सिंधुदुर्गात 317 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात कोरोनाची दूसरी लाट सुरू झाली आहे. परिणामी रूग्णसंख्या दिवसागणिक वाढत चाललेली दिसून येत आहे. तरीही जिल्ह्यातील 741 पैकी 317 गावांनी कोरोनाला गावात शिरकाव करु दिलेला नाही. 424 गावात मात्र कोरोना रुग्ण आढळले आहेत.  कोरोनामुळे मृत्यूची टक्केवारी देखील 2.7 टक्के एवढी आहे. जिल्ह्यात कोरोना झपाट्याने पसरत असला तरी अजूनही 317 गावांनी कोरोनाला वेशिवरच रोखले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अहवालावरून समोर आली आहे. उरलेली 424 गावे ही कोरोना बाधित झाली आहे. बाहेर फिरताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन यामुळे आम्ही कोरोनाला आम्ही गावात येऊ दिले नसल्याची प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी दिली आहे.  26 मार्च 2020 ला जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. कणकवली तालुक्‍यातील नडगिवे गावातील हा तरुण होता. लॉकडाउनच्या काळात मुंबईहुन गावी येत असताना प्रवासादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची वर्षपूर्ती देखील झाली आहे. या दरम्यान जिल्ह्यातील 741 गावांचा आढावा घेतला असता निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 424 गावात कोरोना पोचला असल्याचे समोर आले आहे. 317 गावांनी कोरोनाला आपल्या गावात प्रवेश करू दिला नाही.  जिल्ह्यात सध्या 843 सक्रीय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णासंख्येत घट होत नाही. दिवसागणिक हा आकडा वाढताना दिसून येत आहे. मार्चमध्ये रूग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. प्रतिदिन 70 ते 80 रुग्ण सापडत आहेत. अजूनपर्यंत 7754 रुग्ण आढळले आहेत. 193 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढ व मृत्यूसंख्येमध्ये कणकवली तालुका सर्वांत पुढे आहे. या तालुक्‍यातील संख्या 50 आहे. त्यानंतर मृत्यूसंख्येत देवगडमध्ये 15, दोडामार्गमध्ये 5, कुडाळ 36, मालवण 20, सावंतवाडी 44, वैभववाडी 12, वेंगुर्ले 10, परजिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.  जिल्ह्यातील स्थिती  - वर्षभरात 741 पैकी 424 गावांत कोरोना  - काही गावांत एक तर काही गावांत जास्त रुग्ण  - कित्येकांचा जीव गेला  - गंभीर आजारग्रस्त, वयोवृद्धांना जास्त फटका  - तालुकावार बाधित गावे ः वैभववाडी - 28, कणकवली - 67 , देवगड 57, मालवण 62, कुडाळ 62, वेंगुर्ले 37, सावंतवाडी 69, दोडामार्ग 42.  नियम पाळणे सर्वोत्तम पर्याय  कोरोनाचा प्रसार जरी झपाट्याने वाढत असला तरी जिल्ह्यातील अद्यापही 317 गावांमध्ये कोरोनाला प्रवेश दिला नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. येथील आरोग्य कर्मचारी, सरपंच, ग्रामस्थ यांच्या प्रयत्नांमुळे कोरोना या गावच्या वेशिवरच थांबवले आहे. येथील काही ग्रामस्थांशी चर्चा केली असता ते म्हणाले, की लॉकडाउन काळात आमच्या गावातही चाकरमानी आले होते. आम्हीही मोठ्या शहरांमध्ये खरेदी किंवा इतर कामांसाठी जातो, मात्र शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. परिणामी कोरोना संसर्ग रोखला गेला.  जिल्ह्यात कोरोनाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या काळात ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाला दूर ठेवले आहे. याचे सर्व श्रेय येथील ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धा यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधींना जाते.  - राधा वरवडेकर, सरपंच, आंबडोस, (ता.मालवण)  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 9, 2021

