गाव कारभाऱ्यांवर आज शिक्कामोर्तब ! ग्रामपंचायतींसाठी 12 लाख 85 हजार 921 मतदार  सोलापूर : गावाच्या विकासासाठी थेट ग्रामपंचायतीला निधी देण्याचे धोरण केंद्र व राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून स्वीकारले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तुलनेत आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतींमधील चार हजार 943 सदस्य निवडण्यासाठी आज (शुक्रवारी) मतदान होत आहे. गावचे कारभारी निवडण्यासाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे.  सोलापूर जिल्ह्यातील 657 ग्रामपंचायतींमधील 6 हजार 227 सदस्य निवडणुकीसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतीच्या सदस्य निवडी बिनविरोध झाल्याने आता 657 पैकी 587 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. ग्रामपंचायतीच्या 6 हजार 227 सदस्यांपैकी 1 हजार 218 सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे तर 68 जागांसाठी एकही अर्ज न आल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत.  उर्वरित चार हजार 943 जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी 12 लाख 85 हजार 921 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी सहा लाख 23 हजार दोन एवढ्या महिला मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या सहा लाख 62 हजार 904 एवढी आहे. या निवडणुकीसाठी इतर पंधरा मतदारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील 2 हजार 307 प्रभागांमधून सदस्य निवडले जाणार असल्याने या निवडणुकीसाठी 2 हजार 325 मतदान केंद्रे तयार केली आहेत. मतदानासाठी 3 हजार 23 कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर 11 हजार 625 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सोमवारी मतमोजणी  आज होणाऱ्या मतदानाची मतमोजणी सोमवारी (ता. 18) त्या - त्या तालुक्‍यांच्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीबाबतचे सर्व अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये काय निकाल लागतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  संपादन : श्रीनिवास दुध्याल News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 14, 2021

गाव कारभाऱ्यांवर आज शिक्कामोर्तब ! ग्रामपंचायतींसाठी 12 लाख 85 हजार 921 मतदार  सोलापूर : गावाच्या विकासासाठी थेट ग्रामपंचायतीला निधी देण्याचे धोरण केंद्र व राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून स्वीकारले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तुलनेत आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतींमधील चार हजार 943 सदस्य निवडण्यासाठी आज (शुक्रवारी) मतदान होत आहे. गावचे कारभारी निवडण्यासाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे.  सोलापूर जिल्ह्यातील 657 ग्रामपंचायतींमधील 6 हजार 227 सदस्य निवडणुकीसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतीच्या सदस्य निवडी बिनविरोध झाल्याने आता 657 पैकी 587 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. ग्रामपंचायतीच्या 6 हजार 227 सदस्यांपैकी 1 हजार 218 सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे तर 68 जागांसाठी एकही अर्ज न आल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत.  उर्वरित चार हजार 943 जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी 12 लाख 85 हजार 921 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी सहा लाख 23 हजार दोन एवढ्या महिला मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या सहा लाख 62 हजार 904 एवढी आहे. या निवडणुकीसाठी इतर पंधरा मतदारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील 2 हजार 307 प्रभागांमधून सदस्य निवडले जाणार असल्याने या निवडणुकीसाठी 2 हजार 325 मतदान केंद्रे तयार केली आहेत. मतदानासाठी 3 हजार 23 कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर 11 हजार 625 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सोमवारी मतमोजणी  आज होणाऱ्या मतदानाची मतमोजणी सोमवारी (ता. 18) त्या - त्या तालुक्‍यांच्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीबाबतचे सर्व अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये काय निकाल लागतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  संपादन : श्रीनिवास दुध्याल News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3qnby0M

No comments:

Post a Comment