पलूस तालुक्‍यात सरपंचपदासाठी कार्यकर्ते, नेते लागले कामाला  पलूस : पलूस तालुक्‍यातील 14 ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ते सरपंच आरक्षण सोडत व सरपंच निवडीकडे. सरपंच आपल्याच पक्ष व गटाचा होण्यासाठी निवडून आलेले सदस्य, नेते व कार्यकर्ते यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.  पलूस तालुक्‍यातील भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडी, भिलवडी, माळवाडी, बुरुंगवाडी, धनगांव, नागठाणे, नागराळे, रामानंदनगर, दह्यारी, तुपारी, आंधळी, मोराळे व सुर्यगाव या गावच्या ग्रामपंचायत निवडणूका चुरशीने पार पडल्या. कॉंग्रेस पक्षाने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले.  ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते सरपंच पदाच्या आरक्षण सोडत व सरपंच निवडीकडे. लवकरच सरपंच पदासाठी सोडत निघेल. त्यानंतर सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणूकांपेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि पक्षातून नाराजी आली तर मग कटातटातील ईर्षेपोटी ग्रामपंचायत निवडणूक लढवली जाते. भावकीतील जुने वाद व इतर भांडणे चव्हाट्यावर येतात.अगदी तशीच परिस्थिती ग्रामपंचायत निवडणूकित पहायला मिळाली.  ग्रामपंचायत म्हणजे गांवचे मिनिमंत्रालय असते. आता मोठ्या प्रमाणावर विविध योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतीकडे येते. रस्ते, गटार,आरोग्य ,स्वच्छता यासाठी कोट्यवधी रुपये ग्रामपंचायतीकडे येतात. त्यामुळे सरपंच आपल्याच मर्जीतला असावा तसेच सरपंच पदाची संधी मलाच मिळावी. अशी नूतन सदस्याची इच्छा असते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकिनंतर सरपंच निवडीसाठी नेते, कार्यकर्ते व नूतन सदस्य यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.  सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग  सरपंच पदासाठी प्रत्येक नूतन सदस्य इच्छुक आहे. मात्र, प्रतीक्षा आहे ती सरपंच आरक्षण सोडतीकडे. त्यानंतर हालचालींना आणखी वेग येणार आहे. काठावर बहुमत असलेल्या गावात सदस्यांवर नेते व कार्यकर्ते यांनी पाळत ठेवली आहे.     संपादन : प्रफुल्ल सुतार  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 19, 2021

पलूस तालुक्‍यात सरपंचपदासाठी कार्यकर्ते, नेते लागले कामाला  पलूस : पलूस तालुक्‍यातील 14 ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ते सरपंच आरक्षण सोडत व सरपंच निवडीकडे. सरपंच आपल्याच पक्ष व गटाचा होण्यासाठी निवडून आलेले सदस्य, नेते व कार्यकर्ते यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.  पलूस तालुक्‍यातील भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडी, भिलवडी, माळवाडी, बुरुंगवाडी, धनगांव, नागठाणे, नागराळे, रामानंदनगर, दह्यारी, तुपारी, आंधळी, मोराळे व सुर्यगाव या गावच्या ग्रामपंचायत निवडणूका चुरशीने पार पडल्या. कॉंग्रेस पक्षाने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले.  ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते सरपंच पदाच्या आरक्षण सोडत व सरपंच निवडीकडे. लवकरच सरपंच पदासाठी सोडत निघेल. त्यानंतर सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणूकांपेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि पक्षातून नाराजी आली तर मग कटातटातील ईर्षेपोटी ग्रामपंचायत निवडणूक लढवली जाते. भावकीतील जुने वाद व इतर भांडणे चव्हाट्यावर येतात.अगदी तशीच परिस्थिती ग्रामपंचायत निवडणूकित पहायला मिळाली.  ग्रामपंचायत म्हणजे गांवचे मिनिमंत्रालय असते. आता मोठ्या प्रमाणावर विविध योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतीकडे येते. रस्ते, गटार,आरोग्य ,स्वच्छता यासाठी कोट्यवधी रुपये ग्रामपंचायतीकडे येतात. त्यामुळे सरपंच आपल्याच मर्जीतला असावा तसेच सरपंच पदाची संधी मलाच मिळावी. अशी नूतन सदस्याची इच्छा असते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकिनंतर सरपंच निवडीसाठी नेते, कार्यकर्ते व नूतन सदस्य यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.  सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग  सरपंच पदासाठी प्रत्येक नूतन सदस्य इच्छुक आहे. मात्र, प्रतीक्षा आहे ती सरपंच आरक्षण सोडतीकडे. त्यानंतर हालचालींना आणखी वेग येणार आहे. काठावर बहुमत असलेल्या गावात सदस्यांवर नेते व कार्यकर्ते यांनी पाळत ठेवली आहे.     संपादन : प्रफुल्ल सुतार  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3p0co3x

No comments:

Post a Comment