेत. तेथे पॅराग्लायडिंगप्रेमींची मांदियाळी असते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जानेवारी २००८ मध्ये संजय राव यांच्या कॅम्पसमध्ये राहून करंजगावच्या शेलार हिल येथे तीन दिवसांचे पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतले होते. 

विरार येथील पर्यटक पराग बारी म्हणाले, ‘‘येथील प्रशिक्षण सुरक्षित वाटले. सह्याद्रीचा हा परिसर न्याहाळताना खूप आनंद झाला.’’

उपसभापती दत्तात्रेय शेवाळे म्हणाले, ‘‘स्थानिकांना यातून रोजगार मिळाला आहे. सरकारने पर्यटनवाढीसाठी मूलभूत सुविधा द्याव्यात. प्रशिक्षकांना अनुदान मिळावे.’’

मी सोळा वर्षांपासून प्रशिक्षण देत आहे. आत्मविश्वास, सकारात्मकता वाढली. परदेशात जाऊन परदेशी पर्यटकांना पॅराग्लायडिंगचे धडे शिकवता आले. त्यातून रोजगाराचे साधन मिळाले.
- पंकज गुगळे, प्रशिक्षक 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पॅराग्लायडिंगमुळे तरुणाईची भरारी कामशेत - पॅराग्लायडिंग या साहसी खेळामुळे कामशेतचे नाव जगाच्या नकाशावर झळकले आहे. या साहसी खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी गोवित्री पंचक्रोशीतील तरुण परदेशात जाऊन आले आहेत. मावळातील तरुणाईला पॅराग्लायडिंग पायलट म्हणून रोजगाराचे क्षेत्र खुले झाले असून, ही बाब मावळवासीयांच्या मनाला निश्‍चित उभारी देणारी आहे. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  गडकिल्ले, सह्याद्रीचा कडेपठार हेरिटेज वॉकसाठी प्रसिद्ध आहे. पॅराग्लायडिंग स्कोअरिंगसाठी हे नाव जगाच्या नकाशावर उमटले आहे. १९९७च्या सुमारास संजय राव, अवी मलिक, संजय पेंडूरकर यांनी याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या अनुभवातून हा खेळ बहरत गेला. ‘एक्‍स्ट्रीम ॲडव्हेंचर स्पोर्टस’मध्ये या खेळाची गणना होते. जगभरातील डोंगरदऱ्या आणि कडेकपारातील पठारावरचा हा खेळ आहे. याचे प्रशिक्षण घेतले की खेळाडूला आकाशात मुक्तविहार करता येतो. तानाजी टाकवे हा तरुण मावळातील पहिला पॅराग्लायडिंग पायलट ठरला. त्यानंतर रवींद्र शेलार, पंकज गुगळे, सचिन जाधव, गणपत नेवाळे, पप्पू शेटे यांच्यासह करंजगाव, गोवित्री, नाणे, उकसाण, जांभवली, थोरण, कांब्रे येथे सत्तर प्रशिक्षक आहेत. हवेचा दाब हा या खेळपट्टीवरचा महत्त्वाचा दुवा आहे. स्थिर हवेचा कल या खेळाची रंगत अधिक वाढवतो. अस्थिर हवेत कसलेल्या खेळाडूंना तोल सांभाळून कौशल्य दाखवावे लागते. हवेची दिशा, वेग आणि वातावरणातील तापमान, याच्यावर पॅराग्लायडर किती उंचीवर उडवायचे, हे ठरते. समुद्र सपाटीपासून दीड हजार मीटर उंचीवर दहा ते पंधरा मिनिटांची हवेतील ही सफर अनुभवता येते. प्रशिक्षित खेळाडू दोन ते चार तास ही सफर करू शकतो. पॅराग्लाडिंगमुळे मनाची एकाग्रता वाढते, धाडस वाढते. या प्रशिक्षकांना पंधरा ते वीस हजार रुपये मानधन मिळते. जगाच्या तुलनेत सर्वांत कमी मानधनावर येथे प्रशिक्षण दिले जाते. मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळूरसह हिवाळ्यात युरोप, कॅनडा, अमेरिका, स्वीडनमधून पर्यटक येतात. प्रशिक्षकासह हॉटेल्स, टेंट कॅम्प, कृषी पर्यटन केंद्र, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहन चालक-मालकांना यातून रोजगार मिळाला आहे. कुसगावचा टॉवर हिल, करंजगावचा शेलार हिल, ठाकूरसाईचा पवना हिल आणि वडगावची शिंदे टेकडी पॅराग्लायडिंगच्या उड्डाणाची प्रमुख ठिकाणे आहेत. तेथे पॅराग्लायडिंगप्रेमींची मांदियाळी असते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जानेवारी २००८ मध्ये संजय राव यांच्या कॅम्पसमध्ये राहून करंजगावच्या शेलार हिल येथे तीन दिवसांचे पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतले होते.  विरार येथील पर्यटक पराग बारी म्हणाले, ‘‘येथील प्रशिक्षण सुरक्षित वाटले. सह्याद्रीचा हा परिसर न्याहाळताना खूप आनंद झाला.’’ उपसभापती दत्तात्रेय शेवाळे म्हणाले, ‘‘स्थानिकांना यातून रोजगार मिळाला आहे. सरकारने पर्यटनवाढीसाठी मूलभूत सुविधा द्याव्यात. प्रशिक्षकांना अनुदान मिळावे.’’ मी सोळा वर्षांपासून प्रशिक्षण देत आहे. आत्मविश्वास, सकारात्मकता वाढली. परदेशात जाऊन परदेशी पर्यटकांना पॅराग्लायडिंगचे धडे शिकवता आले. त्यातून रोजगाराचे साधन मिळाले. - पंकज गुगळे, प्रशिक्षक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wVc6or
Read More
राजधानी एक्सप्रेस में कोरोना के मरीज, अफवाह के बाद आधे घंटे खड़ी रही ट्रेन https://ift.tt/2wWItmw
राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर शिंदे गडबडले : (Video)