सिंधुदुर्गात 317 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात कोरोनाची दूसरी लाट सुरू झाली आहे. परिणामी रूग्णसंख्या दिवसागणिक वाढत चाललेली दिसून येत आहे. तरीही जिल्ह्यातील 741 पैकी 317 गावांनी कोरोनाला गावात शिरकाव करु दिलेला नाही. 424 गावात मात्र कोरोना रुग्ण आढळले आहेत.  कोरोनामुळे मृत्यूची टक्केवारी देखील 2.7 टक्के एवढी आहे. जिल्ह्यात कोरोना झपाट्याने पसरत असला तरी अजूनही 317 गावांनी कोरोनाला वेशिवरच रोखले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अहवालावरून समोर आली आहे. उरलेली 424 गावे ही कोरोना बाधित झाली आहे. बाहेर फिरताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन यामुळे आम्ही कोरोनाला आम्ही गावात येऊ दिले नसल्याची प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी दिली आहे.  26 मार्च 2020 ला जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. कणकवली तालुक्‍यातील नडगिवे गावातील हा तरुण होता. लॉकडाउनच्या काळात मुंबईहुन गावी येत असताना प्रवासादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची वर्षपूर्ती देखील झाली आहे. या दरम्यान जिल्ह्यातील 741 गावांचा आढावा घेतला असता निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 424 गावात कोरोना पोचला असल्याचे समोर आले आहे. 317 गावांनी कोरोनाला आपल्या गावात प्रवेश करू दिला नाही.  जिल्ह्यात सध्या 843 सक्रीय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णासंख्येत घट होत नाही. दिवसागणिक हा आकडा वाढताना दिसून येत आहे. मार्चमध्ये रूग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. प्रतिदिन 70 ते 80 रुग्ण सापडत आहेत. अजूनपर्यंत 7754 रुग्ण आढळले आहेत. 193 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढ व मृत्यूसंख्येमध्ये कणकवली तालुका सर्वांत पुढे आहे. या तालुक्‍यातील संख्या 50 आहे. त्यानंतर मृत्यूसंख्येत देवगडमध्ये 15, दोडामार्गमध्ये 5, कुडाळ 36, मालवण 20, सावंतवाडी 44, वैभववाडी 12, वेंगुर्ले 10, परजिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.  जिल्ह्यातील स्थिती  - वर्षभरात 741 पैकी 424 गावांत कोरोना  - काही गावांत एक तर काही गावांत जास्त रुग्ण  - कित्येकांचा जीव गेला  - गंभीर आजारग्रस्त, वयोवृद्धांना जास्त फटका  - तालुकावार बाधित गावे ः वैभववाडी - 28, कणकवली - 67 , देवगड 57, मालवण 62, कुडाळ 62, वेंगुर्ले 37, सावंतवाडी 69, दोडामार्ग 42.  नियम पाळणे सर्वोत्तम पर्याय  कोरोनाचा प्रसार जरी झपाट्याने वाढत असला तरी जिल्ह्यातील अद्यापही 317 गावांमध्ये कोरोनाला प्रवेश दिला नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. येथील आरोग्य कर्मचारी, सरपंच, ग्रामस्थ यांच्या प्रयत्नांमुळे कोरोना या गावच्या वेशिवरच थांबवले आहे. येथील काही ग्रामस्थांशी चर्चा केली असता ते म्हणाले, की लॉकडाउन काळात आमच्या गावातही चाकरमानी आले होते. आम्हीही मोठ्या शहरांमध्ये खरेदी किंवा इतर कामांसाठी जातो, मात्र शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. परिणामी कोरोना संसर्ग रोखला गेला.  जिल्ह्यात कोरोनाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या काळात ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाला दूर ठेवले आहे. याचे सर्व श्रेय येथील ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धा यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधींना जाते.  - राधा वरवडेकर, सरपंच, आंबडोस, (ता.मालवण)  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3t5Tief

No comments:

Post a Comment