Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 5, 2020

ओव्हरटाइम करूनही अलाऊन्स नाही, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचीच व्यथा

औरंगाबाद : महापालिकेच्या मालमत्ता कर, पाणीपट्टी, तसेच अकृषक करांसह विविध प्रकारची वसुलीची कामे करणारे वॉर्ड कार्यालयांतील कर्मचारी चार वर्षांपासून दुसरा, चौथा शनिवार, रविवार आणि अन्य सार्वजनिक सुटीच्या दिवशीही करवसुलीसाठी कार्यालयात येऊन वसुलीचे काम इमाने-इतबारे करीत आहेत.

आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेच्या तिजोरीत कररूपी महसूल जमा करण्यात मोलाचा वाटाही या कर्मचाऱ्यांचा आहे; परंतु सुटीच्या दिवशी येऊन जादा काम करूनदेखील वॉर्ड कार्यालयातील कर्मचारी जादा कामाच्या आर्थिक मोबदल्यापासून (ओव्हरटाइम) वंचित असल्याने कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.

चार वर्षांपूर्वी अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही जादा कामाचा मोबदला दिला जात होता; परंतु मागील चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम बंद झाल्याने कर्मचारी सुटीच्या दिवशी करवसुलीच्या कामावर बहिष्कार टाकण्याच्या मनःस्थितीत असल्याचे सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

या कर्मचाऱ्यांकडून चार वर्षांपासून दर मार्चअखेर रविवारसह सर्व सुटीत वसुलीचे काम करून घेण्यात येते; परंतु त्याचा मोबदला काहीच मिळत नाही. चार वर्षांपूर्वी ओव्हरटाइम मिळत होता; पण आता तोही मिळत नाही. काही विभागांतील कर्मचाऱ्यांना मोबदला मिळतो; मात्र वॉर्ड कर्मचाऱ्यांना मिळत नाही असा दावा सूत्रांनी केला आहे. अग्निशमन विभाग तसेच स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना जादा कामाचा मोबदला दिला जातो; मग वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच असा अन्याय का, असा प्रश्नही वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून आता उपस्थित केला जात आहे.

पाच दिवसांच्या आठवड्यावरही पाणी 

वॉर्ड कार्यालयातील वसुली कर्मचाऱ्यांच्या दुसरा व चौथा शनिवार तसेच सार्वजनिक सुट्या बंद करण्यात आल्या आहेत. ता. २० फेब्रुवारीपासूनपासून रविवारची सुटीही बंद करण्यात आली; मात्र इतर विभागांतील व वसुली कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना ता. २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला. मालमत्ता कर व पाणीपट्टी महानगरपालिकेच्या आर्थिक बाबीशी निगडित असल्याने सुटीत काम करण्यास हरकत नाही; पण त्याचा योग्य मोबदला देणे अपेक्षित आहे. जो की २०१५-१६ पासून देण्यात येत नाही.

भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि... 

वॉर्ड कार्यालयातील अन्य कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू झाला आहे; परंतु मार्च एंडिंगच्या वसुलीमुळे करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र पाच दिवसांच्या आठवड्यापासून वंचितच ठेवण्यात आले आहे. जादा कामाचा मोबदला तसेच अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही हक्काच्या सुट्या मिळाव्यात यासाठी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय तसेच महापौर नंदकुमार घोडेले लक्ष घालतील काय, याकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ओव्हरटाइम करूनही अलाऊन्स नाही, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचीच व्यथा औरंगाबाद : महापालिकेच्या मालमत्ता कर, पाणीपट्टी, तसेच अकृषक करांसह विविध प्रकारची वसुलीची कामे करणारे वॉर्ड कार्यालयांतील कर्मचारी चार वर्षांपासून दुसरा, चौथा शनिवार, रविवार आणि अन्य सार्वजनिक सुटीच्या दिवशीही करवसुलीसाठी कार्यालयात येऊन वसुलीचे काम इमाने-इतबारे करीत आहेत. आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेच्या तिजोरीत कररूपी महसूल जमा करण्यात मोलाचा वाटाही या कर्मचाऱ्यांचा आहे; परंतु सुटीच्या दिवशी येऊन जादा काम करूनदेखील वॉर्ड कार्यालयातील कर्मचारी जादा कामाच्या आर्थिक मोबदल्यापासून (ओव्हरटाइम) वंचित असल्याने कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर आहे. चार वर्षांपूर्वी अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही जादा कामाचा मोबदला दिला जात होता; परंतु मागील चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम बंद झाल्याने कर्मचारी सुटीच्या दिवशी करवसुलीच्या कामावर बहिष्कार टाकण्याच्या मनःस्थितीत असल्याचे सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले.  संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर... या कर्मचाऱ्यांकडून चार वर्षांपासून दर मार्चअखेर रविवारसह सर्व सुटीत वसुलीचे काम करून घेण्यात येते; परंतु त्याचा मोबदला काहीच मिळत नाही. चार वर्षांपूर्वी ओव्हरटाइम मिळत होता; पण आता तोही मिळत नाही. काही विभागांतील कर्मचाऱ्यांना मोबदला मिळतो; मात्र वॉर्ड कर्मचाऱ्यांना मिळत नाही असा दावा सूत्रांनी केला आहे. अग्निशमन विभाग तसेच स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना जादा कामाचा मोबदला दिला जातो; मग वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच असा अन्याय का, असा प्रश्नही वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून आता उपस्थित केला जात आहे. पाच दिवसांच्या आठवड्यावरही पाणी  वॉर्ड कार्यालयातील वसुली कर्मचाऱ्यांच्या दुसरा व चौथा शनिवार तसेच सार्वजनिक सुट्या बंद करण्यात आल्या आहेत. ता. २० फेब्रुवारीपासूनपासून रविवारची सुटीही बंद करण्यात आली; मात्र इतर विभागांतील व वसुली कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना ता. २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला. मालमत्ता कर व पाणीपट्टी महानगरपालिकेच्या आर्थिक बाबीशी निगडित असल्याने सुटीत काम करण्यास हरकत नाही; पण त्याचा योग्य मोबदला देणे अपेक्षित आहे. जो की २०१५-१६ पासून देण्यात येत नाही. भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि...  वॉर्ड कार्यालयातील अन्य कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू झाला आहे; परंतु मार्च एंडिंगच्या वसुलीमुळे करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र पाच दिवसांच्या आठवड्यापासून वंचितच ठेवण्यात आले आहे. जादा कामाचा मोबदला तसेच अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही हक्काच्या सुट्या मिळाव्यात यासाठी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय तसेच महापौर नंदकुमार घोडेले लक्ष घालतील काय, याकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VQJgj9
Read More
दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड 

नगर : सावेडी उपनगरातील भिस्तबाग महालाजवळ दरोड्याच्या तयारीतील इराणी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने काल (बुधवारी) सायंकाळी पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह दरोड्याचे साहित्य जप्त केले.

याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीविरुद्ध राज्यात विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

राजेश बबन देशमुख (रा. राहुरी), कंवर रहीम मिर्झा (रा. श्रीरामपूर), जाफर मुक्तार शेख (श्रीरामपूर), जाकीर ऊर्फ जग्ग्या युनूस खान (श्रीरामपूर) व अनिल रावसाहेब चव्हाण (राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत. 

सावेडी, बोल्हेगाव उपनगरात काही दिवसांपासून घरफोडी व रस्तालुटीच्या घटना वाढल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींचा शोध घेत होते. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना कॉटेज कॉर्नरकडून मोटारीतून काही लोक दरोड्याच्या उद्देशाने हत्यारासह भिस्तबाग महालाकडे येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने भिस्तबाग महालाजवळ सापळा रचला. बुधवारी रात्री साडेआठ वाजता पोलिसांनी हात दाखवून मोटार थांबविली.

पोलिसांनी त्यांच्याकडून मोटारीसह सत्तूर, चाकू, लाकडी दांडके, असा एकूण 2 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कंवर रहीम मिर्झा, जाकीर ऊर्फ जग्या युसूफ खान, जफर मुख्तार शेख यांच्याविरुद्ध पुणे, नाशिक, धुळे, दिल्ली, गुजरात राज्यात विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

पोलिस कॉन्स्टेबल रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शिरीष देशमुख, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, पोलिस नाईक सुरेश माळी, रणजित जाधव, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड  नगर : सावेडी उपनगरातील भिस्तबाग महालाजवळ दरोड्याच्या तयारीतील इराणी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने काल (बुधवारी) सायंकाळी पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह दरोड्याचे साहित्य जप्त केले. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीविरुद्ध राज्यात विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत.  राजेश बबन देशमुख (रा. राहुरी), कंवर रहीम मिर्झा (रा. श्रीरामपूर), जाफर मुक्तार शेख (श्रीरामपूर), जाकीर ऊर्फ जग्ग्या युनूस खान (श्रीरामपूर) व अनिल रावसाहेब चव्हाण (राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत.  सावेडी, बोल्हेगाव उपनगरात काही दिवसांपासून घरफोडी व रस्तालुटीच्या घटना वाढल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींचा शोध घेत होते. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना कॉटेज कॉर्नरकडून मोटारीतून काही लोक दरोड्याच्या उद्देशाने हत्यारासह भिस्तबाग महालाकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने भिस्तबाग महालाजवळ सापळा रचला. बुधवारी रात्री साडेआठ वाजता पोलिसांनी हात दाखवून मोटार थांबविली. पोलिसांनी त्यांच्याकडून मोटारीसह सत्तूर, चाकू, लाकडी दांडके, असा एकूण 2 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कंवर रहीम मिर्झा, जाकीर ऊर्फ जग्या युसूफ खान, जफर मुख्तार शेख यांच्याविरुद्ध पुणे, नाशिक, धुळे, दिल्ली, गुजरात राज्यात विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत.  पोलिस कॉन्स्टेबल रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शिरीष देशमुख, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, पोलिस नाईक सुरेश माळी, रणजित जाधव, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32SG6ND
Read More
"कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही"

नवी मुंबई : कोकणात अनेकदा जत्रा लागत असतात. एका जत्रेत दूकान नाही मिळाले तर दुसऱ्या जत्रेत जावून दूकान लावायचे असे काम काही नगरसेवक करीत आहेत. त्यामुळे कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही, आम्ही आहोत तिथेच आहोत. अशा शब्दात आमदार गणेश नाईक यांनी पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचा समाचार घेतला. आपल्याला असल्या नगरसेवकांपेक्षा मतदरांचा दृष्टांत हवा आहे. जे जातात त्यांची नावे घेऊन त्यांना फार काही मोठे करण्याची गरज नाही असे नाईकांनी नाव न घेता नगरसेवकांवर टीकास्त्र सोडले. 

मोठी बातमी - पनवेलमध्ये अजूनही खुलेआम सुरु आहे 'मृत्यू'ची विक्री....

महापालिका निवडणूकांमध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन पक्षांनी नाईकांविरोधात मोट जुळवली आहे. महापालिकेतील नाईकांची निर्विवाद सत्ता उलथवण्यासाठी मविआने कंबर कसली आहे. त्याकरीता नाईकांचे मनसबदार फोडण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. तुर्भेतील मातब्बर नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह त्यांचे तीन नगरसेवक फोडण्याची किमया शिवसेनेने साधली आहे. कुलकर्णींपाठोपाठ भाजपचे आणखी काही नगरसेवक शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सद्या शहरात रंगली आहे. या पार्श्‍वभूमिवर नाईकांनी मौन बाळगले होते. परंतू शिरवणे येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी-कूंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून नाईकांनी विरोधकांवर टीका केली. 

मोठी बातमी - जेंव्हा देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीसांच्या पगाराबद्दल बोलतात...

