‘अनंत’ अमुची ध्येयासक्ती... ‘अनंता’नुभव या पुस्तकाला आत्मचरित्र म्हटलं तर ते एका व्यक्तीपुरतं मर्यादित होईल. ते वास्तवात समाजातील व्रतस्थ सेवाभावाचे चरित्र आहे. संघाच्या समाजकार्याचे ते प्रतिबिंब आहे. डॉ. अनंत कुलकर्णी नावाची एक व्यक्ती कोल्हापूरची. ती आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रत्यक्ष संघकार्याशी जोडली जाते काय आणि तब्बल ३५ वर्षे स्वयंसेवी संस्थांसाठी राबते काय... त्यासाठी दऱ्याखोऱ्या, चिखल तुडवते काय आणि अनंत संकटांना तोंड देत आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवते काय... सारेच अकल्पित आणि आश्‍चर्यात टाकणारे ! एक माणूस एका जन्मात इतकी सारी कामे कशी काय करू शकतो, असा प्रश्‍न ज्याला कुणाला पडत असेल, त्याने ‘अनंता’नुभव जरूर वाचावे. डॉ. कुलकर्णी यांच्या कार्याशी मी परिचित आहे; परंतु त्यातील अनेक तपशील मला माहिती नव्हते. हे पुस्तक वाचत असताना त्यातील तपशिलांनी मला भारावून टाकले. यात मला केवळ डॉ. कुलकर्णी भेटले नाहीत. त्यांच्यासोबत रा. स्व. संघातील अनेक कर्तबगार लोक आणि असंख्य देवदुर्लभ कार्यकर्त्यांची भेट झाली. त्यांच्या ध्येयासक्तीचा आणखी दाट परिचय झाला. लौकिकार्थाने डॉ. कुलकर्णी प्रचारक नव्हते; परंतु त्यांनी तब्बल ३५ वर्षे निःस्वार्थ भावाने वैद्यकीय सेवा दिली. संघाच्या सेवा प्रकल्पांमध्ये ते निगुतीने राबले. एमबीबीएस झाल्यानंतर त्यांनी मनात आणले असते तर खोऱ्याने पैसा कमावला असता आणि ठिकठिकाणी भाड्याने घेतलेल्या घरांत राहण्याची गरज त्यांना कधी पडली नसती; परंतु संघाच्या अफाट सेवाकार्याशी स्वतःला जोडून घेण्याच्या आणि त्यालाच सर्वस्व वाहून टाकण्याच्या ऊर्मीने त्यांना त्या कामाकडे ओढून नेले. काही माणसांचा पिंडच तसा असतो. त्यांना लौकिकातल्या सुखोपभोगांची असोशी नसते. संघ आणि कुटुंबातील संस्कारांनी डॉ. कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व घडले. ध्येयनिष्ठेला सार्वजनिक कामाच्या आवडीची साथ मिळाली आणि पुढची साडेतीन दशके या माणसानं संघाच्या सेवाकार्याला एवढं मोठं योगदान दिलं, की भविष्यातील पिढ्या केवळ आश्‍चर्यचकित होतील. मी असं मानतो, की कुटुंबातील संस्कारांना संघातील संस्कारांची जोड मिळाली, की अशौ अलौकिक व्यक्तिमत्त्वं घडतात, बहरून येतात आणि समाजाला भरपूर देतात. डॉक्‍टरांनी स्वीकारलेलं काम सोपं नव्हतं. सुखाचं तर नव्हतंच नव्हतं. त्यात निराशा होती, संघर्ष होता, वैफल्य होते. तरीही डॉक्‍टरांनी मार्ग सोडला नाही. प्रगती प्रतिष्ठान ते जनकल्याण चेन ऑफ ब्लड बॅंक्‍स या त्यांच्या प्रवासात अनेक वळणं आली. प्रत्येक वळणावर संस्कारांची साथ, सोबत्यांचा विश्‍वास आणि घरच्यांचं पाठबळ त्यांच्यासोबत होते. संघाची प्रेरणा देवदुर्लभ कार्यकर्त्यांना कसं घडवते यचंच हे उदाहरण. अवघ्या तीन वर्षांसाठी मोखाड्यासारख्या वनवासीबहुल भागात गेलेले डॉक्‍टर त्यानंतर त्या कामात असे रमले, की त्यांनी संघाच्या अनेक सेवा प्रकल्पांच्या पायाभरणीत आणि उभारणीत मोठं योगदान दिलं. