संकेश्‍वर-बांदा महामार्ग सावंतवाडीतूनच न्यावा, बैठकीत एकमत  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - संकेश्‍वर बांदा हा पहिल्या टप्प्यातील राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून प्रस्तावित असलेल्या रिंग रोडमार्गे जावा, असे एकमत आज पालिकेत पार पडलेल्या आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीतील बैठकीत झाले. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी आवश्‍यक असलेले 40 कोटी रुपये उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासनही केसरकर यांनी यावेळी दिले.  प्रस्तावित रिंग रोड सद्यस्थितीत दोन ठिकाणी तुटलेला आहे. त्या ठिकाणी इमारती उभे करण्यास परमिशन आहे, तर काही लोक रिंग रोड विरोधात कोर्टात गेले आहेत. त्यामुळे या लोकांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे, असे नगराध्यक्ष परब यांनी स्पष्ट केले.  संकेश्‍वर येथून बांदा असा होणारा दोन हजार कोटी रुपयांचा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की बावळाटमार्गे बांदा शहराला जोडणार, याबाबत तर्कवितर्क आहेत. हा महामार्ग सावंतवाडी शहरातूनच जावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे. झाराप-पत्रादेवी बायपास हा शहराबाहेरून गेल्याने आधीच शहराचे मोठे नुकसान झाल्याने संकेश्‍वर-बांदा हा महामार्ग शहरातून जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आमदार केसरकर यांनी हा मार्ग शहरातून प्रस्तावित असलेल्या रिंग रोडमार्गे जावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव केला होता. याच पार्श्‍वभूमीवर श्री. केसरकर यांनी आज येथील पालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांसोबत बैठक घेतली.  यावेळी व्यापारी वर्गासह नगराध्यक्ष परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, उदय नाईक, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, दीपाली सावंत, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते.  बैठकीच्या सुरुवातीला भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले यांनी आमदार केसरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत केसरकर म्हणाले, ""संकेश्‍वर ते बांदा या राष्ट्रीय महामार्गाचे शहरातील बुर्डी पुलापर्यंत डीपीआर पूर्ण झाला आहे. त्यानंतर बुर्डी पूल ते रेडी या दुसऱ्या टप्प्याचे डीपीआर होणार आहे. मात्र, संकेश्‍वर ते बांदा जाणारा हा मार्ग शहराबाहेरून गेलेल्या रिंग रोड मार्गे जावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्‍यक भूसंपादन पालिकेने करून जागा ताब्यात घ्यावी. त्यासाठी लागणारे 40 कोटी रुपये मी उपलब्ध करून देतो.''  यावर नगराध्यक्ष परब म्हणाले, ""प्रस्तावित रिंग रोड सद्यस्थितीत दोन ठिकाणी तुटलेला आहे. त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्याठिकाणी घरे बांधण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या दोन ठिकाणचा रोड जोडणे आवश्‍यक आहे. हा मार्ग शहरातूनच गेला पाहिजे, असे आमचे मत आहे. त्यात कुठलेही राजकारण होणार नाही; मात्र जे कोण न्यायालयात गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा होणे आवश्‍यक आहे. ते लोक तयार असल्यास हे काम होऊ शकते.'' त्या लोकांची लवकरच बैठक बोलावून घ्या व त्याचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांची समजूत घालून तसेच टीडीआर माध्यमातून भरपाई दिल्यास ते ऐकून घेणार का? ते पहा. आवश्‍यक असल्यास मी या बैठकीला उपस्थित राहीन, अशा सूचना मुख्याधिकारी यांना दिल्या. महामार्ग हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यात कुठलाही वादाचा विषय होता कामा नये. काही लोक हा महामार्ग दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग रूपांतर होऊ शकते. त्यामुळे अन्य कुठल्याही मार्गाने हा महामार्ग होणार नाही, असेही श्री. केसरकर म्हणाले. यावेळी शहरातील विविध विषय केसरकर यांनी जाणून घेतले. यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष गोंदावळे, पुंडलिक दळवी, अमित परब, साई हवालदार, जितेंद्र पंडित, डी. के. सावंत, राजू लाड, ऋषिकेश वाडकर, संजू शिरोडकर, संदेश परब, संजू विरनोडकर आदी उपस्थित होते.  जनआंदोलनाचा इशारा  यावेळी बुर्डी पूल ते रेडी हा मार्ग कसा बसणार? असा प्रश्‍न हेमंत मराठे यांनी केला. हा मार्ग बांद्यापासून मडूरा-तळवणेमार्गे-आरोंदा असा नेण्याचा घाट आहे. असे झाल्यास मळगाव, निरवडे, न्हावेली, मळेवाड ही गावे विकासापासून दूर राहणार आहेत. यासाठी संबंधित गावातील लोकांना घेऊन जनआंदोलन करू. त्यामुळे हा मार्ग निरवडे-मळेवाड असा होण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 1, 2021