प्रसिद्धी माध्यमांना टोला 

नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या शिवसेना प्रवेशाच्या प्रसिद्धी माध्यमांनी लावलेल्या बातम्यांवर आमदार गणेश नाईक यांनी टीका केली. कोणी कुठून आला आणि कुणीही त्यांना हार घातले, याची बातमी प्रसिद्धी माध्यमांनी चार दिवस चालवली, त्यानंतर त्याच नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे राजीनामे दिले, परत त्यांची बातमी लागली, नंतर कुणाकडे जावून हारतुरे घातले, पुन्हा त्यांची तिच बातमी, म्हणजे एकाच इव्हेंन्टची प्रसिद्धी माध्यमांनी चार दिवस चार वेळा बातम्या लावल्या. असे बोलून नाईकांनी त्यांच्या भाषणात प्रसिद्धी माध्यमांची टर उडवली.  

bjp leader ganesh naik targets corporators those entered mahavikas aaghadi 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही" नवी मुंबई : कोकणात अनेकदा जत्रा लागत असतात. एका जत्रेत दूकान नाही मिळाले तर दुसऱ्या जत्रेत जावून दूकान लावायचे असे काम काही नगरसेवक करीत आहेत. त्यामुळे कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही, आम्ही आहोत तिथेच आहोत. अशा शब्दात आमदार गणेश नाईक यांनी पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचा समाचार घेतला. आपल्याला असल्या नगरसेवकांपेक्षा मतदरांचा दृष्टांत हवा आहे. जे जातात त्यांची नावे घेऊन त्यांना फार काही मोठे करण्याची गरज नाही असे नाईकांनी नाव न घेता नगरसेवकांवर टीकास्त्र सोडले.  मोठी बातमी - पनवेलमध्ये अजूनही खुलेआम सुरु आहे 'मृत्यू'ची विक्री.... महापालिका निवडणूकांमध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन पक्षांनी नाईकांविरोधात मोट जुळवली आहे. महापालिकेतील नाईकांची निर्विवाद सत्ता उलथवण्यासाठी मविआने कंबर कसली आहे. त्याकरीता नाईकांचे मनसबदार फोडण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. तुर्भेतील मातब्बर नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह त्यांचे तीन नगरसेवक फोडण्याची किमया शिवसेनेने साधली आहे. कुलकर्णींपाठोपाठ भाजपचे आणखी काही नगरसेवक शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सद्या शहरात रंगली आहे. या पार्श्‍वभूमिवर नाईकांनी मौन बाळगले होते. परंतू शिरवणे येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी-कूंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून नाईकांनी विरोधकांवर टीका केली.  मोठी बातमी - जेंव्हा देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीसांच्या पगाराबद्दल बोलतात... प्रसिद्धी माध्यमांना टोला  नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या शिवसेना प्रवेशाच्या प्रसिद्धी माध्यमांनी लावलेल्या बातम्यांवर आमदार गणेश नाईक यांनी टीका केली. कोणी कुठून आला आणि कुणीही त्यांना हार घातले, याची बातमी प्रसिद्धी माध्यमांनी चार दिवस चालवली, त्यानंतर त्याच नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे राजीनामे दिले, परत त्यांची बातमी लागली, नंतर कुणाकडे जावून हारतुरे घातले, पुन्हा त्यांची तिच बातमी, म्हणजे एकाच इव्हेंन्टची प्रसिद्धी माध्यमांनी चार दिवस चार वेळा बातम्या लावल्या. असे बोलून नाईकांनी त्यांच्या भाषणात प्रसिद्धी माध्यमांची टर उडवली.   bjp leader ganesh naik targets corporators those entered mahavikas aaghadi  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2xf4Q6U
Read More
कोकण विकासासाठी 'सिंधु-रत्न समृद्धी योजना', चीपी विमानतळ १ मेपासून सुरु - मुख्यमंत्री

कोकण विकासासाठी 'सिंधु-रत्न समृद्धी योजना', चीपी विमानतळ १ मेपासून सुरु - मुख्यमंत्री

March 05, 2020 0 Comments
कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठ्या घोषणा केल्या आहेत.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2wA74gE ht...
Read More
YES बँकेवर RBI चे निर्बंध, खात्यातून 50 हजारच काढता येणार #5मोठ्याबातम्या
काळी-पिवळी गाडीवर लिहिले "बुलाती है मगर जानेका नहीं"....दिला हा संदेश

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांनी सादर केलेली शायरी सोशल मीडियावर खूप हिट ठरली आहे. या शायरीवरून सर्वत्र विविध मिम्स तयार केले जात आहेत. टिकटॉक, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर तर अगदी धुमाकूळ सुरू आहे. समाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एका काळी-पिवळी चालकाने या शायरीचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आपल्या गाडीच्या मागील भागावर "बुलाती है मगर जानेका नहीं" असे लिहिले आहे. या माध्यमातून त्याने मद्यपान व धुम्रपान करू नये, असा संदेश दिला आहे.

दारूबंदी असलेल्या विदर्भातील तीन जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्हा एक आहे. या जिल्ह्यात लागू असलेली दारूबंदी हटविण्यासाठी अनेकांनी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, जिल्ह्यातील गडचांदूर शहरात एका गाडी चालकाने आपल्या गाडीच्या मागच्या बाजूस "बुलाती है मगर जानेका नहीं" असे स्लोगन लिहिले आहे. याद्वारे त्याने, मद्यपान, धुम्रपान करू, नये असे आवाहन केले आहे.

- पती-पत्नी दोघेही मूकबधीर, कोणीही रोजगार देईना... वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी
 

या प्रयोगातून काळी-पिवळी चालकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मद्यपान, धुम्रपान करण्याऱ्याची संख्या व त्यांच्या करीता उपलब्ध असलेल्या सोयीसुविधेची काही कमतरता नाही.

मद्यपान, धुम्रपान न करण्याचे आवाहन
"बुलाती है मगर जानेका नहीं" हा विषय सोशल मीडियावर गंमतीचा ठरलेला असताना एखाद्या गाडीचालकाने गांभीर्यपूर्व सामाजिक संदेश दिल्याने त्याते सर्वत्र कौतुक होत आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

