Unmasking happiness | पोस्टकोव्हिडमध्ये पल्मनरी फायब्रोसिसची चिंता नको!  आजार सावकाशपणे बरा होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत मुंबई  : कोव्हिडचा सर्वाधिक परिणाम होतो तो फुप्फुसावरच. पोस्टकोव्हिडमध्ये फुप्फुसासंबंधी विविध आजार समोर आले आहेत. त्यातही फुप्फुसाच्या पल्मनरी फायब्रोसिसचे प्रमाण जास्त असून अनेक रुग्ण पोस्टकोव्हिड ओपीडीत उपचारांसाठी येत आहेत; मात्र पल्मनरी फायब्रोसिस हा सावकाश बरा होणारा आजार असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञ डॉक्‍टरांनी मांडला आहे. केईएम रुग्णालयात गेल्या महिन्यापर्यंत फायब्रोसिस आणि इतर संबंधित आजारांच्या 104 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून हा आजार बरा होणारा असून त्याबाबत चिंता नसावी, असा निष्कर्ष काढण्यात आला.  कोव्हिडमुळे ऑक्‍सिजन फुप्फुसात घेण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रक्त गोठून तयार होणाऱ्या गुठळ्या होतात. परिणामी फुप्फुसाला जखमा होतात, मात्र पोस्टकोव्हिडमध्ये होणारा फायब्रोसिस हा बरा होणारा आजार असून साधारणत: सहा महिने व्यवस्थित उपचार घेतल्यानंतर फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या श्‍वसनविकार चिकित्सा विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अमिता आठवले यांनी दिली.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 80 टक्के रुग्ण ठणठणीत  केईएम रुग्णालयाच्या पोस्टकोव्हिड ओपीडीतील रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण फायब्रोसिसमधून बरे झाले आहेत; मात्र काही जणांना अद्यापही ऑक्‍सिजनची गरज भासते. पोस्टकोव्हिडमधील फायब्रोसिस हा वेगळ्या प्रकारचा असून यामध्ये रक्त गोठण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानुसार तपासणी केल्यावर गरजेनुसार रक्त पातळ करण्याची औषधे दिली जातात.    मनाची शक्ती महत्त्वाची  फायब्रोसिस झालेले रुग्ण घाबरून रुग्णालयांपर्यंत येतात. हा आजार बरा होणार नाही अशी भीती लोकांमध्ये आहे. कारण अनेकांना अशक्तपणा आणि थकवा जाणवतो; मात्र महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये मनाची शक्ती फार महत्त्वाची असते, असे डॉ. आठवले यांनी स्पष्ट केले.    ऑक्‍सिजन हवा सुरळीत  सामान्यपणे शरीराला ऑक्‍सिजनचा पुरवठा झाल्यास संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत चालते. ऑक्‍सिजनची कमतरता भासू लागल्यास हृदयावर त्याचा परिणाम होतो. इतर अवयवांनाही ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे शरीराला ऑक्‍सिजनचा योग्य पुरवठा होणे गरजे आहे. प्रसंगी एखाद्या रुग्णाला ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असेल, तर ऑक्‍सिजन कॉन्स्ट्रेटरचा वापर केला जातो, अशी माहिती डॉ. आठवले यांनी दिली.  Unmasking happiness No need to worry about pulmonary fibrosis in postcovid Medical experts believe that the disease is slowly healing --------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 18, 2021

Unmasking happiness | पोस्टकोव्हिडमध्ये पल्मनरी फायब्रोसिसची चिंता नको!  आजार सावकाशपणे बरा होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत मुंबई  : कोव्हिडचा सर्वाधिक परिणाम होतो तो फुप्फुसावरच. पोस्टकोव्हिडमध्ये फुप्फुसासंबंधी विविध आजार समोर आले आहेत. त्यातही फुप्फुसाच्या पल्मनरी फायब्रोसिसचे प्रमाण जास्त असून अनेक रुग्ण पोस्टकोव्हिड ओपीडीत उपचारांसाठी येत आहेत; मात्र पल्मनरी फायब्रोसिस हा सावकाश बरा होणारा आजार असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञ डॉक्‍टरांनी मांडला आहे. केईएम रुग्णालयात गेल्या महिन्यापर्यंत फायब्रोसिस आणि इतर संबंधित आजारांच्या 104 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून हा आजार बरा होणारा असून त्याबाबत चिंता नसावी, असा निष्कर्ष काढण्यात आला.  कोव्हिडमुळे ऑक्‍सिजन फुप्फुसात घेण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रक्त गोठून तयार होणाऱ्या गुठळ्या होतात. परिणामी फुप्फुसाला जखमा होतात, मात्र पोस्टकोव्हिडमध्ये होणारा फायब्रोसिस हा बरा होणारा आजार असून साधारणत: सहा महिने व्यवस्थित उपचार घेतल्यानंतर फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या श्‍वसनविकार चिकित्सा विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अमिता आठवले यांनी दिली.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 80 टक्के रुग्ण ठणठणीत  केईएम रुग्णालयाच्या पोस्टकोव्हिड ओपीडीतील रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण फायब्रोसिसमधून बरे झाले आहेत; मात्र काही जणांना अद्यापही ऑक्‍सिजनची गरज भासते. पोस्टकोव्हिडमधील फायब्रोसिस हा वेगळ्या प्रकारचा असून यामध्ये रक्त गोठण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानुसार तपासणी केल्यावर गरजेनुसार रक्त पातळ करण्याची औषधे दिली जातात.    मनाची शक्ती महत्त्वाची  फायब्रोसिस झालेले रुग्ण घाबरून रुग्णालयांपर्यंत येतात. हा आजार बरा होणार नाही अशी भीती लोकांमध्ये आहे. कारण अनेकांना अशक्तपणा आणि थकवा जाणवतो; मात्र महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये मनाची शक्ती फार महत्त्वाची असते, असे डॉ. आठवले यांनी स्पष्ट केले.    ऑक्‍सिजन हवा सुरळीत  सामान्यपणे शरीराला ऑक्‍सिजनचा पुरवठा झाल्यास संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत चालते. ऑक्‍सिजनची कमतरता भासू लागल्यास हृदयावर त्याचा परिणाम होतो. इतर अवयवांनाही ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे शरीराला ऑक्‍सिजनचा योग्य पुरवठा होणे गरजे आहे. प्रसंगी एखाद्या रुग्णाला ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असेल, तर ऑक्‍सिजन कॉन्स्ट्रेटरचा वापर केला जातो, अशी माहिती डॉ. आठवले यांनी दिली.  Unmasking happiness No need to worry about pulmonary fibrosis in postcovid Medical experts believe that the disease is slowly healing --------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2M0Ehd9

No comments:

Post a Comment