आण्विक कार्यक्रमाचे अनावश्यक तपशील जाहीर करू नका तेहरान -आपल्या आण्विक कार्यक्रमाबाबत गोंधळ निर्माण होईल असे अनावश्यक तपशील जाहीरपणे प्रसिद्ध करू नयेत, असे इराणने संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षण संस्थेला ठणकावले आहे. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा प्रमुख युरोपीय देशांनी ताशेरे ओढल्यानंतरही इराणने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेकडून (आयएइए) इराणची झाडाझडती घेतली जात आहे. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी संस्थेनुसार आण्विक खात्याने एक निवेदन जारी केले आहे. हे निवेदन संक्षिप्त पण परखड आहे. ‘आयएइए’ने अनावश्यक तपशील पुरवू नयेत आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये गैरसमज निर्माण करणारे वातावरण निर्माण करण्यास प्रतिबंध करावा, असे स्पष्ट करण्यात आले. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ‘आयएइए’ने गेल्या गुरुवारी एक निवेदन जारी केले होते. त्यात इराणनेच आपल्याला माहिती दिल्याचा दावा करण्यात आला होता. युरेनियम धातूच्या उत्पादनाची यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी साधनसामुग्री बसविली जात आहे. इंधनाचा सुधारित प्रकार बनविण्याचे उद्दिष्ट यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी युरेनियम धातूवर संशोधन आणि विकास करण्याची योजना पुढे नेली जात आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले होते. इराणचे मुद्दे   युरेनियम धातूचे शांततापूर्ण आणि पारंपरिक मार्गाने उत्पादन करण्याच्या योजनेबाबत संबंधित संस्थेला दोन दशकांपूर्वीच माहिती दिली   सिलिसाईड प्रगत इंधन तयार करण्याच्या योजनेबाबत दोन वर्षांपूर्वीच अद्ययावत माहिती   आण्विक प्रकल्पांमध्ये सध्या ऑक्साईडजन्य युरेनियम इंधनाचा वापर   यापेक्षा जास्त सुरक्षित आणि शक्तीशाली असलेल्या युरेनियम सिलिसाईडच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील   युरेनियम सिलिसाईडच्या उत्पादनात युरेनियम धातू महत्त्वाचे माध्यम  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 17, 2021

आण्विक कार्यक्रमाचे अनावश्यक तपशील जाहीर करू नका तेहरान -आपल्या आण्विक कार्यक्रमाबाबत गोंधळ निर्माण होईल असे अनावश्यक तपशील जाहीरपणे प्रसिद्ध करू नयेत, असे इराणने संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षण संस्थेला ठणकावले आहे. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा प्रमुख युरोपीय देशांनी ताशेरे ओढल्यानंतरही इराणने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेकडून (आयएइए) इराणची झाडाझडती घेतली जात आहे. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी संस्थेनुसार आण्विक खात्याने एक निवेदन जारी केले आहे. हे निवेदन संक्षिप्त पण परखड आहे. ‘आयएइए’ने अनावश्यक तपशील पुरवू नयेत आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये गैरसमज निर्माण करणारे वातावरण निर्माण करण्यास प्रतिबंध करावा, असे स्पष्ट करण्यात आले. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ‘आयएइए’ने गेल्या गुरुवारी एक निवेदन जारी केले होते. त्यात इराणनेच आपल्याला माहिती दिल्याचा दावा करण्यात आला होता. युरेनियम धातूच्या उत्पादनाची यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी साधनसामुग्री बसविली जात आहे. इंधनाचा सुधारित प्रकार बनविण्याचे उद्दिष्ट यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी युरेनियम धातूवर संशोधन आणि विकास करण्याची योजना पुढे नेली जात आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले होते. इराणचे मुद्दे   युरेनियम धातूचे शांततापूर्ण आणि पारंपरिक मार्गाने उत्पादन करण्याच्या योजनेबाबत संबंधित संस्थेला दोन दशकांपूर्वीच माहिती दिली   सिलिसाईड प्रगत इंधन तयार करण्याच्या योजनेबाबत दोन वर्षांपूर्वीच अद्ययावत माहिती   आण्विक प्रकल्पांमध्ये सध्या ऑक्साईडजन्य युरेनियम इंधनाचा वापर   यापेक्षा जास्त सुरक्षित आणि शक्तीशाली असलेल्या युरेनियम सिलिसाईडच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील   युरेनियम सिलिसाईडच्या उत्पादनात युरेनियम धातू महत्त्वाचे माध्यम  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XNOIn1

No comments:

Post a Comment