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी याच प्रकारच्या कामांसाठी दिला. म्हटलं तर अवघी हयात त्यांनी सेवाकार्याला दिली. त्यांनी आरोग्यरक्षकांची फळी उभी केली, वनवासी आणि ग्रामीणांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी खटाटोप केला, रुग्णांनाच नव्हे, तर त्यांच्या नातेवाइकांनाही सेवा दिली, रक्तदानाची चळवळ उभी केली, कुपोषणावर काम केले... हे त्यांच्या कामाचे फक्त ठळक टप्पे आहेत. डॉक्‍टरांचा हा नेत्रदीपक आणि प्रेरणादायी प्रवास नेमका झाला कसा हे मुळातून समजून घ्यायचं असेल तर नव्यानं वैद्यक व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांनी आणि प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यानं ‘अनंता’नुभव हे पुस्तक तपशिलानं वाचलं पाहिजे. सामाजिक काम म्हणजे फक्त मलमपट्टी नसते; त्यासाठी समाजात समरस होऊन जावं लागतं, त्यांच्यासारखं जगावं लागतं, हे त्यांना या पुस्तकातून कळेल. मी स्वतः ‘अनंता’नुभव वाचताना अक्षरशः भारावून गेलो आणि डॉ. कुलकर्णी यांच्या सेवाकार्यातील अनुभवांच्या अथांग सागराला मनापासून नमस्कार केला. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी डॉक्‍टरांच्या अनुभवांचे अत्यंत सार्थ असे शब्दांकन केलेले आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो. ‘अनंता’नुभव वाचताना मला सारखी आठवण येत होती ती कुसुमाग्रजांच्या एका कवितेची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ची.  सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ‘मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा... चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला. या ओळीतून या पुस्तकाची आणि डॉ. कुलकर्णी यांच्या कामाची कल्पना येईल .  अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा,                   किनारा तुला पामराला...’       ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 3, 2021

‘अनंत’ अमुची ध्येयासक्ती... ‘अनंता’नुभव या पुस्तकाला आत्मचरित्र म्हटलं तर ते एका व्यक्तीपुरतं मर्यादित होईल. ते वास्तवात समाजातील व्रतस्थ सेवाभावाचे चरित्र आहे. संघाच्या समाजकार्याचे ते प्रतिबिंब आहे. डॉ. अनंत कुलकर्णी नावाची एक व्यक्ती कोल्हापूरची. ती आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रत्यक्ष संघकार्याशी जोडली जाते काय आणि तब्बल ३५ वर्षे स्वयंसेवी संस्थांसाठी राबते काय... त्यासाठी दऱ्याखोऱ्या, चिखल तुडवते काय आणि अनंत संकटांना तोंड देत आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवते काय... सारेच अकल्पित आणि आश्‍चर्यात टाकणारे ! एक माणूस एका जन्मात इतकी सारी कामे कशी काय करू शकतो, असा प्रश्‍न ज्याला कुणाला पडत असेल, त्याने ‘अनंता’नुभव जरूर वाचावे. डॉ. कुलकर्णी यांच्या कार्याशी मी परिचित आहे; परंतु त्यातील अनेक तपशील मला माहिती नव्हते. हे पुस्तक वाचत असताना त्यातील तपशिलांनी मला भारावून टाकले. यात मला केवळ डॉ. कुलकर्णी भेटले नाहीत. त्यांच्यासोबत रा. स्व. संघातील अनेक कर्तबगार लोक आणि असंख्य देवदुर्लभ कार्यकर्त्यांची भेट झाली. त्यांच्या ध्येयासक्तीचा आणखी दाट परिचय झाला. लौकिकार्थाने डॉ. कुलकर्णी प्रचारक नव्हते; परंतु त्यांनी तब्बल ३५ वर्षे निःस्वार्थ भावाने वैद्यकीय सेवा दिली. संघाच्या सेवा प्रकल्पांमध्ये ते निगुतीने राबले. एमबीबीएस झाल्यानंतर त्यांनी मनात आणले असते तर खोऱ्याने पैसा कमावला असता आणि ठिकठिकाणी भाड्याने घेतलेल्या घरांत राहण्याची गरज त्यांना कधी पडली नसती; परंतु संघाच्या अफाट सेवाकार्याशी स्वतःला जोडून घेण्याच्या आणि त्यालाच सर्वस्व वाहून टाकण्याच्या