सोलापूर : "महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने "सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राहुल गांधी की प्रियांका गांधी यांच्यापैकी कोण आवडते असा प्रश्‍न मुलाखातकारांनी केला. तेव्हा हा प्रश्‍न अवघड असल्याचे सांगत त्यांनी उत्तर देणे टाळले. या प्रश्‍नाने ते गडबडून गेले. त्याचवेळी माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी शिंदे यांच्याकडून हसणे घेण्याची इच्छा व्यक्त केली. 
"सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' कार्यक्रमात माजी मंत्री शिंदे व देशमुख यांची मुलाखत ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांनी घेतली. शिंदे व देशमुख दोघेही राजकारणात आले नसते तर त्यांना काय व्हायला आवडले असते, या प्रश्‍नाने मुलाखतीची सुरवात झाली. शिंदे यांनी वॉचमन, चपराशी किंवा पिढीजात धंदा केला असता असे उत्तर दिले. त्याचवेळी शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच आपल्याला राजकारणात आणल्याचे आवर्जून सांगितले. त्याचवेळी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुकीला उभा राहण्याचा निर्णय घेतला. पण, तिकीट कापले गेले. त्यावेळी नोकरीही गेली अन्‌ तिकीटही गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी वेगवेगळ्या लोकांना घेऊन सरकार चालविले होते. त्याचप्रमाणे आताचे तीन पक्षाचे सरकारही चालेल, असा विश्‍वास शिंदे यांनी व्यक्त केला. राजकारणात नेत्यांची मैत्री असते पण कार्यकर्ते एकमेकांचे वैरी असतात, त्याबाबत काय सांगाल असे विचारले असता शिंदे म्हणाले, सगळ्याच पक्षात मित्र आहेत. माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी हे कर्तृत्ववान होते. याविषयी देशमुख म्हणाले, गाव पातळीवरील कार्यकर्त्यांत ईर्षा असते. पण, त्यांनी ती ईर्षा न बाळगता आमदार, खासदार ज्याप्रमाणे वागतात त्याचप्रमाणे गावत वागावे. त्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी शिंदे यांनी त्यांच्याबाबत घडलेली गोष्ट सांगितली. पण, सावरकर हे समाज क्रांतिकारक होते असे त्यांनी स्पष्ट केले. श्री. देशमुख यांनी शिंदे सोलापुरात येत नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केल्याचा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांनाही थेट त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचारणा झाल्याचे सांगितले. शिंदे-देशमुख हे एवढे पॉवरफुल्ल आहेत पण तुम्हाला चिमणी कशी भारी पडली? असा प्रश्‍न विचारताच होटगी रोड विमानतळ व बोरामणी विमानतळबाबत चर्चा झाली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या रागाबाबतही प्रश्‍न विचारला. शहरातील दोन देशमुख एकत्र का येत नाहीत, असा प्रश्‍न देशमुख यांना विचारला असता आम्ही एकच आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी रेणुका महागावकर, प्रशांत बडवे, अविनाश महागावकर उपस्थित होते. 

