खांडवीत हातगाडीवरून केला तरुणांनी निवडणुकीचा प्रचार; पाच जागा जिंकत सत्ताधाऱ्यांना दिली प्रथमच टक्कर !  बार्शी (सोलापूर) : तालुक्‍यात नुकत्याच झालेल्या 78 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ग्रामीण भागात लोकशाहीचा जागर पाहायला मिळाला. अनेक गावांत तरुणांना ग्रामपंचायतींमध्ये सत्ता करण्याची संधी ग्रामस्थांनी दिली आहे, तरुणाईला प्रोत्साहन दिले आहे. त्यापैकीच एक गाव आहे खांडवी. येथील तरुणांनी सत्ताधाऱ्यांशी दोन हात करून पहिल्याच निवडणुकीत टक्कर देऊन नऊ पैकी पाच तरुण उमेदवार निवडून आणले असून, तालुक्‍यात त्यांचे कौतुक होत आहे.  शहरापासून आठ किलोमीटरवर असलेल्या खांडवी-गोडसेवाडी ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची झाली. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात तीन हजार 253 मतदार आहेत. या निवडणुकीत प्रभाग एकमध्ये 80, दोनमध्ये 85, तीनमध्ये 82, चारमध्ये 78 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग एकमध्ये तर "नोटा'ला 198 मते पडली आहेत. या प्रभागात त्यांचा उमेदवार उभा नव्हता.  निवडणूक जाहीर होताच खंडेश्वर ग्रामविकास आघाडी, श्री खंडेश्वर महाविकास परिवर्तन आघाडी अन्‌ खंडेश्वर महाविकास आघाडी असे तीन पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले होते. सत्ताधारी व बुजूर्ग ज्येष्ठ मंडळी यांच्या विरोधात प्रथमच गावातील तरुणांनी दंड थोपटले अन्‌ श्री खंडेश्वर महाविकास परिवर्तन आघाडी स्थापन केली. सर्व तरुणांना निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे केले. दोन अर्ज छाननीत बाद झाले. 11 जागांपैकी 9 जागा लढवल्या आणि पाच जण विजयी झाले आहेत.  शहरापासून अवघे आठ किलोमीटरवर गाव पण विकास नाही, गावात परिवर्तन घडवायचेच, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रचारास सुरवात केली. एकही उमेदवार धनदांडगा, गर्भश्रीमंत नाही. पैसे नाहीत, सर्वसामान्य कुटुंबातील सर्व उमेदवार. सभा घेतली नाही तर प्रचार हातगाडीवर केला. मतदान ओळख पत्रिका प्रसिद्धीसाठी छापल्या व हातगाडीवरून वाटल्या. पाच ते सहा हजार खर्च आला असेल फक्त. प्रदूषणमुक्त प्रचार करायचा, कमी खर्चात निवडणुका होतात हे दाखवून द्यायचे होते, असे विजयी सदस्य आकाश दळवी यांनी आवर्जून सांगितले.  गोडसेवाडी येथे पाण्याची टंचाई खूप आहे. टाकी बांधून अनेक वर्षे झाली पण टाकीत पाणी काही अजून आलेच नाही. पाइपलाइन, रस्ते, गटारी, पाणी या समस्यांसह नेहमीच दबावाचे राजकारण तरुण पाहात होते. अनेक विकासकामे केवळ कागदावरच दिसत असून भावी पिढीच्या भवितव्यासाठी, शैक्षणिक, आरोग्य, वृक्षारोपण करून नैसर्गिक समतोल साधण्याचा आमचा पाच नूतन सदस्यांचा अजेंडा असणार आहे, असेही दळवी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.  खांडवी-गोडसेवाडी ग्रामपंचायत निवडणूक प्रथमच या तरुणांनी लढवली असून यामध्ये आकाश पांडुरंग दळवी (वय 23), योगीराज कल्याण सातपुते (वय 25), सचिन कुंडलिक चोरघडे (वय 24), सुवर्णा बालाजी वाघमारे (वय 35), मीना विनोद गपाट अशी ग्रामस्थांनी निवडलेल्या नूतन सदस्यांची नावे आहेत. या तरुणांना प्रवीण घोडके आणि विनोद गपाट यांनी मार्गदर्शन केले.  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 19, 2021

