भुरट्या चोरट्यांमुळे कारखाना परिसरात घबराट माधवनगर : मध्यरात्री दुकानाच्या दारावर कसली तरी खडबड ऐकू आली आणि शेजाऱ्यांना जाग आली. दोन तीन जण दुकान फोडत असल्याचे दिसल्यावर माणसं सावध झाली. मोबाईलवून निरोप गेले आणि मग अंधारात पाठलाग करुन लोकांनी चोरांना पकडलं. एक सापडला तर दोघं पळाली..हा असा थरात पंचशीलनगरमध्ये नेहमीचा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंचशीलनगर, साखर कारखाना परिसरात फरफोड्यांनी धुमाकूळ घातला आहे. भुरट्या चोरांमुळे साऱ्या परिसरात घबराट पसरली आहे.  रविवारी रात्री पंचशीलनगर चौकातच असलेल्या बबन शिंदे यांचे दुकान चोरट्यांनी फोडले. या अगोदर याच चौकातील अतुल खाडे यांचेही दुकान दोनदा फोडले होते. एका औषध दुकानावरही चोरट्यांनी डल्ला मारला होता. साखर कारखाना परिसरातील रस्त्यावरच असलेल्या बेकरीतही शटर उचकटून चोर शिरले होते. इतकेच नाही तर देशी दारुचे दुकानही चोरट्यांनी सोडले नाही. मध्यरात्रीनंतर या भागात चोरट्यांचा वावर जाणवतो. दोन तीन जणांच्या टोळ्या दुकानांची शटर उचकटून हातोहात चोऱ्या करत असल्याचे नागरीक सांगतात.  साखर कारखाना परिसर, शिवाजी हौसिंग सोसायटी, गोसावी गल्ली, पंचशीलनगर ते जुना बुधगाव रोडपर्यंतचा भाग चोऱ्यांमुळे हैराण झाला आहे. नागरीकांनीच गस्त घालायची तर कुठंवर घालायची? कोणी घालायची असा सवाल असताना पोलीस यंत्रणा काय करते असाही सवाल नागरीक करत आहेत. या भागात सिसीटीव्ही बसवावेत, रोज रात्री पोलीसांनी गस्त घालावी अशी मागणी होत आहे.  जुना बुधगाव रोडवर दहशत  जुन्या बुधगाव रोडवर गेल्या काही दिवसांपासून रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्यांना लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत. रात्री हा रस्ता निर्मनुष्य असतो. बायपास रोडपासून ते पंचशीलनगर चौकापर्यंतचा रस्ता याबाबतीत धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर पोलीस गस्त पथकाचे केंद्र सुरु करावे अशी मागणी होत आहे.  पंचशीलनगर, साखर कारखाना परिसरामध्ये किराणा, मेडीकल, बेकरी आणि बरीच दुकाने आहेत. याशिवाय ही वस्ती उच्चभ्रू लोकांची आहे. या भागात गेल्या काही महिन्यांपासून सतत चोऱ्या होत आहेत आणि चोरटे हाताला लागत नाहीत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांनी याबाबत तात्काळ उपयायोजना करावी.  - महेश शिंदे, सचिन माळी. (किराणा दुकानदार)     संपादन : प्रफुल्ल सुतार  सांगली  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 1, 2021

भुरट्या चोरट्यांमुळे कारखाना परिसरात घबराट माधवनगर : मध्यरात्री दुकानाच्या दारावर कसली तरी खडबड ऐकू आली आणि शेजाऱ्यांना जाग आली. दोन तीन जण दुकान फोडत असल्याचे दिसल्यावर माणसं सावध झाली. मोबाईलवून निरोप गेले आणि मग अंधारात पाठलाग करुन लोकांनी चोरांना पकडलं. एक सापडला तर दोघं पळाली..हा असा थरात पंचशीलनगरमध्ये नेहमीचा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंचशीलनगर, साखर कारखाना परिसरात फरफोड्यांनी धुमाकूळ घातला आहे. भुरट्या चोरांमुळे साऱ्या परिसरात घबराट पसरली आहे.  रविवारी रात्री पंचशीलनगर चौकातच असलेल्या बबन शिंदे यांचे दुकान चोरट्यांनी फोडले. या अगोदर याच चौकातील अतुल खाडे यांचेही दुकान दोनदा फोडले होते. एका औषध दुकानावरही चोरट्यांनी डल्ला मारला होता. साखर कारखाना परिसरातील रस्त्यावरच असलेल्या बेकरीतही शटर उचकटून चोर शिरले होते. इतकेच नाही तर देशी दारुचे दुकानही चोरट्यांनी सोडले नाही. मध्यरात्रीनंतर या भागात चोरट्यांचा वावर जाणवतो. दोन तीन जणांच्या टोळ्या दुकानांची शटर उचकटून हातोहात चोऱ्या करत असल्याचे नागरीक सांगतात.  साखर कारखाना परिसर, शिवाजी हौसिंग सोसायटी, गोसावी गल्ली, पंचशीलनगर ते जुना बुधगाव रोडपर्यंतचा भाग चोऱ्यांमुळे हैराण झाला आहे. नागरीकांनीच गस्त घालायची तर कुठंवर घालायची? कोणी घालायची असा सवाल असताना पोलीस यंत्रणा काय करते असाही सवाल नागरीक करत आहेत. या भागात सिसीटीव्ही बसवावेत, रोज रात्री पोलीसांनी गस्त घालावी अशी मागणी होत आहे.  जुना बुधगाव रोडवर दहशत  जुन्या बुधगाव रोडवर गेल्या काही दिवसांपासून रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्यांना लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत. रात्री हा रस्ता निर्मनुष्य असतो. बायपास रोडपासून ते पंचशीलनगर चौकापर्यंतचा रस्ता याबाबतीत धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर पोलीस गस्त पथकाचे केंद्र सुरु करावे अशी मागणी होत आहे.  पंचशीलनगर, साखर कारखाना परिसरामध्ये किराणा, मेडीकल, बेकरी आणि बरीच दुकाने आहेत. याशिवाय ही वस्ती उच्चभ्रू लोकांची आहे. या भागात गेल्या काही महिन्यांपासून सतत चोऱ्या होत आहेत आणि चोरटे हाताला लागत नाहीत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांनी याबाबत तात्काळ उपयायोजना करावी.  - महेश शिंदे, सचिन माळी. (किराणा दुकानदार)     संपादन : प्रफुल्ल सुतार  सांगली  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3atsqg0

No comments:

Post a Comment