Great : तेरा एकर शेतीच नियोजन अन् पूर्णवेळ धाब्याची जबाबदारी; व्यवसायातून जोपासले सामाजिक दायित्व गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सकाळी सहा वाजता उठायचं अन् थेट शेत गाठायचं. तिथली काम निपटून मग शेतातील ढाब्यात कामाला लागायचं. तेरा एकर शेतीच नियोजन अन् पूर्णवेळ धाब्याची जबाबदारी सांभाळायची. अशावेळी अडलेल्यांना विनामूल्य जेवण देत सामाजिक दायित्व जोपासायच. धानापुरात अरुणाताईंची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. गोंडपिपरी तालुक्‍यातील धानापूर येथील दिलीप साळवे यांची अहेरी-चंद्रपूर मुख्य मार्गावर तेरा एकर शेती आहे. अनेक वर्षे शेती सांभाळताना त्यांनी शेतातच धाबा सुरू केला. सुरुवातीला त्यांनी ही सारी जबाबदारी पेलली. पण, काही कारणास्तव हा सारा भार त्यांची पत्नी अरुणा सावळे यांच्यावर आला. अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन तेरा एकर शेतीत धान, सोयाबीन, कापूस, हरभरा, गहू, कांदे, मिरची या पिकांचे उत्पादन घेतात. सकाळी सहा वाजतापासून शेतातील काम करायचं. यानंतर दोन मुलींच्या शाळेची तयारी अन्‌ मग धाब्यात स्वयंपाक बनविण्यापासून तर सारच नियोजन करायचं. रात्री उशिरापर्यंत स्वयंपाकाचे काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे उठून कामाला लागायचे. हा त्यांचा दिनक्रम आहे. त्यांच्या धाब्यातील गावठी कोंबड्याच चिकन अतिशय लोकप्रिय आहे. बल्लारपूर, आल्लापल्लीपासून चिकनचा आस्वाद घेण्यासाठी या धाब्यावर खवय्ये येतात. मुख्य मार्गावरील अनेक अडलेल्या प्रवाशांना त्या विनामूल्य जेवण देतात. प्रत्येक दिवसातून असे अनेक प्रसंग येतात. परंतु, आम्ही कधी पैशाचा हिशोब करीत नाही. माणुसकीच्या भावनेतून आम्ही अशा अडलेल्या, भुकेल्यांना विनामूल्य जेवण देत असल्याचे ते सांगतात. दहा वर्षांपासून व्यवसायातून सामाजिक दायित्व जोपासण्याचे त्यांचे अविरत कार्य सुरू आहे. अधिक वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला सामाजिक कार्य करण्यासाठी मनाची तयारी असणे आवश्‍यक असते. यातूनच प्रत्यक्षात ती साकारली जात असते. अरुणा साळवे यांनी याचाच प्रत्यय दिला आहे. महिला असूनही तेरा एकर शेतीच्या नियोजनासह प्रचंड चालणाऱ्या धाब्याचे व्यवस्थापन करणाऱ्या अरुणाताईंची ही वाटचाल अनेकांना प्रेरणेची शिदोरी ठरली आहे. सासूंचीही मदत अरुणाताईंच्या सासू विठाबाई यांची त्यांना मोठी मदत मिळते. दुसऱ्या सासू शोभा वडस्कर या अंगणवाडी सेविका आहेत. पण त्याही आपली नोकरी पार पाडून पूर्णवेळ अरुणाच्या मदतीसाठी तत्पर असतात. अरुणा यांचे पती दिलीप साळवे, सासरे हरिश्चंद्र साळवे, दीर विपील घाटे हे सार कुटुंब त्यांच्या मदतीला पूर्णवेळ असतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 27, 2021

Great : तेरा एकर शेतीच नियोजन अन् पूर्णवेळ धाब्याची जबाबदारी; व्यवसायातून जोपासले सामाजिक दायित्व गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सकाळी सहा वाजता उठायचं अन् थेट शेत गाठायचं. तिथली काम निपटून मग शेतातील ढाब्यात कामाला लागायचं. तेरा एकर शेतीच नियोजन अन् पूर्णवेळ धाब्याची जबाबदारी सांभाळायची. अशावेळी अडलेल्यांना विनामूल्य जेवण देत सामाजिक दायित्व जोपासायच. धानापुरात अरुणाताईंची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. गोंडपिपरी तालुक्‍यातील धानापूर येथील दिलीप साळवे यांची अहेरी-चंद्रपूर मुख्य मार्गावर तेरा एकर शेती आहे. अनेक वर्षे शेती सांभाळताना त्यांनी शेतातच धाबा सुरू केला. सुरुवातीला त्यांनी ही सारी जबाबदारी पेलली. पण, काही कारणास्तव हा सारा भार त्यांची पत्नी अरुणा सावळे यांच्यावर आला. अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन तेरा एकर शेतीत धान, सोयाबीन, कापूस, हरभरा, गहू, कांदे, मिरची या पिकांचे उत्पादन घेतात. सकाळी सहा वाजतापासून शेतातील काम करायचं. यानंतर दोन मुलींच्या शाळेची तयारी अन्‌ मग धाब्यात स्वयंपाक बनविण्यापासून तर सारच नियोजन करायचं. रात्री उशिरापर्यंत स्वयंपाकाचे काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे उठून कामाला लागायचे. हा त्यांचा दिनक्रम आहे. त्यांच्या धाब्यातील गावठी कोंबड्याच चिकन अतिशय लोकप्रिय आहे. बल्लारपूर, आल्लापल्लीपासून चिकनचा आस्वाद घेण्यासाठी या धाब्यावर खवय्ये येतात. मुख्य मार्गावरील अनेक अडलेल्या प्रवाशांना त्या विनामूल्य जेवण देतात. प्रत्येक दिवसातून असे अनेक प्रसंग येतात. परंतु, आम्ही कधी पैशाचा हिशोब करीत नाही. माणुसकीच्या भावनेतून आम्ही अशा अडलेल्या, भुकेल्यांना विनामूल्य जेवण देत असल्याचे ते सांगतात. दहा वर्षांपासून व्यवसायातून सामाजिक दायित्व जोपासण्याचे त्यांचे अविरत कार्य सुरू आहे. अधिक वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला सामाजिक कार्य करण्यासाठी मनाची तयारी असणे आवश्‍यक असते. यातूनच प्रत्यक्षात ती साकारली जात असते. अरुणा साळवे यांनी याचाच प्रत्यय दिला आहे. महिला असूनही तेरा एकर शेतीच्या नियोजनासह प्रचंड चालणाऱ्या धाब्याचे व्यवस्थापन करणाऱ्या अरुणाताईंची ही वाटचाल अनेकांना प्रेरणेची शिदोरी ठरली आहे. सासूंचीही मदत अरुणाताईंच्या सासू विठाबाई यांची त्यांना मोठी मदत मिळते. दुसऱ्या सासू शोभा वडस्कर या अंगणवाडी सेविका आहेत. पण त्याही आपली नोकरी पार पाडून पूर्णवेळ अरुणाच्या मदतीसाठी तत्पर असतात. अरुणा यांचे पती दिलीप साळवे, सासरे हरिश्चंद्र साळवे, दीर विपील घाटे हे सार कुटुंब त्यांच्या मदतीला पूर्णवेळ असतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3a8CBGS

No comments:

Post a Comment