स्टार्टअप फंडिंग... स्टार्टअप सुरू करताना सर्वांत मोठे चॅलेंज असते ते फंडिंगचे ! एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणताही स्टार्टअप सुरू करणं सोपं आहे मात्र तो यशस्वी करून दाखविणं सोपी गोष्ट नसते. तसेच स्टार्टअपसाठी फंड उभा करणं ही देखील तितकी सोपी गोष्ट नाही. कोणताही स्टार्टअप फंडिंगशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. निधी आणि निधी उभारणी या दोन्ही मूलभूत गोष्टी स्टार्टअपच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असतात. जेव्हा एखाद्या स्टार्टअपला फंडिंग मिळतं तेव्हा त्याच्या बातम्या वाचून अनेकांना राग येतो. माझी आयडिया याच्यापेक्षा चांगली आहे. तरीही त्याला फंडिंग मिळालं मला नाही, अशी काहीशी भावना अनेकांच्या मनात असते; मात्र सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जितकी आयडिया महत्त्वाची असते, त्यापेक्षा त्याचं एग्झिक्यूशन महत्त्वाचं असतं. फंडिंग मिळवताना स्टार्टअप्सना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. ही प्रक्रिया अनेक वेळा वेळखाऊ ठरते. यात अनेक अटींची पूर्तता करावी लागते आणि त्यामुळे त्याच्याकडून  फंडिंग मिळवणं हे प्रत्येक स्टार्टअपला शक्य होत नाही, काही वेळा तर स्टार्टअप्सना, योग्य मार्गदर्शन नसल्यानं मोठ्या गुंतवणूकदारापर्यंत पोहोचताच येत नाही. एका रिसर्चनुसार सुरुवातीच्या काळातच सुमारे ९० टक्के स्टार्टअप केवळ फंडिंगअभावी बंद पडतात. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी मोदी सरकारनं साधारणत: पाच वर्षांपूर्वी स्टार्टअप इंडिया मिशन सुरू केलं होतं. या कालावधीत अनेक स्टार्टअप सुरू झाले, मात्र रोख निधीचा अभाव हे स्टार्टअपच्या मार्गातील मोठे अडथळे ठरले आहेत. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.  सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ‘लोकल सर्कल्स’ या संस्थेनं हे सर्वेक्षण केलं आहे. संस्थेच्या माहितीनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी २०२० हे वर्ष कोरोनाचं संकट घेऊन आलं. या क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारनं तीन लाख कोटी रुपयांचा आपत्कालीन निधी उपलब्ध करून दिला. मात्र स्टार्टअप कंपन्यांना ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेतील या निधीचा फायदा घेता आला नाही. कोणतंही कर्ज त्यांच्या खात्यावर नसल्यानं या कंपन्या पात्र ठरल्या नाहीत. आता याच समस्येवर ‘दि इंडिया नेटवर्क’नं लक्ष केंद्रित केलं आहे. आम्ही ‘दि इंडिया नेटवर्क’च्या माध्यमातून चांगली आयडिया व तिचं एग्झिक्यूशन, रिसर्च असणाऱ्या होतकरू तरुण- तरुणींना फंडिंग करतो. दि इंडिया नेटवर्कनं शंभर कोटी रुपयांचा फंड यासाठी राखीव ठेवला आहे. आम्ही आतापर्यंत ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्सला फंडिंग केलं असून, ते सर्व खूप चांगलं काम करत असल्याचा आम्हाला जास्त आनंद आहे.  फंडिंगच्या बाबतीत मला आलेला एक अनुभव आहे, जेव्हा कुणाला फंडिंग बाबतीत माहिती मिळते, तेव्हा सुमारे ९९.९९ टक्के लोक २ ते ३ वेळा ती फंडिग मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. तोपर्यंत राहुल सर, तुम्ही माझे आयडॉल आहात... तुम्ही माझे इन्स्पिरेशन आहात वगैरे, वगैरे... मात्र जेव्हा त्यांना इन्स्टंट काही मिळालं नाही, तर तू कोण आणि मी कोण ? हीच चूक आपली मराठी मुलं करतात. फंडिग मिळविण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टरचा विश्‍वास जिंकणं महत्त्वाचं असतं. जर ते इतकं सोपं असतं, तर सर्वांना फंडिंग मिळाली नसती का?  