जिल्हा बॅंकेसह सर्व निवडणुका पुढे  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा बॅंकेसह जिल्ह्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सलग सातव्यावेळी राज्य शासनाने हा निर्णय घेतला. पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याने चक्क पाच महिन्यांसाठी 31 ऑगस्टपर्यंत या निवडणुका पुढे नेण्यात आल्या आहेत.  कोरोना संक्रमणामुळे 18 मार्च 2020 पासून सलग सहा वेळा मुदतवाढ मिळत 31 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या निर्णय राज्य शासनाने 2 फेब्रूवारी रोजी जाहीर केला होता. त्यामुळे मुदतवाढ मिळालेल्या संस्थासह 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे पावणे आठशे सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. यात जिल्हा बॅंकेसह, कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघ, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक पतपेढी, जिल्हा परिषद कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, देवगड अर्बन बॅंक आदी महत्वाच्या सहकारी संस्थांचा समावेश आहे.  2020 मध्ये कोरोनाने हाहाकार माजविला होता. परिणामी पूर्ण जग थांबले होते. माणसे माणसांना भेटू शकत नव्हती. त्यामुळे राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला होता. 18 मार्च 2020ला आदेश काढत 17 जून 2020 पर्यंत निवडणूक प्रक्रिया आहे, त्या टप्प्यात थांबविण्याचे आदेश देत मुदत संपणाऱ्या सर्व सहकारी संस्थांना मुदतवाढ दिली. त्यानंतर 17 जूननंतर पुन्हा आदेश काढत 16 सप्टेंबर मुदतवाढ केली. 28 सप्टेंबरला तिसऱ्या वेळी आदेश काढत 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली; परंतु 12 जानेवारीला चौथा आदेश काढत मुदतवाढ दिलेल्या 2020 मधील सर्व सहकारी संस्था व 2021 मधील मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली होती; मात्र अवघ्या पाचव्या दिवशी राज्य शासनाने पुन्हा आदेश काढत 31 मार्चपर्यंत मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या सर्व सहकारी संस्थांना मुदतवाढ दिली; मात्र शासनाने 2 फेब्रुवारीला पुन्हा सहावा आदेश काढत स्थगिती दिलेल्या सहकारी संस्था व मुदत संपणाऱ्या सहकारी संस्था निवडणुका घेण्याचे नव्याने आदेश दिले होते. यामुळे अखेर जिल्ह्यातील सहकारी संस्थाचे 10 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले निवडणूक बिगुल वाजण्याचे निश्‍चित झाले होते. त्यानंतर शासनाने पुन्हा आदेश काढत 15 फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिली होती.  संस्था संचालकांना मुदतवाढ  कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिलेले आदेश स्थगित करत शासनाने पुन्हा 31 मार्चला मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थाच्या संचालकांना मुदतवाढ दिली आहे. आज 6 एप्रिलला शासनाने सातव्या वेळी आदेश काढत सहकारी संस्था निवडणुका सहा महिन्यासाठी स्थगित केल्या आहेत.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 6, 2021

जिल्हा बॅंकेसह सर्व निवडणुका पुढे  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा बॅंकेसह जिल्ह्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सलग सातव्यावेळी राज्य शासनाने हा निर्णय घेतला. पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याने चक्क पाच महिन्यांसाठी 31 ऑगस्टपर्यंत या निवडणुका पुढे नेण्यात आल्या आहेत.  कोरोना संक्रमणामुळे 18 मार्च 2020 पासून सलग सहा वेळा मुदतवाढ मिळत 31 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या निर्णय राज्य शासनाने 2 फेब्रूवारी रोजी जाहीर केला होता. त्यामुळे मुदतवाढ मिळालेल्या संस्थासह 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे पावणे आठशे सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. यात जिल्हा बॅंकेसह, कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघ, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक पतपेढी, जिल्हा परिषद कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, देवगड अर्बन बॅंक आदी महत्वाच्या सहकारी संस्थांचा समावेश आहे.  2020 मध्ये कोरोनाने हाहाकार माजविला होता. परिणामी पूर्ण जग थांबले होते. माणसे माणसांना भेटू शकत नव्हती. त्यामुळे राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला होता. 18 मार्च 2020ला आदेश काढत 17 जून 2020 पर्यंत निवडणूक प्रक्रिया आहे, त्या टप्प्यात थांबविण्याचे आदेश देत मुदत संपणाऱ्या सर्व सहकारी संस्थांना मुदतवाढ दिली. त्यानंतर 17 जूननंतर पुन्हा आदेश काढत 16 सप्टेंबर मुदतवाढ केली. 28 सप्टेंबरला तिसऱ्या वेळी आदेश काढत 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली; परंतु 12 जानेवारीला चौथा आदेश काढत मुदतवाढ दिलेल्या 2020 मधील सर्व सहकारी संस्था व 2021 मधील मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली होती; मात्र अवघ्या पाचव्या दिवशी राज्य शासनाने पुन्हा आदेश काढत 31 मार्चपर्यंत मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या सर्व सहकारी संस्थांना मुदतवाढ दिली; मात्र शासनाने 2 फेब्रुवारीला पुन्हा सहावा आदेश काढत स्थगिती दिलेल्या सहकारी संस्था व मुदत संपणाऱ्या सहकारी संस्था निवडणुका घेण्याचे नव्याने आदेश दिले होते. यामुळे अखेर जिल्ह्यातील सहकारी संस्थाचे 10 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले निवडणूक बिगुल वाजण्याचे निश्‍चित झाले होते. त्यानंतर शासनाने पुन्हा आदेश काढत 15 फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिली होती.  संस्था संचालकांना मुदतवाढ  कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिलेले आदेश स्थगित करत शासनाने पुन्हा 31 मार्चला मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थाच्या संचालकांना मुदतवाढ दिली आहे. आज 6 एप्रिलला शासनाने सातव्या वेळी आदेश काढत सहकारी संस्था निवडणुका सहा महिन्यासाठी स्थगित केल्या आहेत.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rTY399

No comments:

Post a Comment