बंगालच्या जनतेचा कल ममता दीदींकडेच; तमिळनाडू, पुदुच्चेरीत सत्तांतर शक्य नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, मात्र त्याआधीच भाजप, काँग्रेससह संबंधित सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचे बिगूल फुंकले होते. त्यामुळे तापलेल्या राजकीय वातावरणात आता प्रचाराला वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर जनतेचा कल जाणून घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ‘एबीपी न्यूज - सी व्होटर’ने या पाचही प्रदेशांमध्ये घेतलेल्या मतदानपूर्व कलचाचणी घेतली आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा या कलचाचणीमध्ये, सर्वाधिक चर्चा असलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्याच हातात सत्ता जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या राज्यात भाजपच्याही जागा वाढण्याची शक्यता सर्वेक्षणातून दिसून आली आहे. २०११ नंतर राज्यात बिकट स्थिती असलेले डावे पक्ष आणि अद्यापही अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत असलेला काँग्रेस पक्ष यांना आघाडी करूनही फारसे यश मिळणार नसल्याचा अंदाज आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय घडामोडींमुळे बंगालनंतर सर्वाधिक लक्ष तमिळनाडूकडे असेल. अण्णा द्रमुकच्या जे. जयललिता आणि द्रमुकचे एम. करुणानिधी या दोन दिग्गज नेत्यांचे निधन झाल्याने एकमेकांचे प्रमुख विरोधी असलेले हे पक्ष जनाधार शोधत आहेत. अनेक वर्षे वर्चस्व गाजविलेल्या या दोघांच्या निधनानंतरही ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. द्रमुकचे विद्यमान अध्यक्ष एम. स्टॅलिन यांनी पक्षावर पकड मिळवत जोरदार आघाडी घेतली आहे, तर प्रमुख चेहराच उरला नसल्याने अण्णा द्रमुकला मात्र भाजपचा आधार घ्यावा लागला आहे. रजनीकांत यांनी माघार घेतली असली तरी निवडणुकीच्या तोंडावर जयललिता यांच्या सहकारी शशिकला यांची तुरुंगातून सुटका झाली असून त्याचाही येथील राजकारणावर परिणाम होऊ शकतो. कलचाचणीनुसार, राज्यातील अण्णा द्रमुकची सत्ता जाऊन स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अनेक राज्यांतून हद्दपार झालेल्या डाव्यांसाठी केरळमध्ये विजय मिळण्याचा अंदाज आहे. येथे सध्या माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफचे सरकार आहे. काँग्रेसप्रणीत यूडीएफच्या पदरात फार जागा पडण्याची चिन्हे नाहीत.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 28, 2021

बंगालच्या जनतेचा कल ममता दीदींकडेच; तमिळनाडू, पुदुच्चेरीत सत्तांतर शक्य नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, मात्र त्याआधीच भाजप, काँग्रेससह संबंधित सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचे बिगूल फुंकले होते. त्यामुळे तापलेल्या राजकीय वातावरणात आता प्रचाराला वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर जनतेचा कल जाणून घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ‘एबीपी न्यूज - सी व्होटर’ने या पाचही प्रदेशांमध्ये घेतलेल्या मतदानपूर्व कलचाचणी घेतली आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा या कलचाचणीमध्ये, सर्वाधिक चर्चा असलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्याच हातात सत्ता जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या राज्यात भाजपच्याही जागा वाढण्याची शक्यता सर्वेक्षणातून दिसून आली आहे. २०११ नंतर राज्यात बिकट स्थिती असलेले डावे पक्ष आणि अद्यापही अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत असलेला काँग्रेस पक्ष यांना आघाडी करूनही फारसे यश मिळणार नसल्याचा अंदाज आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय घडामोडींमुळे बंगालनंतर सर्वाधिक लक्ष तमिळनाडूकडे असेल. अण्णा द्रमुकच्या जे. जयललिता आणि द्रमुकचे एम. करुणानिधी या दोन दिग्गज नेत्यांचे निधन झाल्याने एकमेकांचे प्रमुख विरोधी असलेले हे पक्ष जनाधार शोधत आहेत. अनेक वर्षे वर्चस्व गाजविलेल्या या दोघांच्या निधनानंतरही ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. द्रमुकचे विद्यमान अध्यक्ष एम. स्टॅलिन यांनी पक्षावर पकड मिळवत जोरदार आघाडी घेतली आहे, तर प्रमुख चेहराच उरला नसल्याने अण्णा द्रमुकला मात्र भाजपचा आधार घ्यावा लागला आहे. रजनीकांत यांनी माघार घेतली असली तरी निवडणुकीच्या तोंडावर जयललिता यांच्या सहकारी शशिकला यांची तुरुंगातून सुटका झाली असून त्याचाही येथील राजकारणावर परिणाम होऊ शकतो. कलचाचणीनुसार, राज्यातील अण्णा द्रमुकची सत्ता जाऊन स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अनेक राज्यांतून हद्दपार झालेल्या डाव्यांसाठी केरळमध्ये विजय मिळण्याचा अंदाज आहे. येथे सध्या माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफचे सरकार आहे. काँग्रेसप्रणीत यूडीएफच्या पदरात फार जागा पडण्याची चिन्हे नाहीत.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3uGiTeT

No comments:

Post a Comment