मी अनेकांना गुगलचं उदाहरण देतो. तुम्हाला माहिती असेल, की फंडिंग मिळविण्यासाठी गुगलनं सुमारे चार हजार लोकांची भेट घेऊन त्यांना प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यातून एक जण तयार झाला. तोपर्यंत गुगलनं हार मानली नव्हती, आज गुगल इंटरनेट जगताचा बेताज बादशहा आहे, हे सांगायची गरज नाही. भारतात शंभर युनिकॉर्न कंपन्या आहेत, तर चीनमध्ये चार हजार युनिकॉर्न आहेत. ही मोठी तफावत आहे. आपल्या देशात अजून युनिकॉर्न उभी राहण्याची आवश्यकता आहे. येथे खूप  स्कोपदेखील आहे. फंडिंगचा जेव्हा विषय निघतो तेंव्हा बूटस्ट्रैपिंग, क्राउड फंडिंज, एंजेल इन्वेस्टर्स, लाइन ऑफ क्रेडिट, कर्ज, इन्क्यूबेटर्स, मुद्रा लोन, वेंचर कॅपिटल असे अनेक शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. आजच्या या सदरात आपण याच विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांनी सीड फंडिंग, अर्ली स्टेज फंडिंग, लेट स्टेज फंडिंग हे शब्द ऐकले असतीलच. यापैकी सर्वांत आधी सीड फंडिंग म्हणजे काय ते जाणून घेऊयात... सीड फंडिंग म्हणजे कोणताही स्टार्टअप सुरू करण्यासाठी निधी उभारणी. जर तुमच्याकडे एखादी चांगली स्टार्टअपची आयडिया आहे, त्या आयडियाचं बिझनेसमध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारी सामग्री देखील आपल्याकडे आहे, तर तुमच्यासाठी सीड फंडिंग सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र वरकरणी हे जितकं सोपं वाटतं किंवा दिसतं, तितकं सोपं नाही. सीड फंडिंगआधी तुमच्या डोक्यातील आयडियाला एखाद्या स्टार्टअपमध्ये रूपांतरित होण्यासाठी तुम्हाला काही पदरमोड करावी लागते. त्याला साधारणत: प्री सीड फंडिंग असं म्हटलं जातं. या प्री सीड फंडिंगच्या मदतीनं आपण कोणत्याही इन्व्हेस्टरसमोर प्रेझेंटेशन देण्यासाठी पात्र ठरतात, असं म्हटले तरी ते चुकीचं ठरणार नाही. बहुतांशवेळा प्री सीड फंडिंग ही स्वत: जवळील बचत, मित्रांकडून उधार घेतलेले पैसे किंवा तुमच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या जवळच्या व्यक्तींकडून प्राप्त झालेली असते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सेल्फ फंडिंग : या प्रकारात स्वत:कडे उपलब्ध असलेल्या निधीच्या माध्यमातून किंवा फाउंडर्स व को-फाउंडर्सनी वैयक्तिक पातळीवर गोळा केलेल्या निधीच्या जोरावर स्टार्टअपची सुरुवात केली जाते. गुंतवणूकदारांकडे जाण्याआधी सेल्फ फंडिंगच्या माध्यमातून स्टार्टअपची भक्कम पायाभरणी केली जाते. क्राउड फंडिंग : अनेकांकडून क्राउडफंडिंगला पसंती देण्यात येते. क्राउड फंडिंगचे काही प्रकार आहेत. यातील सर्वांत पहिला प्रकार म्हणजे, इक्विटी अर्थात भागभांडवल, या प्रकारात, कंपनीच्या भागभांडवलाच्या मोबदल्यात छोट्या गुंतवणूकदारांकडून भांडवलाची उभारणी केली जाते. दुसरा प्रकार म्हणजे डोनेशन, यात ओळखीच्या लोकांकडून किंवा संस्थांकडून निधी मिळवला जातो. तिसऱ्‍या प्रकारात कर्जाच्या स्वरूपात पैसे जमवले जातात. हे पैसे निर्धारित व्याजदरानं आधीच ठरलेल्या अटींप्रमाणे परत केले जातात. चौथ्या प्रकारात राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमांतून निधी उभा केला जातो. क्राउड फंडिगवेळी होणारी फसवणूक व गैरप्रकार टाळण्यासाठी शासनानं काही नियमावली देखील तयार केली आहे. यात प्रामुख्यानं उल्लेख करावयाचा म्हटल्यास, कंपनीची भारतात अधिकृत नोंदणी झालेली असावी, मात्र शेअर मार्केटमध्ये नोंद झालेली नसावी. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून कंपनीला १० कोटींपेक्षा जास्त भांडवलाची उभारणी करता येणार नाही. भांडवलाची उभारणी करताना एका आर्थिक वर्षात दोनशेपेक्षा जास्त गुंतवणूकदार घेता येणार नाहीत. यांचा उल्लेख करावा लागेल. गुंतवणूकदार : अनेक गुंतवणूकदार लंबी रेस का घोडा ठरू शकणाऱ्‍या स्टार्टअप्सच्या शोधात असतात. एंजल इन्व्हेस्टर्स : हा काहीसा गुंतवणूकदारांशी मिळता जुळता प्रकार दिसून येतो. मात्र त्यांची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर असे काही गुंतवणूकदार असतात, जे भविष्यात यशस्वी होऊ शकतील अशा स्टार्टअप्सच्या शोधात असतात. या स्टार्टअपसाठी ते गुंतवणूक म्हणून रूपांतरित कर्ज किंवा इक्विटीच्या माध्यमातून पैसे देतात. एंजल इन्व्हेस्टर्सचं काम केवळ पैसे दिले व संपले असे होत नाही. ते स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. दि इंडिया नेटवर्क यापैकीच एक आहे. कर्ज : बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात भांडवल मिळवणं हा सर्वांत पारंपरिक भांडवलाचा स्रोत म्हणून आजही तितकाच लोकप्रिय आहे. व्यवसायाचं स्वरूप, उत्पन्नक्षमता, व्यवसायाचा अनुभव व कौशल्य, बँकेची रक्कम परत करण्याची क्षमता या साऱ्‍या गोष्टींचा विचार बँक करते. भारतातील जवळपास सगळ्याच बँका विविध योजनांद्वारे एसएमई वित्त पुरवठा करतात. शासकीय भांडवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही महत्त्वाकांक्षी योजनांपैकी स्टार्टअप इंडिया ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या व्यवसायाची योजना सादर करून कर्जासाठी अर्ज करू शकता. (सदराचे लेखक प्रयोगशील उद्योजक आणि विविध स्टार्टअपचे मार्गदर्शक आहेत. ) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 3, 2021

स्टार्टअप फंडिंग... स्टार्टअप सुरू करताना सर्वांत मोठे चॅलेंज असते ते फंडिंगचे ! एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणताही स्टार्टअप सुरू करणं सोपं आहे मात्र तो यशस्वी करून दाखविणं सोपी गोष्ट नसते. तसेच स्टार्टअपसाठी फंड उभा करणं ही देखील तितकी सोपी गोष्ट नाही. कोणताही स्टार्टअप फंडिंगशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. निधी आणि निधी उभारणी या दोन्ही मूलभूत गोष्टी स्टार्टअपच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असतात. जेव्हा एखाद्या स्टार्टअपला फंडिंग मिळतं तेव्हा त्याच्या बातम्या वाचून अनेकांना राग येतो. माझी आयडिया याच्यापेक्षा चांगली आहे. तरीही त्याला फंडिंग मिळालं मला नाही, अशी काहीशी भावना अनेकांच्या मनात असते; मात्र सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जितकी आयडिया महत्त्वाची असते, त्यापेक्षा त्याचं एग्झिक्यूशन महत्त्वाचं असतं. फंडिंग मिळवताना स्टार्टअप्सना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. ही प्रक्रिया अनेक वेळा वेळखाऊ ठरते. यात अनेक अटींची पूर्तता करावी लागते आणि त्यामुळे त्याच्याकडून  फंडिंग मिळवणं हे प्रत्येक स्टार्टअपला शक्य होत नाही, काही वेळा तर स्टार्टअप्सना, योग्य मार्गदर्शन नसल्यानं मोठ्या गुंतवणूकदारापर्यंत पोहोचताच येत नाही. एका रिसर्चनुसार सुरुवातीच्या काळातच सुमारे ९० टक्के स्टार्टअप केवळ फंडिंगअभावी बंद पडतात. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी मोदी सरकारनं साधारणत: पाच वर्षांपूर्वी स्टार्टअप इंडिया मिशन सुरू केलं होतं. या कालावधीत अनेक स्टार्टअप सुरू झाले, मात्र रोख निधीचा अभाव हे स्टार्टअपच्या मार्गातील मोठे अडथळे ठरले आहेत. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.  सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ‘लोकल सर्कल्स’ या संस्थेनं हे सर्वेक्षण केलं आहे. संस्थेच्या माहितीनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी २०२० हे वर्ष कोरोनाचं संकट घेऊन आलं. या क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारनं तीन लाख कोटी रुपयांचा आपत्कालीन निधी उपलब्ध करून दिला. मात्र स्टार्टअप कंपन्यांना ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेतील या निधीचा फायदा घेता आला नाही. कोणतंही कर्ज त्यांच्या खात्यावर नसल्यानं या कंपन्या पात्र ठरल्या नाहीत. आता याच समस्येवर ‘दि इंडिया नेटवर्क’नं लक्ष केंद्रित केलं आहे. आम्ही ‘दि इंडिया नेटवर्क’च्या माध्यमातून चांगली आयडिया व तिचं एग्झिक्यूशन, रिसर्च असणाऱ्या होतकरू तरुण- तरुणींना फंडिंग करतो. दि इंडिया नेटवर्कनं शंभर कोटी रुपयांचा फंड यासाठी राखीव ठेवला आहे. आम्ही आतापर्यंत ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्सला फंडिंग केलं असून, ते सर्व खूप चांगलं काम करत असल्याचा आम्हाला जास्त आनंद आहे.  फंडिंगच्या बाबतीत मला आलेला एक अनुभव आहे, जेव्हा कुणाला फंडिंग बाबतीत माहिती मिळते, तेव्हा सुमारे ९९.९९ टक्के लोक २ ते ३ वेळा ती फंडिग मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. तोपर्यंत राहुल सर, तुम्ही माझे आयडॉल आहात... तुम्ही माझे इन्स्पिरेशन आहात वगैरे, वगैरे... मात्र जेव्हा त्यांना इन्स्टंट काही मिळालं नाही, तर तू कोण आणि मी कोण ? हीच चूक आपली मराठी मुलं करतात. फंडिग मिळविण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टरचा विश्‍वास जिंकणं महत्त्वाचं असतं. जर ते इतकं सोपं असतं, तर सर्वांना फंडिंग मिळाली नसती का?  मी अनेकांना गुगलचं उदाहरण देतो. तुम्हाला माहिती असेल, की फंडिंग मिळविण्यासाठी गुगलनं सुमारे चार हजार लोकांची भेट घेऊन त्यांना प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यातून एक जण तयार झाला. तोपर्यंत गुगलनं हार मानली नव्हती, आज गुगल इंटरनेट जगताचा बेताज बादशहा आहे, हे सांगायची गरज नाही. भारतात शंभर युनिकॉर्न कंपन्या आहेत, तर चीनमध्ये चार हजार युनिकॉर्न आहेत. ही मोठी तफावत आहे. आपल्या देशात अजून युनिकॉर्न उभी राहण्याची आवश्यकता आहे. येथे खूप  स्कोपदेखील आहे. फंडिंगचा जेव्हा विषय निघतो तेंव्हा बूटस्ट्रैपिंग, क्राउड फंडिंज, एंजेल इन्वेस्टर्स, लाइन ऑफ क्रेडिट, कर्ज, इन्क्यूबेटर्स, मुद्रा लोन, वेंचर कॅपिटल असे अनेक शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. आजच्या या सदरात आपण याच विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांनी सीड फंडिंग, अर्ली स्टेज फंडिंग, लेट स्टेज फंडिंग हे शब्द ऐकले असतीलच. यापैकी सर्वांत आधी सीड फंडिंग म्हणजे काय ते जाणून घेऊयात... सीड फंडिंग म्हणजे कोणताही स्टार्टअप सुरू करण्यासाठी निधी उभारणी. जर तुमच्याकडे एखादी चांगली स्टार्टअपची आयडिया आहे, त्या आयडियाचं बिझनेसमध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारी सामग्री देखील आपल्याकडे आहे, तर तुमच्यासाठी सीड फंडिंग सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र वरकरणी हे जितकं सोपं वाटतं किंवा दिसतं, तितकं सोपं नाही. सीड फंडिंगआधी तुमच्या डोक्यातील आयडियाला एखाद्या स्टार्टअपमध्ये रूपांतरित होण्यासाठी तुम्हाला काही पदरमोड करावी लागते. त्याला साधारणत: प्री सीड फंडिंग असं म्हटलं जातं. या प्री सीड फंडिंगच्या