ऊर्मीने त्यांना त्या कामाकडे ओढून नेले. काही माणसांचा पिंडच तसा असतो. त्यांना लौकिकातल्या सुखोपभोगांची असोशी नसते. संघ आणि कुटुंबातील संस्कारांनी डॉ. कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व घडले. ध्येयनिष्ठेला सार्वजनिक कामाच्या आवडीची साथ मिळाली आणि पुढची साडेतीन दशके या माणसानं संघाच्या सेवाकार्याला एवढं मोठं योगदान दिलं, की भविष्यातील पिढ्या केवळ आश्‍चर्यचकित होतील. मी असं मानतो, की कुटुंबातील संस्कारांना संघातील संस्कारांची जोड मिळाली, की अशौ अलौकिक व्यक्तिमत्त्वं घडतात, बहरून येतात आणि समाजाला भरपूर देतात. डॉक्‍टरांनी स्वीकारलेलं काम सोपं नव्हतं. सुखाचं तर नव्हतंच नव्हतं. त्यात निराशा होती, संघर्ष होता, वैफल्य होते. तरीही डॉक्‍टरांनी मार्ग सोडला नाही. प्रगती प्रतिष्ठान ते जनकल्याण चेन ऑफ ब्लड बॅंक्‍स या त्यांच्या प्रवासात अनेक वळणं आली. प्रत्येक वळणावर संस्कारांची साथ, सोबत्यांचा विश्‍वास आणि घरच्यांचं पाठबळ त्यांच्यासोबत होते. संघाची प्रेरणा देवदुर्लभ कार्यकर्त्यांना कसं घडवते यचंच हे उदाहरण. अवघ्या तीन वर्षांसाठी मोखाड्यासारख्या वनवासीबहुल भागात गेलेले डॉक्‍टर त्यानंतर त्या कामात असे रमले, की त्यांनी संघाच्या अनेक सेवा प्रकल्पांच्या पायाभरणीत आणि उभारणीत मोठं योगदान दिलं. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी याच प्रकारच्या कामांसाठी दिला. म्हटलं तर अवघी हयात त्यांनी सेवाकार्याला दिली. त्यांनी आरोग्यरक्षकांची फळी उभी केली, वनवासी आणि ग्रामीणांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी खटाटोप केला, रुग्णांनाच नव्हे, तर त्यांच्या नातेवाइकांनाही सेवा दिली, रक्तदानाची चळवळ उभी केली, कुपोषणावर काम केले... हे त्यांच्या कामाचे फक्त ठळक टप्पे आहेत. डॉक्‍टरांचा हा नेत्रदीपक आणि प्रेरणादायी प्रवास नेमका झाला कसा हे मुळातून समजून घ्यायचं असेल तर नव्यानं वैद्यक व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांनी आणि प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यानं ‘अनंता’नुभव हे पुस्तक तपशिलानं वाचलं पाहिजे. सामाजिक काम म्हणजे फक्त मलमपट्टी नसते; त्यासाठी समाजात समरस होऊन जावं लागतं, त्यांच्यासारखं जगावं लागतं, हे त्यांना या पुस्तकातून कळेल. मी स्वतः ‘अनंता’नुभव वाचताना अक्षरशः भारावून गेलो आणि डॉ. कुलकर्णी यांच्या सेवाकार्यातील अनुभवांच्या अथांग सागराला मनापासून नमस्कार केला. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी डॉक्‍टरांच्या अनुभवांचे अत्यंत सार्थ असे शब्दांकन केलेले आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो. ‘अनंता’नुभव वाचताना मला सारखी आठवण येत होती ती कुसुमाग्रजांच्या एका कवितेची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ची.  सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ‘मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा... चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला. या ओळीतून या पुस्तकाची आणि डॉ. कुलकर्णी यांच्या कामाची कल्पना येईल .  अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा,                   किनारा तुला पामराला...’       ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3uo79N1

No comments:

Post a Comment