MPSC परीक्षेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी  पुणे - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रविवारी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे म्हणाल्या, जिल्ह्यात ७७ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, या परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सुमारे ३१ हजार उमेदवार असतील. केंद्रांवर नेमलेल्या सुमारे दोन हजार सातशे कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेच्या केंद्रांवर या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या चाचण्या शनिवारी दुपारपर्यंत पूर्ण करण्यात येतील. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडून उमेदवारांच्या शरीराचे तापमान तपासून सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आरटीपीसीआर चाचणीत काही कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यास अडचण येऊ नये, यासाठी राखीव कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर २० ते ३० कर्मचारी असतील. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची केंद्रप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गात बैठक व्यवस्था नेहमीप्रमाणे असेल. त्यानुसार एका वर्गात कमीत कमी १२ आणि जास्तीत जास्त २४ उमेदवार असतील, असे डॉ. कटारे यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 19, 2021

MPSC परीक्षेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी  पुणे - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रविवारी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे म्हणाल्या, जिल्ह्यात ७७ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, या परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सुमारे ३१ हजार उमेदवार असतील. केंद्रांवर नेमलेल्या सुमारे दोन हजार सातशे कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेच्या केंद्रांवर या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या चाचण्या शनिवारी दुपारपर्यंत पूर्ण करण्यात येतील. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडून उमेदवारांच्या शरीराचे तापमान तपासून सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आरटीपीसीआर चाचणीत काही कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यास अडचण येऊ नये, यासाठी राखीव कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर २० ते ३० कर्मचारी असतील. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची केंद्रप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गात बैठक व्यवस्था नेहमीप्रमाणे असेल. त्यानुसार एका वर्गात कमीत कमी १२ आणि जास्तीत जास्त २४ उमेदवार असतील, असे डॉ. कटारे यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3qXlcHu

No comments:

Post a Comment