खांडवीत हातगाडीवरून केला तरुणांनी निवडणुकीचा प्रचार; पाच जागा जिंकत सत्ताधाऱ्यांना दिली प्रथमच टक्कर !  बार्शी (सोलापूर) : तालुक्‍यात नुकत्याच झालेल्या 78 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ग्रामीण भागात लोकशाहीचा जागर पाहायला मिळाला. अनेक गावांत तरुणांना ग्रामपंचायतींमध्ये सत्ता करण्याची संधी ग्रामस्थांनी दिली आहे, तरुणाईला प्रोत्साहन दिले आहे. त्यापैकीच एक गाव आहे खांडवी. येथील तरुणांनी सत्ताधाऱ्यांशी दोन हात करून पहिल्याच निवडणुकीत टक्कर देऊन नऊ पैकी पाच तरुण उमेदवार निवडून आणले असून, तालुक्‍यात त्यांचे कौतुक होत आहे.  शहरापासून आठ किलोमीटरवर असलेल्या खांडवी-गोडसेवाडी ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची झाली. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात तीन हजार 253 मतदार आहेत. या निवडणुकीत प्रभाग एकमध्ये 80, दोनमध्ये 85, तीनमध्ये 82, चारमध्ये 78 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग एकमध्ये तर "नोटा'ला 198 मते पडली आहेत. या प्रभागात त्यांचा उमेदवार उभा नव्हता.  निवडणूक जाहीर होताच खंडेश्वर ग्रामविकास आघाडी, श्री खंडेश्वर महाविकास परिवर्तन आघाडी अन्‌ खंडेश्वर महाविकास आघाडी असे तीन पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले होते. सत्ताधारी व बुजूर्ग ज्येष्ठ मंडळी यांच्या विरोधात प्रथमच गावातील तरुणांनी दंड थोपटले अन्‌ श्री खंडेश्वर महाविकास परिवर्तन आघाडी स्थापन केली. सर्व तरुणांना निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे केले. दोन अर्ज छाननीत बाद झाले. 11 जागांपैकी 9 जागा लढवल्या आणि पाच जण विजयी झाले आहेत.  शहरापासून अवघे आठ किलोमीटरवर गाव पण विकास नाही, गावात परिवर्तन घडवायचेच, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रचारास सुरवात केली. एकही उमेदवार धनदांडगा, गर्भश्रीमंत नाही. पैसे नाहीत, सर्वसामान्य कुटुंबातील सर्व उमेदवार. सभा घेतली नाही तर प्रचार हातगाडीवर केला. मतदान ओळख पत्रिका प्रसिद्धीसाठी छापल्या व हातगाडीवरून वाटल्या. पाच ते सहा हजार खर्च आला असेल फक्त. प्रदूषणमुक्त प्रचार करायचा, कमी खर्चात निवडणुका होतात हे दाखवून द्यायचे होते, असे विजयी सदस्य आकाश दळवी यांनी आवर्जून सांगितले.  गोडसेवाडी येथे पाण्याची टंचाई खूप आहे. टाकी बांधून अनेक वर्षे झाली पण टाकीत पाणी काही अजून आलेच नाही. पाइपलाइन, रस्ते, गटारी, पाणी या समस्यांसह नेहमीच दबावाचे राजकारण तरुण पाहात होते. अनेक विकासकामे केवळ कागदावरच दिसत असून भावी पिढीच्या भवितव्यासाठी, शैक्षणिक, आरोग्य, वृक्षारोपण करून नैसर्गिक समतोल साधण्याचा आमचा पाच नूतन सदस्यांचा अजेंडा असणार आहे, असेही दळवी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.  खांडवी-गोडसेवाडी ग्रामपंचायत निवडणूक प्रथमच या तरुणांनी लढवली असून यामध्ये आकाश पांडुरंग दळवी (वय 23), योगीराज कल्याण सातपुते (वय 25), सचिन कुंडलिक चोरघडे (वय 24), सुवर्णा बालाजी वाघमारे (वय 35), मीना विनोद गपाट अशी ग्रामस्थांनी निवडलेल्या नूतन सदस्यांची नावे आहेत. या तरुणांना प्रवीण घोडके आणि विनोद गपाट यांनी मार्गदर्शन केले.  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/38XL5kt

No comments:

Post a Comment