राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर शिंदे गडबडले : (Video) सोलापूर : "महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने "सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राहुल गांधी की प्रियांका गांधी यांच्यापैकी कोण आवडते असा प्रश्‍न मुलाखातकारांनी केला. तेव्हा हा प्रश्‍न अवघड असल्याचे सांगत त्यांनी उत्तर देणे टाळले. या प्रश्‍नाने ते गडबडून गेले. त्याचवेळी माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी शिंदे यांच्याकडून हसणे घेण्याची इच्छा व्यक्त केली.  "सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' कार्यक्रमात माजी मंत्री शिंदे व देशमुख यांची मुलाखत ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांनी घेतली. शिंदे व देशमुख दोघेही राजकारणात आले नसते तर त्यांना काय व्हायला आवडले असते, या प्रश्‍नाने मुलाखतीची सुरवात झाली. शिंदे यांनी वॉचमन, चपराशी किंवा पिढीजात धंदा केला असता असे उत्तर दिले. त्याचवेळी शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच आपल्याला राजकारणात आणल्याचे आवर्जून सांगितले. त्याचवेळी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुकीला उभा राहण्याचा निर्णय घेतला. पण, तिकीट कापले गेले. त्यावेळी नोकरीही गेली अन्‌ तिकीटही गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी वेगवेगळ्या लोकांना घेऊन सरकार चालविले होते. त्याचप्रमाणे आताचे तीन पक्षाचे सरकारही चालेल, असा विश्‍वास शिंदे यांनी व्यक्त केला. राजकारणात नेत्यांची मैत्री असते पण कार्यकर्ते एकमेकांचे वैरी असतात, त्याबाबत काय सांगाल असे विचारले असता शिंदे म्हणाले, सगळ्याच पक्षात मित्र आहेत. माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी हे कर्तृत्ववान होते. याविषयी देशमुख म्हणाले, गाव पातळीवरील कार्यकर्त्यांत ईर्षा असते. पण, त्यांनी ती ईर्षा न बाळगता आमदार, खासदार ज्याप्रमाणे वागतात त्याचप्रमाणे गावत वागावे. त्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी शिंदे यांनी त्यांच्याबाबत घडलेली गोष्ट सांगितली. पण, सावरकर हे समाज क्रांतिकारक होते असे त्यांनी स्पष्ट केले. श्री. देशमुख यांनी शिंदे सोलापुरात येत नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केल्याचा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांनाही थेट त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचारणा झाल्याचे सांगितले. शिंदे-देशमुख हे एवढे पॉवरफुल्ल आहेत पण तुम्हाला चिमणी कशी भारी पडली? असा प्रश्‍न विचारताच होटगी रोड विमानतळ व बोरामणी विमानतळबाबत चर्चा झाली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या रागाबाबतही प्रश्‍न विचारला. शहरातील दोन देशमुख एकत्र का येत नाहीत, असा प्रश्‍न देशमुख यांना विचारला असता आम्ही एकच आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी रेणुका महागावकर, प्रशांत बडवे, अविनाश महागावकर उपस्थित होते.  अगोदर भाजप मग लोकमंगल  आमदार देशमुख यांना भाजप की लोकमंगल असा प्रश्‍न विचारला असता अगोदर भाजप मग लोकमंगल असे उत्तर त्यांनी दिले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी योग्य व्यक्तिमत्त्व आहेत असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्रात नितीन गडकरी तर राज्यात देवेंद्र फडणवीसच योग्य असल्याचे सांगण्यास आमदार देशमुख विसरले नाही.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 15, 2020

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर शिंदे गडबडले : (Video) सोलापूर : "महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने "सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राहुल गांधी की प्रियांका गांधी यांच्यापैकी कोण आवडते असा प्रश्‍न मुलाखातकारांनी केला. तेव्हा हा प्रश्‍न अवघड असल्याचे सांगत त्यांनी उत्तर देणे टाळले. या प्रश्‍नाने ते गडबडून गेले. त्याचवेळी माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी शिंदे यांच्याकडून हसणे घेण्याची इच्छा व्यक्त केली.  "सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' कार्यक्रमात माजी मंत्री शिंदे व देशमुख यांची मुलाखत ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांनी घेतली. शिंदे व देशमुख दोघेही राजकारणात आले नसते तर त्यांना काय व्हायला आवडले असते, या प्रश्‍नाने मुलाखतीची सुरवात झाली. शिंदे यांनी वॉचमन, चपराशी किंवा पिढीजात धंदा केला असता असे उत्तर दिले. त्याचवेळी शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच आपल्याला राजकारणात आणल्याचे आवर्जून सांगितले. त्याचवेळी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुकीला उभा राहण्याचा निर्णय घेतला. पण, तिकीट कापले गेले. त्यावेळी नोकरीही गेली अन्‌ तिकीटही गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी वेगवेगळ्या लोकांना घेऊन सरकार चालविले होते. त्याचप्रमाणे आताचे तीन पक्षाचे सरकारही चालेल, असा विश्‍वास शिंदे यांनी व्यक्त केला. राजकारणात नेत्यांची मैत्री असते पण कार्यकर्ते एकमेकांचे वैरी असतात, त्याबाबत काय सांगाल असे विचारले असता शिंदे म्हणाले, सगळ्याच पक्षात मित्र आहेत. माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी हे कर्तृत्ववान होते. याविषयी देशमुख म्हणाले, गाव पातळीवरील कार्यकर्त्यांत ईर्षा असते. पण, त्यांनी ती ईर्षा न बाळगता आमदार, खासदार ज्याप्रमाणे वागतात त्याचप्रमाणे गावत वागावे. त्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी शिंदे यांनी त्यांच्याबाबत घडलेली गोष्ट सांगितली. पण, सावरकर हे समाज क्रांतिकारक होते असे त्यांनी स्पष्ट केले. श्री. देशमुख यांनी शिंदे सोलापुरात येत नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केल्याचा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांनाही थेट त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचारणा झाल्याचे सांगितले. शिंदे-देशमुख हे एवढे पॉवरफुल्ल आहेत पण तुम्हाला चिमणी कशी भारी पडली? असा प्रश्‍न विचारताच होटगी रोड विमानतळ व बोरामणी विमानतळबाबत चर्चा झाली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या रागाबाबतही प्रश्‍न विचारला. शहरातील दोन देशमुख एकत्र का येत नाहीत, असा प्रश्‍न देशमुख यांना विचारला असता आम्ही एकच आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी रेणुका महागावकर, प्रशांत बडवे, अविनाश महागावकर उपस्थित होते.  अगोदर भाजप मग लोकमंगल  आमदार देशमुख यांना भाजप की लोकमंगल असा प्रश्‍न विचारला असता अगोदर भाजप मग लोकमंगल असे उत्तर त्यांनी दिले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी योग्य व्यक्तिमत्त्व आहेत असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्रात नितीन गडकरी तर राज्यात देवेंद्र फडणवीसच योग्य असल्याचे सांगण्यास आमदार देशमुख विसरले नाही.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Wf5H1V

No comments:

Post a Comment