काळी-पिवळी गाडीवर लिहिले "बुलाती है मगर जानेका नहीं"....दिला हा संदेश गडचांदूर (जि. चंद्रपूर) : प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांनी सादर केलेली शायरी सोशल मीडियावर खूप हिट ठरली आहे. या शायरीवरून सर्वत्र विविध मिम्स तयार केले जात आहेत. टिकटॉक, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर तर अगदी धुमाकूळ सुरू आहे. समाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एका काळी-पिवळी चालकाने या शायरीचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आपल्या गाडीच्या मागील भागावर "बुलाती है मगर जानेका नहीं" असे लिहिले आहे. या माध्यमातून त्याने मद्यपान व धुम्रपान करू नये, असा संदेश दिला आहे. दारूबंदी असलेल्या विदर्भातील तीन जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्हा एक आहे. या जिल्ह्यात लागू असलेली दारूबंदी हटविण्यासाठी अनेकांनी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, जिल्ह्यातील गडचांदूर शहरात एका गाडी चालकाने आपल्या गाडीच्या मागच्या बाजूस "बुलाती है मगर जानेका नहीं" असे स्लोगन लिहिले आहे. याद्वारे त्याने, मद्यपान, धुम्रपान करू, नये असे आवाहन केले आहे. - पती-पत्नी दोघेही मूकबधीर, कोणीही रोजगार देईना... वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी   या प्रयोगातून काळी-पिवळी चालकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मद्यपान, धुम्रपान करण्याऱ्याची संख्या व त्यांच्या करीता उपलब्ध असलेल्या सोयीसुविधेची काही कमतरता नाही. मद्यपान, धुम्रपान न करण्याचे आवाहन "बुलाती है मगर जानेका नहीं" हा विषय सोशल मीडियावर गंमतीचा ठरलेला असताना एखाद्या गाडीचालकाने गांभीर्यपूर्व सामाजिक संदेश दिल्याने त्याते सर्वत्र कौतुक होत आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cy4W9P
Read More
नवी मुंबईत अवघ्या तीस रूपयांना विकले जाते मतदान ?

नवी मुंबई : महापालिका निवडणुका आता तोंडावर आल्यामुळे उमेदवारांकडून मतदार राजाला भुरळ घालण्यास सुरुवात झाली आहे. नेरूळमध्ये एका शिवसेना नगरसेवकाने त्याच्या पत्नीच्या नावाने दूध तापवण्याचा टोप आणि गॅस शेगडीचे लायटर वाटून मतदारांना प्रलोभन दाखण्यास सुरुवात केली आहे. हळदी-कुंकवाचे वाण या गोंडस नावाखाली मतदारांच्या बहुमूल्य मतदानाचे मोल अवघे 30 रुपये लावले आहे. नवी मुंबईकर या प्रलोभनाला भुलून पुढील पाच वर्षे विकासाची अपेक्षा कुणाकडे ठेवणार, असा प्रश्‍न सुजान नागरिकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. 

एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच आजी-माजी नगरसेवकांसोबत इच्छुक उमेदवारही कामाला लागले आहेत. निवडणुकीआधी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण व रचनेमुळे बहुतांश जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे आता नगरसेवकांच्या जागेवर त्यांच्या पत्नीला संधी देण्यासाठी नगरसेवकांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत घराबाहेर न पडलेल्या या नगरसेवकांच्या पत्नीला कथित समाजसेविका ही बिरुदावली लावण्यासाठी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांनी जोर पकडला आहे. 

मोठी बातमी - १२ वर्षांपूर्वी केलेली कोरोबाबाबतची 'ही' भविष्यवाणी खरी ठरणार ?

शहरातील प्रत्येक प्रभागातील संध्याकाळ हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांनी बहरून जात आहे. आचारसंहिता घोषित झाल्यावर उमेदवारांच्या खर्चावर व वाटप होणाऱ्या वस्तूंवर निवडणूक आयोगाची करडी नजर असते. त्यामुळे आचारसंहिता घोषित होण्याआधीच काही नगरसेवकांकडून मतदारांवर भेटवस्तूंचा वर्षाव केला जात आहे. नेरूळ, जुईनगरमधील शिवसेनेच्या एका नगरसेवकाने याच हळकी-कुंकवाच्या कार्यक्रमाचा वापर आपल्या प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला आहे. हळदी-कुंकवात दिल्या जात असलेल्या वाणाच्या निमित्ताने घरोघरी जाऊन पत्नीच्या नावाने गॅस शेगडीचे लायटर आणि दूध तापवण्याचे भांडे वाटप केले जात आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून नेरूळ व जुईनगरमधील एलआयजी आणि तीन मजली इमारतींच्या सोसायट्यांमध्ये लायटर आणि दूध तापवायच्या भांड्यांनी भरलेले वाहन फिरत असते. या वाहनासोबत त्या नगरसेवकाची पत्नीही फिरत असून घरोघरी जाऊन ही भांडी मतदारांना वाटली जात आहेत. घरोघरी जाऊन महिलांना दारातच हळदी-कुंकवाची बोटे कपाळावर लावून भेटवस्तू वाटप केले जात आहेत. नगरसेवकाकडून अवघ्या तीस रुपयांच्या वस्तू देऊन मतदारांचे बहुमूल्य मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे नेरूळ-जुईनगर परिसरात या नगरसेवकांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. 

मोठी बातमी - मेघनाच्या मृत्यूचं गूढ उकललं, जिम ट्रेनरनेच दिलेलं...

पैठण्यांचा पाऊस 

मविआतर्फे शहरात ठिकठिकाणी भाऊजींची भेट पैठण्यावाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. अनेक ठिकाणी खेळ मांडियेला कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांमध्ये महिलांना बोलावून त्यांच्या आवडीचे कार्यक्रम राबवून पैठणी, नथ, गळ्यातील मोत्यांच्या माळा अशा भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे. खेळ मांडियेला हा कार्यक्रम पाहून इतर नगरसेवकांकडूनही हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून मतदारांवर भेटवस्तूंचा पाऊस पाडला जात आहे. 

लावण्यांच्या फडाला कीर्तनातून उत्तर 

मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून कोपरखैरणे भागात गाजलेल्या लावण्यांच्या फडाचे आयोजन करण्यात येणार आहे. कोपरखैरणे भागात राहत असणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिकांना खेचण्यासाठी खास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे; तर शिवसेनेकडून ऐरोलीमध्ये ह.भ.प. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करून शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

