पुणे प्रशासनाच्या हालचालींना वेग; खासगी रुग्णालयांतील बेड्सची संख्या वाढणार पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुरेसे बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षी कोरोनाची गंभीर स्थिती असताना १३ ऑक्टोबर रोजी खासगी रुग्णालयांकडून उपलब्ध झालेल्या बेड्सची संख्या दोन हजार १३४ होती. येत्या सहा एप्रिलपर्यंत तेवढे बेड्स खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.  विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी (ता.१) खासगी रुग्णालयांच्या पदाधिकारी आणि डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासगी रुग्णालयांकडून बेड्स उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले. गुरुवारच्या बैठकीत खासगी रुग्णालयांनी २७५ बेड्स देण्याचे मान्य केले. येत्या तीन आणि सहा एप्रिल रोजी आणखी पाचशे बेड्स उपलब्ध होणार आहेत.  ससून रुग्णालयातही आज ३० बेड्स वाढविण्यात आले आहेत. ससूनमध्ये शुक्रवारी आणखी शंभर बेड्स वाढविण्यात येणार आहेत. तसेच, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून सहाशे बेड्सचे स्वतंत्र कोविड रुग्णालय उपलब्ध होणार असल्याचे राव यांनी सांगितले.  - पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, जिल्हाधिकारी पोहोचले ऑक्सिजन उत्पादक कंपनीत​ खासगी रुग्णालयही चालविण्याची तयारी  ज्या खासगी रुग्णालयांना बेड्स देण्यासाठी अडचणी आहेत किंवा त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, अशी खासगी रुग्णालये प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात येतील. सध्या प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे, असे विभागीय आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.  - ६ बँका झाल्या इतिहासजमा; जाणून घ्या सविस्तर माहिती खासगी रुग्णालयातील बेड॒सची संख्या (एक एप्रिल २०२१ पर्यंत)  एकूण बेड्स - १ हजार ४२३  ऑक्सिजनविरहीत बेड्स - २५५  ऑक्सिजन बेड्स - ९७२  आयसीयू बेड्स - ६७  आयसीयू बेड्स व्हेंटिलेटरसह - १२९  - पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 1, 2021

पुणे प्रशासनाच्या हालचालींना वेग; खासगी रुग्णालयांतील बेड्सची संख्या वाढणार पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुरेसे बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षी कोरोनाची गंभीर स्थिती असताना १३ ऑक्टोबर रोजी खासगी रुग्णालयांकडून उपलब्ध झालेल्या बेड्सची संख्या दोन हजार १३४ होती. येत्या सहा एप्रिलपर्यंत तेवढे बेड्स खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.  विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी (ता.१) खासगी रुग्णालयांच्या पदाधिकारी आणि डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासगी रुग्णालयांकडून बेड्स उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले. गुरुवारच्या बैठकीत खासगी रुग्णालयांनी २७५ बेड्स देण्याचे मान्य केले. येत्या तीन आणि सहा एप्रिल रोजी आणखी पाचशे बेड्स उपलब्ध होणार आहेत.  ससून रुग्णालयातही आज ३० बेड्स वाढविण्यात आले आहेत. ससूनमध्ये शुक्रवारी आणखी शंभर बेड्स वाढविण्यात येणार आहेत. तसेच, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून सहाशे बेड्सचे स्वतंत्र कोविड रुग्णालय उपलब्ध होणार असल्याचे राव यांनी सांगितले.  - पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, जिल्हाधिकारी पोहोचले ऑक्सिजन उत्पादक कंपनीत​ खासगी रुग्णालयही चालविण्याची तयारी  ज्या खासगी रुग्णालयांना बेड्स देण्यासाठी अडचणी आहेत किंवा त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, अशी खासगी रुग्णालये प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात येतील. सध्या प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे, असे विभागीय आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.  - ६ बँका झाल्या इतिहासजमा; जाणून घ्या सविस्तर माहिती खासगी रुग्णालयातील बेड॒सची संख्या (एक एप्रिल २०२१ पर्यंत)  एकूण बेड्स - १ हजार ४२३  ऑक्सिजनविरहीत बेड्स - २५५  ऑक्सिजन बेड्स - ९७२  आयसीयू बेड्स - ६७  आयसीयू बेड्स व्हेंटिलेटरसह - १२९  - पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/31EpXeH

No comments:

Post a Comment