मदतीनं आपण कोणत्याही इन्व्हेस्टरसमोर प्रेझेंटेशन देण्यासाठी पात्र ठरतात, असं म्हटले तरी ते चुकीचं ठरणार नाही. बहुतांशवेळा प्री सीड फंडिंग ही स्वत: जवळील बचत, मित्रांकडून उधार घेतलेले पैसे किंवा तुमच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या जवळच्या व्यक्तींकडून प्राप्त झालेली असते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सेल्फ फंडिंग : या प्रकारात स्वत:कडे उपलब्ध असलेल्या निधीच्या माध्यमातून किंवा फाउंडर्स व को-फाउंडर्सनी वैयक्तिक पातळीवर गोळा केलेल्या निधीच्या जोरावर स्टार्टअपची सुरुवात केली जाते. गुंतवणूकदारांकडे जाण्याआधी सेल्फ फंडिंगच्या माध्यमातून स्टार्टअपची भक्कम पायाभरणी केली जाते. क्राउड फंडिंग : अनेकांकडून क्राउडफंडिंगला पसंती देण्यात येते. क्राउड फंडिंगचे काही प्रकार आहेत. यातील सर्वांत पहिला प्रकार म्हणजे, इक्विटी अर्थात भागभांडवल, या प्रकारात, कंपनीच्या भागभांडवलाच्या मोबदल्यात छोट्या गुंतवणूकदारांकडून भांडवलाची उभारणी केली जाते. दुसरा प्रकार म्हणजे डोनेशन, यात ओळखीच्या लोकांकडून किंवा संस्थांकडून निधी मिळवला जातो. तिसऱ्‍या प्रकारात कर्जाच्या स्वरूपात पैसे जमवले जातात. हे पैसे निर्धारित व्याजदरानं आधीच ठरलेल्या अटींप्रमाणे परत केले जातात. चौथ्या प्रकारात राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमांतून निधी उभा केला जातो. क्राउड फंडिगवेळी होणारी फसवणूक व गैरप्रकार टाळण्यासाठी शासनानं काही नियमावली देखील तयार केली आहे. यात प्रामुख्यानं उल्लेख करावयाचा म्हटल्यास, कंपनीची भारतात अधिकृत नोंदणी झालेली असावी, मात्र शेअर मार्केटमध्ये नोंद झालेली नसावी. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून कंपनीला १० कोटींपेक्षा जास्त भांडवलाची उभारणी करता येणार नाही. भांडवलाची उभारणी करताना एका आर्थिक वर्षात दोनशेपेक्षा जास्त गुंतवणूकदार घेता येणार नाहीत. यांचा उल्लेख करावा लागेल. गुंतवणूकदार : अनेक गुंतवणूकदार लंबी रेस का घोडा ठरू शकणाऱ्‍या स्टार्टअप्सच्या शोधात असतात. एंजल इन्व्हेस्टर्स : हा काहीसा गुंतवणूकदारांशी मिळता जुळता प्रकार दिसून येतो. मात्र त्यांची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर असे काही गुंतवणूकदार असतात, जे भविष्यात यशस्वी होऊ शकतील अशा स्टार्टअप्सच्या शोधात असतात. या स्टार्टअपसाठी ते गुंतवणूक म्हणून रूपांतरित कर्ज किंवा इक्विटीच्या माध्यमातून पैसे देतात. एंजल इन्व्हेस्टर्सचं काम केवळ पैसे दिले व संपले असे होत नाही. ते स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. दि इंडिया नेटवर्क यापैकीच एक आहे. कर्ज : बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात भांडवल मिळवणं हा सर्वांत पारंपरिक भांडवलाचा स्रोत म्हणून आजही तितकाच लोकप्रिय आहे. व्यवसायाचं स्वरूप, उत्पन्नक्षमता, व्यवसायाचा अनुभव व कौशल्य, बँकेची रक्कम परत करण्याची क्षमता या साऱ्‍या गोष्टींचा विचार बँक करते. भारतातील जवळपास सगळ्याच बँका विविध योजनांद्वारे एसएमई वित्त पुरवठा करतात. शासकीय भांडवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही महत्त्वाकांक्षी योजनांपैकी स्टार्टअप इंडिया ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या व्यवसायाची योजना सादर करून कर्जासाठी अर्ज करू शकता. (सदराचे लेखक प्रयोगशील उद्योजक आणि विविध स्टार्टअपचे मार्गदर्शक आहेत. ) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rSNSlb

No comments:

Post a Comment