navi mumbai municipal corporation elections are approaching see what is being done by political parties 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नवी मुंबईत अवघ्या तीस रूपयांना विकले जाते मतदान ? नवी मुंबई : महापालिका निवडणुका आता तोंडावर आल्यामुळे उमेदवारांकडून मतदार राजाला भुरळ घालण्यास सुरुवात झाली आहे. नेरूळमध्ये एका शिवसेना नगरसेवकाने त्याच्या पत्नीच्या नावाने दूध तापवण्याचा टोप आणि गॅस शेगडीचे लायटर वाटून मतदारांना प्रलोभन दाखण्यास सुरुवात केली आहे. हळदी-कुंकवाचे वाण या गोंडस नावाखाली मतदारांच्या बहुमूल्य मतदानाचे मोल अवघे 30 रुपये लावले आहे. नवी मुंबईकर या प्रलोभनाला भुलून पुढील पाच वर्षे विकासाची अपेक्षा कुणाकडे ठेवणार, असा प्रश्‍न सुजान नागरिकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे.  एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच आजी-माजी नगरसेवकांसोबत इच्छुक उमेदवारही कामाला लागले आहेत. निवडणुकीआधी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण व रचनेमुळे बहुतांश जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे आता नगरसेवकांच्या जागेवर त्यांच्या पत्नीला संधी देण्यासाठी नगरसेवकांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत घराबाहेर न पडलेल्या या नगरसेवकांच्या पत्नीला कथित समाजसेविका ही बिरुदावली लावण्यासाठी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांनी जोर पकडला आहे.  मोठी बातमी - १२ वर्षांपूर्वी केलेली कोरोबाबाबतची 'ही' भविष्यवाणी खरी ठरणार ? शहरातील प्रत्येक प्रभागातील संध्याकाळ हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांनी बहरून जात आहे. आचारसंहिता घोषित झाल्यावर उमेदवारांच्या खर्चावर व वाटप होणाऱ्या वस्तूंवर निवडणूक आयोगाची करडी नजर असते. त्यामुळे आचारसंहिता घोषित होण्याआधीच काही नगरसेवकांकडून मतदारांवर भेटवस्तूंचा वर्षाव केला जात आहे. नेरूळ, जुईनगरमधील शिवसेनेच्या एका नगरसेवकाने याच हळकी-कुंकवाच्या कार्यक्रमाचा वापर आपल्या प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला आहे. हळदी-कुंकवात दिल्या जात असलेल्या वाणाच्या निमित्ताने घरोघरी जाऊन पत्नीच्या नावाने गॅस शेगडीचे लायटर आणि दूध तापवण्याचे भांडे वाटप केले जात आहे.  गेल्या दोन दिवसांपासून नेरूळ व जुईनगरमधील एलआयजी आणि तीन मजली इमारतींच्या सोसायट्यांमध्ये लायटर आणि दूध तापवायच्या भांड्यांनी भरलेले वाहन फिरत असते. या वाहनासोबत त्या नगरसेवकाची पत्नीही फिरत असून घरोघरी जाऊन ही भांडी मतदारांना वाटली जात आहेत. घरोघरी जाऊन महिलांना दारातच हळदी-कुंकवाची बोटे कपाळावर लावून भेटवस्तू वाटप केले जात आहेत. नगरसेवकाकडून अवघ्या तीस रुपयांच्या वस्तू देऊन मतदारांचे बहुमूल्य मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे नेरूळ-जुईनगर परिसरात या नगरसेवकांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.  मोठी बातमी - मेघनाच्या मृत्यूचं गूढ उकललं, जिम ट्रेनरनेच दिलेलं... पैठण्यांचा पाऊस  मविआतर्फे शहरात ठिकठिकाणी भाऊजींची भेट पैठण्यावाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. अनेक ठिकाणी खेळ मांडियेला कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांमध्ये महिलांना बोलावून त्यांच्या आवडीचे कार्यक्रम राबवून पैठणी, नथ, गळ्यातील मोत्यांच्या माळा अशा भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे. खेळ मांडियेला हा कार्यक्रम पाहून इतर नगरसेवकांकडूनही हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून मतदारांवर भेटवस्तूंचा पाऊस पाडला जात आहे.  लावण्यांच्या फडाला कीर्तनातून उत्तर  मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून कोपरखैरणे भागात गाजलेल्या लावण्यांच्या फडाचे आयोजन करण्यात येणार आहे. कोपरखैरणे भागात राहत असणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिकांना खेचण्यासाठी खास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे; तर शिवसेनेकडून ऐरोलीमध्ये ह.भ.प. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करून शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. navi mumbai municipal corporation elections are approaching see what is being done by political parties  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cBMEoj
Read More
मुलीने केलं लव्ह मॅरेज, आईनं उचललं हे पाऊल

राहुरी : मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग अनावर झाल्याने वडील व भावाने राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात तिला मारहाण केली.

पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ मुलीच्या आई-वडिलांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला. त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज दुपारी हा गदारोळ झाला. 

वांबोरी परिसरातील एका तरुणीचे तिच्या गावातच राहणाऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजातील; परंतु मुलीच्या घरातून त्यांना विरोध होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दोघेही पळून गेले. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी राहुरी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची फिर्याद दिली.

दरम्यान, तरुण-तरुणीने आळंदी येथे कायदेशीररीत्या विवाह केला आणि आज सकाळी विवाहाचे प्रमाणपत्र घेऊन ते राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. त्याची माहिती पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना दिली. मुलीचे वडील व भाऊ तातडीने पोलिस ठाण्यात आले.

मुलीला पाहताच त्यांचा संताप अनावर झाला. पोलिस ठाण्याच्या आवारातच वडिलांनी व भावाने तिला मारहाण केली. काही जणांनी मध्यस्थी करून मुलीची सुटका केली.

पोलिसांनीही तिच्या घरच्यांची समजूत काढली. त्या वेळी ते तेथून निघून गेले. परंतु दुपारी दोन वाजता नवविवाहित जोडपे पोलिस ठाण्यात असतानाच मुलीचे आई व वडील विषारी औषधाची बाटली घेऊन आले. पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोघांनी विषारी औषध प्राशन केले. 

सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन दोघांना रुग्णालयात पाठविले. या वेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुलीने केलं लव्ह मॅरेज, आईनं उचललं हे पाऊल राहुरी : मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग अनावर झाल्याने वडील व भावाने राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात तिला मारहाण केली. पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ मुलीच्या आई-वडिलांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला. त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज दुपारी हा गदारोळ झाला.  वांबोरी परिसरातील एका तरुणीचे तिच्या गावातच राहणाऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजातील; परंतु मुलीच्या घरातून त्यांना विरोध होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दोघेही पळून गेले. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी राहुरी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची फिर्याद दिली. दरम्यान, तरुण-तरुणीने आळंदी येथे कायदेशीररीत्या विवाह केला आणि आज सकाळी विवाहाचे प्रमाणपत्र घेऊन ते राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. त्याची माहिती पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना दिली. मुलीचे वडील व भाऊ तातडीने पोलिस ठाण्यात आले. मुलीला पाहताच त्यांचा संताप अनावर झाला. पोलिस ठाण्याच्या आवारातच वडिलांनी व भावाने तिला मारहाण केली. काही जणांनी मध्यस्थी करून मुलीची सुटका केली. पोलिसांनीही तिच्या घरच्यांची समजूत काढली. त्या वेळी ते तेथून निघून गेले. परंतु दुपारी दोन वाजता नवविवाहित जोडपे पोलिस ठाण्यात असतानाच मुलीचे आई व वडील विषारी औषधाची बाटली घेऊन आले. पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोघांनी विषारी औषध प्राशन केले.  सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन दोघांना रुग्णालयात पाठविले. या वेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PTZAMy
Read More
परदेशात गेला नसाल तर निर्धास्त राहा !