संकेश्‍वर-बांदा महामार्ग सावंतवाडीतूनच न्यावा, बैठकीत एकमत  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - संकेश्‍वर बांदा हा पहिल्या टप्प्यातील राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून प्रस्तावित असलेल्या रिंग रोडमार्गे जावा, असे एकमत आज पालिकेत पार पडलेल्या आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीतील बैठकीत झाले. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी आवश्‍यक असलेले 40 कोटी रुपये उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासनही केसरकर यांनी यावेळी दिले.  प्रस्तावित रिंग रोड सद्यस्थितीत दोन ठिकाणी तुटलेला आहे. त्या ठिकाणी इमारती उभे करण्यास परमिशन आहे, तर काही लोक रिंग रोड विरोधात कोर्टात गेले आहेत. त्यामुळे या लोकांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे, असे नगराध्यक्ष परब यांनी स्पष्ट केले.  संकेश्‍वर येथून बांदा असा होणारा दोन हजार कोटी रुपयांचा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की बावळाटमार्गे बांदा शहराला जोडणार, याबाबत तर्कवितर्क आहेत. हा महामार्ग सावंतवाडी शहरातूनच जावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे. झाराप-पत्रादेवी बायपास हा शहराबाहेरून गेल्याने आधीच शहराचे मोठे नुकसान झाल्याने संकेश्‍वर-बांदा हा महामार्ग शहरातून जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आमदार केसरकर यांनी हा मार्ग शहरातून प्रस्तावित असलेल्या रिंग रोडमार्गे जावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव केला होता. याच पार्श्‍वभूमीवर श्री. केसरकर यांनी आज येथील पालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांसोबत बैठक घेतली.  यावेळी व्यापारी वर्गासह नगराध्यक्ष परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, उदय नाईक, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, दीपाली सावंत, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते.  बैठकीच्या सुरुवातीला भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले यांनी आमदार केसरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत केसरकर म्हणाले, ""संकेश्‍वर ते बांदा या राष्ट्रीय महामार्गाचे शहरातील बुर्डी पुलापर्यंत डीपीआर पूर्ण झाला आहे. त्यानंतर बुर्डी पूल ते रेडी या दुसऱ्या टप्प्याचे डीपीआर होणार आहे. मात्र, संकेश्‍वर ते बांदा जाणारा हा मार्ग शहराबाहेरून गेलेल्या रिंग रोड मार्गे जावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्‍यक भूसंपादन पालिकेने करून जागा ताब्यात घ्यावी. त्यासाठी लागणारे 40 कोटी रुपये मी उपलब्ध करून देतो.''  यावर नगराध्यक्ष परब म्हणाले, ""प्रस्तावित रिंग रोड सद्यस्थितीत दोन ठिकाणी तुटलेला आहे. त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्याठिकाणी घरे बांधण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या दोन ठिकाणचा रोड जोडणे आवश्‍यक आहे. हा मार्ग शहरातूनच गेला पाहिजे, असे आमचे मत आहे. त्यात कुठलेही राजकारण होणार नाही; मात्र जे कोण न्यायालयात गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा होणे आवश्‍यक आहे. ते लोक तयार असल्यास हे काम होऊ शकते.'' त्या लोकांची लवकरच बैठक बोलावून घ्या व त्याचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांची समजूत घालून तसेच टीडीआर माध्यमातून भरपाई दिल्यास ते ऐकून घेणार का? ते पहा. आवश्‍यक असल्यास मी या बैठकीला उपस्थित राहीन, अशा सूचना मुख्याधिकारी यांना दिल्या. महामार्ग हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यात कुठलाही वादाचा विषय होता कामा नये. काही लोक हा महामार्ग दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग रूपांतर होऊ शकते. त्यामुळे अन्य कुठल्याही मार्गाने हा महामार्ग होणार नाही, असेही श्री. केसरकर म्हणाले. यावेळी शहरातील विविध विषय केसरकर यांनी जाणून घेतले. यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष गोंदावळे, पुंडलिक दळवी, अमित परब, साई हवालदार, जितेंद्र पंडित, डी. के. सावंत, राजू लाड, ऋषिकेश वाडकर, संजू शिरोडकर, संदेश परब, संजू विरनोडकर आदी उपस्थित होते.  जनआंदोलनाचा इशारा  यावेळी बुर्डी पूल ते रेडी हा मार्ग कसा बसणार? असा प्रश्‍न हेमंत मराठे यांनी केला. हा मार्ग बांद्यापासून मडूरा-तळवणेमार्गे-आरोंदा असा नेण्याचा घाट आहे. असे झाल्यास मळगाव, निरवडे, न्हावेली, मळेवाड ही गावे विकासापासून दूर राहणार आहेत. यासाठी संबंधित गावातील लोकांना घेऊन जनआंदोलन करू. त्यामुळे हा मार्ग निरवडे-मळेवाड असा होण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3oFvuee

No comments:

Post a Comment