कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज  पुणे -  शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत- ढगाळ राहाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे थंडीने घेतलेली विश्रांती कायम राहील. मध्य महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 6) आणि गुरुवारी (ता. 7) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात वेगाने बदल होत आहेत. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अंशत- ढगाळ हवामान आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात बुधवारी (ता. 6) व गुरुवारी (ता. 7) हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. पुण्यातही ढगाळ वातावरणाची शक्‍यता आहे. पुण्यात शिवाजीनगर येथे रविवारी किमान तापमानाचा पारा 14.7 अंश सेल्सिअस नोंदला गेला. सरासरीपेक्षा 4.2 अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरवातीला थंडीने पुण्यात घेतलेली विश्रांती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील, असेही खात्यातर्फे स्पष्ट केले आहे.  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अरबी समुद्राचा वायव्य भाग ते उत्तर पंजाब या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुजरात व राजस्थानच्या नैऋत्य भाग आणि सौराष्ट्र व कच्छ परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे उत्तर भारतात पावसासाठी पोषक वातावरण झाले आहे. त्याचा परिणाम थंडीवर झाला आहे. मध्य महाराष्ट्रातही काही भागात अंशत- ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी-अधिक स्वरूपात आहे.  राज्यातील हवामान  उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्याला हुडहुडी भरली होती. विदर्भात थंडीची लाटही पसरली होती. पुण्यात किमान तापमानाचा पारा 22 डिसेंबरला 8.1 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला होता. या पार्श्वभूमीवर आता ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडीने विश्रांती घेतली आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भात कोरडे हवामान असल्याने बऱ्यापैकी थंडीत चढ-उतार होत आहे.  दृष्टीक्षेपात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)  मुंबई - 21.2  रत्नागिरी - 19.3  डहाणू - 19.5  पुणे - 14.7  जळगाव - 16.7  कोल्हापूर - 17.4  महाबळेश्‍वर - 14.9  मालेगाव - 18.4  नाशिक - 16.4  सांगली - 16  सातारा - 16.1  सोलापूर - 16.2  औरंगाबाद - 16.2  परभणी - 14.5  नांदेड - 15  अकोला - 17.2  अमरावती - 18.7  बुलडाणा - 17  चंद्रपूर - 13.6  गोंदिया - 14.4  नागपूर - 15.1  वर्धा - 16  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 3, 2021

कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज  पुणे -  शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत- ढगाळ राहाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे थंडीने घेतलेली विश्रांती कायम राहील. मध्य महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 6) आणि गुरुवारी (ता. 7) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात वेगाने बदल होत आहेत. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अंशत- ढगाळ हवामान आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात बुधवारी (ता. 6) व गुरुवारी (ता. 7) हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. पुण्यातही ढगाळ वातावरणाची शक्‍यता आहे. पुण्यात शिवाजीनगर येथे रविवारी किमान तापमानाचा पारा 14.7 अंश सेल्सिअस नोंदला गेला. सरासरीपेक्षा 4.2 अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरवातीला थंडीने पुण्यात घेतलेली विश्रांती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील, असेही खात्यातर्फे स्पष्ट केले आहे.  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अरबी समुद्राचा वायव्य भाग ते उत्तर पंजाब या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुजरात व राजस्थानच्या नैऋत्य भाग आणि सौराष्ट्र व कच्छ परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे उत्तर भारतात पावसासाठी पोषक वातावरण झाले आहे. त्याचा परिणाम थंडीवर झाला आहे. मध्य महाराष्ट्रातही काही भागात अंशत- ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी-अधिक स्वरूपात आहे.  राज्यातील हवामान  उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्याला हुडहुडी भरली होती. विदर्भात थंडीची लाटही पसरली होती. पुण्यात किमान तापमानाचा पारा 22 डिसेंबरला 8.1 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला होता. या पार्श्वभूमीवर आता ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडीने विश्रांती घेतली आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भात कोरडे हवामान असल्याने बऱ्यापैकी थंडीत चढ-उतार होत आहे.  दृष्टीक्षेपात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)  मुंबई - 21.2  रत्नागिरी - 19.3  डहाणू - 19.5  पुणे - 14.7  जळगाव - 16.7  कोल्हापूर - 17.4  महाबळेश्‍वर - 14.9  मालेगाव - 18.4  नाशिक - 16.4  सांगली - 16  सातारा - 16.1  सोलापूर - 16.2  औरंगाबाद - 16.2  परभणी - 14.5  नांदेड - 15  अकोला - 17.2  अमरावती - 18.7  बुलडाणा - 17  चंद्रपूर - 13.6  गोंदिया - 14.4  नागपूर - 15.1  वर्धा - 16  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2X93GUi

No comments:

Post a Comment