सर्दी, खोकला म्हणजे कोरोना नसल्याचे आरोग्य खात्याचे स्पष्टीकरण
पुणे - तुम्ही कोणत्याही परदेशातून प्रवास करून आलाय का? किंवा तुम्ही परदेशातून आलेल्या कोणाच्या गेल्या महिना-पंधरा दिवसांत संपर्कात आलाय का? या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे ‘नाही’ अशी असतील तर अजिबात काळजी करू नका. कोणालाही झालेला सर्दी, खोकला म्हणजे कोरोना विषाणूंचा संसर्ग नाही, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

परदेशात प्रवास केला नाही किंवा चीन, मलेशिया, हाँगकाँग, इराण, इटली अशा काही देशांमधून प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातही जे नागरिक नाहीत त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावरच आरोग्य तपासणी केली जाते. ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास त्या प्रवाशांना मुंबईतील कस्तुरबा किंवा पुण्यातील डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले जाते. तसेच कोणतीही लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांना पुढील सात ते चौदा दिवस घरातच राहण्यास सांगितले जाते. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकृतीची चौकशी केली जाते. त्यापैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यानंतर त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पाठविले जातात, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. 

कोरोना संदर्भात ओबामांचा अनोखा सल्ला; पाहा काय म्हणाले!

नायडू रुग्णालयात दहा संशयित
कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या आणखी पाच प्रवाशांना पुण्यातील डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात शुक्रवारी दाखल केले. त्यामुळे आता डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दहा रुग्णांना दाखल केले आहे. नव्याने दाखल झालेले प्रवासी हे अमेरिका, इटली आणि दक्षिण कोरियामधून प्रवास करून आले आहेत. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी ‘एनआयव्ही’ला पाठविले आहेत. त्याचा अहवाल शुक्रवारपर्यंत (ता. ६) मिळेल.

ऍट्रोसिटीची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या अडसूळकडून 34 लाख जप्त!

आळंदीत मास्क वाटप
आळंदी - डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोरोनाच्या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात भाविकांना आज मोफत मास्क वाटप केले.

आळंदी देवस्थानमध्ये विविध ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने येतात. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाबाबत सध्या समाजात भीतीदायक वातावरण आहे. शासन आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या स्तरावर जनजागृती आणि कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांनीही याबाबत दक्ष राहावे, यासाठी आळंदी देवस्थानमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत मास्क वाटप केले. या वेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि महाविद्यालयाचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या 'त्या' दोन बाऊन्सरना अटक

लोणावळ्यातील रुग्णाबाबतची अफवा
लोणावळा - लोणावळ्यात कोरोना विषाणूग्रस्त चार रुग्ण आढळल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदरचा मेसेज हा एका वृत्तवाहिनीच्या नावाने प्रसारित झाला आहे. मात्र, तो मुद्दाम तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचा आरोग्य विभाग परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांवर लक्ष ठेवून आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांना बळी न पडू नये. अफवा पसरविणारे मेसेज प्रसारित करू नयेत, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

परदेशात गेला नसाल तर निर्धास्त राहा ! सर्दी, खोकला म्हणजे कोरोना नसल्याचे आरोग्य खात्याचे स्पष्टीकरण पुणे - तुम्ही कोणत्याही परदेशातून प्रवास करून आलाय का? किंवा तुम्ही परदेशातून आलेल्या कोणाच्या गेल्या महिना-पंधरा दिवसांत संपर्कात आलाय का? या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे ‘नाही’ अशी असतील तर अजिबात काळजी करू नका. कोणालाही झालेला सर्दी, खोकला म्हणजे कोरोना विषाणूंचा संसर्ग नाही, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  परदेशात प्रवास केला नाही किंवा चीन, मलेशिया, हाँगकाँग, इराण, इटली अशा काही देशांमधून प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातही जे नागरिक नाहीत त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावरच आरोग्य तपासणी केली जाते. ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास त्या प्रवाशांना मुंबईतील कस्तुरबा किंवा पुण्यातील डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले जाते. तसेच कोणतीही लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांना पुढील सात ते चौदा दिवस घरातच राहण्यास सांगितले जाते. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकृतीची चौकशी केली जाते. त्यापैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यानंतर त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पाठविले जातात, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.  कोरोना संदर्भात ओबामांचा अनोखा सल्ला; पाहा काय म्हणाले! नायडू रुग्णालयात दहा संशयित कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या आणखी पाच प्रवाशांना पुण्यातील डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात शुक्रवारी दाखल केले. त्यामुळे आता डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दहा रुग्णांना दाखल केले आहे. नव्याने दाखल झालेले प्रवासी हे अमेरिका, इटली आणि दक्षिण कोरियामधून प्रवास करून आले आहेत. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी ‘एनआयव्ही’ला पाठविले आहेत. त्याचा अहवाल शुक्रवारपर्यंत (ता. ६) मिळेल. ऍट्रोसिटीची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या अडसूळकडून 34 लाख जप्त! आळंदीत मास्क वाटप आळंदी - डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोरोनाच्या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात भाविकांना आज मोफत मास्क वाटप केले. आळंदी देवस्थानमध्ये विविध ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने येतात. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाबाबत सध्या समाजात भीतीदायक वातावरण आहे. शासन आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या स्तरावर जनजागृती आणि कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांनीही याबाबत दक्ष राहावे, यासाठी आळंदी देवस्थानमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत मास्क वाटप केले. या वेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि महाविद्यालयाचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या 'त्या' दोन बाऊन्सरना अटक लोणावळ्यातील रुग्णाबाबतची अफवा लोणावळा - लोणावळ्यात कोरोना विषाणूग्रस्त चार रुग्ण आढळल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदरचा मेसेज हा एका वृत्तवाहिनीच्या नावाने प्रसारित झाला आहे. मात्र, तो मुद्दाम तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचा आरोग्य विभाग परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांवर लक्ष ठेवून आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांना बळी न पडू नये. अफवा पसरविणारे मेसेज प्रसारित करू नयेत, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2uYy1KL
Read More
पावणेदोन लाख कर्ज खात्यांवर आतापर्यंत 1025 कोटी वर्ग! 