अगोदर भाजप मग लोकमंगल 
आमदार देशमुख यांना भाजप की लोकमंगल असा प्रश्‍न विचारला असता अगोदर भाजप मग लोकमंगल असे उत्तर त्यांनी दिले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी योग्य व्यक्तिमत्त्व आहेत असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्रात नितीन गडकरी तर राज्यात देवेंद्र फडणवीसच योग्य असल्याचे सांगण्यास आमदार देशमुख विसरले नाही. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर शिंदे गडबडले : (Video) सोलापूर : "महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने "सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राहुल गांधी की प्रियांका गांधी यांच्यापैकी कोण आवडते असा प्रश्‍न मुलाखातकारांनी केला. तेव्हा हा प्रश्‍न अवघड असल्याचे सांगत त्यांनी उत्तर देणे टाळले. या प्रश्‍नाने ते गडबडून गेले. त्याचवेळी माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी शिंदे यांच्याकडून हसणे घेण्याची इच्छा व्यक्त केली.  "सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' कार्यक्रमात माजी मंत्री शिंदे व देशमुख यांची मुलाखत ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांनी घेतली. शिंदे व देशमुख दोघेही राजकारणात आले नसते तर त्यांना काय व्हायला आवडले असते, या प्रश्‍नाने मुलाखतीची सुरवात झाली. शिंदे यांनी वॉचमन, चपराशी किंवा पिढीजात धंदा केला असता असे उत्तर दिले. त्याचवेळी शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच आपल्याला राजकारणात आणल्याचे आवर्जून सांगितले. त्याचवेळी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुकीला उभा राहण्याचा निर्णय घेतला. पण, तिकीट कापले गेले. त्यावेळी नोकरीही गेली अन्‌ तिकीटही गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी वेगवेगळ्या लोकांना घेऊन सरकार चालविले होते. त्याचप्रमाणे आताचे तीन पक्षाचे सरकारही चालेल, असा विश्‍वास शिंदे यांनी व्यक्त केला. राजकारणात नेत्यांची मैत्री असते पण कार्यकर्ते एकमेकांचे वैरी असतात, त्याबाबत काय सांगाल असे विचारले असता शिंदे म्हणाले, सगळ्याच पक्षात मित्र आहेत. माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी हे कर्तृत्ववान होते. याविषयी देशमुख म्हणाले, गाव पातळीवरील कार्यकर्त्यांत ईर्षा असते. पण, त्यांनी ती ईर्षा न बाळगता आमदार, खासदार ज्याप्रमाणे वागतात त्याचप्रमाणे गावत वागावे. त्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी शिंदे यांनी त्यांच्याबाबत घडलेली गोष्ट सांगितली. पण, सावरकर हे समाज क्रांतिकारक होते असे त्यांनी स्पष्ट केले. श्री. देशमुख यांनी शिंदे सोलापुरात येत नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केल्याचा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांनाही थेट त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचारणा झाल्याचे सांगितले. शिंदे-देशमुख हे एवढे पॉवरफुल्ल आहेत पण तुम्हाला चिमणी कशी भारी पडली? असा प्रश्‍न विचारताच होटगी रोड विमानतळ व बोरामणी विमानतळबाबत चर्चा झाली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या रागाबाबतही प्रश्‍न विचारला. शहरातील दोन देशमुख एकत्र का येत नाहीत, असा प्रश्‍न देशमुख यांना विचारला असता आम्ही एकच आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी रेणुका महागावकर, प्रशांत बडवे, अविनाश महागावकर उपस्थित होते.  अगोदर भाजप मग लोकमंगल  आमदार देशमुख यांना भाजप की लोकमंगल असा प्रश्‍न विचारला असता अगोदर भाजप मग लोकमंगल असे उत्तर त्यांनी दिले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी योग्य व्यक्तिमत्त्व आहेत असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्रात नितीन गडकरी तर राज्यात देवेंद्र फडणवीसच योग्य असल्याचे सांगण्यास आमदार देशमुख विसरले नाही.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Wf5H1V
Read More
जादू "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'ची 

