नवाल्नींना अटकेसाठी जय्यत तयारी; रशियन सरकारने उकरले भ्रष्टाचाराचे जुने प्रकरण मॉस्को (रशिया) - रशियातील कट्टर राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी संशयित विषबाधेवरील उपचारानंतर जर्मनीहून रविवारी मायदेशी परतण्याची अपेक्षा आहे. ते विमानाबाहेर पाऊल टाकताच त्यांना गजाआड करण्याची जय्यत तयारी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सरकारने केली आहे. नवाल्नी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विमान प्रवासात अत्यवस्थ झाले. त्यांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेल्या विमानातून बर्लिनला हलविण्यात आले. सोव्हिएत महासंघाच्या कालावधीत रासायनिक शस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नोव्हीचोक या विषारी रसायनाद्वारे त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे चाचणीत आढळून आल्याचा दावा पाश्चात्त्य देशांतील वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. जर्मनीत वेळीच उपचार मिळाल्यामुळे ४४ वर्षांचे नवाल्नी मृत्यूच्या दाढेतून परतले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुतीन यांच्या आदेशावरून आपल्यावर विषप्रयोगाद्वारे हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. चौकशी करण्याचा कोणताही आधार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. आता २०१४ मधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी शिक्षेच्या तरतुदींचा भंग केल्याबद्दल त्यांना ताब्यात घेण्यात येईल असा इशारा सरकारने दिला आहे. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा समर्थकांना आवाहन दरम्यान, अटक आणि कारवाईचे इशारे म्हणजे नवाल्नी यांना मायदेशी परतण्यापासून रोखण्याचे प्रयत्न असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. नवाल्नी यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले. फेसबुकवर कार्यक्रम नवाल्नी यांच्या स्वागतासाठी फेसबुकच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. त्यावेळी उपस्थित राहणार असल्याचे दोन हजारहून जास्त नागरिकांनी जाहीर केले आहे. जर्मनीकडून प्रतिसाद दरम्यान, जर्मनीतील पोलिसांनी नवाल्नी यांची साक्ष नोंदविली होती. याविषयीच्या उताऱ्याची प्रत रशियन सरकारकडे सोपविल्याचे जर्मनीने याआधीच स्पष्ट केले आहे. कायदेविषयक बाबींत सहकार्य करावे अशी विनंती रशियाकडून करण्यात आली होती कारागृह संस्था म्हणते उपकृतच होऊ नवाल्नी मायदेशी परतण्याची शक्यता वर्तविणारे वृत्त दोन दिवसांपूर्वी आले. त्याचवेळी रशियातील कारागृह संस्थेने आक्रमक प्रतिक्रिया दिली. मॉस्कोत येताच त्यांना अटक करून आम्ही उपकृत होऊ, असे सांगण्यात आले. २०१४ मधील भ्रष्टाचार प्रकरणी ठोठावण्यात आलेल्या शिक्षेच्या तरतुदींचा भंग केल्याचा या संस्थेचा दावा आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा मलम फेकण्याचा विरोधकांचा इशारा नवाल्नी यांच्या विरोधकांनी राष्ट्रवादी आंदोलन सुरु केले आहे. झेल्योन्का या गडद हिरव्या रंगाचे मलम फेकूनच त्यांचे स्वागत करू असा इशारा देण्यात आला. याआधी अशा संसर्गविरोधी मलमाद्वारे नवाल्नी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. अकारण लावल्यास हे मलम त्वचेवरून पुसून काढण्यास कित्येक दिवस लागतात. नवाल्नी यांची नाकेबंदी   विमानतळावर स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊ नये असा अधिकाऱ्यांचा इशारा   या कार्यक्रमास मान्यता नसल्याचे स्पष्टीकरण   पत्रकारांना आत येऊन काम करू दिले जाणार नाही असा विमानतळ व्यवस्थापनाचा निर्णय   त्यासाठी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे कारण   सरकारधार्जिणी प्रसार माध्यमे तसेच सरकारी अधिकाऱ्यांकडून नवाल्नी यांचा नामोल्लेख टाळण्यावर भर   बर्लिनचे रुग्ण असा उल्लेख करण्याचा नवा पायंडा   सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीकडून नवाल्नी यांच्याकडे दुर्लक्ष किंवा नकारात्मक वार्तांकन   ही वाहिनी अनेक नागरिकांसाठी माहितीचे मुख्य स्रोत असल्यामुळे सामान्यांमध्ये त्यांना किती पाठिंबा याचे चित्र अस्पष्ट आणखी एक आरोप गेल्या वर्षाच्या अखेरीस नवाल्नी यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी आणखी एक आरोप दाखल केला. ४० लाख डॉलर रक्कमेच्या देणगीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हेगारी आरोप दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 17, 2021

