अंगणवाडी सेविकांना पेन्शन सुरू करा; कृती समितीतर्फे राज्य सरकारला प्रस्ताव पुणे : अंगणवाडी सेविकांना सेवासमाप्तीनंतर एक लाख रुपये आणि मदतनिसांना 75 हजार रुपये इतकी रक्‍कम दिली जाते. त्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वृध्दापकाळामध्ये उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यांना दरमहा मानधनाच्या निम्मी रक्‍कम पेन्शन म्हणून दिल्यास दरवर्षी केवळ दहा कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे त्यांना या सेवासमाप्ती लाभासोबतच दरमहा पेन्शन सुरू करावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे राज्य सरकारला देण्यात आला आहे.  - Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी पार पडली कोरोनाची 'ड्राय रन'!​ राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे दोन लाख इतकी आहे. त्यापैकी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मिळून सुमारे अडीच हजार कर्मचारी वयाच्या 65 वर्षानंतर सेवानिवृत्त होतात. सध्या अंगणवाडी सेविकांना सुमारे दरमहा आठ हजार पाचशे रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच हजार 750 रुपये आणि मदतनिसांना दरमहा साडेचार हजार मानधन दिले जाते. त्यांना त्यांच्या मानधनाच्या 50 टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन म्हणून देण्यात यावी. सरकारने हा निर्णय घेतल्यास अंगणवाडी सेविकांना दरमहा चार हजार 250 रुपये मिनी सेविकांना दोन हजार 875 रुपये आणि मदतनिसांना सव्वा दोन हजार रुपये पेन्शन मिळेल. त्यानुसार राज्य सरकारवर वार्षिक खर्च सुमारे 9.75 कोटी रुपये खर्च येईल, असे संघटनेने प्रस्तावात नमूद केले आहे.  - पुणे : शाळांचे टाळे सोमवारी उघडणार; मनपा आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण!​ सध्या सेवानिवृत्ती लाभ योजनेकरीता राज्य सरकारकडून प्रतिमाह अंगणवाडी सेविकांसाठी दोनशे रुपये आणि मिनी सेविका व मदतनिसांसाठी शंभर रुपये योगदान दिले जाते. ही योजना एप्रिल 2014 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. ढोबळ अंदाजानुसार सर्व सेविका आणि मदतनिसांचे मिळून वर्षाचे 36 कोटी रूपये जमा होतात. आजअखेर 216 कोटी रुपये जमा झाले असून, त्यापैकी अंगणवाडी सेविका, मदतनिसांना सेवासमाप्तीचा एकरकमी लाभ देण्यासाठी गेल्या सहा वर्षांमध्ये सुमारे 131 कोटी रुपये खर्च झाला आहे. राज्य सरकारकडे 85 कोटी रुपये शिल्लक असून, पेन्शन सुरू केल्यास दरवर्षी त्यामध्ये 36 कोटी रुपयांची भर पडणार आहे.  - Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात ३५८ पदांची भरती; दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज​ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाच्या निम्मी रक्‍कम दरमहा पेन्शन दिल्यास दरवर्षी सुमारे दहा कोटी रुपये लागतील. महिला बालविकास खात्याकडील उपलब्ध रकमेमधून दरमहा पेन्शन देणे सहज शक्‍य आहे. या संदर्भात राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा.  - एम.ए. पाटील, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दरमहा पेन्शन सुरू केल्यास मिळणारी रक्‍कम  अंगणवाडी सेविका : चार हजार 250 रुपये  मिनी अंगणवाडी सेविका : दोन हजार 875 रुपये  मदतनीस : दोन हजार 250 रुपये  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 2, 2021

अंगणवाडी सेविकांना पेन्शन सुरू करा; कृती समितीतर्फे राज्य सरकारला प्रस्ताव पुणे : अंगणवाडी सेविकांना सेवासमाप्तीनंतर एक लाख रुपये आणि मदतनिसांना 75 हजार रुपये इतकी रक्‍कम दिली जाते. त्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वृध्दापकाळामध्ये उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यांना दरमहा मानधनाच्या निम्मी रक्‍कम पेन्शन म्हणून दिल्यास दरवर्षी केवळ दहा कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे त्यांना या सेवासमाप्ती लाभासोबतच दरमहा पेन्शन सुरू करावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे राज्य सरकारला देण्यात आला आहे.  - Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी पार पडली कोरोनाची 'ड्राय रन'!​ राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे दोन लाख इतकी आहे. त्यापैकी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मिळून सुमारे अडीच हजार कर्मचारी वयाच्या 65 वर्षानंतर सेवानिवृत्त होतात. सध्या अंगणवाडी सेविकांना सुमारे दरमहा आठ हजार पाचशे रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच हजार 750 रुपये आणि मदतनिसांना दरमहा साडेचार हजार मानधन दिले जाते. त्यांना त्यांच्या मानधनाच्या 50 टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन म्हणून देण्यात यावी. सरकारने हा निर्णय घेतल्यास अंगणवाडी सेविकांना दरमहा चार हजार 250 रुपये मिनी सेविकांना दोन हजार 875 रुपये आणि मदतनिसांना सव्वा दोन हजार रुपये पेन्शन मिळेल. त्यानुसार राज्य सरकारवर वार्षिक खर्च सुमारे 9.75 कोटी रुपये खर्च येईल, असे संघटनेने प्रस्तावात नमूद केले आहे.  - पुणे : शाळांचे टाळे सोमवारी उघडणार; मनपा आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण!​ सध्या सेवानिवृत्ती लाभ योजनेकरीता राज्य सरकारकडून प्रतिमाह अंगणवाडी सेविकांसाठी दोनशे रुपये आणि मिनी सेविका व मदतनिसांसाठी शंभर रुपये योगदान दिले जाते. ही योजना एप्रिल 2014 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. ढोबळ अंदाजानुसार सर्व सेविका आणि मदतनिसांचे मिळून वर्षाचे 36 कोटी रूपये जमा होतात. आजअखेर 216 कोटी रुपये जमा झाले असून, त्यापैकी अंगणवाडी सेविका, मदतनिसांना सेवासमाप्तीचा एकरकमी लाभ देण्यासाठी गेल्या सहा वर्षांमध्ये सुमारे 131 कोटी रुपये खर्च झाला आहे. राज्य सरकारकडे 85 कोटी रुपये शिल्लक असून, पेन्शन सुरू केल्यास दरवर्षी त्यामध्ये 36 कोटी रुपयांची भर पडणार आहे.  - Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात ३५८ पदांची भरती; दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज​ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाच्या निम्मी रक्‍कम दरमहा पेन्शन दिल्यास दरवर्षी सुमारे दहा कोटी रुपये लागतील. महिला बालविकास खात्याकडील उपलब्ध रकमेमधून दरमहा पेन्शन देणे सहज शक्‍य आहे. या संदर्भात राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा.  - एम.ए. पाटील, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दरमहा पेन्शन सुरू केल्यास मिळणारी रक्‍कम  अंगणवाडी सेविका : चार हजार 250 रुपये  मिनी अंगणवाडी सेविका : दोन हजार 875 रुपये  मदतनीस : दोन हजार 250 रुपये  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ob6UCi

No comments:

Post a Comment