गुंतवणुकीवर मिळणारा परतावा म्हणजे त्यावर मिळणारे "व्याज'. यावर तुमच्या संपत्तीत होणारी वाढ अवलंबून असते. हे परताव्याचे गणित सर्रास सरळ व्याज पद्धतीने मोजण्याचा सर्वांत सोपा मार्ग अवलंबिला जातो. समजा, वार्षिक 10 टक्के व्याजदराने 100 रुपये ठेव योजनेत गुंतविले, तर सरळ व्याज पद्धतीने लाभाचे सोपे गणित मांडताना एक वर्षानंतर तुमच्या मुद्दलावर परतावा म्हणून 10 रुपये मिळतील. पुढील वर्षीदेखील तुम्हाला 10 रुपये मिळतील. या पद्धतीने तुम्ही जितक्‍या कालावधीसाठी मुदतठेव केली असेल, तितक्‍या कालावधीसाठी तुम्हाला हे व्याज मिळेल. मात्र, त्यात वार्षिक 10 रुपयांचीच भर पडेल, म्हणजेच येथे ज्या रकमेवर व्याज मोजले आहे ती रक्कम, अर्थात मुद्दल तिन्ही वर्षांत एकसारखीच धरली आहे. 

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बहुतांश वित्तीय योजनांमध्ये "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'चे म्हणजेच चक्रवाढ व्याजाचे तत्त्व लागू आहे. चक्रवाढ व्याज म्हणजे प्रारंभिक गुंतवणूक मुद्दलावर व्याज मोजले जाण्यासह, त्यापुढे या रकमेत समाविष्ट होणाऱ्या व्याज रकमेचेदेखील व्याज मोजण्याची पद्धत आहे. म्हणजेच व्याजावर व्याज मोजले जाते. सुरुवातीला दिलेल्या उदाहरणाला आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊ. पहिल्या वर्षी तुम्हाला 10 रुपये व्याज मिळाल्यानंतर तुमचे भांडवल 110 रुपये होईल आणि त्यामुळे त्यापुढील वर्षी तुम्हाला 110 रुपयांवर 10 टक्के व्याज देण्यात येईल अर्थात ते 11 रुपये असेल, त्यामुळे तुमचे भांडवल 121 रुपये इतके होईल आणि त्यानंतरच्या वर्षी तुम्हाला मिळणारे व्याज 12.1 रुपये असेल. सरळ व्याज पद्धतीने जर तुम्ही 10 वर्षांसाठी मुदतठेवीत पैसे गुंतवले तर तुम्हाला 100 रुपयांच्या भांडवलावर 100 रुपयेच मिळतील. मात्र चक्रवाढ पद्धतीने व्याज लागू केल्यास तुम्हाला व्याजापोटी 160 रुपये मिळतील. यालाच म्हणतात "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'ची जादू 

"पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'ची जादू 
प्रत्येक वर्षागणिक मुद्दल रक्कम ही वाढत जाते, कारण त्यात त्या- त्या वर्षी मिळालेल्या व्याजाची रक्कम जमा होऊन त्यावर व्याजाचा लाभ मोजण्यात येतो. यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 

1) दीर्घकालीन गुंतवणूक : जितक्‍या लवकर शक्‍य होईल, तितक्‍या लवकर बचतीला सुरुवात. 
2) गुंतवणुकीतील नियमितपणा म्हणजे नियमितपणे बचत. 