नवाल्नींना अटकेसाठी जय्यत तयारी; रशियन सरकारने उकरले भ्रष्टाचाराचे जुने प्रकरण मॉस्को (रशिया) - रशियातील कट्टर राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी संशयित विषबाधेवरील उपचारानंतर जर्मनीहून रविवारी मायदेशी परतण्याची अपेक्षा आहे. ते विमानाबाहेर पाऊल टाकताच त्यांना गजाआड करण्याची जय्यत तयारी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सरकारने केली आहे. नवाल्नी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विमान प्रवासात अत्यवस्थ झाले. त्यांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेल्या विमानातून बर्लिनला हलविण्यात आले. सोव्हिएत महासंघाच्या कालावधीत रासायनिक शस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नोव्हीचोक या विषारी रसायनाद्वारे त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे चाचणीत आढळून आल्याचा दावा पाश्चात्त्य देशांतील वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. जर्मनीत वेळीच उपचार मिळाल्यामुळे ४४ वर्षांचे नवाल्नी मृत्यूच्या दाढेतून परतले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुतीन यांच्या आदेशावरून आपल्यावर विषप्रयोगाद्वारे हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. चौकशी करण्याचा कोणताही आधार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. आता २०१४ मधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी शिक्षेच्या तरतुदींचा भंग केल्याबद्दल त्यांना ताब्यात घेण्यात येईल असा इशारा सरकारने दिला आहे. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा समर्थकांना आवाहन दरम्यान, अटक आणि कारवाईचे इशारे म्हणजे नवाल्नी यांना मायदेशी परतण्यापासून रोखण्याचे प्रयत्न असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. नवाल्नी यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले. फेसबुकवर कार्यक्रम नवाल्नी यांच्या स्वागतासाठी फेसबुकच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. त्यावेळी उपस्थित राहणार असल्याचे दोन हजारहून जास्त नागरिकांनी जाहीर केले आहे. जर्मनीकडून प्रतिसाद दरम्यान, जर्मनीतील पोलिसांनी नवाल्नी यांची साक्ष नोंदविली होती. याविषयीच्या उताऱ्याची प्रत रशियन सरकारकडे सोपविल्याचे जर्मनीने याआधीच स्पष्ट केले आहे. कायदेविषयक बाबींत सहकार्य करावे अशी विनंती रशियाकडून करण्यात आली होती कारागृह संस्था म्हणते उपकृतच होऊ नवाल्नी मायदेशी परतण्याची शक्यता वर्तविणारे वृत्त दोन दिवसांपूर्वी आले. त्याचवेळी रशियातील कारागृह संस्थेने आक्रमक प्रतिक्रिया दिली. मॉस्कोत येताच त्यांना अटक करून आम्ही उपकृत होऊ, असे सांगण्यात आले. २०१४ मधील भ्रष्टाचार प्रकरणी ठोठावण्यात आलेल्या शिक्षेच्या तरतुदींचा भंग केल्याचा या संस्थेचा दावा आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा मलम फेकण्याचा विरोधकांचा इशारा नवाल्नी यांच्या विरोधकांनी राष्ट्रवादी आंदोलन सुरु केले आहे. झेल्योन्का या गडद हिरव्या रंगाचे मलम फेकूनच त्यांचे स्वागत करू असा इशारा देण्यात आला. याआधी अशा संसर्गविरोधी मलमाद्वारे नवाल्नी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. अकारण लावल्यास हे मलम त्वचेवरून पुसून काढण्यास कित्येक दिवस लागतात. नवाल्नी यांची नाकेबंदी   विमानतळावर स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊ नये असा अधिकाऱ्यांचा इशारा   या कार्यक्रमास मान्यता नसल्याचे स्पष्टीकरण   पत्रकारांना आत येऊन काम करू दिले जाणार नाही असा विमानतळ व्यवस्थापनाचा निर्णय   त्यासाठी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे कारण   सरकारधार्जिणी प्रसार माध्यमे तसेच सरकारी अधिकाऱ्यांकडून नवाल्नी यांचा नामोल्लेख टाळण्यावर भर   बर्लिनचे रुग्ण असा उल्लेख करण्याचा नवा पायंडा   सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीकडून नवाल्नी यांच्याकडे दुर्लक्ष किंवा नकारात्मक वार्तांकन   ही वाहिनी अनेक नागरिकांसाठी माहितीचे मुख्य स्रोत असल्यामुळे सामान्यांमध्ये त्यांना किती पाठिंबा याचे चित्र अस्पष्ट आणखी एक आरोप गेल्या वर्षाच्या अखेरीस नवाल्नी यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी आणखी एक आरोप दाखल केला. ४० लाख डॉलर रक्कमेच्या देणगीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हेगारी आरोप दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nUb3d8

No comments:

Post a Comment