प्राध्यापकांना देण्यात येणार मानधन; कशाचे ते वाचा पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्‍टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेतल्या, त्यामध्ये काम केलेल्या प्राध्यापकांसह इतर घटकांना मानधन देण्यात येणार आहे. यावर सोमवारी प्राथमिक चर्चा झाली असून, अंतिम निर्णय पुढील काही दिवसात होण्याची शक्‍यता आहे.  पुणे : बलात्कार पीडित मुलीसह आईने घेतली माघार; तरीही आरोपीला झाली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे विद्यापीठाने सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन तर ५० हजार विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा घेतली होती. ती घेत असताना बहुपर्यायी प्रश्‍नसंच तयार करणारे प्राध्यापक, ऑफलाइन परीक्षेसाठी महाविद्यालयात व्यवस्था करणे, पर्यवेक्षक, परीक्षा नियंत्रक यासह इतर घटकांना मानधन देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. दरम्यान, विद्यापीठामार्फत परीक्षा घेण्यात आल्या आहेत, त्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक घटकास मानधन दिले गेलेले आहे. परंतु यंदा ऑनलाइन परीक्षा असल्याने व ऑफलाइन परीक्षेतही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मानधन देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा परीक्षा पार पडल्यानंतर, निकालाची प्रक्रियाही झाल्याने गेल्या काही दिवसांपासून परीक्षेचे मानधन मिळण्याबाबत चर्चा होती. यासंदर्भात आज परीक्षा विभागातील अधिकारी, अधिष्ठाता व इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये मानधन देण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. जानेवारीच्या अखेरीस व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार असून, त्यामध्ये हा परीक्षेसाठीच्या खर्चाचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण सुमारे सव्वा कोटीचा खर्च  अंतिम वर्षाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेत १७ ते १८ हजार जण विविध स्तरावर कार्यरत होते. या परीक्षेत ३ हजार ३०० विषय होते, त्या प्रत्येक विषयाचा प्रश्‍नसंच तयार करण्यासाठी सहा प्राध्यापक, त्याचे अध्यक्ष असे मोठे मनुष्यबळ होते. तसेच परीक्षा केंद्रांवरही यंत्रणा होती. सर्व घटकांना किती मानधन द्यायचे हे अद्याप निश्‍चित झालेले नसले तरी सुमारे सव्वा कोटी रुपये यासाठी खर्च येईल असे सूत्रांनी सांगितले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 19, 2021

प्राध्यापकांना देण्यात येणार मानधन; कशाचे ते वाचा पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्‍टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेतल्या, त्यामध्ये काम केलेल्या प्राध्यापकांसह इतर घटकांना मानधन देण्यात येणार आहे. यावर सोमवारी प्राथमिक चर्चा झाली असून, अंतिम निर्णय पुढील काही दिवसात होण्याची शक्‍यता आहे.  पुणे : बलात्कार पीडित मुलीसह आईने घेतली माघार; तरीही आरोपीला झाली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे विद्यापीठाने सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन तर ५० हजार विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा घेतली होती. ती घेत असताना बहुपर्यायी प्रश्‍नसंच तयार करणारे प्राध्यापक, ऑफलाइन परीक्षेसाठी महाविद्यालयात व्यवस्था करणे, पर्यवेक्षक, परीक्षा नियंत्रक यासह इतर घटकांना मानधन देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. दरम्यान, विद्यापीठामार्फत परीक्षा घेण्यात आल्या आहेत, त्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक घटकास मानधन दिले गेलेले आहे. परंतु यंदा ऑनलाइन परीक्षा असल्याने व ऑफलाइन परीक्षेतही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मानधन देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा परीक्षा पार पडल्यानंतर, निकालाची प्रक्रियाही झाल्याने गेल्या काही दिवसांपासून परीक्षेचे मानधन मिळण्याबाबत चर्चा होती. यासंदर्भात आज परीक्षा विभागातील अधिकारी, अधिष्ठाता व इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये मानधन देण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. जानेवारीच्या अखेरीस व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार असून, त्यामध्ये हा परीक्षेसाठीच्या खर्चाचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण सुमारे सव्वा कोटीचा खर्च  अंतिम वर्षाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेत १७ ते १८ हजार जण विविध स्तरावर कार्यरत होते. या परीक्षेत ३ हजार ३०० विषय होते, त्या प्रत्येक विषयाचा प्रश्‍नसंच तयार करण्यासाठी सहा प्राध्यापक, त्याचे अध्यक्ष असे मोठे मनुष्यबळ होते. तसेच परीक्षा केंद्रांवरही यंत्रणा होती. सर्व घटकांना किती मानधन द्यायचे हे अद्याप निश्‍चित झालेले नसले तरी सुमारे सव्वा कोटी रुपये यासाठी खर्च येईल असे सूत्रांनी सांगितले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2MagG9F

No comments:

Post a Comment