तरुणवयातच कम्पाउंडिंगची ताकद लक्षात आली, तर लवकर बचत सुरू करून दीर्घकाळात मोठी रक्कम उभी करता येते. म्हणूनच जितक्‍या लवकर सुरुवात कराल तितक्‍या लवकर हे सूत्र तुमच्या पैशांसाठी काम करते. सुरुवातीच्या काळात कम्पाउंडिंगची ताकद लक्षात येत नाही. मात्र, कम्पाउंडिंगच्या सूत्राचा वापर करून 15 ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते, तेव्हा त्यातून निर्माण होणारी संपत्ती आपल्या दृष्टिपथात येते. गुंतवणुकीत नियमितपणा राखणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. कारण गुंतवणुकीत नियमितपणा ठेवल्यास आपल्या भांडवलाची वृद्धी होत जाते आणि परिणामी त्यावर मिळणाऱ्या परताव्यातदेखील वाढ होते. 

करण वयाच्या 40व्या वर्षी दरमहा 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीस सुरुवात करतो. करणला गुंतवणुकीवर 8 टक्के वार्षिक परतावा मिळतो. वयाच्या 65व्या वर्षी करणची एकूण गुंतवणूक 9,57,367 रुपये असेल (यासाठी करणने 25 वर्षांच्या कालावधीत 3 लाख रुपये गुंतवले आहेत.) 

रिटा वयाच्या 25व्या वर्षी दरमहा 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीस सुरुवात करते. रिटालाही वार्षिक 8 टक्के परतावा मिळतो. रिटा फक्त 15 वर्षे म्हणजेच वयाच्या 40व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करते. वयाच्या 65 व्या वर्षी रिटाच्या खात्यात 25,57,000 रुपये जमा झालेले असतील (यात रिटाची गुंतवणूक 1,80,000 रुपयांची असेल). 

करणने 25 वर्षे गुंतवणूक केली, तर रिटाने फक्त 15 वर्षे गुंतवणूक केली. मात्र, निवृत्तीच्या वेळी रिटाला मिळणारी रक्कम करणच्या रकमेपेक्षा जवळपास तिप्पट असेल, हीच आहे "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'ची जादू... 

"फायनान्शियल अफेअर्स ऑफ द कॉमन मॅन' या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या सौजन्याने