नगरः  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आजअखेर जिल्हा सहकारी बॅंकेच्या एक लाख 76 हजार 639 कर्ज खात्यांवर 1024 कोटी 85 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. कर्ज वर्ग झाल्याच्या पावत्याही दिल्या जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

आधार व रकमांसंदर्भात प्रशासनाकडे दाखल झालेल्या तक्रारींचे निराकरण तहसील पातळीवर होत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे. योजनेत नगर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. आधार प्रमाणीकरणासाठी दोन हजार बायोमेट्रिक मशिन प्रशासनाने जिल्हा बॅंकेच्या सर्व शाखा, आपले सरकार केंद्र येथे उपलब्ध केल्या आहेत.

हेही वाचा - अण्णांचा ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब

आधार प्रमाणीकरणात दोन लाख 53 हजार 455 पैकी दोन लाख 14 हजार 693 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण निरंतर सुरू राहणार आहे, अशी माहिती सहायक निबंधक हरिश्‍चंद्र कांबळे यांनी दिली. 

बळिराजाला दिलासा देण्यासाठी प्रशासन बांधील 
बळिराजाला दिलासा देण्यासाठी प्रशासन बांधील आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसेल, त्यांनी करून घ्यावे. शेतकऱ्यांना कर्जमाफीसंदर्भात काही अडचणी येत असेल, तर त्यांनी जिल्हा समिती, तहसील पातळीवर संपर्क करावा.

जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहणार नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पावणेदोन लाख कर्ज खात्यांवर आतापर्यंत 1025 कोटी वर्ग!  नगरः  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आजअखेर जिल्हा सहकारी बॅंकेच्या एक लाख 76 हजार 639 कर्ज खात्यांवर 1024 कोटी 85 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. कर्ज वर्ग झाल्याच्या पावत्याही दिल्या जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  आधार व रकमांसंदर्भात प्रशासनाकडे दाखल झालेल्या तक्रारींचे निराकरण तहसील पातळीवर होत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे. योजनेत नगर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. आधार प्रमाणीकरणासाठी दोन हजार बायोमेट्रिक मशिन प्रशासनाने जिल्हा बॅंकेच्या सर्व शाखा, आपले सरकार केंद्र येथे उपलब्ध केल्या आहेत. हेही वाचा - अण्णांचा ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब आधार प्रमाणीकरणात दोन लाख 53 हजार 455 पैकी दोन लाख 14 हजार 693 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण निरंतर सुरू राहणार आहे, अशी माहिती सहायक निबंधक हरिश्‍चंद्र कांबळे यांनी दिली.  बळिराजाला दिलासा देण्यासाठी प्रशासन बांधील  बळिराजाला दिलासा देण्यासाठी प्रशासन बांधील आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसेल, त्यांनी करून घ्यावे. शेतकऱ्यांना कर्जमाफीसंदर्भात काही अडचणी येत असेल, तर त्यांनी जिल्हा समिती, तहसील पातळीवर संपर्क करावा. जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहणार नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2vwDyIN
Read More
कसाबला पकडणारे गोविलकर पुन्हा सेवेत

मुंबई - मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे राष्ट्रपती पदकविजेते पोलिस अधिकारी संजय गोविलकर यांच्याविरोधातील निलंबनाची कारवाई रद्द करून त्यांना सेवेत पुनःस्थापित करण्यात आले आहे. दरम्यान, गोविलकर यांच्या चौकशीचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक सोहेल भामला याच्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘लुक आउट’नोटीस काढली होती. दुबईतून आलेल्या भामला याला विमानतळ प्राधिकरणाने ताब्यात घेतले होते. प्राथमिक चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले होते. या प्रकरणात पोलिस निरीक्षक संजय गोविलकर व सहायक पोलिस निरीक्षक जितेश शिंगोटे यांना निलंबित करण्यात आले होते. निलंबनाची कारवाई स्थगित करून या दोघांना पुन्हा रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हे शाखेने गोविलकर यांची चौकशी करून अहवाल सहपोलिस आयुक्तांना दिला होता. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात आलेला हा चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. 26/११ च्या हल्ल्यावेळी गिरगाव चौपाटीजवळ पोलिस हवालदार तुकाराम ओंबळे आणि गोविलकर यांनी कसाबला जिवंत पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. कसाबने केलेल्या गोळीबारात ओंबळे हुतात्मा झाले; मात्र गोविलकर आणि अन्य पोलिस अधिकाऱ्याने इस्माईल खान या दहशतवाद्याला टिपले होते. या कामगिरीबद्दल गोविलकर यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कसाबला पकडणारे गोविलकर पुन्हा सेवेत मुंबई - मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे राष्ट्रपती पदकविजेते पोलिस अधिकारी संजय गोविलकर यांच्याविरोधातील निलंबनाची कारवाई रद्द करून त्यांना सेवेत पुनःस्थापित करण्यात आले आहे. दरम्यान, गोविलकर यांच्या चौकशीचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक सोहेल भामला याच्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘लुक आउट’नोटीस काढली होती. दुबईतून आलेल्या भामला याला विमानतळ प्राधिकरणाने ताब्यात घेतले होते. प्राथमिक चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले होते. या प्रकरणात पोलिस निरीक्षक संजय गोविलकर व सहायक पोलिस निरीक्षक जितेश शिंगोटे यांना निलंबित करण्यात आले होते. निलंबनाची कारवाई स्थगित करून या दोघांना पुन्हा रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हे शाखेने गोविलकर यांची चौकशी करून अहवाल सहपोलिस आयुक्तांना दिला होता. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात आलेला हा चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. 26/११ च्या हल्ल्यावेळी गिरगाव चौपाटीजवळ पोलिस हवालदार तुकाराम ओंबळे आणि गोविलकर यांनी कसाबला जिवंत पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. कसाबने केलेल्या गोळीबारात ओंबळे हुतात्मा झाले; मात्र गोविलकर आणि अन्य पोलिस अधिकाऱ्याने इस्माईल खान या दहशतवाद्याला टिपले होते. या कामगिरीबद्दल गोविलकर यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ip1Cjq
Read More
"कोरोना विषाणू'च्या चर्चेने `या` शहरात भीतीचे वातावरण  

सोलापूर : येथील अश्‍विनी सहकारी रुग्णालयात कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याची चर्चा समाजमाध्यमावरून पसरल्याने शहर व जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या संदर्भात रुग्णालयाने तातडीने प्रसिद्धपत्रक काढून संबंधित रुग्ण हा कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट केले. तथापि, या रुग्णालयाच्या रुग्णतपासणी अहवालावर मात्र "कोरोना'चा उल्लेख असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षाची पाहणी केली. 

कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आलेला विलगीकरण कक्ष

अश्‍विनी रुग्णालयात संशयित रुग्ण दाखल झाल्याची माहिती समाजमाध्यमावर रुग्णाच्या तपासणीअहवालासह प्रसिद्ध झाली. त्यामुळे नागरिकांत एकच खळबळ उडाली. हा रुग्ण तिरुपतीहून सोलापुरात आला असाही मेसेज फिरल्याने सोलापुरकरांच्या चिंतेत भर पडली. अनेकांनी अश्‍विनी रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खात्री करून घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र घुली यांनी, संबंधित रुग्ण कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित रुग्ण हा सोलापुरातील कुमठे गावातील असून त्यास गेल्या तीन दिवसांपासून खोकला व दमा लागण्यासाठी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तो "कोव्हीड 19' चा रुग्ण वाटत नव्हता. निदान करण्यासाठी त्याची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यात जिवाणू व विषाणूच्या डीएनएची तपासणी होती. त्यात सॅफीलोकोकस ऑरीअस, मायकोप्लाझमा न्यूमोनिया, करोना व्हायरसचे डीएनए दिसून आले. त्यामुळे तशी नोंद प्रयोगशाळेच्या अहवालावर आली आहे. करोना व्हायरसची तपासणी सोलापुरात होत नाही, त्यामुळे संबंधित रुग्णाच्या शरीरात आढळलेला व्हायरस हा वेगळा आहे, असे रुग्णालयाने महापालिकेस दिलेल्या अहवालात म्हटले आहे. 

कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आलेला विलगीकरण कक्षातील सुसज्ज यंत्रणा 

कोरोना विषाणूवरून शहर व जिल्ह्यात गोंधळ सुरु असतानाच राज्याचे मुख्य सचिव राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधत होते. व्हीसी संपल्यावर सर्व अधिकारी आपापल्या कार्यालयात परतण्यासाठी वाटेत असतानाच, अश्‍विनीतील प्रकार जिल्हाधिकाऱ्यांना समजला. त्यांनी परतीच्या वाटेवर असलेल्या सर्वांना पुन्हा बोलावले. रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तातडीने बोलावून घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसह शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली. या ठिकाणी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना दिल्या. 

कक्षाची पाहणी करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ 

 

News Story Feeds https://ift.tt/39vkrO2

"कोरोना विषाणू'च्या चर्चेने `या` शहरात भीतीचे वातावरण   सोलापूर : येथील अश्‍विनी सहकारी रुग्णालयात कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याची चर्चा समाजमाध्यमावरून पसरल्याने शहर व जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या संदर्भात रुग्णालयाने तातडीने प्रसिद्धपत्रक काढून संबंधित रुग्ण हा कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट केले. तथापि, या रुग्णालयाच्या रुग्णतपासणी अहवालावर मात्र "कोरोना'चा उल्लेख असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षाची पाहणी केली.  कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आलेला विलगीकरण कक्ष अश्‍विनी रुग्णालयात संशयित रुग्ण दाखल झाल्याची माहिती समाजमाध्यमावर रुग्णाच्या तपासणीअहवालासह प्रसिद्ध झाली. त्यामुळे नागरिकांत एकच खळबळ उडाली. हा रुग्ण तिरुपतीहून सोलापुरात आला असाही मेसेज फिरल्याने सोलापुरकरांच्या चिंतेत भर पडली. अनेकांनी अश्‍विनी रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खात्री करून घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र घुली यांनी, संबंधित रुग्ण कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित रुग्ण हा सोलापुरातील कुमठे गावातील असून त्यास गेल्या तीन दिवसांपासून खोकला व दमा लागण्यासाठी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तो "कोव्हीड 19' चा रुग्ण वाटत नव्हता. निदान करण्यासाठी त्याची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यात जिवाणू व विषाणूच्या डीएनएची तपासणी होती. त्यात सॅफीलोकोकस ऑरीअस, मायकोप्लाझमा न्यूमोनिया, करोना व्हायरसचे डीएनए दिसून आले. त्यामुळे तशी नोंद प्रयोगशाळेच्या अहवालावर आली आहे. करोना व्हायरसची तपासणी सोलापुरात होत नाही, त्यामुळे संबंधित रुग्णाच्या शरीरात आढळलेला व्हायरस हा वेगळा आहे, असे रुग्णालयाने महापालिकेस दिलेल्या अहवालात म्हटले आहे.  कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आलेला विलगीकरण कक्षातील सुसज्ज यंत्रणा  कोरोना विषाणूवरून शहर व जिल्ह्यात गोंधळ सुरु असतानाच राज्याचे मुख्य सचिव राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधत होते. व्हीसी संपल्यावर सर्व अधिकारी आपापल्या कार्यालयात परतण्यासाठी वाटेत असतानाच, अश्‍विनीतील प्रकार जिल्हाधिकाऱ्यांना समजला. त्यांनी परतीच्या वाटेवर असलेल्या सर्वांना पुन्हा बोलावले. रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तातडीने बोलावून घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसह शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली. या ठिकाणी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना दिल्या.  कक्षाची पाहणी करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ    News Story Feeds https://ift.tt/39vkrO2

March 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cuaFgZ
Read More
दिल्ली हिंसा में गिरफ्तार ताहिर हुसैन की कोर्ट में पेशी आज, कॉल रिकॉर्ड से उठे सवाल https://ift.tt/2uWehY0