...आता न्याय मिळेपर्यंत माघार नाही ः जाधव सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बाजारपेठेतील स्टॉल हटविल्याप्रकरणी पालिका प्रशासनाविरोधात येथील स्टॉल व्यावसायिक रवी जाधव यांनी आज येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाला मारायचं असेल तर पाठीवर मारा, कोणाच्या पोटावर नको, अशी विनवणी केली आहे.  श्री. जाधव यांच्या उपोषणाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी जाधव म्हणाले, ""सणासुदीच्या काळात आपण विक्रीसाठी आणलेले सामान जप्त करून कचरा गाडीतून नेण्यात आले. आपण दलित समाजातील असल्यानेच आपल्यावर अन्याय करण्यात आला. तो स्टॉल व ती जागा कायमस्वरुपी व्यवसायासाठी मिळावी, यासाठी प्रशासनाकडे मागणी देखील केली होती. शिवाय उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता; मात्र उत्तरादाखल कोणत्याही आकसापोटी पालिकेकडून कारवाई केली नसल्याचे कारण पालिका प्रशासनाने पुढे केले आहे. आज जवळपास 90 हजाराचा माल पालिका गोडाउनमध्ये पडून आहे. त्यासाठी बॅंकेकडून काढलेले कर्जाचे हप्ते थकल्याने बॅंकेचे अधिकारी माझ्या दारावर येत आहेत. त्यामुळे आपल्यावर व्यवसाय करण्यापलीकडे कुठलाच पर्याय उरलेला नाही.  न्याय मिळेपर्यंत माघार नाही  जोपर्यंत पालिकेकडून न्याय नाही मिळत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही.'' शहरामध्ये दिवसेंदिवस अनधिकृत स्टॉल उभे राहत आहेत. त्यांना मात्र प्रशासनाकडून अभय देण्यात येत आहे; परंतु माझ्यासारख्या स्थानिकांवर पालिकेकडून अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 19, 2021

...आता न्याय मिळेपर्यंत माघार नाही ः जाधव सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बाजारपेठेतील स्टॉल हटविल्याप्रकरणी पालिका प्रशासनाविरोधात येथील स्टॉल व्यावसायिक रवी जाधव यांनी आज येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाला मारायचं असेल तर पाठीवर मारा, कोणाच्या पोटावर नको, अशी विनवणी केली आहे.  श्री. जाधव यांच्या उपोषणाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी जाधव म्हणाले, ""सणासुदीच्या काळात आपण विक्रीसाठी आणलेले सामान जप्त करून कचरा गाडीतून नेण्यात आले. आपण दलित समाजातील असल्यानेच आपल्यावर अन्याय करण्यात आला. तो स्टॉल व ती जागा कायमस्वरुपी व्यवसायासाठी मिळावी, यासाठी प्रशासनाकडे मागणी देखील केली होती. शिवाय उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता; मात्र उत्तरादाखल कोणत्याही आकसापोटी पालिकेकडून कारवाई केली नसल्याचे कारण पालिका प्रशासनाने पुढे केले आहे. आज जवळपास 90 हजाराचा माल पालिका गोडाउनमध्ये पडून आहे. त्यासाठी बॅंकेकडून काढलेले कर्जाचे हप्ते थकल्याने बॅंकेचे अधिकारी माझ्या दारावर येत आहेत. त्यामुळे आपल्यावर व्यवसाय करण्यापलीकडे कुठलाच पर्याय उरलेला नाही.  न्याय मिळेपर्यंत माघार नाही  जोपर्यंत पालिकेकडून न्याय नाही मिळत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही.'' शहरामध्ये दिवसेंदिवस अनधिकृत स्टॉल उभे राहत आहेत. त्यांना मात्र प्रशासनाकडून अभय देण्यात येत आहे; परंतु माझ्यासारख्या स्थानिकांवर पालिकेकडून अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3isEC4l

No comments:

Post a Comment