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जादू "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'ची  गुंतवणुकीवर मिळणारा परतावा म्हणजे त्यावर मिळणारे "व्याज'. यावर तुमच्या संपत्तीत होणारी वाढ अवलंबून असते. हे परताव्याचे गणित सर्रास सरळ व्याज पद्धतीने मोजण्याचा सर्वांत सोपा मार्ग अवलंबिला जातो. समजा, वार्षिक 10 टक्के व्याजदराने 100 रुपये ठेव योजनेत गुंतविले, तर सरळ व्याज पद्धतीने लाभाचे सोपे गणित मांडताना एक वर्षानंतर तुमच्या मुद्दलावर परतावा म्हणून 10 रुपये मिळतील. पुढील वर्षीदेखील तुम्हाला 10 रुपये मिळतील. या पद्धतीने तुम्ही जितक्‍या कालावधीसाठी मुदतठेव केली असेल, तितक्‍या कालावधीसाठी तुम्हाला हे व्याज मिळेल. मात्र, त्यात वार्षिक 10 रुपयांचीच भर पडेल, म्हणजेच येथे ज्या रकमेवर व्याज मोजले आहे ती रक्कम, अर्थात मुद्दल तिन्ही वर्षांत एकसारखीच धरली आहे.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  बहुतांश वित्तीय योजनांमध्ये "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'चे म्हणजेच चक्रवाढ व्याजाचे तत्त्व लागू आहे. चक्रवाढ व्याज म्हणजे प्रारंभिक गुंतवणूक मुद्दलावर व्याज मोजले जाण्यासह, त्यापुढे या रकमेत समाविष्ट होणाऱ्या व्याज रकमेचेदेखील व्याज मोजण्याची पद्धत आहे. म्हणजेच व्याजावर व्याज मोजले जाते. सुरुवातीला दिलेल्या उदाहरणाला आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊ. पहिल्या वर्षी तुम्हाला 10 रुपये व्याज मिळाल्यानंतर तुमचे भांडवल 110 रुपये होईल आणि त्यामुळे त्यापुढील वर्षी तुम्हाला 110 रुपयांवर 10 टक्के व्याज देण्यात येईल अर्थात ते 11 रुपये असेल, त्यामुळे तुमचे भांडवल 121 रुपये इतके होईल आणि त्यानंतरच्या वर्षी तुम्हाला मिळणारे व्याज 12.1 रुपये असेल. सरळ व्याज पद्धतीने जर तुम्ही 10 वर्षांसाठी मुदतठेवीत पैसे गुंतवले तर तुम्हाला 100 रुपयांच्या भांडवलावर 100 रुपयेच मिळतील. मात्र चक्रवाढ पद्धतीने व्याज लागू केल्यास तुम्हाला व्याजापोटी 160 रुपये मिळतील. यालाच म्हणतात "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'ची जादू  "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'ची जादू  प्रत्येक वर्षागणिक मुद्दल रक्कम ही वाढत जाते, कारण त्यात त्या- त्या वर्षी मिळालेल्या व्याजाची रक्कम जमा होऊन त्यावर व्याजाचा लाभ मोजण्यात येतो. यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत.  1) दीर्घकालीन गुंतवणूक : जितक्‍या लवकर शक्‍य होईल, तितक्‍या लवकर बचतीला सुरुवात.  2) गुंतवणुकीतील नियमितपणा म्हणजे नियमितपणे बचत.  तरुणवयातच कम्पाउंडिंगची ताकद लक्षात आली, तर लवकर बचत सुरू करून दीर्घकाळात मोठी रक्कम उभी करता येते. म्हणूनच जितक्‍या लवकर सुरुवात कराल तितक्‍या लवकर हे सूत्र तुमच्या पैशांसाठी काम करते. सुरुवातीच्या काळात कम्पाउंडिंगची ताकद लक्षात येत नाही. मात्र, कम्पाउंडिंगच्या सूत्राचा वापर करून 15 ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते, तेव्हा त्यातून निर्माण होणारी संपत्ती आपल्या दृष्टिपथात येते. गुंतवणुकीत नियमितपणा राखणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. कारण गुंतवणुकीत नियमितपणा ठेवल्यास आपल्या भांडवलाची वृद्धी होत जाते आणि परिणामी त्यावर मिळणाऱ्या परताव्यातदेखील वाढ होते.  करण वयाच्या 40व्या वर्षी दरमहा 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीस सुरुवात करतो. करणला गुंतवणुकीवर 8 टक्के वार्षिक परतावा मिळतो. वयाच्या 65व्या वर्षी करणची एकूण गुंतवणूक 9,57,367 रुपये असेल (यासाठी करणने 25 वर्षांच्या कालावधीत 3 लाख रुपये गुंतवले आहेत.)  रिटा वयाच्या 25व्या वर्षी दरमहा 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीस सुरुवात करते. रिटालाही वार्षिक 8 टक्के परतावा मिळतो. रिटा फक्त 15 वर्षे म्हणजेच वयाच्या 40व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करते. वयाच्या 65 व्या वर्षी रिटाच्या खात्यात 25,57,000 रुपये जमा झालेले असतील (यात रिटाची गुंतवणूक 1,80,000 रुपयांची असेल).  करणने 25 वर्षे गुंतवणूक केली, तर रिटाने फक्त 15 वर्षे गुंतवणूक केली. मात्र, निवृत्तीच्या वेळी रिटाला मिळणारी रक्कम करणच्या रकमेपेक्षा जवळपास तिप्पट असेल, हीच आहे "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'ची जादू...  "फायनान्शियल अफेअर्स ऑफ द कॉमन मॅन' या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या सौजन्याने News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38O9Qwd
Read More
एमपी में शक्ति परीक्षण पर सस्पेंस, आधी रात बोले कमलनाथ- पहले छोड़े जाएं बंधक एमएलए https://ift.tt/2TTVm9O